बाप लेकीचा
अल्लड प्रश्न
साजुक उत्तर
बालक कोण ? पालक कोण ? गुंता दुस्तर
=====
कालचक्र
हलले पान
हसली कळी
झुकुन पाही (सुकली) फुलरांगोळी
======
थोरांची ओळख (?)
आधी पाहू धर्म
मग शोधू जात
ते उत्तुंग कर्तुत्व,सदगुण ई. ठेवू बासनात
========
सहचरी
डोळ्यात धाक
लटका राग
झोपेतही माग ,....जागेपणी विसरल्या आठवणींचा
===========
सहकार्यं यशोधनंम (?)
योजना कागदात
पैसा खिशात
नेता गराड्यात, कास्तकर (मरतो) राड्यात अन खुराड्यात
=============================
इतिहास पुनर्लेखन(?)
प्रश्न विचारू नका
उत्तरे सांगू नका
इतिहास आम्हीच लिहू, भले माहीत नसला तरी (मुद्द्याविना) ठोका
==============================
सदर लिखाण दोन-तीन महीन्यांपुर्वीच केले होते. रा रा धन्याशेठ आणि रा रा वल्ली उर्फ प्रचेतस यांनी धीर दिला म्हणून इथे देत आहे.
सुचवण्या/टीपण्ण्या स्वागतार्ह.
चुकार (किंचीत कवी) नाखु
प्रतिक्रिया
3 Feb 2016 - 2:33 pm | पद्मावति
:) मस्तं!
3 Feb 2016 - 2:49 pm | टवाळ कार्टा
मस्तयं...त्यानिमित्ताने या धाग्यावर पण प्रतिसादांत हायकूंची बरसात पुन्हा होउदे :)
3 Feb 2016 - 2:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
3 Feb 2016 - 2:59 pm | विजय पुरोहित
मस्त नाखुकाका...
3 Feb 2016 - 3:18 pm | होबासराव
ज ब रा ट
इतिहास पुनर्लेखन(?)
प्रश्न विचारू नका
उत्तरे सांगू नका
इतिहास आम्हीच लिहू, भले माहीत नसला तरी (मुद्द्याविना) ठोका
3 Feb 2016 - 4:11 pm | प्रचेतस
कालचक्रं वालं हायकू काळजाला भिडलं.
3 Feb 2016 - 4:36 pm | चांदणे संदीप
+१
:(
3 Feb 2016 - 8:35 pm | सूड
लिहीलंय छान, पण हायकूची शेवटची ओळ इतकी मोठी असते? आय मीन माहीत नाही, कोणी प्रकाश टाकेल का?
3 Feb 2016 - 8:36 pm | प्रचेतस
म्हणूनच त्यांनी पुढे कायकु असे लिहिले असावे.
3 Feb 2016 - 8:36 pm | यशोधरा
आवडल्या हायकू.