पॉपकॉर्न ची गरज आहे का?
पॉपकॉर्न म्हणजे 'मक्याच्या लाह्या' असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. लाह्या म्हणजे यात वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे असे सगळेच खमंग दाणे अध्याहृत आहेत. सोबतीला कोक, पेप्सी, वेफर्स असे वेस्टर्न प्रोडक्ट अॉप्शनल आहेत .
पॉपकॉर्न गरज पडते(च) का? आणी का पडते? -
पहिली गोष्ट म्हणजे खवैय्यांच्या तोंडाला आलेली सपक चव. कित्येक दिवसांत वशाड खायला न मिळाल्याने आलेली हतबलता. रोजचे वरणभात खाऊन चालू झालेले अपचन. यावर ऊतारा म्हणून हे लोक पॉपकॉर्नच्या 'आहारी' जातात.
पॉपकॉर्न खाणारे लोक आळशी असतात असा एक समाजमान्य ग्रह रुढ झाल्याचे ऐकिवात आहे. हे लोक आपल्या गोलमटोल ढेरीवरुन हात फिरवत कोकचे घोट घेत घेत दर दोन मिनिटांनी पॉपकॉर्नचे चार पाच दाणे आपल्या तोंडात टाकत असल्याचे एक कल्पचित्र सध्या प्रकाशात आले असल्याची बातमी आहे.
पॉपकॉर्न खाण्याचा योग्य कालावधी कोणता? -
एखाद्या चांगल्या धाग्यावर वा रंगलेल्या चर्चेवर पद्धतशीपणे काडी सारुन 'धाग्याचा कश्मीर करणे' वा चर्चा भरकटवणे या प्रकारात पॉपकॉर्नची चव अधिक लज्जतदार होत असल्याचा दावा नुकत्याच एक जालमित्राने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.
नवलेखकांच्या पहिल्या धाग्यांवर पॉपकॉर्नच्या खपाने नेहमीच ऊच्चांक गाठल्याचे निरिक्षण आहे.
एखादा लेखक जेव्हा आपल्या धाग्यात अर्धवट माहिती, बालिश मुद्दे, अतर्क्य प्रसंग टाकून स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करतो त्यावेळेस पॉपकॉर्नशिवाय इतर कोणताही पदार्थ खपल्याचे ऐकिवात नाही असे हॉटेल मालकांनी सांगितल्याची नोंद आहे.
प्रतिक्रिया
26 Jan 2016 - 8:55 pm | कंजूस
प्रश्न आणि उत्तर दोन्ही दिल्याने वाचकांस पॅापकॅर्न निमुटपणे गिळण्याशिवाय ( आणि कागद सीटखाली फेकण्याशिवाय ) पर्याय नाही.
26 Jan 2016 - 8:59 pm | विजय पुरोहित
खिक्क.....
26 Jan 2016 - 10:35 pm | सुरवंट
बर नवीन प्रश्न-
तुम्हाला कोणत्या धाग्यावरचे पॉपकॉर्न अधिक चविष्ट लागले?
कोणत्या बऱ्या धाग्यांना तुम्ही पॉपकॉर्नधागे बनविले?
तुमच्या एखाद्या धाग्याचा पॉपकॉर्न झालाय काय?
( # पॉपकॉर्न आणि आपण - सर्वक्षण)
26 Jan 2016 - 9:45 pm | आनन्दा
सुंदर.. आवडले. खरे तर खरेकाकांच्या गंभीर धाग्याचे विडंबन केले म्हणून थोडा रागच आला होता. पण धागा वाचून तो कुठच्या कुठे पळाला. खरेच अत्यंत संयत, तरीही खुमासदार, आणि मुख्य म्हणजे मूळ धाग्याच्या कल्पनेशी साधर्म्य सांगणारे विडंबन.
मला तरी आवडले बुवा.
26 Jan 2016 - 9:48 pm | सतिश गावडे
गंभीर धाग्याचे विडंबन करू नये असा काही मिपाचा नियम आहे का? :)
26 Jan 2016 - 11:06 pm | टवाळ कार्टा
यईच्च बोल्ताय
26 Jan 2016 - 11:09 pm | सुबोध खरे
अहो ती फक्त शाब्दिक कसरत आहे. त्यात सिरियस होण्यासाखे काय आहे ? पोटभर हसा आणि सोडून द्या
27 Jan 2016 - 10:44 am | आनन्दा
नियमावर बोट ठेवायला मी काय संपादक आहे का?
ह. घ्या. (हसून घ्या :))
27 Jan 2016 - 9:23 am | पगला गजोधर
26 Jan 2016 - 10:08 pm | सुबोध खरे
सुन्दर लेखन
26 Jan 2016 - 11:33 pm | चांदणे संदीप
खरं तर मूळ धाग्यावर चाललेल्या समुद्रमंथनात मी माझा चमचा घेऊन ढवळायला चाललो होतो पण तिथे डांगे अण्णा, विठा, म्हात्रेकाका आणि स्वये श्री खरेसर यांची घुसळणी पाहून चमचा मध्ये घालावा का नको या विचारात पडलो... मग कुठे जाव असा विचार करत असतानाच हा धागा आला! :) हे मिपाचं मला ज्याम आवडतं! काहीही लिहा... लोक्स विडंबनाला तयार! असो, आता आलोय तर चमचाचा वापर करतोच!
तर, मंडळी मिपावर तुम्ही असाल तर बऱ्याचदा पॉपकॉर्न घेऊन बसायची वेळ येते. मिपामुळे तुम्हाला पॉपकॅर्नचं व्यसन लागू शकते. त्यात वाईट काहीच नाही असे माझे वैयक्तिक मत आहे! पॉपकॉर्न मुळे इथल्या जिलब्या सुसह्य होतात असे माझे निरीक्षण आहे! शिवाय पॉपकॉर्न मिळतेही स्वस्त आणि सहज! पॉपकॉर्नच्या वापरामुळे मिपावर येत्या काळात बंधुभाव/भाईचारा वगैरे वाढेल असाही माझा दाट विश्वास आहे. आता थांबतो!
चला, घ्या पॉपकॉर्न!
Sandy
27 Jan 2016 - 2:07 pm | खटासि खट
पकॉ ची गरज आहे का?
27 Jan 2016 - 7:57 pm | राघवेंद्र
+१
27 Jan 2016 - 2:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येऊन द्या अजुन जिल्ब्या. सॉरी पॉपकॉर्न.
अजुन मस्साला पाहिजे होता, पॉपकॉर्न लैच सपक झाले आहे.
-दिलीप बिरुटे
27 Jan 2016 - 2:45 pm | सुरवंट
लै मसाला टाकला की 'ताटली' बिघडते. मग हाटिल मालक केराचा डब्बा ऊघडून दावतात. :-(
27 Jan 2016 - 5:32 pm | अजया
सिनेमाला गेल्यावर बरेच लोक पाॅपकाॅर्न घेऊन खातात.
तेच अतिपरिचयात अवज्ञा या न्यायाने रोज खाल्ले तर चविष्ट पाॅपकाॅर्न सुद्धा साधारण वाटू लागतात. यासाठी थोड्या थोड्या काळाने वेगळे काही तरी फ्लेवर ट्राय करावे. यातून काही लोक चाॅकलेट फ्लेवर खातात तर कोणी टोमॅटो मसाला विथ बटर आणि चवीत विविधता आणण्याचा प्रयत्न करतात. अर्थात काही काळाने त्याचाही कंटाळा येतो. असेही बर्याच लोकांकडून ऐकले आहे. बरेच लोक सिनेमाला गेले की पाॅपकाॅर्न न घेता समोसे खातात याचे कारणही हेच आहे की नेहमीच्या रुटीन खाण्यातून मुक्तता मिळाली की सिनेमा बघायला पण एक वेगळा आयाम येतो.
27 Jan 2016 - 9:06 pm | टवाळ कार्टा
हाच प्रतिसाद त्या धाग्याच्या विषयाच्या संबंधाने वाचला.....कहर आहे =))
28 Jan 2016 - 1:46 am | अन्नू
टका.. असं चारचौघात बोलून दाखवू नये! :P
27 Jan 2016 - 5:47 pm | धडपड्या
पॅापकॅार्न खाताना बरेच लोक्स फांद्यांचे रिझर्वेशन करताना दिसतात.. त्याचे काय प्रयोजन? व्यवस्थित दिसावे, की, व्यायाम?
28 Jan 2016 - 8:41 pm | पैसा
सुरक्षित अंतरावर राहायचा प्रयत्न.
27 Jan 2016 - 6:25 pm | सूड
पॉपकॉर्नऐवजी समर्थ पर्याय उपलब्ध होईपर्यंत पॉपकॉर्न हवेच!!
(मवाळ गार्ठा)
28 Jan 2016 - 1:54 am | अन्नू
29 Jan 2016 - 12:09 am | सुरवंट
खी खी
27 Jan 2016 - 7:40 pm | किचेन
सालिच्या लाह्याना फोडनि दिलि कि त्याहि जास्त भारि लागतात.काय गरज अाहे ह्या सगल्याचि.
27 Jan 2016 - 7:43 pm | सूड
मुदलात सालीच नसेच तर तिच्याकडून लाह्या कश्या आणणार?
27 Jan 2016 - 7:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रमाणलेखनाची गरज - या विषयावर एक निबंध पाडण्यापेक्षा हा संवाद दाखवावा.
27 Jan 2016 - 9:06 pm | टवाळ कार्टा
त्या पेक्षा "सालीच्या लाह्या" यावर निबंध लिहा की ;)
28 Jan 2016 - 11:13 am | डॉ सुहास म्हात्रे
मिपासारख्या उच्च अभिव्यक्तिच्या संस्थळावर अश्या शिव्या देणे शोभत नाही ;)
28 Jan 2016 - 1:34 pm | टवाळ कार्टा
छ्या...तुमाला कळ्ळेच्च नै...मी शिवी बद्दल नै..."आधी घरवाली" बद्दल लिहिले ;)
28 Jan 2016 - 2:41 pm | सूड
तर काय? सरळ सरळ शिव्या देतात म्हणजे काय? आमच्या बालपणी अगदी गर्भशास्त्रापासून भूगर्भशास्त्रापरेंत उद्धार करणार्या शिव्या ऐकल्या असतील आम्ही, पण इथे साल्या वैगरे पण खपवून घेणार नाही बरं!!
7 Mar 2016 - 11:19 pm | किचेन
साळिच्या लाह्या ़अस लिहायच होत मला.
27 Jan 2016 - 7:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
उत्तम विडंबन. सुडंबनच म्हटलं पाहिजे.
27 Jan 2016 - 10:27 pm | पैसा
माहितीपूर्ण लेख! =))
28 Jan 2016 - 2:01 am | खटपट्या
अभ्यासपूर्ण लेख :)
28 Jan 2016 - 10:47 am | तर्राट जोकर
किती वर्षात किती भुकेल्या लोकांना पॉपकॉर्न खायला घातले, तुमच्या कडे किती वर्षाचा कुठल्या कुठल्या थिएटर,सिनेमांचा अनुभव आहे, गॅस्ट्रोनॉमीमधे तुम्ही डॉक्टरेट केली आहे का हे सर्व कळल्याशिवाय लेखातल्या मुद्द्यांना व पॉपकॉर्नविषयीच्या तुमच्या मतांना विश्वासार्हता मिळणार नाही. दणदणित आकडेवारीचे वजन पाहिजे.
28 Jan 2016 - 1:03 pm | सुबोध खरे
आकडेवारी उत्तम जमली तर भारत अमेरिकाच काय सर्व जगाला विकत घेऊ शकेल हेही सिद्ध करता येईल
28 Jan 2016 - 2:40 pm | नाखु
पॉपकॉर्न मुळे देशी लाह्यांची संस्क्रुती लयास गेली असे आम्हाला नाव सांगण्याच्या अटीवर अखिल मिपासंस्क्रुती रक्षक समीतीच्या (तहहयात) अध्यक्षांनी सांगीतले.
दै जाग(रण) साठी नाखु मिपाकरवाला
29 Jan 2016 - 9:40 am | पगला गजोधर
घरी उशिरा टीव्हीसमोर बेडवर, बरेच लोक पाॅपकाॅर्न घेऊन खातात.
ते एकप्रकारे पॉपकॉर्नक्रीडाच साजरी करत असतात, अश्या या पॉपकॉर्नक्रीडेचे तीन भाग आहेत.
सेवनपूर्वक्रीडा, प्रत्यक्ष पॉपकॉर्नसेवन, सेवनपश्चातक्रीडा. सिनेमा/टीव्ही पाहताना लक्ष ही सेवनक्रीडा स्वयंचलित
मज्जासंस्थेद्वारे नियंत्रित केली जात असावी. म्हणूनच परिस्थितीअनुरूप प्रतिसाद आपोआप मिळतो.
उदा. तोंडात आपोआप लाळ येते, कधी ती टपकु लागते, म्हणूनच पॉपकॉर्नमधून उत्कृष्ठ चव मिळावी की ज्यायोगे
त्याचे सुंदररसग्रहण आपल्या मनाच्याही जिव्हेवर दीर्घकाल टिकावे, या दृष्टीने पॉपकॉर्नसेवनक्रीडेचे अनन्यसाधारण महत्व आहे. पॉपकॉर्नसेवनक्रीडा म्हणजे पार्टीसिपंटनी पंचज्ञानेंद्रीयाच्या वापराणे, पॉपकॉर्नसेवनाचे परमसुख अनुभवणे.
पॉपकॉर्नसेवनादरम्यान दृष्टी, रुची, श्रवण, गंध, स्पर्श याचा पार्टीसिपंटनी सुखउद्दिपानार्थ वापर केल्यास, उत्कृष्ठ अनुभव येतो. वैयक्तिक स्तरावर पाहिले, तर पॉपकॉर्नसेवनक्रीडेशिवाय मनुष्य जगू शकतो, ती नैसर्गिक सहजप्रेरणेमुळे होत असली, तरी ती अन्नग्रहण, श्वसन, झोप ई. प्रमाणे अटल नाही.
29 Jan 2016 - 9:45 am | संदीप डांगे
तो ग्रेटपणे थिंकलेला प्रतिसाद टाका बघु कोणीतरी इकडे. आमची तेवढी प्रतिभा नाही.
29 Jan 2016 - 11:03 pm | बोका-ए-आझम
जेव्हा एक पुरुष एका स्त्रीला पाॅपकाॅर्न देतो तेव्हा त्याच्या बोटांचा स्पर्श जो तिच्या हाताला होतो त्यामुळे तिला पाॅपकाॅर्न खायची इच्छा निर्माण होते. सत्तरीच्या दशकात पुरूषांची बरोबरी करण्याच्या उद्देशाने अमेरिकेतल्या स्त्रियांनी खायला सुरूवात केली. पण खरं सांगायचं तर स्त्रियांना भूक लागतच नाही.
- आबासाहेब आंधळे
29 Jan 2016 - 11:15 pm | संदीप डांगे
जमेश!!!! =))