त्या गर्दीत हो समोरी
उभी दिपस्तंभासम ती
तिज पाहुनीच भुललो मी
ती मृगनयने लखलखती
ती भासे खट्याळ हरिणी
चुकवीत नजरेचे बाण
मग अखेर नयने भिडतां
हरपले स्वतःचे भान
मग नजरेतूनच पटली
खुणगाठ अंतरी मजला
अदृश्य जाहलीच गर्दी
दे हाक मानसी तिजला
बोलले न काहि कोणी
तरी सर्वकाही समजले
पुजारी जरी शब्दांचा
शब्दांवाचून जिंकले
टिपः
गेल्यावेळी बर्याच चुका केल्या होत्या आता काहि सुधारणा आहे का अजूनहि घोळ आहे हे नक्की सांगा
प्रतिक्रिया
2 Jan 2009 - 9:12 am | मदनबाण
ती भासे खट्याळ हरिणी
चुकवीत नजरेचे बाण
मग अखेर नयने भिडतां
हरपले स्वतःचे भान
छान.. :)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
2 Jan 2009 - 10:46 am | विसोबा खेचर
बोलले न काहि कोणी
तरी सर्वकाही समजले
पुजारी जरी शब्दांचा
शब्दांवाचून जिंकले
मस्त रे!
तात्या.
2 Jan 2009 - 11:20 am | अवलिया
मस्तच रे!
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
2 Jan 2009 - 8:40 pm | धनंजय
कल्पना.
**(गोव्यातील देवळांत दीपस्तंभ मोठे धिप्पाड असतात - त्यामुळे ही उपमा खट्याळ हरिणीसारख्या अल्लड "तिच्या"साठी पटली नाही.)**
2 Jan 2009 - 8:43 pm | लिखाळ
लखलखती मृगनयने फार आवडली.
कविता मस्तच.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
3 Jan 2009 - 7:47 pm | ऋषिकेश
सर्व प्रतिसाद देणार्यांचे मनापासून धन्यवाद
**धनंजय,
दिपस्तंभाची उपमा लिहिताना धिप्पाडपणा का कोण जाणे डोळ्यासमोर नाहि आला. फक्त सागराच्या (गर्दीच्या) मधे उभा असणारा आणि लक्ष वेधून घेणारा तो दिपस्तंभ असे काहिसे डोक्यात होते. अर्थात दिपस्तंभाचा "धिप्पाडपणा"डोक्यात घेतला तर उपमा चुकीची वाटते हेहि खरेच. हा विरोधाभास नजरेत आणून दिल्याबद्दल धन्यु!**
- ऋषिकेश