भारतिय वंशाचे अंतोनिओ लुई सान्तोस दा कोस्टा हे २६ नोव्हेंबर २०१५ पासून पोर्तुगाल या देशाचे पंतप्रधान झाले आहेत.
सप्टेंबर २०१४ मध्ये ते सोशियालिस्ट पार्टी या पोर्तुगालच्या मुख्य विरोधी पक्षाचे सेक्रेटरी जनरल बनले. ते लिस्बन या पोर्तुगालच्या राजधानीचे मेयर (२००७ ते २०१५) होते. या अगोदर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर (१९९७ ते १९९९), मिनिस्टर ऑफ जस्टिस (१९९९-२००२) व मिनिस्टर ऑफ स्टेट अँड इंटर्नल अॅड्मिनिस्ट्रेशन (२००५ ते २००७) या पदांवर काम केलेले आहे.
लुई अल्फोन्सो मारिया दा कोस्टा हे त्यांचे आजोबा गोव्यात जन्मले होते. गोव्यात जन्मलेले त्यांचे वडील ओरलँडो दा कोस्टा लेखक व कवी होते. १९६१ मध्ये लिस्बनमध्ये जन्मलेल्या अंतिनिओंना त्यांचे वडील बाबुशा या टोपणनावांने हाक मारत असत. त्या नावाने ते सद्याही ओळखले जातात असे बातमीत म्हटले आहे. त्यांचे गोव्यात नातेवाईक आहेत आणि आजही मडगावमध्ये वडीलोपार्जित घर आहे.
त्यांच्या काटकसरी जीवनपध्दतीमुळे त्यांना "लिस्बनचे गांधी (Gandhi of Lisbon)" असेही म्हटले जाते !
प्रतिक्रिया
27 Nov 2015 - 11:34 pm | चिंतामणी
१९६१ मध्ये लिस्बनमध्ये जन्मलेल्या अंतिनिओंना त्यांचे वडील बाबुशा या टोपणनावांने हाक मारत असत. त्या नावाने ते सद्याही ओळखले जातात असे बातमीत म्हटले आहे.
गोवा काळे आहे की गोरे हे या माणसाने कधितरी पाहिले आहे का?
27 Nov 2015 - 11:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
वर दिलेल्या बातमीत काही खोटे आहे किंवा काही अतिशयोक्त लिहीले आहे का ? की काही दावे केले आहेत का ?
27 Nov 2015 - 11:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
अच्छा, अच्छा, बहिर्गोल भिंगातून पाहणार्यांसाठी, विनंती करून शीर्शकात थोडा बदल करवून घेतला आहे. ;) :) खूष ?!
28 Nov 2015 - 7:15 am | पगला गजोधर
'भारतीय वंशाची व्यक्ती पोर्तुगालमधे पंतप्रधानपदी बसते', यावर तिथल्या विरोधी लोकांनी तमाशा / धांगडधिंगा / मुंडण करून आजीवन श्वेतवस्त्रं वै छापाचे वांझोटे प्रयत्न केले की नाही ?
28 Nov 2015 - 2:43 pm | चिंतामणी
लुई अल्फोन्सो मारिया दा कोस्टा हे त्यांचे आजोबा गोव्यात जन्मले होते. गोव्यात जन्मलेले त्यांचे वडील ओरलँडो दा कोस्टा लेखक व कवी होते. १९६१ मध्ये लिस्बनमध्ये जन्मलेल्या अंतिनिओंना
मुळचे पोर्तुगिज असणारे आणि गोव्यात कधिही न आलेली व्यक्ती वडिलांचा जन्म गोव्यात झाला म्हणून "भारतिय" वंशाचे कसे होतात? हे तर्कशास्त्र समजले नाही.
बाकी तमाशा / धांगडधिंगा / मुंडण हे नंतर बघू.
28 Nov 2015 - 5:27 pm | बोका-ए-आझम
या दोन देशांच्या वसाहतींमध्ये एक गोष्ट समान असायची - ती म्हणजे मिश्रवंशीय लोक. शुद्ध वंशाचे स्पॅनिश किंवा पोर्तुगीज हे सर्वोच्च पदी असायचे. त्यांच्या खालोखाल मिश्ररक्ताच्या लोकांचा
(स्थानिक स्त्रिया आणि स्पॅनिश/पोर्तुगीज पुरुष)नंबर यायचा. त्यानंतर या मिश्ररक्ताच्या लोकांच्या आपापसातल्या संततीचा नंबर यायचा. हे पोर्तुगीज पंतप्रधान कदाचित तसे असतील.
28 Nov 2015 - 6:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
दा कोस्टा यांचे आजोबा धर्मांतराने रोमन कॅथॉलिक झालेल्या गोव्यातील हिंदू घराण्यातील होते. ही माहिती आंतरजालावर अनेक ठिकाणी सापडेल.
*** हे कोस्टांवर कोणत्याही प्रकारचा हक्क सांगण्यासाठी नाही (उगाच अजून गैरसमज नको !) तर केवळ वरच्या प्रश्नाचे समाधान आहे. :)
28 Nov 2015 - 2:48 pm | होबासराव
पगला गजोधर आपले बराक ओबामांबद्द्ल काय मत आहे ? कारण ते आफ्रिकन वंशाचे आहेत पण त्यांचा जन्म अमेरिकेतच झालाय त्यामुळे ते अमेरिकेचे अध्यक्ष होउ शकले. आणि बाबुशा ह्यांच जन्म सुद्धा त्याच देशात झालाय ज्याचे ते पंतप्रधान झालेयत.
यावर तिथल्या विरोधी लोकांनी तमाशा / धांगडधिंगा / मुंडण करून आजीवन श्वेतवस्त्रं वै छापाचे वांझोटे प्रयत्न केले की नाही ?
हे सरळ सरळ सोनिया गांधीना लागु होतय आणि माझि सहानुभुति आहे आपल्या बरोबर तरि पण आपलि ईच्छा ह्या जन्मि तरि पुर्ण नाहि होउ शकणार त्याना सर्वोच्च पदी बघण्याची.
प्रस्तुत लेखात इए काकानी माहिति दिलिय कोणाला काहिहि वाटो पण मला मात्र ते वाचुन आनंद झालाय इतके वर्ष पोर्तुगालानी भारताच्या काहि भुभागावर राज्य केल, आज पंतप्रधान म्हणुनच का असेना एक भारतीय वंशाची व्यक्ति पोर्तुगाल वर राज्य करतेय. हेहि नसे थोडके. इए काका धन्यवाद ह्या माहिति करिता.
28 Nov 2015 - 5:48 pm | बोका-ए-आझम
भारताच्या पंतप्रधान होऊ शकत होत्या. त्यावेळी भाजपच्या लोकांनी टोकाची भूमिका घेतली होती आणि शरद पवारांनीही १९९८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना याच कारणासाठी केली होती. पण ही राजकीय कारणं आहेत. तसं म्हणायचं तर डाॅ.मनमोहन सिंग यांचं जन्मगाव आज पाकिस्तानात आहे. एल्.के.अडवानींचं सुद्धा. पण त्याने काहीही फरक पडला नाही.
28 Nov 2015 - 6:16 pm | पगला गजोधर
ज्यावेळी फिजी चे भारतीय वंशाचे अध्यक्ष यांना, ते अ-फिजी वंशाचे आहेत म्हणून बंड होवून पदच्युत करण्यात आलेले (पिढ्यान पिढ्या तिथे राहूनही ), तेव्हा इथे भारतात परकीय मुद्द्यावरून रान उठवणारे, जेव्हा फिजी प्रतिनिधींना, भारताचे कन्सर्न सांगायला गेले, तेव्हा फिजीने, त्यांना त्यांच्या नाकाला लागलेला शेंबूड दाखवून दिलेला, मग हे मुग गिळून गप्प बसलेले.
28 Nov 2015 - 9:34 am | उगा काहितरीच
अगदी डाक्टर सारखे दिसतात , नाही ?
.
.
.
(मला "डॉक्टर लिहीता येते)
28 Nov 2015 - 9:46 am | आनन्दा
कंचा डाक्टर?
28 Nov 2015 - 5:29 pm | उगा काहितरीच
कंच्या बी डागटरवाणी दिसतोय बगा ह्यो गडी .
बगा मणजे आमच्या इकडल्या दवाइखान्यातील डागटर आक्षी आसाच दिसतो.
28 Nov 2015 - 9:48 am | आनन्दा
त्यांचे भारताबद्दलचे व्ह्यु (हे कसे लिहायचे बाबा) वगैरे काही उपलब्ध आहे का?
28 Nov 2015 - 10:39 am | बोका-ए-आझम
म्हणजे पोर्तुगीज राजवट संपुष्टात आली तेव्हा ते जन्माला आले.
28 Nov 2015 - 10:49 am | प्रदीप
माझ्या माहितीप्रमाणे, गोव्यातील अनेक कॅथॉलिक व्यक्तिंचे पोर्तुगालशी अतिशय 'जिव्हाळ्याचे' संबंध आहेत. काही वर्षांपूर्वी त्यातील अनेकांना पोर्तुगीजांनी येथून जातांना नेलेले त्यांचे सोने परत करण्यात आले. ह्यातील अनेकजण स्वतःस पोर्तुगीजांचे वंशज अधिक व भारतीय, कमी असे समजतात, असे म्हटले तर ते अतिशयोक्त ठरू नये.
आणि हे अगदी कॅथॉलिक्सांपुरते मर्यादित आहे असेही नाही. माझ्या माहितीच्या एका सधन हिंदू कुटुंबियांकडेही पोर्तुगीज पासपोर्ट्स आहेत.
थोडक्यात गोव्यात आजही पोर्तुगीज राजवटीशी निष्ठावंत असलेले अनेकजण असण्याची दाट शक्यता आहे. माझे हे अॅनेकडोटल निरीक्षण चुकिचेही असू शकते. ह्याविषयी अर्थात येथील गोवास्थित मंडळी अधिक सांगू शकतील.
28 Nov 2015 - 11:18 am | संदीप डांगे
असेच विचार आले होते मनात....
28 Nov 2015 - 8:22 pm | मोगा
गोव्याच्या सर्वच लोकाना पोर्तुगालचा पासपोर्ट बाय डिफॉल्ट मिळतो.. पोर्तुगीज सरकार त्याना आजही नागरिक मानून पासपोर्ट देते.
त्ञामुळे सर्व गोवेकरांकडे दोन पासपोर्ट असतात ( म्हणे )
28 Nov 2015 - 8:34 pm | अनुप ढेरे
चूक असावं. भारत डुअल सिटीझनशिपची परवानगी देत नाही.
28 Nov 2015 - 9:05 pm | मोगा
माझ्या रूम पार्टनरकडे दोन पासपोर्ट होते.
29 Nov 2015 - 1:23 pm | बोका-ए-आझम
.
29 Nov 2015 - 9:18 am | बिपिन कार्यकर्ते
१. पोर्तुगीज कायद्यानुसार, कोणत्याही वसाहतीत, त्या वसाहतीवरचे पोर्तुगीज राज्य संपुष्टात यायच्या आधी जन्मलेल्या व्यक्तीला, त्या व्यक्तीने आपल्या जन्माची नोंद पोर्तुगालमध्ये करून घेतली तर पोर्तुगीज नागरीकत्व मिळते. इतकेच नव्हे, तर त्या व्यक्तीच्या, पुढील ३ पिढ्यांनादेखील आपोआप पोर्तुगीज नागरीकत्व मिळते. या कायद्याचा लाभ घेऊन, अनेक गोवेकर पोर्तुगीज नागरीकत्व मिळवत आहेत. असे नागरीकत्व मिळविण्याचे प्रमुख कारण म्हणजे, पोर्तुगालचे नागरीकत्व मिळाले की मग युरोपमध्ये मुक्त संचार आणि रोजगाराच्या संधी या दोन्ही गोष्टी घडून येतात. याच आशयाची बातमी काहीच दिवसांपूर्वी इंग्रजी माध्यमातून वाचायला मिळाली होती, त्यातून हे ज्ञान मिळाले.
२. या सगळ्या प्रक्रियेमागे निष्ठा वगैरे भानगडी नाहीत, तर केवळ भौतिक सुखाची आस इतकाच प्रॅक्टिकल मुद्दा आहे. अनेक ख्रिश्चनेतर कुटुंबेही हे करत आहेत.
***
भारत दुहेरी नागरीकत्व स्वीकारू देत नाही. दुसर्या देशाचे नागरीकत्व स्वीकारायचे झाले तर भारतीय पासपोर्ट सरंडर करावा लागतो. त्यामुळे, गोव्यातील लोकांना साहजिकच पोर्तुगीज पासपोर्ट घेताना भारतीय पासपोर्ट परत करावा लागतो. कोणी तसे केले नसेल, तर तो अर्थातच गंभीर स्वरूपाचा दंडनीय अपराध आहे.
28 Nov 2015 - 11:11 am | परिकथेतील राजकुमार
काय लोकांना कौतुक असते ना.
भारतीय वंशाचा माणूस हाम्रिकेत मंत्री, भारतीय वंशाचा माणूस गूगलमध्ये, भारतीय वंशाचा माणूस सिनेट मध्ये, भारतीय वंशाचा माणूस अमक्या तमक्याचा सल्लागार, भारतीय वंशाचा माणूस फलाना देशाचा संघात, भारतीय वंशाचा माणसाला नोबेल....
आणि एक दिवस मग तो भारतीय वंशाचा माणूस करकचून पेकाटात लाथ घालतो आणि भारतावरती तोंडसुख घेतो. मग कानफाडात मारल्यागत गप बसावे लागते.
28 Nov 2015 - 2:45 pm | चिंतामणी
काय लोकांना कौतुक असते ना.
बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना.
28 Nov 2015 - 11:19 am | डॉ सुहास म्हात्रे
केवळ एक रोचक बातमी म्हणून टाकलेल्या व कोणताही दावा ने केलेल्या धाग्यावरच्या काही टिप्पण्या वाचून मनोरंजन झाले ! :)
कुठल्याही गोष्टीकडे कुठलाही चष्मा न घालता बघणे सद्या बरेच कठीण झाले आहे असेच दिसते ! ;) असो.
28 Nov 2015 - 2:47 pm | चिंतामणी
सहमत.
28 Nov 2015 - 11:46 am | मी-सौरभ
तुमचा आय डी हैक झाला की क्काय?
असा प्रश्न ऊभा करणारा धागा आहे हा....
28 Nov 2015 - 8:54 pm | DEADPOOL
पराशेठ व बोकाशेठ +१११११११
30 Nov 2015 - 2:27 pm | नितीनचंद्र
काहींना शंका वाटली म्हणुन लिहितो. तेंका काकुची प्रतिक्रिया आयलेन टी व्हीत. काय बोल्ली ते काय कळ्ळा नाय.
30 Nov 2015 - 3:13 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अंत्याचे अभिनंदन. विकिपिडियात ही माहिती आहे-
His father was of Goan, Portuguese, and French descent.टोनीचे वडिल काही वर्षे गोव्यात होते एवढा उल्लेख आहे.
अंत्या हुमण,तोंडाक खात असेल की नाही ह्याविषयी शंका आहे.
30 Nov 2015 - 3:46 pm | बॅटमॅन
माईशी (नेहमीप्रमाणे) सहमत.
30 Nov 2015 - 3:58 pm | स्पा
ओह आय सी
30 Nov 2015 - 4:26 pm | शब्दबम्बाळ
In 2012-13, of around 2,200 Goa residents who got Portuguese nationality, 500 were government employees, a matter of concern for the Indian state.
15 Dec 2015 - 1:25 pm | पालीचा खंडोबा १
एक महत्वाची माहिती अशी कि जेव्हा भारताने गोव्याची पोर्तुगीचापासून मुक्तता करण्यासाठी गोव्यावर हल्ला केला आणि गोवा मुक्त केला तेव्हा बरेच धर्मांतरित गोवेकर पोर्तुगाल ला गेली कारण त्यांची निष्ठा पोर्तुगालवर होती आणि दुर्दैवाची बाब म्हणजे ती धर्माधिष्टीत होती त्याचे कारण असे कि भारत हिंदू बहुल देश असल्याने अल्पसंख्याकाना वाटले कि त्यांचे धार्मिक उच्चाटन केले जाईल.
आता झालेले पोर्तुगालचे पंतप्रधान तिकडेच जन्मले आहेत त्यामुळे आपल्याला हुरळून जाण्याचे कारण नाही.
बरेच बहुसंख्य ख्रिस्ती गोवेकर हि पोर्तुगाल राजवटिविरुध्द होते त्यात काहीच शंका नाही. गमतीचा भाग म्हणजे काही मुळ पोर्तुगीज असलेल्या पण भारतात जन्मलेल्या लोकांनी सुध्दा पोर्तुगाल सत्तेस विरोध केला होता