लहान मुले प्रश्न विचारून भंडावून सोडतात हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेलच.
आपण चकित होतो की हा विचार ते कसा करतात - जो साधा, सोपा, थेट आणि जिज्ञासेने भरलेला असतो - आपली असा विचार करायची शक्ती कुठे आणि केव्हां बरं हरवली? असा प्रश्न पडतो.
माझ्या मुलाच्या बाबतीत घडलेले काही चुटके देतोय, आपल्या अवतीभवती घडलेले असेच अनुभव इथे येवोत.
------------------------------------------------------------------------
माझ्या मुलाचा (वय वर्षे ६) आणि माझा कालच झालेला संवाद -
तो - शेतकर्याच्या शेतात गाय बैल कुठून येतात.
मी - त्या गाय बैलांचे आई-वडील त्यांना जन्म देतात.
तो - पण ते आई-वडील कुठून येतात?
मी - शेतकरी त्यांना जंगलातून घेऊन येतो.
तो - त्याला कसं कळतं की ते जंगलात आहेत आणि तो त्यांना कसा आणतो?
मी - सगळे प्राणी आधी जंगलात होते त्यामुळे तो जंगलातून त्यांना घेऊन येतो आणि ट्रकमधे घालून आणतो.
तो - (फारसं पटलेलं नसावं पण माझा एकूण चेहरा पाहून त्याला दया आली असावी!) त्याला कसं कळतं की कोणत्या आकाराचा ट्रक घेऊन जायचा?
मी - अरे, तो मोठाच ट्रक, एटीन व्हिलर, नेतो म्हणजे प्राणी छोटे असले तरी बिघडत नाही आणि मोठे असले तरी बसतीलच.
तो - पण ते डायनासॉर सारखे मोठे असले तर??
मी - ?? (विषय बदलला!)
------------------------------------------------------------------------
त्याला एकदा कोणती तरी पौराणिक कथा सांगत होतो तेव्हा 'विष्णू' चा संदर्भ आला - त्याने लगेच विष्णूचे पूर्ण नाव विचारले.
मी त्याला सांगितले की मला त्याच्या वडिलांचे नाव माहीत नाही पण त्याचे लास्ट नेम 'शेषशायीवाले' असं होतं!
------------------------------------------------------------------------
परवा मी गाडीतून त्याला घेऊन एकेठिकाणी निघालो होतो एकदम मला नवीन रस्त्याने जाण्याची हुक्की आली, लगेच गाडी तिकडे हाकली -
त्याने लगेच विचारले - बाबा इकडून कुठून चाललाय?
मी - अरे हा रस्ता आपल्याला जायचंय तिकडेच जाणार असा माझा अंदाज आहे.
तो - कशावरून?
मी - अरे आपण नेहेमी जातो ना त्या रस्त्याची दिशा आणि आत्ता जातोय त्याची दिशा ह्यांच्यावरुन.
तो - आर यू शुअर?
मी - अगदी १००% नाही पण बर्यापैकी..जवळपास तरी पोचूच, चुकणार नक्की नाही!
तो - तुम्ही पुढे काय घडणार हे कसं सांगू शकता?
मी - अनुभवाने.
तो - पण प्रत्येकवेळी ते बरोबर असेलच हे कशावरून? जगात ते कोणीच सांगू शकेल असे मला वाटत नाही! (लोकहो, वय वर्षे ६ चे बालक हे बोलत होते - मी बघतच राहिलो!)
नंतर मी योग्य ठिकाणी पोचलो पण अंतर्मुख होऊनच!
--------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
15 Feb 2008 - 1:04 am | विसोबा खेचर
जगात ते कोणीच सांगू शकेल असे मला वाटत नाही! (लोकहो, वय वर्षे ६ चे बालक हे बोलत होते - मी बघतच राहिलो!)
खरंच आश्चर्य आहे!
नंतर मी योग्य ठिकाणी पोचलो पण अंतर्मुख होऊनच!
खरं आहे. एक गोष्ट मात्र नक्की रंगराव, की हल्लीची मुलं जाम स्मार्ट आहेत. त्यांना एक्स्पोझरच एवढं मिळतंय की काही विचारू नका.
थोडंसं स्पष्ट आणि ग्राम्य शब्दात सांगायचं झालं तर आजकालच्या मुलांच्या तुलनेत आपण त्यांच्या वयाचे असताना आपण अक्षरश: चुत्या आणि बावळट्ट होतो असंच निदान मला तरी वाटतं!
असो..
आपला,
(८ वर्षाच्या गंप्या गोडबोलेचा) तात्यामामा! :)
अवांतर - रंगराव, आपल्या लेकालाही येथूनच अनोकोत्तम शुभाशिर्वाद देतो आणि त्याला त्याच्या लाईफमध्ये सुयश चिंतितो! :)
तात्या.
16 Feb 2008 - 3:23 am | चतुरंग
आपलं म्हणणं खरं आहे, मुलं जाम स्मार्ट झाली आहेत. कधी कधी नको इतकी!
अहो डी.व्ही.डी. प्लेयर आणल्यापासून १/२ तासात हे वायरिंग करुन, रिमोट्ची सगळी फंक्शन्स शिकून डी.व्ही.डी. बघायला बसतात - तो पर्यंत मी यूजर मॅन्युअलच चाळत असतो!:((
आपण गाडीतून ताशी १०० कि.मी. वेगाने जाताना शेजारून गेलेली गाडी ही होंडा, बी.एम्.डब्ल्यू., टोयोटा, मर्सिडिज कि लेक्सस हे त्यांना समजलेलं असतं आणि शिवाय त्यातली महाग कोणती आणि आपल्या बापाकडे ती नाही म्हणजे आपण गरीब आहोत का? हा प्रश्नही येतो! मी तर हल्ली आपण गरीब आहोत असं माझ्या चिरंजिवांना सांगूनच टाकलंय; हो, उगीच दरवेळी प्रश्नोत्तराचा त्रास नको!
बाकी आपण त्यांच्या वयाचे असताना जाम म्हणजे जामच चम्या होतो ह्यात काही वाद नाही! बापाला असले प्रश्न विचारणे सोडाच पण मनातही कधी आले नाहीत असे वाटते!
आपल्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद, लेकापर्यंत पोचवतो, पाहू या काय म्हणतोय ते!
चतुरंग
15 Feb 2008 - 2:00 am | प्राजु
माझ्या मुलाचे प्रश्न..
दि. २५ जाने.च्या रात्री मी techsatish.com झी मराठीवर गुडमॉर्निंग महाराष्ट्र पहात होते. मुलगाही होता सोबत. भारतात तेव्हा २६ जाने. चि सकाळ होती. त्यामुळे या कार्यक्रमात बरिचशी देहभक्तीपर गाणी लावली होती. त्यात ते शूर आम्ही सरदार, तसेच दादा कोंडकेंचे डौल मोराच्या मानंचा हे ही गाणे होते. त्याने शूर आम्ही सरदार अगदी मनलावून पाहिले.
तो : आई, ते बघ काका कसे घोड्यावरून जातायत...
मी : हो.. छान आहे ना गाणं?
तो : आई, उद्या मलासुद्धा असाच घोडा आणूया का? म्हणजे रोज तू नको गाडी घेऊन येऊ मला स्कूलला सोडायला.. मीच जाईन घोडा घेऊन.
मी : अरे तसा घोडा नाही पाळता येत.
तो : का? डॉगी आणि कॅट पाळता येते तर घोडा का नाही. आणि त्याला बांधायला पॅटीओ पण आहे आणि बाहेर लॉन पण आहे ना त्याला बसायला..
(मी हताश)
दुसरे गाणे त्याने पाहिले दादा कोंडकेंचे. त्यात त्याला मी दाखवली बैलगाडी.
मी : ती बघ, याला बैलगाडी म्हणतात. तू पाहिली नाहिस ना अजून कधी?
तो. हो का? आता कुठे आहे ती गाडी?
मी : अरे.. आता नाही दिसत ती बैलगाडी. जवळजवळ बंदच झाली.. शहरात कोणी नाही वापरत.
तो : का बंद झाली?
मी : अरे.. आता शहरात म्हणजे पुण्यात आपलं घर आहे तिथे नाही दिसत बैलगाडी.. बंद झाली ती.
तो : बंद पडली? मग ती दुरूस्त का नाही करत?
(मी हताशपणे त्याच्याकडे पहात बसले)
- प्राजु
15 Feb 2008 - 8:51 am | भडकमकर मास्तर
बाहेर लॉन पण आहे ना त्याला बसायला..
(मी हताश)
>>>मग ती दुरूस्त का नाही करत?
फारच छान प्रश्न...
अवांतर : तशी हल्ली बर्याचदा टीव्ही वरती देहभक्तीपरच गाणी चालू असतात... :)))
17 Feb 2008 - 2:34 pm | सुधीर कांदळकर
लाकडी असते. ती गाडी मजबूत नसते. घोडा घाण करतो, मोटार करत नाही. त्याचे अन्न ठेवायला जास्त जागा लागते पेट्रोलला कमी. घोडा दमतो. जास्तीत जास्त ४०० कि, मी. धाऊ शकतो. मोटार अनेक ड्रायव्हर असतील तर कितीही. घोडा आजारी पडतो. मोटार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे द्या. आमचा मुलगा पण (त्याच्या) लहानपणी असे प्रश्न विचारत असे. पण आम्ही हात टेकले नाहीत.
15 Feb 2008 - 8:48 am | भडकमकर मास्तर
अगदी खरंय...
...लहान लहान पोरांना कंप्युटर मधल्या सुद्धा इतक्या गोष्टी माहित असतात , आश्चर्य वाटते...
15 Feb 2008 - 9:14 am | एकलव्य
हिलरी आणि ओबामा यांचे सी एन एन वरील रोज झडणारे वादविवाद पाहून आमच्या ३ वर्षाच्या कन्येचा (निरागस!@!@?!प्रश्न:
हे दोघे एव्हढे भांडतात तर मग लग्न का नाही करत?
(आता बांधा तुमचे अंदाज... हॅप्पी व्हलेन्टाईन डे)
15 Feb 2008 - 10:20 am | कोलबेर
ह ह पु वा!!!
15 Feb 2008 - 10:32 am | नंदन
'हिलरी'यस :)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
25 Dec 2008 - 12:21 pm | निखिलराव
खरचं १ नंबर........
रोज बायकोची बडबड सहन करणारा,
निखिल
15 Feb 2008 - 9:22 am | प्राजु
कसले अंदाज बांधता डोंबलाचे... तोंडात बोट घालायची वेळ येते अशा प्रश्नांनी..!
- प्राजु
आवांतर : देहभक्तीपर टाईपिंग मिस्टेक.. देशभक्तीपर असे म्हणायचे होते.
15 Feb 2008 - 10:09 am | भडकमकर मास्तर
हिलरी आणि ओबामा यांचे सी एन एन वरील रोज झडणारे वादविवाद पाहून आमच्या ३ वर्षाच्या कन्येचा (निरागस!@!@?!प्रश्न:
हे दोघे एव्हढे भांडतात तर मग लग्न का नाही करत?
:))))))))
15 Feb 2008 - 10:56 am | प्रभाकर पेठकर
एकदा मुंबैच्या दादर स्थानकावर गाडीची वाट पाहात उभा होतो. गाड्या लेट होत्या. त्यामुळे नॅचरली इतर 'बघण्या'सारख्या प्राणिमात्रांचे निरिक्षण चालले होते.
जवळच एक कुटुंब उभे होते. तरूण नवरा -सुंदर बायको - निरागस मुलगा (गुडघ्या इतका). जरा इथे तिथे पाहिल्यावर लक्षात आले जवळपासचे सर्वच 'बघे' तिच्याकडेच बघत होते.
एवढ्यात चिंट्याला 'शू' लागली. त्याने आईला सागितले. आईने बाबांना सांगितले. बाबांनी त्याला प्लॅटफॉर्मच्या कडेला नेऊन त्याची चड्डी खाली केली आणि म्हंटले, 'हं! कर.' चिंट्यालाही गंमत वाटली त्यानेही 'एंजॉय' करत, रेल्वेचे दोन्ही रूळ, लाकडी स्लिपर्स फूल्ल भिजवायचा प्रयत्न केला. झालं. चड्डी वर झाली. लोकं कौतुकाने हा सोहळा न्याहाळत होते.
गाडी बरीच लेट होती. आणि संसर्गजन्य सवय म्हणा की खोड म्हणा. आता बाबांना 'शू' लागली. ते हळूच बायकोच्या कानात पुटपुटले आणि स्थानकाच्या टोकाशी असणार्या मुतारीकडे निघून गेले.
चिंट्याला प्रश्न पडला. बाबा कुठे गेले?
त्याने आईला विचारले, 'आई, बाबा कुठे गेले?'
आई म्हणाली,' मला नाही माहित, कुठे गेले ते.'
पण चिंट्या पाठ सोडतो थोडाच,' पण जाताना ते तुला सांगून गेले नं'
आता आली का पंचाईत. मुलांशी खोटे बोलू नये असे मानसशास्त्र सांगते.
आईने खाली वाकून त्याच्या कानात हळूच सांगितले,' ते नं, शू करायला गेलेत.'
चिंट्याने तात्काळ, आख्ख्या प्लॅटफॉर्मला ऐकू जाईल एवढ्या, मोठ्या आवाजात विचारलं,' पण त्यांनी इथेच का नाही केली माझ्या सारखी?'
त्या माऊलीला हा प्लॅटफॉर्म दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं, असं झालं.
बाबा दूर गेल्यामुळे त्या ललनेकडे जास्त मनमोकळेपणे टक लावून पाहणार्यांची मात्र करमणूक झाली.
15 Feb 2008 - 2:38 pm | धमाल मुलगा
जगात ते कोणीच सांगू शकेल असे मला वाटत नाही! (लोकहो, वय वर्षे ६ चे बालक हे बोलत होते - मी बघतच राहिलो!)
ही मुल॑ हल्ली अशक्य म्हणजे अशक्य झाली आहेत बॉ.
हिलरी आणि ओबामा यांचे सी एन एन वरील रोज झडणारे वादविवाद पाहून आमच्या ३ वर्षाच्या कन्येचा (निरागस!@!@?!प्रश्न:
हे दोघे एव्हढे भांडतात तर मग लग्न का नाही करत?
हे हे लय भारी
आईने खाली वाकून त्याच्या कानात हळूच सांगितले,' ते नं, शू करायला गेलेत.'
चिंट्याने तात्काळ, आख्ख्या प्लॅटफॉर्मला ऐकू जाईल एवढ्या, मोठ्या आवाजात विचारलं,' पण त्यांनी इथेच का नाही केली माझ्या सारखी?'
त्या माऊलीला हा प्लॅटफॉर्म दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं, असं झालं.
च्यामारी आचरट कार्ट !
आई, उद्या मलासुद्धा असाच घोडा आणूया का? म्हणजे रोज तू नको गाडी घेऊन येऊ मला स्कूलला सोडायला.. मीच जाईन घोडा घेऊन...डॉगी आणि कॅट पाळता येते तर घोडा का नाही?
हेच म्हणालो होतो मीही...तिर्थरुपा॑नी कानामाग॑ अरबी घोडा काढला होता ते॑व्हा. निदान मरताना तरी माझी ही इच्छा पुर्ण होईल अशी आशा आहे :)
27 Feb 2008 - 8:02 pm | अन्या दातार
हिलरी आणि ओबामा यांचे सी एन एन वरील रोज झडणारे वादविवाद पाहून आमच्या ३ वर्षाच्या कन्येचा (निरागस!@!@?!प्रश्न:हे दोघे एव्हढे भांडतात तर मग लग्न का नाही करत?
वा! काय सवाल है? कोई जवाबही नही.
हात दाखवून अवलक्षण : मग, तू कोणाबरोबर भांडतोस?????????
15 Feb 2008 - 9:31 pm | छोटा डॉन
माझ्या 'आत्तेभावाचा मुलगा', वय ७ वर्षे , 'काँव्हेन्ट मध्ये' शिकतो , फावल्या वेळात ' आज-तक, स्टार न्युज सारखे भिकार चॅनेल्स' पाहतो, आवडीने 'पुणे टाईम्स ' चाळतो , 'क्रिकेटची अतिआवड '..........
भारताने 'ऑस्ट्रेलियाचा कसोटी मालिकेत ' मार खाल्ल्यानंतर आमच्यात घडलेला साधारणता आथवेल असा संवाद .....
मी : काय मग लीली , मॅच बघितली का ? [ खरे नाव 'सलिल' पण शाळा आणि मित्रात 'लीली' , चूकून सुध्धा सलिल म्हणल्यास भोकाड किंवा समोरच्याच्या वयावर 'डिपेंड' लाथाबुक्क्या ठरलेल्या ..........]
लीली : येस , आय सीन अ बिट .... [ उत्तरे कटाक्षाने 'इंग्लिश' मध्ये .... नाहितर आतून आईची ' लीली ऽऽऽऽऽऽ ' अशी आरोळी ]
मी : इंडिया प्लेड गूड नो ? बट बॅड लक .........
लीली : यप ... बट 'धोनी' इज 'बॅड प्लेयर' , ही मस्ट थ्रोन आऊट ....
मी : कारे , मस्त खेळतो की तो , सिक्स वर सिक्स हाणतो .... [ मी जास्त वेळ नाही बोलु शकत त्याच्या भाषेत ....]
लीली : हॅट , ही वॉज गूड इन पास्ट , नाऊ सो बोअरिंग .......
मी : कारे ?
लीली : दॅट टाईम 'लाँग हेअर' होते ना त्याचे .... नाऊ दे आर शॉर्ट ....
मी : व्हॉट्स दी रिलेशन ?
लीली : 'लाँग हेअर' गीवस पावर ऍज लाईक 'खली ' & 'हर्क्युलस ' [ खली हा 'WWE' मधला समजावा. ... ]
मी : बरं बाबा ....
लीली : यु नो व्हाय ही ट्रीम्ड हीस हेअर ???
मी : नाही बाबा ? का बरे ?
लीली : ती " ओम शांती ओम " म्हणाली ना कट कर म्हणून .... [ ईथे मी बोल्ड , " ओम शांती ओम " म्हणजे 'दिपीका पदूकोणे' , तीचा धोनीशी संबंध याला ह्या वयात समजतो .... धन्य ती न्युज चॅनेल्स, पेपर्स आणि ही नवी पिढी ....]
मी : हा हा हा . हू टोल्ड यु सच थिंग्स ???
लीली : टीव्ही वर सांगत होते .... व्हॉट यू थिंक , लाँग हेअर गिव्हस पावर नो ?
मी : [ हतबल होऊन ] हो , दॅट्स ट्रू ....
लीली : देन , ही मस्ट ग्रो हेअर लाँग , करेक्ट ?
मी : करेक्ट , आय वील पुट १ मेल टू हीम .......
लीली : १ क्वेश्चन फॉर यू .............
लीली : व्हाय डोन्ट यू गो फॉर लाँग हेअर्स ????
मी : [ आश्चर्याने ] का बाबा ?
लीली : नो , लूक्स गूड , गर्ल्स लाईक्स इट .....
यू हॅव लोट्स ऑफ 'गर्लफ्रेन्ड्स ' नो ? [ त्याला अजून 'गर्लफ्रेन्ड' आणि 'फ्रेन्ड गर्ल ' यातील फरक कळत नाही ....]
मी : ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ
लीली : टेल मी ......... [ आवाजात जबर , म्हणजे न ऐकल्यास ५ मिनीटाच्या आत 'लत्तप्रहार' ह्या शस्त्राचा वापर होऊ शकतो .....]
मी : [ स्वयपाकघराकडे बघत ] वहिनी , निघतो मी आता ....
बाय लीली , सम अनादर टाईम ड्युड , आय नीड टू गो ...........
लीली : ओके, बाय , आय अल्सो नीड टू फिनिश माय ' होमवर्क' .......
मी : [ मनातल्या मनात , म्हणजे च्यायला आम्हीच 'बिनकामी ' ] ओके , बाय ..........
15 Feb 2008 - 10:28 pm | बुध्दू बैल
शाळेतील मुलांसाठी एनटीएस, बीटीएस सारख्या आठवी नववीतील स्पर्धात्मक परीक्षांवर व्याख्यान द्यायला आलेल्यांनी मुलांनो काही शंका असल्यास विचारा असे म्हटले. त्यावर एका पाचवीतील मुलाने विचारले,
२९ फेब्रुवरीला जन्मलेल्या मुलाचा वाढदिवस दर चार वर्षांनी येईल, मग त्याने मतदान कधी करावे??
16 Feb 2008 - 9:20 pm | स्वाती राजेश
मुलगा वय वर्षे ५ आणि आजोबा महाद्वार रोड(कोल्हापूर) वरून निघालेले आहेत.
तिथून काही माणसे एक तिरडी घेऊन पंचगंगा नदीकडे निघाली आहेत.
मुलगा आजोबांना विचारतो, "आजोबा ते काय आहे?"
आजोबा त्याच्या विचाराला झेपेल असे उत्तर देतात, "बाळ ती पालखी आहे."
तो विचारतो," तुमची अशी पालखी कधी काढायची?"
हा विनोद नसून, मला असे सांगायचे आहे कि आपण, मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कशी देतो? यावर त्यांची कल्पनाशक्ती काम करत असते.
19 Feb 2008 - 3:41 pm | माझी दुनिया
माझ्या ५ वीतल्या लेकाशी कालच झालेला हा माझा संवाद.
तो : आई ! उद्या शाळेला सुट्टी आहे. आणि परवा आमची गाण्याची परीक्षा आहे.
मी : अच्छा ! मग कोणतं गाणं म्हणणार आहेस तू ?
तो : कोणतं म्हणू ? कोंबडी पळाली ? ढीपाडी ढीपांग ? ये गॊ ये , ये मैना ? चम चम करता ? गालावर खळी ? चला जेजूरीला जाऊ ? सांग कोणतंही...अजून बरेच चॉईस आहेत.
मी : :-(
तो : की वा-यावरती गंध पसरला ? हिरवा निसर्ग हा भवतीने ? मायेच्या हळव्या ? राधा ही बावरी ?
मी : अरे , परीक्षेत ही अशी गाणी म्हटलीस बाई शून्य मार्क देतील.
तो : नाही गं, एकाने म्हटलं सुध्दा.
मी : नाही, नको...कोणतंही देवाचं गाणं म्हणं
तो : शी ! काय गं , तू कोणतं म्हटलेलंस तुमच्या वेळी
मी : मी ? अरे ते ’ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले’. ते म्हण तू पण, चांगल आहे ते.
तो : चल, पकवू नकोस काही तरी गाणं म्हणायला सांगून.
मी : अरे, बाई शाळेतून हाकलून देतील !
तो : अगं नाही, बाईंना आवडतात ही गाणी
मी : कशावरून ?
तो : बाईंनीच आम्हांला सांगितलंय...की त्या आता ४० शी च्या वरच्या लोकांकरता जे ’सारेगमप’ आहे ना त्यात जाणार आहेत.
मी : बाईंनी तुम्हाला हे असं सांगितलं ? :-(
तो : होsssss गं ! आणि मी पटकन उठून बाईंना सांगितलं. बाई तुम्ही जा बिन्धास ! आम्ही सगळे तुम्हाला एसेमेस पाठवू.
(या बोलण्याला सगळ्या वर्गाने दुजोरा दिला.)
मी : :-(((((((((((((((((((((
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
19 Feb 2008 - 4:34 pm | प्रभाकर पेठकर
ये दुनिया ये महफिल मेरे कामकी नही कामकी नही|
असेच म्हणावेसे वाटले असेल नाही?
19 Feb 2008 - 5:13 pm | विसोबा खेचर
मी : बाईंनी तुम्हाला हे असं सांगितलं ? :-(
तो : होsssss गं ! आणि मी पटकन उठून बाईंना सांगितलं. बाई तुम्ही जा बिन्धास ! आम्ही सगळे तुम्हाला एसेमेस पाठवू.
(या बोलण्याला सगळ्या वर्गाने दुजोरा दिला.)
मी : :-(((((((((((((((((((((
हम्म! म्हणजे आमची ही कविता सार्थ आहे!
माझीदुनिया, तुम्हाला एक विनंती. कृपया या कवितेची एक प्रिन्ट आऊट काढून आपल्या लेकासोबत त्याच्या बाईंना वाचण्याकरता पाठवा आणि तात्या अभ्यंकराचा नमस्कारही कळवा!
असो..
दुनिया ये महफिल मेरे कामकी नही कामकी नही|
पेठकरांशी सहमत..
आपला,
(आऊट डेटेड!) तात्या.
27 Feb 2008 - 10:53 am | धमाल मुलगा
सृष्टीताई, लै भारी !बर्याच दिवसा॑नी असा मी असामी मधल॑ काहीतरी वाचायला मिळाल॑.अगदी घरच॑ कोणितरी कित्येक वर्षा॑नी कडकडून भेटाव॑ तस॑ वाटल॑.थ्या॑कू ग॑ !!!! अवा॑तरः आमच्या तिर्थरुपा॑ना उचकवण्यासाठी आम्ही त्या॑ना "फादर" अशी हाक मारायचो, ते भडकले की आम्ही "माग॑ पाय लाऊन" पसार, हे वेगळेसा॑गणे न लगे. असो, तर ही अशी हाक मारण्याची आमची प्रेरणा चि.कु.श॑कर्या धो॑डोप॑त (बे॑बट्या) जोशी (पोष्ट्याचा).- आमच्या आबा॑चा "श॑कर्या"ध मा ल.
27 Jun 2008 - 4:56 am | स्वप्निल..
वय ४ वर्षे ..
एकदा माझी बहीण त्याला हनुमानाची गोष्ट सांगत होती..गोष्टीमध्ये कुठेतरी हनुमानाला खुप भुक लागते..म्हणुन तो आईला म्हणतो..की मला भुक लागलेली आहे..काहीतरी दे..त्यानंतर तो एका झाडावर चढुन फळे खायला लागतो..वगैरे वगैरे..
हे ऐकुन झाल्यावर त्याचा प्रश्न - "मम्मी हनुमान झाडावर का गेला..त्याच्या घरी फ्रीज नव्हता का? त्याची मम्मी फ्रीजमध्ये जेवण ठेवत नव्हती का?"
आता सांगा..त्याचे त्याच्या द्रुष्टीने बरोबर आहे कारण त्याने लहानपनापासुनच फ्रीज बघीतलेला..
स्वप्निल..
27 Jun 2008 - 9:01 am | शितल
माझा लेक ही ३ वर्षाचा आहे प्रच्॑ड प्रश्न विचारत असतो, आणि एका प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ह्या विचारात मी असतानाच दुसरा प्रश्न पुढे,
डोके सगळे मॅकॅनिकल, वस्तु घरात आणली रे आणली की ती तोडुन मोडुन बघायची त्याचे आणि मग जर ती चालली तर त्याच्या शी खेळायचे.
गा़ड्या बद्दल तर प्रच॑ड आकर्षण आहे, वाढदिवसाला देवाला प्रार्थना केली तर देवाला काय सा॑गितले तर म्हणतो सगळ्या गाड्या दे.
27 Jun 2008 - 3:35 pm | वेदश्री
माझा ७ वर्षाचा भाचा तक्रार करतोय.. का गं मावशे, बाबांनी धनुष्यबाण सोडून आता घड्याळ का घेतलं? मागच्या वर्षी तर घड्याळ बंद होतं ना.. मग आता एकदम कसं काय चालू झालं?!!!
दुसरा ८ वर्षाचा भाचा कविता करणे, एकपाठी असल्याने कथाकथन वगैरेमध्ये स्टेज गाजवणे वगैरेत पटाईत. त्याच्याशी झालेला संवाद..
मी : का रे तू मोठा होऊन काय होणार?
तो : अंतराळवीर. ( सध्ध्या अंतराळाचे भूत डोक्यावर स्वार आहे त्याच्या )
मी : तिकडे जाऊन काय करणार मग तू? अंतराळकवी होणार का काय?! ( माझा विनोदाचा क्षीण प्रयत्न )
तो : छ्या ! काय हे आत्या? एलियन्स कवितांमध्ये वेळ वाया घालवत नाहीत काही... मी दगडमातीचे नमुने त्यांच्याकरवी गोळा करून घेतले की त्यांच्याशी चेस खेळेन ! त्यात त्यांना हरवले की मग त्यांना कविता आणि गोष्टी ऐकायला लागतील !!!!!
24 Dec 2008 - 10:31 pm | एकलव्य
BOLT - 3D हा डिजनीचा चित्रपट पाहण्यासाठी तिघे जण गेलो - आम्ही दोघे आणि आमची ४ वर्षांची मुलगी. शेवटच्या मिनिटाला माझ्या बायकोने आम्हाला डिच्चू देण्याचे ठरविले. मुलीच्या आणि नवर्याच्या कटकटीपेक्षा मॉलमध्ये भटकंती करणे तिने पसंद करायचे ठरविले. (वरं पर्वतदुर्गेषु वगैरे वगैरे!) असो... तेव्हा दोनच तिकिटे काढायची ठरली.
अस्मादिक - One Child and One Adult, Please!
तास, दोन तास बोल्टचा धिंगाणा पाहिल्यावर स्टारबक्सपाशी आम्ही तिघे पुन्हा एकत्र आलो. आणखी काही ओळखीची मंडळीही तेथे भेटली. हास्यविनोद भर रंगात आलेले असताना कोणीतरी माझ्या मुलीला विचारले - "काय मग कसा होता पिक्चर?" "बाबा आणि मी बोल्ट पाहिला... खू.....प्प्प्पप छान होता." मग आईकडे वळून बडबड चालूच... "पण आई आमच्याबरोबर आली नव्हती. आई तुझा Adult मुव्ही कसा होता ग?"
;) :))
24 Dec 2008 - 10:42 pm | चतुरंग
एकदम 'CLEAN BOLD 3D' च की!! ;)
चतुरंग
24 Dec 2008 - 11:51 pm | बिपिन कार्यकर्ते
माझी तिसरीतली मुलगी - काही कारणाने तिला एक दिवस शाळेला दांडी मारावी लागली. दुसर्या दिवशी ती शाळेत गेली तेव्हा इतर मुलामुलींनी विचारले की काय झाले वगैरे. पण एक मुलगा तिला म्हणाला 'आय मिस्ड यू'.... नंतर माझी मुलगी मला हे सांगून म्हणाली की 'असं काय बॉयने गर्लला म्हणायचं असतं का?' :D
बिपिन कार्यकर्ते
25 Dec 2008 - 10:57 am | विनायक प्रभू
आई, बाबा पुण्यावरुन आला त्या दिवशी रात्री आंघोळ करतो, ब्रश करतो. रोज का नाही करत.
आमचा- वय वर्ष ५
३ ४ दिवसासाठी पुण्याला जावे लागायचे तेंव्हा.
25 Dec 2008 - 12:33 pm | मराठी_माणूस
ह्याचे बरेच स्पष्टिकरण इथे (http://en.wikipedia.org/wiki/Flynn_effec) मिळु शकेल.
19 Jan 2009 - 11:01 am | एकलव्य
विचारलेला प्रश्न नाही पण एक उत्तर येथे देतो आहे...
डान्सचा क्लास (म्हणजे त्या नावाखाली होणार्या धिंगाणा) संपल्यानंतर आमची कन्या - "आई, मला डान्समध्ये कॄष्ण केले होते पण म्हणाले मला गोपीच व्हायचे आहे. फक्त गोपींनाच दांडिया खेळायला आहेत कॄष्णाला नाहीत :) ".
त्यावर आम्हा दोघांकडून मवाळ/जहाल भाषेत ... हसू दाबत तत्वज्ञान "पण असे मला हे नको ते नको असे म्हणायचं नाही. आता काही तू बेबी नाहीस. नेहमी काही आपल्याला पाहिजे तेच मिळतं असं नाही." ... ... ... त्यावर आम्हाला अगदी समजावणीच्या सुरांत मिळालेले उत्तर - "नाही$$$ असं नाही काही. मी टिचरला सांगितले की मला गोपी व्हायचयं, कृष्ण नाही. प्लीज म्हणून सांगितलं की सगळं मिळतं!"
विप्रंच्या नाही म्हणण्याबद्दलच्या लेखास खरेतर ही प्रतिक्रिया द्यायची होती. पण तो शोधायचा कसा हे न जमल्याने येथे डकविली आहे. अर्थात येथेही ती अवांतर आहे असे नाही. ;)