महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते.
1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही.
2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला.
3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले.
4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली.
5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली.
6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे.
7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला.
8. रावणाला दहा तोंडे होती.
9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
प्रतिक्रिया
27 Oct 2015 - 6:29 pm | द-बाहुबली
हा दुसरा आयडी(डुप्लीकेट न्हवे) घेउन नांदत आहे. पहीला आयडी निश्कासीत आहे.
27 Oct 2015 - 7:28 pm | द-बाहुबली
अस्वस्थामाजी मला तुमचं वागणं/बोलनं मला मनापासुन आवडलं... म्हणजे तुम्ही माझा प्रोफाइल धुंडाळणे मला आवडले म्हनतो.
कारण शक्य आहे मी जे बोलतोय त्याचे पुरेसे ज्ञान मला नसावे, हे ही शक्य आहे की मी चर्चेच्या ओघात अतिशय दिशाभुल करणारे विधान या धाग्यावर करत असेन, कदाचीत हे ही शक्य आहे की तुमचेच म्हणने योग्य असेल पण यासगळ्या गदारोळात मात्र मला तुमचं हे असं वागणं कमालीचं सुखावुन गेलं...
कारण चर्चा चालु असताना आपल्या मिपावयावर कमेंट येणं हे चर्चेतच समोरील व्यक्तीकडुन आपले प्रोफाइल धुंडाळले जाण्याचे लक्षण आहेच अन ऐन चर्चेत ते धुंडाळले जाणे फक्त तेंव्हाच व त्या व्यक्तीकडूनच घडते जेंव्हा चर्चेतील आत्मविश्वास/ठामपणा आपण योग्य अथवा अयोग्य असुनही कमी पडू लागतो.. आन चालु चर्चा तशीच सोडुन द्यायचा विचार मनाच्या कोपर्यात कुठेतरी घर करायला सुरुवात करतो, म्हणून मला आवडलं... आपलं वाग्णं व ते कमेंट करणं मला आवडलं... कारण अशा चर्चात हे घडलं पाहिजे.
इश्वराचे/चमत्काराचे अस्तित्व नाकारणे, हटयोग अभ्यास नसणे अशा बाबी सगळ्यात सोप्या अन थिल्लर असतात, हे करायला विचारवंत बनायची अजिबात गरज नसते... पण अशा धाग्यांवर गांभीर्य हवं असेल तर विचार-मंथन झालं पाहिजे, नुसता थिल्लरपणा नको. बाजुची विरोधी दोन्ही मते वाचायला भ्यासायला त्यावेळीच आवडतात. म्हणून हे घडलं पाहिजे. असो, धन्यवाद.
27 Oct 2015 - 8:34 pm | असंका
आर ओ एफ एल....:-))
(रच्याकने मी पण ह्या अशाच भावनेतून आधी प्रोफाईल बघून प्रतिसाद देतो कधी कधी.)
27 Oct 2015 - 6:15 pm | वगिश
माहिती मला नवीन आहे. आपणास ही कला साध्य आहे काय?? किंवा तसे कुणाला ओळखता काय?? ह्यावर अधिक माहिती दिली तर उत्तम.
27 Oct 2015 - 1:05 pm | मार्मिक गोडसे
असणारंच. ह्या समसंखी १० तोंडांमुळेच रावणाला डोक्यांचा तोल सांभाळता येत नव्हता. एका बाजूला ४ डोकी व दुसर्या बाजूला ५ डोकी, ह्या असमतोलपणामुळे मान वाकडी व्हायची व नजरही वाकडी झाली. बिचारा रावण !
27 Oct 2015 - 1:08 pm | हेमंत लाटकर
बाहुबली तम्ही केलेले स्पष्टीकरण बरोबर वाटत नाही.
पराशर कडून सत्यवतीला व्यास हा मुलगा लग्नाआधी झाला. तरीही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही.
कृष्णाने सुदर्शन चक्राने सुर्याला झाकले.
त्यावेळेस ग्रहण असेल.
27 Oct 2015 - 1:42 pm | द-बाहुबली
चंद्राला कधीच कुठेच सुदर्शनाची उपमा दुरुनही नाही त्यामुळे ग्रहण नेमके घडवणे हे सुदर्शन सोडण्यापेक्षा खचितच अवघड काम आहे म्हणून ग्रहणाची थ्योरी बाद वाटते. विज्ञान ग्रहणाला मानते म्हणून त्याला महाभारतात असे प्रक्षीप्त करणे चुक आहे.
27 Oct 2015 - 1:13 pm | कानडाऊ योगेशु
एक खरे तोंड असावे बाकीचे नऊ डुप्लिकेट आय.डी. इथे मि.पा वर ही असे दशानन बेंबीत बोटे घालत फिरत असतात.
27 Oct 2015 - 5:26 pm | द-बाहुबली
दशानन नामक एकच आयडी मिपावर आहे आणी त्यानी आपल्या बेंबीत बोटे घालत का फिरावे जरा स्पश्ट कराल काय ? बेंबीला काही प्रॉब्लेम ?
27 Oct 2015 - 1:22 pm | चित्रगुप्त
"कोमार्य भंग" वाचून कोमात गेलो होतो , आत्ता कोमा भंग होऊन जागा झालो .
27 Oct 2015 - 1:49 pm | द-बाहुबली
तुमी जुसिंग करता, विपश्यनाही केली आहे, मग तुम्हाला साधना करायचा अनुभव आहे हे नक्कि. आपण सश्रध नाही तरीही आपणास हटयोग अवश्य साध्य आहे. तो सुधा विपश्यनेप्रमाणे अभ्यासाने साध्य होणारा प्रवास आहे. इश्वर श्रध्देची नितांत आवश्यक्ता अजिबात नाही. जुसिंग अभ्यासाने जसे सिक्स पॅक बनवायचा आपला मानस आहे तसेच याला हटयोगाची जोड देउन आपण पुन्हा तरुण बनु शकता, व मग बनवलेल्या सिक्सपॅकचा वापर निव्वळ दर्शनापलिकडेही (तुम्हाला) होइल. अनायसे तुम्हाला साधनेची सवय आहेच त्याला आता हटयोगाची अवश्य जोद द्या, काळ, सवयी व वय आपणास नक्किच अनुकुल आहे. गंभिर्याने विचार करा.
27 Oct 2015 - 4:17 pm | चित्रगुप्त
@ द - बाहुबली: हठयोगासाठी प्रेरित केल्याबद्दल आभारी आहे . योग्य वेळ आली, की तेही घडेल.
27 Oct 2015 - 5:28 pm | द-बाहुबली
मला मनःपुर्वक वाटते तुम्हाला हे नक्कि जमु शकेल. धन्यवाद.
(अन्यथा हटयोगाचे तव्तज्ञान पुरेसे न पटुन त्याचे वाभाडे निघणारा एक धागा तरी अवश्य प्रसेल, ज्याचे स्वागतच आहे.)
27 Oct 2015 - 1:30 pm | चित्रगुप्त
काल घडलेली खरी घटना ब्रेकिंग न्यूज बनून आज विस्मरणात जाते, महाकाव्ये हजारो वर्षे टिकतात ती त्यातील कल्पनाविस्तारामुळे. उगाच तथाकथित वैज्ञानिक कसोट्या लावण्यची गरज नाही .
27 Oct 2015 - 1:36 pm | जेपी
हाफशेंच्युरी निमीत्त लाटकर सायबांचा सत्कार ,महाभारत आणी रामायणाची एक एक प्रत देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक - जेपी आणी तमाम विस्तववादी कार्यकर्ते.
27 Oct 2015 - 1:43 pm | प्यारे१
>>> महाभारत आणी रामायणाची एक एक प्रत
कुठल्या लेखक आणि प्रकाशकाची ते पण नक्की करा. ;)
27 Oct 2015 - 2:09 pm | नाखु
विसू: दिलेल्या (आवृत्ती) प्रतीतील पात्रे आणि त्यांची माहीती इथेच तपासून घेणे नंतर कसलीही तक्रार चालणार नाही वा प्रत बदलून मिळणार नाही
सचि(ड्)व
सत्कार समीती
27 Oct 2015 - 2:25 pm | तुडतुडी
कसलीहि अतिशयोक्ती वगेरे काही नाही .कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणतात न तसंच आहे हे . दैवी शक्ती , मंत्र शक्ती जाणून घ्यायची किवा तिचा अनुभव घ्यायची आपली कुवत नसते . आपला त्या विषयातला तेवढा अभ्यास नसतो म्हणून मग अतिशयोक्ती वाटतं आणि आपण स्वताची तर फसवणूक करतोच पण लोकांचीही दिशाभूल करून रामायण , महाभारताबद्दल आणि एकूणच हिंदू अध्यात्माबद्दल गैरसमज पसरवायचं काम चोख बजावतो .
27 Oct 2015 - 5:00 pm | मारवा
लाटकर जी
तुमचे मागचे धागे जे होते त्यात जे विचार व्यक्त झाले होते
त्या सर्वांशी तुलना केली तर हा धागा सर्वथा वेगळा वाटतो.
इतकं मोठ वैचारीक परीवर्तन इतक्या अल्पावधीत
एकदम कोकिळाव्रता पासुन नियोगा पर्यंत ?
हे कस काय ?
27 Oct 2015 - 5:04 pm | होबासराव
सतरंजी चोर दादु चा तर ह्यात हात नाहि ?
27 Oct 2015 - 5:09 pm | मारवा
यात डावा हात असावा
एक जाहीरात आठवतेय जुनी एस्सेल वर्ल्ड ची
भुलभुलैय्या मे खोया है पाटकर
27 Oct 2015 - 5:45 pm | हेमंत लाटकर
@ तुडतुडी अतिशयोक्ती का नाही.
1. सत्यवतीला लग्नाआधी व्यास झाले तरी ती कुमारी कशी राहील.
2. यम, वायू, इंद्र, अश्विनीकुमार या देवांपासून कुंती व माद्री या राण्यांना मुले झाली.
3. त्यावेळेस चंद्रग्रहण लागले असेल.
4. समुद्राची पातळी वाढल्यामुळे व्दारका बुडाली असावी.
5. भुकंपामुळे कोकण भागाची निर्मिती झाली असेल.
6. गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे कसे शक्य आहे.
7. बाण मारून समुद्राची पातळी कशी कमी होईल.
8.रावणाला दहा तोंडे कशी असतील.
9 संजिवनी बुटी हिमालयात सापडते.
27 Oct 2015 - 6:20 pm | मारवा
लाटकर जी
तुमच्या बदलत्या भुमिकांमुळे संभ्रम निर्माण होतो .
विचार पुर्णपणे बदलण्यात काही म्हणजे काहीच गैर नाही
पण इतक्या वेगाने कस हो तुमचा स्टॅन्ड बदलतो हे अनाकलनीय आहे थोडं.
वरचा प्रतिसादातला विनोदाचा भाग सोडा पण तुम्ही खरचं सीरीयस आहात का धाग्याच्या विषयाशी ?
27 Oct 2015 - 6:27 pm | शब्दबम्बाळ
ज्या गोष्टी आपल्या विवेक बुद्धीला योग्य वाटतात त्यांचे अनुकरण करावे किंवा विश्वास ठेवावा(अर्थात त्याने इतरांना काही त्रास होत नाही ना याचाही थोडा विचार व्हावा) , ज्या पटत नाहीत त्या तपासून पहाव्यात. तरीही नाहीच पटल्या तर सोडून द्याव्यात...
आता महाभारत/रामायण वैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिले गेले आहे असे मला तरी वाटत नाही. त्यामुळे त्यांना कलात्मकतेच्या कसोटीवर न पाहता वैज्ञानिक कसोटीवर तोलणे गैर वाटते.
27 Oct 2015 - 7:20 pm | ऋतुराज चित्रे
पराशर कडून सत्यवतीला व्यास हा मुलगा लग्नाआधी झाला. तरीही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही.
आधुनिक शास्त्रानुसार हे शक्य आहे. सुक्ष्म सुईद्वारे कृत्रिम रेतन करून स्त्रीचे कोमार्य टिकवणे शक्य आहे. व गर्भाची पुर्ण वाढ झाल्यावर त्या गर्भवती स्त्रीचे सिझेरिअन डिलिव्हरी केल्यास तीचे कोमार्य टिकून राहील.
27 Oct 2015 - 7:34 pm | याॅर्कर
पराशरांना सत्यवतीप्रति कामवासना जागृत झाली होती,त्यांनी संबंध प्रस्थापित केले.
आणि वासना जागृत झालेला मनुष्य तुम्ही सांगतलेली पद्धत वापरेल काय?
27 Oct 2015 - 9:39 pm | आनंदी गोपाळ
आधुनिक शास्त्रानुसार → वॉव!
आपल्या चरणकमलांचा फोटू व्यनि करा. व्हॅटिकन सिटीमधे डकवीन म्हणतो. इम्मॅक्युलेट कन्सेप्शन (ऑफ आयडियाज) बर्का ;)
(रच्याकने. सिझरच्या काळात अर्थात रोमन लोकांच्या काळात उदयाला आलेल्या या शस्त्रक्रियेने जीझस ऑफ नाझारेथचा जन्म झालेला असण्याची शक्यता पडताळून पहायला हवी. तुम्हाला त्या काळच्या सिझरियन सेक्शनबद्दलचे काही ज्ञान आहे काय? असल्यास टंकण्याचे करावे ही नंर इनंती.)
कठीण शब्दांचे अर्थः
रच्याकने : रस्त्याच्या कडेने. बाय द वे.
नंर : नम् र
28 Oct 2015 - 12:07 pm | द-बाहुबली
आधुनिक शास्त्रानुसार कॉस्मेटीक सरजरी करुन हायमेन पुर्ववत करता येतो की नाही ? म्हणून हीच ती प्रोसेस होती म्हणत मी याला नक्किच प्रक्षीप्त करणार नाही.
पण मुळात पुराणातील गोष्टीत आधुनीक शास्त्रच होते असे अजिबात मानत नाही कारण आधुनीक शास्त्र आणि पुराणातील गोश्टीत महत्वाची तफावत म्हणजे सामान्य माणसाला त्याचा उपयोग करायचा नसलेला अधिकार. जसे पुराणात विमान होते तर होते पण त्याचा सामान्य व्यक्तीला उपयोग काय ? पण आधुनीक शास्त्राचे विमानातु मात्र जो कोणी पैसा फेकेल तो तिकीट काढुन त्यातुन फिरुन येइल पैसा जास्त असेल तर विमान विकतही घेइल. त्यामुळे मला आधुनीक शास्त्रातील तंत्र्ज्ञान व पुराणात वर्णन केलेल्या गोष्टींच्या तंत्रज्ञानात कमालीची तफावत आहे.. उगा भारतीयांनी ते पुर्वीपासुन आधुनीकच होते याची टीमकी मारणे बंद केले पाहीजे.
स्वगतः- आता इथे सिन्सीअर चर्चा वगैरे घडणार आहे की काय ? तेवडी कुवत आहे ?
27 Oct 2015 - 7:26 pm | याॅर्कर
मिपावर हा लेख आहे
"भावना दुखावणे एक दुखणं
लिंक माहित नाही,शोधा सापडेल
.
.
.
.
.
.
(दुसर्याच्या भावना दुखावतील म्हणून आपल्या भावना दाबून ठेवाव्या लागतात.)
27 Oct 2015 - 7:29 pm | मनिमौ
एकदा भैरप्पा यांनी लिहिलेले व उमा कुलकर्णी यांनी अनुवाद केलेल पर्व हे पुस्तक वाचले तर तुम्हाला जे प्रश्न पडले आहेत त्या बद्दल बरीच माहिती मिळेल. एका वेगळ्या पद्धतीने विचार करून लिहिले आहे.
27 Oct 2015 - 7:46 pm | ऋतुराज चित्रे
पराशरांना सत्यवतीप्रति कामवासना जागृत झाली होती,त्यांनी संबंध प्रस्थापित केले.
कामवासना शमवण्यासाठी वेगळ्या प्रकारचेही संबंध प्रस्थापित केले असतील.
27 Oct 2015 - 8:35 pm | हेमंत लाटकर
@ ऋतराज
मग सत्यवतीला पराशर पासून व्यास कसा झाला विनासबंध.
27 Oct 2015 - 8:49 pm | नाव आडनाव
सर, त्यांना काय विचारता? त्यांचा तरी काय संबंध ? :)
27 Oct 2015 - 8:43 pm | काळा पहाड
१. रावण बहुधा बेभरवशाचा माणूस असावा. म्हणजे तो दहा लोकांना दहा वेगवेगळ्या आणि गोंधळात टाकणार्या सूचना देत असावा आणि मग स्वतःच त्या केल्याबद्दल जाब विचारत असावा. आपण नाही का एखाद्याला दुतोंडी किंवा "लै बारा xxचा" म्हणतो. तसंच.
२. किंवा रावणाचं गुप्तहेर खातं अतिशय निष्णात असावं. तो दहा कानांनं ऐकतो असं म्हटलं जात असेल आणि अपभ्रंश होवून ते दहा तोंडं असं झालं असेल.
३. किंवा त्याचे नऊ डमी असावेत.
28 Oct 2015 - 1:21 am | प्रभाकर पेठकर
रावणाला दहा ग्रंथ मुखोद्गत होते. म्हणजे त्याला सर्व ज्ञान अवगत होते. म्हणून त्याला दशग्रंथी, दहा वेगवेगळी व्यक्तीमत्व असणारा मानायचे आणि सर्वसामान्यांना समजण्यासाठी त्याला दहा डोक्यांची उपमा आहे. (असे कुठेतरी वाचले आहे.)
27 Oct 2015 - 8:44 pm | काळा पहाड
हे सुद्धा रुपकात्मक असू शकतं. पर्वत उचलणे म्हणजे अतिशय अवघड काम करणे अशा अर्थानं,
27 Oct 2015 - 8:51 pm | काळा पहाड
अटलांटिस सुद्धा समुद्रात बुडाल्याबद्दल बरंच चर्विचरण होत असतं. द्वारकेबद्दल का आश्चर्य वाटतं? बाकी मानवी कृत्यामुळे आर्क्टिक वितळून समुद्राची पातळी (ज्यावेळी) वाढेल, आणि मालदीव पाण्याखाली जाईल, तेव्हा मानवी पापांमुळे हे झालं अशी हेडलाईन सकाळच देईल की नाही पहा. तशीच घटना तेव्हा कशावरून घडली नसेल? त्यावेळी पण लालू यादव सारखे असतीलच. त्यामुळे लोकांची भावना यांच्यामुळेच हे झालं अशी असू शकते. बाकी बुडालेल्या द्वारकेचा शोध गुजरात जवळच्या समुद्रात चालू आहे (होता!). ती कधी मिळेल तेव्हा काय झालं ते कळेलच.
28 Oct 2015 - 11:19 am | मोगा
बाकीच्या देशानी उष्णता वाढवायची व बिचा र्या मालदीवने बुडायचे !
यादव स्वतःच्या पापाने बुडले , मालदीव दुसर्याच्या पापाने बुडणार आहे.
28 Oct 2015 - 11:35 am | मोगा
मालदीव दरवर्षी ऑष्ट्रेलियात थोडीथोडी जागा खरेदी करत आहे. बेटं बुडली की ते ऑष्ट्रेलियात जाउन तिथले नागरिइक होणार आहेत.
28 Oct 2015 - 11:53 am | सुबोध खरे
ऑस्ट्रेलियात नागरिक होता येईल पण रस्त्यावर नमाज पढता येणार नाही.
28 Oct 2015 - 12:29 pm | मोगा
कदाचित तिथे मशिदीही मोठ्या बांधतील.
28 Oct 2015 - 12:38 pm | सुबोध खरे
ऑस्ट्रेलियात राहायचे असेल तर ऑस्ट्रेलियाचे कायदे पाळावे लागतील अन्यथा जिथे जायचे आहे तिथे चालू लागा हे तिथल्या पंतप्रधानानी स्वच्छ शब्दात तेथील मुसलमान नागरिकांना सांगितले आहे.
आणी हितेसभाऊ तुम्ही मालदीवचे नागरिक प्रथम तिथे नागरिक होणार आणी मग मोठी मशीद बांधून ती तयार झाली कि मग त्यात नमाज पढणार म्हणून गाजरं खात बसा.
हा हा हा, हि हि हि, हु हु हु
28 Oct 2015 - 1:11 pm | मोगा
ते खजूर खातील.
http://googleweblight.com/?lite_url=http://oilprice.com/Latest-Energy-Ne...
28 Oct 2015 - 12:16 am | अत्रुप्त आत्मा
ते टॉप गियर्ड फिलॉसॉफर कुठे गेले हो? लैच आठवण यायली त्यांची! ;)
28 Oct 2015 - 12:44 am | काळा पहाड
मेले ते
28 Oct 2015 - 1:09 am | कपिलमुनी
त्यांच्या आत्म्याने फक्त शरीर ( आयडी) बदलला आहे . देह नश्वर आहे आत्मा अमर आहे
28 Oct 2015 - 10:30 am | हेमंत लाटकर
महाभारतात द्रोपदीवर अन्याय झाला. अर्जुनाने स्वयंवरात द्रोपदीला जिंकले तरी तिला पाचही पांडवाशी विवाह करावा लागला. व्यासाच्या सांगण्यानुसार प्रत्येक पांडवाबरोबर 1-1 वर्ष सबंध ठेवायचे ठरले. त्यामुळे एकाही पांडवाचे प्रेम तिला मिळाले नाही. चीर हरणाला सामोरे जावे लागले. पांडवा सोबत वनवासात जावे लागले. महाभारत युद्ध जिंकूनही अश्वत्थामाने द्रोपदीच्या पाचही पुत्राचा वध केल्यामुळे दुख: भोगावे लागले.
28 Oct 2015 - 11:15 am | मोगा
बारा महिने भागिले पाच .... इतके महिने.
कर्ण सहावा पांडव असता तर विभागणी बरोबर दोन महिने झाली असते असे कर्णाला पाहिल्यावर द्रौपदीला वाटते म्हणे असा कायतरी संदर्भ जांभळाख्यानात आहे. ( ? )
28 Oct 2015 - 1:14 pm | याॅर्कर
कि पाचजणांबरोबर विवाह कर म्हणून.काय जबरदस्ती होती काय?(तिची तशी इच्छा असणार!) कुठलं वचन आणि काय ते पूर्वजन्मातील वरदान?पाच पती मिळण्याचे.छे छे काहीही हं.
द्युतसभेत कर्णाने जे उद्गार काढले ते काही चुकिचे वाटत नाहीत.(मी चीरहरणाचे समर्थन करत नाही)
पाच! मुलं झाली आणि एकाही पांडवाचे प्रेम मिळाले नाही,ते कसं?
.
.
.
.
.
एकंदरीतच काय बुद्धीभेद चालवलाय बघा!
महाभारत नव्हे कामभारत असं पाहिजे
(इतरांना पटावं अशी अपेक्षा नाही)
28 Oct 2015 - 11:50 am | हेमंत लाटकर
http://googleweblight.com/?lite_url=http://mnaidunia.jagran.com/spiritua...
28 Oct 2015 - 2:13 pm | हेमंत लाटकर
मुले होणे म्हणजे प्रेम मिळाले असा होत नाही. पाच जणात एक बायको असल्यावर कोणाचे प्रेम मिळेल. अर्जुनाने द्रोपदीला स्वयंवरात जिंकले पण द्रोपदीचे सोंदर्य पाहुन युद्धिष्टराचे चित्त ढळले व द्रोपदी विषयी अभिलाषा निर्माण झाली. युद्धिष्टर ज्ञानी होता पण पराक्रमी नव्हता. जेष्ठपणाचा युक्तीवाद केला. व्यास व नारदांनी दैवी दाखले देऊन द्रोपदीला पाच पांडवा बरोबर विवाह करण्यास राजी केले. (द्युष्टद्युम्नाने विरोध केला होता)
28 Oct 2015 - 2:25 pm | याॅर्कर
मग हे तुमच्या मनाला पटतं का?तेव्हडं सांगा
28 Oct 2015 - 7:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
वाचन वाढवा लट्टुकाका.
द्रौपदी इनिशिअली फक्तं अर्जुनाची बायको होती. तिला घेउन घरी आल्यानंतर पांडवांनी कुंतीला हाक मारली. तिने त्यावर आणलेली भिक्षा समान वाटुन घ्या असं नं पहाता म्हणलं होतं. त्याकाळी जेष्ठांच्या आज्ञा पाळल्या जात असल्याने आणि सर्व पांडव मातेच्या वचनामधे असल्याने त्यांना द्रौपदीशी विवाह कराव लागला.
दुसरं म्हणजे हे वाक्यं.
असं कोणं म्हणालं? पांडवांपैकी प्रत्येक जणं एकेका प्रकारच्या शस्त्रास्त्र विद्येमधे निपुण होता जसं की अर्जुन= धनुष्य बाण भीम= गदा, नकुल किंवा सहदेवांपैकी एकजण= खड्ग अर्थात तलवार ई.ई.. माझ्या माहितीप्रमाणे युधिष्ठिरानेही कौ.पां. युद्धात प्रचंड पराक्रम गाजवलेला होता.
उगीचं वाटेल ती माहिती पसरवु नका.
29 Oct 2015 - 12:04 pm | पगला गजोधर
पांडवांमध्ये, अर्जुनाला > अभिमन्यु, भीमाला > घटत्कोच अशी संततीचा उल्लेख आढळतो,
परंतु युधिष्ठीराच्या पुत्र / कन्या ची नावं /नांवे काय ? युधिष्ठीराला संतती होती का ?
याचे उत्तर जर ''नाही'' असेल, तर आमच्या शालेयजिवनातील शिक्षक डॉ चाफेकरांनी,
युधिष्ठीराच्या पौरुषत्वा-संधर्भात विधान केलेले (सन १९९२ मधे) , ते मी सांगू शकेन.
(आणि जर युधिष्ठीराच्यासंततीचा अस्सल उल्लेख असेल, तर त्यामुळे चाफेकर सरांच विधान मी इथे देणार नाही,
त्यांच्या तर्कानुसार द्रौपदीला पाचही पांडवांची पत्नी म्हणून ठेवण्याच्या मागे, पांडव व कुंतीचे पूर्वनियोजित कृत्य असल्याची मीमांसा, मी इथे देणार नाही )
28 Oct 2015 - 7:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेख व लेखकाचे आतापर्यंतचे दोन्ही बाजूंनी दिलेले प्रतिसाद पाहता, हे विचार मनात आले...
१. रामायण व महाभारत यांना महा/काव्य असे संबोधले जाते. म्हणजे त्यांचे लेखक कवी झाले. कवींना काव्यात वस्तुस्थितीपासून दूर जाण्याची सूट (पोएटिक लिबर्टी) असते असे म्हणतात. या लिखाणाच्या लेखकांपैकी कोणीही "ही जशी घडली तशीच लिहीलेली सत्यकथा आहे" असे कुठेच लिहून ठेवल्याचे ऐकिवात नाही (जाणकारांनी खुलासा करावा).
२. रामायण व महाभारत यांना बर्याच भारतियांच्या मनात बरेच आदराचे व आस्थेचे स्थान असले तरी, त्या लेखनातील संदर्भ आजच्या जीवनात वापरा असे सांगितले तर त्यातले बरेच जण "वेडे झालेत काय? हे आजच्या काळात चालणार नाही" असे सांगून आपल्याला वेड्यात काढतील अशीच परिस्थिती आहे. तेव्हा आता "हे असे कसे" असे म्हणण्याचे फारसे प्रयोजन उरले नाही ही वस्तुस्थिती आहे.
३. जगातील प्रत्येक अर्वाचीन/मध्ययुगीन/प्राचीन लेखनात सर्वांना सर्वकाळ पटेल असे कधीच काही नव्हते/नाही/असणार नाही. त्यामुळे, कोणत्याही लेखनातील शास्त्रिय कसोट्यांवर "न उतरणार्या / न पटणार्या" गोष्टी जोपर्यंत सर्वांवर लादल्या जात नाहीत किंवा त्यांचा इतरांना उपद्रव होत नाही, तोपर्यंत त्यांचा उगाच बाऊ करणे असहिष्णूपणा होईल. तसा बाऊ न करण्याला अर्वाचीन कालात विचारस्वातंत्र्याचा मानवी अधिकार असे म्हणतात.
४. लेख व लेखकाचे प्रतिसाद पाहता लेखकाकडे उत्तम लिखाण करण्याची ताकद आहे असा अंदाज आहे. तेव्हा त्याने, असला चावून चोथा झालेला आणि चर्चेचे शून्य फलित असलेले विषय सोडून इतर काही वैचारिक / रोचक / लालित्यपूर्ण लिहीले तर नक्कीच आवडेल. हे लेखक व मिपासभासद दोघांसाठी सकारात्मक होईल. शिवाय, चांगले लिहीले तर मिपाकर भरभरून प्रतिसाद देतातच... त्याकरिता वादग्रस्त मुद्दे असायलाच हवेत असे नाही.
हे माझे व्यक्तिगत मनोगत झाले. बाकी मिपाकर (यात लेखकमहाशयही आलेच) आपापले योग्य निर्णय घेण्याइतके सुज्ञ आहेतच.
29 Oct 2015 - 11:17 am | हेमंत लाटकर
डाॅक्टर म्हात्रे हे कौतुक आहे की पुणेरी खोचकपणा आहे. :)
29 Oct 2015 - 12:06 pm | अभ्या..
फॉर्म्यालिटी आहे बहुधा. ;)
29 Oct 2015 - 3:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
मी जे लिहायचे ते स्पष्ट लिहीतो. त्यामागे वेगळा अर्थ नसतो. :)
तुमची विषय मांडण्याची आणि विषद करण्याची पद्धत चांगली आहे. तर्कही चांगले करता/वापरता. यामुळे तुम्ही चांगले लिहू शकाल असा माझा अंदाज आहे. वादग्रस्त विषय निवडू नये असे माझे मत अजिबात नाही... पण ज्या विषयावर केवळ वादच होणार, काहीच सकारत्मक होणार नाही, हे नक्की आहे, त्या विषयाला परत परत उकरून काढणे कोणाच्याच फायद्याचे नाही असे माझे मत आहे. आपण मांडलेला विषय व त्यावरची चर्चा फलदायी झाल्यास त्या लिखाणापासून लेखकाला जास्त सकारात्मक समाधान मिळते, असा माझा अनुभव आहे.
29 Oct 2015 - 1:16 am | चित्रगुप्त
डॉ. सुहास म्हात्रे यांचा प्रतिसाद अतिशय समर्पक.
29 Oct 2015 - 8:13 am | नाखु
वरील प्रतीसादास दोन्ही हातांनी बाक वाजवून अनुमोदन आणि काकांचे अभिनंदन !!!!
29 Oct 2015 - 10:24 am | हेमंत लाटकर
हे बरोबर नाही. कुंतीला व व्यासाला 100% माहित होते स्वयंवरात अर्जुनच जिंकणार. माते आम्ही भिक्षा आणली असे युद्धिष्टर म्हणाला. म्हणून न पाहता कुंती वाटून घ्या असे म्हणाली. द्रोपदीचे सोंदर्य पाहून युद्घिष्टराच्या मनात द्रोपदीविषयी अभिलाषा निर्माण झाली होती. सुरवातीला द्रोपदी, द्रुपद, द्युष्टद्युम्न यांनी विरोध केला. पण व्यासाने दैवी दाखले देवून पाच पांडवाशी द्रोपदीचा विवाह करण्यासाठी राजी केले.
मी महाभारताची बरीच पुस्तके वाचली आहेत नावे आता आठवत नाही.
29 Oct 2015 - 1:15 pm | हेमंत लाटकर
द्रोपदीला अर्जुनाने स्वयंवरात जिंकले तरी विवाह पाच पांडवा बरोबर करावा लागला. अर्जुन तर युद्धामुळे बाहेरच असायचा. व्यासाने सांगितले एखाद्या पांडवाकडे द्रोपदी असताना दुसर्या पांडवाने जर व्यत्तय आणला तर त्याला 12 वर्ष वनवास. एकदा गायी सोडवून आणण्यासाठी शस्त्रे पाहिजे म्हणून युद्धिष्टर द्रोपदी बरोबर असताना अर्जुनाने व्यत्तय आणल्यामुळे त्याला 12 वर्ष वनवास भोगावा लागला व द्रोपदी 12 वर्ष युद्धिष्टरा बरोबर राहिली. 12 वर्षाच्या वनवास काळात उलुपी, चित्रागंदा व सुभद्रा यांच्या बरोबर अर्जुनाने विवाह केला. सुभद्रा अर्जुना बरोबर राहिली. बाकी दोघीनी पुत्र झाल्यावर जायची परवानगी दिली. युद्धिष्टरच जेष्ठ असल्यामुळे द्रोपदी बरोबर जास्त राहिला. (द्रोपदीला स्वयंवरात न जिंकता युद्धिष्टराची मात्र मजा झाली)
31 Oct 2015 - 11:28 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अत्यंत चीप प्रतिसाद.
31 Oct 2015 - 1:15 pm | टवाळ कार्टा
मिपावरच्या सग्ळ्यात मोठ्ठ्या कंपूने यावर काहिही आक्षेप घेतला नाही...त्यामुळे त्या प्रतिसादात वैट्ट काही नसावे (इतरवेळी मात्र खफवर मिपावर पुरुष आयडी स्त्रीयांबद्दल वैट्ट लिहितात असा आरोप केला जातो)
29 Oct 2015 - 2:48 pm | तर्राट जोकर
स्त्री-पुरुषांचे कौमार्य जपणे हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे.
29 Oct 2015 - 8:14 pm | मम्बाजी सर्वज्ञ
मी पा झोपडपट्टीत सुद्धा पोहोचल्याची लक्षणे आहेत....
29 Oct 2015 - 8:17 pm | मम्बाजी सर्वज्ञ
माफ करा जोकर साहेब, माझा संदर्भ थोडा वेगळा आहे. उगाच वाईट वाटून घेऊ नका. ज्यांना समजायचा त्यांना समजेल.
31 Oct 2015 - 11:19 am | हेमंत लाटकर
@ बाहुबली
पराक्षर सत्यवतीच्या सबंधातून व्यासाचा जन्म झाला. पराक्षर ने सांगितले तुझे कोमार्य पुर्वीसारखे झाले. ते पाहण्यासाठी इ.स. पुर्व 3000 मध्ये सोनीग्राफी होती का?
वीर्य शोषून घेईपर्यंत शुक्रजंतू थांबणार आहेत का?
@ ऋतराज
<<<आधुनिक शास्त्रानुसार हे शक्य आहे. सुक्ष्म सुईद्वारे कृत्रिम रेतन करून स्त्रीचे कोमार्य टिकवणे शक्य आहे.>>>
इ.स. पुर्व 3000 ला हे तंत्र होते का?
@चिमणराव
<<<तिला घेउन घरी आल्यानंतर पांडवांनी कुंतीला हाक मारली. तिने त्यावर आणलेली भिक्षा समान वाटुन घ्या असं नं पहाता म्हणलं होतं.>>>
स्वयंवराला जाताना पांडव कुंतीला सांगूनच गेले होते. कुंतीला अर्जुनाच्या पराक्रमाची खात्री होती की स्वयंवरात अर्जुनच जिंकणार. कुंतीने जाणूनबुजून वाटून घ्या असे म्हणले होते. द्रोपदीचे साेेंदर्य बघून बाकी चार पांडवाच्या मनात द्रोपदीविषयी अभिलाषा निर्माण झाली. व्यासाने दैवी दाखले दिले व द्रोपदीला पाच पांडवाशी लग्न करण्यास भाग पाडले. कोणती स्त्री पाच पुरषाशी लग्न करायला तयार होईल.
31 Oct 2015 - 11:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
म्याचफिक्सिंग झालेलं का? कर्ण सर्वार्थानी अर्जुनाएवढाचं लायक उमेदवार होता. आणि जेष्ठ पांडव असुनही त्याचा सुतपुत्र म्हणुन हिणवलं जाउन त्याला स्पर्धेमधुन थेट बाहेर काढलं गेलं.
त्याकाळी एकपतीव्रत वगैरे प्रकार नसावा.
31 Oct 2015 - 1:04 pm | हेमंत लाटकर
कर्ण हा कुंतीला लग्नाआधी झालेला होता. (बहुतेक वसिष्ठापासून झालेला असेल) कुमारी मातेला समाजाने मान्यता दिली नसती. पाच पांडव हे कुंतीला व माद्रीला पान्डुच्या संमतीने झाली. "मनस्मृती" या हिन्दु धर्मशाश्त्रात नियोगाने जन्मलेले पाच पांडवाचे आई वडिल पान्डु, कुंती व माद्री हेच होते.
अर्जुन कर्णापेक्षा जास्त धर्नुधारी होता. विराट राजाच्या गाय़ी सोडून आणण्याच्या वेळी अर्जुनाशी युद्ध करताना कर्णाला रणांगणातून पळावे लागले.
युद्धाच्या वेळी कुंतीने तु पांडव आहेस व द्रोपदी तुझी सुद्धा पत्नि आहे हे सांगणे म्हणजे कर्णाचे मन खच्ची करणे होते. ही कृष्णनीती होती.
31 Oct 2015 - 1:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कर्ण सुर्यपुत्र होता लाटकर साहेब. तुम्ही आपलं ट्यालेंट असल्या विषयात वाया घालवु नये असं माझं वैयक्तीक मत आहे.
31 Oct 2015 - 6:32 pm | सतिश गावडे
महाभारतकथेमध्य दंतकथा काहीही असेल, तुला खरंच असं वाटतं का? :)
31 Oct 2015 - 1:26 pm | हेमंत लाटकर
वसिष्ठ च्या जागी दुर्वास वाचावे.
31 Oct 2015 - 3:57 pm | काळा पहाड
या वेळी तरी नक्की का?
31 Oct 2015 - 4:06 pm | नाखु
निघाला दुर्वासांच्या जागी वसीष्ठांचा पत्ता. पुढच्या वेळी नीट पिसतील ते !!!
५-३-२ वाला नाखु
31 Oct 2015 - 6:01 pm | हेमंत लाटकर
100% नक्की. रामायण महाभारत मध्ये कन्फ्युज झाले. वसिष्ठ दशरथाचे राजपुरोहित व रामाचे गुरू होते.
31 Oct 2015 - 2:50 pm | हेमंत लाटकर
चांगली सेवा केल्यामुळे दुर्वास ऋषीने तिला मंत्रदिक्षा दिली व कोणत्याही देवाला आवाहन केले की तो देव प्रगट होईल ही कवीकल्पना आहे.
प्राचीन काळी निसर्गातील प्रत्येक गोष्टीला देव मानत. उदा. सुर्य,चंद्र,पर्वत,समुद्र,वारा,आग, वीज,पाऊस,वृक्ष,नदी.
अंबिका,अंबालिका व दासीला जसे नियोगाने व्यासापासून धृतराष्ट,पान्डु,विदुर झाले. तसेच कुंतीला व माद्रीला हिमालयीन भागातील ऋषीं पासून पाच पांडवे नियोगाने झाली.
31 Oct 2015 - 6:19 pm | मोगा
दुर्वास ऋषींचा संदर्भ आला की पुराणात भयानक घटनाच घडलेल्या दिसतात.
त्यांच्या रागामुळे त्यांच्याबरोबर सहवास करणे अवघड वाटे. म्हण्युन दुर्वास नाव मिळाले म्हणे.
1 Nov 2015 - 2:02 pm | याॅर्कर
कर्ण हा दुर्वासांनपासून झालेला असणार,आणि बाकिचे पाच पांडव इतर निरनिराळ्या ऋषींपासून.
नंतर यांनी युद्धात पराक्रम दाखवला म्हणून ते देवांपासून प्राप्त झालेत अशी फोडणी टाकली गेली असणार.
.
.
.
.
.
आणि कुठे काही अडचण आलीच तर कथेचे निर्माते(व्यास) प्रकट होऊन ती अडचण पूर्ण करतात.