✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती

ह
हेमंत लाटकर यांनी
Mon, 10/26/2015 - 17:36  ·  लेख
लेख
महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते. 1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही. 2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला. 3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले. 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. 5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली. 6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे. 7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला. 8. रावणाला दहा तोंडे होती. 9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
40894 वाचन

💬 प्रतिसाद (169)

प्रतिक्रिया

चला!! कोणीतरी परशु उचलला

नाना स्कॉच
Tue, 10/27/2015 - 09:36 नवीन
चला!! कोणीतरी परशु उचलला म्हणायचे एकदाचा! म्हणले फाउल होतोय का काय ह्या धाग्याचा!! मुळात धागाकर्त्याने कुठल्या विषयावर/धर्मावर धागा काढवा हा त्याच्स prerogative (मराठीत सांगा) आहे, तुमच्या भावना दुखावतात तर तुम्ही न वाचण्याचे ऑप्शन आहेच की तुमच्या हातात, शिवाय आमच्या वैयक्तिक मतानुसार "त्यांना सांगा की अगोदर" वाली वृत्तीच हिंदुत्वासाठी सर्वात विघातक आहे असे प्रांजलपणे वाटते.
  • Log in or register to post comments

हात्तीच्या....!

दत्ता जोशी
Tue, 10/27/2015 - 10:11 नवीन
आख्या महाभारत आणि रामायणातून फक्त नऊच मुद्दे मिळाले! आम्हाला विचारला असतं तर बसल्या बसल्या ३-४ डझन मुद्दे दिले असते की.
  • Log in or register to post comments

आख्या महाभारत आणि रामायणातून

हेमंत लाटकर
Tue, 10/27/2015 - 12:14 नवीन
आख्या महाभारत आणि रामायणातून फक्त नऊच मुद्दे मिळाले!
अजून बरेच काढता येतील. उदा. दाखल 9 च टाकले. पांडव शुर होते यात वाद नाही. महाभारत युद्ध जिंकण्यासाठी कृष्ण नीतीचा सुद्धा तेवढाच वाटा आहे. उदा. भीष्माला मारण्यासाठी शिखंडीला पुढे करणे. येथे भावना दुखवण्याचा काय प्रश्न आहे ही एक चर्चा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

आम्ची दाद

नाखु
Tue, 10/27/2015 - 10:12 नवीन
धागा पिसाट गर्दभ सुसाट खेळ नव्याने जुना जुना ======================= मूळ स्तोत्र

संदर्भ

टीआर्पीसाठी काही विषयः पुण्याला दुगाण्या.. अनिवांशींना देशप्रेमाचा काढा स्वतः सतत ख्वाडा आयटीवाल्यांना उगाच फायटी राजकारणातील गजकरण अर्थात खाजवून खरूज व्याकरणाचे शिकरण आणि बोलीभाषेचा ठेचा आध्यात्माची उशी आणि विज्ञानाची काशी
  • Log in or register to post comments

घुमून फिरून त्याच चौकात आले

प्यारे१
Tue, 10/27/2015 - 10:18 नवीन
घुमून फिरून त्याच चौकात आले ना बे.... कोणाला काय बोलनार आपन तरी गरीब बापडे लोकं? इथल्ला माहौल च कै ठीक वाटू नाय ऱ्हायला. काय करावं गरीबांन् काय उमगत नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

धागा पिसाट

हेमंत लाटकर
Tue, 10/27/2015 - 12:27 नवीन
धागा पिसाट गर्दभ सुसाट
तुमचा झाडपन हा धागा कोणत्या प्रकारात मोडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नाखु काका पार बाजार उठवला तुम्हि तर

होबासराव
Tue, 10/27/2015 - 15:47 नवीन
धागा पिसाट गर्दभ सुसाट खेळ नव्याने जुना जुना लाटकर, तुमचे को़किळ व्रत झाले का पुर्ण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

वरच्या

नाखु
Tue, 10/27/2015 - 16:34 नवीन
प्रतीसादातील संदर्भावर क्लीक करा बराच खजीना मिळेल. अवांतर : मध्यंतरी गायब होतात काय? दादुच्या एका धाग्यावर लै याद काढली आता दादू नाही आणि त्यो धागाबी न्हायी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

आता मीच दादू असे समजा.

मोगा
Tue, 10/27/2015 - 20:21 नवीन
... मोगाखान पठाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

(No subject)

टवाळ कार्टा
Tue, 10/27/2015 - 23:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

Really? Before we could miss,

प्यारे१
Wed, 10/28/2015 - 00:47 नवीन
Really? Before we could miss, he came back. Daduji, please allow us to miss you. We will call you...... for sure.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

प्यारे मिया

सुबोध खरे
Wed, 10/28/2015 - 10:41 नवीन
प्यारे मिया तुम्ही पटकन कोणाच्या चड्डीलाच त्यांना न कळत हात घालता बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

काय हे...

प्रभाकर पेठकर
Wed, 10/28/2015 - 11:58 नवीन
अश्लिल....अश्लिल.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

असलं काही आम्ही करत नाही, असं

प्यारे१
Wed, 10/28/2015 - 12:45 नवीन
असलं काही आम्ही करत नाही, असं नाही, करतो, असंही नाही. खुलासा संपला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

प्रतिज्ञा

याॅर्कर
Tue, 10/27/2015 - 11:00 नवीन
इतर सदस्यांच्या भावना दुखवू नयेत म्हणून . . मी याॅर्कर "चारो दिशाओ,धरती,आकाश को साक्षी मानकर यह प्रतिज्ञा करता हूँ कि,आज से कोई भी धार्मिक टिप्पणी नही करूंगा,जिससे किसी कि भावना को ठेच पहुंचे,ना ही मेरा कोई ड्युआयडी था, ना है,ना आगे जाकर बनेगा| यह मेरी अखंड प्रतिज्ञा है| (विजांचा कडकडाट अन् सोसाट्याचा वारा)
  • Log in or register to post comments

+

नाव आडनाव
Tue, 10/27/2015 - 11:17 नवीन
(आणि मंदिरांच्या घंटा वाजल्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

श्रीरामाने बाण मारून

मार्मिक गोडसे
Tue, 10/27/2015 - 12:35 नवीन
7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला.
शाळेत असताना साबणाचा वापर करुन पाण्याचे 'सरफेस टेंशन' कमी करणारा प्रयोग केला होता. त्यामुळे अशक्य वाटत नाही.
9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
हनूमानात अख्खा पर्वत उचलून उडाण्याची शक्ती होती, तर राम सेतू बांधायच्या भानगडीत कशाला पडला, बसवायचे होते सगळे सैन्य एखाद्या पर्वतावर, तो पर्वत उचलून केले असते उड्डान हनूमानाने लंकेकडे. कदाचीत रामाला ते कमीपणाचे वाटले असेल. मग बसला पाण्याची पातळी कमी करून ,दगड टाकून सेतू बांधायला. राम व त्याचे सैन्य सेतू बांधत असताना तिकडे रावणाला ह्याचा सुगावा कसा लागला नाही. आणि लागला असेल तर लंकेच्या किनार्‍यापर्यंत सेतू बांधेपर्यंत रावण हाताची घडी तोंडावर बोट ठेवून का बसला होता. किनार्‍यावर आपले सैनिक जमा करून रामाच्या सैन्यावर हल्ला का केला नाही.
  • Log in or register to post comments

1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 12:36 नवीन
1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही.
आपण हटयोग अभ्यासावा त्यात हे प्रकरण सामाविश्ट आहे. तुम्हीही तुमेच कौमार्य यापध्दतीने टिकवु शकाल, द्रौपदी नसलात तरी. अथवा पुरुष असाल तर समागम करुन/ विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउ शकाल. या सर्व यौगीक क्रिया होत अगदी विपश्यनेप्रमाणेच प्रॅक्टीकल अन निव्वळ शारीराच्या अभ्यासाने साध्य. यात इश्वर-नामस्मरण यांची तशी आवश्यक्ता आहेच असे नाही. पण त्यामुळे अभ्यास चालु ठेवण्यास मानसीक बळ मिळते हे खरे आहे. बट नॉट मेंडेटॉरी अ‍ॅटोल. 2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला. होय. कसे ? यासाठी आपणास काही विद्यांचा भ्यास करावा लागेल पण तुम्हला भ्यास नको तर फंक्त शंकासमाधान हवयं तेवडीच आपली तुश्णा/ कुवत असल्याने वादासाठी वाद म्हणून इतर कोणीही त्यांचे पित्रूत्त्व कधीही स्विकारलेले नाही. अथवा कोणाधोब्याने तिच्या चारीत्र्यावर साँशयही घेतला नाही हे वाक्य आपली मती संतुष्ट करेल अशी अपेक्षा आहे. 3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले. मग दुसरे काय घडले असावे असे आपले मत आहे ? 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. याबाबत माझा विषेश अभ्यास्/वाचन्/अनुभव नाही त्यामुले पास. 5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली. खरे आहे. तुम्ही परशु राम असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. 6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे. तुम्ही श्रीकृष्णावतार असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य, नकारात्मकता अजिबात बाळगुन जगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. 7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला. खरे आहे. तुम्ही राम असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. 8. रावणाला दहा तोंडे होती. खरे आहे. तुम्ही रावण असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. 9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला. १००% सत्य. आपणही हनुमान असता तर हे तुम्ही सुध्दा ते केले असते... तुम्ही हनुमान नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. हनुमान चालीसा वाचत रहा अनुभवही येइल.
नियोग पद्धतीने झालेला युधिष्ठिर राजा कसा काय बनू शकतो? गादीवर अधिकार राजाच्या ज्येष्ठ पुत्राचा असतो(त्या काळी) आणि तो अधिकार धृतराष्ट्राचा त्यानंतर त्याच्या ज्येष्ठ पुत्राचा म्हणजे दुर्योधनचा.पण धृतराष्ट्र अंध असल्यामुळे तो केवळ कार्यकारी राजा असतो,राज्याभिषेक झालेला नसतो.भीष्मांच्या म्हणण्यानुसार त्याचा हक्क राहत नाही,कारण राजा अंध असू शकत नाही.मग पांडू गादीवर बसतो आणि भीष्म,विदूर इ.च्या मते पांडूनंतर तो हक्क युधिष्ठिराकडे जातो.पण हे पूर्ण चूकीचे आहे.खरा वारसदार धृतराष्ट्र असतो जरी अंध असला तरी, मग त्यानंतर दुर्योधन.आणि ते योग्यतेनुसार युवराजनियुक्तीसाठी रंगभूमी वगैरे ढोंग होतं. खरा अन्याय दुर्योधनबरोबर झालाय. आणि कर्णाला त्याची जात दाखवून अपमान करणारी स्त्री,आणि नंतर त्याच्याकडे त्या नजरेने(?) पाहणारी स्त्री सदाचारी,शीलवान असू शकत नाही. (जांभूळ आख्यायन माहित आहे का?)
हे असले विचार होते म्हणूनच कौरवांना रट्टे पडले पांडवांकडुन. पण तुम्हाला आम्हला मात्र तेच वाचुन अथवा लिहुन फरक पडनार नाही कारण ना तुम्ही कौरव ना आम्ही पांडव.. त्यामुळे जे प्रत्यक्षात घडून गेले व कौरवांना रट्टे बसले त्याचे कदापी वैशम्य मनाशी बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा.
  • Log in or register to post comments

आमच्या प्रतिक्रियांचे वैषम्य मनाशी बाळगू नका

याॅर्कर
Tue, 10/27/2015 - 13:08 नवीन
प्रतिक्रिया देवून वेळ दवडू नका, तठस्थ मनाने आयुष्य एंजाॅय करा. . . . . .बाकि, भारत-चीन युद्धात भारताने रट्टे खाल्ले म्हणायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

तठस्थ अजुन मुरली नाहीये

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 13:39 नवीन
तठस्थ अजुन मुरली नाहीये तुमच्यात.. अजुन प्रयत्न करा अवश्य जमेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

मुद्दा क्रमांक १

कपिलमुनी
Tue, 10/27/2015 - 14:40 नवीन
यावर समस्त डॉक्तर लोकांनी आपापल्या डीग्र्या परत करून हटयोग अभ्यासावा आणि अखिल भारतवर्ष रोगमुक्त करावे.
विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउन
कुटूंब नियोजनाचा असला उपाय फारिनच्या टेक्नॉलॉजीकडे पण नाय हां
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

हा हा हा.….

पगला गजोधर
Tue, 10/27/2015 - 15:09 नवीन
विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउन
मानवी शरीराचा ऐक अवयव, हा पेट्रोल-डीस्पेन्सर नॉझल सारखा फक्त डिस्चार्ज करणारा नसून, योगाद्वारे सक्शनपंप प्रमाणे सुद्धा काम करू शकतो, अश्या अर्थाचे लेखन वाचून, थक्क झालो. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

यावर समस्त डॉक्तर लोकांनी

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 17:23 नवीन
यावर समस्त डॉक्तर लोकांनी आपापल्या डीग्र्या परत करून हटयोग अभ्यासावा आणि अखिल भारतवर्ष रोगमुक्त करावे.
अत्यंत बालीश विधान. हा असला गाढवपणा डॉक्टरांना करायला सांगण्यापेक्षा शक्य आहे त्याने हटयोग अवश्य स्विकारावा. जितका जमेल तितका चांगलाच आहे व इश्वर मानायचे त्यात बंधनही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बालीश विधान

कपिलमुनी
Tue, 10/27/2015 - 17:48 नवीन
विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउन
असल्या तर्कटहीन मूर्ख विधानापेक्षा बरेच आहे. हटयोगाला विरोध नाही पण हे असे पंप वापरण्याचे सल्ले मूर्खपणाचे आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

हटयोगात सदरील क्रिया विषद आहे

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 17:53 नवीन
हटयोगात सदरील क्रिया विषद आहे त्याबाबत आपण योग्य माहिती घेतली आहे की फक्त डोक्टर म्हणतात हे शक्य नाही म्हणून ते विधान आपल्याला तर्कटहीन मूर्खपणाचे वाटते ? पाश्चात्य डॉक्टरांच्या कंपुत येउन योगाभ्यासाचे उघड प्रदर्शन करुन त्यांना हैराण करुन सोडलेल्या योग्यांची माहीती आपणास ठावुक नाही काय ? हा पंप (अजुन एक बालीश शब्दप्रयोग) सोडा आख्खे हार्ट तासभर थांबवुन पुन्हा सुरु केल्याची उदाहरणे डॉक्टरांच्या रेकॉर्डी आहेत. ते सुध्दा शास्त्रशुध्द चाचण्या करुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

डॉक्टर

कपिलमुनी
Tue, 10/27/2015 - 18:11 नवीन
माझा कुठल्याही हटयोग्यापेक्षा डॉक्टरवरच अधिक विश्वास आहे.
पाश्चात्य डॉक्टरांच्या कंपुत येउन योगाभ्यासाचे उघड प्रदर्शन करुन त्यांना हैराण करुन सोडलेल्या योग्यांची माहीती
इथे दिल्यास आनंद होइल ! त्याचाही आस्वाद आणी अभ्यास होइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

माझा कुठल्याही हटयोग्यापेक्षा

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 18:23 नवीन
माझा कुठल्याही हटयोग्यापेक्षा डॉक्टरवरच अधिक विश्वास आहे.
आँ हे काय नवी प्रकरण ? मी तरी डॉक्टरांची आवश्यक्ता नाही असे कुठेही विधान केलेले नाही फक्त काही व्यक्तींना अचंबीत करणार्‍या शारीरीक क्षमता काही व्यक्तींना कशा प्राप्त होतात या विषयी रेफरंस दिलेले आहे म्हणून या चर्चेत हटयोगी विरुध्द डॉक्टर असा सामना आपण जो भरवु पहात आहात ते सपशेल विषयांतर ठरत आहे.
इथे दिल्यास आनंद होइल ! त्याचाही आस्वाद आणी अभ्यास होइल
हे मदतीला आहेच वापरता न आले तर मी आहे. पण हे मदतीला असताना आपणाला माझी गरज पडावी हे नक्किच विषयाचा अस्वाद , आनंद, आणी अभ्यास करण्यास आपण तयार्/योग्य आहात काय यावर प्रश्नचीन्ह उपस्थीत करते. बोले तो नो स्पुन फिडींग. तरीही अडचण येतेय असे वाटत असेल तर सुरुवात Paramahans Yoganand पासुन करा. आम्ही मग (गरजेनुसार चमचा घेउन) सोबत आहोतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सामना

कपिलमुनी
Tue, 10/27/2015 - 18:30 नवीन
हटयोगी विरुध्द डॉक्टर असा सामना भरवण्यात इम्तरेस्ट नाहीये . मुद्दा संबंधानंतरही कौमार्य टिकून राहण्यापासून सुरू झाला होता . आणि त्या " उलट शोषून घेण्याच्या क्रियेबद्दल किंवा सत्यवतीच्या कौमार्य हटयोग पद्धतीने टिकवणंयाबद्दल " होता . आधुनिक शास्त्रानुसार असे कौमार्य टिकवणे अशक्य आहे. हटयोगा बद्दल बरीच माहिती नेटवर आहे पण या क्रियेबद्दल काही सापडले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

मुनी आपल्याबद्दल आदर आहे

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 18:43 नवीन
मुनी आपल्याबद्दल आदर आहे म्हणून आपणास अभ्यास वाढवा असे नक्किच म्हणनार नाही.. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

इथेच होता.

प्रभाकर पेठकर
Tue, 10/27/2015 - 19:13 नवीन
कपिलमुनी 'उर्ध्वरेता' नांवाच्या प्रक्रिये संबंधी इथेच मिसळपाव वर एक धागा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

धागा

कपिलमुनी
Tue, 10/27/2015 - 22:41 नवीन
http://www.misalpav.com/node/19802 धागा सापडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हे ऊर्ध्वरेता नावाचं प्रकरण

सुबोध खरे
Wed, 10/28/2015 - 11:20 नवीन
हे ऊर्ध्वरेता नावाचं प्रकरण वाचलं पण हे तुम्हाला स्वतः जाणतेपणी (CONCIOUSLY) करता येणं शक्य असावं असं वाटत नाही. उलटपक्षी वंध्यत्व या शाखेत काम करत असताना वीर्यात शुक्रजंतू नाहीत(AZOOSPERMIA) अशा पुरुषांची तपासणी करताना त्यांचे वीर्य लिंगातून बाहेर जायच्या ऐवजी ते मुत्राशायात जात असे आणी नंतर केलेले मुत्र गढूळ येत असे. पहा Retrograde ejaculation- https://en.wikipedia.org/wiki/Retrograde_ejaculation दुर्दैवाने अशा पुरुषांना वीर्यस्खलनाचे वेळेसअत्युच्च सुखाचा भास फार कमी होतो( DRY ORGASM) आणी दोन रुग्ण तर वीर्यस्खलनाचे वेळेस वेदना होतात म्हणून स्त्रीसंबंध टाळताना आढळले. स्खलन झालेले वीर्य परत लिन्गाद्वारे शोषून घेणे हि जास्त करून कविकल्पना वाटते. राहिली गोष्ट कौमार्याची-- चित्रे साहेबांनी लिहिलं आहे तसं सुईने वीर्य दान करून नंतर सिझेरीयनने प्रसूती केल्यास कौमार्य टिकवता येईल. इतका अव्यापारेषु व्यापार करण्यापेक्षा आधुनिक शास्त्राला कौमार्य पडदा परत शिवणे किंवा नवीन पडदा टाकणे हे फारच सोपे काम आहे. पहा -- Hymenorrhaphy--https://en.wikipedia.org/wiki/Hymenorrhaphy असे रुग्ण आता सर्रास सर्व स्त्रीरोग तज्ञा कडे आणी प्लास्टिक सर्जनकडे येताना दिसतात. लग्न होऊनही "कौमार्य" तसेच राहिल्यामुळे मूल न होणारी जोडपी या वर्षी दोन आणी मागच्या वर्षी तीन अशी मी नियमितपणे पाहत आलो आहे. यात कौमार्य पडदा अतिशय जाड असल्याने फाटत नाही आणी त्यातील छिद्र फार लहान असल्याने वीर्य आतपर्यंत जाऊ शकत नाही. शिवाय संभोग सुद्धा दोघांना वेदनादायक झाल्याने ते टाळण्याकडे कल जातो. हि पाचही जोडपी शल्यक्रिया करून सुधारलेली आहेत. अजून एक प्रकार म्हणजे कौमार्य पटल याला छीद्रच नसणे यामुळे मुलीला आतून रजोदर्शन झाले तरीही बाहेर काहीही दिसत नाही आणी हे रक्त योनीत साठून राहते आणी मुत्र्मार्गाला अटकाव निर्माण होतो. Cryptomenorrhea--https://en.wikipedia.org/wiki/Cryptomenorrhea कौमार्य हि गोष्ट सर्व संस्कृतींमध्ये जरा जास्तच ताणली गेली आहे. यामुळे बर्याच वेश्या गृहांमध्ये वर्योशितेच्या योनीत जळू ठेवली जाते. आणी साम्भोग्चे वेळेस ती फुटून रक्तस्त्राव होतो म्हणजे ती स्त्री कुमारिका आहे असे समजून ग्राहक वाटेल तितके पैसे देण्यास तयार होतात. याचे कारण कुमारिके बरोबरसंभोग केल्यास गुप्तरोग किंवा एड्स बरा होतो असा गैरसमज फार मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. लहान बालिकेवर बलात्काराचे काही वेळेस हेही एक कारण असल्याचे आढळून आलेले आहे. रामायण महाभारत किंवा हठयोग याबद्दल माझे वाचन तुरळक/ जेमतेम आहे त्यामुळे त्यात सांगितलेल्या गोष्टी चूक कि बरोबर हे सांगण्याचा मला कोणताही अधिकार किंवा ज्ञान नाही तेंव्हा त्याबद्दल पास. मूळ धाग्यापासून फार विचलित झालो असल्याने येथे थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

@ बाहुबली.

हेमंत लाटकर
Tue, 10/27/2015 - 20:19 नवीन
@ बाहुबली. येथे हटयोग कशासाठी. लग्नाआधी सत्यवतीचा पराशर ऋषी बरोबर संबध येऊन व्यासाचा जन्म झाला. तरीही कोमार्य पटल पुर्ववत झाले. तसेच.... द्रोपदीचे पांडवा बरोबर लग्न झाले तेव्हा व्यासाने सांगितले एका पांडवा बरोबर एक वर्ष राहिल्यावर दुसर्या पांडवाकडे जाताना कोमार्य पहिल्यासारखे होईल. यात द्रोपदीला पाचही पांडवापैकी एकाचेही प्रेम लाभले नाही. अर्जुनाने स्वयंवरात द्रोपदीला जिंकले पण द्रोपदीला अर्जुनाचे प्रेम कधीही मिळाले नाही. कुंतीच्या कौरवांचा नाश करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे द्रोपदीवर अन्याय झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

कुंतीच्या कौरवांचा नाश

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 20:40 नवीन
कुंतीच्या कौरवांचा नाश करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे द्रोपदीवर अन्याय झाला
<माई मोड ऑन> आज काय हसवुन हसवुन मारयचे ठरवले आहेस काय रे हेमंता ? </माई मोड ऑफ>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

बाहुबली हास्यास्पद आहेत यात संशय नाही.

आनंदी गोपाळ
Tue, 10/27/2015 - 21:29 नवीन
पण,

कुटूंब नियोजनाचा असला उपाय फारिनच्या टेक्नॉलॉजीकडे पण नाय हां

यात तुमचा थोडुकला गैस झालेला आहे. हे "योगिक" प्रकरण कुटुंबनियोजनासाठी नसून वीर्यनाश हाच मृत्यू, ब्रह्मचर्य हेच जीवन या लायनीवरचे आहे हे कृपया ध्यानी घ्या. सर्व निर्बुद्ध धार्मिक प्रथा/कल्पनांपाठी स्त्री ही पुरुषाला 'स्खलित' करण्यासाठी जबाबदार असते, (उदा. पॅराडाईज लॉस्ट) तस्मात, मी स्खलित होऊनही (पक्षी मज्जा करून्बी ;) ) "उर्ध्वरेता" बनेन, जेणेकरून वीर्य रीटर्न प्रोस्टेटमधे आणीन इ. बिनडोक कल्पना उदयास आलेल्या आहेत. असो. बोलण्यासारखे बरेच आहे. पण, की फर्क पैंदा? - (डॉ. असल्यामुळे आनंदी) गोपाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आपण हटयोग अभ्यासावा त्यात हे

अस्वस्थामा
Tue, 10/27/2015 - 17:17 नवीन
आपण हटयोग अभ्यासावा त्यात हे प्रकरण सामाविश्ट आहे. तुम्हीही तुमेच कौमार्य यापध्दतीने टिकवु शकाल, द्रौपदी नसलात तरी. अथवा पुरुष असाल तर समागम करुन/ विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउ शकाल. या सर्व यौगीक क्रिया होत अगदी विपश्यनेप्रमाणेच प्रॅक्टीकल अन निव्वळ शारीराच्या अभ्यासाने साध्य.
हे असलं लोक लिहायला लागले की यकूची आठवण होते .. :/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

यकुची आठवण पुन्हा पुन्हा

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 17:21 नवीन
यकुची आठवण पुन्हा पुन्हा आवर्जुन यावी असे बरेच लिखाण मिपावर आहे ते ही वाचावे. आणि हटयोगात वर मेंशन केलेल्या गोष्टी त्याही आधिच्या आहेत. ज्याचा रेफरंन्स भारतीय कामशास्त्राच्या पुस्तकातही घेतल्या जातो. तेंव्हा प्रयोग करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

ज्याचा रेफरंन्स भारतीय

अस्वस्थामा
Tue, 10/27/2015 - 18:26 नवीन
ज्याचा रेफरंन्स भारतीय कामशास्त्राच्या पुस्तकातही घेतल्या जातो. तेंव्हा प्रयोग करायला हरकत नाही.
भारतीय कामशास्त्र म्हणजे "कामसूत्र" का? तुम्ही प्रयोग केले आहेत का ? तुमचा अनुभव अथवा/आणि इतर पुरेशा समुदायाच्या प्रयोगांचा अनुभव याचा पुराव्यासहित संदर्भ मिळेल काय ? तुमची हरकत नाही म्हणजे तुमची हरकत असेल तर कोणी हे प्रयोग करु शकत नाही काय ? तुमची हरकत नसेल म्हणून कोणी प्रयोग केले आणि ते चुकले तर त्याचे होणारे साईड-इफेक्ट वगैरेची जबाबदारी तुमची असणार काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

मी हटयोग आचरावा हे नक्किच

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 18:36 नवीन
मी हटयोग आचरावा हे नक्किच सांगत आहे पण तो मी रचला आहे अथवा मी त्याचा गुरु आहे असा माझा दुरुनही दावा नाही. ति एक शारीरीक क्रिया आहे हे मला मान्य असलेले मत आहे. ज्याचा लाभ प्रत्येकाला होतो इश्वरावर विश्वास नसला तरी. इथे चर्चा काही व्यक्तींना अचाट शारीरीक क्षमता कशा प्राप्त होत्या त्यविषयी विवेचन म्हणून मी ह्टयोगातील क्रियांचे उदाहरण दिलेले आहे. हटयोगातील तज्ञ गुरुच्या मार्गदर्शनाखालीच त्या करायच्या असतात हे नमुद करायचे लक्षात आणून दिल्याबद्दल एकवार धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

यकुची आठवण पुन्हा पुन्हा

अस्वस्थामा
Tue, 10/27/2015 - 18:27 नवीन
यकुची आठवण पुन्हा पुन्हा आवर्जुन यावी असे बरेच लिखाण मिपावर आहे ते ही वाचावे.
बादवे, सहा महिने वयाच्या आयडीने आम्हाला हा प्रेमळ सल्ला द्यावा हे पाहून अंमळ मौज वाटली.. :) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

बाळा अनेक वर्षे होउन गेली मला मिपावर.

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 18:29 नवीन
हा दुसरा आयडी(डुप्लीकेट न्हवे) घेउन नांदत आहे. पहीला आयडी निश्कासीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

जाता जाता अस्वस्थामाजी मला आवडलं...

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 19:28 नवीन
अस्वस्थामाजी मला तुमचं वागणं/बोलनं मला मनापासुन आवडलं... म्हणजे तुम्ही माझा प्रोफाइल धुंडाळणे मला आवडले म्हनतो. कारण शक्य आहे मी जे बोलतोय त्याचे पुरेसे ज्ञान मला नसावे, हे ही शक्य आहे की मी चर्चेच्या ओघात अतिशय दिशाभुल करणारे विधान या धाग्यावर करत असेन, कदाचीत हे ही शक्य आहे की तुमचेच म्हणने योग्य असेल पण यासगळ्या गदारोळात मात्र मला तुमचं हे असं वागणं कमालीचं सुखावुन गेलं... कारण चर्चा चालु असताना आपल्या मिपावयावर कमेंट येणं हे चर्चेतच समोरील व्यक्तीकडुन आपले प्रोफाइल धुंडाळले जाण्याचे लक्षण आहेच अन ऐन चर्चेत ते धुंडाळले जाणे फक्त तेंव्हाच व त्या व्यक्तीकडूनच घडते जेंव्हा चर्चेतील आत्मविश्वास/ठामपणा आपण योग्य अथवा अयोग्य असुनही कमी पडू लागतो.. आन चालु चर्चा तशीच सोडुन द्यायचा विचार मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी घर करायला सुरुवात करतो, म्हणून मला आवडलं... आपलं वाग्णं व ते कमेंट करणं मला आवडलं... कारण अशा चर्चात हे घडलं पाहिजे. इश्वराचे/चमत्काराचे अस्तित्व नाकारणे, हटयोग अभ्यास नसणे अशा बाबी सगळ्यात सोप्या अन थिल्लर असतात, हे करायला विचारवंत बनायची अजिबात गरज नसते... पण अशा धाग्यांवर गांभीर्य हवं असेल तर विचार-मंथन झालं पाहिजे, नुसता थिल्लरपणा नको. बाजुची विरोधी दोन्ही मते वाचायला भ्यासायला त्यावेळीच आवडतात. म्हणून हे घडलं पाहिजे. असो, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

आर ओ एफ एल....:-))

असंका
Tue, 10/27/2015 - 20:34 नवीन
आर ओ एफ एल....:-)) (रच्याकने मी पण ह्या अशाच भावनेतून आधी प्रोफाईल बघून प्रतिसाद देतो कधी कधी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

पुरुष असाल तर समागम करुन/

वगिश
Tue, 10/27/2015 - 18:15 नवीन
पुरुष असाल तर समागम करुन/ विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउ शकाल
माहिती मला नवीन आहे. आपणास ही कला साध्य आहे काय?? किंवा तसे कुणाला ओळखता काय?? ह्यावर अधिक माहिती दिली तर उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

रावणाला दहा तोंडे

मार्मिक गोडसे
Tue, 10/27/2015 - 13:05 नवीन
रावणाला दहा तोंडे होती.
असणारंच. ह्या समसंखी १० तोंडांमुळेच रावणाला डोक्यांचा तोल सांभाळता येत नव्हता. एका बाजूला ४ डोकी व दुसर्‍या बाजूला ५ डोकी, ह्या असमतोलपणामुळे मान वाकडी व्हायची व नजरही वाकडी झाली. बिचारा रावण !
  • Log in or register to post comments

बाहुबली तम्ही केलेले

हेमंत लाटकर
Tue, 10/27/2015 - 13:08 नवीन
बाहुबली तम्ही केलेले स्पष्टीकरण बरोबर वाटत नाही. पराशर कडून सत्यवतीला व्यास हा मुलगा लग्नाआधी झाला. तरीही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही. कृष्णाने सुदर्शन चक्राने सुर्याला झाकले. त्यावेळेस ग्रहण असेल.
  • Log in or register to post comments

कृष्णाने सुदर्शन चक्राने

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 13:42 नवीन
कृष्णाने सुदर्शन चक्राने सुर्याला झाकले. त्यावेळेस ग्रहण असेल.
चंद्राला कधीच कुठेच सुदर्शनाची उपमा दुरुनही नाही त्यामुळे ग्रहण नेमके घडवणे हे सुदर्शन सोडण्यापेक्षा खचितच अवघड काम आहे म्हणून ग्रहणाची थ्योरी बाद वाटते. विज्ञान ग्रहणाला मानते म्हणून त्याला महाभारतात असे प्रक्षीप्त करणे चुक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

रावणाला दहा तोंडे होती.

कानडाऊ योगेशु
Tue, 10/27/2015 - 13:13 नवीन
एक खरे तोंड असावे बाकीचे नऊ डुप्लिकेट आय.डी. इथे मि.पा वर ही असे दशानन बेंबीत बोटे घालत फिरत असतात.
  • Log in or register to post comments

असे दशानन बेंबीत बोटे घालत

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 17:26 नवीन
असे दशानन बेंबीत बोटे घालत फिरत असतात.
दशानन नामक एकच आयडी मिपावर आहे आणी त्यानी आपल्या बेंबीत बोटे घालत का फिरावे जरा स्पश्ट कराल काय ? बेंबीला काही प्रॉब्लेम ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

"कोमार्य भंग" वाचून कोमात

चित्रगुप्त
Tue, 10/27/2015 - 13:22 नवीन
"कोमार्य भंग" वाचून कोमात गेलो होतो , आत्ता कोमा भंग होऊन जागा झालो .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा