पुरंदर आणि मी

झकासराव's picture
झकासराव in जनातलं, मनातलं
14 Jan 2008 - 9:53 pm

चालत्या गाडीतुन फोटो काढलाय शिवाय झूम वापरल होतच त्यामुळे तेवढा छान नाही आलेला. तरिही मनातल लिहाव म्हणून टाकलाय....

कोल्हापुरला जाणं सारखच होतं.
अगदि ठरवुन महिन्यातुन एकदा जायचच असही जवळजवळ वर्षभर केल होतं.
जाताना नेहमी रात्रीच जायचो.
येताना दिवसा येत असे. असच पुण्याला येताना जर झोपलो नाही तर आजुबाजुला बघत बसे खिडकीतुन बाहेर काय दिसत ते. (बर्‍याच लांबवर असणार्‍या डोंगरावरच्या सातारा कराड ह्या पट्ट्यातल्या अंधुक दिसणार्‍या पवन चक्क्या ह्या अस पाहताना लागलेला शोध :))
असच एक दिवस पाहताना मला हा वरचा प्रचंड डोंगर दिसला. त्यावेळी बरचस ऐतिहासिक कादंबर्‍यांच वाचन झाल होतच. मनात विचार आला जर त्या काळात मी असतो तर छत्रपती शिवाजी महाराजाना हा अति प्रचंड डोंगर नक्की दाखवला असता आणि त्यानी नक्कीच एखादा किल्ला तिथे बनवला असता. :)
तर कापुरव्होळ जवळुन जाताना वाचल की पुरंदर तालुका. मनात आल की हाच तर पुरंदर नसेल???
आणि गावाच नाव वाचल तर कापुरव्होळ. मग खात्रीच पटली. मनात खुप आनंद झाला कारण हाच तो किल्ला ज्यावर शंभु राजेंचा जन्म झाला.
तो कुठे आहे हे माहित असुन देखिल पहाण झालच नाही. पण एकदा एक ट्रेलर कात्रज घाटात अडकल्याने आमची एशियाड कापुरव्होळ्-सासवड मार्गे आली. त्यावेळी किल्ल्याच बरच जवळुन दर्शन झालं. त्याची उंची पाहताना मान खाली पडती के काय अस वाटल :)
आणि मी ज्या बाजुने फोटो काढलाय त्याच्या बाजुने त्या किल्ल्याचा रक्षण कर्ता म्हणून एकही मोठा डोंगर आडवा नाहिये म्हणून मनातुन वाटत होत की एवढ काय असेल त्या पुरंदरला जिंकणं पण गाडी वळसा घालुन नारायणपुर क्रॉस करते तेव्हा लक्षात येत पुरंदर काय चीज आहे ते. :)
माझ नशीब असल आहे ना मी त्याच्या पायथ्यापर्यंत गेलोय पण अजुन एकदाही वरपर्यंत जायला मिळाल नाहि :(
बघु कधी माझ नशीब उजाडतय ते.
तो पर्यंत तरी कोल्हापुरला जाता येता मला तो पुरंदर साद घालणारच आणि मी ही गारुड झाल्यासारखं तो दिसेनासा होइतो त्याच्याकडे बघत राहणारच :)

प्रवासइतिहासभूगोलअनुभव

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

14 Jan 2008 - 9:58 pm | ऋषिकेश

तुम्हाला पुरंदर लवकर घडो हि इच्छा!

धमाल मुलगा's picture

15 Jan 2008 - 12:09 pm | धमाल मुलगा

पुर॑दर अप्रतीम आहेच तसा. हा॑, ईतिहास-प्रेमी असाल आणि काही पहायला जाल, तर मात्र थोडे निराश व्हाल.
बाकी गड मोठा खासा !

जमेल तेव्हा जाऊन याच. आणि गडमाथ्यावरच केदारेश्वर म॑दीर चुकवू नये. म॑दीर छोट॑स॑च आहे, पण तेथुन दिसणार॑ मावळ भन्नाट !!!

उगाच नाय पुर॑दर लाडका ह्या देशमुखाचा :)

झकासराव's picture

17 Jan 2008 - 4:52 pm | झकासराव

ऋषिकेश आणि धमाल मुलगा.
पुढच्या महिन्यात प्रयत्न करेन जायचा. बघु :)

राज्या's picture

17 Jan 2008 - 5:00 pm | राज्या

अरे झक्या त्या ज्या पवनचक्क्या तुला दिसल्या त्या आम्हीच बसवल्या आहेत. जवळपास २००० असतील.