✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

च
चित्रगुप्त यांनी
Mon, 10/19/2015 - 08:26  ·  लेख
लेख
मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे. १. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल : पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले. 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' ची लक्षणे माझ्यात दिसत होती, आणि वर्षानुवर्षे 'फिस्टुला' च्या वेदना मी भोगत होतो. फिस्टुलावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे सर्जनने सांगितले, परंतु जालावर हुडकता शस्त्रक्रिया करून सुद्धा पुन्हा फिस्टुला उद्भवतो असे समजले. अ‍ॅलोपाथीची औषधे घेणे मला कधीच भावत नसल्याने आता करावे तरी काय, हेच कळेनासे झाले. पूर्वी नियमित व्यायाम करायचो, तोही आळस आणि निरुत्साहामुळे बंद झाला. गोड, तळकट खाणे सोडवले जात नव्हते. अतिशय निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती. रेक्झीन च्या खुर्चीवर बसल्याने, सिंथेटिक कापडाची विजार घातल्याने, कॉफी प्यायल्याने लगेच फ़िस्टुला होतो हे लक्षात आल्यावर कॉफी पूर्ण बंद केली, सुती पटलूण घालू लागलो, आणि सिनेमाला जातानासुद्धा बुडाखाली ठेवायला सुती बस्कुर नेऊ लागलो. या उपायांनी फिस्टुला होण्याचे प्रमाण जरा कमी झाले खरे, परंतु पुढे मूळव्याधीने पण मला ग्रासले. --- आता मात्र माझी पाचावर धारण बसली. जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे "मै अपनी जिंदगीसे तंग आ चुका था… मेरी बीवी मुझसे नफरत करने लगे थी " --- असे झालेले होते, पण ... " फिर एक दिन मुझे पिंटो मिला, उसने मुझे xxxxx के बारे मे बताया" ... असे मात्र काही घडून येत नव्हते. २. आशेचा किरण : अश्या परिस्थितीत २०१४ च्या जुलै महिन्यात अमेरिकेत येऊन पहुचलो. मुलाचे घर पहिल्या मजल्यावर होते, तो एक जिना चढायलाही मला जड जात होते. आलो, त्याच दिवशी मुलाने ' Fat, Sick and Nearly Dead' हा सिनेमा दाखवला आणि त्यात दाखवल्याप्रमाणे आपण सर्वजण एक आठवडा फक्त भाज्या-फ़ळांचा रस घेऊन राहूया, असा प्रस्ताव मांडला. मला आणि पत्नीला ही कल्पना अशक्य कोटीतील वाटली. नुसत्या रसाने पोट कसे भरणार ? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटे, दूध-तूप वगैरेंशिवाय शक्ती कशी राहणार ? एक दिवस सुद्धा जेवणात पोळी नसेल तर आपण त्रस्त होतो, सात दिवस कसे काढणार ? वगैरे शंका होत्या, पण मुलगा एवढे म्हणतो आहे तर करून बघू, झाला तर फायदाच होईल, अगदी रहावले गेले नाही तर खाऊया काहीतरी, असा विचार करून आम्ही संमती दिली. ३. रस-आहारावर वीस दिवस आणि 'काळ-सर्प वियोग' मग लगेचच बाजारात जाऊन ज्यूसर खरेदी केला आणि काकडी, हिरवी सिमला मिर्च, दुधी भोपळा, पालक, पोदिना, सेलरी, केल वगैरे हिरव्या भाज्या, हिरवी (ग्रॅनी स्मिथ) सफ़रचंदे, पिवळी-लाल सिमला मिर्च, गाजरे, संत्री, टमाटर, ग्रेपफ़्रूट, बीटरूट, लाल सफ़रचंदे, अननस, कलिंगड, वगैरे लाल-पिवळ्या भाज्या आणि फळे, आले, ओली हळद, लिंबू असे सर्व सामान नीट धुवून फ्रिज मध्ये ठेऊन सज्ज झालो. . दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. ... रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो. . रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते. . पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले... ... सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला. अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले. ४. यानंतरचा काळ : भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो. . ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले. ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला. कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत. http://www.rebootwithjoe.com Fat Sick and Nearly Dead: https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
समाज
जीवनमान
राहणी
औषधोपचार
विज्ञान
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
अनुभव
शिफारस
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
274210 वाचन

💬 प्रतिसाद (317)

प्रतिक्रिया

इथे कुणीतरी ज्युस करुन , माझी

पिलीयन रायडर
Mon, 10/19/2015 - 14:38 नवीन
इथे कुणीतरी ज्युस करुन , माझी मान मागे करुन माझ्या घशात ज्युस ओतुन मझं तोंड पुसुन माझी मान परत जागेवर आणुन देणार असेल तर I am in!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

घरी नव्रा नामक हक्काचा नोकर

टवाळ कार्टा
Mon, 10/19/2015 - 14:46 नवीन
घरी नव्रा नामक हक्काचा नोकर अस्तो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तो सध्या घरी नसतो.. हच

पिलीयन रायडर
Mon, 10/19/2015 - 16:15 नवीन
तो सध्या घरी नसतो.. हच पिराब्लेम आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मान कुरियर कर इथे.

अजया
Mon, 10/19/2015 - 14:57 नवीन
मान कुरियर कर इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 10/19/2015 - 16:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

'कनेक्टीविटी' चा प्रॉब्लेम

प्यारे१
Mon, 10/19/2015 - 16:27 नवीन
'कनेक्टीविटी' चा प्रॉब्लेम येईल असं नाही वाटत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

अत्यंत प्रेरणादायी लेख..

चिगो
Mon, 10/19/2015 - 14:13 नवीन
चित्रगुप्त काका, अत्यंत प्रेरणादायी लेख.. 'कोलोन क्लिनींग' बद्दल ऐकले आहे, पण त्याचे महत्त्व इतके असते हे ठाऊक नव्हते. ती एक 'मार्केटींग गिमीक' वाटायची.. काही प्रश्न, ज्यांनी उत्तरे तुमच्याकडून व डॉक्टरलोकांकडून अपेक्षित आहेत.. १. सुरुवातीला कही त्रास झाला का? 'क्रेव्हींग्स' वगैरे.. २. वर दादादरेकरांनी विचारलंय की चोथ्यासकट प्यावं की चोथ्याशिवाय? तुम्ही 'चोथ्याशिवाय' असं लिहीलंय. पण मग चोथ्यातील पोषकतत्वे वाया नाही का जाणार? चोथ्याला पुन्हा पाणी टाकून फिरवून त्याला गाळून घेतल्यास चालेल काय? (कंजूसपणासाठी सॉरी ;-) ) ३. महीना-दोन महीना हा आहार केल्यास त्याचे काही तोटे आहेत का (क्रॅशडायटींगसारखे)? ४. ह्या आहारासोबत व्यायाम केल्यास चालतो का? कि थकवा येणार? वेल्लासाहेबांची कमेंट आहेच वर.. ५. ह्या आहारानंतर आपल्या नेहमीच्या (माफक प्रमाणात 'बिंज' करणार्‍या) आहाराकडे वळल्यास त्याने काही तोटे आहेत का? बर्‍याचशा डाईटींग प्लान्सनंतर शरीर 'रिबाऊंड' करण्याचा प्रयत्न करते, असं ऐकलं आहे.. आणखीही काही प्रश्न आहेत.. सध्या इतकं पुरे..
  • Log in or register to post comments

चिगो यांच्या प्रश्नांची उत्तरे

चित्रगुप्त
Tue, 10/20/2015 - 15:29 नवीन
१. सुरुवातीचे दोन-तीन दिवस रोजच्या अन्नाच्या अभावी जरा चुकल्या चुकल्या सारखे वाटले, परंतु भूक अशी लागली नाही, कारण खरेतर रोजच्यापेक्षा जास्त पोषक द्रव्ये शरीराला जूसमधून मिळणे सुरू झालेले असते. शरीरात साठून असलेली चरबी जाळणे हे उद्दीष्ट असल्याने खरेतर अन्नाची गरजही नसते. २. चोथ्यात असलेली पोषक तत्वे वापरण्यासाठी त्यात पाणी टाकून फिरवून वा उकळून गाळून सूप बनवता येईल. किंवा घरच्या इतर मंडळींसाठी चोथा वापरून पराठे, थालपीठ, आणखी भाजी घालून रस्सा वगैरेही बनवता येईल. चोथ्यात दही-केळे आणि पाणी घालून मिक्सर मधे उत्तम पेय तयार होते. मात्र हे सर्व जूसिंग करणाराने त्या ठराविक दिवसात न घेणे बरे. फार वाटले, तर एकाद वेळी घ्यायला हरकत नाही. ३. सुरुवातीला एकदम महिना-दोन महिने न करता सात-आठ दिवस करणे बरे. नंतर मधे काही दिवस सकाळी एक-दोन ग्लास जूस, बाकी दिवस भर रोजचा आहार (अर्थात मैद्याचे पदार्थ वर्ज्य) असे करून पुन्हा काही दिवसांनी पाच-सात दिवस रसाहार, असेही करता येईल. ४. उत्साह वाढत असल्याने व्यायाम करावासा वाटू लागतो, तो अवश्य करावा, मात्र अति शीण येणारे व्यायाम नकोत. योगासने सर्वात उत्तम. शिवाय पायी चालणे, सायकलिंग, पोहणे वगैरे झेपेल तेवढे करावे. हे सर्व जास्त वेगात करू नये. ५. एवढे केले, की पुढे काय करायचे हे आपोआपच समजते. मी रोज जूस आणि चोथा वापरून केलेली लस्सी/स्मूदी घेणे सुरु ठेवले आहे. पांढरी साखर, ब्रेड-मैद्याचे तळकट पदार्थ, याविषयी आपोआपच विरूचि निर्माण झाल्याने ते मुद्दाम टाळावे लागत नाहीत. कणकेची पोळी कधीतरी खातो, त्याऐवजी भाकरी, थालीपीठ, भात हे 'ग्लूटेन फ्री' अन्न घेतो. प्रत्येकाची प्रकृती निराळी असल्याने आपल्यावर काय परिणाम होतो, हे ज्याने त्याने जागरूकपणे बघून ठरवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

धन्यवाद काका..

चिगो
Tue, 10/20/2015 - 16:43 नवीन
आपल्या सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद, चित्रगुप्तकाका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

काका , लेख वाचुन थक्क झालो

आनंदराव
Mon, 10/19/2015 - 15:41 नवीन
काका , लेख वाचुन थक्क झालो आहे. मला पित्ताचा त्रास आहे. (बराच आळशी पण आहे). तुम्ही सांगितलेला प्रयोग करुन बघणार. बाकी वेल्लाभट यांनी दोन ओळीत जीवनसत्य सांगितले आहे. बॉडी अँड सोल इज द ओनली अ‍ॅसेट यू रियली ओन. इन्व्हेस्ट इन वर्काउट अँड गुड हेल्दी डाएट, अँड रीप द डिव्हिडंड कॉल्ड फिटनेस. आभार!
  • Log in or register to post comments

>>>> बॉडी अँड सोल इज द ओनली अ

प्यारे१
Mon, 10/19/2015 - 15:48 नवीन
>>>> बॉडी अँड सोल इज द ओनली अ‍ॅसेट यू रियली ओन. इन्व्हेस्ट इन वर्काउट अँड गुड हेल्दी डाएट, अँड रीप द डिव्हिडंड कॉल्ड फिटनेस. बाल की खाल - यु रिअलि 'ओन' द बॉडी???? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव

यू आर सपोज्ड टू

वेल्लाभट
Mon, 10/19/2015 - 15:55 नवीन
बाल की खाल - यु रिअलि 'ओन' द बॉडी????
यू आर सपोज्ड टू ओन इट. बट मेनी पीपल जस्ट पझेस इट. अँड दोज हू अझ्यूम ओनरशिप ऑफ इट, टेक केअर ऑफ इट. बिकॉज ओनरशिप कम्स बन्डल्ड विथ रिस्पॉन्सिबिलिटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

प्राउड ऑफ यु सर. हॅट्स ऑफ टु यु. _/\_

द-बाहुबली
Mon, 10/19/2015 - 16:29 नवीन
कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा.
मला याबद्दल अधिक माहिती हवी आहे, इथे दिलीत तरी चालेल. वर मोद्कभाउंना पडलेले प्रश्न मलाही पडले आहेत. तसेच आपणास आहारात अचानक बदल केल्या केल्या काही त्रास जाणवला काय ? विषेशतः अपचन, अशक्तपणा, चक्कर वगैरे वगैरे ? मी सध्या रात्री फक्त सफरचंदे आणी संत्री (अधाशासारखा बका बका भरपेट ) खातो. पण यामुळे मला गॅसचा त्रास वाढला असे अनुभवाला आले आहे. त्यामुळे लिक्वीड डायट करायचे माझ्या मनात बरेच दिवस होते पण धिर होत न्हवता. तुमच्या मुळे तो सुदीनही उगवला असे वाटत आहे, आपण माहिती लवकर शेअर करा मी शक्यतो उद्या पासुनच हे करु इछ्चीत आहे. अतिशय धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जे सदस्य हा प्रयोग लगेचच सुरू

तर्राट जोकर
Mon, 10/19/2015 - 17:14 नवीन
जे सदस्य हा प्रयोग लगेचच सुरू करू इच्छितात त्यांनी मी वर दिलेली पीडीएफ वाचून घ्यावी. त्यात म्हटल्याप्रमाणे १५ दिवसांचा प्लान सूरु करण्याच्या एक आठवडाआधीपर्यंत एक सिमॉल प्याक प्लान करावा. ज्यात फक्त दिवसातून एकदा ज्यूस, तळलेले व इतर हानिकारक पदार्थ वर्ज्य, पाणी भरपूर पिणे इत्यादी करावे. नंतर मेनकोर्स ला सुरुवात करावी. सुरवातीचे ३-५ दिवस असहय होण्याची शक्यता आहे. नंतर सुरळीत होईल. अधिक माहिती साठी पिडीएफ नीट वाचून घ्यावी. अजाणतेपणी शरिरासोबत अचानक प्रयोग करू नयेत. एकदा असेच ज्युस-फलाहार टायप डायट करून माझी प्रकृती पार बिघडली होती. चक्कर यायचे. अशक्तपणा वाढला. डॉक्टरकडे गेलो तर तो म्हणाला साखर कमी झालिये. पूर्ण चौरस आहार दोन्ही वेळेला घ्या. पण ह्या सगळ्या धबडग्यात या आगावूपणाचा दोन महिने खूप त्रास झाला. डॉक्टरकडे जायला अजून उशीर झाला असता तर स्वर्गवासी झालो असतो बहुधा, तेही कुणाच्या नकळत. तस्मात् सावधान!
  • Log in or register to post comments

सहमत.

चित्रगुप्त
Mon, 10/19/2015 - 17:51 नवीन
तर्राट जोकर यांच्या वरील प्रतिसादाशी सहमत. मला पूर्ण वेळ मोकळा, दगदगीचे काम काही नाही, मुलगा स्वतः फिजियोथेरापिस्ट आणि या प्रकारचे प्रयोग स्वतः केलेले असलेला, असे असल्याने निश्चिंतपणे प्रयोग करता आला. सावधगिरीने वागणे बरे, पण थोडी हिंमतही करणे आवश्यक. १५ दिवसांचा प्लान सूरु करण्याच्या एक आठवडाआधीपर्यंत एक सिमॉल प्याक प्लान करावा.... हे उत्तम. साखर, मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत. १५ दिवस जमत नसेल तर ७ दिवस करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

डॉक्टर खरे साहेबांचे ह्या

प्रसाद१९७१
Mon, 10/19/2015 - 17:23 नवीन
डॉक्टर खरे साहेबांचे ह्या पोटातुन निघणार्‍या सर्पा विषयी मत आणि माहिती वाचायला आवडेल. डॉक्टरांनी त्या बाबतीत मौन च पाळले आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments

रस-आहारावर वीस दिवस

सुबोध खरे
Mon, 10/19/2015 - 22:03 नवीन
रस-आहारावर वीस दिवस दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

मी गेली २४ वर्षे क्षकिरण तज्ञ

सुबोध खरे
Mon, 10/19/2015 - 22:04 नवीन
मी गेली २४ वर्षे क्षकिरण तज्ञ म्हणून काम करीत आहे त्यात बेरियम एनिमा हि एक तपासणी येते. यात रुग्णाला प्रथम साधा एनिमा देऊन पोट साफ केले जाते त्यानंतर बेरियम सल्फेटच्या द्रावणाचा एनिमा दिला जातो आणी हा द्रव कुठपर्यंत जातो आहे कुठे अडकतो ई चे एकस रे घेतले जातात. इतक्या वर्षात कोणत्याही रुग्णाच्या पोटातून असा काळा सर्प बाहेर पडलेला नाही. शिवाय मी बर्याच एण्डोस्कोपी पाहिल्या आहेत ज्यात माझ्या आई आणी वडिलांचाही आणी अनेक नातेवाईक आणी रुग्णांचा समावेश आहे. यापैकी एकाच्याही मोठ्या आतड्यात असा काळा सर्प मला किंवा माझ्या माहितीतील कोणत्याही पोटाच्या विकाराच्या तज्ञाला आढळून आलेला नाही. https://en.wikipedia.org/wiki/Mucoid_plaque चित्रगुप्त साहेबांचा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे तो नाहीच असे मी कसे म्हणू शकतो. पण माझ्या अनुभवात असे कधीही आढळून आलेले नाही. बाकी त्यांनी केलेल्या खालील गोष्टी सर्वानीच कराव्या अशा आहेत त्याबद्दल दुमत नाहीच. रस-आहारावर वीस दिवस दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

http://www.skepticalraptor

एच्टूओ
Tue, 10/20/2015 - 13:59 नवीन
http://www.skepticalraptor.com/skepticalraptorblog.php/colon-detoxification-myth-vs-science/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

@एच्टूओ: अमेरिकेत नेहमी

चित्रगुप्त
Tue, 10/20/2015 - 14:21 नवीन
@एच्टूओ: अमेरिकेत नेहमी नवनवीन फॅड्स येत असतात, आणि त्यावर उलट-सुलट चर्चा, मतप्रवाह, त्या आधारे लाखो डॉलरांची उलाढाल वगैरे चाललेले असते. मी हा जो प्रयोग केला, तो याबद्दल उलट-सुलट मते न वाचता केला, आणि त्याचा अतिशय उत्तम परिणाम मला मिळाला. तुम्ही वर दिलेली लिंक अजून मी वाचलेली नाही. त्यात काय सांगितले आहे, हे थोडक्यात इथे सांगितले तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एच्टूओ

काळ सर्प

चित्रगुप्त
Tue, 10/20/2015 - 14:15 नवीन
'काळा सर्प' हे मी गमतीने दिलेले नाव आहे, परंतु त्यामुळे काहीतरी 'काळा, सॉलिड जीव' अशी कल्पना होते, तसे मात्र नाही. स्वयंपाकघराच्या सिंकच्या खाली पाणी वाहून नेणार्‍या प्लास्टिकच्या नळीतून जशी लांबट बुळबुळीत घाण निघते, तसे ते होते. मला वीसेक वर्षांपासून फिस्टुलाचा विकार होता, त्या अर्थी एवढ्या प्रमाणावर घाण साठून असणे सहाजीकच वाटते. दुसरे म्हणजे एरव्ही विष्ठा तुकड्या-तुकड्यात निघते, तसे न होता एकच एक लांब गुंडाळी सरसर निघाली, हे वेगळेच वाटले. (एक जिज्ञासा: बकरीच्या अगदी गोल, गुळगुळीत लेंड्या कश्यामुळे असतात ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

चित्रगुप्तजी, अभिनंदन. फॅट,

रेवती
Mon, 10/19/2015 - 18:30 नवीन
चित्रगुप्तजी, अभिनंदन. फॅट, सिक, निअरली डेड हा शिनेमा पाहीन. मी त्यातील फॅट, सिक व निअरली डेड अशी नसले तरी तब्येत चांगली ठेवण्याविषयी आलेले लेख, चित्रफिती पाहते (व्यायामही नियमीत करते). तुमच्यासारखा प्रयोग करण्याचे धाडस अजून नाही कारण त्याने काही कमी जास्त झाले तर नस्ता उद्योग होऊन बसायचा असे वाटते. शिवाय हा आहार काही आमचा रोजचा आहार नसेल. मग काय करायचे? हा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी...

प्रभाकर पेठकर
Mon, 10/19/2015 - 18:38 नवीन
चित्रगुप्त साहेब, तुमचा हा लेख ज्यांना, माझ्या सारखेच, वजन कमी करायचे आहे आणि जमत नाही अशा सर्वांसाठी, अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. ते कृमी आणि कालसर्प अविश्वसनिय वाटते आहे तरी पण, तुमचा स्वानुभव असल्याकारणाने, हे का झाले असावे आणि फक्त तुमच्याच बाबतीत (फिस्तुला इतिहास) झाले की सर्वांच्याच पोटात असे कांही भयंकर वास्तव्यास असते अशा संभ्रमात मी आहे. सामान्यतः आतड्यात गांठ वगैरे होऊन मलावरोध होतो आणि तदनुषंगाने इतर आजार होतात. त्यावर शस्त्रक्रियेने अशी गांठ दूर केली जाते आणि मार्ग मोकळा होतो असे पाहिले आहे. असो. आता पंचांग पाहून, लवकरात लवकरचा 'मुहूर्त शोधून', आपण शिफारस केलेला आहार सुरु करायचा प्रयत्न करणार आहे.
  • Log in or register to post comments

चित्रगुप्त साहेब, तुम्ही

विवेकपटाईत
Mon, 10/19/2015 - 19:35 नवीन
चित्रगुप्त साहेब, तुम्ही दिल्लीला परतला असाल तर, पुन्हा एखाद्या दिवशी भेटू. मलाहि वजन कमी करायचे आहे, आपला सल्ला उपयोगी पडेल.
  • Log in or register to post comments

दिल्ली कट्टा

चित्रगुप्त
Mon, 10/19/2015 - 20:25 नवीन
विवेकश्री, मी दिल्लीला २० नोहेंबरला परतणार आहे. त्यानंतर आपण पुन्हा महाराष्ट्र सदनात कट्टा करूया. आणखी जी मंडळी तिकड असतील, त्यांची माहिती तोपर्यंत काढून ठेऊया. सध्या दिल्लीत लाल गाजरे, चुकंदर, पालक, मेथी, खीरा (हिरवा कंच अमेरिकन खीरा घ्या) किन्नोर सफरचंदे, नाग, बब्बूगोशा, देसी टमाटर, आवळे, सिमला मिर्च, दुधी भोपळा, मोसंबी, संत्री, अननस, द्राक्षे वगैरे सर्व उत्तम मिळत असेल, जूससाठी त्याचा लाभ घेणे सुरू करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

मस्त माहिती....

मुक्त विहारि
Mon, 10/19/2015 - 20:02 नवीन
धन्यवाद....
  • Log in or register to post comments

मस्त माहिती

ट्रेड मार्क
Mon, 10/19/2015 - 21:15 नवीन
माझ्या अमेरिकन मित्रानी मला याचे बरेच फायदे सांगितल्यानंतर असाच उत्साहानी ज्यूसर घेवून आलो आणी रोज सकाळी भाज्या आणी फळांचा ज्यूस प्यायला सुरुवात पण केली होती. कशामुळे तरी खंड पडला आणि मग आता ज्यूसर नुसतीच जागा अडवून पडला आहे. या निमित्ताने परत एकदा चालू करावे असं वाटतंय. संपूर्ण दिवस फक्त ज्यूस प्यायचं आत्ता तरी जरा अवघड वाटतंय. पण TJ नि दिलेल्या PDF मधील १५ दिवसांचे बघायला पाहिजे. धन्यवाद चित्रगुप्त काका आणि TJ.
  • Log in or register to post comments

प्रयोगासाठी अनेक शुभेच्छा!

तर्राट जोकर
Mon, 10/19/2015 - 21:48 नवीन
प्रयोगासाठी अनेक शुभेच्छा! नीट प्लानिंग करून सुरुवात करा. कारण रोजचं कॅलरी इन्टेक शरिराच्या गरजेनुसार मॅच झालं पाहिजे. त्यामुळे हळू हळू सुरू करा. ज्युसिंगचा उद्देश बहुधा पचनसंस्थेवर ताण येऊ न देता आतड्यास उपास घडवणे असा काहीसा आहे असे वाटते. त्यामुळे रोजच्या आयुष्यासाठी आवश्यक इतकी उर्जा मिळेल इतकं पोटात जाणं आवश्यक अन्यथा सुगर वा इतर काही कमी पडून तब्बेतीवर परिणाम होऊ नये. जसा माझ्याबाबतीत झालं होतं ते बघता.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

वजन तर कमी करायचे आहे. पण

खटपट्या
Mon, 10/19/2015 - 21:28 नवीन
वजन तर कमी करायचे आहे. पण यामुळे काही उलट होउन दांड्या मारायला लागू नयेत असे वाटते आहे. रोजची कामे करायचीच आहेत. त्यामुळे कोणी जर फुल प्रूफ प्लान देत असेल तर सीरीयसली करायला तयार आहे. ईथे कोणी विपश्यनेला जाउन आले आहे का? तिकडे रोजचा आहार अशाच प्रकारचा असतो असे ऐकीवात आहे. सरळ विपश्यनेला जावे काय?
  • Log in or register to post comments

पैसे मोजुन

कपिलमुनी
Mon, 10/19/2015 - 21:31 नवीन
डायेटीशनकडे जावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

विपश्यनेचा आहार हा त्या दहा

तर्राट जोकर
Mon, 10/19/2015 - 21:44 नवीन
विपश्यनेचा आहार हा त्या दहा दिवसाच्या जीवनशैलीला अनुसरुन आहे. तस्मात तो आहार रोजच्या धावपळीच्या जीवनात उपयोगाचा नाही. पण त्या दहा दिवसात त्वचेवर तजेला व शारिरिक हलकेपणा येतो. वजन खास कमी होत नाही. पण एकूण मानसिकतेवर खुप चांगला परिणाम होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ईथे कोणी विपश्यनेला जाउन आले

नाव आडनाव
Mon, 10/19/2015 - 21:58 नवीन
ईथे कोणी विपश्यनेला जाउन आले आहे का? तिकडे रोजचा आहार अशाच प्रकारचा असतो असे ऐकीवात आहे. आता काही बदल झाला असला तर माहित नाही (शक्यता कमी आहे), पण १० वर्षाआधी विपशना केली होती, तेंव्हा लेखात लिहिलेल्या पैकी काहीच नव्हतं तिथल्या रोजच्या आहारात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

बरोबर आहे.

चतुरंग
Mon, 10/19/2015 - 21:58 नवीन
रोजच्या जीवनशैलीत जे बसवता येईल आणि सासत्य टिकवता येईल तेच करणे जास्त योग्य आहे. एक सल्ला - वजन कमी करणे हे टारगेट ठेवू नका. सतत हालते रहा. बैठे काम असले तरी आवर्जून हालचाल करणे बघाच. म्हणजे लिफ्ट न वापरता जिन्याने जाणे, पाणी आपल्या ऑफिसमध्ये न भरुन ठेवता मुद्दाम लांबच्या नळावरुन आणणे, हाफिसातल्या हाफिसात ईमेल किंवा फोनवरुन सहकार्‍यांबरोबर होणारी कामे आवर्जून त्यांच्या ऑफिसात चालत जाऊन करणे. शिवाय घरापासून थोड्या अंतरावरची कामे चालत जाऊन करणे शक्य असेल तर तसेच करणे, सायकल जेव्हा सोयीची असेल तेव्हा वापरणे. किमान २५-३० मिनिटे व्यायाम रोज करणे. आणि मुख्य म्हणजे खाताना पोर्शन कंट्रोल. एका जेवणात समजा दोन पोळ्या खात असलात तर फक्त चतकोर किंवा शक्य असेल तर अर्धी पोळी कमी करा. एवढ्याने काय फरक पडणार असे वाटते परंतु वजनही असेच हळूहळू वाढलेले असते हे आपण विसरतो:)आणि या सगळ्याचा पॉझीटिव साईडइफेक्ट म्हणजे वजन कमी होणे हा असतो!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

विपष्यना अवश्य करा. अर्थात

द-बाहुबली
Tue, 10/20/2015 - 00:06 नवीन
विपष्यना अवश्य करा. अर्थात आपण म्हणता तसा आहार त्यात अजिबात नसतो पण इतर फायदे बरेच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

विपश्यना

चित्रगुप्त
Tue, 10/20/2015 - 00:13 नवीन
मी पंधराएक वर्षांपूर्वी विपश्यनेचा कोर्स केला, तो सहज, निर्हेतुक कुतुहलामुळे. मात्र त्यात माझी पाठदुखी बरी झाली ती आजतागयत. मात्र त्यानंतर मी एक दिवसही विपश्यना केलेली नाही. कोर्स मधे मात्र पूर्ण समर्पणाने केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

सर्वांचे उत्तराबद्दल आभार...

खटपट्या
Tue, 10/20/2015 - 14:34 नवीन
सर्वांचे उत्तराबद्दल आभार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मी २०११ पासून रोज विपश्यना

विलासराव
Wed, 10/21/2015 - 13:04 नवीन
मी २०११ पासून रोज विपश्यना करतो. आताही मी ६० दिवसाच्या शिबिरात सेवा देतोय. इथे सकाळी नाष्टा पोहे, शिरा, उपमा, साबूदाना खिचड़ी , ढ़ोकळा, खाकरा, ब्राउन ब्रेड, केळी आनी सीजनल फळे असा असतो. चहा आणि दुधही असते. दुपारी कमी तिखट कांदा लसुन नसलेलया २ भाजी,डाळ् भात, चपाती, सॅलाड, रायता, ताक किंवा दही असे जेवण असते. संध्याकाळी ५ वाजता फक्त लिंबुपाणी असते. प्रथमच १० दिवसाचा कोर्स करणार्यांसाठी संध्याकाळी चिवड़ा आणि चहा किंवा दूध असते. विपशयना मुख्यता मन निर्मळ करण्याची साधना आहे. पण मनाचा शरिरावर खुप प्रभाव असल्याने मनाच्या आरोग्याचा शरीराच्या आरोग्यालाही फायदा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

धन्यवाद विलासराव...

खटपट्या
Wed, 10/21/2015 - 13:17 नवीन
धन्यवाद विलासराव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

चित्रगुप्त तुमचे अभिनंदन!

चतुरंग
Mon, 10/19/2015 - 22:10 नवीन
असे डाएट करायचे म्हणजे मनाचा पक्का निग्रह हवाच. तुमचे वय बघता तुम्ही हा उत्साह दाखवलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. आणि तुमचे अनुभव इथे मांडलेत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! हे मला जमेल असे वाटत नाही परंतु दैनंदिनीमध्ये यातले काही प्रकार कसे बसवता येतील याचा विचार करु शकतोच.
  • Log in or register to post comments

सर्व करता येते.

चित्रगुप्त
Mon, 10/19/2015 - 22:29 नवीन
माझा मुलगा, ज्याच्यामुळे हा प्रयोग आम्ही केला, हल्ली महिनाभरापासून जूसिंग करतो आहे.सकाळी साडेसहाला तो ऑफिससाठी निघतो, त्यापूर्वी आमची सून त्याला दोन-तीन (काचेच्या) बाटल्यात एक हिरवे आणि एक लाल जूस ताजे काढून देते, ती स्वतःही दोन बाटल्या नेते, आणि आमच्यासाठीपण काढून ठेवते. ते दोघे घरी साडेचार-पाचला येतात, तो पर्यंत जूसवरच असतात. संध्याकाळी अगदी हलका आहार सर्वजण घेतो. शिवाय पुन्हा जूसही घेतो. पंधरा-वीस दिवसाच्या जूसिंग नंतर मुलाचा आळस दूर होऊन तो आता संध्याकाळी चार-पाच मैल धावू लागला आहे. हे सांगण्याचा हेतु हा की करायचेच म्हटले, तर सर्व करता येते.
  • Log in or register to post comments

अरे वा, हे सगळे कौतुकास्पद दखल घेण्याजोगे आहेच.

चतुरंग
Mon, 10/19/2015 - 22:38 नवीन
बघूयात आता यातले कायकाय जमवू शकतो ते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

जूसर कोणता घ्यावा

चित्रगुप्त
Mon, 10/19/2015 - 23:58 नवीन
व्यनित जूसर कोणता वापरता, अशी पृच्छा झाली आहे, आम्ही खालील जूसर वापरत आहोतः अमेरिकेत BREVILLE juicer Image removed. पॅरिस मधे: BRAUN juicer Image removed. भारतातः OSTER juicer Image removed. परंतु यापैकी भारतातील आता जुना झाल्याने नवीन घेणे आहे. जूसर घेताना तो ७००-८०० वॉट चा असावा. फिलिप्स बजाज वगैरेंचे चांगले नाहीत. दिल्लीत सरसकट सर्व जूस विकणारे 'सुजाता' चा वापरतात. त्यांचा जूसर दिवसभर चालत असतो. त्यामुळे हा ८१० वॉटचा घेण्याचा विचार आहे: Image removed. Model Sujata Powermatic Juicer Mixer Grinder -Motor Heavy duty, universal type 810 watts अगदी नाइलाज असेल तेंव्हा सोडून दिवसातून एकदा तरी जूस पीणे हे रोजच्या दिनक्रमाचे आवश्यक अंग होऊ शकले तर उत्तम.
  • Log in or register to post comments

ओके

प्रसाद गोडबोले
Wed, 10/21/2015 - 17:17 नवीन
ओके मी विचार करत होतोच की कोणता जुसर घ्यावा . आता सुजाताची चौकशी करतो . ( फ्लिपकारटं लय अव्वाच्या सव्वा रेट सांगतय . लोकल स्तोअर ला जाऊन विचारेन म्हणतो )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मोलाची माहिती अन प्रेरणादायी अनुभवकथन

श्रीरंग_जोशी
Tue, 10/20/2015 - 00:20 नवीन
मोलाची माहिती अन प्रेरणादायी अनुभवकथन. एक प्रश्न माझ्याकडून. इथे अमेरिकेत नेकेड जूस मिळतात जे पूर्णपणे नैसर्गिक असतात असा त्या कंपनीचा दावा असतो. घरी जूस बनवण्याला हे जूस पर्याय बनू शकतात का? Image removed.
  • Log in or register to post comments

नाही.

रेवती
Tue, 10/20/2015 - 02:08 नवीन
नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Tue, 10/20/2015 - 02:13 नवीन
उत्तरासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

साखर

नंदन
Tue, 10/20/2015 - 03:12 नवीन
'नेकेड ज्युस'मध्ये तब्बल ३० ते ४० ग्रॅम प्रतिपोर्शन साखर असते. शीतपेयांइतकी किंवा अधिकच. त्यामुळे त्यापासून दूर राहिलेलेच उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Tue, 10/20/2015 - 03:22 नवीन
पूर्वी अधून मधून प्यायचो. या वर्षी एक दोनदाच पिले असेल. त्याचा कॅलरी काउंटही हाय असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

ताजा रस

चित्रगुप्त
Tue, 10/20/2015 - 12:28 नवीन
हल्ली अमेरिकेत ऑर्गॅनिक, ऑल नॅचरल, ग्रास फेड, ग्लूटेन फ्री, यूएसडीए सर्टीफाईड, बायो, वगैरे शब्द वापरून नवनवीन महाग उत्पादने विकण्याची चलती आहे. नेटफ्लिक्स वर यांची बिंगे उघड करणारे सिनेमेही आहेत. मोठमोठ्या कंपन्या सिनेटर्सना कटात सामील करून घेऊन कायदे सुद्धा बदलायला कसे लावतात, वगैरे बरेच काही आहे. यावर दीपक चोप्रांनी सोपा उपाय सांगितलेला आहे, तो म्हणजे कोणतेही 'पॅकेज्ड फूड' घेऊ नका. 'ऑनेस्ट वेट' मधे ज्वार-बाजरीच्या पीठापासून मध, विविध बिया, तेले आणी शेकडो प्रकारचे पदार्थ ताजे, सुट्टे मिळतात. ते घेणे बरे. जूस घरी केलेला ताजाच घ्यावा. फारतर काचेच्या बंद बाटलीत वरपर्यंत गच्च भरून फ्रीजमधे एकाद दिवस ठेऊन संपवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Tue, 10/20/2015 - 22:40 नवीन
या माहितीकरता धन्यवाद. वरवर अंदाज होताच पण इतके नेमकेपणाने वाचले नव्हते यापूर्वी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा