मराठी अंताक्षरी

आजानुकर्ण's picture
आजानुकर्ण in जनातलं, मनातलं
17 Sep 2007 - 10:45 am

चला मराठी अंताक्षरी खेळूया!

आजी सोनियाचा दिनु.. वर्षे अमृताचा घनु
हरी पाहिला रे हरी पाहिला रे

र.

औषधोपचारमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Sep 2015 - 11:51 am | ज्ञानोबाचे पैजार

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

पैजारबुवा

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही

भेट तुझी ती पहिली लाख लाख आठवतो
रूप तुझे ते धुक्याचे कण कण साठवतो
वेड सखी साजणी हे मज वेडावून जाई
दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही...

रातराणी's picture

16 Sep 2015 - 12:07 pm | रातराणी

हात तुझा हातात धुंद ही हवा
रोजचाच चंद्र आज भासतो नवा

वादळ वारं सुटलं गं वार्‍याने तुफान उठलं गं
भिरभिर वार्‍यात पावसाच्या मार्‍यात
सजणाने होडीला पाण्यात लोटलं

रातराणी's picture

16 Sep 2015 - 12:29 pm | रातराणी

लटपट लटपट तुझ चालण ग मोठ्या नखर्याच
बोलण ग मंजुळ मैनेच
नारी ग

गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली..

लागते अनाम ओढ श्वासांना येतसे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलाच स्मरताना

हिंदी मध्ये पण न दिल आता इथे पण न च का.. ;)

नीलमोहर's picture

16 Sep 2015 - 1:08 pm | नीलमोहर

नाच नाचूनी अती मी दमले
थकले रे नंदलाला

लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

घ्या आता ण

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2015 - 1:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तेच स्वप्‍न लोचनांत रोज रोज अंकुरे
पाहतो नभात मी धुंद दोन पाखरे

शरद चांदण्यातली भेट आठवे मला
गुपित सांगता तुझा अधर मात्र रंगला
रास संपला तरी भास अंतरी उरे

-दिलीप बिरुटे

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्‍तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

रम्य हि स्वर्गाहुन लंका
तुझ्या प्रितीच्या सागर लहरी
वाजविती डंका

नीलमोहर's picture

16 Sep 2015 - 1:25 pm | नीलमोहर

काजळ रातीने ओढून नेला
सये साजण माझा..

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया

द-बाहुबली's picture

16 Sep 2015 - 1:29 pm | द-बाहुबली

ये गो ये ये मैन पिंजडा बनाया सोनेका
पिंजडा बनाया सोनेका ताला लगाया चांदीका...

द-बाहुबली's picture

16 Sep 2015 - 1:29 pm | द-बाहुबली

(हे मराठी गाणे आहे)

प्यारे१'s picture

16 Sep 2015 - 1:30 pm | प्यारे१

कानडा राजा पंढरीचा

द-बाहुबली's picture

16 Sep 2015 - 1:34 pm | द-बाहुबली

चांदोबा चांदोबा भागलास का
लिंबोणीच्या झाडाखाली लपलास का..
लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी

Gayatri Muley's picture

16 Sep 2015 - 2:03 pm | Gayatri Muley

दत्ता दिगंबरा या हो
दयाळा मला भेट द्या हो

स्वामी आहे बहुतेक पहिल्यांदा..

"दत्ता दिगंबरा या हो
स्वामी मला भेट द्या हो"

नीलमोहर's picture

16 Sep 2015 - 2:13 pm | नीलमोहर

ही नवरी असली
ही मनात ठसली

लिंबलोण उतरू कशी, असशि दूर लांब तू
इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू

एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका
तूच दुःखसागरी, उभविलीस द्वारका
सर्वभार घेतला, असा समर्थ खांब तू

शीणभाग संपला, तृप्त माय जीवनी
आयु उर्वरीत ते, सरेल ईश चिंतनी
लाभले न जे कुणा, असे सुदैव भोग तू

तरुतळी आहेत गं खुणा भेटीच्या
हृदयात असतील खोल सयी प्रीतीच्या

य घ्या

या डोळयांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती
पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती..

द-बाहुबली's picture

16 Sep 2015 - 4:30 pm | द-बाहुबली

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना

प्यारे१'s picture

16 Sep 2015 - 4:34 pm | प्यारे१

तरुण आहे रात्र अजुनि
राजसा निजलास का रे?

नीलमोहर's picture

16 Sep 2015 - 4:34 pm | नीलमोहर

ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला
तळमळला
सागरा..

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Sep 2015 - 4:52 pm | ज्ञानोबाचे पैजार

रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये
वेणु वाजवी वृंदावना
वृंदावना गोधने चारिता हे
सावळा गे माये

पैजारबुवा,

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..

द-बाहुबली's picture

16 Sep 2015 - 5:17 pm | द-बाहुबली

येइओ विठ्ठले माझे माउली ये
निधलावरी कर ठेउनी वाट मी पाहे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2015 - 7:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रिपीट नका करू राव मागे कोणती गाणी झाली ती एकदा बघायची आणि मग गाणं लिहायचं.

-दिलीप बिरुटे

दुर्गविहारी's picture

16 Sep 2015 - 7:56 pm | दुर्गविहारी

हिरवा निर्सग हा भवतीने,
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, गुनगुनारे

दुर्गविहारी's picture

16 Sep 2015 - 7:57 pm | दुर्गविहारी

हिरवा निर्सग हा भवतीने,
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, गुनगुनारे

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Sep 2015 - 10:00 am | ज्ञानोबाचे पैजार

रात्र काळी, घागर काळी, यमुना जळें ही काळीं वो माय,
बुन्थ काळी, बिलवर काळी, गळा मध्ये मोती काळी वो माय

पैजारबुवा,

भिंगरी's picture

18 Sep 2015 - 10:07 am | भिंगरी

या बाई या
बघा बघा कशी माझी बसली बया.
ऐकू न येते
हळू हळू अशी माझी छबी बोलते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Sep 2015 - 10:22 am | ज्ञानोबाचे पैजार

तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे
गोविंदु रे, अजी गोविंदु रे, तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे,
अनुमाने ना अनुमाने ना, श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे
तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे,

पैजारबुवा,

भिंगरी's picture

18 Sep 2015 - 10:37 am | भिंगरी

त्या तिथे पलीकडे
माझ्या प्रियेचे झोपडे

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Sep 2015 - 11:49 am | ज्ञानोबाचे पैजार

डोळे कशासाठी? कशासाठी? तुला साठवून मिटून घेण्यासाठी
आला भरुन पाऊस, नको एकटा जाऊस
आरे सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी

पैजारबुवा,

भिंगरी's picture

18 Sep 2015 - 1:52 pm | भिंगरी

ठरला जणु मत्सर राजा, वृद्धतरूण बांधिती पूजा ॥

होत सहज सुख तरुणपणाला, वृद्धदशा सोडी सुखलीला
सह्य तरिच परि विभव मनाला, हाचि नियम विलया अजि गेला ॥

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Sep 2015 - 2:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

लाय्‌ लाय्‌ लाय्‌ लाय्‌ लायेकरनी पोरी लायेकरनी
वाकड्या शेंड्याच्या गोयेकरनी

वाशी नी कुर्ला वरलीकरनी पोरी वरलीकरनी
सफेद परकर्या मुंबईकरनी

भिंगरी ताई ती वरची कविता संपुर्ण टाका ना मस्त वाटते आहे या आधी ऐकलेली नाही.

पैजारबुवा,

भिंगरी's picture

18 Sep 2015 - 2:15 pm | भिंगरी

द्रौपदी नाटकातली आहे.
एव्हढीच दिसते आहे.
(कदाचित संगीत नाट्य असेल,घोळून घोळून म्हणत असतील)

संगित नाटकाचे ज्ञान नसलेली 'भिंगरी'

नीलमोहर's picture

18 Sep 2015 - 10:20 pm | नीलमोहर

नाते जुळले मनाशी मनाचे

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Sep 2015 - 9:40 am | ज्ञानोबाचे पैजार

चल रं शिरपा, देवाची किरपा
झालीया औंदा छान रं छान
गाऊ मोटं वरचं गानं

पैजारबुवा,

नीलमोहर's picture

19 Sep 2015 - 2:38 pm | नीलमोहर

निसर्गराजा ऐक सांगते
गुपित जपलंय रे
कुणी माझ्या मनात लपलय रे.

ज्योति अळवणी's picture

19 Sep 2015 - 7:21 pm | ज्योति अळवणी

रेशमाच्या रेघांनी
लाल काळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढीला... हात नका लाऊ माझ्या साडीला