मराठी अंताक्षरी

आजानुकर्ण's picture
आजानुकर्ण in जनातलं, मनातलं
17 Sep 2007 - 10:45 am

चला मराठी अंताक्षरी खेळूया!

आजी सोनियाचा दिनु.. वर्षे अमृताचा घनु
हरी पाहिला रे हरी पाहिला रे

र.

औषधोपचारमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

14 Sep 2015 - 9:19 am | श्रीरंग_जोशी

लाल लाल पागोटं, गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला, जीव झाला वेडा.

एक दोन तीन चार, हमालपुर्‍यातली पोरे हुशार...

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 9:39 am | ज्ञानोबाचे पैजार

रति रंगी रंगे ध्यान रंगवी तरंगा
वांच्छिला प्रेमसंग परि होय मनोभंग

विकचदल सुमनांग भ्रमरीस सुखसंग
विपरीत परि दैव तरी होई रसभंग

पुढचे अक्षर "ग "

पैजारबुवा,

श्रीरंग_जोशी's picture

14 Sep 2015 - 9:43 am | श्रीरंग_जोशी

रुपानं देखणी, सुपारी चिकणी, सोळावं सरलं
दुनिया फिरते माझ्या मागं पर तुलाच मी हेरलं
तुझं पाऊल कुठे फसलं?

हे हे हे हे हे, मला भुतानं पछाडलं, मला भुतानं पछाडलं....

याला भुतानं पछाडलं, याला भुतानं पछाडलं....

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 10:27 am | ज्ञानोबाचे पैजार

लवलव करी पात
डोळं नाही थार्‍याला
एकटक पाहु कसं
लुकलूक तार्‍याला

पैजारबुवा,

सिरुसेरि's picture

14 Sep 2015 - 11:01 am | सिरुसेरि

लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 11:21 am | ज्ञानोबाचे पैजार

ठाऊक आहे का तुज काही,
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई?
कशी होती रे माझी आई?

पैजारबुवा,

रातराणी's picture

14 Sep 2015 - 1:20 pm | रातराणी

इवले इवले सुख चिमुकले जर निसटले मिळेल का पुन्हा
हलके फूलके ढगाच्या सारखे व्हावे कधीतरी वाटते का मला
उंच उंच झूला भासते गरगर
धुंद मौज किती वाटते वरवर
नाद लाव तू मनाला

द-बाहुबली's picture

14 Sep 2015 - 1:33 pm | द-बाहुबली

लेक लाडकी या घरची होणार सुन मी त्या घरची होणार सुन मी त्या घरची...

सिरुसेरि's picture

14 Sep 2015 - 1:44 pm | सिरुसेरि

चिन्मया सकल ह्रदया , सदया रे बा गोविंदा

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात

द-बाहुबली's picture

14 Sep 2015 - 1:52 pm | द-बाहुबली

तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं.
नव्या घरामंदी काय नविन घडंल घरकुलासंग समदं येगळं होईल..
दिस जातील, दिस येतील भोग सरंल
सुख येइल..

रातराणी's picture

14 Sep 2015 - 1:57 pm | रातराणी

लबाड लांडग ढोंग करतंय
लगीन करायच सॉंग करतंय

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 2:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

येथोनी आनंदू रे आनंदू ।
कृपासागर तो गोविंदू रे
कृपासागर तो गोविंदू रे
येथोनी आनंदू रे आनंदू

पैजारबुवा,

द-बाहुबली's picture

14 Sep 2015 - 2:05 pm | द-बाहुबली

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवेहिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे

रातराणी's picture

14 Sep 2015 - 2:07 pm | रातराणी

दैवजात दुखे भरता दोष ना कुणाचा
जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 2:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

हि दोन शेपरेट गाणी आहेत.

दैवजात दुखे भरता दोष ना कुणाचा
पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा

आणि

एक धागा सुखाचा अन शंभर धागे दु:खाचे
जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे

पैजारबुवा,

द-बाहुबली's picture

14 Sep 2015 - 2:12 pm | द-बाहुबली

मुळात द पासुन गाणं का म्हटलयं ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 2:18 pm | ज्ञानोबाचे पैजार

या बाबतीत त्यांचे बरोबर आहे

माझ्या
येथोनी आनंदू रे आनंदू ।
कृपासागर तो गोविंदू रे
कृपासागर तो गोविंदू रे
येथोनी आनंदू रे आनंदू

या गाण्यावरची त्यांची ती प्रतिक्रीया होती.

(जस्टिस) पैजारबुवा,

रातराणी's picture

14 Sep 2015 - 2:24 pm | रातराणी

धन्यवाद आजोबा.
मी असच म्हणत आलिये हे गाणं.
कुणीच नाही करेक्ट केलं.
हर एक दोस्त कमीना होता है.

रातराणी's picture

14 Sep 2015 - 2:24 pm | रातराणी

धन्यवाद आजोबा.
मी असच म्हणत आलिये हे गाणं.
कुणीच नाही करेक्ट केलं.
हर एक दोस्त कमीना होता है.

द-बाहुबली's picture

14 Sep 2015 - 2:09 pm | द-बाहुबली

चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना...चाफा बोलेना

नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक
भर बाजारी करशी खुणा करू नको गुन्हा हा पुन्हा

द-बाहुबली's picture

14 Sep 2015 - 2:14 pm | द-बाहुबली

ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा हाय श्वासातही, ऐकू ये मारवा ...

ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा.

ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा..

रातराणी's picture

14 Sep 2015 - 2:18 pm | रातराणी

वारा गाई गाणे
प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली
धुंद फूल पाने

द-बाहुबली's picture

14 Sep 2015 - 2:19 pm | द-बाहुबली

नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे.. नको वाजवू श्रीहरी मुरली

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 2:22 pm | ज्ञानोबाचे पैजार

लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?
पैजारबुवा,

कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय बाई ।
स्‍त्री-जातीप्रति झटता अंत कळत नाही

हलके हलके जोज्वा बाळाचा पाळना
पाळण्यच्या मधोमध फिरतो खेळणा

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 2:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे उर भरू
श्री रामाचे नाव घेत या श्रीरामाला पार करू
ज्या गंगे ज्या भागीरथी ज्या ज्या राम दाशरथी

पैजारबुवा,

रातराणी's picture

14 Sep 2015 - 2:36 pm | रातराणी

थ? अक्षर द्या की दुसर. त चालेल का

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 2:43 pm | ज्ञानोबाचे पैजार

णाही
थ वरून बरीच गाणी आहेत मराठीत.

पैजारबुवा,

रातराणी's picture

14 Sep 2015 - 2:47 pm | रातराणी

अस नाय करायच त्या धाग्याच त्या धाग्यावर इकडची इकडं.

रातराणी's picture

14 Sep 2015 - 2:53 pm | रातराणी

घ्या थ पाहिजे होता ना तुम्हाला.
थेंबभर तुझे मन.. ओघळले माझ्यावर..
माझ्यापाशी मागत होते एक पाऊस, एक सर

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 3:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

क्या बात है... बर्याचा दिवसांनी आठवल हे गाणं

मी आपला थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा पकडुन बसलो होतो.

लिहितो "र" वरुन

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 3:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत

पैजारबुवा,

रातराणी's picture

14 Sep 2015 - 3:08 pm | रातराणी

तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता यायचा (?) पाऊसही

केदार-मिसळपाव's picture

14 Sep 2015 - 3:15 pm | केदार-मिसळपाव

ही युगा युगांची नाती
हळव्या प्रेमाची महती
सागरही थांबे तेव्हा
ह्या एका थेंबासाठी

ठ घ्या.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 3:18 pm | ज्ञानोबाचे पैजार

अरेच्या दिवसातला दुसरा ठ
आठवायला पाहिजे

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 3:23 pm | ज्ञानोबाचे पैजार

ठेउन हिम्मत मर्दा वाणी
लाव सगळ्यांची वाट अरे तू लाव सगळ्यांची वाट
हिम्मत कसली जिवात माझ्या झालीय ग घबराट
घामही फुटला अंगालाया सुटलाय ग थरथराट,

(थरथराट मधले लक्ष्याचे गाणे)

पैजारबुवा,

रातराणी's picture

14 Sep 2015 - 3:26 pm | रातराणी

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात

केदार-मिसळपाव's picture

14 Sep 2015 - 3:28 pm | केदार-मिसळपाव

टिम्क्याची चोळी बाई रंगान फुलायली.
तुझी माझी जमली जोरी ....... बाय गो

ग घ्या

(अरे ते टिंब टिंब कोणीतरी सांगा रे)

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 4:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

टिमक्याची चोली बाय रंगान्‌ फुलयली
तुझीमाझी जमली जोरी माझे वसयकरीन बाय गो

पैजारबुवा,

किसन शिंदे's picture

14 Sep 2015 - 11:26 pm | किसन शिंदे

वेसावकरीन

अविनाश पांढरकर's picture

14 Sep 2015 - 3:25 pm | अविनाश पांढरकर

ठाऊक नाही मज काही !
ठाऊक आहे का तुज काही, कशी होती रे माझी आई ?

रातराणी's picture

14 Sep 2015 - 3:32 pm | रातराणी

जस्टीस करा आता पैजारबुवा.
आता मी बास.

Gayatri Muley's picture

14 Sep 2015 - 3:35 pm | Gayatri Muley

गोरी गोरी पान, फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण

गोर्‍या गोर्‍या वहीनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण

वहिनीला आणायला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी
हरणाची गाडी तुडवी गुलाबाचे रान

वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होऊ, दोघी आम्ही सान
दादा मला एक वहिनी आण

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी
तेणें केलें देशोधडी आपणियासी मायबापा

पैजारबुवा

केदार-मिसळपाव's picture

14 Sep 2015 - 7:24 pm | केदार-मिसळपाव

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती रत्‍नकीळ फांकती प्रभा,
अगणित लावण्य तेजःपुंजाळले न वर्णवे तेथींची शोभा,
कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू,
येणे मज लावियेला वेधू.

ध घ्या

धुंदी कळ्याना धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना

भिंगरी's picture

14 Sep 2015 - 10:47 pm | भिंगरी

नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा जाउ पाहे

सचिन जोशी's picture

14 Sep 2015 - 11:04 pm | सचिन जोशी

लख लख चांदणं कोजागरीचं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं

रातराणी's picture

14 Sep 2015 - 11:18 pm | रातराणी

ल कसा आला?
असू दे आता र घेते

प्यारे१'s picture

14 Sep 2015 - 11:19 pm | प्यारे१

राजा ललकारी अशी दे,
साद दिली साद मला दे (असंच आहे ना ते?)

रातराणी's picture

14 Sep 2015 - 11:23 pm | रातराणी

रूप पाहतां लोचनीं सुख जालें वो साजनी
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा

दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई
नीज दाट्ली डोळ्यात तरी घरी कुणी नाही

एस's picture

14 Sep 2015 - 11:38 pm | एस

हसले आज कुणी
तू का मी?
हो तू का मी!

श्रीरंग_जोशी's picture

14 Sep 2015 - 11:40 pm | श्रीरंग_जोशी

मी मज हरपून बसले गं, सखी मी मज हरपून बसले गं

आज पहाटे श्रीरंगाने, मजला पूरते लूटले गं
साखर झोपेमधेच अलगद प्राजक्तासम टिपले गं

रातराणी's picture

14 Sep 2015 - 11:41 pm | रातराणी

मन तळ्यात मन मल्यात
मन नाजूकशी मोती माळ
तुझ्या नाजुकशा गळ्यात

गे मायभू तुझे मी, फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे चंद्रसूर्यतारे

बादवे, गाण्याच्या भेंड्या म्हणायचं सोडून अंताक्षरी हा हिंदी शब्द का वापरला जातोय?

प्यारे१'s picture

14 Sep 2015 - 11:58 pm | प्यारे१

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा
सांडी तू अवगुणु रे भ्रमरा
(सर परत या. गाणं रिपीट झालं असल्यास क्षमस्व)

नीलमोहर's picture

15 Sep 2015 - 11:00 am | नीलमोहर

ऋतु हिरवा ऋतु बरवा
पाचूचा मनी रूजवा
पाचूचा मनी रूजवा
हिरवा,
ऋतु हिरवा ऋतु बरवा..

सिरुसेरि's picture

15 Sep 2015 - 12:10 pm | सिरुसेरि

विकल मन आज झुरत असहाय
हि चांदरात नीज नच त्यात
विरह सखी मी कुठवर साहू
नाही मज चैन
क्षण क्षण झुरती नैन कोणा सांगू

नीलमोहर's picture

15 Sep 2015 - 12:16 pm | नीलमोहर

गेले द्यायचे राहूनि
तुझे नक्षत्रांचे देणे..

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Sep 2015 - 12:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

नकळत सारे घडले
मी वळता पाउल अडले

पैजारबुवा,

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या, हा हा !

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Sep 2015 - 12:38 pm | ज्ञानोबाचे पैजार

हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरी, मठाची उठाठेव कां तरी
वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावे परि, हरीचें नांव भवांनुज तरी

पैजारबुवा,

सिरुसेरि's picture

15 Sep 2015 - 12:49 pm | सिरुसेरि

रवी मी हा चंद्र कसा मग मिरवितसे , लावित पिसे
त्या जे न साधे गगनी , गमे ते साधेची , तव या वदनी
अबलाबल नव हे भासे

द-बाहुबली's picture

15 Sep 2015 - 12:52 pm | द-बाहुबली

सांग कधि कळणार तुला.. भाव माझ्या मनातला...

Gayatri Muley's picture

15 Sep 2015 - 12:56 pm | Gayatri Muley

लवलव करी पात
डोळं नाही थार्‍याला
एकटक पाहु कसं
लुकलूक तार्‍याला

पुन्हा ल
;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Sep 2015 - 12:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?

पैजारबुवा,

नीलमोहर's picture

15 Sep 2015 - 12:59 pm | नीलमोहर

लाल लाल पागोटे गुलाबी शेला
पिंट्या दादा गेला जीव झाला वेडा..

(नक्की शब्द माहित नाहीत)

सिरुसेरि's picture

15 Sep 2015 - 1:20 pm | सिरुसेरि

डोंगरकाठाडी ठाकरवाडी , ठाकरवाडीला हुल्लडहोळी
आमची ठाकरवाडी

नीलमोहर's picture

15 Sep 2015 - 1:22 pm | नीलमोहर

डाव मांडून भांडून मोडू नको
डाव मोडू नको

भिंगरी's picture

15 Sep 2015 - 1:25 pm | भिंगरी

का रे दुरावा कारे अबोला
अपराध माझा असा काय झाला.

द-बाहुबली's picture

15 Sep 2015 - 2:01 pm | द-बाहुबली

लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे

नीलमोहर's picture

15 Sep 2015 - 2:18 pm | नीलमोहर

नाविका रे वारा वाहे रे
डौलाने हाक जरा आज नाव रे

द-बाहुबली's picture

15 Sep 2015 - 2:21 pm | द-बाहुबली

रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते
कून तान विसरन भान ही वाट कुणाची बघते
तया सपतसूराचया लाटेवरूनी साद ऐ!कूनी होई
राधा ही बावरी, हरी ची,राधा ही बावरी

भिंगरी's picture

15 Sep 2015 - 2:40 pm | भिंगरी

रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुनेलाही पूर चढे
.............
गेला माधव कुणीकडे

डोल डोलतंय वार्‍यावं बाय माझी
डोल डोलतंय वार्‍यावं

मी डोलकर डोलकर दर्याचा राजा

द-बाहुबली's picture

15 Sep 2015 - 2:55 pm | द-बाहुबली

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Sep 2015 - 3:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

झिणिझिणि वाजे बीन, सख्या रे, अनुदिन चीज नवीन

कधि अर्थाविण सुभग तराणा , कधी मंत्रांचा भास दिवाणा
सूर सुना कधि केविलवाणा शरणागत अति लीन
सख्या रे, अनुदिन चीज नवीन,

पैजारबुवा

द-बाहुबली's picture

15 Sep 2015 - 5:10 pm | द-बाहुबली

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच

चिउ चिउ चिमणी चारा खाते पानी पीते भुर्र उडून जाते ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Sep 2015 - 10:43 am | ज्ञानोबाचे पैजार

तुझ्या कांती सम रक्त पताका पूर्व दिशी उजळती
अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपति

पैजारबुवा

नीलमोहर's picture

16 Sep 2015 - 10:57 am | नीलमोहर

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
तूच कर्ता आणि करविता

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Sep 2015 - 11:01 am | ज्ञानोबाचे पैजार

तव नयनांचे दल हलले ग,
पानावरच्या दंवबिंदूपरी
त्रिभुवन हे डळमळले ग

तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सूर कोसळले
ऋषि-मुनि-योगी चळले ग,

पैजारबुवा

नीलमोहर's picture

16 Sep 2015 - 11:15 am | नीलमोहर

गारवा..
वार्‍यावर भिर भिर भिर पारवा नवा नवा

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Sep 2015 - 11:21 am | ज्ञानोबाचे पैजार

वाट इथे स्वप्‍नातिल संपली जणू
थांबवितो धारांनी सावळा घनू, ग बाई

पैजारबुवा

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते....