(इच्छामटण)

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
8 Sep 2015 - 4:45 pm

इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्‍या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही.

चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्‍यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो.

हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.

विडंबनविनोदमाहिती

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2015 - 4:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

अश्याप्रकारे इच्छामटणाचा खीमा झाला !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2015 - 6:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे काय चालवलंय हे ????? आँ ?????

इथे मटण-चिकन-माश्यांची खर्रीखुर्री चायपे चर्चा सुरू करून (इच्छामटना)चा पार खिमा करून टाकलात की, राव !!!!!!!!!!!!!!! =))

होबासराव's picture

9 Sep 2015 - 8:04 pm | होबासराव

काहि प्रतिसाद तर राजा एकदमच हेकोडे तिकोडे होउन राहिले ना..म्हंजे स्क्रिन च्या निरा उजविकडेच चाल्ले ना ते.वाच्याले लय तरास होउन राह्यला :)

पैसा's picture

9 Sep 2015 - 9:55 pm | पैसा

1

फुलथ्रॉटल जिनियस's picture

10 Sep 2015 - 12:09 am | फुलथ्रॉटल जिनियस

बामणानं मटण महाग केलं
दलितांनं पुस्तक महाग केलं
समाजवादाचं ओझं एकमेकांच्या दाराशी नेलं
त्यात आपल्या बापाचं काय गेलं?
( रामदास फुटाणे यांची चारोळी)

शित्रेउमेश's picture

10 Sep 2015 - 8:58 am | शित्रेउमेश

हा असला मस्त विषय चर्चायला श्रावणच का निवडलात??
जखमेवर मीठ (मीट) लावायचा प्रकार झाला हा...

वैष्णव पंथीयांनीच हे सगळं सुरू केलं आहे, कि सात्विक गुणांसाठी शाकाहार करणे वगैरे. आणि हिंदू धर्मात वैष्णव पंथ जास्ती प्रभावी असल्यामुळे हिंदूधर्मामध्ये मांसाहार निषिद्ध आहे असा त्यांनी प्रसार केला. आणि तोच समज आजही बहुतेकांचा आहे कि हिंदू धर्मात मांसाहार नको आहे.
आपण जर अभ्यासपूर्ण निरिक्षण केल्यास असे लक्षात कि वैष्णव पंथीयच यथाशक्ती प्रयत्न करून असे सांगतात कि मांसाहार करू नये.
उदा.- वारकरी संप्रदाय
इस्काॅन आणि बरेच
त्यामुळे मांसाहार केल्यामुळे पाप वगैरे लागते म्हणजे कहरच झाला.
आणि गीतेमध्ये जे काही मांसाहाराबद्दल असेल तर ते वैष्णवपंथीयांनीच नंतर घुसडले असणार हे नक्की.तेव्हा मित्रांनो काही होत नाही हादडा तुम्ही पोट भरून,फक्त अतिरेक नको व्हायला एवढेच.
स्वामी विवेकानंद मांसाहारी होते माहित आहे ना? कारण ते शाक्त पंथ मानणारे होते,आणि बंगालीही होते.

आणि आत्मा मरत नाही त्यामुळे त्या प्राण्याला(पशू,पक्षी,श्वापदे,मानव नव्हे) मारणे म्हणजे त्याचे शरीर मारणे होय.फक्त हे सार्वजनिक असू नये इतकेच.

प्यारे१'s picture

10 Sep 2015 - 1:42 pm | प्यारे१

खिक्क्क्क!

अगदी बरोबर यॉर्करराव!!!! एकदम यॉर्कर अर्ग्युमेंट्स आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

11 Sep 2015 - 12:03 pm | प्रसाद गोडबोले

वैष्णव पंथीयांनीच हे सगळं सुरू केलं आहे, कि सात्विक गुणांसाठी शाकाहार करणे वगैरे.

ब्यॅटुअण्णा , हे विधान बरोबर आहे असे म्हणता ? आमच्या अब्यासानुसार तर जैनांनीच शाकाहार वगैरे सुरु केले , आणि जैन हा संप्रदाय बैश्णव संप्रदायाच्या किमान १००० वर्ष आधीचा आहे , आणि वैदिक लोकं सर्रास मांसभक्षण करत होते ,

थोडक्यात शाकाहारी दहशतवादाचे खापर हिंदु वैष्णवांच्या माथ्यावर कसे काय फोडता येईल ? सुरुवात जैनांनीच केली ना ? यज्ञातील हिंसेला विरोध आधी बौध्दांनी केला ना ? अहिंसेच्या अतिरेकाचे पाप वैष्णवांचे कसे ?

नाही म्हणजे तो तसा प्रचार अजेंड्याचा भाग असेल तर राहु द्या .... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

सुरुवात जैन - बौद्धांनी केली हे बरोबर. पण त्यांची तळी उचलून अन्य पंथीय लोकांना गिल्ट काँप्लेक्स देण्यात आघाडीवर कोण आहे हे पहा, म्हणजे कळेल. त्यांनी दिलेली उदा. बरोबरच आहेत. शैवपंथीय लिंगायतही कट्टर व्हेजी असतात, पण ते कै भारतव्यापी नव्हेत. भारतव्यापी लेव्हलला असा आग्रह कोण करते ते पहा.

बाकी अजेंड्याबद्दल तुम्ही सांगणे म्हणजे...ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

प्रसाद गोडबोले's picture

11 Sep 2015 - 12:18 pm | प्रसाद गोडबोले

वैष्णव पंथीयांनीच हे सगळं सुरू केलं आहे, कि सात्विक गुणांसाठी शाकाहार करणे वगैरे.

हे विधान चुकीचे आहे हे मान्य केल्या बद्दल धन्यवाद :)

बाकी ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !!

आणि आम्ही कशाला कोणता अजेंडा राबवू ? कारण जेव्हा धर्माला ग्लानि येईल तेव्हा भगवंत अवतीर्ण होतीलच. ! त्यामुळे तुम्ही उगीच आमच्या अजेंड्याची काळजी करू नका.
आणि हो, रूढी,परंपरा,संस्कृती,म्हणजे धर्म नव्हे.धर्माची व्याख्या वेगळीच आहे ती जाणून घ्या.
आणि जैन,बौद्ध म्हणजे हिंदूंमधील काही कर्मकांडाना वैतागून तयार झालेले संप्रदाय आहेत त्याला नंतर धर्मांचे स्वरूप आले हा वेगळा विषय.
त्यामुळे या वर्गांना धर्मांमध्ये न बघता हिंदूमधीलच एक वेगळे पंथ म्हणून बघा,

आणि जाता जाता.......
गौतम बौद्ध सुद्धा मांस खात होते त्यांचे इतकेच म्हणणे होते कि खास खाण्याकरिता प्राणी हिंसा करू नका,एखादा प्राणी मृत झाला असेल तर त्याचे मांस खाल्ले तर काही हरकत नाही .(हे उदाहरण बुद्धांना विष्णूंचा अवतार मानणार्या वैष्णवपंथीयांसाठी)

अमेरिका,चीन,जपान,इग्लंड,फ्रांस हे काय शुद्ध शाकाहारी देश आहेत काय? त्यांची प्रगती बघा जरा.

आणि मानव शराराची रचना शाक आणि मांस दोन्ही पचवू शकेल अशी आहे, मग कशाला नसती उठाठेव सगळी?

प्रसाद गोडबोले's picture

14 Sep 2015 - 1:16 pm | प्रसाद गोडबोले

मानव शराराची रचना शाक आणि मांस दोन्ही पचवू शकेल अशी आहे, मग कशाला नसती उठाठेव सगळी?

हेच तर ना ! वैदिक धर्मात असली कसलीही नसती उठाठेव नव्हती , लोकं सर्रास मांसभक्षण कराचे , वैदिक धर्मात जितक्या काही वाईट रुढी प्रथा घुसल्या आहेत त्या सार्‍या जैन , बौध्द , अवैदिक लोकल संप्रदायातुनच घुसल्या आहेत आणि त्यातुन जे काही निर्माण झाले त्याला आज हिंदु धर्म म्हणतात !!

असो . मटनाच्या धाग्यावर कशाला अस्मिता उधळताय , रसा ओरपा की निवांत ....

बोका-ए-आझम's picture

11 Sep 2015 - 12:27 am | बोका-ए-आझम

हा खरा इनस्विंगिंग याॅर्कर!

कपिलमुनी's picture

10 Sep 2015 - 1:41 pm | कपिलमुनी

पुण्यात चांगला सावजी मटण कुठे मिळते ?

मला पुण्यातले महित नाही पण सोलापुरात श्रवण सावजी, वैशाली सावजी अन मंगेश सावजीचे खिमा ऊंडे भारी असत्तात. बिर्यानी पण टिपिकल भुश्शाच्या शेगडीवरच्या मटणाच्या टेस्टसहित. अजून बरेच घरगुती सावजी बनवून देणारे आहेत. एकसे एक टेस्ट वाले. वैशाली सावजीत आधी क्वेल (तित्तर) मिळायचा. सध्या नाही.

राही's picture

28 Oct 2015 - 10:37 am | राही

काय तर मग? झाला की नाही 'लंगोटकट्टा'?
निदान 'गोटकट्टा' तरी?

प्यारे१'s picture

28 Oct 2015 - 11:33 am | प्यारे१

नेमकं काय अपेक्षित आहे? ;)

राही's picture

28 Oct 2015 - 1:25 pm | राही

प्रतिसादातील वरील दोन शब्दांच्या साहचर्यामुळे अर्थाच्या अनेक शक्यता निर्माण होण्याची शक्यता असली तरी आमच्या कल्पनेची भरारी गोट्=बकरा/बकरी किंवा तत्सम प्राणी इतपतच असल्याने आपण निर्धास्त असावे.

प्यारे१'s picture

29 Oct 2015 - 9:02 pm | प्यारे१

जीव भांड्यात पडला.

नगर रोडला खराडीपासून जवळच असलेले कावेरी!!!! काय मटन आहे तेच्यायला, लयच मज्या आली राव खाऊन. रस्सापण असला चविष्ट, आहाहाहा....ह्याऽऽ मोठाल्या भाकर्‍या आणि हे चविष्ट मटन....तोंडाला चव आली हे लिहूनसुद्धा.

मालोजीराव's picture

30 Oct 2015 - 2:38 pm | मालोजीराव

वाघोलीवाली मेन ब्रांच का बे ?

मेन ब्रांच की नै ते ठाऊक नाञ, परंतु हे आहे त्याच बाजूस खरे.

मालोजीराव's picture

30 Oct 2015 - 3:02 pm | मालोजीराव

तेच असेल… हांडेवाडीच्या शिवेंद्र ची मटण भाकरी हाणलीस का नाय ? यात्रेची टेस्ट एकदम

नाय बा. ते कुठंय हांडेवाडीत नेमकं?

मालोजीराव's picture

30 Oct 2015 - 3:47 pm | मालोजीराव

हडपसर ते हांडेवाडी जाताना उजव्या बाजूलाच हांडेवाडी चौकात...बाकी आर्थर्स थिम कस आहे, डक / टर्की मीट साथी भेट द्यायची इछा आहे

आर्थर्स थीम उत्तम आहे, भाव रीझनेबल आहेत. टेस्ट इंडियन स्टाईल आजिबात नाही. फिशच्या काही डिशेस छान बनवतात, चिकनही उत्तमच असते. पण सोबत नुस्ती रोटी वा नुस्ता राईस नाय मिळत. ब्रेड देतात छोटेसे आणि बटर प्याक्स.

कोरेगाव पार्कात किंवा आसपास आवडलेली अजून काही ठिकाणे :

फ्रेंच विंडो नामक पॅटिसेरी / बेकरी. अस्सल फ्रेंच पद्धतीच्या पेस्ट्रीज अतिशय उत्तम मिळतात. तिथली "शू पेस्ट्री" अवश्य विचारा अन खा. कमी गोड असते पण जाम चविष्ट लागते. इतर ऑप्शन्सही अवश्य ट्राय करावेत.

मलाक्का स्पाईसः इंडोनेशियन पद्धतीचे जेवण. फिश, सूप्स आणि चिकन डिशेस एक नंबर. मात्र महाग.

हॉटेल वेस्टिनला लागून एबीसी फार्म्स आहे, तिथे चारपाच हाटेले एकमेकांना लागून आहेत. पैकी शिशा जॅझ कॅफे इथे मिडल ईस्टर्न पद्धतीचे जेवण उत्तम मिळते. विशेषतः डोनर कबाब खावा तर तिथेच.

त्याच लायनीत अजून एकदोन हाटेले सोडून जे हाटेल येते (विदिन एबीसी फार्म ओनली) त्यात थिन क्रस्ट चिकन पिझ्झा लय भारी मिळतो. तिथे ओपन एअर शिटाच आहेत मोस्टली.

बॅटमॅन's picture

30 Oct 2015 - 4:42 pm | बॅटमॅन

मी तिथले डक अथवा टर्की टेस्ट नै केले अजून.

मालोजीराव's picture

30 Oct 2015 - 5:28 pm | मालोजीराव

मलाक्का स्पाईस, शिशा ला गेलोय...मलाक्का चा चोप्स फ्राय जबरी

टर्कि,डक इतर कुठे मिळतात याबद्दल कल्पना नाही म्हणून आर्थर्स. प्रभात रोड च ले प्लेसैर पण झकास फ्रेन्च Cafe आहे.
कोथरूड शिवाजी पुतळा जवळचे मालवणी नाका चे मासे आवड्ले इतर ठिकाणापेक्शा

ले प्लेसिरला गेले पाहिजे, लै ऐकून आहे त्याबद्दल.

तदुपरि पेठेतले फिशकरीराईस एक नंबर वाटले. मालवणी नाका ट्राय केला पाहिजे.

ऑर्थर्स थीम बाबत मालोजीराजे अन बॅट्याबुवाला धन्यवाद. जाऊन येणारच एकडाव.
बाकी एखादे फूड पोर्टल काढायचे ठरले तर बॅटया बुक आहेस रे तू. हा व्यासंग चांगला जोपासलायस तू. थम्सप त्यासाठी.

जमेल तेव्हा कळव, मीही येईन.

हा व्यासंग माझा कायच नाय बे. पण्णासराव अन मोदक व मृत्युंजय यांच्यापासून पेर्णा घेट्लो त्यासाठी.

शाकाहाऱ्यांसाठी इच्छावरण असा धागा काढावा काय?

बॅटमॅन's picture

2 Nov 2015 - 1:06 pm | बॅटमॅन

हज्जार वेळा.

आमच्या मूडप्रमाणे आम्ही शाक मांस दोन्ही खात असल्यामुळे दोन्ही धागे आमच्या कामाचेच आहेत.

तूर्तास एक प्रश्न विचारतो:

केळीच्या पानावरची टिपिकल साऊथ इंडियन थाळी पुण्यात कुठे मिळते?

मला एकच ठिकाण माहितीये- द्रविडा'ज़ बिस्त्रो, पुणे स्टेशनजवळ ढोले पाटील रोडवर सिगरी जिथे आहे त्याच बिल्डिंगीत.

अन्य कुठेशीक मिळत असल्यास सांगावे.

प्रचेतस's picture

2 Nov 2015 - 2:44 pm | प्रचेतस

केरला फास्ट फ़ूड म्हणून औंध आणि खडकी येथे दोन जॉइंट्स आहेत. तिथे केळ्याच्या पानावर केरळी थाळी मिळते असे ऐकून आहे. क्वालिटीबद्दल माहीत नै.

बॅटमॅन's picture

2 Nov 2015 - 2:48 pm | बॅटमॅन

धन्स रे.

मालोजीराव's picture

3 Nov 2015 - 1:03 pm | मालोजीराव

लय वेळा जेवलोय तिकड, रोस्ट चिकन आणि अप्पम अफलातून आहे, कोत्ठू पराठा पण चांगला होता. केरला लंच घेतला तरच ते केळीच पान वगैरे येतं

तुमच्यासारख्या लोकानी तिकडे पाठ फिरवल्यामुळे हे हाटिल बंद पडले आहे.
एक क्रमांक द्रविडी जेवण द्यायची ती पोरगी. इड्यप्पम लय विषेश.

निओ's picture

3 Nov 2015 - 11:50 pm | निओ

लय भारी ..

मालोजीराव's picture

3 Nov 2015 - 3:33 pm | मालोजीराव

shivendra

shivendra 2

मालोजीराव's picture

3 Nov 2015 - 6:01 pm | मालोजीराव

shiv

अभ्या..'s picture

3 Nov 2015 - 11:52 pm | अभ्या..

राजं....
फटू दिसना. :(

मालोजीराव's picture

4 Nov 2015 - 12:18 am | मालोजीराव

shiv

shiva

अभ्या..'s picture

4 Nov 2015 - 12:21 am | अभ्या..

दिसला. ....
लालभडाक तर्रीवाला.
मस्त. एकदम बारक्या परातीत बिरातीत. लैच भारी. कंदुरीची याद आली.

मालोजीराव's picture

4 Nov 2015 - 10:28 am | मालोजीराव

बार्शीत कुठ चांगली सोय ए मटणाची ?

Pain6's picture

29 Oct 2015 - 11:45 am | Pain6

हाहाहा

अभिजीत अवलिया's picture

29 Oct 2015 - 8:34 pm | अभिजीत अवलिया

सर्व मिपाकारानी इतक्या हॉटेल ची नावे दिली आहेत कि ह्या सर्व ठिकाणी एक एकदा जायचे म्हंटले तर पाच एक वर्ष तरी सहज निघून जातील आस्वाद घेण्यात.

जेपी's picture

31 Oct 2015 - 9:28 am | जेपी

0

संजय पाटिल's picture

31 Oct 2015 - 10:43 am | संजय पाटिल

एका वाटीत रस्सा, एका वाटीत मटण आहे हे कळतय. मधल्या वाटीत (की प्लेटीत) काय आहे?

बोका-ए-आझम's picture

1 Nov 2015 - 9:32 pm | बोका-ए-आझम

.

मधल्या वाटीत सुके मटण आहे.

याॅर्कर's picture

1 Nov 2015 - 2:51 pm | याॅर्कर

बिल घेऊन ये

कपिलमुनी's picture

3 Nov 2015 - 4:29 pm | कपिलमुनी

तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगावकडून चाकणला जाताना नदीच्या अलीकडे आपुलकी मधे मटण , चिकन थाळी मिळते.. तिथली आपुलकी स्पेशल चिकन थाळी मस्त असते !

प्रसाद गोडबोले's picture

3 Jun 2016 - 12:12 pm | प्रसाद गोडबोले

आपल्या हिंजवडी मध्ये कोठे चांगले मटन भाकरी मिळेल ?
(लय भारी कोल्हापुरी आहे , पण त्याचा रिव्हुव लय बेकार आहे )

हतोळकरांचा प्रसाद's picture

4 Dec 2016 - 12:41 pm | हतोळकरांचा प्रसाद

हिंजवडीत फारसे चांगले पर्याय नाहीत. एक सोनाली ढाबा होता आधी चांगला पण हल्ली तोही आवडत नाही. म्हणून आम्ही थोडं लांब पण रावेतला दाजीच्या ढाब्याला जातो. चिंचवडचं "जैत रे जैत" पण निघालं तेव्हा ठीक होतं पण अलीकडे चांगलं नाही वाटलं. मी चिंचवडच्या लईभारी कोल्हापुरला गेलो होतो, अजिबात आवडलं नाही.

गणामास्तर's picture

6 Dec 2016 - 3:21 pm | गणामास्तर

हिंजवडी चौकाच्या पुढे 'रसरंग स्वीट्स' च्या जवळ 'मल्हार' म्हणून आहे, तिथली मटन भाकरी चांगली आहे असे ऐकून आहे.
जाऊन बघूया लवकरचं :)

हतोळकरांचा प्रसाद's picture

6 Dec 2016 - 3:39 pm | हतोळकरांचा प्रसाद

सांगा कवा जायचं? मी कालच ऐकलं त्या हॉटेलबद्दल.

गणामास्तर's picture

6 Dec 2016 - 4:20 pm | गणामास्तर

चला आज. मी आहे ९ - ९.३० पर्यंत हापिसात :)

प्रसाद गोडबोले's picture

6 Dec 2016 - 4:30 pm | प्रसाद गोडबोले

मी पण आहे ९ - ९.३० पर्यंत हापिसात.

पण आधि बोकडाचे आहे की बोल्हाई चे ते कन्फर्म करा. हिंजवडी असल्याने बोल्हाई असण्याची दाट शक्यता आहे आणि मला आता बोल्हाई चे खायची इच्छा नाही.

थॅन्क्स अ‍ॅन्ड रीगार्ड्स
प्रसाद

गणामास्तर's picture

6 Dec 2016 - 4:39 pm | गणामास्तर

ओक्के. तिथे जाऊन खाऊन चेक करतो आणि मग तुला फोन करतो, ओके ? =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

6 Dec 2016 - 9:47 pm | हतोळकरांचा प्रसाद

हुइंग!! उशिरा बघितला मेसेज राव! 7 लाच आलाव घरी! गेलताव का?

गणामास्तर's picture

7 Dec 2016 - 2:48 pm | गणामास्तर

आज दुपारीचं जाऊन आलो. जबरदस्त चव आहे मटनाची (फक्त बोल्हाईचे मिळते).
मटन एकदम निगुतीने शिजवलेले होते, रस्सा तर अफलातून होता. अळणी सुद्धा भारी होते.
मार्कस राजेंनी चिकन खाल्ले पण त्यात मजा नव्हती.

प्रसाद गोडबोले's picture

7 Dec 2016 - 2:55 pm | प्रसाद गोडबोले

मटण रस्स्सा भारी ! चिकन अगदीच ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ होते ! सर्विस लय स्लो होती तब्बल अर्धा तास लावला ताटे लावायला पण ते बहुतेक सकाळची वेळ असल्याने असावे.

ओव्हरॉल रेटिंग ४*

चला हिंजवडी कट्ट्याला एक भारी जागा सापडली !

हतोळकरांचा प्रसाद's picture

7 Dec 2016 - 3:30 pm | हतोळकरांचा प्रसाद

ह्या काय ह्या काय? एकटेच (मंजी दोगंच) जाऊन आलाव? मेसेज टाकायचा ना एक हितं! आम्ही आज जायचा बनवलेला प्लॅन ऐनवेळी ढेपाळला, ऑफिसमधल्या अंडाकरीवर भागवावं लागलं :(.

वरुण मोहिते's picture

2 Dec 2016 - 8:23 pm | वरुण मोहिते

काही अनवट ठिकाणं . जव्हार नाशिक रोड सगळीकडे उत्तम वेगळीच चव असलेलं मटण. लातूर आणि उस्मानाबाद जबरदस्त मटण. माझा एक मित्र आहे हिंदू खाटीक एकतर त्यांचे बार असतात किंवा सावकारी धंदा . मटणावर मस्त तूप टाकावं आणि भाकरी बस्स हा प्रकार तिथेच खावा . त्यांच्या घरातच . बाकी बरीच ठिकाणं बोलून झाली आहेत तरी आवर्जून उल्लेख करावा लागेल तो राजस्थानात लाल मास चा आणि मंगलोर ला मिळणाऱ्या मटणाचा .
मुंबई मधील सामिष खाद्यप्रकार ह्यावर एक स्वतंत्र धागा काढायचा आहे . जाता जाता गुजरातलाही उत्तम मटण मिळत अहमदाबाद वडोदरा येथे . कधी गुजराती थाळी खाऊन बोर झालात तर जरूर ट्राय करा

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Dec 2016 - 8:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

कधी वऱ्हाडात चक्कर मारा, वऱ्हाडी रस्सा, जिळ्यागणिक टेस्ट मध्ये फरक जाणवेल अन कदाचित आवडेलही तुम्हाला. शिवाय सावजी मटण आहेच :)

वरुण मोहिते's picture

2 Dec 2016 - 8:38 pm | वरुण मोहिते

चंद्रपूर ला जावं लागायचं खूप वेळा एका पॉवर प्लांट साठी त्यामुळे अकोला अमरावती नागपूर शोधून शोधून खायचो तिथल्या हॉटेलात . ड्राईव्ह करत जायचो त्यामुळे .

संदीप ताम्हनकर's picture

4 Dec 2016 - 2:36 pm | संदीप ताम्हनकर

बडवे खानावळ इचलकरंजी
तारांगण - जगदंबा च्या समोर खेड शिवापूर टोलनाक्याच्या अलीकडे पुणे बाजूस.
इकडेपण उत्तम मटणभाकरी मिळते.

वरुण मोहिते's picture

5 Dec 2016 - 3:37 pm | वरुण मोहिते

ललित रेफ्रेशमेंट मध्ये खा फोर्ट ला गुड फिश गुड नॉनव्हेज . त्याच्या बाजूलाच अपूर्वा आहे नॉनव्हेज छान मिळत मंगलोरी पद्धतीचं.महेश लंच होम ला पण तोड देईल असं.बाजूलाच प्रदीप लंच होम आहे तिथे पण मस्त मटण मिळतं. गिरगावात अनेक ठिकाण आहेत बोरिवलीला पाचकळशी मटण प्रसिद्ध आहे .अशी अनेक ठिकाण आहेत. मुंबईतील खादाडी वर एक स्वतंत्र धागा काढावा कोणीतरी . दादर गिरगाव फोर्ट बांद्रा हि म्हणजे आद्य पंढरी आहे खाणाऱ्या लोकांची . सर्व प्रकारच्या खाण्या बाबतीत .बाहेर जायलाच नको .

प्रसाद गोडबोले's picture

5 Dec 2016 - 4:32 pm | प्रसाद गोडबोले

बोरिवलीला पाचकळशी मटण

.... नाव ऐकुनच नको वाटतय तिथे जायला :(

वरुण मोहिते's picture

7 Dec 2016 - 9:18 pm | वरुण मोहिते

हॉटेल च नाव नाही हो जात आहे पाचकळशी ..९०-१०० वर्षांपासून खानावळ चालवतात ती लोकं

भावना कल्लोळ's picture

6 Dec 2016 - 6:21 pm | भावना कल्लोळ

दादर गिरगाव फोर्ट बांद्रा हि म्हणजे आद्य पंढरी आहे खाणाऱ्या लोकांची... प्रचंड सहमत

पाटीलभाऊ's picture

7 Dec 2016 - 5:46 pm | पाटीलभाऊ

उपयुक्त धागा...वाचनखूण साठवली गेली आहे. :P

डिस्कोपोन्या's picture

7 Dec 2016 - 6:19 pm | डिस्कोपोन्या

पुण्याजवळ भोर मध्ये (शिवापूर जवळ सुद्धा आहे) "पलंगे बिर्याणी" ची चव recently आवडली आहे..पुन्हा एकदा try करुन confirm करायचा विचार आहे..

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Dec 2016 - 6:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

एका काळ होता जेव्हा हैद्राबादी बिर्याणी सोडून इतर काहीच आवडत नसे, पण तोवर मी अवधी बिर्यानी हाणली नव्हती. वाह वाह अन फक्त वाह, एखादी थंड धुकाळलेली अवधी लखनवी संध्याकाळ, बडा इमामबाडा भागात खाण्याचे सुगंध दरवळत आहेत, एकीकडे जगप्रसिद्ध गलौटी कबाब खुणावत आहेत पण मी स्थितप्रज्ञ योग्यासारखा त्या कबाबचे लटके झटके टाळून पुढे जातोय, इतक्यात दरवळतो एक सुगंध न टाळता येण्यासारखा, जणू तपोभंग करणारी एखादी अमरवतीतली अप्सराच ती, उघडलं बघा झाकण देगचीचं त्या कुलीन घरंदाज नवाबी शिया रसोईयाने, जणू डोकेच फिरावे, शीतं मोकळीमोकळी असलेला सुगंधी बासमती, त्यात इतर अवर्णनीय मिलाफ, बाबौ तोंडात त्सुनामी उठली तिच्यायची (डोळे झाकलेले माकड स्मायली)

हतोळकरांचा प्रसाद's picture

7 Dec 2016 - 8:28 pm | हतोळकरांचा प्रसाद

रहेम बाप्पु रहेम! एवढं रसभरीत वर्णन, जवळपास तसलं काही खायला नसताना, अन्याव हाये ह्यो! त्रिवार निषेध!

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Dec 2016 - 10:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

सरजी, नुसतं चार ओळीचं वर्णन वाचून असं झालं तर तुम्ही मिपाद्वाडकार्टी संघटना सहसचिव श्री बॅटमॅन विरचित बिर्याणी स्तोत्र वाचायला हवं होतं, लेकाच्याने येत असलेली सगळी (हुच्च) संस्कृत ओतून लिहिलं होतं गुलाम ते स्तोत्र.

वरुण मोहिते's picture

7 Dec 2016 - 9:24 pm | वरुण मोहिते

लखनौ म्हटलं कि मला फक्त टुंडा कबाब आठवतात .

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Dec 2016 - 10:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

सरजी तुंडा इज द टीप ऑफ आईसबर्ग, मोतीपुलाव नामे एक आयटम मिळतो (त्याबद्दल एपिक चॅनलवर लॉस्ट रेसिपी मध्ये एक एपिसोड पण झालाय) खूप दुर्मिळ पाककृती आहे त्यात अंड्याच्या पांढऱ्या भागाला इंजेकशन ने बोकडाच्या वजडीत भरतात अन ती वजडी ठराविक अंतराने दोऱ्याने बांधतात, मग ते पूर्ण जंगम प्रकरण उकळतात, नंतर वजडी कात्रीने फाडून टाकतात तेव्हा आतून अंड्याच्या पांढऱ्या भागाचे सुंदर पांढरे मोती बनून निघतात उकडल्यामुळे, असे हे मोती अव्वल बासमती, बोनलेस कलेजी वगैरे घालून शिजवलेल्या उमद्या पर्शियन स्टाईल पुलावात घालतात, वरतून मजबूत तूप ओतून दम देतात अन चांदीचा वर्ख लावतात, च्यायला मोतीपुलाव खरंच खाण्याची चीज आहे राव !! (दोन डोळ्यात हृदयं असलेली स्मायली)

चांदणे संदीप's picture

8 Dec 2016 - 3:47 pm | चांदणे संदीप

मीसुद्धा एपिकचा फ्यान आहे आणि हा मोतीपुलाव टू डू लिस्ट वर पाहिल्याक्षणीच घेऊन टाकलेला! :)

Sandy

बाकी हैदराबाद वरून आठवलं बऱ्याचदा जाऊन काही वेगळी ठिकाणं.. तिथे सिकंदराबाद क्लब ला जे जेवण मिळत ते अप्रतिम आणि आलवाल ला आर्मी कॉंटेन्मेन्ट आहे माझे २ मेजर मित्र होते तेव्हा मी गेलेलो जे मटण आणि फूड त्याला तोड नाही इन निजाम पॅलेस गुड व्हिस्की आणि बेस्ट बिर्याणी जी अक्ख्या हैद्राबाद ला मिळणार नाही . ते असो पण सिकंदराबाद क्लब जरूर ट्राय करा .

प्रसाद गोडबोले's picture

15 Jan 2019 - 1:04 pm | प्रसाद गोडबोले

नुकतेच ३ ठिकाणी मटण भाकरी खाण्याचा योग आला

१. दक्खन स्पाईस , वाकड
अतिषय उत्तम मटण आणि इन्द्रायणी भातही अप्रतिम !

२. जगदंबा हॉटेल , पुणे सातारा महामार्ग
इथे आधीही जेवण्याचे बेत झाले आहेत. ह्यावेळेला तब्बल अर्धा पाऊण तास वेटिंग होते , किमान ५०-७० माणसे हॉतेल बाहेर उभी होती !
जेवण अप्रतिम . मटण ओके टाईप्स. मस्त पण स्टिल ऑके . रस्सा जरा जास्तच तिखट . इन्द्रायणी भात मात्र तुफ्फान ! शिवाय अळणी थाळी सोबत अळणी भातही सर्व्ह केलेला . पहिल्यादा तो पाहुन हे काय वरणभातासारखे सर्व्ह केले आहे असे वाटले पण पहिला घास खल्ल्या बरोबर जाणवले ... निव्वळ सुख !
३. लाड , काळाखडक , भुमकर चौकाच्या जवऴ वाकड
बास बास ! ऑफिसातुन घरी जाताना अप्रतिम मटण खायला मिळेल अशी जागा सापडली शेवटी !! कुक / ओनर बहुतेक सातार्‍याच्या माणुस आहे ! एक नंबर टेस्ट ! मटण तांबडा पांढरा आणि इंद्रायणी भात सारेच उत्तम !

आता नेक्स्ट कधी आणी कोठे भेटायचे बोला !

प्रसाद गोडबोले's picture

16 Apr 2019 - 6:40 pm | प्रसाद गोडबोले

महत्वाचा धागा : मागील पानांवरुन पुढे काढत आहे !

नुकतेच बंगलोर मध्ये सुर्यवंशी रेस्टोरंट मध्ये मटन भाकरी खायला मिळाली ! सीरीयसली , आय वॉज मिसिन्ग तांबडा पांढरा अँड फाऊन्ड द प्लेस !
मटण इतके खास नाही पण ठीक आहे , अगदीच मराठी कोल्हापुरी पध्दतीच्या मटणाची आठवण झाल्यावर जाण्यास उत्तम जागा ! प्रॉन्स मसाला मात्र अफलातुन होता !

बँगलोर मध्ये अजुन कोणी मिपाकर आहेत का? असल्यास अजुन काही मटण ( किम्व्वा मासे, सीफुड वगैरे ही चालतील) हॉटेल्स सुचवणे ही विज्ञापना !
कळावे !