सूर्य मावळतीकडं आला होता .
ओढ्याच्या बाजूने पलीकडच्या पा॑दीत शिरलो .
पाण्याशेजारी बसून घटकाभर डोळे मिटले .
तेवढ्यात मागून पक्या आला.
पाटलाच्या घरातून मटणाचा वास येतोय म्हणाला .
रात्री चांदीच.
निघालो दोघे .
खमंग वासान डोकं चवताळतय.
पाटलाघरचं जेवण संपायची वाट बघतोय.
दम निघना.
देशमुखांच्या घरी जायची पक्यानं शिफारस केली .
मी नाही म्हणालो. परवा शिळ्या भाकरीचा तुकडा नरड्यात अडकला होता . किती खोकलो तरी निघता निघत नव्हता .
वाट बघू पण मटणचं खाऊ.
आण्या, सुरश्या, विक्या रानात सुशीच्या मागावर होती.
नाहीतर सोन्यासारख्या संधीच मातेरं झालं असतं.
जीव मुठीत धरून तसंच कितीतरी वेळ बसून राहिलो.
झोपायच्या आधी पाटलीनबाईनं ऊकिरड्यावर खरकटं फेकलं.
मग आम्हि दोघांनी शेपट्या हलवत मटणाचा यथेच्छ स्वाद चाखला.
प्रतिक्रिया
19 Aug 2015 - 9:16 pm | नाव आडनाव
:)
19 Aug 2015 - 9:20 pm | माम्लेदारचा पन्खा
अरेरे...... मटणाऐवजी वाटाणे टाकायचे हो !
19 Aug 2015 - 9:51 pm | जव्हेरगंज
तुम्ही तर वाटाण्याच्या अक्षताच लावल्या की हो....
19 Aug 2015 - 9:22 pm | बॅटमॅन
हा हा हा, मला वाटलं किमान माहुताने दिलेल्या भात-पेंडीची कथा टाकेल जव्हेरगंज, पण छानच जमलीये कथा.
19 Aug 2015 - 9:56 pm | जव्हेरगंज
उन्मत्त गजाला भात-पेंडीपेक्षा अजुनही काही हवं असतं हो...
20 Aug 2015 - 1:36 am | उगा काहितरीच
हाहाहा प्रतिसाद आणि कथा दोन्ही आवडले.
20 Aug 2015 - 6:25 pm | बॅटमॅन
जव्हेरगंज, जव्हेरगंज!!!!
बॅटमॅन शिंदे. ;)
20 Aug 2015 - 10:23 pm | जव्हेरगंज
अस्मादिक झाडावर चढले गेले आहेत. तुर्तास काळजी नसावी.
20 Aug 2015 - 11:04 pm | बॅटमॅन
क्या बात है!
20 Aug 2015 - 1:12 pm | जेपी
मला वाटल रेशिपी हाय काय की!!
20 Aug 2015 - 5:49 pm | gogglya
अन्डे घालून लिहिता येईल का?
20 Aug 2015 - 6:32 pm | सूड
अंड घातल्यानंतर लिहायचं अवसान उरलं तर नक्की लिहा!!
20 Aug 2015 - 6:27 pm | प्राची अश्विनी
:):)
20 Aug 2015 - 6:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त जमली आहे कथा...
आण्या, सुरश्या, विक्या रानात सुशीच्या मागावर होती.
इथे शेवटाचा अंदाज आला !
20 Aug 2015 - 6:49 pm | बबन ताम्बे
.
21 Aug 2015 - 11:23 am | तुषार काळभोर
भादवाची वाट बघू द्या आण्या, सुरश्या, विक्या आणि सुशी ह्यांना
21 Aug 2015 - 11:34 am | बबन ताम्बे
बाय द वे, कथा खूप आवडली.
20 Aug 2015 - 10:00 pm | पीशिम्पी
झक्कास...
21 Aug 2015 - 11:24 am | अभिजितमोहोळकर
कल्ला!!
21 Aug 2015 - 12:04 pm | डायवर
+ 1
22 Aug 2015 - 8:07 pm | सत्याचे प्रयोग
मटण खायला जावे आणि ताटात बेसन यावे असा फिल आलाय
22 Aug 2015 - 8:29 pm | मांत्रिक
?????
एक कथाप्रकार म्हणून वाचा. चांगलीच आहे. प्राणी नायक होऊ शकत नाहीत का एखाद्या कथेचे? त्यात चूक काय?
अतिश्श्श्शय वेगळा कथाप्रकार हाताळल्याबद्दल मला तर कौतुक वाटतं लेखकाचं!
22 Aug 2015 - 8:30 pm | मांत्रिक
हा प्रतिसाद सत्याचे प्रयोग यांचेसाठी आहे.
22 Aug 2015 - 8:30 pm | मांत्रिक
हा प्रतिसाद सत्याचे प्रयोग यांचेसाठी आहे.
22 Aug 2015 - 10:17 pm | सत्याचे प्रयोग
मांत्रिक यांच्या दोन प्रतिसादावरून कथा परत वाचली. कथा मंतरलेली वाटायला लागली. कृपया मटणच्या ऐवजी बेसन व बेसनच्या ऐवजी मटण वाचावे.
22 Aug 2015 - 10:24 pm | मांत्रिक
हायल्ला!!! कथेत बेसनचा उल्लेख कुठेच नाहीये!!!
पण मूळ मुद्द्याला बगल देऊ नका! कुत्रा नायक का होऊ शकत नाही एखाद्या कथेचा?
23 Aug 2015 - 12:40 am | जव्हेरगंज
अतिश्श्श्शय वेगळा कथाप्रकार हाताळल्याबद्दल मला तर कौतुक वाटतं लेखकाचं!>>>>>>>>>
लै धन्यवाद ...!!:-)
22 Aug 2015 - 9:19 pm | पैसा
मजेशीर!
22 Aug 2015 - 9:28 pm | तीरूपुत्र
कडक कथा....+१११११११