******************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा
********************************************************
नमस्कार मंडळी! जरा अडखळत सुरुवात झाली, पण आता पाऊस सुरू झाला सगळीकडे. सगळीकडे सृष्टीचे हिरवेगार, शांत रूप बघायला मिळते आहे. मागची स्पर्धा जरा कठीण होती असा विचार बहुसंख्येने ऐकायला मिळाला. यावेळच्या स्पर्धेचा विषय आम्ही कोण ठरवणारे? आपोआपच ठरला तो! सर्वांना सारखंच भिजवणारा पाऊस!
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवाभिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा-शांताबाई शेळके -
या पावसाचा उत्सव आपापल्या चित्र प्रतिमांमधून इथे साजरा करू यात तर!
आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावर तुम्ही मंडळींनी सुचवलेल्या विषयांची नोंद पुढच्या स्पर्धांसाठी घेतली आहेच. मात्र यावेळी पावसाशिवाय दुसरे काहीच सुचत नाहीये! स्पर्धेसाठी आपापली छायाचित्रे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत इथे सादर करा. या स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणेच. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि वाचकांना धन्यवाद!
प्रतिक्रिया
29 Jul 2015 - 11:43 am | Vikrant
प्राकाशित केलेला फोटो दिसत नाहि पहिल्यानदाच प्राकाशित करतोय मदत करावि
29 Jul 2015 - 12:13 pm | पैसा
http://www.misalpav.com/node/13573 या धाग्यावर लिहिल्याप्रमाणे. तरी जमले नाही तर इथेच मूळ फोटोची लिंक द्या.
29 Jul 2015 - 5:58 pm | श्रीरंग_जोशी
त्रुटी:
उपायः
एक महत्वाची चाचणी:
29 Jul 2015 - 11:58 am | मदनबाण
सुंदर फोटोज... :)
वेळ मिळाल्यास मी सुद्धा फोटू टाकेन हिथ... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in
29 Jul 2015 - 12:20 pm | Vikrant
29 Jul 2015 - 12:51 pm | सोंड्या
आवडले एकदम
गरद लेणी (पळू) जवळील गीरन्यांची* आठवण आली
* - गीरी-नद्या याचा अपभ्रंश असावा हा बहुतेक
29 Jul 2015 - 12:59 pm | Vikrant
29 Jul 2015 - 1:09 pm | भाग्यश्री कुलकर्णी
सगळेच फोटो अप्रतीम...अॉफीसच्या रुक्ष वातावरणात हे फोटो सहलीचा फिल घेताहेत.
जियो मिपा आणी मिपाकर्स. ..
29 Jul 2015 - 2:34 pm | दिपक.कुवेत
सरसच आहेत सगळे फोटो.
29 Jul 2015 - 3:35 pm | आशय ढवळे
29 Jul 2015 - 4:03 pm | टवाळ कार्टा
जुरासिक पार्कमधला म्हणून सहज खपून जाईल
29 Jul 2015 - 5:42 pm | सविता००१
मस्तच आहे
29 Jul 2015 - 11:49 pm | रवीराज
पण रस्ता सोडुन बाहेर चालली आहे ना गाडी (फोटो बाहेर चाललाय)
29 Jul 2015 - 3:58 pm | आशय ढवळे
29 Jul 2015 - 6:41 pm | अश्विनी मेमाणे
अप्रतिम !!!!
29 Jul 2015 - 5:25 pm | झकासराव
एक से बढकर एक फोटो आलेत. :)
29 Jul 2015 - 8:49 pm | ढंप्या
अजून एक.......
दोन्ही फोटो मोबाईल ने क्लीकले आहेत. (Samsung S-II)
टेक्नीकल डिटेल्स ....... माहीत नाही..... ऑटो मोड मध्ये क्लीकले आहेत
रस्ता आपला नेहमीचाच..... खोपोली ते पाली याच्यामध्ये कुठेतरी.... २०१३ चे आहेत फोटो.. त्यामुळे आठवत नाही......
30 Jul 2015 - 10:50 am | मोहन
पावसाळ्यातला उन - पावसाचा खेळ आणि इंद्रधनुष्य नेहमीच मनमोहक दिसते.

31 Jul 2015 - 7:35 am | वेल्लाभट
पाऊस

सोनी सायबरशॉट डब्ल्यू ५०
एफ २.८
१/१००
आयएसओ ८०
31 Jul 2015 - 12:48 pm | विशाल कुलकर्णी
एकच नंबर !
या फोटोला प्रथम क्रमांक मिळायलाच हवा.
31 Jul 2015 - 8:16 am | त्रिवेणी
31 Jul 2015 - 9:25 am | किल्लेदार
असाही एक पाऊस …………
31 Jul 2015 - 9:46 am | कपिलमुनी
बेष्ट फ़ोटो !
पाउस यापेक्षा सुंदर असूच शकत नाही :)
31 Jul 2015 - 10:07 am | नाव आडनाव
ह्या चित्रातल्या पोज नंतरचा डायलॉग (हिंदी पिच्चरातला) -
"ये हमसे कैसी मीठी सी भूल हो गयी" :)
31 Jul 2015 - 10:10 am | किल्लेदार
रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
31 Jul 2015 - 12:43 pm | कहर
आज लीपट जाये तो हमे न छुडैयो
31 Jul 2015 - 1:22 pm | वेल्लाभट
व्हॉट अ मोमेंट कॅप्चर्ड.....
31 Jul 2015 - 1:48 pm | टवाळ कार्टा
दिल गार्डन गर्डन और बरच कै हो गया ;)
31 Jul 2015 - 2:28 pm | मधुरा देशपांडे
स्पर्धेसाठी दिला असेल किंवा सहज दिला असेल, फोटो पटला नाही. आंतरजालावर सार्वजनिक संस्थळावर वावरताना असे फोटो देऊ नयेत हे माझे वैयक्तीक मत.
31 Jul 2015 - 3:46 pm | प्रियाजी
मधुरा, मी तुझ्याशी १०० टक्के सहमत आहे. मलाही हा फोटो मि.पा.वर योग्य वाटत नाही.बाकी ज्याची त्याची आवड आणि निवड!!
31 Jul 2015 - 3:59 pm | वेल्लाभट
ऑलदो, आय से इट्स अ ग्रेट कॅप्चर,
पण तुमचं म्हणणं १००% रास्त आहे.
31 Jul 2015 - 4:13 pm | कपिलमुनी
हे चित्र राजा रविवर्मा यांच्या ओलेती सारखा वाटला
आणि ते चित्र हे जगभरात मास्टर पीस म्हणून प्रसिद्ध आहे.
चित्राचा दुवा
7 Aug 2015 - 11:05 pm | एस
ते चित्र एस. जी. ठाकूरसिंग यांचे आहे. औंधच्या संग्रहालयात राजा रविवर्मांच्या चित्रांबरोबरच हेही चित्र आहे. पण ते राजा रविवर्माचे नाही.
31 Jul 2015 - 4:17 pm | ऋतुराज चित्रे
स्पर्धेचा विषय निट समजून फोटो टाकावेत. पावसापेक्षा पावसाळ्याचेच फोटो जास्त वाटतात.
वरील फोटोतील प्रेमीयुगलासारखे फोटो मिपावर येवू लागले तर भाद्रपदातलेही फोटो यायला लागतील.
31 Jul 2015 - 5:39 pm | चिगो
ह्या वाक्याच्या 'ठ्ठोऽऽ" पोटेंशियलशी सहमत.. पण ह्या फोटोने पावसाचा 'रोमँटीक' किंवा 'प्रणय' मुड बरोबर पकडला आहे असं वाटतं.. ह्या फोटोला 'संस्कारी' विरोध करणारे, 'लहान मुलांचा पावसात बागडण्याचा किंवा कागदी होड्या सोडण्याच्या' फोटोला असाच विरोध करणार का? तो पावसाचा 'निरागस' मुड तसाच हा पावसाचा 'नॉट सो निरागस मुड'..
हे वाक्य ह्या फोटोच्या बाबतीत गैरलागू आहे.. बाकी बर्याच फोटोंना मात्र लागू होतंय..
1 Aug 2015 - 10:22 am | ऋतुराज चित्रे
वरील फोटो विषयाला धरुनच आहे, परंतू बघताना अवघडल्यासारखे वाटते. अशा फोटोंची लाट यायला वेळ लागणार नाही भले मग स्पर्धेचा विषय कोणताही असो. म्हणुन भाद्रपद म्हटले.
1 Aug 2015 - 4:00 pm | सस्नेह
तो फोटो 'पाऊस' या विषयाचा न वाटता 'पावसातला प्रणय' या विषयाचा वाटतो.
31 Jul 2015 - 4:48 pm | चिगो
आपकी पारखी नजर और.. भारी फोटो, किल्लेदार..
31 Jul 2015 - 5:46 pm | किल्लेदार
या छायाचित्रावर संमिश्र प्रतिसाद येणे अपेक्षितच होते.
सर्वप्रथम मी संपादक मंडळाला विनंती करतो की छायाचित्र आक्षेपार्ह असल्यास प्रथम इथून काढून टाकावे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य असेल. पण थोडा प्रतिवाद नक्कीच करावासा वाटतो.
काही मुद्दे इथे मांडणार आहे पण त्याही आधी संपादक मंडळास काय वाटते ते जाणून घ्यायचे आहे.
1 Aug 2015 - 12:22 am | कंस
छान आहे फोटो
4 Aug 2015 - 1:28 am | किल्लेदार
सर्वप्रथम या छायाचित्राबद्दल ……
कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात न डोकावता घेतलेले हे छायाचित्र आहे.
(लोणावळ्यात एका चित्रपटाचे छायाचित्रण चालू असताना इतर पाचशे लोकांसमक्ष घेतलेले आहे)
१.
"आंतरजालावर सार्वजनिक संस्थळावर वावरताना असे फोटो देऊ नयेत"
"मलाही हा फोटो मि.पा.वर योग्य वाटत नाही"
…. विषयास अनुसरून वाटला म्हणून मी तो इथे दिला. आणि मुळात मिपाकर प्रगल्भ आहेत म्हणूनच तो इथे डकवतांना मला संकोच वाटला नाही.
२.
पाऊस म्हणजे फक्त नद्या, डोंगर, ओढे आणि निसर्ग-चित्रच असले पाहिजे का ?
पहिल्या पावसात पिसारा फुलवणारा मोर, पावसात नाचणारी मुले, भातखाचरात काम करणारे शेतकरी, आडोश्याला बसलेली पाखरे, कडाडणाऱ्या विजा, अगदी खिडकीत ठेवलेली भज्यांची प्लेट आणि बाहेर कोसळणारा पाऊस असे अनेक विषय आणि मूड्स असूच शकतात. चिगो यांनी म्हटले तसे हा मूड पाऊस विषयाला धरून का वाटत नाही ?
३.
पाऊस या विषयाला धरून आपल्याकडे कितीतरी सुरेख शृंगारिक गाणी लिहिली गेलीत, छायाचित्रीत झाली आणि लोकप्रिय पण झालीत. त्यातला पाऊस वगळला तर ही गाणी तेवढी परिणामकारक वाटतील का?
या छायाचित्रात हाच एक मूड टिपायचा प्रयत्न केला आहे. तरीही मिपाकर सुज्ञ आहेत. त्यांनीच काय ते ठरवावे.
बादवे ……. हा स्पर्धेसाठी नाही.
4 Aug 2015 - 1:47 am | प्यारे१
503 लोकांना सर्दी खोकला. डॉक्टर चा धंदा वाढणार!
4 Aug 2015 - 2:10 am | मधुरा देशपांडे
स्पष्टीकरणाबाबत धन्यवाद.
१. फोटो न पटण्यामागे पहिले कारण होते की जर स्पर्धेसाठी दिला असे गृहित धरलं, म्हणजेच तो तुम्ही काढलाय (आंतरजालावरुन घेतलेला नाही) असे समजुन, तेव्हा आता जी पार्श्वभुमी सांगितली (लोणावळ्यात एका चित्रपटाचे छायाचित्रण चालू असताना इतर पाचशे लोकांसमक्ष घेतलेले आहे) ती आधीच दिली असती तर हा एक मुद्दा आला नसता. हे कुणाच्या व्यक्तीगत आयुष्यात न डोकावता घेतले असेल हे वाटत नव्हते, पण आंतरजालावर ज्या प्रमाणात अशा घटना घडु शकतात, त्यामुळे शंका आल्याशिवाय राहात नाही. हे तुम्हाला पर्सनली म्हणत नाहीये. हा किंवा तत्सम फोटो कुणीही टाकला असता तरी हेच वाटले असते.
अर्थात तरीही -
२ आणि ३. पाऊस म्हणजे फक्त नद्या, डोंगर, ओढे आणि निसर्ग-चित्रच असले पाहिजे का ? पाऊस या विषयाला धरून आपल्याकडे कितीतरी सुरेख शृंगारिक गाणी लिहिली गेलीत, छायाचित्रीत झाली आणि लोकप्रिय पण झालीत. त्यातला पाऊस वगळला तर ही गाणी तेवढी परिणामकारक वाटतील का?
असे नक्कीच नाही. पाऊस म्हटला की रोमान्स, प्रणय या बाबी येणारच. आणि त्यावर आक्षेपही नाही. फक्त यातले काही आनंद हे अधिक सार्वजनिक रीत्या सहजगतीने मांडता येतात, तसेच काही हे प्रत्येकाचे खाजगी असु शकतात. हेही अर्थात व्यक्तीसापेक्षा धरुन चालु. पण गाणी कविता लेख यातुन व्यक्त होणे वेगळे आणि या छायाचित्रातुन व्यक्त होणे वेगळे. हे छायाचित्र मला अश्लीलतेकडे झुकणारे वाटले, म्हणुन मी तसे लिहिले. आक्षेप रोमान्सला नव्हता, या छायाचित्रातुन दिसणार्या त्या सादरीकरणाला होता आणि म्हणुनच मला मिपावर ते योग्य वाटले नाही.
मी फक्त माझे वैयक्तीक मत सांगितले. मिपाकरांची मते वेगळी असु शकतात, त्यामुळे फोटो काढुन टाका असे मी म्हणाले नाही. फक्त पटले नाही हे मत नोंदवले.
4 Aug 2015 - 7:58 am | किल्लेदार
मुद्देसूद प्रतिक्रियेबद्दल आभार. :)
4 Aug 2015 - 2:25 pm | सूड
काय सांगता?
31 Jul 2015 - 1:52 pm | प्रभो
भेडसे लेण्यांना जाताना एका पानावर जमलेले पावसाचे दवबिंदू... मोबाईल क्यामेर्याने टिपलेले.
31 Jul 2015 - 3:49 pm | प्रियाजी
खूप सुंदर!
31 Jul 2015 - 4:24 pm | रेवती
सगळे फोटू आवडले फक्त तो वरचा बाई आणि मनुष्याचा अस्थानी आहे...........आणि आपण क्लिकवलेलेच द्यायचे आहेत ना?
31 Jul 2015 - 6:49 pm | चौकटराजा
एन एच फोर इन रेन
स्थळ - वाघजाई उतार -खंडाळा
वेळ सकाळी साडे दहा दि. गुरू ३० जुलै २०१५
31 Jul 2015 - 6:58 pm | चौकटराजा
स्थळ - खण्डाळा गाव कॉर्नर ..
वेळ सकाळी ९ ची
दि. ३० जुलै २०१५
1 Aug 2015 - 10:55 am | विशाल कुलकर्णी
इथे रेंगाळला पाऊस...
3 Aug 2015 - 5:01 pm | रोहन अजय संसारे
आनुस्कुरा घाट - पाचल - कोकण
https://lh3.googleusercontent.com/-b9OowGdtV1A/Vb9LwPcUedI/AAAAAAAAAM0/E...
3 Aug 2015 - 5:02 pm | रोहन अजय संसारे
आनुस्कुरा घाट - पाचल - कोकण

3 Aug 2015 - 5:49 pm | नन्दादीप
स्पर्धेसाठी (रत्नागिरी जेट्टी)

स्पर्धेसाठी नाही

स्पर्धेसाठी नाही

4 Aug 2015 - 8:08 am | किल्लेदार
हा पाऊस पडण्याआधीचा आहे…म्हणून स्पर्धेसाठी नाही :)
4 Aug 2015 - 1:57 pm | कपिलमुनी
तुम्ही अफ़ाट सुंदर फ़ोटो काढता !
डोळ्याचे पारणे फिटते !
4 Aug 2015 - 2:28 pm | चिगो
हा अप्रतिम सुंदर फोटो आहे.. हा द्याच स्पर्धेसाठी. आणि कपिलमुनींनी, ज्यांचा फोटो माझ्यामते ह्या विषयातला 'टॉप कंटेंडर' आहे, त्यांनी एवढी खुलून समरसून दाद द्यावी म्हणजे क्या बात.. हा यारानाच सगळ्यात जास्त भावतो मला मिपा आणि मिपाकरांमधे..
4 Aug 2015 - 10:13 pm | प्यारे१
काय आहे नेमकं हे?
कधी नि कसं पकडलंत हे दृश्य ते सांगाल काय? (camera settings बद्दल माहिती नसलेल्या माणसाला समजेल अशा भाषेत सांगता येईल काय)
4 Aug 2015 - 11:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम !
5 Aug 2015 - 12:11 am | किल्लेदार
हा एका तळ्याकाठी दुपारी काढलेला फोटो आहे. फोटो काढल्यावर लगेच पाऊस सुरु झाला. इतका जोरात…. की कारच्या काचा पूर्णपणे अपारदर्शक झाल्या.
ट्रायपॉड वापरायला सवड आणि जागा पण मिळाली नाही. नाहीतर अजून रौद्र रूप दाखवता आले असते. शिवाय अंधार असल्यामुळे हात स्थिर ठेवतांना कसरत करावी लागली ते वेगळेच.
याचे अजून काही सुंदर फोटोज मिळाले पण त्यासाठी एक वेगळा धागा काढावा लागेल.
5 Aug 2015 - 12:16 am | प्यारे१
धाग्या साठी इर्शाद.....
येऊ च दया नवा धागा. खुपच रौद्र आणि (बंगाली) भीषण सुन्दर आहे फ़ोटो...
5 Aug 2015 - 12:54 am | कपिलमुनी
Shutter speed इत्यादी पण सांगा
6 Aug 2015 - 6:33 pm | किल्लेदार
shutter speed आणि aperture काय घेऊन बसलात कपिलमुनी. वेळच इतका कमी मिळाला की फक्त नीट फ्रेम करून हाणला.
पण तरीही landscape घेताना जास्त aperture value घेतलेली चांगली. पण कमी प्रकाश असल्यामुळे ६.३ च ठेऊ शकलो. shutter स्पीड १/६० होती जी हाताने फोटो काढायला पुरेशी नाही. त्यामुळे burst मोड मध्ये बंदूक चालवली. :)….
6 Aug 2015 - 9:32 pm | एस
माझ्या अंदाजाप्रमाणे क्रॉप्ड सेन्सर कॅमेरा + १८-१०५ मिमी लेन्स १८ मिमीवर ठेवली असावी. वाइड अँगलचे परिदृश्य (पर्स्पेक्टिव्ह) फारच छान पकडले आहे. कारमधून घेतलाय तरी एकदम कमी उंचीवरून घेतलाय असे वाटते. लेन्सचा अंदाज बरोबर आहे की अल्ट्रावाइड अँगल लेन्स (११-१६) वापरलीये?
बर्स्ट मोडचा वापर करण्याची समयसूचकता आवडली.
7 Aug 2015 - 7:12 pm | किल्लेदार
कॅनन १००० D + १८-५५ लेन्स वापरले आहे. १८ मी. मी. वर barrel distortion आले आहे आणि त्यामुळे क्षितिजरेषा सरळ ठेवायला त्रास झाला (अजूनही ती सरळ नाहीच).
अल्ट्रावाइड अँगल चा भास cropping करून साधला आहे. :) (चला इतरांना पण तसं वाटलं …… लेन्स चे पैसे वाचले :) )
हा फोटो तुम्हाला वाटला तसा खाली बसूनच घेतला आणि नंतर कार मध्ये जाऊन बसताना तारांबळ उडाली……
याचे काही वेगळे फोटोज नंतर नक्की डकविन.
7 Aug 2015 - 8:01 pm | एस
अरे वा! मस्त!
फोटोंच्या प्रतीक्षेत.
6 Aug 2015 - 11:21 am | नाव आडनाव
भारीच.
7 Aug 2015 - 2:02 pm | ब़जरबट्टू
काय टायमिंग आहे राव...
आवडला !!
6 Aug 2015 - 11:10 am | नीर
6 Aug 2015 - 4:57 pm | अनुरोध
6 Aug 2015 - 7:01 pm | पैसा
पब्लिक शेअर नाहीये. ते करा फोटोच्या सेटिंगमधे. आत्ता शेअर चा ऑप्शन येत नाही फोटोवर.
6 Aug 2015 - 8:24 pm | श्रीरंग_जोशी
त्यांनी खालील दुवा वापरला आहे. जो बहुधा अॅड्रेसबार मधून कॉपी केलाय. फोटोचा दुवा असता तर .jpg अंतर्भूत असतं.
https://www.flickr.com/photos/133598057@N08/shares/j81SX1
6 Aug 2015 - 6:45 pm | जगप्रवासी
किल्लेदार भारी आहे फोटो.
तुम्ही काढाच वेगळा धागा, आम्हा पामरांना पण दाखवा की तुमचे फोटो
6 Aug 2015 - 9:17 pm | कोमल
कैक दिवसांच्या विश्रांती, मनःशांती, मनोसाधने नंतर आम्ही परतायचा निर्णय घेतला.
वाटेत पाहिलं तर गडावर खळबळ दिसली. कानोसा घेतला आणि खबर निघाली की गडावर "छायाचित्रणकला स्पर्धा" चालू आहे.
म्हंटंले चलां आंपण पण हजेरीं लांवावी.. ख्याख्याख्या...
स्पर्धेसाठी
Disclaimer: It's not religious photo. The place it was taken is a Hindu temple but intention behind click was not religious
स्पर्धेसाठी
Disclaimer: It's not religious photo. The place it was taken is a Hindu temple but intention behind click was not religious
खांलील पैंकी कोणताही एक घ्या स्पर्धेसाठी आणि विषय संपवां!!! ख्याख्याख्या
सर्व छायाचित्रे गगनबावडा येथे तुफान पावसात काढले आहेत. खॉक् खॉक् खॉ.
कॅमेरा: Nikon Coolpix 13 MP
Full Resolution: Flickr
राम राम
7 Aug 2015 - 1:54 pm | अभ्या..
धिश्क्लेमरची काय गरज नस्ते ओ. ;)
थोडा आमच्या इकडे खरा पाऊस पडावा ही त्या शंकरराव अन सगळ्या देवांकडे इनंती.
7 Aug 2015 - 1:50 pm | शामसुन्दर
7 Aug 2015 - 8:44 pm | इन कम
7 Aug 2015 - 8:45 pm | इन कम
7 Aug 2015 - 8:49 pm | इन कम
7 Aug 2015 - 9:43 pm | सर्वसाक्षी
10 Aug 2015 - 10:06 am | अनिरुद्ध.वैद्य
नुकताच पाउस पडून गेला होता ... गडावर वारे सुटले होते आणि ही इवली इवली फुले पाऊस आणि वाऱ्यावर मस्त झुलत आणि नाचत होती!
पाऊसवेडी :)