चाल : चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर
मोत्याचा घास तुला भरविते
सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर
मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.
पदावर मुख्य नव्हता
पोलिसांना मंत्री नव्हता
मनी त्याचा सल नव्हता
पित्त्या बसवायचा होता
गुरहाळ चर्चेचे किती घालते ...... १
सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर
मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.
जन्तेला फाट्या मारिले
नवे नायक नाही दिले
पायांना कितीक खेचले
पछाड धोबी टाकले
डाव कुटील किती मी खेळते........२
सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर
मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.
झाला मुंबैइवर हल्ला
इकडे नेत्यांचाच कल्ला
लावला निष्टेचा बिल्ला
कोण मुख्यमंत्री ते बोला
आमदारांची सगळ्या मते जाणते.......३
सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर
मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.
कसे केले बिनबोभाट
झाला नारायण सपाट
बाकी सगळेच हे माठ
आहे माझ्याशीच गाठ
पक्षावर सत्ता माझी चालते....... ४
सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर
मुख्यमंत्री आता मी निवडिते.
प्रतिक्रिया
6 Dec 2008 - 9:18 am | अमोल केळकर
प्रासंगिक विडंबन आवडले
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
6 Dec 2008 - 11:28 am | वेताळ
कपिल काळे पण आता शीघ्र कवी झाला म्हणायचे.विडंबन खुप छान जमले आहे. महाराष्ट्राची व्यथाच आहे की दिल्लीश्वराचे पाय चाटणारे इथे राज्य करतात.
वेताळ
7 Dec 2008 - 11:33 pm | श्रीकान्त पाटिल
सुन्दर विडम्बन आहे आणि यथार्थ चित्र रेखाटले आहे.
12 Dec 2008 - 2:15 pm | वाहीदा
कसे केले बिनबोभाट
झाला नारायण सपाट ---- हे कोणी केले ??
बाकी सगळेच हे माठ
आहे माझ्याशीच गाठ --- कोणाची कोणाशी गाठ ?? मला वाटते विलासरावान शी गाठ नारायण रावान ची