साहित्य संपादकीय आवाहन

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
15 Jul 2015 - 10:37 pm

नमस्कार मिपाकर मित्रमैत्रिणींनो,

साहित्य संपादक मंडळाची स्थापना काही विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. त्यामधले महत्त्वाचे उद्देश म्हणजे नव्या मंडळींना मिसळपाव वर स्वतःचं लेखन करायला प्रोत्साहन देणे आणि त्यासंदर्भात लागेल ती मदत करणे हे होत. इथल्या नव्या आयडींनी मोडकं-तोडकं का होईना पण लेखन करायला सुरुवात करावी अशी अपेक्षा आहे. तुमच्या चुका सुधारून घ्यायला आणि तुम्हाला मदत करायला दोन्ही संपादक मंडळं तयार आहेतच. इथे ह्या धाग्यावर म्हणा किंवा व्यक्तीगत निरोपाने म्हणा तुम्ही मदत मागू शकता.

नव्या मिपाकरांना सांगायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांसमोर तुमचं साहित्य सादर करायला अजिबात घाबरू किंवा लाजू नका. तुम्ही नवे असाल तेव्हा तुमच्याकडून चुका ह्या होणारंच. ह्याचं चुकांमधून शिकून पुढे अत्यंत उत्तम साहित्य लिहिणारे बरेच मान्यवर आयडी इथे मिपावर किंवा एकूणच मराठी आंतरजालावर लेखन करत असतात. मिपाकर तुमच्या लेखनाचं स्वागत करतीलच. कदाचित तुमच्या सुरुवातीच्या काही लेखांवर टिका होईल, चुकांवर बोट ठेवलं जाईल. थोड्याफार प्रमाणामध्ये रॅगिंगही होईल. त्यामुळे निराश व्हायचं काहीच कारण नाही. लोकं तुम्हाला हळू हळू ओळखायला लागतील, तुमच्या लेखनाची पद्धत किंवा बाज त्यांच्या सवयीचा झाला की हेच लोकं तुमचे जवळचे मित्र बनतील (स्वानुभवाचे बोल. माझं मिपावर झालेलं अलौकिक स्वागत अजून विसरलेलो नाही. तेव्हा राग आलेला, प्रचंड वाईट वाटलेलं पण आता मात्र हे लोकं माझे मित्र बनलेत :) ). सो, लिहिते व्हा. तुमच्या कथा, कविता, प्रवासवर्णनं, पाककृती, अनुभव ह्या सगळ्यांचं मिसळपाववर स्वागतच असेल. काही नियम किंवा मर्यादा मात्र लागू असतील ते म्हणजे लेखन तुमचं स्वतःचं असावं, मोडकं-तोडकं असेल तरी चालेल काही हरकत नाही. अनुवाद करत असाल तर मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय इथे प्रकाशित करू नका. बुद्धी स्वामित्व ही कायदेशीर बाब असल्याने हा नियम कटाक्षाने पाळा. कुठल्याही जाती-धर्माला दुखावलं जाईल असं लेखन टाळा. समिंग अपः लिहिते व्हा. अधून मधून जागोजागी आपले मिसळपावकरांचे कट्टे होतं असतात त्यांनाही हजेरी लावा. नव्या लोकांशी त्यानिमित्ताने ओळखही होईल :).

ह्या लिंकवर तुम्हाला साहित्य संपादकांची नावं कळतीलः साहित्य संपादक

जुन्या संपादक मंडळामध्ये काही बदल झालेले होते त्याची यादी मी नीट माहिती घेऊन इथे लिहीनच.

इथले बरेच जुने आयडी हल्ली वाचनमात्र असतात असं हल्ली लक्षात आलेलं आहे. पूर्वी अत्यंत चांगलं लेखन करणारे हे लोक्स अचानक लेखनसंन्यासी का झालेत ह्यामागचं कारण जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. तुमचं साहित्य वाचूनच, तुमच्या मार्गदर्शनाखालीच हौशी नवमिपाकर आणि माझ्यासारखे लोकं शिकतील असं मनापासून वाटतं. त्यामुळे तुम्हीही लिहितं व्हा अशी आग्रहाची विनंती मी करतो. जुन्या लोकांना बहुतांश वेळा मदतीची गरज लागत नाही, पण तरीही अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोणाला मदत लागल्यास संकोच नं बाळगता मी आणि माझं संपादक मित्रमंडळ हजर आहेच.

तुमच्याकडे काही कल्पना असतील तर त्याही ह्या लेखामध्ये प्रतिसादांमधून मांडा. ही कल्पना प्रत्येक वेळी लेखनाशी संलग्न असायलाचं हवी असं नाही. एखादा सामाजिक उपक्रमही यामध्ये येऊ शकतो. नाखु'न'काकांशी मधे बोलताना त्यांनी एक संकल्पना मांडली होती. ती तेच इथे लिहितील अशी अपेक्षा. मिपावर तुम्हाला काही बदल अपेक्षित असतील तर तेही इथे मांडा. काही नवे साहित्यप्रकार मिपावर जोडायच्या विचारामधे सध्या सा.सं. मंडळ आहे. त्यांमध्येही तुमचं योगदान अपेक्षित आहे :) .

कळावे. लोभ असावा.

P.S. लेखक/ कवी मंडळींना एक आवाहनः तुमच्या साहित्यामधे अपेक्षित असणारे बदल तुम्ही साहित्य संपादकांना कळवत असताना शक्यतो एकापेक्षा जास्तं संपादकांना कळवणं टाळा. म्हणजे तुमच्या साहित्यामधे अपेक्षित असणारे बदल अत्यंत योग्य पद्धतीने केले जातील. काही वेळेला एकापेक्षा जास्तं संपादक एका धाग्यावर दुरुस्तीचं काम करत असतील तर जो शेवटी धागा प्रकाशित करेल त्याने केलेले बदल फक्त धाग्यामधे दिसतील. पहिल्या संपादकाने बदल करुनही ते धाग्यामधे दिसणार नाहीत. (Too many cooks spoils the dish) असा प्रकार टाळण्यासाठी वरची सुचना करतो आहे. एंजॉय पावसाळा एंजॉय मिपा. :)

धोरणमुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मितभाषी's picture

15 Jul 2015 - 10:59 pm | मितभाषी

हाहाहा

आमचे विचार तुम्हाल्ला पचणार नाही.

असो.ओ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jul 2015 - 11:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पचवायचा प्रयत्न करु. नै पचले तर मग बघु :)!!!

अरुण मनोहर's picture

16 Jul 2015 - 7:01 am | अरुण मनोहर

मी
काही वर्षान्पुर्वी मिपावर सातत्याने लिहायचो. मधे काही काळ फिरकलो नाही. फक्त वाचनमात्र असायचो. आता पुन्हा लिहीणे सुरू केले आहे.
तुम्ही हा फिडबॅक उपक्रम सुरू केलात ही चान्गली गोष्ट आहे.

न लिहीण्याची माझी कारणे-
१) (त्यावेळी) गटबाजी खूप होती. फक्त आपापल्या गटातील लेखनाला प्रोत्साहन आणि चान्गले प्रतिसाद व इतरान्ना फाट्यावर मारायचे असा सन्शय होता.
२) लेखक प्रतिसादान्चा भुकेला असतो. ही भूक भागायची नाही.
३) लेखकाने अगदी सतत रोजचा रतीब घालायला हवा, नाहीतर लोक त्याला विसरून जातात असा येथे सन्शय आला. हा (काल्पनिक) रेटा रुचला नाही

आता पुन्हा लिहीणे का सुरू केले?
१) मिपा खूप बदलले आहे, बरीच नवीन मन्डळी आली आहेत.
२) जरा वेळ हाताशी आहे.

समस्या- इथे लिहीताना जर काही चुका झाल्या, व
बॅक स्पेस ने खोडून पुन्हा लिहीले, तर त्यानन्तर्ची
सर्व अक्षरे एकमेकात मिसळली जातात. हे मी प्लेन तेक्ष्ट आणि एच टी एमेल सेटीन्ग वर देखील अनुभवले आहे. असे
ट्न्कन गन्डू नये म्हणून काहीही खोडले की एक लाइन फीड घ्यावा लागतो,-- असे
मग गन्डत नाही. पण मग
सारे झाल्यावर ते लाईन फीड एरॅझ करावे लागतात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jul 2015 - 7:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही गुगल क्रोम वापरत असावात. तुमच्या अकाउंट सेटिंग मधे जाउन तुम्ही लेखनपद्धत बदलु शकता. संपादनमधे जाउन युजर इनपुट सेक्शनमधे जाउन गुगल आय.एम.ई. हा पर्याय निवडा.

लेखकाने अगदी सतत रोजचा रतीब घालायला हवा, नाहीतर लोक त्याला विसरून जातात असा येथे सन्शय आला.

रोज रतिब घातलात तर लोक्स ट्रॉलिंग करतील. दोन धाग्यांमधे योग्य अंतर ठेवलं तर लोकांनाही वेळ मिळतो आणि नीट वाचतात :)

अरुण मनोहर's picture

16 Jul 2015 - 7:43 am | अरुण मनोहर

इनपूट मेथड मध्ये बदल केलेला आहे. आता बरोबर वाटते.

रोज रतीब घालण्याचा प्रश्नच नाही. ते शक्यही नाही. रोज म्हणजे सातत्याने असे म्हणायचे होते.

ही अडचण मलाही येत होती, आता बदल केलाय. आभार.

अमृत's picture

16 Jul 2015 - 9:18 am | अमृत

अरूण मनोहरांनी लिहेलेल्या १ व २ या समस्यांवर काहीही भाष्य केलेले नाही??

याचबरोबर बर्‍याच धाग्यांवर कंपूतील एकानी फाटा फोडला की लगेच त्या धाग्याची खरडवही बनवायची, काही नवख्या लेखकांच्या पहील्या धाग्यांपासूनच शुद्धलेखनाच्या चुकांची सरबत्ती करायची वरून 'तुम्हीतर इतक्या वर्षंपासून सदस्य आहात तरी कशा काय चुका? हे जोडीला. सदस्य असणे आणी लिखाण करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही सदस्यांच्या प्रतिभा केवळ विडंबनापूरत्या मर्यादीत आहेत तर बहुतांश केवळ प्रतिक्रिया देउन चुका कढण्यातच सुख मानताना दिसतात. अजुनही बरेच मुद्दे आहेत पण असो लिहून फार काही फरक पडेल असे वाटत नाही. गेल्या ५ वर्षात बर्‍याच जणांनी तक्रारी करून सुद्धा विषेश बदल झालेला नाही. पण यासगळ्यांमूळे तोटा मात्र मिपाचाच झालाय बरीच जेष्ठ व दर्जेदार लेखन करणारी मंडळी सद्ध्या दिसत नाहीत.

या धाग्यावर ज्या प्रतिक्रीया येतील त्यातुन जर काही सकारात्मक बदल घडलेत तर ते नक्कीच स्वागतार्ह असतील अन्यथा संपादक मंडळास हा धागा पुन्हा कढावा लागल्यास आश्चर्य वाटणार नाही.

ही माझी वैयक्तिक मतं आहेत.

पण यासगळ्यांमूळे तोटा मात्र मिपाचाच झालाय बरीच जेष्ठ व दर्जेदार लेखन करणारी मंडळी सद्ध्या दिसत नाहीत

हे मात्र खरं.

सदस्यनाम's picture

16 Jul 2015 - 10:36 am | सदस्यनाम

दुर्लक्ष्य तर होणारच.
टवाळ कंपू साथीला घेऊन प्रतिसादाच्या खरडवह्या कोण करतंय ते दिसलय. आवाहन करण्यातली कळकळ ठिकाय पण त्यापेक्षा लेखकाला लिहावे वाटेल असे वातावरण निर्माण करा आधी.
नुस्ते लिहा लिहा सांगायचे पण चांगल्या कथांवर प्रतिसाद किती तर १५-२०. परत प्रतिसादांच्या संख्येवर जाऊ नका ही मखलाशी आहेच. नगरीनिरंजन, बहुगुणी, रामदास, ५० फक्त सारख्यांच्या दर्जाच्या कथा आता येतच नाहीत.
चांगले काथ्याकूट अगदी दुर्मिळ. फाटे फोडणेच जास्त. विविध क्षेत्रांची माहीती देणारे ले़ख जवळपास नाहीतच. सोताला रिलेट करतील असे इंजिनिअरींग कॉलेज लाईफ, आयटी, हुच्च्भ्रु प्रोब्लेम्स, मॉल अन चित्रपट असेच विषय गाजवले जातात. ते पण सेल्फरेड करुन. टोटल अ‍ॅटिट्युड असा की पुणे मुंबई सोडून मराठी कुठे नसतेच. यावर जरा कुठे बोलले की सूड उगवायला तयारच.
नॉस्टॅल्जिक लेखांचे तसेच. रामदास सरांचे अत्यंत माहितीपूर्ण लेख सर्वानाच जमतील असे नाही पण लिमिटेड आठवणींवर उगा काढलेले कढ पण वाचवत नाहीत.
संस्कृती अन भाषाविशयक लेखात राही, बॅटमॅन, पैसा, वल्ली अशाच मोजक्या सदस्यांचे प्रतिसाद उत्तम असतात.
राजकारणाविषयी अगदी एखादे दुसर्या क्लिंटनसारख्या लेखकांचा अ‍ॅप्रोच अन सातत्य उल्लेखनीय. म्रुत्युंजयसारख्या काहीच सदस्याचे प्रतिसाद वाचनीय.
भटकंती काही लेखकांच्या ठिक आहेत. पण ऑलरेडी त्याला वीणावर्ल्ड च्या प्रायोजित पानाची कळा येऊ लागलीय.
मराठी वाचकांच्या साहित्यविश्वात पुस्तके, मासिके, साप्ताहिके, वर्तमानपत्रांच्या दर्जेदार पुरवण्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे तसे स्थान आंतरजालावर मिसळपावने मिळवावे असे वाटते.
शुभेच्छा सर्वांनाच.
वर व्यक्त केलेले हे मत मात्र वैयक्तिक.

अन्या दातार's picture

16 Jul 2015 - 5:54 pm | अन्या दातार

धाग्यांच्या खरडवह्या झाल्या की लेखकाचा उत्साह रखडतो.
खरंच अवांतर आणि कैच्याकै अवांतर डोक्यात जाते. चांगला फिडबॅक दिल्याबद्दल आभार

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2015 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

कंपूबाजी उर्फ ऑफिस पॉलिटिक्स हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे आता सर्वमान्य आहे. यातला "ऑफिस" हा शब्द वाच्यार्थाने ऑफिस, कॉलेज, एखादी संस्था, तुम्ही रहात असलेली वसाहत, मिपासारखे संस्थळ, इ इ बरेच काही जिथे चार टाळकी जमतात असे ठिकाण असू शकते. वाईट कंपूबाजीला सर्वोत्तम उपाय म्हणजे (अ) दुर्लक्षाने मारणे किंवा (आ) चांगल्या लोकांचा त्याहून मोठा कंपू करणे. कायदे, नियम, प्रशासन असावेच पण चांगल्या लोकांचा व्यक्त रेटाच वाईट कंपूबाजी जास्त प्रभावीपणे निर्बल करू शकतो. कोणीतरी म्हटले आहेच...

"वाईट वागणे हा वाईट लोकांच गुणधर्म आहे. पण, चांगल्या लोकांच्या गप्प बसण्याच्या प्रवृत्तीमुळेच वाईट लोकांना वाईटपणा करायला प्रोत्साहन मिळते, हे सुद्धा तितकेच खरे आहे."

थोडक्यात, मिपावर काही जणांनी कंपूबाजी केली म्हणून "वाचनमात्र राहणे" किंवा "संस्थळ सोडून जाणे" हे उपयोगी पर्याय नाहीत.

"वाईट वागणे हा वाईट लोकांच गुणधर्म आहे. पण, चांगल्या लोकांच्या गप्प बसण्याच्या प्रवृत्तीमुळेच वाईट लोकांना वाईटपणा करायला प्रोत्साहन मिळते, हे सुद्धा तितकेच खरे आहे."

डुआयडी आणि विखारी ट्रोलींगबद्दल हेच विचार लागू पडतात का?

अगदी मनातलं बोललात डाॅक्टर. तुम्ही आता काहीच सुचवायचं शिल्लक ठेवलेलं नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jul 2015 - 12:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणामधे नाहीत त्या गोष्टींवर मी काय भाष्य करणारे? तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला गटबाजी ही सापडणारचं. आता त्याकडे लक्ष देण्यात वेळ घालवायचा का दुर्लक्ष करुन चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं हे सुज्ञ लोकं ठरवु शकतातचं. आणि कंपुबाजी हा प्रकार नेहेमी त्रासदायक असतोचं असं नाही. असो. लिहित रहा. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Jul 2015 - 3:56 am | निनाद मुक्काम प...

गेले हो ते दिवस
कधीच गेले आता अपवाद म्हणून सुद्धा कंपूबाजी येथे दिसत नाही

काही लोक सातत्याने चांगले लिहित असतानादेखील प्रतिसाद नसल्याने लिहायचे सोडुन देतात(नुकतेच एका खरडीत वाचण्यात आले.)उदा.स्केअरक्रो ही सध्या सुरु असणारी लेखमालिका.अत्युत्तम अनुवाद असणारी ही लेखमालिका,अत्यल्प प्रतिसादात सुरु आहे. प्रत्येक वादाच्या,कट्ट्याच्या धाग्याला शंभरी गाठुन देणारे असे साहित्य वाचत नाहीत काय असा प्रश्न पडतो. साहित्य संपादकांनी तरी अशा लेखकांना प्रतिसाद देऊन लिहायला उत्तेजन द्यावे असे वाटते.

वॉल्टर व्हाईट's picture

16 Jul 2015 - 8:34 am | वॉल्टर व्हाईट

सहमत आहे. या निमित्त्ताने बोका यांना सांगु इच्छितो की, प्रतिसाद कमी आहेत म्हणुन लेखनाचा मुड जाऊ देऊ नका. मी तरी इंटर्नेटवर असा प्रयोग झालेला या आधी पाहीला नव्हता. (म्हणजे इतक्या प्रथितयश लेखकाची कादंबरीचे भाषांतर या अर्थी ). तुम्ही खूप मोठे उदाहरण सेट करताय आणि वाचक म्हणुन, मराठी माणुस म्हणुन माझ्यासारख्या अनेकांना याचे निशितच कौतुक वाटत असेल याची खात्री बाळगा.

रातराणी's picture

16 Jul 2015 - 8:34 am | रातराणी

ताई ही मालिका वॉच लिस्ट (?) मधे आहे. माझ्या लक्षात आलं तेव्हा ऑलरेडी 7वा -8वा भाग आला होता, म्हणून मालिका पूर्ण झाल्यावर शिस्तीत वाचू असे ठरवले आहे. बाकी हाच प्रतिसाद तिथेही द्यायला हवा पण आळस केला. माय बॅड. बोका ए आझम प्लीज लिहायचे थांबु नका. : )

टवाळ कार्टा's picture

16 Jul 2015 - 10:04 am | टवाळ कार्टा

मी वाच्तोय :)

उगा काहितरीच's picture

16 Jul 2015 - 8:46 am | उगा काहितरीच

लिंक वर गेल्यावर access denied असा मेसेज दिसतोय .

वॉल्टर व्हाईट's picture

16 Jul 2015 - 8:52 am | वॉल्टर व्हाईट

तुमच्याकडे काही कल्पना असतील तर त्याही ह्या लेखांमधे प्रतिसादांमधुन मांडा.

शतशब्दकथा हा प्रकार मिपावर अत्यंत फ़ेमस होतोय असे दिसून येतेय. ट्विटर सुरु होतांना तेव्हा मेनस्ट्रिम असणार्या ब्लॉगर्सनी त्याची बरीच खिल्ली उडवली होती, आज ट्विटरने इतिहास घडवलाय हे आपण बघतोय. शतशब्दकथा अशीच एक भरपूर पोटेंन्शिअल असलेला कंटेंट टाईप आहे. मिपाने याचे उत्तम ब्रांडिंग करावे अशी कल्पना सुचवतोय.

ब्रांडिंग करावे म्हण्जे काय ?

१. कविता , चर्चा इत्यादी साठी जसे वेगळे इंडेक्स आहेत तसा शतशब्दकथा म्हणुन एक इंडेक्स बनवावा.
२. मुखपृष्ठावर त्यांचा एक वेगळा स्क्रोल असावा.
३. सगळी कथा फेसबुकवर एका बटनावर पोस्ट होईल अशी सोय करावी
ई ई .

जडभरत's picture

16 Jul 2015 - 8:53 am | जडभरत

खूप छान वाटलं, सीजेएस. मी नवीनच आहे. अजून लिहायला सुरूवात केली नाही. कारण मी गविंचा नियम पाळणारः अगदी चांगलं देण्याची गॅरंटी असेल तेव्हाच लिहा.असो.
एक विनंतीः १) प्रतिसाद कमी मिळाले नाही म्हणून प्लीज लेखन बंद करू नका.इतरांच्या प्रतिसादापेक्षा तुम्हाला जे एक्सप्रेस व्हायचं समाधान मिळतंय ते खूप मोठं असतं.
२) गटबाजीचा विचार करू नका. तुमचं लिहिलेलं थोड्याच जणांना आवडलं तरी ते त्यांना खूप आनंद देतं. गटबाज अर्थातच उत्तम साहित्याच्या आनंदाला मुकतात.

बोका-ए-आझम's picture

16 Jul 2015 - 9:00 am | बोका-ए-आझम

राजीव गांधी यांच्या स्टाईलमध्ये सांगू इच्छितो - हमे लिखना है और हम लिखेंगे!

मोहन's picture

16 Jul 2015 - 9:57 am | मोहन

खूपच छान उपक्रम आहे. जुने नवे दोघेही लेखकु लिहीते होवोत.

मी-सौरभ's picture

16 Jul 2015 - 10:18 am | मी-सौरभ

अतिशय योग्य लेख.
यामुळे फक्त जिलब्या वाढू नयेत ही अपेक्षा...

सूड's picture

16 Jul 2015 - 3:59 pm | सूड

वाचुनचं, हळु हळु, मुळ, तुमच्याकडुन, एकुणचं, मागु, जाणुन

वरचे सगळे उकार दीर्घ असायला हवेत असं वाटतं. मीही माझी काही कारणाने थांबलेली कथा सुरु करायच्या विचारात आहे.

मिपावर अभिप्राय देण्यासाठी हा दूवा वापरावा Feedback

सुबोध खरे's picture

16 Jul 2015 - 8:16 pm | सुबोध खरे

मिपा वर आपण लेखन करतो ते लोकांनी वाचावे म्हणून आणि स्वतःच्या सुखासाठी. मी मिपावर असणार्या अत्यंत अल्पसंख्यांक अशा समुदायाचा प्रतिनिधी. डॉक्टर आणि लष्करी अधिकारी. माझ्या बहुसंख्य लेखांवर दोन आकड्यात प्रतिसाद मिळतात. तीन आकड्यात प्रतिसाद आले ते सर्व ट्रोलिंग कंपूबाजी किंवा ठरवून कुरघोडी करण्याचा प्रयत्न इ होते. मी अर्थात अशा लोकांना फाट्यावरच मारत आलो आहे. त्यामुळे भुंकणारे लोक थोड्या काळाने शांत होतात. परंतु मला अनेक मिपाचे सदस्य असलेले किंवा नसलेल्या लोकांचे वैयक्तिक कौतुकाचे शब्द ऐकायला मिळाले आहेत किंवा मिपा कट्ट्यावर गेल्यावर लोकांनी आवर्जून तुमचे अनुभव आवडले हे सांगितले.
बाकी काही लोक एखाद्याला ठरवून निशाण करायचा प्रयत्न करतात त्याने आपण हतोत्साह झालो तर त्यांना विजय मिळाल्यासारखे आहे. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. आपले लेखन हे स्वान्त सुखाय असले कि कुणी प्रतिसाद दिला काय कि नाही काय फरक पडतो?
शुद्ध लेखनाच्या चुका मात्र जाणीव पूर्वक टाळाव्यात अशा मताचा मी आहे. कारण उत्तम बिर्याणीच्या भातात जर चावताना खडा आला तर तो रसभंग करतो तद्वत चांगल्या लेखाचा विचका होऊ शकतो.

आदिजोशी's picture

16 Jul 2015 - 8:17 pm | आदिजोशी

पूर्वी मिपावर नियमीत लिखाण करत होतो. इतकंच नव्हे बंगळूर मुक्कामी मिपा ओसरी सुद्धा सुरु करण्यास हातभार लावला होता.
पण नंतर संपादकांची गटबाजी फारच सुरु झाली. आवडत्या आयडींना वाट्टेल ते बोलायची मुभा आणि बाकिच्यांच्या प्रत्येक शब्दावर आक्षेप हे प्रकार अती झाले. काही विचारायला गेलं तर 'चपला घ्या आणि चालू पडा' हा माजोरडा अ‍ॅटिट्यूड दाखवला जायचा. आवडतीचा शेंबूड गोड वाटला तरी बाकिच्यांचं मीठ अळणी वाटायचं कारण नाही.
ह्या दरम्यान अनेक लोक मिपा सोडून गेले, काहींना चपला देण्यात आल्या. ह्याचं शून्य दु:ख संबंधीतांना होऊन 'जे गेले ते मिपाचे नव्हतेच' असा ठाकरी आहेर देण्यात आला. त्यामुळे आम्ही त्याला त्यांच्याच शब्दात फाट्यावर मारले.
शेवटी ह्या सगळ्याला वैतागून मिपा सोडून दिली. संस्थाळाच्या फार सुरुवातीपासून इथे कार्यरत असल्याने मिपा सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी फार त्रासदायक होता.
नंतर एका चांगल्या मित्राच्या सांगण्यावरून आणि परिस्थिती बदलली असल्याचा त्याने दिलेला हवाला ऐकून मिपावर परत आलो. थोडं फार लिखाण केलंही, पण सुरुवातीचा जो मूड होता तो ह्या दळभद्री लोकांमुळे गेला तो गेलाच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2015 - 10:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

थोडं फार लिखाण केलंही, पण सुरुवातीचा जो मूड होता तो ह्या दळभद्री लोकांमुळे गेला तो गेलाच.

ज्यांना आपण (तुमच्या शब्दात) "दळभद्री" समजतो अशा लोकांसाठी आपण आपल्या आवडीचे काही सोडावे इतके त्यांचे महत्व का वाढवावे ? आपण आपल्या आवडीचे काही सोडण्याने आपण अश्या लोकांचा उद्देश यशस्वी करून त्यांना प्रोत्साहन देत असतो. एकतर त्यांना विरोध करावा किंवा सरळ दुर्लक्षाने मारावे. इतकेही करून ते सुधारले नाही तर प्रशासकीय कारवाई त्यांचा बंदोबस्त करते असे गेल्या काही महिन्यांत दिसत आहे.

...असा माझा व्यक्तिगत दृष्टीकोन आहे.

प्रशासकीय कारवाई कुठे आहे साहेब? कधीच दिसत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2015 - 11:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

"अनेक डोकेदुखी ठरलेल्या आयड्या नुकत्याच नाहिश्या झाल्या असे काही सभासदांनी प्रतिसादांत म्हटले आहे ते का बरे ?" असा विचार मनात आला. तसेच अनेक प्रकारच्या प्रशासकिय कारवाया गाजावाजा न करता पडद्यामागे व्यक्तीगत स्तरावर होऊ शकतात. कारण कोणत्याही चांगल्या प्रशासनाचा उद्देश "शासन करणे" अथवा "नेम अँड शेम" करणे नसून तसे करायला लागून नये यासाठी प्रयत्न करणे असतो.

मात्र याचा अर्थ असाही नाही एखाद्या सभासदाचा त्याला योग्य वाटणारा हट्ट मानलाच जावा.

मानवस्वभावच असा आहे की सर्वांना सर्वकाळ खूष ठेवणे कधीच शक्य होत नाही. हे जेवढे प्रशासनाने जाणून घेणे आवश्यक आहे तेवढेच सभासदांनीही जाणून घेणे आवश्यक आहे, इतकेच !

प्रशासकीय कारवाई ३ आठवड्यात (तुमचा सदस्य काळ) दिसणार नाही. ३ आठवडे हा खुप कमी काळ आहे. शिवाय वर म्हणलंय तसं कदाचित ते जाहीर करणं प्रशासना ला प्रशस्त वाटणार नाही.

साहित्य संपादक कारवाईसाठी नाहीत. त्यामुळे या धाग्ग्यावर हा मुद्दा गैरलागु आहे.

जडभरत's picture

16 Jul 2015 - 8:25 pm | जडभरत

@ आदिजोशी आणि @ सुबोध खरे धन्यवाद.
परखड मत व्यक्त केलेबद्दल.

अपप्रवृत्तींकडे दुर्लक्ष करून केवळ तुमच्या वैयक्तिक आनंदासाठी लिखाण करा किंवा लेखन नसेल जमत तर इतरांच्या लेखनाचा आनंद घ्या. त्याला योग्य ते प्रतिसादही आवर्जून द्या. ज्यामुळे अशा व्यक्तिंना लेखनासाठी प्रेरणा मिळेल. निष्पक्षपाती व्यक्तींनी स्वतःचे बहुमत केले तरच या प्रकाराला आळा बसेल.

प्रसाद गोडबोले's picture

16 Jul 2015 - 8:58 pm | प्रसाद गोडबोले

छान धागा !

- पुलेशु

प्रसाद गोडबोले's picture

16 Jul 2015 - 9:18 pm | प्रसाद गोडबोले

बाकी परवाच एक नवीन धागा काढायचा विचार मनात आला होता - " मिपा अ‍ॅनालिटिक्स "
मिपावरील स्वगृह पानावरील डेटा एक्सेल मधे नेवुन थोडे फार टेक्स्ट मायनिंग करुन मिपावरील लेखनाचे ईनालिसिस करता येईल ... म्हणजे

नक्की कोणत्या विशयावर किती लेख येतात ?
कोणत्या विशयावर किती प्रतिक्रिया येतात ?
कोणाच्या किती प्रतिक्रिया संपादित होतात ?
जे ५-६ मेन विषय आहेत त्यांचा मंथ ऑन मंथ काही टाईम सीरीज ट्रेंड आहे का ?
म्हणजे काही विशिष्ट महिन्यात काही विषिष्ठ साहित्य प्रकारांना उधाण येते का ?
कोण लेखक विशेष अ‍ॅक्टीव्ह आहेत आणि जास्त लेखन करतात ?
किती नवीन लोकांचे नवीन लेखन आले ? त्यावर साधारण किती प्रतिसाद आले ?

आणि सरते शेवटी ...

साहित्य संपादक ह्या रचनेनंतर नवीन लेखकांच्या / नवीन लेखनाच्या संख्येत खरेच काही वाढ झाली का ? जी काही वाढ झाली ती सिग्निफिकंट आहे का प्लेसेबो इफ्फेक्ट आहे ?

( अर्थात : शेवटचा प्रश्ण अत्यंतच स्ट्रेट फॉरवर्ड आणि " नो नॉनसेन्स " अर्थात ते बलिवर्दनेत्रभंजक का काय म्हणतात ते त्याप्रकारातील असल्याने धागा संपादन व्हायची भिती वाटली म्हणुन उगाच कष्ट घेतले नाहीत ... हाही प्रतिसाद घाबरत घाबरत लिहित आहे. )

आदूबाळ's picture

16 Jul 2015 - 9:47 pm | आदूबाळ

लिहाच हो तुम्ही.

टेक्स्ट मायनिंग + अ‍ॅनालिटीक्सचा निष्कर्ष काहीही येवो, बट द जर्नी इज वर्थ इट.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2015 - 10:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

अश्या प्रयत्नांचे स्वागतच आहे. अत्यंत उपयोगी प्रकल्प होईल. जरूर करा.

फक्त एक सूचना...

साहित्य संपादक ह्या रचनेनंतर नवीन लेखकांच्या / नवीन लेखनाच्या संख्येत खरेच काही वाढ झाली का ? जी काही वाढ झाली ती सिग्निफिकंट आहे का प्लेसेबो इफ्फेक्ट आहे ?

सासंमंडळ नुकतेच स्थापन होऊन त्यांचे कार्य सुरू होऊन थोडे दिवसच झाले आहेत आणि त्यांच्या कामाचा प्रभाव जाणवायला अजून काही काळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे, या प्रश्नाच्या उत्तरांचे स्टॅटिस्टिकली योग्य प्रभावाचे आणि योग्य आकाराचे सँपल साईज मिळायला अजून काही वेळ द्यावा लागेल असे वाटते.

एस's picture

16 Jul 2015 - 11:17 pm | एस

हेच म्हणायला आलो होतो.

नाखु's picture

17 Jul 2015 - 9:13 am | नाखु

मूळ अवांतर : कप्तानाने चांगल्या विषयाला हात घातला आहे. सा.संपादक सक्रीय असतात याचे खणखणीत उदाहरण आहे हे.

मूळ खाजगी अवांतर : याला नेहमी पन्नाशीचे धागे कसे काढता येतात समक्ष भेटून इगत माहीत करून घ्यावी काय?
मूळ जाहीर अवांतर :मिपावर तत्काळ फरक दिसण्याचा आणि मोदींच्या अच्छे दिन आये है चा काहीही संबध नाही याची नम्र नोंद सभीक्षक आणि (सं)वादक यांनी घ्यावी ही विनंती

शब्दानुज's picture

16 Jul 2015 - 9:42 pm | शब्दानुज

माझ एक मत आहे जे आधीपण मांडले होते. ते म्हणजे लेख प्रतिसादानुसार वरखाली सरकतात. त्याएवजी चक्क मार्कींग सिस्टिम चालु करायची. प्रत्येक सदस्याला मार्क देण्याचा अधिकार द्यायचा आणि त्यानुसार लेख वर खाली सरकायला हवेत

हे जरा जास्तच वाटत असल्यास प्रत्येक लेखाखाली ' लेख आवडला ' असा अॉप्शन ठेवा. जेवढे जास्त किल्क यावर होतील तेवढा लेख वर.
प्रतिसाद संख्या आणि या किल्कचाही मेळ घालता येईल.

महिनाअखेरीस निवडणुकीद्वारे निवडलेल्या लेखांचा सन्मान करण्यात आल्यास उत्तम लेखांसाठी चुरस निर्माण होईल.

अस्वस्थामा's picture

16 Jul 2015 - 10:03 pm | अस्वस्थामा

हे जरा जास्तच वाटत असल्यास प्रत्येक लेखाखाली ' लेख आवडला ' असा अॉप्शन ठेवा. जेवढे जास्त किल्क यावर होतील तेवढा लेख वर.

एक कल्पना म्हणून तरी हे आवडलेय असे नमूद करतो. अजून बरीच सुधारणा सुचवता येईल पण पुढचं पुढे. :)

पैसा's picture

16 Jul 2015 - 10:06 pm | पैसा

पण ही पद्धत योग्य वाटत नाही. मायबोलीवर हा प्रयोग काही दिवस चालू होता. तो बंद केला. मिपावरही बहुधा काही थोडक्या काळासाठी झाला होता. पण कंपूबाजी करून एखाद्याच्या लेखाला वर ओढणे किंवा मुद्दाम पाडणे हे प्रकार अशा सिस्टीममधे नक्कीच होतात. त्यामुळे ही पद्धत फक्त वाद निर्माण करील. अजून काही होईल असे वाटत नाही.

मित्रहो's picture

16 Jul 2015 - 10:01 pm | मित्रहो

खरे सांगायचे म्हणजे मी मिपावर लिखणापेक्षा वाचण्यासाठी असतो. नवीन प्रकारचे लेखन, नवीन अनुभव वाचायला मिळतात. उदाहरणच द्यायचे झाले तर भितीच्या भिंतीसारखी मालिका किंवा लेहचा सायकलवर केलेला प्रवास. जुने जाणते लेखक जर परत सक्रीय झाले तर आमच्यासारख्या वाचकांचा फायदाच होइल.
तसा मला मिपावर टंकण्यात कधी समस्या आली नाही. लेखक हा प्रतिसादांसाचा भुकेला असतो हे खरे आहे पण प्रतिसादांवरुन लिखाणाचा दर्जा ठरविणे म्हणजे एसएमएस वरुन गायक निवडण्यासारखी आहे. कुठल्याही धाग्यावर जर चाळीसच्या वर प्रतिसाद असतील तर तिथे विषयांतर झालेले असते असे माझे निरीक्षण आहे.

जडभरत's picture

16 Jul 2015 - 10:10 pm | जडभरत

@पैसा @मित्रहो :-
मार्मिक प्रतिसाद!!!!

ज्यांना आपण (तुमच्या शब्दात) "दळभद्री" समजतो अशा लोकांसाठी आपण आपल्या आवडीचे काही सोडावे इतके त्यांचे महत्व का वाढवावे ? आपण आपल्या आवडीचे काही सोडण्याने आपण अश्या लोकांचा उद्देश यशस्वी करून त्यांना प्रोत्साहन देत असतो

हे मात्र खरेय. असे लोक खरोखर त्या लायकीचे नाहीत.फक्त अनामिक आयडीखाली दडून वार करणे एवढाच त्यांचा पुरूषार्थ!

चिमणराव तुम्ही पुढाकार घेतला म्हणून किमान इतकं तरी बोलता येतंय? नाहीतर शक्यच नाही इतकं मोकळं बोलणं. धन्यवाद आपणास की आपण एवढं धाडस दाखवलं!!!

प्यारे१'s picture

16 Jul 2015 - 11:16 pm | प्यारे१

भावा, तुझं मिपावय किती? तू बोलतो किती?
नवसम्पादकांच्या प्रामाणिक प्रयत्नाला रोखीनं हरताळ का फासतोय?

माझ्या मिपावयाचा इथे काय संबंध? चिमणरावांच्या प्रयत्नाला मी कधी हरताळ फासला रे!

प्यारे१'s picture

16 Jul 2015 - 11:24 pm | प्यारे१

:) (पूर्वीसारखी स्माइली नाहीये समजून घेणे)

काही न पटलेल्या गोष्टी पण बोलू नयेत का आम्ही?

प्यारेजी कदाचित तुम्ही काय बोलताय हे समजलं नाही मला.

माझी फक्त इतकीच इच्छा आहे की मिपा मराठी मानस, मराठी अभिव्यक्ती, मराठी आकांक्षा यांचे संकेतस्थळ व्हावे ना की काही ठराविक लोकांची मक्तेदारी.

जडभरत's picture

16 Jul 2015 - 11:39 pm | जडभरत

मराठीबाबत आत्ता किती उपेक्षेचे वातावरण आहे हे अनुभवलेय. आत्ता मराठी ही लाजिरवाणी बाब झालीय खुद्द महाराष्ट्रात! असं वाटतं की मिपासारखं व्यासपीठ मराठीला तिचा मान मिळवून देईल. पण जर आपणच या संस्थळाची अशी वाताहात केली तर मग उपयोग काय?

तुमचं शुद्धलेखन बरेच सुधारलेय की इतक्या कमी कालावधीत!

आणि तुमच्या मिपाअभ्यासालाही दाद दिलीच पाहिजे.

आवाहनाचं शब्दांकन आवडलं. भा.पो.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Jul 2015 - 10:03 am | प्रकाश घाटपांडे

चला या निमित्ताने अनेकांचे आत्मपरिक्षण/ परपरिक्षण झाले असेल.

माझा आत्ता पर्यंतचा एकच फंडा आहे...
स्वतः आनंद घ्या आणि दुसर्‍यांना आनंद ध्या. :)
ज्यांच्या टकुर्‍यात हे शिरत नाही त्यांना फाट्यावर मारा ! बाकी काही फाटे इतके "निर्लेज्य" आहेत की त्यांची कितीही ठासली तरी... असो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला आता शिकलो आहे ! तरी सुद्धा कधी कधी सटकतेच ! वायझेड साले असे म्हणतो आणि परत दुर्लक्ष करतो.
आदि च्या भावना योग्य आहेत,त्याच प्रमाणे एक्का काकांचा प्रतिसाद सुद्धा अतिशय उत्तम आहे. :)

अवांतर :- नामांतर चळवळीला माझा विरोध आहे, अनेक सदस्यांनी { स्त्री/पुरुष} आपल्या जुन्या आयडीचे नामकरण केले आहे, परंतु त्यामुळे अनेकदा यांचा आधीचा "अवतार" कोणता ? हे आठवण्याचे फालतु कष्ट घ्यावे लागत आहेत.तसेच त्यांच्या बरोबर आधी ज्या मोकळेपणाने,बिनधास्तपणे बोलता येत होते ते तसे करणे आता जमत नाही.जरी नामांतर करणे हा व्यक्तिगत निर्यण स्वातंत्र्याचा पर्याय असला तरी मला तरी तो न-रुचणारा वाटला.एकदाच काय तो आयडी घ्या आणि वावरा.अनेक आयडींना त्यांच्या त्या नावावरुन किंवा टोपण नावावरुन हाक मारण्यात,गप्पा मारण्यात जी मजा होती ती निघुन गेली. आजही श्री. डॉ.सुहास म्हात्रे यांना मी एक्का काका याच टोपण नावाने संबोधित करणे पसंत करतो याचे कारण तेच आहे. :) तसेच उध्या {डॉ.}सुबोध खरे ज्यांना डॉक या टोपण नावाने हाक मारतो त्यांनी उध्या "जरत्कारु" असे त्यांच्या आयडीचे नामकरण करुन टाकले तर माझ्या सारख्या बापड्यांची पंचाईत होइल की नाही ? ;) तर मिपा व्यवस्थापनाला माझी विनंती आहे की यापुढे एकदा आयडी घेतल्यावर ते सदस्यनाम बदलण्यास पूर्णपणे बंदी असावी.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- जगणे कसले आव्हान इथे, दिन रात नवे छळणारे... :- 'ऋण'

भाते's picture

17 Jul 2015 - 10:50 am | भाते

नामांतर चळवळीच्या विरोधाशी सहमत आहे. नविन आयडी आणि जुना आयडी याच्यात बऱ्याचदा गोंधळ होतो.
सुरुवातीला मिपावर नविन असताना टोपणनावाने वावरणारे अनेकजण नंतर मिपावर स्थिरावल्यावर आपले पुर्ण नाव नविन आयडी म्हणुन घेतात. यात गैर काही नाही. पण नामांतरानंतर स्वाक्षरीमध्ये जुना आयडी आणि नविन आयडी देणे बंधनकारक करावे अशी सूचना!
मी सुध्दा माझा आयडी बदलुन माझे पुर्ण नाव नविन आयडी म्हणुन घ्यायचा विचार केला होता.

मनीषा's picture

17 Jul 2015 - 11:45 am | मनीषा

आपल्या आवाहनास चांगला प्रतिसाद लाभून माझ्यासारख्या वाचनमात्रं आणि क्चचित प्रतिक्रियालेखनमात्रं सभासदांना " अच्छे दिन" दिसावेत हीच सदिच्छा!

प्यारे१'s picture

18 Jul 2015 - 12:42 pm | प्यारे१

सूत्रोंके अनुसार भाजपा अध्यक्ष ने कहा अच्छे दिन आने के लिए लगेंगे 25 साल
-कैमरामैन ***** के साथ प्यारक चौरासिया, अंत तक!

प्यारे१'s picture

18 Jul 2015 - 1:27 pm | प्यारे१

बऱ्याचदा असं आढळतं की लेख update झालाय. उघडून पाहिल्यावर लक्षात येतं की काही प्रतिसाद दुरुस्त झालेत. ते बऱ्याचदा सम्पादकांचे असतात. सदस्य म्हणून प्रतिसाद दिल्यानंतर संपादकीय अधिकारांचा वापर करुन स्वत:चा प्रतिसाद दुरुस्त करणं हां पदाचा दुरुपयोग आहे असं आमचं स्पष्ट मत आहे.
यावरुन अनेक सम्पादकांशी अनेकदा भांडण झालं आहे. खुद्द् मिपासंस्थापकांचा शुद्धलेखनासाठी आग्रह नव्हता त्यामुळे कानामात्रावेलांटी साठी प्रतिसाद सम्पादन होऊ नयेच् त्याव्यतिरिक्त एका सम्पादकाचा प्रतिसाद बदल करण्याचे अधिकार त्याला स्वत:ला असू नयेत. आणि तसं वाटत नसेल तर सामान्य सदस्यांना देखील हां अधिकार मिळावा असं का वाटत नाही?
(ही खरड in right spirit घेतली जाईल ही आशा. अशा आक्षेपानंतर सम्पादकांच्या आमच्याप्रति असलेल्या वागण्यात बदल झालेले अनुभवलेले आहेत)

संदीप डांगे's picture

19 Jul 2015 - 1:47 pm | संदीप डांगे

संपादकांना पूर्वनिरिक्षण ही सुविधा नसेल प्यारेभाई...! :-)

(मरा आता....)

संदीप डांगे's picture

19 Jul 2015 - 1:49 pm | संदीप डांगे

पूर्वपरिक्षण असे वचावे,,,

नाव आडनाव's picture

19 Jul 2015 - 2:29 pm | नाव आडनाव

स्वसंपादन असतं तर दुसरा प्रतिसाद लिहायला लागला नसता ना संदीप भाऊ ;)

पार जुने प्रतिसाद बदलल्यामुळे पुढची चर्चेचा अर्थ बदलंत असेल तर स्वसंपादनाला वेळेची (१ दिवस / २ दिवस आधिचे प्रतिसाद) बदलण्याची मर्यादा ठेवू शकतो. त्यातही मूळ प्रतिसाद आणि बदललेले शब्द याचं प्रमाण असू शकतं. जर या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिसाद बदलत असेल तर ते सर्वर वर सेव्ह होऊ शकणार नाही अशी स्क्रिप्ट / रूल असेल तर ज्या लोकांना फक्त शुध्ध्लेखणात बदल करायचे आहेत त्यांच्यासाठी सोपं होइल. यामुळे जास्त बदल असतील तर नवा प्रतिसाद असतील लिहावा लागेल. अश्या केस मधे बदल करयचेच असतील तर संपादकांना मदत मागता येइल.

टवाळ कार्टा's picture

19 Jul 2015 - 1:51 pm | टवाळ कार्टा

खिक्क...आता तुम्ही रडारवर येणार

सामान्य सदस्यांना देखील हां अधिकार मिळावा असं का वाटत नाही?
पूर्णपणे सहमत !

अवांतर :-
सब कुछ सिखाया जा सकता है...पर किसी के भावनाओं का खयाल रखाना कैसे सिखाया जाये ?
इति :- श्री देवी फ्रॉम Engliश Vingliश

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरी का साजन, साजन की गोरी... :- आखिरी रास्ता

काही धाग्यांवर जेव्हा लेखनात सुधारणा करायची गरज दिसते (विरामचिन्हे खूप जास्त किंवा चुकीच्या ठिकाणी; शुद्धलेखनाच्या गडबडी, जोडाक्षरे लिहिण्यात अडचणी) अशा प्रसंगी साहित्य संपादकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन मदत करावी. साहित्य संपादक अशी मदत करतात हे लक्षात आल्यावर मदत मागतीलही लेखक.

सदस्यनाम's picture

19 Jul 2015 - 3:46 pm | सदस्यनाम

विरामचिन्हे खूप जास्त

बहुतेक ही सध्याची फ्याशन असावी त्यामुळे त्यांना ते चूक वाटत नसणार. दुरुस्त करुन कशाला मागतील?
अगदी जुन्या अन हुशार हुशार आयडींना सर्रास दोन अथवा जास्त पूर्णविराम अथवा प्रश्नचिन्हे देताना पाह्यले आहे.

स्रुजा's picture

19 Jul 2015 - 6:57 pm | स्रुजा

प्यारे१ आणि तुमच्या प्रतिसादाला एकत्र च उत्तर देते. धागे दुरुस्त करायची जेंव्हा वेळ येते म्हणजे टंकन चुका, फोटो ची साईझ बदलणे, लेख मालिका असेल तर आधीच्या लेखांचे दुवे देणे, लेखक च कधी प्रतिसादांतुन लेखांत भर घालतात कारण मुळ लेखात ते लिहायचं राहुन गेलेलं असतं, त्या प्रतिसादामधला मजकुर लेखकाला हवं असल्यास मुळ लेखात घालणे, या सगळ्या दुरुस्त्या सा. सं. करतात आणि लेखकाला व्यनि करतात. बर्‍याच नवीन लेखकांना पण आम्ही व्यनि करुन काही गोष्टी सुचवत असतो. सा. सं ची जेंव्हा अधिकृत घोषणा झाली तेंव्हा हे काम सुद्धा त्यात एक होतं आणि त्यानुसार लेखकांना मदत लागली की अथवा आमच्या लक्षात आलं की ते काम केलं जातंय. हे इथे विस्ताराने लिहीते म्हणजे कुणा लेखकाला मदत हवी असल्यास काय करायचे हा प्रश्न पडणार नाही.
तो लेख तसा दुरुस्त केला की "updated" दिसतो. इथे आता "updated" म्हणजे प्रतिसाद संपादित नाहीयेत; धाग्यात सुधारणा केल्यात. जेंव्हा स्वतःचे प्रतिसाद कुणी संपादक सुधारतात तेंव्हा तो प्रतिसाद पुन्हा नवीन प्रतिसाद म्हणुन दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ, धाग्यावर १० प्रतिसाद आहेत, तुम्ही ते वाचले आहेत आणि मग कुणी तरी त्या १० मधला आपला प्रतिसाद सुधारला तर तुम्हाला त्या धाग्यावर एक नवीन प्रतिसाद दिसेल. त्या १ आकड्यावर क्लिक करुन तुम्ही नवीन प्रतिसाद बघायला जाल तर सुधारीत प्रतिसाद दिसेल. updated हे प्रतिसाद सुधारण्यामुळे येत नाही, धागा सुधारण्यामुळे येतं.

प्यारे१'s picture

19 Jul 2015 - 7:14 pm | प्यारे१

प्रतिसादासाठी आभार स्रुजा.
बाकी सगळ्या कामासाठी कौतुक आहेच्च.
पण
>>>> जेंव्हा स्वतःचे प्रतिसाद कुणी संपादक सुधारतात तेंव्हा तो प्रतिसाद पुन्हा नवीन प्रतिसाद म्हणुन दिसतो.

हे वर दिलेलं आहे त्याला आक्षेप आहे. निव्वळ सदस्य म्हणून प्रतिसाद देतात ना आणि त्याबाबत थयथयाट सुद्धा करता ना? (हे शब्द ज्येष्ठ आणि श्रेष्ठांचे आहेत) मग संपादन दुसर्‍या संपादकांकडून करवून घ्यावं. यात कमीपणा का वाटतो? चिडचिड का होते? ज्येष्ठांचं आपल्या विचारांवर आणि लिखाणावर प्रभुत्व असतं असावं असं अपेक्शित असताना प्रतिसाद संपादनाची गरज का बरे निर्माण होत असावी? मान्य की चुका होतात आणि त्या दुरुस्त देखील करायला हव्यात पण मग जर तो गैरफायदा नसेल आणि निव्वळ फायदा म्हणुन च वापरला जात असेल तर थोडासा विश्वास मिपासदस्यांवर सुद्धा ठेवा की! त्यांना का या फायद्याचा लाभ देऊ नये? असा साधा सरळ प्रश्न आहे.

म्हणणं समजलं असेल असं अपेक्षित आहे.

त्या बाबतीत मुख्य सं. म> शीच बोललेलं बरं. वर आणि इतर अनेक जागी लिहिल्या प्रमाणे सा. सं ना प्रतिसाद संपादित करतात ना पॉलिसी मेकर्स आहेत. सा. सं चं कार्यक्षेत्र वेगळं आहे , वर कॅप्टन नी ते विस्ताराने लिहिलं आहे. त्या व्यतिरिक्त इतर तक्रारींची चर्चा इथे करुन काहीच साध्य होणार नाही.
अतिवास आणि तुमच्या प्रतिसादानिमित्त विस्ताराने सांगण्याची कारणे २: १. आता पर्यंत कुणाच्या नजरेतुन सुटलं असेल अथवा प्रक्रिया कळली नसेल तर या निमित्ताने कळावी २. updated हे सा. सं च्या कामाशी संबंधित आहे हे अधोरेखित करणे.

बॅटमॅन's picture

21 Jul 2015 - 12:48 pm | बॅटमॅन

प्यारे काकांशी सहमत.

पैसा's picture

21 Jul 2015 - 2:11 pm | पैसा

भाऊ, तुम्ही लोक नीलकांतवर हल्ले करत आहात हे लक्षात येतंय का? कोणाला कोणते अधिकार द्यायचे हे सर्वस्वी नीलकांतच्या हातात आहे. त्याच्यासारखा समतोल आणि विचारी माणूस एखादी गोष्ट का करतो किंवा का करत नाही याला तसेच कारण असते. निदान त्याच्यावर तरी विश्वास ठेवा.

चालूदे. स्वतःचे मत मांडल्यावर इतका त्रास होईल असे वाटले नव्हते.

प्रसाद गोडबोले's picture

21 Jul 2015 - 3:12 pm | प्रसाद गोडबोले

#स्वमतांध्_दांभिकता कि #निरर्थक्_अत्मरंजन कि #ल्ल्ल्ल्लूऊऊऊ ??

पायजे ते! लसावि वा मसाविदेखील चालेल =))

पैसा's picture

21 Jul 2015 - 10:35 pm | पैसा

मला त्रास होतो असे कुठे बोलले का मी? चालू द्या तुमचे निरर्थक आत्मरंजन! त्रासापेक्षा मनोरंजन होण्याची शक्यता जास्त आहे इथे!

अस्वस्थामा's picture

21 Jul 2015 - 3:51 pm | अस्वस्थामा

मला कसलाही इतिहास (असल्यास) माहिती नाही तरी पण,

तुम्ही लोक नीलकांतवर हल्ले करत आहात हे लक्षात येतंय का?

इथे थोडी असहमती. एक तर हा हल्ला नाही, आक्षेप आहे. ज्यांनी नोंदवलाय त्यांनी जेवढे मांडलेय ते विचारार्ह आहे असे वाटतेय. त्याचबरोबर,

त्याच्यासारखा समतोल आणि विचारी माणूस एखादी गोष्ट का करतो किंवा का करत नाही याला तसेच कारण असते.

असेल की. पण म्हणून नीलकांतने निर्णय घेतल्यास सदस्यांनी आक्षेपदेखील नोंदवू नये काय ? "नोंदवू नये" असे नीलकांतने स्वतः म्हटल्याचे माहित नाही. सदस्यांना स्वसंपादन नाही हे समजू शकतो पण "एका सम्पादकाचा प्रतिसाद बदल करण्याचे अधिकार त्याला स्वत:ला असू नयेत." हा आक्षेप म्हणून तरी मान्य होण्यात काही प्रॉब्लेम नसावा.
ह्यात नीलकांतवर हल्ला वगैरे दिसत नाही.
आणि गैरसमज नसावा पण संपादकच नव्हे तर नीलकांतदेखील माणूसच आहे आणि चुकू शकतोच की. बाय डिफॉल्ट एखादी गोष्ट संमं ने केलीय अथवा नीलकांतने केलीय म्हणून आक्षेप नोंदवू नये हे पटत नाही.

असेल की. पण म्हणून नीलकांतने निर्णय घेतल्यास सदस्यांनी आक्षेपदेखील नोंदवू नये काय ? "नोंदवू नये" असे नीलकांतने स्वतः म्हटल्याचे माहित नाही. सदस्यांना स्वसंपादन नाही हे समजू शकतो पण "एका सम्पादकाचा प्रतिसाद बदल करण्याचे अधिकार त्याला स्वत:ला असू नयेत." हा आक्षेप म्हणून तरी मान्य होण्यात काही प्रॉब्लेम नसावा.
ह्यात नीलकांतवर हल्ला वगैरे दिसत नाही.

पालथा घडा भरायचा सोस लैच बगा तुमास्नी.

अस्वस्थामा's picture

21 Jul 2015 - 4:32 pm | अस्वस्थामा

:)))

"पालथा घडा" असं वाटत नै म्हणून लिहिलय राव.

(येथील व्यवस्थेवर विश्वास असलेला आणि ते मत बदलण्यास अजून कसलाही अनुभव नसलेला )

पैसा's picture

21 Jul 2015 - 10:46 pm | पैसा

पण सदस्यांवर नीलकांतने विश्वास ठेवून बघावा असे म्हणताना "सध्या नीलकांतचा सदस्यांवर विश्वास नाही" असा सरळ अर्थ निघतो. जो त्याच्यावर भरपूर अन्याय करणारा आहे. शिवाय अनेकदा आपण संपादकांची जिरवली असे वाटून जे अनेक सदस्य लिहीत असतात तेव्हा आपण नकळत नीलकांतला अप्रत्यक्ष जबाबदार धरतोय आणि दुखावतोय हे त्यांना समजत नाही. माझा प्रतिसाद केवळ एवढेच सांगण्यासाठी होता, आहे. इतर पालथ्या घड्यांबाबत मला काहीच म्हणायचे नाही. आणि मी आता दगडांवर डोके आपटायचे सोडले आहे. तुम्ही समंजस आहात म्हणून फक्त तुमच्याशी बोलत आहे. नीलकांतकडे जर आक्षेप नोंदवायचे असतील तर त्यासाठी नीलकांतशी थेट बोलावे लागेल. चिमणरावच्या धाग्यावर लिहून काय होणार? तुम्हाला नरेन्द्र मोदीसाहेबांना सल्ले द्यायचे असतील तर पीएमओ ला लिहावे लागेल. मिसळपाव वर लिहून काय होणार आहे?

अप्रत्यक्ष काय ते सोडून द्या, प्रत्यक्षाचं बोला. इथे एक प्रतिसाद काय लिहिला तर इतका काय त्रास होतोय की डैरेक नीलकांतला मध्ये आणायची गरज वाटतेय?

पैसा's picture

22 Jul 2015 - 1:01 pm | पैसा

आपले भांडण होते तेव्हा लै मजा येतेच! पण समजून घे रे बाळा, इथे कोणाला कोणते अधिकार द्यावेत किंवा देऊ नयेत हे फक्त आणि फक्त नीलकांत ठरवतो. तेव्हा त्याबद्दल जे काय म्हणायचे असेल ते इथे चिमणरावाला सांगून काय उपयोग आहे? ते आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी होते नाही का? समजतंय का? नैतर जौ दे. मला एका संस्कृत काव्याचे भाषांतर करायचे आहे. तुला काही शब्दांसाठी व्यनि करते थोड्यावेळात.

पैसा's picture

22 Jul 2015 - 1:02 pm | पैसा

अभिप्राय दिलास का तू?

बॅटमॅन's picture

22 Jul 2015 - 1:07 pm | बॅटमॅन

तुमचं काय ते बोला आज्जी, गावभरचा उपदेश नंतर करा जमलं तर.

पैसा's picture

22 Jul 2015 - 1:14 pm | पैसा

माझा या सगळ्यात काय संबंध?

प्यारे१'s picture

22 Jul 2015 - 12:42 pm | प्यारे१

>>>>भाऊ, तुम्ही लोक नीलकांतवर हल्ले करत आहात हे लक्षात येतंय का?

सॉरी हा!

दिनेश सायगल's picture

22 Jul 2015 - 1:21 pm | दिनेश सायगल

प्यारे आणि बॅटमॅन काका, मालक काम करत नाहीत किंवा अपुरे काम करतात असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आवडीच्या संस्थळांवर तुम्ही का जात नाही? किंवा तुमच्या मित्रांप्रमाणे तुम्हाला आवडेल तसे संस्थळ काढायचा पर्याय तुम्हाला खुला आहेच की!