पाऊस (शतशब्दकथा)

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
7 Jul 2015 - 8:58 pm

त्या पावसाचं कवतिक तुमा लोकांनला!
पावसावर गानी लिवता, मोट्या मोट्या गाड्यांमदी भिजायला जाता तिकडं डोंगरात.
आमाला काय त्याचं ? दर वर्साला येतोय आन जिनं हराम करतोय बगा.
आत्ता, दर वरसाला झोपड्याचं पलास्टिक बदलायला पैका कुटं हाय ?
औंदा पन असाच आला माज्या दादल्यासारका आन लई झोंबून ग्येलाय कुटं तरी उंडारायला!
सगली बरबादी क्येली बगा माज्या संसाराची.
आता नसला तरी पान्याची बोंब व्हनार. कुटं उलथलाय कोनास टाऊक!
येईल आता दुसर्‍या आखाडाच्या टायमाला
आन येकद्म पडून सूड उगवंल मागील जलमाचा.
मागल्या मैन्याला माजी दोन टोपली वाह्यली.
आता दोनच भांड्यांत खायाला कसं बनवावं मानसानं ?
प्वारं बी रडताती त्येंची बुकं भिजली म्हनून.
दादल्याचं लक्ष फकस्त माज्या ............!!!

मुक्तकजीवनमानराहणीप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2015 - 9:17 pm | श्रीरंग_जोशी

दारिद्रय परिणामकारकपणे मांडलय.

नाखु's picture

8 Jul 2015 - 10:25 am | नाखु

ठसठशीत

एक एकटा एकटाच's picture

7 Jul 2015 - 9:26 pm | एक एकटा एकटाच

परिणामकारक

उगा काहितरीच's picture

7 Jul 2015 - 9:33 pm | उगा काहितरीच

संपवली का ?

आतिवास's picture

7 Jul 2015 - 9:48 pm | आतिवास

परिणामकारक!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2015 - 10:49 pm | अत्रुप्त आत्मा

+१

रातराणी's picture

7 Jul 2015 - 11:33 pm | रातराणी

+१

कपिलमुनी's picture

8 Jul 2015 - 1:08 pm | कपिलमुनी

+१

खटपट्या's picture

8 Jul 2015 - 1:00 pm | खटपट्या

भावली !!

मधुरा देशपांडे's picture

8 Jul 2015 - 1:02 pm | मधुरा देशपांडे

कथा छान जमली आहे. सर्व प्रतिसादांशी सहमत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Jul 2015 - 5:18 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली असे तरी कसे म्हणू?
पैजारबुवा,