मित्र हो,
या यात्रेतील महत्वाचा भाग होता की मेरठ, लखनौ, प्रतापगढ व साहरनपुरला भेट देऊन तेथील भृगुशास्त्रीकडील संहिता पत्रांची माहिती व जमल्यास गोडीगुलाबीने त्यांच्याकडील पट्ट्यांचे फोटो काढून पट्ट्यांचे करायला प्रवृत्त करणे. सहारनपुरच्या केंद्रात केदारनाथ प्रभाकर यांच्या मुलाने 'सध्या रामनवमीमुळे वडील भेटू शकणार नाहीत' म्हटल्यावर पालम विमानतळावरून सरळ आम्ही मेरठच्या डब्बा गाडीत बसायला आयएसबीटी वरून चढलो. ही गर्दी, घाम येणारी गर्मी, त्यात गावागावातून झुंडीच्या झुंडी आसपासच्या गावात लागलेल्या मेळ्यात जायला ट्रॅक्टरचे ट्रेलर भरभरून जाताना पाहून रामनवमीच्या गर्दीचा हिसका आम्हाला कळून आला. पुढे अयोध्या रेल्वेस्टेशनात गाडी थांबायचा अवकाश असे लोंढे आत येऊन मला खाली उतरायला शक्य झाले नाही! इतके की मी उलट्या बाजूने उतरून शेवटी इंजिनाला फेरी मारून ओकसरांना भेटू शकलो. या सर्वात ते शिताफीने उतरून माझ्याकडून जड सामानाची बॅग घेऊन उतरले म्हणून मला उरलेले सामान आणायला सोईचे गेले!
एका स्टँड जवळच्या हॉटेलवाल्याला विपिन दिक्षितांनी फोन लावून, बोलून सोय केली होती म्हणून झटपट खोलीमिळून एसीच्या थंड हवेत आम्हाला दमणूक झालेल्या दिवसाची सांगता करता आली... त्या दिवशी सानू थापांनी बाय केल्यावर असा प्रचंड पाऊस पडला असे निमित्त होऊन आमची फ्लाईट 2 तास उशीरा सुटली होती.
दुसऱ्या दिवशी हनुमान मंदिर दर्शनानंतर समोरच्या घरातील मजला चढून बेल दाबल्यावर आता आमचे स्वागत कसे होईल असा सरांना जरा पेच होता. कारण त्यांच्या आधीच्या भेटीत उत्साहवर्धक वातावरण नव्हते. ते सर्वीस मधे होते तेंव्हा एका आर्मी ऑफिसरला केंद्रात भेटल्यावर त्यांनी सरांना त्यांचे हिन्दीतील पुस्तक म्हणून एक चोरून प्रकाशित झालेले नाडीवरील पुस्तक सप्रेम भेट दिले होते! शिवाय आर्मी कर्नलच्या वतीने सर विपिनजींशी बोलताना गरम वातावरण झाले होते म्हणे.
यावेळचा अनुभव अगदी उलट होता. आई, पत्नी व मुलासमोर त्यांचा आम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचा हार देऊन केलेला सत्कार भावला होता. त्यांनी आनंदाने राशी मिलान यंत्र, ताडपत्रावर पाली भाषेतून लिहिलेल्या पट्ट्यांचे पॅकेट बासनातून काढले. एक सुरवातीचे भृगुफल वाचून दाखवले. गर्ग संहितेची पाने उलगडून दाखवत त्यांच्या आजोबांनी घालून दिलेल्या शिस्तीमुळे सर्व पट्ट्या आणि ग्राहकांना दिलेली टाईप करून दिलेल्या कागदांच्या फाईल्स वगैरे कसे व्यवस्थित केलले होते याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी हातातल्या मोबाईलमधील टॉर्चचा वापर करून पट्टीवर फिरवत वाचायची सोय करून दिली.
10 ला पोहचलेलो आम्ही 2 वाजेपर्यंत त्यांच्या घरी रमलो होतो. पट्टी सापडली तर कुटुंबासह तिथे जायचा विचार मी करत माझी कुंडली त्यांना दिली आहे. पाहू केंव्हा बोलावतात ते.
रात्रीच्या ट्रेनचे आयत्यावेळीचे तात्काल एसीचे रिझर्वेशन मिळाल्याने रात्रीचा प्रवास संपवून आम्ही लखनौचा नबाबी ब्रेकफास्ट करून रेल्वेक्लोकरूममधे जड बॅगा देऊन नाडीकेंद्राकडे मो्चा वळवला... मात्र त्याआधी संडारीवाल्या भृगुशास्त्रींनी आधी ठरवले असून ही 'आज नही कल आना' असे म्हणून आम्हाला बुचकळ्यात टाकले... त्यावर ओक सरांनी शक्कल लढवून लखनौमधील नाडीवाल्याची भेट घ्यायला फोन घुमवला.'विनयखंड मधे या' म्हणून फोन बंद झाला... ती हकीकत पुढील वेळी...
1. पं. विपिन दीक्षित ताडपट्ट्या दाखवताना
2. एका ताडपट्टीतील मजकूर व पालीलिपी दर्शन
3. राशी-इष्टकाल करेक्शन यंत्र
4.टाईप केलेले कोणाएकाचे फल
5. विपिन दीक्षितांचा सत्कार करताना
6. कागदी भृगु फल दर्शन
7. गर्ग संहितेचे एक पान
प्रतिक्रिया
26 Apr 2015 - 2:33 am | अर्धवटराव
बुचकाळ्यात पडायला होतय.
26 Apr 2015 - 2:53 am | योगविवेक
मेरठ मधील बुढाना गेटपाशी असलेल्या भृगुशास्त्रींच्या घरी ओकसर घरच्याच्या समोर सत्कार करताना...
26 Apr 2015 - 7:41 am | हेमन्त वाघे
नेपाल मधील अतिशय दुर्दैवी भुकंपात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली ....
तर ह्या भृगु ला आणि त्याचे वाचन करणाऱ्या प्रकांड पंडितांना याची चाहूल हि लागली नवती. म्हणजे अनेकांच्या नशिबात येकदम मृत्यू योग असेल तर कळायला पाहिजे होते ना ?
कि माणसे मेली तरी चालतील पण भृगु चे चेले पैसा मिळाल्याशिवाय काहीच सांगत नाहीत ?
कि मुळात काही माहीतच नसते?
27 Apr 2015 - 9:27 pm | रामपुरी
जास्त ताप करून घेऊ नका. असे काही नसते. फक्त एकच नाडी खरी- विजारीतली.
सोपी गोष्ट आहे... आत्तापर्यंतची जगाची लोकसंख्या ८ अब्ज धरा. एका माणसाच्या नाडीचा (विजारीतल्या नव्हे) आकार x ८ अब्ज एवढी जागा नाड्या साठवायला लागेल. करा हिशोब. यात अजून पुढे येणारी लोकसंख्या धरलेली नाही.
आता नाडीवाल्यानी तुमच्या प्रश्नाला उत्तर काय दिलंय पहा "तुम्ही अभ्यास करा". म्हणजे तुम्ही नाड्यांच्या दुकानात जा, तिथे पैसे भरा मग तुम्हाला कळेल (कि हे सगळे खोटे आहे). आता समजली यातली मेख?
तस्मात, दुर्लक्ष करा. मी तरी असल्या धाग्यांवर प्रतिसाद वाचायला येतो. पण हल्ली सगळेच दुर्लक्ष करतात असं दिसतंय. काय मज्जा र्हायली नाय.
27 Apr 2015 - 10:25 pm | शशिकांत ओक
दुर्लक्ष करा.
जे नाडी ग्रंथ भविष्य विषयावर माहिती, वाचन करू इच्छितात ते आपल्या सारख्यांच्या विचारणांकडे दुर्लक्ष करून आपला सल्ला मानतात.
आपण मात्र आपल्या सल्ल्याची ऐशी की तैशी करत 'तरी मी असल्या धाग्यावर प्रतिसाद वाचायला येतो' म्हणता. कारण आपल्या सारख्यांना या विषयाचे विपरीत आकर्षण वाटते.
26 Apr 2015 - 9:44 pm | शशिकांत ओक
असते कि नसते या वर भाष्य करायला आपण या ग्रंथाचा अभ्यास करावा. जगात मृत्यू ठरलेला असतो त्याची माहिती करून देणे योग्य किंवा अयोग्य हे नाडी ग्रंथ कर्त्या महर्षींनी ठरवायचे आहे. आपल्याला ते मान्य नसेल तर ते आपले वैयक्तिक मत आहे.
26 Apr 2015 - 9:50 pm | शशिकांत ओक
माझ्या हँडसेट वर दिसत नाही. Plugin not supported असे लिहून येते आहे इतरांना दिसत आहे काय?
27 Apr 2015 - 6:59 pm | योगविवेक
नेपाळ सध्या धरणीकंपाच्या कचाट्यात आहे. एक महिन्यापुर्वी 23 ते 26 मार्चमधे आम्ही काठमांडौला असताना घेतलेल्या काही फोटोत ज्या इमारती पाहिल्या होत्या त्यांची विदारक चित्रे आजकाल पेपरमधे पाहून मन विषण्ण होते आहे...
१. दरबार हॉल - एका झाडाच्या काष्ठापासून तयार केलेल्या या वास्तूवरून काष्ठमंडप? - 'काठमांडौ' हे नाव पडले म्हणतात. ओकसर व सानु थापा पुढील भेटीविषयी चर्चा करताना..
२. त्रिचंद्र कॉलेजजवळचा क्लॉक टॉवर इथे मी व ओकसर प्रो. शरणांना भेटायला गेलो होतो... आता कसा उभा आहे न कळे!
३. सुरईत काय आहे? भारत पुस्तकालयापाशी ही मर्कटाची मुर्ती भगव्या वस्त्रात काय करते आहे हा प्रश्न पडतो. ती तरी शाबूत आहे कि नाही शंका आहे.
४. म्हणतात पशुपती नाथाच्या मंदिरातील अशा काही इमारतींना बरेच नुकसान झाले आहे...
27 Apr 2015 - 11:16 pm | हेमन्त वाघे
रामपुरी खुश झालो.
ओंक असे आहे कि सर्व भविष्यवेत्ते मोठ्या प्रमाणात मरणाचे भाकीत अचूक का करीत नाहीत ? म्हणजे सर्व कुटुंबात जर अपघातात तहात होणार असेल तर सर्वांचा येकच मृत्युयोग द्रीसेल . पण असे भाकीत मी कधी आईक्ले नाही, तीच गोष्ट मोठ्या आपत्तीची ... इकडेच हे थोतांड उग्डे पडते.
28 Apr 2015 - 11:05 am | काळा पहाड
जे काम करतायत त्यांना करू देत ना, तुम्हाला काय पडलीय? तुम्हाला जबरदस्तीनं तर वाचून दाखवंत नाहीयेत ना नाडी? बाकी उथळ पाण्यालाच फार खळखळाट असतो असं म्हणतात. अतींद्रीय शक्तींवर संशोधन करणारे पदार्थ विज्ञानातील संशोधक ज्यावेळी हे थोतांड आहे हे सिद्ध करतील त्यावेळी साजरा करा शिमगा. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत (किंवा हे तुम्ही करत नाही तोपर्यंत) याला थोतांड म्हणायचा 'अधिकार' तुम्हाला नाही. अधिकार हा मिळवावा लागतो. उगीच विद्रोही साहित्य संमेलनात हजेरी लावून आणि खळ्ळ खट्याक करण्यापर्यंतच ज्यांच्या बुद्धीची दौड आहे त्यांनी तो घेण्याचा यत्न करू नये.
ता.क. जरा शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करा. जमलं तर.
4 May 2015 - 11:45 pm | सतिश गावडे
डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेल्या लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकात डॉ. दाभोलकर, जयंत नारळीकर आणि ओक काका यांच्यातील नाडीग्रंथाच्या सत्य-असत्यतेविषयी झालेला पत्रव्यवहार तसेच त्याअनुषंगाने इतर सविस्तर माहिती एका स्वतंत्र प्रकरणात दिली आहे.
जरुर वाचा.
5 May 2015 - 4:31 pm | प्रचेतस
:)
5 May 2015 - 4:40 pm | टवाळ कार्टा
:)
28 Apr 2015 - 10:44 am | शशिकांत ओक
आपल्या विचारांना.
2 May 2015 - 7:16 pm | योगविवेक
ओक सर, आपण ज्यांना ज्यांना भेटलो, ते लोक व त्यांची घरे, इमारती सर्व सुरक्षित आहेत असे सानूंनी ईमेल करून कळवले आहे...
3 May 2015 - 12:27 pm | प्रकाश घाटपांडे
अनुभूतीच्या शोधार्थ अशी प्रवासयात्रा करणे हा काही लोकांना आतून आलेली उर्मी असते. आपण त्याला छंद म्हणतो. नाडीग्रंथ भृगुसंहिता यावरची माझी मते व लेखन बहुसंख्यांना माहित आहे. इथे ती सापडतील देखील. पण एक वेगळा अनुभव घेउन आल्याबद्दल टीमचे, विशेषतः ओकांचे कौतुक
3 May 2015 - 1:27 pm | तिमा
आपल्याला जे आज माहित नाही, ते नसतेच असा विचार करुन मनाची दारे बंद करु नयेत. पटत नसेल तर वाचू नये. पण कुठलाही स्वार्थ नसताना कोणी जर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर टीका करु नये.
माझा ओक साहेबांच्या सिन्सिअॅरिटीवर प्रचंड विश्वास आहे.
11 Jun 2015 - 2:09 pm | कंजूस
हा भाग वाचनातून निसटलाच होता.अमुल्य फोटो आहेत.ज्या लोकांनी या तीन चारशे वर्षे जुन्या पोथ्यांचे जतन केले त्यांचे कौतुकच केले पाहिजे.चारपाच हजार वर्षांपुर्वीच्या संस्कृतीत ग्रह ताय्रांचे निरीक्षण आणि ग्रहणे अचूक वर्तवली जात होती तरी त्यांना स्वत:चा ह्रास थांबवता आला नाही मग भृगु संहिता ,नाडीग्रंथोपासक भूकंप होणार हे सांगू शकले नाहीत म्हणजे एक थोतांड आहे हे म्हणणे हास्यास्पद वाटत नाही काय? आम्ही नेहमीच ओरड करतो परकीयांनी आमची नालंदा नष्ट केली,काहींनी ग्रंथ चोरून त्यांची संग्राहलये सजवली.झाले ते झाले आता कुठे काही उरले असेल तर तेही शोध घेऊन जतन करायचे नाही का?त्यातल्या भाकितांच्या खय्रा खोट्याची चर्चा करून सत्य शोधणे काहींना फार महत्त्वाचे वाटते आहे.मुळात अशा ग्रंथांचा शोध घेणे आणि त्याची नोंद घेणे अधिक प्रशंसनीय आहे.
Updated
11 Jun 2015 - 5:55 pm | मूकवाचक
+!
11 Jun 2015 - 5:00 pm | योगविवेक
कंजूस सर,
आपल्या नजरेतून हा धागा सुटला होता. आपण असे प्रांजळपणे म्हणून पुढे दिलेली मन मोकळी दाद वाचून आनंद झाला.
नाडीग्रंथोपासक भुकंप होणार सांगू शकले नाही आदि ओरडीला आपण भाव दिला नाहीत तेही योग्यच... असो.
11 Jun 2015 - 6:04 pm | योगविवेक
काहींनी डॉ दाभोळकरांच्या वरील पुस्तकाचा संदर्भ देऊन त्यावर ओकांचे मत काय? अशी गर्भितार्थांने विचारणा केली होती.
माझ्या माहितीप्रमाणे ओकसरांना कै. डॉ दाभोळकरांच्या जीवनभर निस्वार्थपणे केलेल्या कार्याबद्दल फार आदरभाव आहे. त्यांनी बोध अंधश्रद्धेचा पुस्तकाची प्रत साधनाच्या कार्यालयात जाऊन दिली होती. अंनिसने नाडीग्रंथांविरुद्ध कामाला लावलेले प्रकाश घाटपांडे व कै. रिसबुडांनीही ते पुस्तक वाचले होते. त्या सर्वांनी 'बोध अंधश्रद्धेचा' पुस्तक वाचल्याचा उल्लेख ही केला होता. पण त्यांनी जे मुद्दे ओकांशी अनेक महिने पत्रव्यवहार करून मांडलेले तेच तेच जुने पुराणे म्हणणे पुन्हा 'लढे' पुस्तकात मधे रंगवले होते.
मी लढे अंधश्रद्धेचे पुस्तक संपूर्ण वाचलेले नाही. फक्त ओकांच्या बाबतीतील प्रकरणाची पूर्ण झेरॉक्स एका कार्यळाशाळेच्या वेळी वाचली आहे.
आम्ही देऊ त्या १० ठशांचे नाडी भविष्य ओकांनी मद्रासहून शोधून आम्हाला पाठवावे. आपल्याकडून माहिती काढून आपल्याला तीच नाडीपट्टीतून आल्याचे भासवतात. कार्बन १४ टेस्ट करायला ओकांनी नाडीपट्टीचे नमुने अंनिस समोर हजर करावेत. ओंकार पाटीलांनी प्रत्यक्ष भेट घेऊन केलेल्या शोधाने आमची खात्री झाली आहे की नाडी पट्टीत व्यक्तीचे नाव कोरलेले असते असे नसते. आम्हाला ताडपत्रातील भाषा व लिपी वाचता येत नाही ती वाचायची सोय ओकांनी करावी आदि विचार वाचल्याचे आठवते.
माझ्या माहितीप्रमाणे या सर्व प्रश्नांची उत्तरे बोध अंधश्रद्धा पुस्तकातून दिले गेली आहेत. पण त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करून असे भासवून जणु काही आमचे मुद्दे अनुत्तरित आहेत असे त्यांच्या वाचकांना वाटावे असे म्हणून पुन्हा तीच फुटकी रेकॉर्ड लढे अंधश्रद्धेचे मधे वाजवल्याची टीका एक नाडी ग्रंथ प्रेमी व प्रकाश घाटपांड्यांचे मित्र प्रकाश पेंडसे यांनी नाडीग्रंथांवर आयोजित एका कार्यशाळेत दिलेल्या मुलाखतीत वर्णन केली आहे. त्याच्या व्हीडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत. इच्छुकांना पहायच्या असतील तर ओकसरांशी संपर्क करावा.