अकादमी 9 :- अंतिम पग

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in जनातलं, मनातलं
26 Apr 2015 - 1:47 pm

==========================================================

==========================================================

ऑब्स्टकल एंड रुट मार्च झाल्यावर एक दिवस आमची रिटन टेस्ट झाली, मुल्की कायदे, सीमावर्ती राज्यांची संस्कृती, अर्थकारण इत्यादी विषयांचे पेपर्स झाले, नाही म्हणले तरी ती एक परीक्षाच होती, आजवर शिकवलेले सारे विषय फारच नवीन वाटत होते कारण जास्ती करून आम्ही ह्या सब्जेक्ट लेक्चर मधे डोळे उघडे ठेऊन झोप काढायचो. तेव्हा मदतीला आले ते आमच्या मित्रांचे पदवी ज्ञान अन लोकेशन, पुनीत आम्हाला अर्थशास्त्र शिकवे, गौड़ा कायदा, गुरुंग अन सांगे उत्तर भारतीय सीमावर्ती क्षेत्रांची माहिती देत असत अन माझ्या सारखे गुड फॉर नथिंग "बीएससी" आइटम ती भक्तिभावे टीपुन घेत असु, अश्याच प्रकारे फायरिंग टेस्ट ही पार पडली, अन शेवटी उगावला तो रिजल्ट चा दिवस. मी केलेल्या तूफ़ान मकऱ्यांमुळे मला काही रँक वगैरे यायची अपेक्षा नव्हती , त्यामुळे रॅट रेसिंग न करता आम्ही फ़क्त टेस्ट्स देत होतो. आमच्या पुर्ण बॅच मधे घासु असे ठरवून कोणीच नव्हते ! अन्ना सारखे जे बुद्धिजीवी होते त्यांना ही ट्रेनिंग ने कम्पलीट बदलून टाकले होते. रिजल्ट आमचा अनपेक्षित होता इंडिविजुअल टेस्ट्स मधे मी पाचवा होतो अन गृप टेस्ट ला आमची कंपनी सेकंड होती. थोडक्यात आम्ही सगळे कमीअधिक अंतराने पास झालो होतो. 35 च्या बॅच मधे मी 5 वा होतो. टॉपर पुनीत , सेकंड मोसाय, थर्ड गिल, फोर्थ समीर, अन्ना अन सांगे 8 वर टाई कीश्या 7 अन गौड़ा 9 . टॉप 10 ला नऊ आम्हीच होतो, रिजल्ट नोटिस बोर्ड वर डिक्लेअर झाला अन सोबत आम्हाला पोस्ट लंच फॉल इन ची ऑर्डर ही आली. मस्त लंच झाल्यावर आम्ही फॉल इन झालो अन ऑडिटोरियम ला पोचलो तेव्हा विक्रम सर तिथे आले. आपल्या छोट्याश्या एड्रेस मधे त्यांनी आम्हाला सर्वांना शुभेच्छा दिल्या अन पुढे म्हणाले

"बॉयज अब तयारी शुरू होगी पास आउट परेड की, पास आउट परेड मतलब जो कुछ तुमने सीखा है उसे तुम्हारे माता पिता के समक्ष पेश करना, बोहोत ख़ास दिन होता है ये जब मातापिता दोनों दो साइड खड़े हो कर के आपके कंधे पर स्टार सजायेंगे, तुम सिविल लाइफ में अपने अंतिम पग लोगे और जिंदगी सेवा में झोक दोगे, जनरली जो टॉपर्स होते है वो परेड कमांडर और डेप्युटी परेड कमांडर होते है, पर एक और काम है , एक प्रेजेंटेशन होगा, इस दीक्षांत समारोह में एक मॉक ड्रिल भी होगा, एक एम्बुश दिखाया जायेगा जिसके एन्ड में तिरंगी फ्लेयर फायर किये जायेंगे, परेड खुबसूरत बनाने के लिये इसकी खुब जरूरत है पर उसमे मेहनत भी डबल है. अब जैसे ट्रेडिशन है परेड कमांडर होगा पुनीत शुक्ला और डेप्युटी परेड कमांडर होगा सुदीप्तो सेन उर्फ़ अपना मोसाय, अब मैं आपको पाच मिनट देता हूँ, आप अपने में से बेहतरीन 6 लडाखे चुनो जो एम्बुश प्रेजेंटेशन देंगे"

मी शांत बसुन कोण भारी एम्बुश करेल हा विचार करतच होतो तोवर माझा पलीकडे बसलेला पुनीत अन समोर बसलेला मोसाय ताड़कन उभे राहिले,

"सर, हमको जिसने दोस्त बनाया सबके साथ दोस्ती से रहा , सबको हँसाता रहा , सर एम्बुश पार्टी लीड करेगा अपना रगड़ोत्तम भारती बापुसहेब" पुनीत

"सर हाम बी वही सोचताय" मोसाय

मी उगीच अवघडून बसलो , मला टेंशन आले होते! आईबाबां समोर प्रेजेंटेशन द्यायचे!!

"किसीको कोई आपत्ती?"

आपापल्या कंपनीज सोबत काही सेकंड मधे डिस्कशन करुन गुरुंग , मोसाय, गिल, गौड़ा , सांगे एकसुरात म्हणाले

"नो सर कोई आपत्ती नहीं है" अन जगमित्र नाम्या बापूसाहेब "प्रेजेंटेशन पार्टी" चा लीडर झाला पुढे सर्वमताने पार्टी डीसाइड झाली ती म्हणजे

1 मी
2 समीर
3 गुरुंग
4 अन्ना
5 किश्या
6 गिरीश यादव

आमच्या पैकी गुरंग सोडुन कोणीच कंपनी कमांडर नव्हते सो आम्हाला एम्बुश करताना पुढल्या परेड ला लीड करायचे टेंशन नव्हते.

आता आमचे डेली रूटीन बदलले, रोज पहाटे उठणे, रनिंग करून झाले की पहाटे 6 ते 0830 ड्रिल प्रैक्टिस, ती झाली की ब्रेकफास्ट, त्या नंतर लंच पर्यंत इतर लोकांस वेपन साफ़ सफाई ला कोत ला बसवत अन आम्ही एम्बुश ची प्रैक्टिस करत असु, चीफ गेस्ट म्हणुन आमचे डायरेक्टर जनरल येणार होते, ते कुठे बसतील, विजिटर गैलरी कुठली असेल , आम्ही कुठे कसे एंटर करू, पुनीत अन मोसाय कुठे उभे असतील इत्यादी आम्ही पहिले समजून घेतले, ते घेतल्यावर मग आमची करवाई काय असेल ते समजवले गेले, जनरल रूपरेषा काहीशी अशी होती

प्रथम आम्ही पासआउट चा सेरेमोनियल ड्रेस घालून "निरिक्षण" ला उभे राहणार, ओपन जिप्सी मधुन डीजी इंस्पेक्शन झाले की आम्ही एम्बुश वाले , गेस्ट स्थानापन्न होईस्तोवर पासआउट परेड च्या मागे असलेल्या तटबंदी टाइप बंधकामाच्या मागे जाणार तिकडे मोजुन 8 मिनट होते हाती, तेवढ्यात camouflage चढवून तयार राहणार, तोवर अद्जुडेँट साहेब वेलकम एड्रेस देणार, तो झाला की आमचे नाव पुकारले जाणार, मग आम्ही ठरवल्या प्रमाणे प्रेजेंटेशन देणार, ते होऊन आम्ही परत चेंज ला गेलो की डेप्युटी अद्जुडेँट साहेब "कोर्स रिव्यु" देणार (परत 8 मिनट) आता आम्ही परत चेंज करून आमच्या कंपनी मधे फॉलइन होणार, ते झाले की आम्ही विश्राम होणार, मग चीफ गेस्ट चा एड्रेस, स्टार्स अन स्पोर्ट्स अकडेमिक्स वगैरे ची अवॉर्ड्स डिस्ट्रीब्यूशन चा कार्यक्रम, तो झाला की मंचा समोरून सलामी देत परेड अन तो संपला की "अंतिम पग" टाइल क्रॉस करणे, ते क्रॉस झाले की 5 मिनट मधे आमचे पालक आमच्या खांद्यांवर स्टार्स ची पट्टी जोडणार, ते झाले की त्याच्याच बाजूला असलेल्या amphitheater ला आम्ही हाइट नुसार उभे राहणार मग एकसुरात भारताचे संविधान अन महामहिम राष्ट्रपती महोदय ह्यांना एकनिष्ठ रहायची शपथ ,अन मग आयुष्यात पहिल्यांदा घातलेली पीक्ड कॅप टॉस करायचा सेरेमनी, मग आम्ही मोकळे. असा एकंदरित कार्यक्रम होता.

ह्याच रूटीन ची भयानक परफेक्शन ने प्रैक्टिस आम्ही करत असु. पहिल्या दिवशी टाइमिंग जरा गड़बड़ झाले (27 सेकंड लेट) तर आम्ही सारे एम्बुश पार्टी वाले रगड्याचे धनी झालो, नंतर एक दिवस ऑर्डर द्यायला मोसाय चुकला तर त्याला अन उर्वरित ट्रूप ला रगड़ा!. असे एकंदरित चालले होते, एखाद्याला अवॉर्ड मिळाल्यास त्याने फॉलआउट कसे व्हायचे , गेस्ट ला ग्रीट कसे करायचे हाती दिलेले स्टार्स/अवार्ड नजर न हलवता शेजारी उभे असलेल्या बड़े उस्तादजी च्या हाती कसे द्यायचे, ह्याची प्रैक्टिस ही होत असे,

पहिल्या दिवशी तर मला विजिटर गैलरी मधे आई बाबा दिसायला लागले होते, अन मी विचलित होऊन चुकलो होतो, तेव्हा बड़े उस्ताद समजावत म्हणाले

"बेटा पैदा करनेवाली है वो, उसके सामने ऐसे कमजोर होंगे तो हमलोग को बड़ा करनेवाली के लिए ड्यूटी कैसे करेंगे? ध्यान लगा बापूसाहेब, गलती नहीं होनी चाहिए"

डोक्यात त्या वाक्यांनी लख्ख प्रकाश पडला होता अन प्रवास सुरु झाला तो परफेक्शन च्या दिशेने,आमच्या घरी लेटर्स गेली होती, अतिशय मानाने देशासाठी पोटची पोरे देणाऱ्या आमच्या आई बापाला पासआउट परेड ला हजर राहयची "रिक्वेस्ट" केली गेली होती, now it was our job to put on a good show, अन शेवटी तो सोन्याचा दिवस उजाडला....

मला, सांगे ला, पुनीत ला अन समीर ला प्रैक्टिस झाल्यावर बड़े उस्ताद ने सांगितले

"तुम चार दौड़ के अपने गेस्ट हाउस जाओ और अपने पेरेंट्स की व्यवस्था ठीक करवाओ"

तो क्षण, रेलवे स्टेशन आठवले घरचे, बाबांचे शब्द,

"जा मागे वळून पाहू नकोस, निरोप घेणे कठीण होते...."

"नीट रहा जितका व्यायाम करशील तितके खात जा..."

गेस्टहाउस ला रूम नंबर 5 ला मी पोचलो तेव्हा मी चेंज करून आमचे ब्लेजर घातले होते, पॉश अश्या त्या खोलीत माझे बाबा अन आई अवघडून बसले होते, मी आत गेलो, अन आई ला म्हणालो

"आई, कशी आहेस ग!?"
लगबगीत ती अन बाबा उठले, मी सरळ पाय धरले त्यांचे तसे बाबा म्हणाले
"बाळ आज अण्णा असते तर खुप गर्व वाटला असता त्यांना" अन मी दोघांना कव घातली, कारण शब्द संपले होते!.
थोड़ी विचारपुस झाली तेव्हा मला समजले स्टेशन ला स्वतः शर्मा उस्ताद त्याना रिसीव करायला गेले होते, अत्यंत मानाने त्यांना आणले गेले होते, तो मान त्यांच्यासाठी मी कमवला आहे ही फीलिंग फार जबरदस्त होती.

थोडावेळ बोलत बसलो तसा हळूच दारात सांगे दिसला, त्याच्या मागोमाग पुनीत अन समीर

"मे आय कम इन बापूसाहेब?"

"अरे तुम लोग,आओ आओ"

आईबाबांच्या पाया पडले ते, मी ओळख करून दिली

"आई बाबा हे माझे भाऊ, हा समीर हरयाणा चा आहे, हा पुनीत कानपूर चा, हा नेमा सांगे हा सिक्किम चा बरका"

मोठ्या अप्रुपाने दोघे त्यांना बघत होते, बाबांनी हळूच विचारले

"सांगे ला हिंदी समजते न रे?"

गडगड़ाटी हसु आले मला तेव्हा पहिली मैत्री आठवली आमची!

"हो ! अहो तुमच्या माझ्यासारखा भारतीय आहे तो!"

मग ते लोक माझ्या मित्रांशी बोलत बसले, आई म्हणाली

"बेटा इसने किसीको परेशान नहीं किया ना"

"नहीं आंटीजी ये और हम सबको साथ में परेशान करते थे" समीर बोलला!

त्यांची व्यवस्था करुन मी बाकीच्या पेरेंट्स ना भेटलो, अन परत आपापल्या कामाला लागलो होतो

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सेरेमोनियल ड्रेस मधे तटबंदी मागे उभे होतो, अन गढ़ी च्या दारा सारखे ते मोठे दार उघडले, पुनीत चा खणखणीत आवाज उमटला

"परेडsssssssबाए सेsssss तेजsssss चलss" एक साथ कदम से कदम आम्ही बाहेर पडलो, अन विजिटर गैलरी मधल्या लोकांनी जल्लोष केला,

"परेडssss थमsssss" नेमक्या जागेवर आम्ही उभे होतो, तेवढ्यात चीफगेस्ट आले, अन पोडियम वर उभे राहिले, तेव्हा एक ओपन जिप्सी आली , त्यात गेस्ट, मागे अद्जुडेँट सर सोर्ड घेऊन उभे राहिले, मग आमच्या परेड चे निरिक्षण झाले, ते परत जागेवर गेले तेव्हा आम्ही एम्बुश वाले फॉलआउट होऊन मागच्या मागे चेंज करायला पोचलो होतो तेव्हा अद्जुडेन्ट सरांचा ओपनिंग एड्रेस सुरु होता, तो झाल्यावर सूत्रसंचालन करणारे विक्रम सर म्हणाले

"अब आपके सामने फ़ोर्स के कॉम्बैट स्किल्स का एक प्रेजेंटेशन होगा, प्रेजेंटेशन लीड कर रहे है ओसी बापुसहेब, साथ में है ओसी समीर सांगवान, ओसी तेजु गुरुंग, ओसी गिरीश यादव, ओसी किशोर उमरीकर, ओसी एस दिवाकर.

आम्ही आमची प्रत्यक्षिके सुरु केली, धावत येऊन धावा पोजीशन , ती घेतली की मग बेनट फाइटिंग चे वेगवेगळे हात अन शेवटी चार दिशाना तोंड करुन क्राउच पोजीशन मधे समीर गुरुंग अन्ना अन कीश्या त्या घेर्यात जमिनीवर क्राउच झालेला गिरीश अन मधे उभा मी , मी हाती आडवी राइफल घेऊन

"धावाssssssआsssआsssss"

केले तेव्हा समोरच्या तिघांनी फ्लेयर्स उघडली अन सुंदर तिरंगी धुर निघायला सुरुवात झाली, अन टाळ्याचा कड़कड़ाट झाला, आता आम्ही चेंज करुन येईस्तोवर विक्रम सर "कोर्स रिव्यु" देत होते, कोर्स कसा सुरु झाला, टीम्स ची प्रोग्रेस , काय शिकवले इत्यादी त्यांनी सांगितले तोवर आम्ही चेंज करून परत फॉलइन झालो होतो, फॉलइन होताच आम्हाला पुनीत ने विश्राम केले, परत सावधान केले अन गेस्ट सरांचा एड्रेस सुरु झाला,भारतापुढली बॉर्डर सिक्यूरिटी चैलेंजेज , प्रोब्लेम्स, फ़ोर्स ची ट्रेडिशन वगैरे सांगून झाल्यावर ते पोडियम ला उभे राहिले, आता एक एक ओसी ला बोलवुन स्टार्स अन त्याने जिंकलेले अवॉर्ड्स दिले जाऊ लागले, त्याच वेळी माझे नाव पुकारले गेले, विक्रम सर माझे "रिपोर्ट कार्ड" वाचत होते

"ओसी बापूसाहेब, आयडी नंबर xxxxx, मॅपरीडिंग फील्ड एक्सरसाइज के दौरान और रुटमार्च नाईट एक्सरसाइज के दौरान अद्वितीय नेतृत्वगुण के प्रदर्शन के लिए , अद्जुडेँट रिबन "

मी फॉल आउट झालो, मार्च करत गेस्ट कड़े आलो, सावधान करून एक कड़क सलूट घातला तितकाच कड़क रिप्लाई आला, बाजूला उभ्या बड़े उस्ताद ने मखमली ट्रे पुढे केला, त्यात असलेला स्टार्स चा छोटा डबा त्यांनी मला दिला मी तो नजर न ढळु देता परत उस्तादजी ला दिला मग रिबन दिली ती सुद्धा तशीच परत दिली. मग परत जाउन फॉलइन झालो , अन त्या सोनेरी दिवसाचा सुवर्ण क्षण आला, परत एकदा पुनीत चा आवाज गरजला

"परेडsssssss मंच के सामने से सलामी देते हुए आगे बढ़ेगाssss तेज चलssss"

पोलिस बैंड च्या "सारे जहाँ से अच्छा" वर आम्ही लयबद्ध कदम टाकत सलामी दिली, अन 3-3 च्या ओळित आस्तेकदम "अंतिम पग" ची टाइल क्रॉस केली, आजवर परेड ग्राउंड मधे येताजाता ती टाइल कोणीही क्रॉस करायची नाही असा कड़क दंडक होता, ती टाइल आजसाठी राखीव होती, ती आम्ही पार केली होती, सिविलियन आयुष्यातले शेवटचे पाऊल टाकून आम्ही आमच्या नव्या लाइफ चे पहिले पाऊल टाकले होते. झटपट आईबाबांनी त्यांना सुपुर्त केले गेलेले स्टार माझ्या खांद्यावर चढवले, अन बाबांनी खांद्यावर थाप मारली,

"जा शपथ घे, ट्रेनिंग पुर्ण कर" विलक्षण गर्वाने मी amphitheater ला पोचलो, तिथे आम्ही सावधान मधे उभे झालो, माधोमध विक्रमसर झेंडा घेऊन उभे होते, अन अद्जुडेँट साहेबांनी शपथ "अडमिनिस्टर" करायला सुरुवात झाली आम्ही त्यांच्या मागोमाग एक एक वाक्य बोलु लागलो,

***"In the name of the President of the Soverign Socialist Secular Democratic Republic of India....

.....till I draw my last breath"

ओथ घेऊन 4 सेकंड झाले असतील तोवर आम्ही अंतःप्रेरणेने एकाचवेळी विलक्षण ओरडा करत कॅप्स टॉस केल्या, तो शेवटचा क्षण होता , तो क्षण आम्हाला जणू सांगत होता,

"हा तुमचा indiscipline मधला शेवटचा क्षण, टोप्या उड़वा ओरडा, काय वाटेल ते करुन घ्या one last time in this life"

वर टॉस केलेल्या कॅप्स झेलून आम्ही परत डोक्यावर ठेवल्या अन आवेगाने एकमेकांना मिठ्या मारू लागलो!! एक एक क्षण आठवत होता आम्हाला

"बाई आमारा मग फ्लोर पे पड़ती"

"हैलो दोस्त मैं पुनीत"

"मेरा एक भाई है elder brother"

"सर हमसे नहीं होतायsssss"

अन असेच अगणित क्षण!!

त्यानंतर आम्ही आमच्या पेरेंट्स अन मित्रांच्या पेरेंट्स ना भेटलो, सगळ्यांचे पेरेंट्स गोल करून उभे असताना मधे आम्ही 9 पोरे होतो, मी ओरडलो

"ओसी रगड़ाssss" लगेच पोरांनी वाकुन् पुशप सुरु केल्या!!! 1 2 3 ..... 10

मग उभे राहून जल्लोष!! हे कौतिक पहायला आई वडला सोबत उस्तादजी ही उभे होते सगळे

त्यांना पाहताच आम्ही धावलो बड़े उस्ताद च्या पाया पडायला मी झेपावलो तो त्यांनी मला मधेच अडवले अन शेवटचा धड़ा दिला,
"अरे नहीं नहीं साबजी अब आप झुकना नहीं, कंधे पर स्टार्स है आपके, आपकी और आपके देश की शान है वो, आपके नागरिको का भरोसा है वो, झुकाना नहीं....."

असे म्हणत बड़े उस्तादजी अन इतर उस्तादांनी चक्क आम्हाला सलूट केले आम्ही विलक्षण अवघड़लो , तेव्हा बड़े उस्ताद पुढे बोलले

"....अब आप अफसर है साहब , आप पासआउट हो चुके है और हम उस्ताद लोग आपके जूनियर्स, ट्रेनिंग में कुछ बोल दिया हो तो यही ग्राउंड पे छोड़ कर जाइए साहब, मन छोटा नहीं करना, कड़े अफसर बनाने के लिए बोल भी कड़े रखने पड़ते है साहब...जय हिंद"

मला अरुणाचल ला पोस्टिंग मिळाले होते, बाकी लोकांना ही कुठे कुठे पोस्टिंग लागली होती,संध्याकाळी डिनर चा फक्कड़ इंतजाम होता पण घास उतरत नव्हता, डिनर नंतर आई बाबांना गेस्टहाउस ला सोडून आम्ही मेस ला जमलो, आज अधिकारी म्हणून राजरोस रम चे लार्ज घेऊन 9 लोक बसलो, शांतपणे घुटके घेत गप्पा केल्या अन आपापल्या खोल्यांत झोपलो, सकाळी लवकर मी आईबाबा सोबत निघणार होतो 10 दिवस घरी मग पोस्टिंग ला पळायचे होते. पुनीत , समीर, सांगे अन कीश्या संध्याकाळीच निघाले होते त्यांना सी ऑफ़ करताना आम्ही सगळे अनावर रडलो होतो, कारण ड्यूटी च्या नादात आता मित्र परत कधी भेटतील काही खरे नव्हते, सकाळी मी निघायच्या आधी मी गिल, मोसाय, गौड़ा, अण्णा, गुरुंग अन गिरीश ला असाच भेटलो, निग्रहाने पोरांना सांगितले गेट पर्यन्त येऊ नका, जिप्सी आली सामान लोड झाले, आई बाबा मागे बसले मी समोर , मेन गेट पाशी आलो तसे मी जिप्सी थांबवली , खाली उतरलो एकदा अकादमी डोळे भरून पाहिली, ओलसर डोळ्यांनी परत गाडी बसलो,गाडी स्टेशन कड़े निघाली तेव्हा मी डोळे मिटुन बसलो होतो, चेहऱ्यावर वारे लागत होते अन कानात शब्द घुमत होते

"मैं सुभेदार भरत नारायण चौधरी.....जात से जाट हूँ.....अब हम एकसाथ पैलेस जाएंगे"

आयुष्याचा एक विलक्षण काळ स्मृतीत सोनेरी अक्षरात छापला गेला होता, मी एक अधिकारी झालो होतो.

(लेखनसीमा) बाप्या

*** ती शपथ ते शब्द परमपवित्र असतात, ते एकदाच उच्चारायचे असतात नंतर ते उच्चारायचे लिहायचे नसतात, म्हणुन पुर्ण शपथ दिली नाहिए, क्षमस्व!.

कथाअनुभव

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 2:00 pm | टवाळ कार्टा

अप्रतिम

नगरीनिरंजन's picture

26 Apr 2015 - 2:03 pm | नगरीनिरंजन

अप्रतिम लेखमाला!!! लिहील्याबद्दल धन्यवाद!

वगिश's picture

26 Apr 2015 - 2:30 pm | वगिश

अप्रतिम!

जेपी's picture

26 Apr 2015 - 2:32 pm | जेपी

+1

एस's picture

26 Apr 2015 - 2:35 pm | एस

वाह!

लॉरी टांगटूंगकर's picture

26 Apr 2015 - 3:04 pm | लॉरी टांगटूंगकर

_/\_

आतिवास's picture

26 Apr 2015 - 3:11 pm | आतिवास

अप्रतिम लेखमालिका.
लिहिते राहा.

विवेकपटाईत's picture

26 Apr 2015 - 3:27 pm | विवेकपटाईत

आवडली

अद्द्या's picture

26 Apr 2015 - 3:35 pm | अद्द्या

सलाम तुम्हाला . .

आणि हे सगळं सोडून हसत हसत जीव देण्याच्या गोष्टी करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाला आम्ही लायक आहोत का . हा प्रश्न पडतोय . .

परत एकदा .
सलाम . .

आता जमल्यास तुमच्या विविध ठिकाणच्या पोस्टिंगचे . किंवा "अफसर " झाल्यावर आतापर्यंत आलेले सगळे अनुभव पण टाका इथे . .

वात बघतोय पुढील लेखाची

भाग्यश्री कुलकर्णी's picture

26 Apr 2015 - 3:44 pm | भाग्यश्री कुलकर्णी

बापू,पाणी थांबत नाहीये डोळ्यातलं...सलाम फौजीभाय...

अत्यंत सुंदर आणि तंतोतंत वर्णन ! प्रत्येक अधिकाऱ्यांच्या कायम स्मरणात राहणारा प्रत्येक अकादमीच्या प्रशिक्षणातील सर्वौच्च अभिमान आणि आनंदाचा सुवर्ण क्षण . धन्यवाद बापुसाहेब, तुमच्या लिखाणातून परत पासिंग आऊट परेड अनुभवता आली.

अभिमान वाटतो तुमचा आम्हाला _____/\_____

अनुप ढेरे's picture

26 Apr 2015 - 3:59 pm | अनुप ढेरे

आवडली लेखमाला खूप!

आदूबाळ's picture

26 Apr 2015 - 4:19 pm | आदूबाळ

....

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Apr 2015 - 4:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

काय झाले भाई?

बहुगुणी's picture

26 Apr 2015 - 5:43 pm | बहुगुणी

प्रतिसादासाठी शब्द सुचत नाहीत इतकं मन भरून आलं की असं होतं, जसं माझ्यासारख्या कित्येकांचं झालंय इतकी अप्रतिम लेखमाला वाचून.

तुमच्या अनुभवांत आम्हाला सामील करून घेतल्याबद्दल तुम्हाला, आणि आमच्यासाठी प्राण देऊ करणार्‍या तुम्हां सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

श्री's picture

26 Apr 2015 - 7:58 pm | श्री

+१११
_/\_

संदीप डांगे's picture

26 Apr 2015 - 4:59 pm | संदीप डांगे

अप्रतिम. प्रत्येक शब्द सोन्यासारखा लिहला आहे.

ओसी बापुसाहेब, एक कडक सॅल्यूट.

एनसीसी कँपचे दिवस आठवले. सुरुवात ते शेवट असेच होते. तुमचे ११ महिने, आमचे ११ दिवस. तुमच्या या अफाट अनुभवाचा एक लक्षांश भाग अनुभवला असल्याने प्रत्येक घटना मनास भिडून गेली.

तुमची शैली तर अवर्णनीय. असे वेगळे उत्तुंग अनुभव तुमच्या लेखणीतून वारंवार बाहेर पडो. येणार्‍या पिढीला प्रोत्साहित करत राहो अशी प्रार्थना करतो.

मी_आहे_ना's picture

27 Apr 2015 - 3:14 pm | मी_आहे_ना

अगदी अगदी..
बापूसाहेब, कडक सलाम!

लालगरूड's picture

26 Apr 2015 - 5:00 pm | लालगरूड

__/\__
तुमच्यामुळेच आम्ही सुरक्षित जगतोय. #Respect :)

पॉइंट ब्लँक's picture

26 Apr 2015 - 5:17 pm | पॉइंट ब्लँक

मस्त लेखन. कधी कधी वाटत. एक दोन वर्षाची सैन्यातील सेवा सक्तीची करायला हवी भारतात.

प्यारे१'s picture

26 Apr 2015 - 5:22 pm | प्यारे१

अ प्र ति म लेखमाला.
अतिशय सुन्दर चित्रदर्शी लिखाण शैली आणि फर्स्टहॅण्ड अनुभव असल्यानं आलेलं डिटेलिंग.
Heartfelt salute Sir.
(पाउच वाल्या अंडयाच्या वेळी खेचाखेची केल्याबद्दल क्षमस्व)

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Apr 2015 - 5:53 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो काही ही काय! ते उगा काही क्षमा वगैरे नको

llपुण्याचे पेशवेll's picture

14 May 2015 - 3:11 pm | llपुण्याचे पेशवेll

हे पाऊचवालं अंडं म्हणजे एनसीसी मधले का? ड्यूटीच्या वेळेला रेफ्रेशमेंट म्हणून मिळणारे ?

प्रथम म्हात्रे's picture

26 Apr 2015 - 5:26 pm | प्रथम म्हात्रे

सैल्यूट...

Dhananjay Borgaonkar's picture

26 Apr 2015 - 5:27 pm | Dhananjay Borgaonkar

फार भारी झालीये लेखमाला. मला मी पाहिलेली एन.डी.ए ची पी.ओ.पी आठवली.
एखादा कड्क युनिफॉर्म् मधला फोटो पाठवाल का?
तुमच्या देशसेवेला प्रणाम आणि शुभेच्छा.

ही लेखमाला इथेच थाबवु नका.आर्म्ड फोर्सेसच्या अजुनही गोष्टी शेअर करा.

पियुशा's picture

26 Apr 2015 - 5:48 pm | पियुशा

एक कड्डक सॅल्यूट :)

पैसा's picture

26 Apr 2015 - 5:55 pm | पैसा

प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट असतो हे माहीत असलं तरी तो शेवट आला की गलबलून जाणे चुकत नाही. खूप सुरेख, अगदी मनाच्या तळापासून लिहिलं आहेस, पोचलं थेटपर्यंत. जमेल तसं अजूनही लिहीत रहा!

तुषार काळभोर's picture

27 Apr 2015 - 2:48 pm | तुषार काळभोर

फार कमी वेळा असं आंतरजालावर गलबलून येतं!

नाखु's picture

28 Apr 2015 - 10:43 am | नाखु

हेलावणारे अस्सल लिखाण.

या अनुभव कथनात निर्लेप खरेपणा आणि साधेपण एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.

बाप्पूसो आता तुमच्या दर्जेदार लेखनाकडे लोकांच्या अपेक्षा उत्तरोत्तर वाढतील इतकी ही सुरेल आणि अनवट लेख्-माला आहे.

किमान २ वर्षेतरी सैन्य प्रशि़क्षण दिलेच पाहिजे (विद्द्यार्थी दशेत) याबाबत असे वारंवार वाटत असलेला.

ता.क. ज्या मिपाकरांना आपल्या पाल्यांना दहावी-बारावी नंतर सैन्य तत्सम सेवेत दाखल करायचे असेल तर एखादी लेखमाला चालू करू शकाल काय. तसे सैन्यसंबधीत बरेच जेश्ठ मिपाकर आहेतच. ही विनंती आहे.

नूतन सावंत's picture

26 Apr 2015 - 5:59 pm | नूतन सावंत

मुशीतून तावून सुलाखून निघणारया शब्दांचे गारूड उतरणे कठीण आहे.शब्दच सुचत नाहीत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2015 - 6:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम लेखमाला !

या भागातला आईवडीलांच्या अकादमीतल्या प्रथम भेटीचा प्रसंग आणि पास आऊट झाल्यानंतरच्या वस्तांदांबरोबरचा प्रसंग खास आवडले !

ब्राव्हो !!!

अत्रन्गि पाउस's picture

26 Apr 2015 - 6:03 pm | अत्रन्गि पाउस

आम्हा देशवासीयांची तुमच्या सारखे सैनिकी अधिकारी आमच्यासाठी असण्याची लायकी नाही ... आणि हे तरीही तुम्ही अत्यंत निस्सीम देशप्रेमाने आणि कडक शिस्तीने आपली कर्तव्ये पार पडता ...एकदा नाही त्रिवार आमचा भाबडा सलाम ... आम्हाला आमच्या निष्क्रिय देशप्रेमाबद्दल माफ करा ...

वर म्हटल्याप्रमाणे जमल्यास काही फोटो टाकता आले तर खूप आनंद वाटेल ..

आणि हो...कधी भेटाल असे झाले आहे ...
मनापासून शुभेच्छा

पगला गजोधर's picture

26 Apr 2015 - 7:13 pm | पगला गजोधर

दिलोंमे तुम अपनी बेताबीयां लेके चल रहे हो, तो झिंदा हो तुम....
नझरमे ख्वाबोन्की बिजलीया लेके चल रहे हो, तो झिंदा हो तुम....
हर एक लम्हेसे तुम मिलो खोले अपनी बाहें....
जो अपनी आखोंमे हैरानीया लेके चल रहे हो, तो झिंदा हो तुम....

आनन्दिता's picture

26 Apr 2015 - 6:57 pm | आनन्दिता

____/\____

टिवटिव's picture

26 Apr 2015 - 7:00 pm | टिवटिव

अप्रतिम

बोका-ए-आझम's picture

26 Apr 2015 - 7:20 pm | बोका-ए-आझम

जबरदस्त लेखमाला!

श्रीरंग_जोशी's picture

26 Apr 2015 - 7:41 pm | श्रीरंग_जोशी

शेवटच्या भागाने या लेखमालिकेच्या उंचीचा कळस गाठलाय.
सर्व प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले.

या भागात वर्णिलेल्या यशाबद्दल बापुसाहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन.
अशी लेखमालिका वाचायला मिळाल्याने स्वतःला मी भाग्यवान समजतो.

जुन्या भागांचे दुवे

राही's picture

26 Apr 2015 - 8:06 pm | राही

भावना वर्णन करायला. डोळे खरोखर ओले झाले. अभिमानाने मन दाटून आले.
मुशीतून तावून सुलाखून सोन्यासारखे झळाळून निघालात सोन्याबापू!
पुढील आयुष्यातील अनुभवही लिहाच.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Apr 2015 - 8:58 pm | अत्रुप्त आत्मा

फार छान हो!
अत्ता काही बोलवत नाही,नमस्कार फ़क्त तुम्हाला. __/\__

शिव कन्या's picture

26 Apr 2015 - 9:05 pm | शिव कन्या

अप्रतिम झाली लेखमाला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Apr 2015 - 10:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

Jay hind

आज परत सगळे भाग पहिल्यापासुन वाचुन काढले मग हा भाग वाचला. जय हिंद. जय भारत. _/\_

यशोधरा's picture

26 Apr 2015 - 10:29 pm | यशोधरा

जबरदस्त!

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Apr 2015 - 10:45 pm | बिपिन कार्यकर्ते

रडवलंस भो***!

मधुरा देशपांडे's picture

26 Apr 2015 - 11:48 pm | मधुरा देशपांडे

वरील सर्व प्रतिसादांशी सहमत.

यसवायजी's picture

27 Apr 2015 - 1:05 am | यसवायजी

वाखुसाआ. अतिशय सुंदर.
सलाम!!

sश्रिकान्त's picture

27 Apr 2015 - 1:24 am | sश्रिकान्त

मस्तच. बापुसाहेब पहीली पोस्टींग आणी त्यानंतरचे अनुभव िलहा.वाट पाहत आहोत.

बॅटमॅन's picture

27 Apr 2015 - 2:17 am | बॅटमॅन

.....

पाषाणभेद's picture

27 Apr 2015 - 5:58 am | पाषाणभेद

सगळे भाग वाचले. मस्त आहेत. NCC मध्ये असतांना असलेच वातावरण होते.

इडली डोसा's picture

27 Apr 2015 - 6:44 am | इडली डोसा

एका खूप छान लेखमालिकेचा तेवढाच सुंदर शेवट. तुमची लेखनशैली प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभी करणारी आहे. असेच अजून लिहीत रहा.
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

अन्या दातार's picture

27 Apr 2015 - 7:26 am | अन्या दातार

दंडवत!!

लाल टोपी's picture

27 Apr 2015 - 8:15 am | लाल टोपी

स्वत:च्या प्रशिक्षणाचे वर्णन करणारी मालिका असली तरीही कोठेही आत्मस्तुती नसल्याने अधिकच वास्तवादी म्हणुनच अतिशय भावणारी लेखमाला.

सस्नेह's picture

27 Apr 2015 - 8:24 am | सस्नेह

सॅल्यूटस टु अॅकॅडमी !
अस्सल फौजी भाषेतील लेखन आवडले. लिहीत रहा..
खरं तर प्रत्येक नागरिकाला विद्यार्थीदशेत किमान १ वर्ष आर्मी ट्रेनिंग कंपल्सरी पाहिजे.

नि३सोलपुरकर's picture

27 Apr 2015 - 10:05 am | नि३सोलपुरकर

अप्रतिम..

पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!.

चिनार's picture

27 Apr 2015 - 10:10 am | चिनार

सुंदर..अप्रतिम ...जबरदस्त लेखमाला.. शेवटचा भाग वाचू की नको असं झालं होतं कारण ही लेखमाला कधीच संपू नये असं वाटायचं....
सलाम बापूसाहेब !!!
लक्ष्य सिनेमातला ओम पुरी आणि ह्रतिक यांच्यातला एक संवाद आठवला ..थोडा अवांतर आहे पण मला फार आवडतो..
ओम पुरी : "सब लोग हम फौजीयो से केहते हैं की जंग बहोत बुरी होती हैं. मैं केहता हु, ये बात एक फौजी से बढकर कौन समझ सकता हैं
ह्रितिक : तो फिर ये जंग क्यो होती हैं.
ओम पुरी: क्या बताऊ साहब ...उपरवाले ने तो एकही धरती बनायी थी. पर इन्सान के लालच ने उसपे लकीरे खीच दी. ये तेरा ....ये मेरा...मैं तो शुक्र करता हु के चांद आसमान में हैं.. वरना इन्सान उसके भी तुकडे कर देता.

स्वप्निल रेडकर's picture

27 Apr 2015 - 10:20 am | स्वप्निल रेडकर

कड़क सल्यूट!बाकी काही प्रतिक्रिया दयायला शब्द्च नहित.

भुमन्यु's picture

27 Apr 2015 - 10:34 am | भुमन्यु

सॅल्युट!!! आणि प्रत्येक प्रतिक्रियेशी सहमत...

ह्या भागाच्या शेवटी समाप्त चुकुन आलंय का? कारण आम्ही सगळेच तुमच्या पुढील अनुभवांविषयी ऐकायला उत्सुक आहोत.

लेखमालेसाठी धन्यवाद आणि देशासाठी झटणार्‍या सर्व सैनिकांना मानाचा मुजरा

नीलमोहर's picture

27 Apr 2015 - 10:35 am | नीलमोहर

सैनिकी आयुष्याची एवढ्या जवळून ओळ्ख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !!
तुमचे इतरही अनुभव नक्की लिहा..

सौंदाळा's picture

27 Apr 2015 - 10:44 am | सौंदाळा

मिपावरची अजरामर लेखमाला
_/\_

एकनाथ जाधव's picture

27 Apr 2015 - 11:22 am | एकनाथ जाधव

अगदी बरोबर सलाम!!!

अकादमी मधल्या ट्रेनिची लेखमाला अप्रतिम झाली … salute "रगड़ोत्तम भारती बापुसहेब" खूपच मस्त शेवट केलात …. असो आता नवीन लेखमाला चालू करा अरुणाचल पोस्टिंग मधील अनुभव… आम्ही तुमच्या नवीन लेखमालेची आतुरतेने वाट पाह्तोय. येऊ द्या लवकर …!

पदम's picture

27 Apr 2015 - 12:07 pm | पदम

_/\_ अभिमान वाटतो तुमचा.

सुहास झेले's picture

27 Apr 2015 - 1:10 pm | सुहास झेले

!!

सिरुसेरि's picture

27 Apr 2015 - 1:52 pm | सिरुसेरि

लेख छान ..
"अन मग आयुष्यात पहिल्यांदा घातलेली पीक्ड कॅप टॉस करायचा सेरेमनी, मग आम्ही मोकळ"
हा सेरेमनी कंपल्सरी असतो का ? कारण एवढ्या महत्प्रयासाने मिळवलेली परम पवित्र कॅप टॉस करणे / हवेत भिरकावणे कसे शक्य आहे ? पुर्वी वार्षिक परिक्षा संपल्यावर शाळेतली व्रात्य पोरे आपल्या पाट्या हवेत भिरकाउन देत तसा प्रकार आहे का ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Apr 2015 - 3:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

मला खरेच नाही माहिती , हे एक ट्रेडिशन आहे ते पाळले जाते , आधी आयएमए ला सुद्धा होते ह्या वर्षी बंद केले आहे म्हणे , आम्हाला जे सांगितले होते त्यानुसार ही एक पद्धत असते सिविलियन लाइफ ला टाटा म्हणायची, आयुष्यात एकदाच कुटाने करुन घ्या एक नागरीक म्हणून लास्ट टाइम असे काहीसे असेल

कोंबडी प्रेमी's picture

27 Apr 2015 - 2:09 pm | कोंबडी प्रेमी

ऑल टाईम ग्रेट ...

स्वराजित's picture

27 Apr 2015 - 2:32 pm | स्वराजित

_/\_

कोंबडी प्रेमी's picture

27 Apr 2015 - 2:33 pm | कोंबडी प्रेमी

सगळेच प्रतिसाद अतिशय हृद्य

सन्दीप's picture

27 Apr 2015 - 3:32 pm | सन्दीप

अप्रतिम लेखमाला!

जगप्रवासी's picture

27 Apr 2015 - 3:39 pm | जगप्रवासी

लेखाचे शीर्षक वाचूनच लेख वाचायची हिम्मत होत नव्हती, इतकी चांगली लेखमालिका संपणार याच दुख होत पण मग मनाचा हिय्या करून लेख वाचला आणि खर सांगतो ऑफिस मध्ये बसलोय हे विसरून नकळत डोळ्यातून पाणी आल.

रडवलंत ओसी रगडोत्तम बापूसाहेब!!!!!

खूब जियो और लिखते रहो

मोदक's picture

27 Apr 2015 - 3:41 pm | मोदक

.

सातारकर's picture

27 Apr 2015 - 3:47 pm | सातारकर

उत्तम लेखमाला.

शपथेतला हा भाग गमतिशिर वाटला.
In the name of the President of the Soverign Socialist Secular Democratic Republic of India....
हे अस आहे याचि कल्पना नव्हती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Apr 2015 - 7:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

Sovereign Socialist Secular Democratic Republic of India

हे भारत देशाचे अधिकृत पूर्ण नाव आहे. ते भारतीय घटनेच्या सुरुवातीस (प्रियांबल्) लिहीलेले आहे.

भारतीय संसदेने २६ नोव्हेंबर १९४९ ला स्विकृत केलेल्या घटनेच्या मूळ प्रतीत Sovereign Democratic Republic of India असे नाव होते. त्यात नंतर १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीने त्यात Socialist Secular या दोन शब्दाची भर घातली गेली.

प्रभो's picture

27 Apr 2015 - 4:18 pm | प्रभो

भारी! लिहिते रहा!

मोहनराव's picture

27 Apr 2015 - 4:33 pm | मोहनराव

कडक सलाम बापुसाहेब! आपण असेच लिहित रहा!

होबासराव's picture

27 Apr 2015 - 4:41 pm | होबासराव

... शब्द नाहीत.. फक्त सलाम

असंका's picture

27 Apr 2015 - 4:43 pm | असंका

अप्रतिम!!

( यावेळी ट्रॅकही ठेवला नाही, कितीवेळा डोळ्यातून पाणी येतंय त्याचा...)

उगा काहितरीच's picture

27 Apr 2015 - 8:34 pm | उगा काहितरीच

अप्रतिम ! आत्ताच सर्व भाग एकत्र वाचून काढले . केवळ अप्रतिम !! धन्यवाद अस काही तरी आम्हाला वाचायला दिल्याबद्दल.

रामपुरी's picture

28 Apr 2015 - 1:37 am | रामपुरी

जबरदस्त.
कधीकाळी सैन्यात जायची इच्छा होती पण..... आता पुढच्या जन्माचीच वाट बघावी लागेल

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Apr 2015 - 11:37 am | ज्ञानोबाचे पैजार

अप्रतिम लेखमालेचा तेवढाच अप्रतिम समारोप.

तुमचे सेनादलातले इतर अनुभवही वाचायला आवडतील.

लिहिणे थांबवु नका.

(सैन्यदलात जायची इच्छा अपुर्ण राहिलेला) पैजारबुवा,

शिवाजी नाठे's picture

28 Apr 2015 - 1:11 pm | शिवाजी नाठे

साष्टांग दंडवत तुमच्या अप्रतिम जीवन प्रवासाला .

अप्रतिम लेखमाला. डोळ्यातुन पाणी काढले तुम्ही. परेडचा भाग वाचताना तर अंगावर काटा आला अगदी. खुप खुप धन्यवाद आम्हाला एवढे छान लिखान वाचायला दिल्या बद्दल.

जे.पी.मॉर्गन's picture

28 Apr 2015 - 5:38 pm | जे.पी.मॉर्गन

मिपावर आल्याचं पुन्हा एकदा सार्थक वाटलं ह्या मालिकेमुळे! काही पुस्तकं अशी असतात की कधीही कुठल्याही पानावरून वाचायला सुरुवात करावी. तशी झालिये ही मालिका!

अप्रतीम!

जे.पी.

पिशी अबोली's picture

29 Apr 2015 - 4:42 pm | पिशी अबोली

निव्वळ अप्रतिम! संपूर्ण लेखमालाच जमेल तशी वाचून काढली, पण कुठेही साखळी तुटली नाही.. अनुभव तर जबरदस्त आहेतच, पण तुमची ते मांडण्याची शैलीपण जबरदस्त!

रुपी's picture

30 Apr 2015 - 6:07 am | रुपी

ही पूर्ण मालिका वाचताना कित्येक वेळा डोळे पाण्यावल्यामुळे वाचता वाचता थांबावं लागलं, अंगावर काटा आला, कधी धडधड वाढली, तर केव्हा केव्हा नुसतं वाचूनच छाती अभिमानानं भरुन आली.

हा भाग तर अगदी कळसच! खास करुन ते बडे उस्तादांचे निरोपाच्या वेळचे बोल तर खूपच रडवून गेले.

हे सगळं तुम्ही अनुभवलं त्यामुळे नशीबवानही आहात की अशी माणसे तुम्हाला भेटली, आणि इतक्या खडतर परिश्रमांतून पार होउन अधिकारी झालात त्यासाठी सलाम.

हे सगळं आमच्यापर्यंत पोहोचवलंत - तेही इतक्या सुरेख शब्दांत - यासाठी धन्यवाद!

अनय सोलापूरकर's picture

30 Apr 2015 - 3:02 pm | अनय सोलापूरकर

बापुसाहेब _/\_

लव उ's picture

30 Apr 2015 - 5:12 pm | लव उ

निव्वळ अप्रतिम

शैलेन्द्र's picture

30 Apr 2015 - 8:07 pm | शैलेन्द्र

एका जबरदस्त लेखमालेचा शेवट .. धन्यवाद

प्रास's picture

2 May 2015 - 2:40 am | प्रास

नंतरच्या आयुष्यासाठी तयार करणार्‍या ट्रेनिंग दरम्यानच्या घटनांचा चढता आलेख राखणारं लेखन आवडलं.

लिहिते रहा....

धन्यवाद!

सुकामेवा's picture

13 May 2015 - 2:26 pm | सुकामेवा

अप्रतिम लेखमालेचा तेवढाच अप्रतिम समारोप. निशब्द