मानसिक त्रास
काल ७ एप्रिल रोजी माझ्या आईची पुणे येथील पासपोर्ट ऑफिसची ३:४५ ची अपाँटमेंट होती.
१.व्यवस्थित भरलेला फॉर्म
२.रीसीट
३.आधार कार्ड
४ पॅन कार्ड
५. शाळा सोडल्याचा दाखला
६.दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट
७. अॅनेक्चर डी ( लग्नानंतरचे नाव बदलल्यासाठी)
८.अॅनेक्चर ए ( जन्मगाव )
९. लाइट बिल
१०. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (१ वर्षा हूनही जुने)
वरील सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याम्च्या सेल्फ अॅटेस्टेड झेरॉक्सचे २ सेट असे नेले होते.
प्रचंड गर्दी आणि २.५ तास वाट पाहिल्यानंतर नंबर आला . पहिल्या ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासून "ओके" चा शेरा मिळाला पुढे दुसर्या काउंटरवर फोटो हाताचे ठसे घेतले . एवढे होईतो ७ वाजत आले होते. पुढील माणसाने कोणतीही माहिती न देता "insuffiecient documents" असा शेरा मारला . त्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे हे विचारले असता. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली आणि दुसर्या काउंटरवर पाठवले ( त्याला मराठी येत नव्हते आणि आइचे हिंदी- इंग्लिश कच्चे आहे). आणि त्याने पुढची तारीख २१ मे टाकली आणि निघून गेला. दुसर्या काउंटरवर तिथल्या महिलेने कागदपत्रे तपासली आणि योग्य असल्याचा निर्वाळा दिला. पण तोवर हा मनुष्य सीस्टम बंद करून निघुन गेला होता.
त्या महिलेने सांगितले एकदा तुमचा अॅप्लीकेशन ऑन होल्ड स्टेटस वर गेले तर पुन्हा त्या तारखे शिवाय काहीच करू शकत नाही. या प्रकारात ८ वाजून गेले होते. प्रंचंड मनस्ताप झाला होता आणि पासपोर्ट ची पुढची तारीख २१ मे ( ४५ दिवसानंतरची) मिळाल्यामुळे बर्याच प्लॅनवर पाणी फिरले आणि यात कोणतीही चूक नसताना !
दुर्दैवाने या विरूद्ध कुठेही तक्रार करायची सोय नाही . फीडबॅक मधे लिहा किंवा कॉल सेंटरला कॉल करा ठराविक साच्याची उत्तरे मिळतात पण बेजबाबदार कर्मचार्यांची तक्रार करण्याची आणि कारवाईची सोय कुठेही नाही.
अशा गोष्टी टाळण्यासाठी
१. महाराष्ट्रात मराठी भाषिक कर्मचारी / अनुवादक असावेत.
२. प्रत्येक कर्मचार्याने काम न होण्याचे कारण लिखित स्वरूपात द्यावे.
३. तक्रार नोंदणी आणि कारवाइ विभाग असावा
(अशी दिवास्वप्ने आहेत).
प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते.
प्रतिक्रिया
8 Apr 2015 - 3:47 pm | चिनार
तुम्हाला आलेला अनुभव दुर्दैवी म्हणावा लागेल. पण मी इतक्यातच माझ्या पत्नीचे आणि आणखी २ नातेवैकांचे पासपोर्ट काढण्यासाठी पुणे ऑफिस मध्ये गेलो होतो. अर्थात मला आतमध्ये जाता आले नाही. पण तिथले कामकाज आणि एकंदरीत systeem अत्यंत सुटसुटीत आहे असे वाटले.
8 Apr 2015 - 3:48 pm | सस्नेह
कुठे दट्ट्या हाणायचा ते बरोबर शोधून काढायचे अन घाव घालायचा.
बरेचदा इमिजिएट वरिष्ठाकडे गेल्यास काम होते, असा अनुभव आहे.
बाकी जास्त माहितीसाठी कॉलिंग मोदक..
8 Apr 2015 - 6:17 pm | मोदक
मला (सुदैवाने) पासपोर्ट काढताना काहीच त्रास झाला नाही.
त्यामुळे फारशी माहिती नाही. :)
8 Apr 2015 - 4:10 pm | चैतन्य ईन्या
सध्या बँकेमध्ये १५जी भरण्याचा एक प्रचंड मानसिक त्रासदायक प्रकार आहे. ह्यांना दर वर्षी तीच सगळी माहिती लागते तर ऑनलाईन सोय का नाही करत? एसबीआय म्हणजे तर हिटलरचे छलवणूक चेंबर आहे असे आमचे मत आहे बुवा. माझ्या पुढे १क ८० वर्षाची आजी होती. तिला धड काहीही कळत नव्हते आणि हे साले माजुरडे तिला इकडून तिकडे उडवून लावत होते. शेवटी सटकून मी जाम तमाशा केला तेंव्हा तिचे काम केले आणि मला जाम तंगवले. कुठलेही काम सोपे करायचे असते हे अख्या भारतात मान्य नाहीये. सतत भरपूर त्रास दिलाच पाहिजेल असा अलिखित नियम आहे. जी गोष्ट सहज होऊ शकते ती पण मुद्दामहून कशी कठीण करता येईल ह्यातच सगळी शक्ति वाया घालावाची आणि म्हणे भारत महासत्ता होणार.
8 Apr 2015 - 4:16 pm | कपिलमुनी
वयस्कर लोकांना नवीन संज्ञा (टर्म) माहीत नसतात तेव्हा ते अडाणी म्हणून वागवले जाते.
वरती लेखात अमराठी कर्मचार्याम्चा मुद्दा टंकायचा होता पण धाग्याचा काश्मीर झाला असता . त्यांना मराठी येत नाही ही आपली चूक नव्हे पण ते अत्यंत माजोरडेपणे वागतात.
8 Apr 2015 - 4:24 pm | चैतन्य ईन्या
अहो ते स.*** भ**** मराठीच आहेत हो. साल्यांना इतके डोके नाहीये की एकाच ठिकाणी काम करावे. कशाला हव्यात १० लाईन्स मला अजूनही त्या आजीचा चेहरा आठवातोय. असे हात शिवशिवत होते एक एकाला पिदाडून काढायला. असो. आमच्या विन्जनियारिग कालेजपासून ते पासपोर्ट असो वा अजून काय असो उगाचच आपले लोकांना ताटकळत उन्हात ठेवण्यात फार मजा येते असे माझे मत झाले आहे. दुसऱ्याची सोय पहावी असे कधीच कुठे बघितलेले नाहीये आणि लोकांचा त्रास कमी करावा असे तर बिलकुल कुठे धोरण नाहीये. त्यामुळे जो तो नुसता संधी मिळाली की तसाच छळून काढायला बघतो. थोडेफार अपवाद आहेत पण ते अपवादच.
8 Apr 2015 - 5:27 pm | आजानुकर्ण
हा नक्की कुठल्या बँकेचा त्रास आहे? एचडीएफसीमध्ये ऑनलाईन 15जी भरण्याची सुविधा आहे. काळ्या पैशाच्या नावाखाली बँकांचे व्यवहार किचकट करण्याची अहमहमिका सर्वच ठिकाणी सुरु आहे. केवळ एक किंवा दोन(बस्स!) बँक खाती असलेले उत्तम.
8 Apr 2015 - 5:37 pm | चैतन्य ईन्या
एस बी आय आणि तत्सम सहकारी बँका. खरे म्हणजे त्या आजींना पासबुक भरून हवे होते आणि १५जी भरायचा होता. पूर्वी एकाच ठिकाणी होत असे आता उगाचच इकडून तिकडे जा आणि तिकडून पलीकडे जा आणि बस बोंबलत
8 Apr 2015 - 11:12 pm | मास्टरमाईन्ड
सं*स बँक ऑफ इंडिया आहे.
17 Apr 2015 - 6:03 pm | संदीप डांगे
खरं आहे शंभर टक्के.
नव्या कोर्या व्यवसायाचे पहिले वहिले करंट अकाऊंट उघडायला गेलो तर म्हणे दोन वर्षाचे आयटीआर आणा. मी म्हटलं बाबारे हा नवीन बिझनेस अस्तित्वात यायाच्या आधीच आयटीआर कुठून आणेन. मी काय लोन मागायला नाय आलो. तर ते म्हणे ते आम्हाला काय म्हाईत नाय. (टाईम मशीन शोधतोय.)
नशीब, कोटकने प्रचंड सुविधा असलेली झीरो बॅलंसवाली स्किम देऊन खातं उघडून दिलं. बाकी कुठल्या राष्ट्रियकृत बँकांचे उपकार नको.
8 Apr 2015 - 6:55 pm | प्रणित
१०० % सह्मत
8 Apr 2015 - 4:18 pm | पिलीयन रायडर
मी आज सकाळपासुन पासपोर्ट ऑफिस सोबत संपर्क करत आहे.
(आता विषय निघालाच तर इथेही विचारुन बघते.. कुणाला काही माहिती असेल तर प्लिझ मदत करा..)
माझ्या मुलाच्या बर्थ सर्टिफिकेट वर माझे नाव सासरचे लागले आहे. मी कुठेही सासरचे नाव लावत नाही. आता मुलाचा पासपोर्ट काढताना माझा नि माझ्या नवर्याचा पासपोर्ट ह्यावरील माझे नाव आणि बर्थ सर्टिफिकेट वरचे माझे नाव ह्यात फरक आहे. म्हणुन मग अर्थातच प्रॉब्लेम येणार. तर ह्यासाठी काय करता येईल हे विचारय्चे आहे.
मला फकत मीच माझ्या मुलाला जन्म दिला आहे असे सांगणारे कोणतेही प्रुफ हवे आहे.
१. कस्टमर केअर - 1800-258-1800- ह्यांनी बरीच मदत करायचा प्रयत्न केला. पण शेवटी केस त्यांच्या हाताबाहेर असल्याने रिजनल ऑफिसला जा म्हणाले.
२. मग आता रिजनल ऑफिसला एवढय उन्हात कधी जा.. म्हणुन सहज मेल आयडी शोधुन मेल केला. (rpo.pune@mea.gov.in) फोनही करायचा प्रयत्न केला. (020-25675421, 25675422 ) फोन उचलला नाही पण त्यांचाच मला दुपारी कॉल आला की काय नक्की प्रॉब्लेम आहे? मी सविस्तर सांगिल्यावर मदत केली. अर्थात मला त्या ऑफिसला जावे लागणारच कारण काम तसे आहे. पण किमान मेल वाचला तरी.. शिवाय पुन्हा त्यांनी त्यावर रिप्लायही करुन ठेवला की "फोनवर बोलणे झाल्याप्रमाणे जे सांगितले आहे ते करा (!!)"
३. मी "सारथी" च्या हेल्प लाइनला ही कॉल केला. त्यांनी नीट ऐकुन मदत करायचा प्रय्त्न केला. पण काम झाले नाहीच..
एकंदरीत मलाही वाटते की तुम्ही वेब्साईट वर जाऊन इथे कंप्लेंट करा - http://passportindia.gov.in/AppOnlineProject/ccgm/ServiceRequestHomeAction
8 Apr 2015 - 5:28 pm | आजानुकर्ण
२ उपाय आहेत.
१. ज्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या बाळाचा जन्म झाला तिथून (तुमच्या माहेरच्या नावाखाली जन्म दिल्याचे) नवे बर्थ सर्टिफिकेट घ्यावे लागेल. माझ्या एका मित्राची हीच कथा होती. त्याला काही पैसे भरुन नवे सर्टिफिकेट मिळाले.
२. किंवा तुमचा आताचा पासपोर्ट रद्द करुन तो सासरच्या नावाने रिन्यू करुन घ्यावा लागेल. मॅरिज सर्टिफिकेट व कायदेशीर नाव बदलले असल्यास तुम्हाला तात्काळ नवा पासपोर्ट मिळू शकतो.
8 Apr 2015 - 5:49 pm | पिलीयन रायडर
१. हे नक्की कसे केले हे सांगाल का? कारण आता हॉस्पिटल कानावर हात ठेवेल की आमचा आता काही संबंध नाही. तरी प्रयत्न करेनच.
२. हे मला करायचं नाहीये म्हणुन तर हा खटाटोप. अन्यथा गॅझेट मध्ये नाव बदलुन हा सगळा घोळ सोडवता येईल.
8 Apr 2015 - 6:02 pm | आजानुकर्ण
तुमच्याकडे मॅरिज सर्टिफिकेट असेल तर मिळायला काहीच हरकत नसावी. थोडी खटपट करावी लागेल. तुमच्याकडे सध्या असलेले बर्थ सर्टिफिकेट तिथे दाखवून बदलून देण्याची विनंती करु शकता.
जर तुमचा आणि नवऱ्याचा पासपोर्ट दोन्हीही लग्नापूर्वी काढले असतील तर बाळाचा पासपोर्ट मिळणे अवघड आहे. तुमचे आणि नवऱ्याचे पासपोर्टवरील आडनाव वेगळे असेल तर बाळाचा पासपोर्ट काढताना दोघांपैकी एकाच्या पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला रिन्यूअल करावेच लागेल.
लग्नानंतर नवऱ्याचेच नाव सर्व ठिकाणी असलेले सोयीचे पडते. तुमच्या जुन्या पासपोर्टवरचे विसे वगैरे वॅलिड राहतात. (हे त्यात्या देशाच्या कॉन्सुलेटला विचारुन घ्या) विशेषतः भारतात अतिउत्साही लोक लग्न झालेली बाई दिसली की स्वतःहून तिच्यामागे सासरचे आडनाव लावतात. (उदा. वरच्या उदाहरणातील हॉस्पिटलवाले). त्यामुळे सासरचेच आडनाव असले तर अडचणी खूपच कमी होतात.
(माझ्या बायकोचे अद्याप माहेरचेच नाव सर्व ठिकाणी आहे. तरी एकदोन ठिकाणी (दवाखाना, बँक वगैरे) सासरचे नाव लावण्याचा उद्योग अतिउत्साही मंडळींकडून झाला आहे. )
8 Apr 2015 - 6:26 pm | पिलीयन रायडर
१. माझे बाळांतपण प्रायव्हेट हॉस्पिटलला झाले. तिथुन माहिती भरुन सरकारी दवाखान्यात गेली न तिथे जन्मदाखला मिळाला. आता मी कुठेही गेले तरी लोक "हे आमचं काम नाही" असंच म्हणत आहेत.
२. नवर्याच्या पासपोर्ट्वर माझे माहेरचे नाव आहे. माझ्या पासपोर्ट वर लग्नाआधी काढला असल्याने त्याचे नाव नाही. आमच्याकडे विवाहनोंदणी केलेले प्रमाणपत्र आहे. आता समजा त्यांनी हे मान्य केले की मीच माझ्यामुलाची आई आहे, तरी मला असं वाटतं की ते मुलाच्या पासपोर्टवर माझे सासरचे नाव लावतील. म्हणजे अजुन गोंधळ.. म्हणुन हा सगळा खटाटोप..
आता माझ्याकडे २ पर्याय आहेत असे वाटते.
१. लोकल आणि नॅशनल पेपर मध्ये जाहिरात देणे ह्या संबंधी.. अनेकदा अशी जाहिरात देताना पाहिले आहे.
२. वरचा उपाय.. आणि इतर कोणताही उपाय असल्यास त्यासंबंधी S.B Road वरील पासपोर्ट ऑफिसमध्ये एक चौकशी खिडकी आहे म्हणे (सोम-शुक्र, बुधवार सोडुन, दुपारी १२.३० पर्यंत) तिथे जाऊन अधिकार्यांना भेटणे आणि काही मार्ग आहे ते पहाणे.
8 Apr 2015 - 6:54 pm | आजानुकर्ण
लग्नानंतर नाव बदललेले कधीही चांगले. जर ताबडतोब प्रवास करायची शक्यता नसल्यास तुमचे नाव सगळीकडे बदलून घ्या. पेपरमध्ये जाहिरात देणे सक्तीचे नाही. मॅजिस्ट्रेट किंवा नोटरीकडे अॅफिडेविट करुन नाव बदलता येते. नंतर टप्प्याटप्प्याने पॅनकार्ड, रेशनकार्ड, बँका वगैरे सगळीकडे नाव बदलून घ्या.
8 Apr 2015 - 7:04 pm | पिलीयन रायडर
अहो हेच तर..
मुळात नाव बदलणं आवश्यक गोष्ट नाहीचे.. मला माझे नाव बदलायचे नाही हा प्रमुख मुद्दा आहे म्हणुन तर मी हा खटाटोप करतेय..
8 Apr 2015 - 7:23 pm | आजानुकर्ण
याबाबतीत मी कोर्टाचे वेगवेगळे निकाल, काही वकिलांची मते यावरुन प्रचंड गोंधळून गेलोय. एका वकीलाच्या मते हिंदू विवाहकायद्याखाली लग्नाची नोंदणी असेल तर बाईचे सासरचे नाव हे 'अापोआप' होते. त्यामुळे ते सगळीकडे बदलून घेणे आवश्यक ठरते. अन्यथा 'खोटे नाव' (माहेरचे) वापरल्याचा आरोप होऊ शकतो. याऊलट स्पेशल मॅरिज अॅक्टाखाली विवाह व नोंदणी असेल तर ते सक्तीचे नसते.
तुमचा जुने नाव ठेवायचा हट्ट असल्यास एखाद्या वकीलाशी बोलून घ्या.
मालमत्ता-वारसा हक्क व इतर नियमांसाठीही नाव बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
8 Apr 2015 - 7:30 pm | आजानुकर्ण
गूगलवर शोधले असता हे एक दिसले. ही माहिती मी ऐकलेल्या माहितीशी सुसंगत आहे. यात लग्नानंतर (हिंदू विवाह कायदा) माहेरचे नाव तसेच ठेवायचे असल्यास तशी नोंद करुन घ्यावी लागते असे लिहिले आहे. त्यामुळे किचकटपणा कमी करण्यासाठी एकच आडनाव (नवऱ्याचे) असलेले चांगले
http://www.lawyersclubindia.com/forum/Name-change-after-marriage-for-lad...
8 Apr 2015 - 11:29 pm | पिलीयन रायडर
साधारण मागच्या १-२ वर्षापुर्वी कोर्टाचा निर्णय आला होता की आता नाव बदलण्याची काहिही गरज नाही.
गुगलले असता ही लिंक मिळाली
http://nlrd.org/womens-rights-initiative/news-from-high-courts-womens-ri...
8 Apr 2015 - 11:44 pm | श्रीरंग_जोशी
केवळ लग्न झाले म्हणून नाव / आडनाव बदलणे मला पटत नाही. ही बातमी वाचून बरे वाटले.
भविष्यात ज्यांना नाव आडनाव बदलायचे आहे त्यांच्यासाठी विशिष्ट प्रक्रिया असावी. केवळ लग्न झाले म्हणून मध्यनाव अन आडनाव बदलल्याचे गृहीत धरणे थांबवले जावे. ही सुधारणा कधी तरी होईल अशी आशा आहे.
या विषयावरचा माझा जुना प्रतिसाद - विवाहोत्तर नाव बदलणे.
9 Apr 2015 - 7:46 am | इडली डोसा
तुमच्या पासपोर्ट वर spouse name मधे नवर्याचे नाव टाकुन घ्या. मी आधि ते करुन घेतले आणि मग मुलिचा पासपोर्ट अप्लाय केला. तुमच्या आणि माझ्या केस मधे हा एकच फरक दिसतोय.
9 Apr 2015 - 9:52 am | पिलीयन रायडर
माझ्या नवर्याच्या पासपोर्टवर माझे नाव आहे. माझ्या पासपोर्टवर त्याचे टाकेन.
आणि तुमच्याही केस मध्ये बर्थ सर्टिफिकेट्चा असाच घोळ होता का?
9 Apr 2015 - 11:11 pm | इडली डोसा
माझ्याही केस मध्ये बर्थ सर्टिफिकेट्चा असाच घोळ होता. आता मुलीच्या पासपोर्टवर माझे लग्नानंतरचे नाव लागले आहे. पण मी ते वापरत नाही. ती माझ्या Work Visa वर dependant आहे. आणि व्हिजासाठी नावात फरक होता तरी काही त्रास नाही झाला.
तुमच्या नवर्याच्या पासपोर्टवर तुमचे नाव असेल तरीही तुम्हाला तुमच्या पासपोर्टवर नवर्याचे नाव टाकुन घ्यायला लगेल. खाली वाचा.
If either parent holds a valid passport with spouse name endorsed, passport will be issued to the minor without any police verification. Original passport of parent(s) should be presented for the verification of particulars. If parent(s) hold a valid passport, but spouse name is not endorsed, then they must get the spouse name added in their passport. For this they have to apply for a reissue of passport and get the specified change in personal particulars.
ही माहिती या बुकलेट मधुन मिळाली. - PassportApplicationformInstructionBooklet-V3.0.pdf , passport.gov.in वर नविन information booklet असेल तर त्यात काही बदल दिसतोये का ते बघा.
19 Apr 2015 - 11:49 am | आशु जोग
पिलियन रायडर ताई
एक गोष्ट पहिल्यांदा तुम्ही मान्य करा जो काही घोळ झाला आहे तो तुम्ही स्वतः घातला आहे. तुम्ही जी माहिती द्याल तीच सरकारी अधिकारी फीड करणार. मग सगळीकडे एकसारखी भरण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे.
आता सांगा आत्ता नावामुळे काही काम अडते आहे का...
9 Apr 2015 - 12:01 pm | संग्राम
नाव बदलले आहे / २ नावाची व्यक्ती एकच आहे असे अॅफिडेविट आणि लोकल आणि नॅशनल पेपर मध्ये जाहिरात देणे गरजेचे आहे. गॅझेट पुरावा म्हणून मान्य करत नाहीत असा अनुभव आहे.
Annexure "H" आणि Annexure "E" सुद्धा लागेल असे वाटते
10 Apr 2015 - 4:28 am | अनन्त अवधुत
बाळाच्या जन्माचा दाखला स्थानिक नगर परिषदेत / महानगरपालिकेत मिळतो.बाळाचा जन्म झाला ते इस्पितळ दाखला देणार नाही.
माझ्या मामेभावाच्या बाबत असेच झाले होते, त्यात मामाचे (म्हणजे त्याच्या वडिलांचे) वापरातले नाव दिले होते
कागदोपत्री मामाचे नाव वेगळे असल्याने. जन्म दाखला दुरुस्त करावा लागला.
त्यासाठी मामाला प्रतिज्ञापत्रासह नवीन दाखल्यासाठी अर्ज करावा लागला.पण नाव दुरुस्त होऊन नवा दाखला मिळाला. २००५ ची घटना आहे. नवीन काही नियम आले असतील तर कल्पना नाही.
8 Apr 2015 - 6:21 pm | आदूबाळ
बर्थ सर्टिफिकिटे दोन असतात.
१. हॉस्पिटल देते ते. त्यात "बेबी {आडनाव}" असा उल्लेख असतो.
२. महानगरपालिका देते ते. त्यात पूर्ण नाव+आडनाव उल्लेख असतो.
आपण कोणत्या बर्थ सर्टिफिकेटबद्दल बोलत आहात?
क्र. २ चं बर्थ सर्टिफिकेट महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात जाऊन बदलता येईल.
8 Apr 2015 - 6:27 pm | आजानुकर्ण
दोन्ही बदलावी लागतील. हॉस्पिटलचे बर्थ सर्टिफिकेट पाहून महापालिका सर्टिफिकेट देते. हा तितकासा किचकट प्रकार नाही. मुळात काहीही खोटी मागणी नसल्याने अडचण यायची शक्यता फारच कमी आहे.
8 Apr 2015 - 6:30 pm | पिलीयन रायडर
मला फक्त क्रमांक २ चे मिळाले आहे. जे बदलता येत नाही नव्या नियमा नुसार.
9 Apr 2015 - 7:38 am | इडली डोसा
नव्या नियमा नुसार नगरपालिके कडुन मिळालेले बर्थ सर्टिफिकेट बदलता येत नाही. शिवाय अजुन प्रति हव्या असतिल तर त्यासुद्धा पहिल्यावेळी सर्टिफिकेट घेतानाच थोडी जास्त फी भरुन घ्याव्या लागतात.
9 Apr 2015 - 9:54 am | पिलीयन रायडर
ह्या निमित्ताने...
पिं.चि मनपा मध्ये जन्मलेल्या बाळांसाठी ही लिंक उपयुक्त ठरावी. मी एकदा अशीच वापरुन पाहिली होती. मला माझ्या मुलाचा जन्मदाखला सापडला होत. बदल मात्र करता येत नाहीत.
http://203.129.227.16:8080/BND/wicket/
11 Apr 2015 - 1:03 am | टिल्लू
तुमची आणि आमची केस अगदी तंतोतंत जुळते. फरक एव्हढाच की, आम्ही नागपुर पास्पोर्ट कार्यालयात अर्ज केला होता.
मला आठवते तसे आम्ही इतर कागद्पत्रासोबत, annexure I, H, F, जोडले होते.
काहीही प्रोब्लेम आला नाही, फक्त पोलिस व्हेरीफिकेशन ई. गोष्टींमुळे पासपोर्ट यायला दोन महिने लागले.
22 Apr 2015 - 12:12 pm | ऋषिकेश
काहीही करता येत नाही. आमचंही असंच झालं होतं.
हॉस्पिटलवाले नवरर्याचं जे आडनाव असेल तेच बाईला चिकटवून मोकळे होतात. वेळीच लक्षात आलं नाही तर काहीही करता येत नाही.
शेवटी सगळ्या डॉक्युमेंट्सवर बायकोचं नाव बदलून घेणं भाग पडलं :(
8 Apr 2015 - 4:54 pm | मालोजीराव
स्क्रीनिंग कौंटर आणि कौंटर 'ए' टीसीएस कडे आहेत,त्यामुळे तिथे अमराठी लोकांचा भरणा आहे. 'बी'आणि 'सी' शासनाकडे आहे.
8 Apr 2015 - 4:59 pm | एस
मला वाटतं लेखातील अनुभव बी काऊंटरचा असावा.
8 Apr 2015 - 5:08 pm | कपिलमुनी
अमराठीचा मुद्दा केवळ भाषा समजण्यापुरता आहे. सर्वच मराठी माणसांना इंग्रजी किंवा हिंदी येत असेल असा कसा काय गृहीत धरू शकतात ?
8 Apr 2015 - 5:08 pm | के.पी.
तुम्ही दिलेल्या कागदपत्रांच्या यादीत रेशनकार्ड आणि मतदान ओळखपत्र दिसत नाहिये. रेशनकार्ड नाही पण मतदान ओळखपत्र तरी घेतातच.(आधार कार्ड असुनही)
8 Apr 2015 - 5:19 pm | होकाका
कपिलमुनीजी, पासपोर्टच्यासंदर्भात, ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊनच पुढे जाणं श्रेयस्कर. (परंतु ती वेळ निघून गेलेली आहे).
पासपोर्टसंबंधी तक्रार येथे नोंदवावी:
http://passportindia.gov.in/AppOnlineProject/ccgm/callCenterOnlineGrievance
आणि येथे नोंदवावी:
https://org2.passportindia.gov.in/AppConsularProject/welcomeLink
या दोनही संस्थळांवर तक्रार नोंदवूनही काम न झाल्यास, पुढचा मार्ग म्हणजे: escalation.
तसेच, सर्व सरकारी किंवा निम्नसरकारी कारभारासंदर्भात ऑनलाइन तक्रार करण्याचीही सोय आहे.
येथे पहा: http://dpg.gov.in/Lc_ViewStatus.aspx
Hope, this helps.
8 Apr 2015 - 6:21 pm | कपिलमुनी
दुव्यांबद्दल धन्यवाद !
वरील अपाँटमेंट ऑनलाईनच मिळाली होती. हा त्रास कागदपत्रांची पडताळणी करताना झाला आहे.
@ केपी
रेशन कार्ड हा पुरावा ग्राह्य धरला जात नाही.
मतदान ओळखपत्रावरची जन्मतारीख आणि पत्ता चुकीचा होता. पण पॅन कार्ड आणि आधार कार्ड , १ वर्षाहून जुने नोंद असेलेले पासबुक ह्या द्वारे ओळख ग्राह्य धरली जाते.
10 Apr 2015 - 7:16 am | के.पी.
माझ्या माहितीत तरी अजुन कोणाचे रेशनकार्ड आणि पॅन कार्ड घेतल्याचे आठवत नाही. पण आधार कार्ड असुनही वोटर आयडी घेतात (स्वानुभव) म्हणून बोलले.
तसेच असही दिसून आलय की 2 व्यक्ति आपापली कागदपत्रांची फाईल ( दोघांचेही सारखेच कागदपत्र हा) घेउन गेले असता , प्रत्येकाकडून काही वेगळी कागदपत्र घेतली गेली आहेत.
8 Apr 2015 - 6:04 pm | अत्रुप्त आत्मा
त्रासातून मांडला गेलेला असला तरी,
उपयुक्त आहे हा धागा... वाचत राहिन.. धन्यवाद
9 Apr 2015 - 8:31 am | इडली डोसा
@पि.रा. - मुलिच्या बर्थ सर्टिफिकेट माझेही सासरचे नाव लागले आहे. आणि मी अजुन माझे माहेरचेच नाव सगळीकडे वापरते. मुलीच्या पासपोर्टसाठी या गोष्टीचा मला काही त्रास नाही झाला. पण माझ्या पासपोर्टवर नवर्याचे नाव आहे. जे मुलीच्या बर्थ सर्टिफिकेट वरही आहे.
तुम्हाला अजुन माहिती हवी असेल तर मला व्य.नी. करा.
8 Apr 2015 - 7:18 pm | सौन्दर्य
२००७ साली मुंबईत वरळीला स्वता जाऊन, सकाळी ५ वाजल्यापासून रांगेत उभे राहून (एजंटची मदत न घेता) पासपोर्ट काढण्याचा प्रयत्न केला होता. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील दोन महिने झाले तरी पासपोर्ट हाती लागला नव्हता. वरिष्ठ अधिकार्यांची भेट घ्यायचा प्रयत्न केला होता तरी काहीही झाले नाही, नाईलाजाने शेवटी एजंट गाठला आणि त्याच कागदपत्रांच्या जोरावर घरपोच पासपोर्ट आला. बहुतेक सर्व अधिकारी महाराष्ट्रीयनच होते.
8 Apr 2015 - 8:57 pm | रामपुरी
२००३ साली वरळी ऑफिसला पासपोर्ट काढला होता. काहिही अडचण आली नाही. लाच न दिल्याने पोलिसाने 'पत्ता तंतोतंत जुळत नाही' (फक्त काही अक्षरे जुळत नव्हती) असे कारण देऊन अर्ज परत पाठवायची धमकी दिली. मला गडबड नसल्याने त्याला "पाठव परत" म्हणून सांगितले. एवढे सगळे होऊनही ६ महिन्यात पासपोर्ट घरपोच आला होता.
9 Apr 2015 - 7:34 am | इडली डोसा
पुणे पासपोर्ट ऑफीस चा फारच वाईट अनुभव आला .
इथे वरिष्ठ अधिकारीच खालच्यांना सामील आहेत.
माझी मुलगी २ महिन्यांची होती . मी माझा पस्स्पोर्ट रिन्यू आणि तिचा नवा पासपोर्ट करण्यासाठी तत्काळमध्ये ऑनलाईन अपाँटमेंट घ्यायचा प्रयत्न केला. २ आठवडे रोज प्रयत्न करूनही अपाँटमेंट मिळाली नाही . त्यामुळे माझ्या गावाहून लहान मुलीला घेऊन पुण्याला गेले.
ऑनलाईन अपाँटमेंट मिळत नसेल तर से.बा. रोड पुणे पासपोर्ट ऑफीसला जाऊन अपाँटमेंट घेऊ शकतो . कॉल सेंटरला कॉल केल्यावर त्यांनी सांगितले कि ज्यांच्यासाठी अपाँटमेंटहवी त्या व्यक्ती प्रत्यक्षात अपाँटमेंट घेताना तिथे हजार पाहिजेत . (लहान मुल असेल तर ते सुद्धा )
प्रत्यक्षात तिथे गेल्यावर मुलीला आणायची गरज नाही असे कळाले. (सगळा नुसता भोंगळ कारभार आणि आपल्याला मनस्ताप )
पुढचा प्रकार आणखी जास्त त्रासदायक होता . इथे तुम्ही प्रत्यक्ष पासपोर्ट अधिकाऱ्याला भेटता आणि तुम्हाला अपाँटमेंट मिळते . या बाईंनी मला तात्काळ पासपोर्टसाठी दोन महिन्यांनतरची अपाँटमेंट दिली .
मला परदेशात नोकरीवर एका महिन्यात हजर व्हायचं होतं त्यामुळे मला एक दोन आठवड्यातली तारीख हवी होती . पण त्यांनी काहीही ऐकून न घेता माझी बोळवण केली.
यानंतर अखेरचा पर्याय म्हणून एक एजंट गाठला. त्याने पैसे घेऊन याच बाईंच्या सहीचा पुढच्या आठवड्यातल्या अपाँटमेंट तारखेचा कागद दिला.
ही दोन वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. आता काही फरक झाला असेल तर चांगलाच आहे.
9 Apr 2015 - 9:58 am | पिलीयन रायडर
लहान मुल आणि ज्येष्ठ नागरिक ह्यांना तर "वॉक इन" सुविधा आहे ना?
२४ तास आधी ऑनलाईन पासपोर्ट फॉर्म भरुन तुम्ही तिथे सकाळी बहुदा १२.३० पर्यंत जाउ शकता.
बाकी एजंटने माझ्या नवर्याचा ३ महिने प्रिंट मध्ये अडकलेला पासपोर्ट १ दिवसात काढुन दिला होता. ही गोष्ट २ वर्षापुर्वीची..
In order to facilitate submission of passport applications at Passport Seva Kendras (PSKs), some types of services such as 'Tatkaal', Police Clearance Certificates and some distinct categories of applicants such as senior citizens, minors and differently-abled applicants are allowed to submit their duly registered online applications with ARN as Walk-in applicants. Applicants coming under these categories are also required to submit their applications online and obtain an ARN, and then visit the nearest Passport Seva Kendra (PSK) during prescribed hours (no prior appointment is required). In addition, applicants should also refer to any advisory issued by the concerned Passport Offices from time to time.
9 Apr 2015 - 10:08 am | खेडूत
परदेशांत जाणारच असाल तर तिथे नुतनीकरण करून घेणे अतिशय सोयीचं असतं. विशेषतः युरोपात वकीलातीसाठी फार दूर जावं लागत नाही. सगळे कागद असतील तर ४ दिवसात नवा पासपोर्ट येउन जातो!
9 Apr 2015 - 10:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
लिगली नावं बदलुन घ्यायची प्रोसेस करुन मिळालेली सर्टिफिकेट्स चालतील असं वाटतं आहे.
10 Apr 2015 - 8:26 pm | वेताळ
बाबु म्हणुन एक्जण अहे तिथे.काय प्रोब्लेम आहे एक्पण नीट सांगत नाही.
11 Apr 2015 - 1:23 pm | आशु जोग
प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते.
असली बेजबाबदार विधाने करायची असतील तर कृपया अधिक चांगला देश पहा आणि सुखाने रहा. सरकारी कर्मचारी काही दुसर्या देशातून येतात का ? तुमच्यासारख्या जनतेमधूनच येतात नाहा लेख अतिशय ढोंगी वाटतो आणि आपल्याला फटका बसला की इतरांना जबाबदार धरणार्या प्रवृत्तीचा वाटतो. या ऑफीसमधे अनेकांना आजवर उत्तमच अनुभव आलेला आहे. काही भाग टी सी एस आणि काही परराष्ट्र मंत्रालयाकडे आहे. सर्वजण अत्यंत सौजन्याने वागतात. रोज एवढ्या मोठ्या संख्येत येणार्या लोकांचे काम हाताळायचे आणि तरी चेहेरा हसतमुख ठेवायचा हे कौतुकास्पद आहे. यात काडीचीही अतिशयोक्ती नाही.
अगदी बाहेर केवळ शंका विचारण्यासाठी एक माणूस बसलेला आहे. रोज लोक येऊन त्याला पिडतात तेच तेच प्रश्न विचारतात पण तो तितक्याच उत्साहाने उत्तरे देतो. दिलेल्या वेळेच्या स्लॉटमधे गेल्यास कामे व्यवस्थित होतात. अलिकडे तर पैसे भरणे आणि नंबर लावणे हे दोन्ही ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे सुटसुटीतपणा आलेला आहे.
कंप्युऊटर नव्हता तेव्हाही गडबड गोंधळ अजिबात नव्हता. कारण माणसे शिस्तीची आहेत.
आता यातूनही कुणाला काही त्रास झाला असेल तर त्यांनी आपले काय चुकले हे आधी सांगावे मिसळीकडे दाद मागायला येऊ नये.
11 Apr 2015 - 10:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
वा वा ! (अगदी हितसंबंधांचा सुवास यावा इतका गोग्गोड प्रतिसाद, असा विचार मनात आला. पण ते म्हणायचे टाळत आहे. ;) )
कंप्युऊटर नव्हता तेव्हाही गडबड गोंधळ अजिबात नव्हता. कारण माणसे शिस्तीची आहेत.
कुठल्या ग्रहावर ही स्थिती होती हे सांगितले असते तर बरे झाले असते !? :)
फार पूर्वीही अर्ज दाखल केला की ६ ते ८ आठवड्यात पासपोर्ट मिळायचा. आता पोर्टलवरून साधारण (ऑर्डिनरी) अपॉईंटमेंट सहा आठवड्यांच्या नंतरची मिळते आणि पासपोर्ट त्यांनतर सहा आठवड्यांनी... म्हणजे एकूण बारा आठवड्यांनी पासपोर्ट मिळतो !
काही कारण नसताना पासपोर्ट अर्ज केल्यानंतरही ३ महिने नविनिकरण करून दिला नाही तेव्हा पासपोर्ट अधिकार्याला भेटून जरा जोरात नक्की कारण विचारले तरी ते सांगता आले नाही. मात्र याचा फायदा नविन पासपोर्ट आठवड्यात मिळण्यात झाला ! का बरे ?
आजही पोर्टलवर ज्या प्रती जोडव्या त्यांची यादी आहे ती खूप जुनी आहे. तिच्या योग्य ते बदल केले जात नाहीत. तरीही लोकांनी अंतर्ज्ञानाने ते ओळखावे नाहीतर कोणतीही तक्रार न करता पुढच्या (४-६ आठवड्यांनतरच्या) तारखेला परत यावे, यात काही गैर आहे असे तेथल्या शासनाला वाटत नाही. अर्थात, लोक कंटाळून अथवा वेळेच्या कमीमुळे एजंटतर्फे जादा फी भरून आले तर आनंदाचीच गोष्ट आहे, नाही का ?
आजही तत्काळ पासपोर्टची अपॉईंटमेंट पोर्टलवर ऑनलाईन मिळत नाही, पण एजंटला हवी तेवढी फी दिली की दोन दिवसानंतरची मिळते !
भारतिय पासपोर्ट ऑफिस भारतातले असो परदेशातले, त्यांच्या कारवाईमध्ये खूप सुधारणा व्हायला हवी आहे हे नक्की.
17 Apr 2015 - 8:36 pm | आजानुकर्ण
तुमच्या मताशी एकंदरीत सहमत आहे. भारतातल्या बहुतेक सरकारी कार्यालयांमध्ये चांगलाच अनुभव आला आहे. एसबीआय वगळता इतर बँकांमध्येही खूपच चांगला अनुभव आहे. माझा सामान्य प्रक्रियेतून पासपोर्ट काढताना व बायकोचा तात्काळ प्रक्रियेतून पासपोर्ट काढताना भारतात कुठलाही त्रास झाला नाही. माझ्या ओळखीतल्या निदान २५ जणांनी पासपोर्ट काढलेत त्यांनाही काहीही त्रास झाला नाही. माझ्या आईवडिलांना पासपोर्ट काढताना कुठलाही त्रास झाला नाही. मला नंतर पासपोर्ट रिन्यू करतानाही कुठलाही त्रास झाला नाही. भारतात तीन वेळा लायसन/आरसी पत्र/गाडीविक्रीचे कागदपत्र इ. साठी जावे लागले. तिन्ही वेळा एजंट न वापरता वेळेवर लायसन व आवश्यक ती कागदपत्रे मिळाली. लायसन मिळाले तेसुद्धा २० वर्षाचे. रेशनकार्ड काढताना काडीचाही त्रास झाला नाही. गॅस कनेक्शन, फोन सेवा वगैरेमध्ये काहीही अडचण आली नाही. फोनसेवेच्या बाबतीत खाजगी कंपन्यांपेक्षा (रिलायन्स, आयडिया व एअरटेल) सरकारी कंपन्यांचा (बीएसएनएल) अनुभव चांगलाच आलाय.
याउलट गाडी चालवायच्या लायसनसाठी मला अमेरिकेत प्रत्येक वेळी प्रचंड त्रास झाला आहे. भारतात मी एजंट वगैरे वापरला नाही पण त्रास झाला असता तर निदान तो पर्याय तरी होता. अमेरिकेत तीनचारवेळा लायसन रिन्यूअल करताना इथल्या कार्यालयांमधला प्रचंड वेळखाऊपणा आणि मंदबुद्धी कर्मचारी पाहून वैताग आला. भारतात मला दोन तासात लायसन मिळाले आहे. अमेरिकेत आता मागच्या वर्षी लायसन रिन्यू केले तेव्हा ९ वाजता ऑफिसात गेलो आणि १२.३० ला लायसन मिळाले. शिवाय व्हिश्याच्या मर्यादेनुसार लायसनही सहामहिने वगैरे मिळाले. अमेरिकेतल्या दोनतीन शहरातील पोष्ट ऑफिसात जाण्याचा प्रसंग आला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या उर्मटपणाचा कहर म्हणजे काय हे प्रत्येकवेळेस अनुभवास आले. एकदोनवेळा पोष्टमन मंडळींनी चुकीच्या डब्यात महत्त्वाची पत्रे टाकली. सामान्यपणे भारतात एकंदर पैसे देतो त्या मानाने सरकारी सुविधा फारच चांगल्या मिळतात (व्हॅल्यू फॉर मनी) असे वाटत आहे.
माझ्या अनुभवानुसार समोरचा कर्मचारी अगदी सॅडिस्ट नसेल आणि तुमची कागदपत्रे वगैरे व्यवस्थित असली तर भारतातल्या सरकारी कार्यालयात त्रास होण्याची शक्यता बरीच कमी आहे. नवरा आणि बायकोचे वेगळे नाव, मुलाच्या प्रमाणपत्रावरील आणि आईच्या पासपोर्टवरील वेगळे नाव ही उदाहरणे अजूनतरी सामान्य नाहीत. पासपोर्ट अधिकाऱ्यांनी निदान अशा केसेसमध्ये योग्य ती पडताळणी करणे आवश्यकच आहे. त्यासाठी एखादा हेलपाटा मारावा लागला तर त्याला भारताच्या सरकारी कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता मानणे चुकीचे वाटते.
19 Apr 2015 - 6:34 pm | बॅटमॅन
पासपोर्ट ऑफिसचा अनुभव चांगलाच आहे, पण लायसन्सचाही चांगला आहे? नक्की? विथौट एजंटवाल्यांना ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास केल्याची उदाहरणे पाहिलीत, कागदपत्रांतही अडवणूक केलेले पाहिलेय म्हणून विचारतो. माझा अनुभव पुण्यातला आहे.
20 Apr 2015 - 6:57 pm | आजानुकर्ण
माझा अनुभव पिंपरी चिंचवड आरटीओ (चिखली) इथला आहे. मुळात सरकारी काम असो किंवा खाजगी, खालील गोष्टी नेहमी जवळ ठेवाव्यात. बहुतेक वेळा काम होतेच.
१. २-३ पासपोर्ट आकाराचे फोटो
२. दोन वेगवेगळे आयडीप्रूफ (उदा. लायसन व पॅनकार्ड - ओरिजनल) व त्याच्या दोन साक्षांकित प्रती
३. दोन वेगवेगळे अॅड्रेसप्रूफ (उदा. लाईटबिल व आधारकार्ड) व त्याच्या दोन साक्षांकित प्रती
४. सुटे पैसे
५. २-३ रेवेन्यू स्टँप
अनेकदा अडचणी खालीलप्रमाणे असतात
१. फोटो नाही. (तरीही सरकारी अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता)
२. आयडी/अॅड्रेसप्रूफ फक्त ओरिजिनल आहे. झेरॉक्स/साक्षांकित प्रत नाही.
३. जवळचा झेरॉक्सवाला बंद आहे.
४. थोडा लांबचा झेरॉक्सवाला सुटे पैसे घेतल्याशिवाय प्रत काढून देत नाही.
५. नोटरीला कुठे शोधू
६. बँकेत/पोष्टात रेवेन्यू स्टँप मागितला. तो तिथे मिळत नाही.
या सर्व गोष्टींमुळे एखाददोन हेलपाटे वाढतात. आता ही आवश्यक कागदपत्रे आहेत अशी सरकारची इच्छा आहे. बहुतेक वेळा सरकारी अधिकारी मनमानी करत नसतात. अापल्यालाच आपली चूक झाकण्यासाठी किंवा गैरसोय टाळण्यासाठी प्रीमियम सर्विसची अपेक्षा असते. त्याची फी म्हणजे लाच किंवा एजंट.
20 Apr 2015 - 7:06 pm | बॅटमॅन
कागदपत्रांची पूर्तता करणे याच्याशी सहमत आहेच, फक्त आरटीओमध्ये इतके सहज काम विथौट एजंट होत नाही असे वाटते इतकेच. असो.
17 Apr 2015 - 9:13 pm | अनुप ढेरे
हेच बोल्तो. बाकीच्या सरकारी हपिसांना श्या घालणार्यांकडून देखील या पासपोर्ट ऑफिसमधल्या कार्यक्षमतेच कौतुकच ऐकलं आहे.
17 Apr 2015 - 9:39 pm | आजानुकर्ण
सुमारे बारा वर्षापूर्वी मार्केट यार्ड (गुलटेकडी) येथे पासपोर्ट काढतानाही कर्मचाऱ्यांचा अनुभव चांगला आला होता. मात्र दुर्दैवाने तिथे उभे राहण्यासाठी योग्य जागा नव्हती. विशेषतः कडाक्याच्या उन्हात वा पावसात त्रास होत असावा असा अंदाज आहे. मे महिन्यात अर्ज देताना चांगलाच घाम फुटला होता. मात्र तीनचार वर्षापूर्वी बायकोचा पासपोर्ट काढला तेव्हा ते ऑफिस बदलून सेनापती बापट रस्त्यावर आले होते. झाडांची छान सावली, हवेशीर परिसर आणि पटापट पुढे सरकणारी रांग पाहून फारच हायसे वाटले. ऑफिस उघडल्यावर तासाभरात आत जाऊन कागदपत्रे देऊन आम्ही न्याहारी करायला युनिवर्सिटीजवळही पोचलो होतो. नंतर एकदोनदिवसात फाईल नंबर वगैरे उपलब्ध झाल्यावर सर्व स्टेटस ऑनलाईन चेक करता आले. अर्थात सरकारी कार्यालयाच्या बाबतीत आपले ते कार्टे आणि दुसऱ्याचा तो बाब्या ही परिस्थिती असतेच. अमेरिकेच्या व्हिश्याच्या लायनीत उन्हातानात दंडुके खात उभी राहणारी पब्लिक भारताच्या पासपोर्टच्या लायनीला मात्र कायमच शिव्या देताना पाहिली आहे.
11 Apr 2015 - 11:36 pm | टवाळ कार्टा
ठान्यातल्या ओफिसात एकदम पटकन काम झाले रिन्यु करायचे
17 Apr 2015 - 5:33 pm | पिलीयन रायडर
गरज पडली तर म्हणून..
१. कुणाला पुणे ऑफिसमध्ये पा.पो काढायला चांगला, भरवशाचा एजंट माहिती आहे का?
२. मुलाचा पा.पो शक्य तितक्या लवकर काढायचा असेल तर काही ऐडियाज आहेत का??
17 Apr 2015 - 8:50 pm | आजानुकर्ण
एका परिचिताला गिरिराज ट्रॅवल्सचा खूप चांगला अनुभव आला आहे. वयस्कर असल्याने त्यांना एकदोनदा एजंटची आवश्यकता भासली आहे.
+91-20-24436157
1 Mukta Apartments, Near Hotel Natraj Swargate, Pune-411009
पिंपरी चिंचवड परिसरातील एक थोरात म्हणून एजंटची सेवा मी वडिलांच्या पासपोर्टसाठी घेतली होती. त्यांचा नंबर मिळाला तर पाहतो. या एजंटने अपॉईंटमेंट वगैरे सर्व कामे हाताळली. अपॉईंटमेंटच्या दिवशी घरून वडिलांना पिक केले. अपॉईंटमेंटनंतर घरी ड्रॉप केले. माफक फी होती (दोन वर्षापूर्वी १००० रु.). चिंचवडवरुन सेनापती बापट रोड ला रिक्षाने जाणेयेणे यातच निम्मे पैसे गेले असते. शिवाय मी हजर नसल्याने कागदपत्रांची पडताळणी वगैरे करणे वडिलांना जमले असते असे वाटत नाही.
17 Apr 2015 - 9:05 pm | श्रीरंग_जोशी
गिरिराज ट्रॅवल्सची सेवा आई वडिलांच्या अमेरिकन टुरिस्ट व्हिसासाठी घेतली होती.
डि एस १६० मी आधीच भरला असल्याने त्यांनी केवळ कॉन्सुलेटची फी भरणे व अपॉइंटमेंट बुक करणे ही कामे केली. त्यांच्याकडे जाण्याचे एकमेव प्रयोजन होते की कॉन्सुलेटमधील मुलाखतीमध्ये विचारल्या जाणार्या प्रश्नांची व्यवस्थित माहिती मिळणे. दुर्दैवाने त्याबाबतीत त्यांच्याकडून त्याबाबतीत काही विशेष मार्गदर्शन मिळाले नाही.
17 Apr 2015 - 9:41 pm | आजानुकर्ण
व्हिश्याबाबत कल्पना नाही. मात्र आमच्या परिचितांनी त्यांचा तात्काळ पासपोर्ट गिरीराजकडून करुन घेतला होता. गिरीराजवाल्यांनी झेरॉक्स, अटेस्टेशन, वगैरे सगळी कामे हाताळली.
17 Apr 2015 - 9:54 pm | श्रीरंग_जोशी
त्यांच्या सर्वच कामांचा दर्जा वाईट असेल असे माझे म्हणणे नाही.
याच प्रकरणात त्यांच्याकडून आलेला नकारात्मक अनुभव म्हणजे. मी डि एस १६० काही महिने अगोदर भरला होता पण सबमिट केला नव्हता. तेव्हा माझे अमेरिकेतील घर बदलत होते म्हणून त्यांना सांगितले की एक दिवस थांबा मी माझ्या नव्या घराचा पत्ता डी एस १६० मध्ये अपडेट करतो. त्या क्षणी नेमका पत्ता (युनिट क्रमांक) कळला नव्हता म्हणून.
ही बाब त्यांना मी इमेलद्वारे व वडिलांनी प्रत्यक्षात भेटून सांगूनही त्यांनी तोच डि एस १६० सबमिट करून टाकला.
नंतर त्यांना हे लक्षात आणून दिल्यावर त्यांनी सल्ला दिला की मुलाखतीच्या वेळी अमेरिकेतील पत्ता विचारला तर जुनाच सांगा. असे करणे (खोटे बोलणे) मला व वडिलांना पटत नसल्याने नवा पत्ता सांगायचे ठरवले होते. मुलाखतकर्त्याने विचारल्यास डि एस १६० सबमिट करते वेळी जुन्या पत्त्यावर वास्तव्य होते असे सांगावे अशी योजना होती.
सुदैवाने पत्त्याबाबत प्रश्न विचारला गेला नाही.
17 Apr 2015 - 10:46 pm | आजानुकर्ण
मी गिरीराज ट्रॅवलचा मालक, भागीदार किंवा हितचिंतक नाही. :) त्यामुळे ही माहिती माझ्यासाठीही उपयुक्त आहे. धन्यवाद.
19 Apr 2015 - 3:19 am | ईंद्रनिल
एजंटची गरजच नाही तुम्ही ऑनलाईन फ़ॉर्म भरुन १५०० रुपयात काम उरकु शकता,आणि एजंट वगैरे फ़सवाफ़सवी धंदे आहेत,ते लोक पण नेऊन लाईनतच उभे करतात.
19 Apr 2015 - 3:16 am | ईंद्रनिल
मला निराळाच अनुभव आलाय,गर्दी होती हा काय पासपोर्टवाल्यांचा दोष नाही,आणि ही एवढी दहा कागदपत्र घेऊन तुम्ही कशाला गेला होतात? एवढी कागदपत्रं लागतच नाहित,पाहिल्या ठिकाणी जेवढी रांग असेल तेवढा वेळ लागतो पण तेथे काय भाराभर माणसे आत सोडत नाहित,प्रत्येकाच्या वेळेनुसार गटाने माणसे आत सोडतात,ठसे घेणे वगैरे प्रक्रिया सुलभ आहे,आत मस्त ए.सी. असुन खाण्यापिण्याची सोय आहे, टिव्ही वर आपला नंबर कुठल्या टेबलावर आला आहे याची सुचना मिळते,तेथिल लोक सहकार्यशिल आहेत,दिवसभर इतक्या लोकांचे वेगळे अनुभव घेऊन कदाचित कधितरी निराळा अनुभव येऊ शकतो पण अत्यंत सुलभपणे आता पासपोर्ट मिळतो,तुम्ही उल्लेख केलेली कित्येक कागदपत्र पोलिस स्टेशनमध्ये वकिलाचा शिक्का मारुन जमा करावे लागतात.स्टेशनमध्ये अर्थातच चहा पाणी करावाच लागतो नाहितर चेकिंग बरेच दिवस सुरुच रहाण्याची शक्यता असते.
20 Apr 2015 - 2:53 pm | पिलीयन रायडर
@ आशु जोग दादा..
मी कधीही असं म्हणलय का की हा घोळ सरकारने घातलाय? बाळाच्या जन्माच्या वेळेस परिस्थिती गंभीर होती. तेव्हाच्या गडबडीत ह्या मुद्द्याचे गंभिर्य लक्षात आले नाही आणि तशीच सही करुन आम्ही माहिती पुढे दिली. चुक आमचीच आहे. पण १०० करोडच्या देशात अशा चुका होत नसतील का? मग त्यावर काहीच उपाय कसा नसेल..?
असो.. तर पुढची कहाणी..
मी आज पासपोर्ट ऑफिस्मध्ये जाउन आले. (सोम-शुक्र (बुधवार सोडुन) , वेळ सकाळी १०-१२.३० ) तिथे भली मोठी लाईन होती. (लगेच शॉर्ट लॉव्हचा मेसेज बॉसला केला). १ तासाने माझा नंबर आला. त्या माणसाने प्रॉब्लेम ऐकुन एका चिठ्ठीवर काही तरी खरडले. ती दाखवुन आत ऑफिसात गेले तर अजुन एका मोठ्या लाईन मध्ये बसवले. DPO ना भेटावे लागेल म्हणे. ११.१५ ते १.३० वाट पासुन नंबर लागला. (मग हाफ डे चा मेसेज करुन ठेवला..) त्या बाई कुर्मगतीने समोरचे काम उपसत होत्या. एक एक माणुस आत १०-१५ मिनिटं थांबत होता.. का कोण जाणे?
माझा नंबर आल्यावर मी त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी हात वर केले, म्हणे मी काहीच करु शकत नाही, बर्थ सर्टीफिकेट बदलुन आण. म्हणलं सरकारचा नियम आहे, बदलुन देत नाहीयेत. बाईंना अदगी पार गयावया करुन सांगुनही त्यांनी काहीही ऐकले नाही. मग म्हण्लं मी श्री.गोतसुर्वे ह्यांना भेटते (IFS Officer) म्हणे मीच तुझे कागद नेउन दाखवते. अजिबात मला त्यांना भेटु दिलं नाही. परत येऊन म्हणाल्या की "साहेब म्हणाले, सर्टीफिकेट बदलुन आणा, सगळे आणतात..".. पुन्हा पुन्हा मी सरकारी नियम दाखवुनही कुणीही काहिही ऐकुन घेतले नाही.
मग मनाची तयारी केली फुल डे लीव्हची, म्हणलं आता कार्पोरेशनला जाउन येउ. पण त्याआधी सारथी हेल्पलाइनला कॉल केला. ते लोक म्हणे बदलता येत नाहीच, फारतर ज्या सरकारी दवाखान्यातुन दाखला घेतला तिथे वैद्यकीय विभागात उप-निबंधकाला भेटा. जे भेटतील अशी काही आशा नसल्याने मी २५ किमी ताबडत जाण्या ऐवजी हापिसात येणे पसंत केले.
मला जन्मदाखला बदलुन मिळेल ह्याची काडिमात्र आशा नाही. आणि पा.पो मध्ये कागदपत्र तरतील ह्याची सुद्धा...
आता माझ्याकडचे काही पर्याय :-
१. आहे ते कागदपत्र घेउन पा.पो अप्लाय करणे. माझा पा.पो न दाखवता मुलाच्या पा.पोवर माझे सासरचे नाव पडु देणे. मग पुढे विसाला वगैरे नवा बखेडा उभा राहिला तर काय हा प्रश्न आ वासुन उभा आहेच..
२. पेपरमध्ये नाव बदलाची जाहिरात देणे, पण उलटी.. म्हणजे सासरचे नाव सोडून माहेरचे वापरत आहे अशी.. आणि मग अप्लाय करुन पहाणे.
३. स्वतःचे नाव बदलणे हा पर्याय मी समोर ठेवलाच नाहीये..
(जो अभी अभी ट्युन इन हुवे है उनके लिये!! माझा प्रॉब्लेम असाय की:-
माझ्या मुलाच्या बर्थ सर्टिफिकेट वर माझे नाव सासरचे लागले आहे. मी कुठेही सासरचे नाव लावत नाही. आता मुलाचा पासपोर्ट काढताना माझा नि माझ्या नवर्याचा पासपोर्ट ह्यावरील माझे नाव आणि बर्थ सर्टिफिकेट वरचे माझे नाव ह्यात फरक आहे. म्हणुन मग अर्थातच प्रॉब्लेम येणार. तर ह्यासाठी काय करता येईल हे विचारणे चालु आहे.मला माझे नाव बदलायचे नाही. शक्यतो माझ्या मुलाच्या पा.पोवर माझे माहेरचेच नाव लागावे म्हणजे सर्व कागदपत्रांवर एकच नाव राहील असे वाटते. )
20 Apr 2015 - 6:10 pm | श्रीरंग_जोशी
शहाणपणाचा अभाव असल्यास सर्वसामान्य नियम आपल्या अधिकारांद्वारे कसे जाचक केले जावे हे या प्रकारच्या सरकारी अधिकार्यांकडून शिकावे.
हे सर्व प्रकरण निस्तारून झाल्यावर या प्रकाराविरुद्ध (केवळ विवाहीत आहे म्हणून एखाद्या स्त्रीचे (मध्यनाव (नवर्याचे प्रथमनाव) व आडनाव (नवर्याचे आडनाव)) बदलणे आहे असे गृहित धरणे, सरकारदरबारी पाठपुरावा करा. तुमचे स्वतःचे उदाहरण असल्याने पुरावे देणे सोपे जाईल म्हणून तुम्हाला म्हणतोय.
कदाचित राष्ट्रिय महिला आयोग याबाबतीत मदत करू शकेल.
या प्रकारचा लढा पूर्वी कुणी दिला आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो.
20 Apr 2015 - 6:19 pm | पिलीयन रायडर
मी मान्य करते की चुक आमच्याकडुन झाली आहे. पण मला असं एखाद्या अधिकार्याने "आम्ही काहीच करु शकत नाही" असे म्हणुन हात वर करणे बरोबर नाही. सर्वांकडेच सर्व कागदे बरोबर असतीलच असे नाही. म्हणुनच तर हे अधिकारी तिथे बसले आहेत मदतीला. तर त्यांनी मदत करावी. अशाने मला नाव बदलायला नशिबाने भागु पाडु नये म्हणजे झालं..
20 Apr 2015 - 7:02 pm | आजानुकर्ण
महानगरपालिका बर्थ सर्टिफिकेट बदलून देत नाही हा कधीचा नियम आहे? मी कालच मित्राला विचारले. त्याने मागील वर्षी मुलीचे बर्थ सर्टिफिकेट हॉस्पिटलमधून (व नंतर महापालिकेतून) बदलून घेतले. त्याने त्यावेळी एका वकीलाला विचारले होते तेव्हा अॅफिडेविट वगैरे करावे लागेल असे त्याचे मत होते. मात्र तसे करावे लागले नाही.
20 Apr 2015 - 7:07 pm | श्रीरंग_जोशी
जन्मदाखला घेण्याचा मला प्रत्यक्ष अनुभव नाही. त्यासाठी नवजात बाळाच्या आई वडिलांना किंवा त्यापैकी एकाला रितसर फॉर्म भरावा लागतो का? तो तुम्ही किंवा तुमच्या नवर्याने भरला असल्यास अन त्यात तुमचे सासरचे आडनाव लिहिले गेले असल्यास ती प्रत्यक्ष तुमची चूक आहे असे म्हणता येईल.
21 Apr 2015 - 10:01 am | आशु जोग
पिलीयन रायडर ताई
जिथे चूक झाली असेल तिथे दुरुस्त करा. मला सांगा बाळाच्या जन्मदाखल्यावर कोणते नाव आहे आईचे(म्हणजे सासरचे की माहेरचे) आणि पासपोर्टवर तुमच्या आणि पतीच्या कोणते नाव आहे. ते कळले तर बरे होइल
21 Apr 2015 - 12:01 pm | पिलीयन रायडर
जन्मदाखला - आईचे सासरचे नाव (वापरत नाही)
बाकी माझा पासपोर्ट / नवर्याचा पासपोर्ट / इतर कोणतेही कागदपत्र - माहेरचे नाव.
आइचे नाव असे वेगळे असल्याने पासपोर्ट मध्ये प्रश्न येतील.
जन्मदाखला पि.चि.मनपा कडुन मिळालेला आहे. तो बदलता येत नाही असा रुल आहे. मी एकदा गुगल केलं होतं तर मिळाला होता. आता मात्र तो मला सापडत नाहीये. पण सारथीला संपर्क करुन मी ह्याची पडताळणी केली आहे. आता ज्या सरकारी रुग्णालयातुन हा दाखला दिला (तालेरा रुग्णालय) तिथे वैद्यकीय विभागात काही मदत मिळते का ते पहावे लागेल.
जन्मदाखला मिळण्याची पद्धत :-
बाळाच्या जन्मानंतर सर्व माहिती हॉस्पिटल घेते - त्यावर तुमची सही घेते (इथे आमची चुक आहे. ही माहिती धांदलीत नीट न वाचताच सही केल्या गेली) - हीच माहिती सरकारी रुग्णालयात पाठवली जाते. आणि मग जन्मदाखला दिला जातो.
माझ्या सुपीक डोक्यातला प्लान
A - अॅफिडेविट करुन पेपरला जाहिरात देणे की माझे जुने नाव (सासर) बदलुन नवे नाव (माहेरचे) आहे. / मी सासरचे नाव वापरत नसुन माहेरच वापरत आहे / सासर-माहेरच्या नावाची व्यक्ती एकच असुन मी माझ्या मुलाला ह्या ह्या दिवशी जन्म दिलाय.
B - सगळं सोडुन हरी हरी करत बसणे
21 Apr 2015 - 11:28 pm | आशु जोग
म्हणजे सगळीकडे माहेरचेच नाव आहे. बदललेले नाही. शैक्षणिक कागदपत्रांतही तेच नाव असणार.
म्हणजे फक्त जन्मदाखल्यावर सासरचे नाव आहे... कारण तिथे नाव टाकताना कोणी कागदपत्र मागत नाही. आता फक्त जन्म दाखला बदलून घ्या म्हणजे त्यावरचे आईचे नाव(जे माहेरचे हवे आहे)
जन्मदाखला पि.चि.मनपा कडुन मिळालेला आहे. तो बदलता येत नाही असा रुल आहे.
पि.चि.मनपा भारतातच येते म्हणावं... सगळ्या भारतात नियम सारखेच आहेत.
अर्थात तुमच्यासारखा प्रॉब्लेम तिथेही अनेकांना आला असेल त्यामुळे दाखल्यात बदल विषयीची माहिती देणारी पाटी बाहेरच लावलेली असायला हवी. नाही म्हणायचे कारणच नाही.
आणखी एक-
येवढ्यासाठी स्वतःचे नाव बदलून घेण्याच्या फंदात पडू नका आणि ते पॅन पासपोर्ट बॅक अकाऊंट सगळीकडे करणेही शक्यही नसते त्यामुळे गोंधळ वाढेल
...
आपल्या देशात सरकारी नियम हे फारच काटेकोर आणि लाखो केसेसचा विचार करुन केलेले असतात हा विश्वास बाळगा
21 Apr 2015 - 11:38 pm | श्रीरंग_जोशी
कृपया हा लेख वाचावा - विश्वास ठेवायला शिका - संदीप वासलेकर
या लेखात मांडलेल्या मुद्द्यांविषयी आपले काय मत आहे हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.
22 Apr 2015 - 1:04 pm | आशु जोग
वासलेकर हे महान असतीलच पण म्हणून आम्हाला मिळालेले फर्स्ट हँड ज्ञान कसे नाकारायचे. आपल्याकडचे नियम विशेषतः बँक, इन्शुरन्स, प्रॉपर्टी, सिटी सर्व्हे हे अत्यंत काळजीपूर्वक बनवलेले असतात. आता एखादा अपराधी यातून सुटू नये यासाठी ते जाचक वाटत असतील तर त्याला इलाज नाही.
सॉफ्ट वेयर इंजीनयर असाल तर हे नियम नीट पहावेत. लक्षात येइल किती इफ एल्सची काळजी घेतलेली आहे.
(या लेखा निमित्ताने मनातल्या वासलेकरांच्या मूर्तीचे भंजन व्हायला सुरुवात झाली आहे)
23 Apr 2015 - 6:01 am | श्रीरंग_जोशी
नियम काटेकोरपणे बनवले गेले असतील यावर शंका व्यक्त करत नाही आहे. परंतु या सर्व नियमांच्या मुळाशी असलेल्या गृहीतकाचे काय.ते गृहीतक म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य माणूस सरकारला फसवणारच आहे हे समजूनच नियम बनवले गेले असणे.
या सर्व नियमांची सुरुवात इंग्रजांच्या काळात झाली. परक्या लोकांवर नियंत्रण ठेवायचे असल्याने तेव्हा असे नियम असणे काही आश्चर्याची गोष्ट नव्हती. पण स्वतंत्र भारताने त्यात फारसा धोरणात्मक बदल केला नाही हे सर्व समस्यांचे मूळ आहे.
तुम्ही म्हणता तशी परिस्थिती असती तर लालफीतशाही, नोकरशहा, लायसन्स / परमिट राज, सरकारी काम चार महिने थांब अशी विशेषणे / वाक्प्रचार / म्हणी तयार झाल्या नसत्या. सरकारी विभागांच्या अडवणुकीमुळे होणार्या सामान्य जनांच्या शोषणावर कितीतरी कथा, कादंबऱ्या, नाटक, चित्रपट निघाले असतील.
जी व्यक्ती (खास करून पहिल्या) नोकरीमुळे दुसऱ्या शहरात स्थिरावत असते तिला गॅस कनेक्शन, बँक खाते उघडणे, पासपोर्ट काढणे अशी कामे करताना किती नाकी नऊ येतात हे विचारून बघा. मी या सर्व गोष्टींमधून गेलो आहे. पहिल्या नोकरीच्या वेळी बहुतेकांची आर्थिक बाजू अगोदरच लंगडी असते अन अशा अनेक सरकारी नियमांचा जाच सहन करावा लागतो. सरकारी नियमन लागू असलेल्या खाजगी सेवांमध्येही सरकारी खात्यांची सावली पडलेली असते.
भारतातून परदेशात गेल्यावर बहुतेकांना आश्चर्याचे सुखद धक्के बसतात ते तिथे सहजपणे होणारी सरकारी खात्यासंबंधीची कामे बघून. अमेरिकेत बरेचदा सरकारी कार्यालयात आपले ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कुठले फोटो ओळखपत्र सोबत नेले अन अर्जावर स्वतःचा सोशल सिक्युरिटी नंबर टाकला की तुमच्या तर्फे फारसे अधिक काही करावे लागत नाही. ओळखपत्राची छायाप्रतही न्यायची गरज नसते. त्या कार्यालयातील कर्मचारी स्वतः छायाप्रत काढून ओळखपत्र लगेच परत करतात. छायाप्रतिंचे साक्षांकन नावाचा प्रकारच नाही. (सध्याच्या पंतप्रधानांनी छायाप्रतींच्या स्व-साक्षांकनाला सरकारी पातळीवर स्वीकारार्ह करून चांगला पायंडा पाडला आहे).
मी भारतात अन अमेरिकेत गृहकर्ज घेऊन घर खरेदी केले आहे. दोन्हीकडल्या अनुभवांमध्ये जमीन असमानाचा फरक आहे. अमेरिकेत मी त्यांचा नागरिक नसतानाही इतक्या सहजपणे मला या प्रक्रियांमधून जाता आले तसे भारतात एका पिढी नंतरही होईल का याविषयी शंका वाटते.
23 Apr 2015 - 11:07 am | आशु जोग
या नियमांमुळे जो चोर आहे त्यालाच त्रास होइल आणि तो पकडला जाईल. पण चोरही पास व्हायला लागला तर तो आपल्यावर अन्याय नाही का...
सरकारी काम चार महिने थांब
मी स्वतः या सगळ्याचा अनुभव घेतला आहे अगदी मोठ्या शहरापासून तालुक्यापर्यंत आणि भारतात काही प्रांतात. पण बहुतेक ठिकाणी जिथे वेळ लागतो तिथे सरकारी कार्यालयाला कामही प्रचंड असते. ऑफिसच्या वेळेनंतर आणि सुटीच्या दिवशीही येऊन कित्येक ऑफिसात काम चालते.
आणि प्रायवेटमधे फार उत्तम काम चालते असे वाटत असेल तर त्यांनी एयरटेल, आयडीया, रिलायन्स कम्युनिकेशनचा गोड अनुभव घ्यावा.
जाता जाता
तुम्ही एकटे प्रामाणिक असलात तरी बाकी सगळी जनता प्रामाणिक आहे अशी खात्री देता येइल का भारतात आणि अमेरिकेतही
22 Apr 2015 - 12:20 pm | पिलीयन रायडर
https://arogya.maharashtra.gov.in/Site/Uploads/GR/FAQs-on-Registration-o...
पान ५ पहा. मला काहीच नीट कळाअले नाही त्यातुन की बाबा नाव बदलु शकतो की नाही... (बॉल्पेन वापरावा की शाईपेन ह्यावर पण एक प्रश्न आहे.. पण आईच्या नावाबद्दल काय लिहीलय ते कळायला मार्ग नाही..)
हे ही पहा:-
http://www.censusindia.gov.in/2011-FAQ/FAQ-CRS.html#M
M.Whether a correction is allowed after registration? /strong>
Corrections or Cancellations are allowed under the provision of Section 15 of the Act and the corresponding Rules made there under. However, corrections are allowed only if it is proved to the satisfaction of the Registrar that any entry of a birth or death in any register kept by him under this Act is erroneous in form or substance, or has been fraudulently or improperly made.
हे ही पहा:-
http://www.prsindia.org/uploads/media/Registration%20of%20births%20and%2...
f it is proved to the satisfaction of the Registrar that any entry of a birth or
marriage or death in any register kept by him under this Act is erroneous in form or
substance, or has been fraudulently or improperly made, he may, subject to such rules
as may be made by the State Government with respect to the conditions on which and
the circumstances in which such entries may be corrected or cancelled, correct the
error or cancel the entry by suitable entry in the margin, without any alteration of the
original entry, and shall sign the marginal entry and add thereto the date of the correction
or cancellation.
सगळीकडे करेक्शन होऊ शकते असंच लिहीलय पण
१. तालेरा सरकारी रुग्णालय - दाखला देण्याची खिडकी
२. सारथी - पिंचिमनपाची हेल्पलाईन / आरोग्य विभागाला केलेला फोन
ह्या दोन्ही ठिकाणी मला असे करेक्शन होणार नाही हेच सांगण्यात आले. अगदी जन्म मृत्यु नोंदणी विभागाचे प्रमुख एकाच्या ओळखीचे होते, त्यांनी सुद्धा हेच सांगितले..
22 Apr 2015 - 12:57 pm | आशु जोग
ह्या दोन्ही ठिकाणी मला असे करेक्शन होणार नाही हेच सांगण्यात आले
म्हणून तुम्ही स्वतःचे नाव बदलायच्या फंदात पडू नका. पुढचे गोंधळ निस्तरता येणार नाहीत. करेक्शन करता येत नाही असे तोंडाने सांगत असतील तर त्यांना अर्ज द्या. त्यांचे लेखी उत्तर घ्या आणि मग त्यांच्या बापाकडे जा.
आणि हेच बेसिक आधारभूत डॉक्यूमेंट असल्याने ते करेक्ट मिळाल्याशिवाय त्यावर आधारीत दुसर्या कामाला हात घालू नका.
बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते
बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते
बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते
भारतात सर्वत्र नियम सारखेच आहेत. हे मी अनुभवाने सांगत आहे.
22 Apr 2015 - 2:06 pm | पिलीयन रायडर
थांबाच आता..
ह्याचा काय तो सोक्षमोक्ष लावतेच.
20 Apr 2015 - 6:32 pm | कपिलमुनी
एका महिलेने घटस्फोट घेतला होता. पण बरेच वर्षे संसार झाल्याने तिची कागदपत्र सासरच्या नावाने होती. ती पासपोर्ट रीन्यू करायला गेल्यावर तिला घटस्फोटानंतर सासरचे नाव लावता येणार नाही असे पासपोर्ट ऑफिसकडून सांगितले गेले . त्यावर तिला कोर्टात जाउन लढा द्यावा लागला.
संबधित बातमी
20 Apr 2015 - 7:04 pm | आजानुकर्ण
घटस्फोटानंतर सासरचे नाव लावण्याची परवानगी देणारा निर्णय पटला नाही.
असो.
20 Apr 2015 - 7:08 pm | कपिलमुनी
कोर्टाचा निर्णय आहे त्यामुळे नो कॉमेंट्स !
20 Apr 2015 - 7:57 pm | श्रीरंग_जोशी
तात्विकदॄष्ट्या केवळ लग्न झाले म्हणून एखाद्या स्त्रीने आपले नाव किंवा आडनावासकट नाव बदलणे पटत नसले तरी हा निर्णय मला पटतो.
लग्न झाले म्हणून असतील तिथे नाव बदलण्याच्या प्रक्रीया पूर्ण करायच्या (बँक खाती, पासपोर्ट इत्यादी) अन घटस्फोट झाला की लगेच त्याच्या विरूद्ध काम करायचे. अन हे सर्व करणे कधीच सुटसुटीत नसते. वरून भविष्यात अधिक गोंधळ होण्याची शक्यता असतेच. कुणी सरकारी अधिकारी म्हणणार की ही व्यक्ती एकच आहे कशावरून?
मला वाटते स्मिता ठाकरे यांचे अनुभवकथन वर्तमानपत्रांत आले होते काही वर्षांपूर्वी.
स्त्रियांनी लग्न झाले म्हणून आपले नाव आपोआप बदलणे ही परंपरा थांबायलाच हवी असे माझे मत आहे. आपल्या समाजात या मुद्द्यावर जागॄती जवळजवळ नसल्याने फार वाइट वाटते.
20 Apr 2015 - 8:05 pm | आजानुकर्ण
खरंय. मूल हे नवरा व बायको हे दोघांचे असते. मुलाने केवळ नवऱ्याचेच आडनाव घेणे हेही मला तात्त्विकदृष्ट्या पटत नाही. तिथे नवरा व बायको दोघांपैकी एकाचे नाव निवडण्याचा पर्यायही हवा.
20 Apr 2015 - 8:13 pm | श्रीरंग_जोशी
माझ्या ओळखीतल्या एका दांपत्याने मुलांना मध्यनाव म्हणून वडिलांचे नाव अन शेवटचे नाव (लास्ट नेम) आडनाव नाही म्हणून आईचे नाव वापरली आहेत. भारतात मुलांच्या शाळेत वगैरे अनेकदा त्यांना विचित्र प्रश्नांना व किंचित हेटाळणीला सामोरे जावे लागले. ते सध्या अमेरिकेत राहतात. तिथे काय अनुभव आहे हे मात्र ठाऊक नाही.
एक जुनी आठवण - मी पहिलीत असताना तिमाही परिक्षेत एका वर्गमित्राने प्रश्नपत्रिकेवर (नाव लिहिण्याच्या ठिकाणी) आपले संपूर्ण नाव लिहिल्यावर 'मालू' असे त्याच्या आईचे घरचे नाव पण लिहिले होते.
20 Apr 2015 - 8:22 pm | आजानुकर्ण
बहुतेक सरकारी नियम हे बहुतांश प्रजेला सोयीचे वाटतील अशा पद्धतीने बनवलेले असतात. कुणाला हट्ट धरून आईचेच नाव लावायचे असेल तर तिथली अडथळ्याची शर्यत पार करण्याची मानसिक तयारी हवी. तीच गोष्ट माहेरच्या/सासरच्या आडनावाची. वेगवेगळ्या कोर्टांचे निकाल हे त्या त्या वेळच्या केसीनुसार बदललेले पाहिले आहे. एखाद्याला हट्टाने अमुकतमुकच प्रकारचे नाव हवे असे वाटत असेल तर त्याची किंमत ही अशा स्वरुपाच्या मनस्तापातून द्यावी लागते.
हे योग्य आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. मात्र परिस्थिती ही अशी आहे.