मानसिक त्रास
काल ७ एप्रिल रोजी माझ्या आईची पुणे येथील पासपोर्ट ऑफिसची ३:४५ ची अपाँटमेंट होती.
१.व्यवस्थित भरलेला फॉर्म
२.रीसीट
३.आधार कार्ड
४ पॅन कार्ड
५. शाळा सोडल्याचा दाखला
६.दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट
७. अॅनेक्चर डी ( लग्नानंतरचे नाव बदलल्यासाठी)
८.अॅनेक्चर ए ( जन्मगाव )
९. लाइट बिल
१०. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (१ वर्षा हूनही जुने)
वरील सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याम्च्या सेल्फ अॅटेस्टेड झेरॉक्सचे २ सेट असे नेले होते.
प्रचंड गर्दी आणि २.५ तास वाट पाहिल्यानंतर नंबर आला . पहिल्या ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासून "ओके" चा शेरा मिळाला पुढे दुसर्या काउंटरवर फोटो हाताचे ठसे घेतले . एवढे होईतो ७ वाजत आले होते. पुढील माणसाने कोणतीही माहिती न देता "insuffiecient documents" असा शेरा मारला . त्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे हे विचारले असता. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली आणि दुसर्या काउंटरवर पाठवले ( त्याला मराठी येत नव्हते आणि आइचे हिंदी- इंग्लिश कच्चे आहे). आणि त्याने पुढची तारीख २१ मे टाकली आणि निघून गेला. दुसर्या काउंटरवर तिथल्या महिलेने कागदपत्रे तपासली आणि योग्य असल्याचा निर्वाळा दिला. पण तोवर हा मनुष्य सीस्टम बंद करून निघुन गेला होता.
त्या महिलेने सांगितले एकदा तुमचा अॅप्लीकेशन ऑन होल्ड स्टेटस वर गेले तर पुन्हा त्या तारखे शिवाय काहीच करू शकत नाही. या प्रकारात ८ वाजून गेले होते. प्रंचंड मनस्ताप झाला होता आणि पासपोर्ट ची पुढची तारीख २१ मे ( ४५ दिवसानंतरची) मिळाल्यामुळे बर्याच प्लॅनवर पाणी फिरले आणि यात कोणतीही चूक नसताना !
दुर्दैवाने या विरूद्ध कुठेही तक्रार करायची सोय नाही . फीडबॅक मधे लिहा किंवा कॉल सेंटरला कॉल करा ठराविक साच्याची उत्तरे मिळतात पण बेजबाबदार कर्मचार्यांची तक्रार करण्याची आणि कारवाईची सोय कुठेही नाही.
अशा गोष्टी टाळण्यासाठी
१. महाराष्ट्रात मराठी भाषिक कर्मचारी / अनुवादक असावेत.
२. प्रत्येक कर्मचार्याने काम न होण्याचे कारण लिखित स्वरूपात द्यावे.
३. तक्रार नोंदणी आणि कारवाइ विभाग असावा
(अशी दिवास्वप्ने आहेत).
प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते.
प्रतिक्रिया
20 Apr 2015 - 8:25 pm | श्रीरंग_जोशी
पण काळानुसार परंपरा सोडून काही बदल घडायला हवेतच.
आपण ज्या सुधारणांचा लाभ घेतोय त्या घडवून आणण्यासाठी पूर्वी कुणीतरी किंमत मोजली असतेच.
21 Apr 2015 - 12:07 pm | पिलीयन रायडर
@ श्रीरंग जोशी आणि आजानुकर्ण
असं नाही की सरकार माहेरचे नाव लावणार्यांना त्रास देतं. असा कुठे नियम नाही की नाव बदलावेच लागते / आपोआप बदलते. तुम्हाला पुर्ण मुभा आहे तुमचे नाव काय आहे हे ठरवण्याची. नवरा बायकोचे आडनाव वेगवेगळे आहे म्हणुन पासपोर्ट / व्हिजा / होमलोन / नोकरी ... कुठेही त्रास होत नाही.
त्रास होतो तो काही कागदप्त्र माहेरच्या न काही सासरच्या नावावर असण्याचा. हा अनेक बायकांचा प्रॉब्लेम असतो.
अशावर केवळ एका अॅफिडेविटने उत्तर काढता यायला हवे की ह्या दोन नावांच्या व्यक्ति एकच आहेत. माझ्या केस मध्ये किमान माझे नाव तरी तेच आहे, काही बायकांचे तर संपुर्ण नाव - आडनाव बदलते. त्याला कसे सिद्ध करणार की मीच ती व्यक्ति आहे. काही तरी तर उत्तर असेलच की..
21 Apr 2015 - 10:23 pm | श्रीरंग_जोशी
सरकार ठरवून त्रास देत नसेल पण माझा मुद्दा आहे की एखादी स्त्री विवाहीत असल्यास तिचे मध्य नाव (नवर्याचे प्रथम नाव) व आडनाव (नवर्याचे आडनाव) असे असणे गृहीत धरणे.
बाळाच्या जन्मदाखल्याचा फॉर्म हॉस्पिटलच्या कर्मचार्यांनी स्वतः भरला व त्यावर तुमची सही घेतली असे या प्रतिसादावरून दिसते.
प्रसुतीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये भरती होताना तुमचे जे नाव अन ओळखपत्राची छायांकीत प्रत जमा केली असेल त्यावरून ते नाव लिहिले असते तर ही चूक झाली नसती. त्यांनी स्वतःच तुमचे प्रथम नाव व बाकीचे तुमच्या नवर्याचे नाव वापरले असावे असा अंदाज आहे.
बरेचदा प्रसुतीनंतर मातेची किंवा नवजात बाळाची प्रकृती बरी नसणे अशा कारणांमुळे बाळाचे पालक घाई गडबडीत अशा फॉर्म्सची पडताळणी न करता सही करण्याची शक्यता असते. जर विवाहित स्त्रीचे मध्यनाव + आडनाव बदलले आहे हे गृहीत धरण्याची पारंपारिक सवय बदलल्यास असे घडण्याची शक्यताच शिल्लक राहत नाही.
21 Apr 2015 - 2:08 pm | अजया
पिरा अॅफिडेविट करणे आणि गॅझेटमधे ते डिक्लेअर करणे एवढे पुरावे पुरेसे आहेत.पासपोर्टच्या वेबसाईटवरची अॅनेक्शर्स बघुन घे.आणि अॅप्लाय कर.ही कागदपत्र सोबत लाव .आणि फाॅर्मवर तुला हवे तसे नाव लिहुन दे.होईल काम.
काही दिवसापूर्वीच माझ्या मैत्रीणीचे जिचे दुसरं लग्न झालंय आणि पहिल्या नवर्याचा एक मुलगा आहे,त्या मुलाचा पासपोर्ट ठाण्याला केला.काहीही कटकट न होता काम झालं.
21 Apr 2015 - 2:17 pm | पिलीयन रायडर
विचार तोच आहे.. करुन तर पाहु.. रिजेक्ट झालं तर काय म्हणतील ते करुन पाहु..
21 Apr 2015 - 11:44 pm | विकास
मी संपूर्ण चर्चा डीटेल मधे वाचलेली नाही, पण असे दिसते आहे की तुमचे नाव चुकून पण चुकीचे लागलेले आहे. जर पाहीले नसेल तर खालील दुवा आणि प्रश्न-उत्तर अवश्य पहा: (प्रश्न संबंधीत नसेल पण उत्तर आहे असे वाटते...) .
http://passportindia.gov.in/AppOnlineProject/online/faqServicesAvailable
Q29: I recently got married/divorced. How do I change my name on my passport?
A: To change the name in the passport, you have to apply for a "Re-issue" of passport and get the specified change done in the personal particulars. To check the complete list of documents to be submitted along with the application form, please click on "Documents Required" link on Home page.
22 Apr 2015 - 12:00 pm | पिलीयन रायडर
पासपोर्ट वर नाव बदलता येतेच.. रिइश्यु करुन घेता येईल.. पण ते करायचं नाहीये.
मला मुलाच्या जन्मदाखल्यावर माझं जे नाव लागलं आहे (सासरचं) ते बदलायचं आहे कारण मी ते वापरत नाही.
27 Apr 2015 - 12:37 pm | पिलीयन रायडर
सरकारी रुग्णालय
शनिवारी जाऊन इथे चौकशी केली. हातात एक कागद देण्यात आला ज्यावर काय काय करावे लागेल हे लिहीले होते:-
१. मी १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र.
२. मला ओळखणार्याने / शेजार्याने १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र. (दोन्ही प्रति़ज्ञापत्र "नागरी सुविधा केंद्रातुन"च करायचे)
३. दोघांचेही रेशनकार्ड - प्रभारी अधिकार्याला ओरिजिनल दाखवुन स्वाक्षर घेणे .
४. नावात बदलाचे पुरावे - रेशनकार्ड / लायसन्स / पॅन कार्ड / मतदानकार्ड / बँक पासबुक (ह्यात ६-७ कागदपत्रांची लिस्ट आहे पण पासपोर्ट लिहीलेला नाही..!!)
४. मा. उपनिबंधकांना विनंती अर्ज
५. मा. उपनिबंधकांसमोर जबाबी
आज नागरी सुविधा केंद्रातील अनुभव -
आकुर्डी येथील नासुकें मध्येच हे काम होते. तिथे गेलो तर म्हणे तुम्हाला तुमचा स्टॅम्प पेपर आणावा लागेल. मग जाउन तो घेऊन आलो. मग म्हणे खाली साहेब बसलेत त्यांना जाऊन आधी विचारा सही करतील का?
विचारलं.. तर आम्ही... आमची काकुळतीला आलेली थोबाडं.. आमच्या हातातले कागद.. कशाकडेही पहायची तसदी न घेता साहेब वदले ...
"स्कुल लिव्हिंग सर्टीफिकेट आणा..."
" पण साहेब, पासपोर्ट आहे.."
" स्कुल लिव्हिंगच पाहिजे.."
आणि नायब तहसीलदार हुडुत करुन निघुन गेले..
पासपोर्ट हा पोलीस व्हेरीफाईड असल्याने त्याला सर्वोच्च महत्व असते असल्या भ्रमात मी ते घेऊन फिरत होते. पण घरात असलेल्या स्कुल लिव्हिंगने हातातल्या पासपोर्टच्या थुतरीत मारली.. आणि पडेल चेहरे घेऊन आम्ही परत आलो..
मी एकटीच हे करायचं असतं तर मी केलंही असतं.. पण ओळखीच्या कुणाला तरी सोबत न्यायचं म्हणजे त्याही माणसाला फिरवायचं.. त्यात तिथल्या बाईने विचारल्च की हा सोबतचा माणुस साक्षिदार आहे का म्हणे मुलाच्या जन्माचा? अरे???? तुम्हाला कशाची साक्ष हवीये? माझं नाव काय आहे ह्याची? की मुलाच्या जन्माची?? म्हण्जे नक्की काय चाललय काय? परवा मित्र आणि एक फॅमेली मेंबर आणि स्कुल लिव्हिंग ते परवा काढलेले पी.एम.टीचे तिकीट.. सगळं सोबत नेणारे..
27 Apr 2015 - 1:40 pm | कपिलमुनी
धन्य तो स . कर्मचारी !
बाकी
४. नावात बदलाचे पुरावे - रेशनकार्ड / लायसन्स / पॅन कार्ड / मतदानकार्ड / बँक पासबुक (ह्यात ६-७ कागदपत्रांची लिस्ट आहे पण पासपोर्ट लिहीलेला नाही..!!)
या मुद्द्यावर बोट ठेउन लोका तुम्हालाच वेड्यात काढणार ! पण पासपोर्ट का चालत नाही याचा उत्तर मिळणार नाही.
27 Apr 2015 - 2:45 pm | झकासराव
मुलाचच नाव गॅझेट मध्ये बदलुन काम होणार नाही का?
27 Apr 2015 - 2:50 pm | झकासराव
बाकी नागरी सुविधा केन्द्र म्हणजे राजकारणी लोकांनी त्यांच्या खास माणसांचे पोट भरण्याचे केलेली सोय आहे.
मी ५० रुपयात रेशन कार्ड काढलं होतं. ते पत्ता बदलल्याने आधीच कॅन्सल करुन नवीन काढायच होतं.
नुसत आधीच कॅन्सल करायला ५०० रुपये मागितले होते. मी त्याला हुडुत करुन आलो.
आधीचा पत्ता आकुर्डीतला, नवीन चिखलीतला. चिखली हे पिंची महानगरपालिकेत येवुन सुद्धा रेशन कार्डाच काम करायला हवेली तालुका तहसील स्वारगेटला जावं लागत. ग्रामीण भाग पकडतात. त्यामुळेच आकुर्डीतुन चिखलीत कार्ड ट्रान्स्फर होत नव्हते. च्यामारी, प्रोपर्टी टॅक्स हिशेबात बरोब्बर महानगरपालिकेच्या हिशेबाने लावतात. पावसाळ्यात आमच्या येरीयाच चिखली नाव सार्थ होतं.
असो. तो एक वेगळाच वैताग.. इथे नको.
27 Apr 2015 - 5:23 pm | पिलीयन रायडर
काही प्रश्न
१. प्रतिज्ञापत्र करुन मग पेपर मध्ये तशी जाहिरात देऊन ते पासपोर्टसाठी पुरावा म्हणुन दाखवणार आहे. पण जन्मदाखला बदलायची जी प्रोसेस आहे, ती सुद्धा करायची असल्यास, आज आला तस अनुभव वारंवार येऊन त्रास होण्याचीच शक्यता वाटत आहे.
सरकारी कार्यालयात, कारण न देता सतत वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करुन अडवल्या गेले तर काय करता येते?
(जसे की पासपोर्ट गृहीत धरता येत नाही, स्कुल लिव्हींग आणा.. ह्या पद्धतीची मनमानी)
२. मला आडुन लाच मागितली तर मी काय करु शकते?
27 Apr 2015 - 5:57 pm | आशु जोग
१. मी १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र.
आणि तरी तुम्ही घेवून गेला नाहीत याला जग काही करु शकत नाही.
दुसरी गोष्ट मुलाच्या जन्मदाखल्यात आईचे नाव चुकले आहे(किंवा जे आहे ते कोणत्याही कागदपत्रावर नाही)
त्यामुळे तेवढेच बदला. म्हणजे सगळी कागदपत्रे एकसारखी होतील. बस्स या पलिकडे काही नको आणि पेपरमधे जाहिरातीची काय गरज. तुम्ही नाव बदलत नसून. दाखल्यात करेक्शन करत आहात.
लोक बेजबाबदारपणे अनेक उलटे पालटे सल्ले देतील त्याकडे दुर्लक्ष करा नाहीतर अभिमन्यू होइल
27 Apr 2015 - 6:55 pm | पिलीयन रायडर
अहो हो.. स्टॅम्प पेपरच नक्की माहित नव्हतं मला कारण डोमेसाईलच्या वेळेस तिथेच प्रतिज्ञापत्र करुन त्यावर बहुदा १०/- चा स्टॅम्प लावतात. फोटोही तिथेच काढतात हे पाहिलं होतं. म्हणुन चक्कर मारुन पाहिली. तेव्हाच मला ह्या साहेबांनी सांगितलं असतं की तुम्हाला स्कुल लिव्हींग लागेल तर मी आणलं नसतं का? शिवाय स्कुल लिव्हिंगच का ह्याचं उत्तर काय?? ते नेल्यावर नवीन काही मागणार नाही कशावरुन?
वरचं सगळं वाचुन तुम्हाला काय वाटतं? काय जास्त सोप्पं आहे?
नासुकें - सरकारी रुग्णालय - महानगरपालिका - बॅक टु सरकारी रुग्णालय - मध्ये कधी तरी उपनिबंधकांसमोर जबानी - मग फायनली पापो ऑफिस
की
नोटरी - पेपर अॅड - पापो ऑफिस
28 Apr 2015 - 8:00 am | आशु जोग
पकडलाय मार्ग तोच योग्य आहे. दुसरं काही करायला जाल तर त्या गोंधळाच्या विचारानेही माझ्या अंगावर काटा येतोय.
आपली कागदपत्रे पूर्ण ठेवा. अडचण आली तर बापाला(वरच्या साहेबाला) भेटा.
26 May 2015 - 6:52 pm | कपिलमुनी
पुढच्यास ठेच मागचा शहाणा !
तुमच्या स्वतःच्या नावामधे , पालकांच्या नावामध्ये कुठे कॄ , मॄ असेल बाळकृष्ण , अमृता तर त्याचे इंग्रजी नाव तपासून पहा .
काही ठिकाणी बाळकृष्ण चे स्पेलिंग balkrishna तर कुठे balkrushna तसेच अमृता चे amrita किंवा amruta असेही लिहितात.
पण पासपोर्ट काढताना जर तुमच्या कोणत्याही डॉक्युमेंटवर या पैकी दोन्ही नावे असतील जसे की शाळेच्या दाखल्यावर amrita आणि मॅरीज सर्टिफिकेटवर amruta तर तुम्हाला अॅफेडेव्हिट करून द्यावे लागते. ते सुद्धा अॅनेक्शचर ई आणि ते २ पेपर मधे छापावे लागते. आणि सदर पेपर सोबत घेउन जावे लागतात.
असेच तुमचे नाव वेगवेगळे कागदपत्रांवर दिपक किंवा दीपक असेल तरी करावे लागते.
--------------------------------------------------------
27 May 2015 - 12:58 pm | पिलीयन रायडर
इथ माझ्या प्रश्नावर अनेकांनी खुप मदत केली. इथे खुप माहिती मिळाली तसंच व्यनि करुनही अनेकांनी आवर्जुन माहिती दिली. ह्याबद्दल धन्यावाद!!
"जन्मदाखला बदलुन मिळतोच" हे ठामपणे सांगितल्याबद्दल आशु जोग ह्यांचे विषेश आभार!!
इथुन प्रेरित होऊन मी परत तालेरा रुग्णालयात जाऊन चौकशी केली तेव्हा
१. मी १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र.
२. मला ओळखणार्याने / शेजार्याने १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र. (दोन्ही प्रति़ज्ञापत्र "नागरी सुविधा केंद्रातुन"च करायचे)
३. दोघांचेही रेशनकार्ड - प्रभारी अधिकार्याला ओरिजिनल दाखवुन स्वाक्षर घेणे .
४. नावात बदलाचे पुरावे - रेशनकार्ड / लायसन्स / पॅन कार्ड / मतदानकार्ड / बँक पासबुक (ह्यात ६-७ कागदपत्रांची लिस्ट आहे पण पासपोर्ट लिहीलेला नाही..!!)
४. मा. उपनिबंधकांना विनंती अर्ज
५. मा. उपनिबंधकांसमोर जबाबी
हे देऊन काम होइल म्हणाले होते. नागरी सुविधा केंद्रात जाऊन काय अनुभव आला हे इथे लिहीले आहेच.
तर दोन दिवसांनी स्कुल लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन गेलो परत नागरी सुविधा केंद्रात. बरोब्बर १० वाजता गेलो तरी तिथे स्मशानशांतता होती. तिथल्या शिपायांना विचारुन आधी खात्री केली की जे साहेब पटकन सही देतात ते आज ११ पर्यंत का होइना पण येणार आहेत. मग आम्ही प्रतिज्ञापत्र करायला वरच्या मजल्यावर गेलो.
१० वाजता कार्यालय सुरु होईल म्हणजे १० ला आम्ही फरशा पुसायला घेऊ असा अर्थ होतो हे मला माहित नव्हतं! शटर अर्धवट उअघदुन आत साफसफाई चालु होती. १० मिनिटांनी मग लोकच ते उघडुन आत घुसले. मी पळत जाऊन योग्य काउंटर गाठुन तिथल्या बाईला सांगितलं की आज माझ्याकडे सर्व कागदपत्र आहेत. द्या मला प्रतिज्ञापत्र. ओके म्हणुन मॅडम खुर्चीवर बसल्या. मग विचारलं की नक्की प्रॉब्लेम काय आहे. मी सांगितल्यावर म्हणे
"का पण? नाव का नाही बदलत तुम्ही?"
"अहो मॅडम, तसा नियम नाही कुठे. तुम्ही द्या ना"
"नियम माहितीये हो.. पण तुमचं नवर्याशी पटत नाही का??"
"अहो..... तसं काही नाहीये.. तुम्ही द्या ना"
आता मला परत एकदा "बरं असतं नाव बदललेलं.." हे प्रवचन परत एकदा गरज नसताना १२६२७ व्यांदा ऐकावं लागणार काय... पण नाही.. मॅडमना तेवढयात फोन आला न मी सुटले.
मग पुढची २० मिनिटं मॅडम फोनवर बोलत.. एका हातानी टाईप करत कसं बसं काम करत होत्या. १५ लोक तुम्हाला टक लावुन पहात असताना "अय्या हो.. कै तरीच बै तुमचं..!! ही ही ही... असं नाही जा... तुम्ही तर बुवा फारच फनी... ही ही ही" अस मुरके मारत, पापण्यांची पिटपिट करत कसं काय बोलता येतं देव जाणे.
पण शेवटी २ प्रतिज्ञापत्र हातात आली. खालच्या साहेबांनी १५ सेकंदात त्यावर सही केली. मग संपुर्ण सेटची झेरॉक्स करुन स्वतःकडे ठेवली आणि सर्व कागदपत्र तालेरा मध्ये सबमीट केले. पोच म्हणून झेरॉक्स सेट्वर सही घेतली. हे झालं २९ एप्रिल २०१५ ला.
मध्ये ३-४ चकरा मारुन शेवटी आज २७ मे २०१५ ला मनपा कडुन आदेश आला की नावात दुरुस्तीस हरकत नाही!! त्याला परत एकदा जन्मदाखला मिळावा म्हणुन अर्ज जोडला. आता ४-५ दिवसात मिळुन जातील दाखले!!!
२. मला माझा पासपोर्ट रिइश्यु आणी मुलाचा नवा पासपोर्ट करायचा आहे. एकंदरीत आजवर मला माहित नसलेली माहिती जी कदाचित तुमच्याही उपयोगी पडु शकेल.
अ. तत्काळ रिइश्यु साठी Annexure F (Letter Class 1 officer ) लागत नाही.
आ. लहान मुलांच्या तत्काळ्साठी सुद्धा Annexure F (Letter Class 1 officer ) लागत नाही.
इ. तुमचे नाव असलेले एक तरी अॅड्रेस प्रुफ लागतेच. बायकांना नवर्याच्या नावावरचं लाईट बिल किंवा इतर कागद चालत नाहीत. तुमचं लग्न झालय (विवाह नोंदणी) आणि नवरा अमुक ठिकाणी रहातो (अॅड्रेस प्रुफ) एवढेच ह्यातुन सिद्ध होते. तुम्ही तिथे रहात आहात हे सिद्ध होत नाही. म्हणून एकतरी अॅड्रेस प्रुफ तुमच्या नावचे हवे (सगळ्यात सोपे म्हणजे बँकेचे पासबुक)
ई. मुलाचे आई/ वडील परदेशात असतील तर परदेशातल्या पालकाची संमती मिळवायला तिथल्या एम्बसी मधुन sworn affidavit मिळवावे लागते. (ह्याबद्दल अजुन माहिती असल्यास सांगावी)
27 May 2015 - 4:34 pm | मॅक
सगळा लेख वाचला..
मला 11 जून तारीख मिळाली आहे. ठाणे पासपोर्ट ऑफीस... वरील सुचनांचा चांगला फायदा होईल असे वाटते.... तयारी करूनच जातो.... बघुया काय होतय...पत्नीच्या नावाच्या बदलाच्या पुराव्याबाबत माहीती मिळाली तयारी करून जातो....आल्या नंतर पुन्हा सांगतो काय झाले ते...........धन्यवाद