अकादमी मधे आता जवळ जवळ 8 महीने झाले होते, गेट च्या आत यायच्या आधी जो एक होमसिक हळवा बापूसाहेब होता तो 8 महिन्यात कुठे अन कधी गेला हे आजकाल मला पडलेले कोड़े होते, जवळपास सगळ्यांचीच अवस्था तशीच होती , आलो तेव्हा फिजिकल करताना आमची होणारी अवस्था आठवुन आम्ही आपापसात हसत असु त्या दिवसांत. आमच्या ट्रेनिंग चा एक एक पदर हळुहळु उलगडत होता. आता जे मोड्यूल होते ते होते बेसिक माउंटेनियरिंग उर्फ़ प्रार्थमिक गिर्यारोहण. वेगवेगळी गिर्यारोहणाची इक्विपमेंट त्याचे उपयोग इत्यादी ह्यात शिकवले जात असे. कारण मैक्सिमम ड्यूटी तिकडेच असणार होती आयुष्यभर. ह्यात नैसर्गिक प्रेरणे ने हीरो होता आमचा सांगे. नॉर्थ सिक्किम मधे मंगन नावच्या गावचा होता तो!. अर्थात माउंटेनियरिंग चे ट्रेनिंग पुढे वेगळ्या ठिकाणी होत असे कारण ते ट्रेनिंग इकडे मैदानात देणे अशक्य होते. सांगे मात्र रोज आमची revision घेत असे . वेगवेगळ्या दोर्या त्यांची tensile limit , रॉक क्राफ्ट ची इक्विपमेंट, स्नो एंड आइस क्राफ्ट ची इक्विपमेंट ह्याची प्रार्थमिक माहिती आम्ही घटवत असु, रोज रात्री डिनर नंतर बेइज्जती मंडपात ह्याची ही उजळणी सुरु असे, आजकाल आमच्या अण्णा ची ही हिंदी सुधारली होती म्हणुन त्यांच्यासाठी असलेला राखीव वेळ आता ह्या उजळणी मधे सतकर्णी लागत असे. 8 महीने झाल्या मुळे असेल बहुतेक पण, आजकाल आम्हाला कधी मार्किट ला जायचे असल्यास ड्रेस कोड (नेवी ब्लू ब्लेजर, पैंट , टाई, सॉक्स, पांढरा शर्ट अन ब्लैक शूज) मधे जायची परमिशन असे, फुल ड्रेस, बारीक हेअरकट मधे असताना मार्केट मधे फिरायची मजाच वेगळी असे,शिवाजी सावंतांच्या स्टाइल मधे वर्णन करायचे झाल्यास, "छाती पुढे काढुन, पायाखालची मृत्तिका दाबत" आम्ही चालत असु, तसेच एक जबरी मोटिवेशन म्हणजे आजकाल आम्हाला कैंटीन ला जायची परवानगी ही होती, तिथुन आम्ही साबण, कपडे, बिस्किटे वगैरे घेत असु, दारू नव्हती फ़क्त! ते कार्ड पासआउट नंतर जिथे पोस्टिंग असेल तिथल्या रीजनल डायरेक्टरेट मधुन मिळणार होते.
आम्हाला जवळपास प्रत्येक बाबतीत स्वावलंबी करत होती अकादमी, अगदी अकादमी ची सुरक्षा सुद्धा आमच्या हातुन राखली जात असे, त्याला म्हणत ड्यूटी ऑफिसर पोस्टिंग उर्फ़ "डीओ ड्यूटी". ह्या ड्यूटी मधे रोटेशन सिस्टम मधे दोन ओसीज ची ड्यूटी लागत असे. ह्यावेळी आमच्या हाती लोडेड एके 47 देत असत. ह्या ड्यूटी चे आकर्षण म्हणजे ही ड्यूटी रात्रभर केली की पीटी अन ड्रिल माफ़ असे दुसऱ्या दिवशीची. डायरेक्ट ब्रेकफास्ट ला मेस मधे जावे लागे. साधारण 0400 hrs ला ड्यूटीहुन परत आले की 0800 hrs पर्यन्त झोप मग ब्रेकफास्ट मग लेक्चर असे स्वरूप त्या ड्यूटी चे असे, माझी ड्यूटी समीर सोबत असायची कायम रोटेशन मधे. साधारण 80 एकर्स मधे पसरलेल्या अकादमी मधे पट्रॉलिंग चे राउंड्स असत, आम्ही ती ड्यूटी करायचो ही नीट.असाच एक दिवस आम्ही पहाटे परत आलो, रूम नंबर 13 उर्फ़ घरी येऊन मी अन समीर उलथलो होतो, अंगात डांगरी (एक प्रकारचा कॉम्बेट यूनिफार्म) तशीच होती, फ़क्त बूट काढणे झाले होते, साधारण 0730 ला मला जाग आली, मी समीर ला डिस्टर्ब न करता उठलो अन माझे ब्रश करणे वगैरे आटोपले,अन आता काय करावे हा विचार करत बेइज्जती मंडप ला बसलो होतो. दुरवर उस्ताद चे तालबद्ध "एक दो एक" ऐकू येत होते, तितक्यात माझ्या डोक्यात एक विचार आला. अनायास सुट्टी मिळाली होतीच, जवळची ड्राईफ्रूट्स ही संपत आली होती, 0800 ला कैंटीन उघड़ते हे माहिती होते,म्हणले चला ज़रा पावशेर बदाम घेऊन यावे. मी रूम ला परत आलो, पायात परत बूट चढ़वले अन कैंटीन कड़े निघालो, कैंटीन कड़े जाताना वाटेत मला एक मध्यमवयीन लेडी दिसली, अस्सल घरांदाज सौंदर्य, निखळ म्हणजे इतके निखळ की त्या रूपाकडे पाहुन वासनेला कोणीही मनात थारा देऊ शकला नसता इतके निखळ. परिधानावरुन तरी त्या कुठल्यातरी ऑफिसर वाइफ वाटत होत्या, मी समोर होऊन सावधान होऊन म्हणले
"जय हिंद मॅम, गुड मॉर्निंग"
"गुड मॉर्निंग ओसी, डीओ?"
"यस मॅम"
"हाउ इज ट्रेनिंग गोइंग ऑन?"
"फाइन मॅम , थैंक यु"
"कॅरी ऑन ओसी"
"एक्सक्यूस मी मॅम, I just wanted to mention that you are the most gentle lady i have come across on campus"
"well, thank you for your compliment young man, I am Mrs. Vikram Singh"
मायला!!! डेप्युटी अद्जुडेँट सरांची उर्फ़ आमच्या बर्ड ची वाइफ. काही सेकंड मी तंतरलो पण माझ्यालेखी मी चुक नव्हतो, तरीही मी डिसिप्लिन तोड़ले होते!म्हणुन मी त्यांना विचारले
"मॅम , हाउ मेनी पैलेस टूर्स??"
"considering your clear good intentions, only one!"
"palace टूर", काही काही शिक्षा प्रत्येक शिक्षेची माय असतात, आमच्या अकादमी ला ती म्हणजे "पैलेस टूर". ही शिक्षा फ़क्त ऐकून होतो, आज होणार होती!. पैलेस टूर म्हणजे रात्री डिनर न करता फूल किट लेडन अवस्थेत परेड ग्राउंड च्या माधोमध सावधान मधे उभे राहणे अन दर तासाला कीती वाजले हे जोरात बोंबलणे, हे करताना मान उंच ठेऊन पैलेस च्या सर्वात उंच असलेल्या घुमटाकड़े पाहत राहणे , त्यात दर एक तासाने डीओ ड्यूटी वाली पोरे येऊन एक बादली पाणी डोक्यावर घालुन जाणार, असे पहाटे चार पर्यन्त केले की एक पैट्रोलिंग राउंड लावायचा पुर्ण अकादमी ला अन परत येऊन न झोपता चेंज करुन डायरेक्ट पीटी ला पळायचे, बस!!!
तर, ब्रेकफास्ट ला मी पानातली बॉयल्ड एग्स नुसतीच चिवडत बसलो होतो, माझे ते "गुमसुम रूप" पाहुन पोरांनी मला घोळात घेतला
"क्या हुआ बे?" समीर
"खा ले जल्दी आज क्यों ऐसे कर रहा है?" पुनीत
"भाऊ घरची आठवण आली का?" किश्या
"अन्ना आमारा बाबी ब्रेकप किया क्या??" हे मधेच अण्णा
सांगे अन गौड़ा नुसतेच बघत बसले होते
"वो क्या हुआ न......" घसा खाकरत मी सारी कथा ऐकवली तेव्हा मोसाय ते गौड़ा प्रत्येकाने कपाळावर हात मारून घेतला, अन गिल ने मला टपली लगावली
"हरामी का मन नहीं भरा है रगड़े से" सरदार!
पण शेवटी एकमताने
"कुछ नहीं होगा, तू टेंशन मत ले" असे ठरले आमचे.
दिवस पुर्ण गेला तरी मी टेंशन मधेच होतो जरासा, पण लेक्चर झाली तेव्हा मी ही ज़रा ढिलावलो . स्पोर्ट्स च्या वेळी मी वॉलीबॉल कोर्ट ला असताना शेवटी एकदाचा सन्देश आला, प्रभज्योत सरांनी बोलावले
"ओसी बापूसाहेब, जाओ दौड़ के डेप्युटी अद्जुडेँट साहेब ने बुलाया है"
मी मागे वळून पाहिले तसे श्वास रोकुन उभी आमची बिलंदर कार्टी उभी होती, मी मान खाली घालुन निघालो. ऑफिस बाहेर पिन ड्रॉप साइलेंस होता, ब्रिटिश कालीन एक खोली होती ती, शिंदेशाही ने जोडलेली पैलेस मधे, थोड्या वेळात बेल वाजली अन स्टूल वरचा सिविलियन शिपाई म्हणाला
"जाओ साहब अंदर जाओ"
आता ओरडा बसणार ह्या विचाराने मी अर्धमेला होऊन आत घुसलो
समोर सर बसलेले , ते मात्र रिलैक्स वाटत होते, मी आपले जयहिंद चे सोपस्कर केले अन मान खाली घालुन उभा राहिलो, तसा अगदी सॉफ्ट आवाज आला
"at ease ओसी, take a seat"
सरांसमोर मी बसलो होतो, मान खालीच,
"अरे क्या हुआ, डरे हो क्या चिड़िया वन?"
"......."
सर उठले, चालत माझ्या बाजूला आले, पाठीवर हात ठेवला अन बोलले
"तुने जो बोला, वो गलत नहीं था या तहजीब छोड़ के नहीं था , पर तुने डिसिप्लिन तोडा, अकादमी गप्पे मारने के लिए नहीं है , खैर...."
"मैंने मिसेस से भी पुछा, वो भी बोली, u are a gentleman with ethics and morals and that the upbringing given by ur parents is visible"
आता मी मान वर करुन सरांकड़े पाहिले, ते मंद हसत होते... मला काहीच कळेना, म्हणले एखादा बाबा "माझी बायको छेड़ली" म्हणत अकांडतांडव करायला लागला असता पण विक्रम सर तर.....
माझ्या चेहऱ्यावरचे कंफ्यूज भाव हेरत सर पुढे बोलले,
"एक मजेदार किस्सा बताता हूँ चिड़िया वन तुझे....."
"....25 साल पहले, ऐसे ही एक ओसी था, तुने कमसकम एक मिडऐज लेडी को तहजीब से खूबसूरत कहा, वो ओसी ने तो अकादमी के अद्जुडेँट के बेटी का हाथ पकड़ के प्रोपोज़ किया था उसे, तीन पैलेस टूर किये थे उसने!, वो था ओसी विक्रम सिंह और लड़की थी आजकी खूबसूरत लेडी मिसेस कविता विक्रम सिंह".
आता सर खळखळून हसत होते, अन मी चक्रम झालो होतो,
"क्या बताऊँ यार मैंने मेरे अद्जुडेँट की बेटी ही पटा ली थी, पश्ता रहा हूँ आज भी" गड़गड़ाटी हसत ते म्हणाले
"सर, मैं वो लेकिन आय एम् सॉरी सर मैंने डिसिप्लिन , मॅम"
मला काहीच सुधरना, तेव्हा सर पुढे म्हणाले,
"तेरेको एक टूर क्यों लगेगी पता है बापू??, तेरी तहजीब mannerism सब सही था, थेट फोर्सेज को जैसा चाहिए वैसा, पर ये गुण हर एक में नहीं होता, अगर तुझे पनिश नहीं किया तो एक गलत ट्रेंड सेट होगा और जिन्हें मैनर्स नहीं है वो सब भी बोलने लगेंगे कुछ भी, फिर अपने फ़ोर्स का virtue क्या रहेगा?"
"सर...."
"तो अब जाओ, आज एक पैलेस टूर काटो , और कल सुबह चाय पे मेरे क्वार्टर पे आ जाना, साथ में तेरे वो सांगवान को भी ले आना, डिसमिस"
धडपडत मी आपला कसाबसा बाहेर आलो , हॉस्टल ला पोचलो तसे बेइज्जती मंडप ला बसलेले आमचे समस्त मित्र घोळका करुन आले
"क्या हुआ बे ??"
सगळा किस्सा सांगितल्यावर सगळ्यांनी मला
"बच गया गांडू , सामनेवाला भी रॉयल है इसीलिए" असे सुनावले
शिस्तीत पैलेस टूर करून मी अन समीर दुसऱ्या दिवशी सरांच्या बंगलो वर दत्त! आमचे स्वागत स्वतः सरांनी केले त्या दिवशी, इकड़तिकडच्या गप्पा झाल्या कॉफ़ी झाली , आमचे एजुकेशन, बैकग्राउंड वगैरे विचारपुस झाली अन आम्ही लेफ्ट राईट करत परत आलो.
परत आलो त्या दिवशी संध्याकाळी मंडपात सगळे जमले होते, चहापानाचा कार्यक्रम समीर ने वर्णन करुन झाला तेव्हा
मोसाय उभा राहिला अन ओरडला
"सुनो बे सालो, सबको आज तक रगड़े लगे है, सबकी फटी है पर रगड़े लगने के कारण भी इज्जत बढ़ा के आया है हे हरामी बापूसाहेब, इसके इस गां*मस्ती के लिए इसका भी कुछ नया नामकरण होना चाहिए"
अन,
सगळ्यांच्या एकमताने आमचे नवे नामकरण पार पडले
"रगड़ोत्तम भारती बापूसाहेब"
प्रतिक्रिया
20 Apr 2015 - 3:55 pm | मोदक
वाचतोय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
20 Apr 2015 - 4:12 pm | पॉइंट ब्लँक
ही. ही. वाचून मज्जा आली. लिहित राहा :)
20 Apr 2015 - 4:32 pm | मृत्युन्जय
हा हा हा. वाचुन मजा आली.
20 Apr 2015 - 4:35 pm | जेपी
मस्त चाललय..
20 Apr 2015 - 4:35 pm | आदूबाळ
जबरीही.
खूप खूप भाग लिहा आणि एक पुस्तक काढा. सीरियसली.
20 Apr 2015 - 4:47 pm | कैलासवासी सोन्याबापु
अहो हे आपले उगाच मेमोइर्स लेखन झाले! पुस्तक लायक कहा कुछ है! काही अनुभव आले सर्विस मधे तर पाहू पुढेमागे
20 Apr 2015 - 4:41 pm | Mrunalini
हाहाहाहा.. मस्स्त झालाय हा पण भाग. पुभाप्र :)
20 Apr 2015 - 4:48 pm | कपिलमुनी
व्हर्व मधे एनडीए / आर्मी कॉलेजची पोरा ब्लेझर घालून फुल्ल हवा करायची. पोरी फुल्ल्टू फिदा असायच्या !
जाम जळायची तेव्हा
20 Apr 2015 - 5:09 pm | आदूबाळ
एकदम खरां. आणि आमचा अड्डा समोरच्या कॅफे रामसारमध्ये. तिथे कोणा पोरीला न्यायची सोयच नाही...
(अर्थात कोणी आलं असतं का हा वेगळा मुद्दा...)
20 Apr 2015 - 5:13 pm | कैलासवासी सोन्याबापु
मी स्वतः पुण्यात असताना एनडीए च्या पोरांस खुपच हसायचो, आयला सिग्नललाही ज़ेब्रा क्रासिंग वर एका लाइन (फ़ाइल) मधे चालणे म्हणजे काय!! पण जेव्हा आम्ही आमच्या रूटीन मधे रुळलो तेव्हा लक्षात आले की , अरेच्या आपण बी तेच करतोय की!! ही एक नैसर्गिक प्रवृत्ती होऊन जाते! तुमचे प्रतिसाद वाचून आमची जी धौंस असायची ग्वालियर मधे ती आठवली!
20 Apr 2015 - 8:27 pm | सुबोध खरे
मुनिवर
युनिफॉर्मवर मुली फिदा वगैरे काही नाही होत हे आम्हाला वर्षभरात जाणवले. त्यामुळे त्यानंतर आम्ही सरळ साधे कपडे घालून क्याम्पात जाणे पसंत केले.
14 May 2015 - 10:22 am | llपुण्याचे पेशवेll
डॉक तुमचा काळ वेगळा होता हो. आम्ही पण अशी हवा करणारी एन डी ए ची मुले पाहीली आहेत. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर तर खूप वेळा.
20 Apr 2015 - 4:58 pm | चित्रार्जुन
बापु सहेब
लै भारि लिव्ता वो तुमी, मी तर तुम्च्या प्रेमात पड्लोय. १ न. एकदा भेटलच पाहिजे.
20 Apr 2015 - 5:15 pm | चिनार
मस्त !! रगड़ोत्तम भारती बापूसाहेब
20 Apr 2015 - 5:22 pm | टवाळ कार्टा
गुर्जींन्ना पण सांगित्ले आणि अता तुम्हाला पण....पुस्तक लिहाच...मस्त लिहिता
20 Apr 2015 - 5:24 pm | प्रीत-मोहर
Sahee..
20 Apr 2015 - 5:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हेहेहे!! जब्राट. रगडा पॅलेस.
20 Apr 2015 - 5:32 pm | बॅटमॅन
रगडोत्तमाचार्य बापूसाहेबांचा विजय असो!!!
26 Apr 2015 - 10:50 pm | श्रीरंग_जोशी
अप्रतिम आहे हा भाग.
जुन्या भागांचे दुवे
20 Apr 2015 - 6:28 pm | यशोधरा
मस्त! :)
20 Apr 2015 - 8:01 pm | बाबा पाटील
आयला नाहीतर आमच मेडीकल,पोर साली ३०% आणी पोरी ७०% .भेंडी नुसती चिव चिव.
20 Apr 2015 - 8:18 pm | कैलासवासी सोन्याबापु
आयला !!! सत्तर टक्के पोरी!! नसीब वाले थे बाबा!!!
20 Apr 2015 - 8:30 pm | सुबोध खरे
बाबा साहेब
बर्याच वेळेस वर्गात एवढ्या मुली असून त्यात मजा वाटत नाही पण ज्युनियर च्या मुली मात्र जास्त "कडक" असायच्या असा "अनुभव" आहे.आणी जसे जास्त सिनियर होता तसे "फ्रेश"(रचे) चेहरे जास्त चांगले वाटतात
कदाचित "घरकी मुर्गी" किंवा FORBIDDEN FRUIT मुळे असेल.
20 Apr 2015 - 8:54 pm | बाबा पाटील
च्यायला आम्ही पोर सगळी चिंटीपिंटी आणी पोरी मात्र बाबौ. त्यापेक्षा ज्युनियर आणी सिनियर मात्र.....जावु दे नाही सांगत.
20 Apr 2015 - 9:07 pm | पियुशा
पुलेशु
20 Apr 2015 - 9:35 pm | बिपिन कार्यकर्ते
चालू रखो! :)
20 Apr 2015 - 9:37 pm | अजया
मस्त जमलाय रगडोत्तम भाग!!
20 Apr 2015 - 10:50 pm | मधुरा देशपांडे
रोमांचक अनुभव आणि ते लिहिण्याची तेवढीच जबरदस्त हातोटी. पुभाप्र.
21 Apr 2015 - 2:59 pm | क्रेझी
हा पण भाग एक नंबर बातचीत झाला आहे :)
21 Apr 2015 - 3:31 pm | नाखु
बाप्पू (साहेब)..एक नंबरी लि़खाण
=====
नुस्ता रगडा पॅटीसवाला नाखु
21 Apr 2015 - 3:48 pm | तुषार काळभोर
आमच्या कॉलेजला सरासरी ५-८ मुली एका वर्गात (रेशो=१०:१). (काँप्युटरला १२-१३ तर मेक्यानिकल अन् इन्स्ट्रुला ०-१)
घराशेजारच्या मेडीकल कॉलेजात येता-जाता नजर जायची तेव्हा "एक आह्ह सी निकलती थी"..
बाकी,
या डॉक्टरसाहेबांच्या मताशी बाडिस!
22 Apr 2015 - 2:10 pm | एस
छान लिहिलंय.
26 Apr 2015 - 10:20 pm | पैसा
धमाल आहे!