विचारत इकडे तिकडे आले
आज पाहुणे घरात आले
अहाहा सदन धन्य झाले ..
निवांत खुर्चीवर ते बसले
मान डोलवत जरासे हसले
रुमालाने तोंडही पुसले ..
'कसे काय तुम्ही वाट चुकला
आठव आमचा कसा जाहला ?'
- गूळपाणी देत प्रश्न विचारला ..
ओशाळवाणे पाहुणे हसले
हळूच इकडे तिकडे पाहिले
प्रश्नाचे उत्तर देणे टाळले ..
पिशवीतून मोबाईल काढला
रुमालाने स्वच्छही पुसला
माझ्या हाती तो सोपवला ..
"गनिमी कावा" त्याचा ध्यानी
आला माझ्या त्याच क्षणी
मुकाट उठलो हाती धरुनी ..
जर्जर जीव त्या पाहुण्याचा
"चार्जर" विसरला मोबाईलचा
शोधला पत्ता माझ्या घरचा .. !
.
प्रतिक्रिया
26 Mar 2015 - 10:42 pm | शब्दानुज
शब्दांची रचना अडखळल्यासारखी वाटते थोडी..बाकी सारांश उत्तम..
30 Mar 2015 - 5:22 pm | विवेकपटाईत
कविता आवडली.
14 Apr 2015 - 1:23 pm | विदेश
शब्दानुज, विवेकपटाईत -
प्रतिसादाबद्दल आभारी आहे .
14 Apr 2015 - 3:42 pm | कविता१९७८
मस्त