अकादमी 5 :- तिचा पहिला स्पर्श

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in जनातलं, मनातलं
11 Apr 2015 - 1:28 pm

अकादमी... १ , अकादमी... २ , अकादमी... ३ , अकादमी... ४ , अकादमी... ५ , अकादमी... ६

***

अकादमी ने पहिल्या एका आठवड्यात काही केले असेल, तर ते म्हणजे आम्हाला सॅंड पेपर ने घासल्यागत चकाचक केले!! एव्हाना 3 आठवडे झाले होते , खच्चुन फिजिकल करूनही आजकाल संध्याकाळी स्पोर्ट्स ला बाहेर काढले तरी काही वाटत नसे आम्ही खुशाल बास्केटबॉल वॉलीबॉल वगैरे खेळत असु.त्या तीन आठवड्यात आमची अंगदुखी बरीच आटोक्यात आली होती पण आता नवीन प्रॉब्लेम सुरु झाला होता, पहिल्या आठवड्या नंतर. बघायला अतिशय मनोरंजक पण शिकायला खुप जास्त डिमांडिंग तो म्हणजे "ड्रिल".

शाळेत ड्रिल म्हणजे पीटी वगैरे असे, पण फोर्सेज च्या भाषेत मार्चिंग ला म्हणतात ड्रिल. जनरल "लेफ्ट राईट लेफ्ट" इतकेच त्याचे स्वरुप नसते , त्यात अनेक बारकावे असतात. काही सांगायचे झाल्यास

1. चटख :- म्हणजे "तेजsssss चलssssss" किंवा इतर कोणती ही ऑर्डर मिळाल्यावर इंस्ट्रक्टर किंवा कमांडर ची ऑर्डर संपल्या संपल्या भयानक विद्युतवेगाने डावा पाय अन उजवा हात एकाचवेळी बाहेर काढणे किंवा सांगितली असेल ती करवाई करणे.

2. टर्नआउट :- ड्रिल च्या वेळी आम्हाला परफेक्ट ड्रेसिंग बाय सेन्स ऑफ़ ड्यूटी आले पाहिजे बैरेट कॅप घालायचा कोन, डोक्याच्या उजव्या भागावर टोपी चेपली म्हणजे तिचा डावा भाग अन त्यावर लावलेला लोगो किंवा यूनिट इंसिग्निआ हा डोक्यावर डाव्या बाजुला डाव्या डोळ्याच्यावर अर्धी वित वर असावा, टोपी घातल्यावरही ती कपाळ पुर्ण झाकता कामा नये, त्यात 4 बोटांची गॅप असावी, इत्यादी.

3.सिस्त (शिस्त) :- फाइल्स बनवणे, ब्लैंक फ़ाइल सोडणे, दाहिने देख च्या ऑर्डर ला फ़ाइल च्या गाइड ने सरळ पाहत राहणे इत्यादी

हे फ़क्त काही नमुन्यादाखल देतोय अश्या असंख्य गोष्टी असतात, बड़े उस्ताद ह्या बाबीत फार कड़क लक्ष्य घालत असे, सकाळी उठलो की रनिंग , मग कैनेडियन पीटी मग फिजिकल ट्रेनिंग अन मग ड्रिल असा एकंदरित कार्यक्रम असे, ह्यात फिजिकल अन ड्रिल हे कोर फोर्सेज चे ट्रेनिंग समजा, ह्या फिजिकल मधे दोर चढणे , वुडन लॉग पुलप्स , पुशप , फ्रंट रोल बॅक रोल (कोलंटउड्या सरळ अन रिवर्स), डिच क्रोलिंग वगैरे असे. सगळेच आधी तंत्रशुद्ध माहिती नव्हते तेव्हा ते हाहाकारी भासे, दोर चढ़ताना गुढघे फ़क्त सपोर्ट ला वापरून एंकल लॉकिंग ने वर चढायचे असते, दात ओठ चावत आम्ही वर चढत असु पण उतरताना ब्रेकिंग ला हमखास गुढघे घासत असु जाडजुड़ काथ्यासारख्या त्या दोराला घासल्यामुळे आतल्या बाजूंनी गुढघे अन मांड्यांवर अक्षरशः कट्स पडत, अन त्याची आगाग होत असे मग आम्ही कैंटीन मधुन nycil वगैरे पावडरी आणून तिथे लावायचो अन टंगड्या फासकटुन रात्री पंख्याखाली उताणे पसरायचो, मला त्या फिजिकल मधे खुप जास्त रगड़ा लागे. त्यात मी शर्मा उस्ताद चा लाडका होतो!!! पुलप्स मारतो पण फ्रंटरोल आवर असे व्हायचे, एक चुक झाली की पुर्या फिजिकल ग्राउंड ला फ्रंट रोल ने राउंड मारवा लागे.

तिथून परत आले की अंघोळ करुन वेगळा यूनिफार्म घालून मेस ला जायला 25 मिनट्स असत, डेली वेगळा ब्रेकफास्ट असे, शक्यतो अंडी अन स्प्राउट्स वगैरे हायप्रोटीन डाइट असायचा तेव्हा.

दहा ते दुपारी एक सिविलियन प्रोफेसर लोक्स लेक्चर घेत असत आम्ही ह्याच लेक्चर मधे जांभया कंट्रोल करायची कला अवगत केली होती विषय पण बोरिंग स्ट्रेटेजिक स्टडीज अन ऑल आमच्या फोर्स ला स्पेसिफिक असलेल्या पहाड़ी राज्यांबद्दल तिथल्या संस्कृति बद्दल वगैरे (अर्थात आज लोकल लोकांसोबत जेलिंगअप करताना त्या लेक्चर चे महत्त्व ही जाणवते)

त्यानंतर मॅप रीडिंग (ह्यात कन्वेंशनल मॅप, जीपीएस वगैरे सगळे असे) मग वेपन चा क्लास असे, वेपन ला मजा असायची , ते झाले की स्पोर्ट्स तेव्हा इंचार्ज प्रभजोत सर स्वतः आमच्या बरोबर खेळत असत विविध गेम्स, ज्यांना गेम्स खेळायचे नाही त्यांस जिम ला जाणे कंपल्सरी असे, सहज फिरताना कोणीही दिसला की खैर नाही. 6.00(1800) वाजता ते संपले की 6.30 (1830) ते परत 8.00 (2000)पर्यंत स्टडी टाइम असे लेक्चर चा अभ्यास करायला, अर्थात त्यावेळी आम्ही पण अभ्यास उरकुन टाकत असु,8.15 (2015) ला मेस ला डिनर असे, डिनर शक्यतो लाइट असे पण प्रोटीन्स चा मारा असे ह्या ही वेळी. सगळ्यांना सगळ्या टेबल्स वर सर्व करण्यात श्रीवास्तवजी अन मेस स्टाफ चे प्रोफेशनलिज्म डोळ्यात भरण्यालायक असे.साधारण 9 पर्यंत डिनर आटपे कुजबुजत गप्पा मारत.परत 9 (2100) ते 9.44 (2145) स्टडी देत , ह्या वेळात आम्ही उद्याचे लेक्चर पाहून ती पुस्तके बॅग मधे घालुन ठेवणे, सकाळ च्या पीटी चा यूनिफार्म खुर्चीवर जय्यत तयार ठेवणे इत्यादी उद्योग करत असु अन मग हॉस्टल च्या मधल्या चबुतर्यावर एकमेकांची टांग ओढ़त बुट पट्टे वगैरे हाती येतील त्या चमकवण्यालायक गोष्टी घासत बसत असु, त्या चबुतर्याला आम्ही "बेइज्जती मंडप" असे नाव दिले होते . ह्याचवेळी अन्ना ला हिंदी चे धड़े द्यायचे ही कार्य करावे लागे, कारण ऑर्डर येऊन ती समजून करवाई करण्यात अन्ना ढीला पड़े व् जवळपास रोज आम्हाला रगड़ा लागे. मग सगळे आवरून 9.45(2145) ला लाइट्स ऑफ़ होत असत!.

अश्याच रोजच्या रूटीन मधे काही काही दिवस विलक्षण गमतीदार म्हणुन लक्षात राहत. उदा वेपन सुरु झाले तो दिवस. आमची सुरुवात ऑर्डनेन्स फैक्ट्री बोर्ड (OFB) च्या 9 mm pistol ने झाली होती. वेपन्स स्वतः बड़े उस्तादजी शिकवत असत. पहिल्या दिवशी कोत मधुन(शस्त्रागार) DM pistols (डमी हत्यारे) आणायची जबाबदारी किश्या अन अल्फा कंपनी च्या तेज प्रताप गुरुंग ला दिली होती! एका हातात 2 ह्या प्रकारे 8 pistols घेऊन दोघे आले. वेपन्स म्हणजे नुसते वेपन्स नसते तर सोबत वेपन्स च्या माहिती चे चार्ट्स, ती वेपन्स खोलुन ठेवल्यावर मातीत ठेवावी लागु नये म्हणुन ती ठेवायला काही ताड़पत्री च्या मॅट्स वगैरे पण जामानिमा असे. हत्यारे न बघितलेल्या पोरांना एकदम लाइव ammo ला एक्सपोज़र नको म्हणुन बैरल जैम केलेल्या किंवा फायरिंग पिन्स काढून टाकलेल्या अश्या राइफल किंवा पिस्टल्स असत. त्याला म्हणायचे डीएम पिस्टल. त्या पिस्टल घेऊन जेव्हा किश्या अन तेजु आले तेव्हा सगळी पोरे कौतुहलाने फ़ाइल तोडायला येतील असे वाटले पण पोरे औत्सुक्य दाबून चुळबुळत जागेवर उभी होती! उस्तादजी ने मला अन समीर ला फॉलआउट करायला सांगितले अन आदेश दिला

"दोनों आदमी, मैट्स बिछाओ, हर मैट पर एक एक पिस्टल, बैरल टारगेट की तरफ होगी, मगज़ीन निकली होगी, उसके बाद टारगेट पेपर सेट करो"

आम्ही इमानेएतबारे आधी मैट्स अंथरल्या मग टारगेट्स लावली अन पिस्टल्स ना हात लावला, आयुष्यात पहिल्यांदा एक आधुनिक शस्त्र अन त्याचे शास्त्र डोळ्यासमोर होते , उगाच आपण लै भारी टाइप फील होता. अन मी तो मूर्खपणा केला! सहज गंमत म्हणुन मी त्या वांझोटया पिस्टल चा बैरल समीर कड़े केला अन त्याला डोळा मारला!. मागे वळलेल्या उस्तादजी ने एक सेकंड मधे आमची करवाई पाहिली अन मला अन समीर ला फरमान सुटले.

"दौड़ के इधर आओ"

सम्या चरफडत होता अन मी ओशाळलेलो होतो.

"कभी भी बैरल किसी अपने की तरफ नहीं मोड़ा करते, सिखलाई कैसे भुल गया ओसी बापुसहब??"

"......"

"ओसी पुनीत, ओसी दिवाकर फॉलआउट, जो करवाई इन दो मकरो से छुटी है पुरी करो"

अन्ना ने डबल गाढवपणा केला!

"क्या करना सर???"

"जब इंस्ट्रक्शन दिया इनको तब तु सोया था या इंस्ट्रक्शन सिर्फ इनके लिए था रे xxxx, ओसी पुनीत इन्हें करवाई सिखाओ"

"......"

"मजाक बना रखा है क्या पुरे ट्रेनिंग का??, पूरा कंटिंजेंट प्लांक पोजीशन"

बड़े उस्तादजी बरसला!!!
अल्फा,ब्रावो,चार्ली,डेल्टा,एको साऱ्या कंपनी पुशप पोजीशन ला आल्या तसे मी अन समीर ही साळसुदपणे प्लांक होऊ लागलो!

"आप दोनों नहीं जी, आप तो जान हो इस पनिशमेंट की..."

आता मी अन समीर हादरलो पुढे ऑर्डर आली

".... पुरी कंटिंजेंट 10 पुशप करके तबतक प्लांक रहेगी जबतक ओसी बापुसहेब ओसी सांगवान को कंधे पर फायरमैन लिफ्ट देकर पुरे परेड मैदान की एक राउंड नहीं लगता..."

"....मजाक बना रखा है ट्रेनिंग का!!, मैंने पहले ही दिन कहा था एक गलती करेगा ट्रूप को सजा होगी , टीमवर्क इसीको कहते है, अगर ओसी बापुसहब गिरा तो ट्रूप की सजा दोगुनी और ट्रूप में से किसीने प्लांक पोज़ छोड़ा तो बापुसहब की पनिशमेंट दोगुनी, ओसी बपुसहब ओसी सांगवान पीछे मुड़ तेज चल"

समीर ला माझ्या खांद्यावर आडवे उचलले होते मी, सहा फूटी होता हरामखोर आजकाल फिजिकल शिक्षेचे काहीच वाटत नसे , अगदी वाढत्या शारीरिक ताकदी सोबत ती ही चढत्या भाजणीत असली तरी.

त्याला फायरमैन लिफ्ट दिल्यावर त्याचे मुंडके माझ्या डाव्या कानाशी आले होते अन त्याने अखंड लाखोली गजरनाम सुरु केले होते, फुसफुसत्या शिव्या ऐकून मला अजुनच हसु येत होते.

"भोसडीके काक्के, बड़े शौक तेरे शूटर बननेके कमीने कुत्ते भाग वरना रात तक ऐसेही रहेंगे"

तिकडे अन्ना किश्या सांगे सहित सारे माझ्याकडे आशेने पाहत होते त्यांचे प्रेमळ संवाद काय असतील हे क्लियर समजत होते!! एव्हाना 5 पुशप झालेल्या त्यांच्या

मी समीर चे धूड़ घेऊन दुडक्या चालीत मजेत होतो! जास्त थकवा नव्हता डोळ्याच्या कोपर्यातून मागे चाललेला आमच्या नावचा शिमगा समीर मला लाइव सांगत होता! अन त्याला ही कळले नाही सांगे ला शिक्षेतुन मुक्ति का मिळाली. नंतर माझ्या ढुंगणानेच त्याचे उत्तर दिले!!

मी हळू चलतोय म्हणल्यावर उस्ताद ने सांगे ला मुक्त केले! त्याच्या हाती स्वतःची केन दिली अन आमच्या मागे धावत गरज पडेल तिथे आमच्या बोच्यावर वळ उमटवायची जबाबदारी दिली.

धावत आलेल्या सांगे ने चप्पकन एक केन आमच्या कुल्ल्यावर ओढली तसे मी दबक्या आवाजात ओरडलो

"साले सांगे कमीने इकलौती गांड है मेरी आराम से केन मार"

"सॉरी यार बापु ,उस्तादजी तो तु जानता ही है" असे म्हणत तो हळूच केन पिछाड़ी ला टच मात्र केल्यासारखे करु लागला तशी त्या पिनाकदृष्टि उस्ताद चा आवाज कडाडला

"ओसी सांगे मकरे की गांड पे मार रहा है की घरवाली के!! जोर से मार वरना तेरी खाट खड़ी करूँगाsssss"

पर्यवसान आमच्या टिरी वर एक अजुन सज्जड़ फटका बसण्यावर झाले!!मी हाय हुई करत होतो अन स्पीड कमी झाली की सांगे वळ काढत होता!

समीर खांद्यावर मजेत होता असे ही नाही त्याच्या बरगड़ी ला अन "सेण्टर फ्रेश" ला माझे खांदे टोचत होते तो ही मेटाकुटीला येऊन शिव्या घालत होता!!

तसाच परेड ग्राउंड ला एक चक्कर मारून आम्ही जागेवर आलो, तरी मी त्याला उतरवला नाही म्हणले परत त्या मिठाच्या पोत्यागत व्हायचे!! पण तोच म्हणाला

"निचे उतारो उसको और तीनो ओसी मिल जाओ, बाकी लोग भी आराम से"

आम्ही घामाघुम होऊन खाली बसलो तसे उस्तादजी बोलु लागले

"ये हथियार है ओसीज, इससे कभी मजाक मत करना! उसको अपना खुद का दिमाग नहीं होता इसकी नली सिर्फ दुश्मनो की तरफ होनी चाहिए,ये एक खतरनाक हथियार है जिसे हम लोग "लीथल वेपन" कहते है", निशाने पर इसकी गोली हो तो जान बचना मुश्किल होती है, इसी कारण यह वेपन Indian arms act,1959 के तहत PB अर्थात PROHIBITED BORE वेपन होता है,कोई भी सिविलियन इसे अपने पास नहीं रख सकता है, ये पहली बात, आजसे यह हथियार तुम्हारा हिस्सा होनेवाला है! जैसे पाउडर क्रीम लगाके चेहरा खूबसूरत रखते हो उसे खरब नहीं होने देते वैसेही हथियार होगा,यह हुई दूसरी बात और तिसरी बात ट्रेनिंग की सिस्त बरकरार रखो! बॉर्डर पे रहना है आपको , खेतो में चिड़िया नहीं हांकनी है, हर हफ्ते तुम्हे खिलाने पर लाखो में पैसा खर्च कर रही है सरकार,दाना दाना कर्ज है तुमपर, मकरा बंद करो"

आम्ही ही सीरियस होतोच पण परिस्थिती, वय , रगड़ा ह्या सगळ्यामुळे कधी कधी मस्ती ही करायचो! ते तसेच राहणार हे उस्ताद ला ही माहिती होतेच फ़क्त दरवेळी चांस आला की तो आम्हाला तांब्याच्या भांड्यागत ठोकुन सरळ करत असे इतकेच.

"तो अब सुनो, इसे कहते है क्लोज क्वार्टर बैटल वेपन या फिर सीक्युबी वेपन , इसे ऑफिसर्स पर्सनल वेपन भी कहा जाता है. रेंज 50 मीटर्स. इसमें कुल 54 कलपुर्जे होते है, तो आओ हम पहले इसके बाहरी रूप को जाने, यह है मैगज़ीन इसमें चौदह गोलिया या राउंड्स आ सकते है लेकिन जाम न हो इसलिए एक बैरल में और 13 मैगज़ीन में रखे जाते है, हर राउंड में 0.450 ग्रॅम बारूद होता है ...."

आमच्या आधुनिक द्रोणाचार्याने मुक्तहस्ताने आम्हाला आधुनिक विद्या वाटायला सुरवात केली होती अन आता लेक्चर संपत आले तसे ऑर्डर आली

"ओसी बापुसाहब फॉलआउट" माझ्या सकट सात पोरे आम्ही एकेक मॅट समोर उभे होतो"

"अपने अपने वेपन उठाओ, जो हात से लिखते हो उस हात से हथियार पे मजबुत ग्रीप बनाओ, बाया हाथ पीछे पीठ पर मुठ्ठी बांधके रखो,टारगेट का बुल्स आय, फ्रंट साइड टिप, बॅकसाइड यु और तुम्हारी ऐमिंग आँख सबकुछ एक लाइन में अलाइन करो, सांसे काबू करो , सांसो की तरह हात पैर की तरह हथियार को अपने शरीर का हिस्सा बनाओ"

अन , घराबाहेर पडलेल्या, अकादमी मधे नवे मित्र जोडून कक्षा रुन्दावणाऱ्या आमच्या सगळ्यांच्या कक्षा अजुन रुंद झाल्या, आपण इथे का आहोत ह्याची जाणीव देणारा तो क्षण होता, बुल्सऑय, फ्रंटसाइड टिप, बॅकसाइड यु अन माझा डोळा एका लाइन मधे होते! जणू प्रत्येक श्वासा बरोबर मी त्या 9 mm ला सुद्धा रक्त पुरवठा करत होतो , पोसत होतो!. शेवटी "ती" मला जाणावली , एकरूप झालो मी तिच्याशी,

अन खऱ्या अर्थाने तो आयुष्यातला पहिला असा एक विलक्षण "तिचा स्पर्श" होता.

कथाअनुभव

प्रतिक्रिया

जबरदस्त झालाय हाही भाग!लष्करी हिंदीतल्या त्या आॅर्डर्स वाचताना आपण तिथेच आहोत असं वाटतंय अगदी.
पुभाप्र.

आदूबाळ's picture

11 Apr 2015 - 1:49 pm | आदूबाळ

जबरी! वाटच पहात होतो.

एक प्रश्न - पिस्तुलाचे सगळे ५४ कलपुर्जे वेगवेगळे सोडवता येतात का? तो मेन्टेनन्स ऑफिसर स्वतः करतो की त्यासाठी विशेष डिपार्टमेंट असतं?

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Apr 2015 - 1:59 pm | कैलासवासी सोन्याबापु

मेंटेनेंस किट असल्यास सगळे वेगळे होतात, अर्थात ते खाली म्हणजे बैक एंड करवाई मधे असते, ऐन पोस्ट वर रूटीन मधे फायरिंग असेंबली वेगळी होते अन आम्हीच सुती कापड़ाने हत्यार साफ़ करतो आपापले , काही विशेष उपकरणे असतात, उदा बैरल क्लीनिंग रॉड्स किंवा फुलतुर (एका टोकाला चिंधी गुंडाळलेली बारकी दोरी टाइप असते) ,ऑइल (कुठलेही चालते पण आम्ही आळशी चे तेल (लिनसीड ऑइल) किंवा कैस्टर ऑइल किंवा जे पोस्ट च्या भटारखान्यात असेल ते ऑइल) वापरतो

जगप्रवासी's picture

11 Apr 2015 - 1:56 pm | जगप्रवासी

आजकाल मिपावर आलो कि पहिल तुमचे काही लिखाण आलाय का हे पाहतो कारण तुम्ही तुमच्या लिखाणातून आमच्यासमोर लष्करी वातावरण अस काही तयार करता कि आम्ही त्यात रमून जातो.
हा हि भाग अप्रतिम झाला आहे हेसांवेनला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Apr 2015 - 2:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

_/\_ ती आवडली _/\_

जब्राट.

तुषार काळभोर's picture

11 Apr 2015 - 2:24 pm | तुषार काळभोर

तुमची गळाभेट घ्यायची फार इच्छा होतीये.

संपुर्ण माहौल नजरेसमोर उभा केलात. एक मिनिटापुर्वी सांगे तुम्हाला वेताने फटकावित असताना खुदुखुदु हसत होतो,
तेव्हढ्यात शेवटच्या परिच्छेदाने अंगावर सर्रकन काटा आला.
(हा पाहा, प्रतिसाद टायपुन झाला तरी,अजून काटा तसाच आहे)

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Apr 2015 - 2:34 pm | कैलासवासी सोन्याबापु

आभार पैलवान!!

अविस्मरणीय असतो तो क्षण!! आता रोज होल्स्टर मधे नाइन एमएम असते सतत !! पण त्या रगड्या मुळे कुठे कशी कधी अन का वापरायची ह्याचे ज्ञान ही मेंदुच्या "फिक्स्ड रॉम" मधे राहते

तुषार ताकवले's picture

11 Apr 2015 - 2:26 pm | तुषार ताकवले

NCCत असताना अनुभवला. भन्नाट. रगड़ा राहून गेला तो गेलाच. तुमच्या लिखनातून तो अनुभवतो

स्पंदना's picture

11 Apr 2015 - 2:34 pm | स्पंदना

आहा!! वाचताना सगळच्या सगळ डोळ्यासमोर उभं रहातयं. विलक्षण लिखाणाची हातोटी आहे तुमच्याकडे बापूसाहेब.
तुमच्या शिक्षेचा प्रसंग वाचताना खुदु खुदु हसायला येत होतं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Apr 2015 - 2:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

अकादमी च्या नव्वद टक्के आठवणी ह्या शिक्षेच्याच् असतात हो!! पण त्यात मोनोटोनी नाही जाणवत कधीच!! दरवेळी कारण स्थलकाल वेगळे असते !! त्याच्यामुळे शिक्षण मैत्री आठवणी सगळे घट्ट करत जाते

पॉइंट ब्लँक's picture

11 Apr 2015 - 3:14 pm | पॉइंट ब्लँक

जोरदार आहे एकदम! चालू राहू द्या?

अद्द्या's picture

11 Apr 2015 - 3:32 pm | अद्द्या

बापूसाहेब . .

रोज येउन बघत बसतो तुमचा लेख आला का .

जबरदस्त लिहिताय .

जेपी's picture

11 Apr 2015 - 4:25 pm | जेपी

मस्त चाललय...

एस's picture

11 Apr 2015 - 7:07 pm | एस

भारी!

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Apr 2015 - 7:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

फ्रंट साइड टिप, बॅकसाइड यु

हे खरे पाहता फ्रंट साईट टिप अन बॅक साइट यु असे होते पण उस्तदजी साइडम्हणत ते आम्हांस ही तीच सवय लागली

अत्रन्गि पाउस's picture

11 Apr 2015 - 7:47 pm | अत्रन्गि पाउस

प्रत्यक्ष भेटीची आत्यंतिक आस आहे ...

अत्रन्गि पाउस's picture

11 Apr 2015 - 7:49 pm | अत्रन्गि पाउस

सलाम कुणी कुणाला कधी कसा केव्हा करायचा ...
आणि केव्हा तो करायचा नाही
आम्ही फारच बेसिक लेव्हल ला शिकलो पण पुन्हा उजळणी करावीशी वाटते ...

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Apr 2015 - 8:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

सलूट चे असंख्य प्रकार असतात , वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळे असतात समोर डिपार्टमेंटल सीनियर आहे की क्रॉस disciplinary ह्यवर पण अवलंबुन असते, सिविलियन अथॉरिटी असल्यास त्यांनी जर कुठले ही पारंपरिक भारतीय "हेडगियर" परिधान केले असले तर ते सलूट ला पात्र असतात, लैच डिटेल मधे हवे असल्यास ब्यूरो ऑफ़ पोलिस रिसर्च एंड डेवलपमेंट (बीपीआरडी) ह्यांच्या संकेत स्थळावर "पोलिस ड्रिल मैनुअल" सापडेल ते डालो केल्यास खुप काही कळू शकेल :)

आतिवास's picture

11 Apr 2015 - 8:17 pm | आतिवास

सुरेख लेखमाला - आवर्जून वाचण्याजोगी.

मस्त लिहिताय. आवर्जून वाचत आहे.
मागील एक ट्रेकला भारतीय सैन्यातील जवानांशी बातचीत करायचा - काही काळ घालवायचा योग आला होता, तेह्वा आमच्या विनंतीखातर मॅगझिन काढून घेऊन एके ४७ हातात धरायला दिली होती ते आठवले!

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Apr 2015 - 9:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

रियली, कुठे हो?

काश्मीरमध्ये सोनमर्ग - गगनगीर च्या पुढे.ग्रेट लेक्स असा ट्रेक आहे. (सोनमर्ग ७८०० फू -निचनई पास व शेकदुरु ११५०० फू - विशनसर + किशनसर हे जुळे तलाव १२००० फू -गडसर पास १२५०० फू - गडसर १२००० फू - सतसर १२०००फू - झच पास (१३५०० फूट) - गंगबाल आणि नंदकोल जुळे तलाव ११५०० फू - नारनाग ७४५० फू)

ह्या अख्ख्या मार्गावर ३ महत्वाची सैनिकी ठाणी आहेत. शेवटच्या दिवशी हार्डकोअर कमांडोजना भेटलो, रादर दर्शन घेतलं. :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Apr 2015 - 10:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

सोनमर्ग!!! रम्य ठिकाण!! आर्मी चे हॉज (हाई अल्टीट्यूड वारफेयर स्कूल) आहे तिथे! मस्त जागा

ग्रेट लेक्समध्ये नंदकुल ते नारनाग या दरम्यान, तसेच निचनई पास नंतर ठाणी लागतात.

काय जबर्‍या ट्रेक आहे तो, खरंच तेजायला. लै मजा आली होती. (यद्यपि तितकीच लागलेली असूनही)

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Apr 2015 - 2:07 pm | कैलासवासी सोन्याबापु

ट्रेक्स मजेदार असतात! फ़क्त ट्रेक्स चे "पेट्रोल रुट्स" झाले की डोके उठते!!!

:P

बॅटमॅन's picture

12 Apr 2015 - 3:40 pm | बॅटमॅन

हाहा, अगदी अगदी!!

पहिले ठाणे गडसर पासनंतर आहे. दुसरे सतसरच्या आधी आणि तिसरे नंदकोल आणि नारनागच्या मध्ये.

खुप छान लिखाण. आम्ही अकादमीत असताना चे दिवस आठवले . अगदी तंतोतंत वर्णन आहे.फक्त मुलींच्या उस्ताद लेडी डी.आय. असायच्या. आमची पहिली पनिशमेंट मात्र रडापडीची होती. नंतर मात्र आम्ही तासंतास लाइन पोजिशन मधे आगे बढ आवडीने करायचो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Apr 2015 - 10:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

आपण कुठल्या अकादमी ला होतात???

चाणक्य's picture

11 Apr 2015 - 10:36 pm | चाणक्य

फार भारी लिहीताय.

मी महाराष्ट्र पोलिस अकादमीत P.S.I. च्या ट्रेनिंग साठी होते. बाकी अकादमीच्या आठवणी न विसरता येणाऱ्याच!

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Apr 2015 - 10:59 pm | कैलासवासी सोन्याबापु

अरे वा!! एमपीए!! उत्तम उत्तम!!! तुमचे अकादमी कैंपस अतिशय सुंदर त्यात नाशिक चे माइल्ड वातावरण! पण पाहिले काही आठवडे अन्न गोड लागत नाही अजिबात

श्रीरंग_जोशी's picture

12 Apr 2015 - 8:18 am | श्रीरंग_जोशी

नेहमीप्रमाणेच खास.

वाचकांच्या सोयीसाठी पूर्वीच्या भागांचे दुवे...

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Apr 2015 - 9:09 am | बिपिन कार्यकर्ते

चालू द्या! मस्त चालू आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Apr 2015 - 9:18 am | बिपिन कार्यकर्ते

सोन्याबापु, आधीच्या सगळ्या भागांचे दुवे याच धाग्यात सुरूवातीला अपडेट केले आहेत. शिवाय, सगळे दुवे नवीन टॅबमध्ये उघडतील. असेच प्रत्येक भागात टाकत जा. वाचकांची सोय होते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Apr 2015 - 9:28 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

धन्यवाद बि.का. ते फोनवरुन टंकत आहेत त्यामुळे कदाचित एवढा मोठा कोड कॉपी पेस्ट करायला अडचण येत असावी. त्यामुळे येथुन पुढच्या भागांना सं.मं. नी हे छोटसं काम करावं अशी नम्र विनंती.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Apr 2015 - 10:25 am | कैलासवासी सोन्याबापु

मनःपूर्वक आभार बि.का. , अहो नुसतेच् फोन वरुन नाही कैप्टेन जॅक् त्यात एंड्रॉइड एप्प वापरतोय मिपाचे , इथून लिंक कॉपी करुन हाइपरलिंक तयार करणे ही त्रासाचे जाते म्हणुन त्या बाबतीत आपण महानुभाव किंवा संम वर अवलंबुन आहे मी ! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Apr 2015 - 12:50 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद जॅक आणि सोन्याबापु. एक उपाय असा की, टेक्स्ट टाईप करून झालं की संमंपैकी कोणाला तरी पाठवा. मग तो व्यवस्थितपणे (तुमच्या नावाने) प्रकाशित करता येईल.

आवडाबाई's picture

12 Apr 2015 - 10:55 am | आवडाबाई

सर्व भाग वाचले आहेत येतील तसतसे. आधीच्या भागाना प्रतिसाद दिला नाही, माफ करा. हा भाग पण छान

बॅटमॅन's picture

12 Apr 2015 - 1:47 pm | बॅटमॅन

सगळे संवाद बाकी फारच प्रत्ययकारी पद्धतीने मांडता तुम्ही. मान गये सोन्याबापुसाहेब.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Apr 2015 - 2:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

_/\_

अन्या दातार's picture

12 Apr 2015 - 3:54 pm | अन्या दातार

झकास चालू आहे लेखमाला. पुभाप्र

प्रीत-मोहर's picture

12 Apr 2015 - 7:19 pm | प्रीत-मोहर

अफाट सुंदर आहे लेखमाला
__/\__

बाबा पाटील's picture

12 Apr 2015 - 9:03 pm | बाबा पाटील

काय सांगु बापुसाहेब,आळंदीच्या ट्रेनिंग कँपवर जेंव्हा पहिल्यांदा वेपन हातात घेतल तेंव्हा असच काहीतरी झाल होत.पण त्याच बरोबर आला एक जबरदस्त आत्मविश्वास आणी जबाबदारीची जाणिव. विसरुच शकत नाही.तुमचा लेख वाचताना अंगावर काटा आला आज.

पैसा's picture

12 Apr 2015 - 9:18 pm | पैसा

मस्तच! आधीचे भाग आता वाचते एकेक! काय अफाट लिहिताय बाप्पू!

सुबोध खरे's picture

12 Apr 2015 - 9:42 pm | सुबोध खरे

आपली लेखमाला उत्तमच आहे. जुन्या दिवसांची( आणि कष्टाची) आठवण येत आहे.
शिवाय गणवेशातील माणसाला काय कष्ट पडतात याची सर्व सामान्य माणसाला कल्पना नसते. तुमच्या लेखमालेमुळे लोकांना त्याची थोडीशी झलक मिळते आहे हे अतिशय चांगले आहे. ड्रील बद्दल बरेच काही लिहायचे आहे परंतु आपल्या धाग्याला उगाच आमचे ठिगळ नको म्हणून एक वेगळा धागा काढत आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Apr 2015 - 9:59 pm | कैलासवासी सोन्याबापु

कथारूप अनुभवांत टेक्निकल डिटेल्स जास्त दिल्यास फ्लो बिघडेल ही भीती मला उगाच असते, म्हणुन ड्रिल चे जास्त डिटेल्स टाळले मी डॉ.साब तुम्ही काढ़ा भारी धागा!! आम्ही येतोच बघा तिथे

अवांतर मध्यांतरी एक नार्वेजियन आर्मी अकादमी अन एक एनसीसी कॅडेट्स च्या ड्रिल्स चा वीडियो पाहिला होता! साला कलेजा खुश झाला

यसवायजी's picture

13 Apr 2015 - 12:52 am | यसवायजी

भावा, एक क-ड-क सेल्यूट _/\_.
आज पाचही भाग वाचले. लई भारी. hi-5. पुभाप्र.

आनन्दिता's picture

13 Apr 2015 - 4:49 am | आनन्दिता

+१ क -ड्ड- क सॅल्युट भावा !!

नाखु's picture

13 Apr 2015 - 9:39 am | नाखु

अतिशय प्रत्ययकारी अगदी शेजारी बसून मित्र आठवणी सांगतोय असं वाटतय हेच ह्या लि़खाणाचं खर बलस्थान आहे.
शिक्षा जास्त कठोर वाटत असल्या तरी तावून्-सुलाखून निघण्यासाठी हव्यातच असं तुम्ही सोदाहरण सांगताय हेही जास्त आवडले.
पुभाप्र.

खूपच जबरदस्त बापूसाहेब !!
लिहित राहा !!

भडकमकर मास्तर's picture

13 Apr 2015 - 1:01 pm | भडकमकर मास्तर

वा.. आज पाचही भाग वाचले... जबरदस्त..

तुमचं प्रत्येक भाग संपवायचं टायमिंग आणि त्यात लिहिलेलं सारं प्रत्यक्ष दृश्य पुढं उभं करणारं आहे... एखादी सीरियलची जमलेली पटकथा असावी आणि एपिसोड संपताना प्रेक्षकाला बरोब्बर इमोशनली पकडायची कला आहे राव तुमच्याकडे ... झकास !!!

भडकमकर मास्तर's picture

13 Apr 2015 - 1:26 pm | भडकमकर मास्तर

अवांतर :
गंमतीतसुद्धा वेपन आपल्या माणसाकडे रोखू नये, हा धडा महत्त्वाचा. यावरून दोन सत्यकथा आठवल्या.

पहिली आमच्या हॉस्टेलमेटची. त्याचे वडील पोलीस अधिकारी होते आणि घरी मित्र असताना पिस्तुल हाताळताना मित्राला वर्मी गोळी लागली. तो जागेवर गेला. या आमच्या डॉक्टर मित्राने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.वर्तमानपत्रात मोठी बातमी आली होती.

दुसरी सत्यकथा माझ्या चान्गल्या वकील मित्राने सांगितलेली. त्याच्या दुसर्‍या एका मित्राकडे लायसन्सड वेपन होते.या दोघांनी एकत्र वेपन्स घेतली होती. मित्राला दाखवले त्याने. ट्रिगरवर बोट ठेवून त्याच्याकडेच रोखले होते. मला दे, असे मागता मागता गोळी सुटली, थेट छातीत. तोही गेला. ऐकून हळहळ व्यक्त करणे, इतकंच आपल्याला शक्य.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Apr 2015 - 2:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

अरे रे!!! दुर्दैवी झाले!! मुळात आता चुक कोणाची ह्या विश्लेषणाला काहीच अर्थ नाही!!, लॉक पण करत नाहीत लोकं वेपन्स! आता काय बोलावे

सुबोध खरे's picture

13 Apr 2015 - 2:10 pm | सुबोध खरे

मास्तर
हा महत्त्वाचा धडा लष्करात अगदी गिरवून घेतला जातो. आम्ही येउर येथील फायरिंग रेंज वर गेलो असताना लाईट मशीन गन मधून गोळी सुटत नाही म्हणून एका नौसैनिकाने तिचे तोंड उलटीकडे फिरवले. तेंव्हा आमच्या तोफखाना विभागाच्या वरिष्ठ नौसैनिकाने अक्षरशः त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारली आणि त्याला, "बेवकूफ पहले गन उधर करो! गलतीसे गोली छुट गयी तो किसी बेकसूर को अपनी जान से हाथ धोना पडेगा!." फायरिंग झाल्यावर त्याला रायफल डोक्यावर पकडून त्याच मैदानाला तीन चकरा मारायला लावल्या आणि सर्वाना स्पष्टपणे सांगितले कि बंदूक का रुख सिर्फ दुष्मनकि तरफ हि होना चाहिये. कोई अपनोकी तरफ गलती से भी नही! जिंदगी कि किमत ही नही होती, वो अनमोल है!

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Apr 2015 - 2:50 pm | कैलासवासी सोन्याबापु

हे आपले झाले डॉक्टर साहेब, सिविलियन मधे वेपन्स चे एक वेगळेच आकर्षण , त्यात शास्त्रोक्त ज्ञान नाही, त्यात सारखे प्रैक्टिस नाही , मग होतात मिसहॅप

फोर्सेज मधे वेपन चे एक्चुअल फायरिंग करायच्या अगोदर तिप्पट ते चौपट मेहनत ही वेपन चा प्रकार त्याची निगा फायरिंग चे डूज़ एंड डोंट्स इत्यादी वर घेतली जाते मगच पहिला राउंड फायर होतो!!

फोर्सेज मधे वेपन चे एक्चुअल फायरिंग करायच्या अगोदर तिप्पट ते चौपट मेहनत ही वेपन चा प्रकार त्याची निगा फायरिंग चे डूज़ एंड डोंट्स इत्यादी वर घेतली जाते मगच पहिला राउंड फायर होतो!!

याचमुळे 'तुमच्यात' असे मिसहॅप होत नाहीत किंवा झाले तरी प्रमाण खूपच कमी असावे.

वेपनसाठी जर अर्ज करायचा असेल तर ट्रेनिंग सर्टीफिकेट आवश्यक असत पण ५ वर्षापुर्वी त्याची फी होती ३०००/५००० यामध्ये फायरिंगला राउंड देतात, १०+१० तेव्ह्डे झाल की तुमच ट्रेनिंग सर्टीफिकेट लगेच इश्यु होत.बर तिथ कोठल वेपन वापरला काही कळत नाही, बर्‍याचदा तर .२२ च देतात.परत हत्याराचा निदान काही वर्ष तरी संबध नाही. यानंतर लायसन्सची प्रोसेस चालु होते सरासरी २ वर्ष त्यात एखादी इलेक्शन लागली ६ महिने अधिक त्यानंतर समजा जर चुकुन लायसन्स मिळालेच तर वेपन खरेदीला ६ महिन्यांची मुदत असते.आपल्याकडे अंबरनाथ आणी कानपुर फॅक्टरीची रिव्हाल्वर्स मिळतात पण त्याला सरासरी सहा महिने ते एक वर्षाचे वेटींग आहे आणी त्यालाच फक्त लॉक आहे.प्राव्हेट मध्ये जे वेपन्स आहेत ती १९८७ च्या पुर्वीची त्यानंतर सरकारने परदेशी वेपन्स अधिकृतरित्या खरेदीस बंदी केली आहे.तरी पण ही सरकारी माल सगळ्यात सेफ मानला जातो.कोलकत्ता फॅक्टरीचे पिस्टल मिळते त्याला वेटींग आहे १ ते दिड वर्षाचे . एव्हडे सगळे झाल्यावर वेपन हातात पडते त्यात रिव्हाल्वरला राउंड मंजुर होतात ५० आणी बंदुकवर्षाला, एक वर्षाला मग सांगा फायरिंग प्रॅक्टीस कधी आणी कुठे करायची.त्यात फायरिंग रेंज कुठे उपल्बद्ध आहेत ते पण सांगा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Apr 2015 - 7:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

देवा देवा एवढे कुटाने!! मग काय खरे आहे!!

अवांतर - तुमच्याकडे कुठला मेक आहे पाटील??

बाबा पाटील's picture

13 Apr 2015 - 7:51 pm | बाबा पाटील

सरकारी माल

बाबा पाटील's picture

13 Apr 2015 - 8:22 pm | बाबा पाटील

नाहीतरी पोलिस्,महसुल,वन आणी नगरविकास या एका एका डिपार्टमेंट वर एक एक लेख तयार होइल

अन्या दातार's picture

14 Apr 2015 - 1:48 pm | अन्या दातार

जाऊदे झाडून
द्या ३ लेख पाडून.

हम वाचते है

भडकमकर मास्तर's picture

17 Apr 2015 - 7:24 pm | भडकमकर मास्तर

.आपल्याकडे अंबरनाथ आणी कानपुर फॅक्टरीची रिव्हाल्वर्स मिळतात पण त्याला सरासरी सहा महिने ते एक वर्षाचे वेटींग आहे आणी त्यालाच फक्त लॉक आहे.

बाप रे... म्हणजे बर्‍याचशा लायसन्स्ड पिस्तुलांना लॉकच नसते? कठीण आहे ...

सविता००१'s picture

13 Apr 2015 - 3:28 pm | सविता००१

अप्रतिम लिहिताहात

शैलेन्द्र's picture

13 Apr 2015 - 7:57 pm | शैलेन्द्र

मिपाच्या इतिहासातील काही सर्वोत्तम लेखमालांपैकी एक..

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Apr 2015 - 8:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो इतके काही नाही शैलेन्द्र!! आपल्याला आवडले ह्यातच सारे आले!! _/\_

नेहमीप्रमाणेच वाचनीय !! पुभाप्र..एकदम चित्रदर्शी वर्णन!!

प्रदीप साळुंखे's picture

13 Apr 2015 - 11:12 pm | प्रदीप साळुंखे

तीचा पहिला स्पर्श हे असलं आता सार्वजनिक होणार?

अन्या दातार's picture

14 Apr 2015 - 1:46 pm | अन्या दातार

प्रतिक्रिया देण्यापूर्वी जरा लेख वाचायची तसदी घ्या हो!!

(या असल्या प्रतिक्रिया हे आता सार्वजनिक होणार?)

नंदन's picture

14 Apr 2015 - 2:35 pm | नंदन

पाचही भाग वाचले. जबरदस्त लेखमाला!

खुप छान झालाय हा पण भाग. मस्त. पुभाप्र. :)

पियुशा's picture

15 Apr 2015 - 2:18 pm | पियुशा

जबर्याच् ! तुमची लेखनशैली इतकी प्रभावी आहे की सगळ डोळ्या समोर घड़तय अस वाटतं

मोहनराव's picture

15 Apr 2015 - 5:57 pm | मोहनराव

जबराट!!

का हो सोन्याबापू, एक डौट आहे.

मिलिट्रीत असताना तुम्हांला ही हत्यारे वापरायला मिळतात त्यांची लाईफसायकल किती वर्षांची असते? तुम्ही रिटायर झालात की तुमची बंदूक दुसर्‍याला देतात की काय करतात?

प्रदीप's picture

22 Apr 2015 - 9:09 pm | प्रदीप

वाचतो आहे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

23 Apr 2015 - 12:11 am | भाग्यश्री कुलकर्णी

डाेळ्यासमोर चित्र उभे करण्याची ताकद प्रत्येक भागात आहे.जियो....

स्वीत स्वाति's picture

23 Apr 2015 - 3:27 pm | स्वीत स्वाति

मस्त अनुभव
आणि चुकून क्रमश: लिहायचे राहिले आहे का … पुढील भागाच्या प्रतीक्षेत

स्वीत स्वाति's picture

23 Apr 2015 - 3:29 pm | स्वीत स्वाति

पुढी भागाची लिंक दिसत नव्हती
ती मिळाली ..

रुपी's picture

30 Apr 2015 - 12:59 am | रुपी

वाचताना थांबवत नाहीये. पण इतकं छान वाचून प्रतिक्रिया न देणं म्हणजे स्वार्थीपणा होईल.

तुमचं लेखन फारच जबरदस्त आहे!