अकादमी 3: रूटीन अन आयोडेक्स

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in जनातलं, मनातलं
30 Mar 2015 - 7:25 pm

अकादमी... १ , अकादमी... २ , अकादमी... ३ , अकादमी... ४ , अकादमी... ५ , अकादमी... ६

***


(टिप : ह्या भागात थोड़ी शिविगाळ आहे!!! टिपिकल अकादमी शिव्या)

हॉस्टेल ला आपापल्या रूम्स ना सेटल झाल्यावर आमचे तिसऱ्याच दिवसापासुन "रूटीन" सुरु झाले ! सकाळी 0445 hrs ना बिगुल होणार 0500 hrs पर्यन्त बेड टी घेऊन पीटी यूनिफार्म म्हणजेच पांढरी चड्डी पांढरा राउंड नेक टीशर्ट पायात कैनवास शुज अन सोबत ड्रिलसाठी असलेला खाकी यूनिफार्म व् बूट्स पट्टा अन एक पाण्याची बॉटल इतके पिठ्ठु (बारकी कैनवास ची रकसॅक) मधे भरून घ्यायचे अन हॉस्टेल बाहेर फॉलइन व्हायचे! आमच्या कंपनी चा उस्ताद मग आम्हाला रनिंग ला नेत असे. शर्मा उस्ताद ने पहिल्याच दिवशी गोड बोलत रागवत "बस आधा किमी और" म्हणत 5 किमी ओढले!!!. पुर्या कंपनी च्या तोंडाला फेस यायचा सुद्धा बाकी राहिला नव्हता. मी , समीर, पुनीत सुरु मोठ्या जोशात झालो होतो साढे 3 किमी पर्यन्त काही वाटले नाही नंतर ज़रा थकवा वाटला पण जेव्हा 5 किमी झाले अन बिना रेस्ट परत जायचे ऐसा उस्ताद नामे खविस बोलला तेव्हा मात्र सपशेल गलपाटलो आम्ही!!!परत जेव्हा पीटी ग्राउंड ला आलो तेव्हा आमचे ऑलरेड़ी पांढरे डोळे जे काही पाहिले त्याने तिप्पट पांढरे झाले अन आपण नशीबवान आहोत असे वाटले!! चार्ली कंपनी घामेजलेली उभी होती कंपनी च्या उजव्याबाजुला मोसाय चक्क उताणा पडला होता अन ठो ठो बोंबलत होता

"सरssssss आम्ही से ना होतायsssss आम्ही मर जाबो सरsssss"

मीणा उस्ताद त्याच्यापालिकडे उभा होता तोच चार्ली कंपनी चा उस्तादजी होता आम्ही आवंढे गिळत मोसाय कड़े पाहतच होतो तोवर मीणा उस्ताद कडाडला

"फॉल आउट के ऑर्डर बिना तु बाहेर कैसे आगया बंगाली, पुरी चार्ली कंपनी, परेड ग्राउंड के चक्कर तब तक लगाएगी जबतक ये *मकरा उठ के अपनी फाइनल लॅप पुरी नहीं करता, शूटsssss" चार्ली कंपनी मोसाय कड़े खाऊ की गिळु पाहत होती पण न धावुन जातात कुठे !!! दुड़क्या चालीने 6 चार्ली धावायला लागले त्यांना ती ऑर्डर देताना मोसाय अवाक् होऊन पाहत होता चार्ली कंपनी 100 मीटर पुढे गेली होती तोवर मीणा उस्ताद चा आवाज परत एकदा घुमला "थमsssssss" "पिच्छे मुड़ssssss" आता चार्लीच नाही तर सरदार ची ब्रावो अन आमची डेल्टा धरून बाकी 2 कंपनीजला अवाक करणारा नजारा होता, धडपड़त मोसाय उठून उभा राहिला होता अन चार्लीच्या दिशेने बऱ्यापैकी स्पीड ने धावत होता.

हे सगळे दुरून पाहत असलेला बड़े उस्ताद तोवर ओरडला "बाकी की कारवाई क्यों बंद हो गई!!दौड़ रहा है वो!! मरा नहीं है!!" आम्ही ताबडतोब पीटी फॉर्मेशन मधे आलो !!! मोसाय दातओठ खात शेवटचा राउंड पुर्ण करत होता, तो होताच हे ध्यान मीणा उस्ताद पुढे जाऊन उभे राहिले, अन पीटी थांबवुन बड़े उस्ताद ओरडला

"ओसीज अपने कंपनी के लिए मेहनत करने वाले ओसी सुदीप्तो के लिए ताली बजाओ"

"1....2....123" ह्या ठेक्यावर आम्ही 3 वेळा टाळ्या वाजवल्या अन डे वन चा विजेता सुदीप्तो मोसाय ह्याला आज्ञा झाली "जाओ अपने कंपनी में मिल जाओ" त्या दिवशी अंग खाच्चुन घाम गाळल्यामुळे असेल बरेच हलके वाटत होते! अगदी मोसाय पण बरा वाटत होता!!! दुपारी लंच ला असलेला पुलाव, फिश अन फ्रूट्स पार चट्टामट्टा केले पोरांनी!!! पहिल्या दिवसभर काही नाही जाणवले!! अन मग उगवली ती मनहूस दूसरी सकाळ!!!

0440 hrs चा गजर कानाशी ठेवला होता मी हात मागे वळवुन घड्याळ उचलयचा प्रयत्न केला अन लक्षात आले !! माझे हात पाय दगडासारखे घट्ट झाले होते! पण विस्सल ची भीती होतीच्!! दात ओठ खात उठलो अन शेजारी पाहिले तर समीर ची पण तीच अवस्था!!! अक्षरशः घसटत खुरडत टॉयलेट ला गेलो ते निराळीच् पंचाइत! कमोड वर बसायलाच येइना !! दात ओठ खाऊन वेदना विसरून बसलो ते स्पष्ट बोलायचे झाल्यास आतून बुच मारल्यागत पोट ढिम्म् पाच मिनिटे बसलो!!! ते घड्याळ कोणाच्या बापाचे नसते हे लक्षात आले !! तसाच पुन्हा लंगडत रूम मधे आलो!!! आता एक महत्वाचे मिशन होते!! नाईट पैंट उतरून पीटी ची चड्डी चढ़वणे!!! ती कशी चढवली हे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे!!! तसाच दातओठ खात फॉलइन झालो!! समीर कड़े पाहिले तसे तो हळूच कुजबुजला

"काक्के तेरे भी पॉटी के सियापे हो गए क्या बे???"

"हाँ बे पेट के मसल्स हिल ही नहीं रहे!!"

इतक्यात आमची नजर ब्रावो कंपनी कड़े गेली गिल तंगड्या फासकटुन चालत येत होता सहा फूटी काटकुळा सरदार असा चालताना पाहून आम्ही त्या ही अवस्थेत हसायचा प्रयत्न केला! हो फ़क्त प्रयत्न!! कारण जबड़ा हलवायला गेलो ते बरगड्या बोंबलायला लागल्या होत्या!! त्या दिवशी आम्ही पीटी अन ड्रिल कशी केली हे फ़क्त आम्हीच जाणोत!!! त्या दिवशी ब्रेकफास्ट ला मेस मधे गरम ऑम्लेट्स पानात पडत होती पण ती ही बेचव लगायला लागली!! दुसऱ्या दिवसापासुन आमची वेपन्स अन मैप रीडिंग ची लेक्चर सुरु होणार होती! आज अंग दुखत होते तरी एक बरे होते आज ऑडिटोरियम ला व्हीएस सरांचा ओपनिंग एड्रेस होता, पानात पडले ते गिळून कसे बसे अंघोळीला पोचलो !!! ते हॉस्टेल लॉबी ला बड़े उस्तादजी एक पोते घेऊन हजर , मी पुनीत सोबत खुरडत चालत येत होतो ते पाहून उस्ताद ओरडला "ये दोनों आदमी दौड़ के आ" कसेबसे "दौड़त" पोचलो ते नवीन झ्यांगट

"अकादमी के अंदर हर काम दौड़ चाल में होगा ये जानके भी दोनों पैदल कैसे चले *मकरो??"

आम्ही "......."

"दोनों आदमी 20 20 पुशप अभी"

तिरिमिरित आम्ही वाकलो अन 20 पुशप मारुन मी उठून उभे राहायची अगळीक केली!!!

"उठने की करवाई क्यों की!, पोजीशन फिरसे, मराठे तु 20 पुशप और , पंडितजी आप प्लांक पोजीशन में वैसे ही !!"

"जल्दी शुरू करोssssss"

मी जीव लावुन पुशप करायला लागलो पण पुनीत ची ही अवस्था भयानक होती, जिम् मधे ऐब्स चे रूटीन केलेल्या लोकांस "प्लांक" पोजीशन काय असते ते चांगलेच ठाऊक असेल!!! पुशप करुन मी तसाच पोजीशन मधे होतो तेव्हा उस्ताद म्हणाला "खड़े होss"

उभे राहिल्यावर पुढचा आदेश ऐकून जीव अर्धा झाला!!

"ये नमक का बोरा है! उठा के बाथरूम के दरवाजे में रखो! और सब को बोलो आज नहाने के पानी में एकएक मुठ्ठी डालो बदन दर्द ठीक होगा"

कणहत कुथत आम्ही ते 50 किलोचे पोते ठेवले अन तेवढ्यात उस्तादजी ने स्वतःच सारी पोरे फॉलइन करुन त्यांना मिठाची काशी करायला सांगितले आम्ही सूटल्यासारखे मटकन बसलो पण लगेच उठलो!!न जाणो ह्या सैतानाच्या परत नजरेला पडलो तर बोंबला!!!

त्या गोंधळात दोन ओसीज एका मागे एक आले बाथरूम मधे अंघोळीला , मोठी मजेशीर ध्याने होती दोघेही, एक काळाकुळकुळीत अंगात जानवे इतक्या वेदनेत ही जवळ आला अन म्हणाला

"वनक्कम आम एस दिवाकर,अल्फा कंपनी, मदुरई तमिळनाडु ,बाई थुड़ी एल्प करदो"

मला पाच मिनट सुधरना हा कोण काळू? माला बाई का म्हणतो??? पण कळले तेव्हा मी वेदनेच्या तिरिमिरित उठलो अन म्हणले

"क्या हेल्प होना अन्ना??"

"बाथरूम का फ्लोर पर मग पड़ती !! आम उठा नै सकती मग उठा के देता क्या बाई?"

माझे टाळके हलले म्हणले "अबे गांx जान लेगा क्या बच्चे की निकल यहाँसे भोसड़ीके" खाली मान करुन तो निघुन गेला , त्याच्यामागे एक चीनी दिसणार ध्यान आले! नीमा सांगे, राहणार सिक्किम,आधीच गोरेभरड त्यात रगड्याने लाल तोंड झालेले माकडा सारखे !! मी हसु दाबत म्हणले "हॅलो" तर म्हणाला "dont talk to me man u marathas harass my bros in your state"
च्यायला म्हणले हा काय भिकारचोटपणा
"निकल भोसड़ीके" अस्मादिक!

एका आयुष्यभरच्या घट्ट मैत्री ची सुरवात अशी झाली होती!!! अर्थात त्यात कोणाचाच दोष नव्हता!! सगळे वेदनेत होते प्रत्येकाच्या स्नायु मज्जा चेता लसुण कांदे प्रत्येक भागात तोबा दर्द होता!!! तिकडे मोसाय पारच हेंदरला होता मुटकुळ करुन बसला होता बोxखाली उशी घेऊन!! गिल बरा होता पण तो ही "वक्रतुंड" होता त्याने शक्य तितकी धावपळ केली होती मोसाय साठी , मोसाय जरा स्टेबल भासत होता पण हायहुई करत होता!! त्याच्या रडण्याला कंटाळून गिल ओरडला
"ओ भोसड़ीवाले नी होती है मेहनत तो आया क्यों फ़ौज में!!! गांx बंगाली खोत्या" ते ऐकुन मोसाय ने ही तोंड फिरवले!!! आज वेदना मैत्रीवर भारी पडत होती! पण नियती अन उस्तादवृंद सोडुन कोणालाच माहिती नव्हते की आम्हाला सोबत प्रेस करुन एक केले जाते आहे

*मकरा :- कामात अळंटळं करणारा ट्रेनी , मकरे त्याचे अनेक वचन!!

कथाअनुभव

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

30 Mar 2015 - 7:39 pm | श्रीरंग_जोशी

वाचायला रम्य वाटत असले तरी प्रत्यक्षात काय अवस्था होत असेल याची कल्पना करवत नाही.

घणाचे घाव सोसल्याखेरीज दगडातून शिल्प बनू शकत नसते याची प्रखर जाणीव करून देणारे हे लेखन.

या लेखनासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Mar 2015 - 7:48 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझे कसले आभार देवा आभार मायबाप वाचकाचे!! मी फ़क्त खरडतोय!!!

श्रीरंग_जोशी's picture

30 Mar 2015 - 7:56 pm | श्रीरंग_जोशी

व वा क लिवलय ,वाचनेबल अस काही गावल बुवा मस्त :)

आदूबाळ's picture

30 Mar 2015 - 7:41 pm | आदूबाळ

जबरी!

पण आयोडेक्सचा संदर्भ आला नाही का या भागात?

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Mar 2015 - 7:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

देवा पुर्ण भागच आयोडेक्समय आहे!!! सरासरी पहिल्या दोन आठवड्यात एका ओसी ला एक आयोडेक्स बॉटल लागत असे! असा काहीसा संदर्भ अभिप्रेत होता! पारच हुक्ला काय??

येस, पण वेदनाशामक या अर्थाने फक्त मिठाच्या पाण्याचा उल्लेख आला म्हणून विचारलं.

यशोधरा's picture

30 Mar 2015 - 7:49 pm | यशोधरा

खरंच मजा येतेय वाचायला पण तुमचे हाल तुम्हांलाच ठाउक!

मोदक's picture

30 Mar 2015 - 7:52 pm | मोदक

जबरदस्त!!!

हे असे काहीसे होते का? ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Mar 2015 - 8:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

मोदक हा नैसर्गिक अभिनय आहे!!! आमच्या केशीत अभिनय वजा झाला अन सगळे नैसर्गिक बोंबलने तेवढे उरले बाघा

मोहनराव's picture

30 Mar 2015 - 7:59 pm | मोहनराव

No pain, No gain!!
कठोर परिश्रम!! यातुनच एक तगडा जवान तयार होतो.
लेख वाचुन तुमचे काय झाले असेल त्यावेळी कल्पनाच करु शकत नाही.
पुभाप्र!!

निमिष ध.'s picture

30 Mar 2015 - 8:02 pm | निमिष ध.

सुरूवातीच्या दिवसांतले खतरनाक वर्णन आहे. आम्ही कल्पनाही करू शकत नाही. एकदम इतके पळणे आणि पुश अप्स आणि प्लँक्स म्हणजे खरच ते आयोडेक्स मय दिवस असतील.
पुलेशु

जेपी's picture

30 Mar 2015 - 8:04 pm | जेपी

जबरी हो बापुसाहेब...

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Mar 2015 - 8:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

मंडळी कोणी कितीही फिटनेस फ्रिक असलो आपण तरीही अकादमी च्या रेट्यापुढे आपण सुरवतीला गलपाटतोच!!! पाहिले ७ दिवस मरणाचा त्रास असतो मग अंगळवाणी पड़ते!!! पण ते सात दिवस भयंकर असतात नंतर व्यायाम न केल्यास अंग दुखते!!! स्नायु बरेच दिवस नंतर जर ताणले गेले तर त्यातुन काही एसिड secrete होते म्हणे त्याच्यामुळे पेन्स होतात ! डॉक्टर बंधु प्रकाश टाकू शकतील ह्याच्यावर

बहुगुणी's picture

31 Mar 2015 - 12:24 am | बहुगुणी

याचं स्पष्टीकरण ऑक्सिजन डेफिसिट किंवा Excess post-exercise oxygen consumption (EPOC) इथे मिळेल.

व्यायामात स्नायूंमधल्या शुद्ध-रक्तवाहिन्यां (रोहिणीं)च्या भिंती प्रसरण पावतात आणि स्नायूंना आधिक प्राणवायूचा पुरवठा व्हावा म्हणून रक्तप्रवाह वाढवला जातो. एका मर्यादेपर्यंत रक्तातून मिळणारा प्राणवायू पुरेसा असतो, आणि aerobic glycolyis (glycolysis= ग्लुकोजचे रेणू तुटणं) या प्रक्रियेने प्रमुख शक्तिदाता रेणू असलेल्या ग्लूकोजचं आधी पायरुव्हिक अ‍ॅसिड रेणूंमध्ये आणि त्याचं ATP या शक्ती-रेणूंमध्ये रुपांतर होतं:

पण अतीव स्नायू-श्रमाने हा रक्तातला प्राणवायू अपुरा पडायला लागतो (oxygen deficit / Excess Post-exercise Oxygen Consumption), आणि आवश्यक असलेले आधिकचे ATP रेणू anaerobic glycolysis या प्रक्रियेने निर्माण केले जातात. या प्रक्रियेत पायरुव्हिक अ‍ॅसिड रेणूंचं रुपांतर लॅक्टिक अ‍ॅसिड रेणूंमध्ये होतं, आणि असं तयार झालेलं ८०% लॅक्टिक अ‍ॅसिड हळूहळू स्नायूंमधून रक्तात पाझरून यकृतात पोहोचतं आणि तिथे त्याचं पुन्हा ग्लूकोजमध्ये रुपांतर होतं. स्नायूंमधल्या कमी पडलेल्या ATP रेणूंची भरपाई व्हायला चांगलं अन्न मिळावं लागतं आणि या प्रक्रियेला बरेच दिवस लागू शकतात.

(मला हे नुसतं टंकायला oxygen deficit झालेलं आहे! धन्य आहे सोन्याबापूंसारख्या असंख्य सैनिकांची जे इतके अविरत श्रम करून सैन्यात प्रवेश करून त्यानंतर पुढे अनेक वर्षे देशाची अविरत सेवा करतात!!)

खेडूत's picture

30 Mar 2015 - 8:06 pm | खेडूत

भयंकर आवडले....

असेच डीट्टेलमध्ये येउन्द्या !

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Mar 2015 - 8:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्रयत्न तोच आहे

नुसती हजेरी लावून जातोय, पहिल्या भागापास्नं वाचून काढणार आहे वेळ मिळाला की!!
धन्स टु आदूदादू खफवर याबाबतीत लिहील्याबद्दल!! :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Mar 2015 - 8:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

ह्या प्रस्तावासाठी श्री आदूबाळ ह्यांचे आभार _/\_

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Mar 2015 - 8:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

_/\_

जबरदस्त.

धर्मराजमुटके's picture

30 Mar 2015 - 8:45 pm | धर्मराजमुटके

अनुभव चांगले आहे पण लेखनाकडे थोडे लक्ष द्या असे सुचवितो. इथे वाचणारे ९९% लोक्स ब्लडी सिव्हिलियन्स आहेत :) त्यांना मिलिट्रीवाल्यांसारखे एका दमात मोठी मोठी वाक्ये वाचाता नाही येत.
उदाहरणादाखल खालील वाक्ये परत वाचा.

सकाळी 0445 hrs ना बिगुल होणार 0500 hrs पर्यन्त बेड टी घेऊन पीटी यूनिफार्म म्हणजेच पांढरी चड्डी पांढरा राउंड नेक टीशर्ट पायात कैनवास शुज अन सोबत ड्रिलसाठी असलेला खाकी यूनिफार्म व् बूट्स पट्टा अन एक पाण्याची बॉटल इतके पिठ्ठु (बारकी कैनवास ची रकसॅक) मधे भरून घ्यायचे अन हॉस्टेल बाहेर फॉलइन व्हायचे! आमच्या कंपनी चा उस्ताद मग आम्हाला रनिंग ला नेत असे.

"फॉल आउट के ऑर्डर बिना तु बाहेर कैसे आगया बंगाली, पुरी चार्ली कंपनी, परेड ग्राउंड के चक्कर तब तक लगाएगी जबतक ये *मकरा उठ के अपनी फाइनल लॅप पुरी नहीं करता, शूटsssss" चार्ली कंपनी मोसाय कड़े खाऊ की गिळु पाहत होती पण न धावुन जातात कुठे !!! दुड़क्या चालीने 6 चार्ली धावायला लागले त्यांना ती ऑर्डर देताना मोसाय अवाक् होऊन पाहत होता चार्ली कंपनी 100 मीटर पुढे गेली होती तोवर मीणा उस्ताद चा आवाज परत एकदा घुमला "थमsssssss" "पिच्छे मुड़ssssss" आता चार्लीच नाही तर सरदार ची ब्रावो अन आमची डेल्टा धरून बाकी 2 कंपनीजला अवाक करणारा नजारा होता, धडपड़त मोसाय उठून उभा राहिला होता अन चार्लीच्या दिशेने बऱ्यापैकी स्पीड ने धावत होता.

आणि असेच लिहित राहणार असाल तर पुढील वेळेस येताना सीएसडी मधून येताना आमच्यासाठीही आयोडेक्सच्या बाटल्या घेऊन या :)

शिवाय उद्गारवाचक चिन्हे तुम्हाला फार आवडतात असे दिसते ती जरा कमी केली तर थोडी जास्त मजा येईल. वाक्य संपवण्यासाठी पुर्णविराम वापरा. शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याची खुद्द मिपा मालकांचीच परमिशन आहे पण सगळे नियम पाळलेच पाहिजे असेही नाही.
अजून एक - रेफरन्ससाठी राजाराम सीताराम वाचू नका नाहितर तुमची शैली प्रभावित होईल. ती आहे तशीच राहूद्या. हवतर तुमची लेखमाला झाल्यावर वाचा.

प्रतिसाद चांगल्या हेतुने दिला आहे. सैन्याबाहेरची मंडळी देखील तुम्हाला काहीतरी शिकवू पाहात आहेत असे समजून लिहा. पुढील लेखनास शुभेच्छा !

धर्मराजमुटके's picture

30 Mar 2015 - 8:47 pm | धर्मराजमुटके

नीलकांत साहेब, स्वसंपादनाची सुविधा द्या की राव ! जीवनातल्या चुका सुधारता येत नाहित पण लिखाणातल्या तरी सुधारुन घेऊ द्या !

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Mar 2015 - 8:57 pm | कैलासवासी सोन्याबापु

मोबाइल वर लिहतोय, गूगल हिंदी इनपुट ला मराठी वळण देणे कठिण जातंय तरी प्रयत्न करतो, बाकी तुम्ही कोट केलेल्या वाक्यात काय कमी वाटले ते स्पष्ट सांगाल ज़रा मी सुधारायचा प्रयत्न करतो,

राजाराम सीताराम मी वाचले नाही डिटेल अजुन

स्क्रूटिनी साठी आभारी आहे आपला!

धर्मराजमुटके's picture

30 Mar 2015 - 9:29 pm | धर्मराजमुटके

गुगल हिंदी इनपुट वापरुन लिहिताय तरी लिखाण चांगल्यापैकी शुद्ध आहे. त्याबद्दल वादच नाही. मात्र अवतरण चिन्हे व्यवस्थित वापरायला हवीत. मी उल्लेख केलेला उतारा पुन्हा लिहून दाखवितो.

सकाळी 04:45 वा. (किंवा पावणेपाच वाजता) बिगुल होत असे. पाच वाजेपर्यंत बेड टी घेऊन पीटी यूनिफार्म म्हणजेच पांढरी चड्डी, पांढरा राउंड नेक टीशर्ट, पायात कैनवास शुज अन सोबत ड्रिलसाठी असलेला खाकी यूनिफार्म व् बूट्स, पट्टा, एक पाण्याची बॉटल इतके पिठ्ठु (बारकी कैनवास ची रकसॅक) मधे भरून घ्यायचे. हॉस्टेल बाहेर फॉलइन व्हायचे. आमच्या कंपनी चा उस्ताद मग आम्हाला रनिंग ला नेत असे.
शक्यतो वाक्ये छोटी छोटी लिहा. वाक्य संपल्यावर ! च्या ऐवजी पुर्णविराम (टिंब) द्या. वाक्य जर मोठे लिहिणे गरजेचेच असेल तर मधे स्वल्पविराम द्या. त्याने वाक्य कसे वाचायचे याचे वाचकाला मार्गदर्शन होते. एखाद दुसरा शब्द लिहितांना चुकला तरी वाचक तो समजावून घेऊ शकतो.
सध्या एवढेच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Mar 2015 - 9:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

ओके सर! एग्रीड एंड नोटेड!

आनन्दा's picture

31 Mar 2015 - 5:19 pm | आनन्दा

याबाबत मी असहमत. त्यांना त्यांच्या शैलीत लिहू द्या हो. त्यांनी ते एका वाक्यात लिहिलेय ना ते सगळे ते १५ मिनिटात करायचे. असे छोटी छोटी वाक्ये लिहिली तर मग त्यातला परिणाम, ती घाई निघून जाईल.
छोटी छोटी वाक्ये लिहायला तो काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम आहे का?

स्वप्नांची राणी's picture

31 Mar 2015 - 5:56 pm | स्वप्नांची राणी

मी पण असहमत. तुमच्या लिखाणात उत्स्फुर्तता आहे आणि ती तशीच राहु द्या. ती छोटी छोटी वाक्य, ते अचुक व्याकरण, ते अल्प-स्वल्पविराम ई.ई. फार कोरडं, फार टेक्नीकल वाटतय....माहितगारांच्या लेखासारख. तिथली शैली वेगळी, ईथली वेगळी. अर्थात तिथे ती योग्य, आणि ईथे हिच...!!!

प्रचेतस's picture

31 Mar 2015 - 5:57 pm | प्रचेतस

सहमत.

अगदी पूर्ण सहमत.

धर्मराजमुटके's picture

31 Mar 2015 - 7:26 pm | धर्मराजमुटके

लिखाणातील उत्स्फुर्तता आणि शुद्धलेखनाचा, अवतरण चिन्हांचा काय संबंध ? उदाहरणार्थ तुमचाच प्रतिसाद कोणतीही अवतरणचिन्हे न घालता वाचून बघूया ? तुमचा हा प्रतिसाद देखील उत्स्फुर्त असेल असे समजून चालतो. पण तुम्ही मग विरामचिन्हे वापरायचे कारण कळले नाही. मनोगत सारखे अगदी काना,मात्रा, वेलांटी सह काटेकोर शुद्धलेखनाची अपेक्षा नाहिये मात्र योग्य ठिकाणी अवतरण चिन्हे वापरा ही जास्त मोठी अपेक्षा आहे काय ?
असो, शुद्धलेखनाच्या विषयावर मी मिपावर कायमच अल्पसंख्यांक असेन याची जाणिव आहे पण जिथे जमेल तिथे सांगणे माझे कर्तव्यच समजतो.

अवांतर : संपादक साहेबांनी मेहेरबान होऊन स्वसंपादनाची सोय दिली त्याबद्दल आभारी आहे.

बोका-ए-आझम's picture

1 Apr 2015 - 10:05 am | बोका-ए-आझम

Just Marathi नावाचं अॅप डाऊनलोड करा मोबाईलवर आणि मोबाईलच्या लँग्वेज आणि इनपुट सेटिंगमध्ये जाऊन सेट करा. मराठीत लिहिता येईल. ळ वगैरे अक्षरंही मिळतील.

मधुरा देशपांडे's picture

30 Mar 2015 - 9:30 pm | मधुरा देशपांडे

सगळे भाग वाचले. मिपावर एक उत्तम लेखमाला सुरु झाली. पुभाप्र.

मस्त लिहित आहात हो. येऊद्यात अजून.....

खटपट्या's picture

31 Mar 2015 - 12:09 am | खटपट्या

हाही भाग उत्तम.
पुभाप्र.

वॉल्टर व्हाईट's picture

31 Mar 2015 - 12:31 am | वॉल्टर व्हाईट

"क्या हेल्प होना अन्ना??"
"बाथरूम का फ्लोर पर मग पड़ती !! आम उठा नै सकती मग उठा के देता क्या बाई?"

एका दमात तीनही भाग वाचले. अत्यंत इंटरेस्टिंग लेखमाला आहे. तुमच्या वर्णनातुन अंदाज येत होता की तुम्हा लोकांची काय हालत झाली असेल, पहिल्या दिवशी.
या वरच्या वाक्याने अक्षरशः आर ओ एफ एल, बिचारा अण्णा !

जुइ's picture

31 Mar 2015 - 8:10 pm | जुइ

हाही भाग रंजक झाला आहे. तरी एकूण खूपच कष्टप्रद ट्रेनिंग असते याची जाणीव झाली. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

सांगलीचा भडंग's picture

31 Mar 2015 - 1:34 am | सांगलीचा भडंग

अतिशय मस्त आणि जब्राट लेखमाला !!! काय ट्रेनिंग का काय.वाचूनच पाय दुखले

रमेश आठवले's picture

31 Mar 2015 - 5:40 am | रमेश आठवले

देशाच्या रक्षणासाठी तयार होण्यासाठी केवढ्या दिव्यातून जावे लागते याची कल्पना आपल्या सुरेख लिखाणा मुळे आली. असेच आणखी भाग वाचण्याची उत्कंठा आहे.
*मकरो हा शब्द उर्दू -हिंदीतील मक्कारो या शब्दाचे फौजीकरण असेल का ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Mar 2015 - 6:09 am | कैलासवासी सोन्याबापु

माहिती नाही राव! पण त्यांना मकरा म्हणतात इतके नक्की!!!

नाखु's picture

31 Mar 2015 - 9:10 am | नाखु

आयुष्यात किमान २ वर्षतरी सैनीकी प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थी+युवा अवस्थेत दिले पाहीजे.
कठोर परिश्रम म्हणजे काय आणी जवान नक्की काय ? हेच ब्लडी सिव्हिलियन्सना कळेल.
नाहेतर फक्त २६ जानेवरी १५ ऑगस्टला नारा देणे आणी कँन्टीन सुविधांपुरता जवान आठवतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Mar 2015 - 9:34 am | कैलासवासी सोन्याबापु

किमान छात्र सेना उर्फ़ नॅशनल कॅडेट कोर तरी असावाच् !! बाकी कॉन्सक्रिप्शन्स कंपल्सरी नको, फोर्सेज जितके वालंटियर असतील तितके त्यांचे फाइटिंग स्पिरिट जास्त असते कारण त्यांचे करियर हा त्यांचा चॉइस असतो कुठली ही जबरदस्ती नसते.

हे माझे वैयक्तिक मत झाले

खंडेराव's picture

31 Mar 2015 - 12:24 pm | खंडेराव

लिखाण अगदीच जबरदस्त झालेय..वाट बघतोय.
कंपल्सरी सैन्य भरती नसल्यामुळे असेल, मला आजवर सैन्यातला एकही माणुस भेटला नाही जो त्याच्या पेशावर नाराज होता, जसे बरेचसे सिविलिअन्स असतात.

नाखु's picture

1 Apr 2015 - 9:06 am | नाखु

ह्या अनिवार्य प्रशिक्षणाने रस्त्याने चालताना आणि सर्व सार्वजनीक ठिकाणी किमान शिस्त+वेळ पाळण्याची वाईट्ट खोड लागली तर चांगलेच आहे की !!
शालेय पुस्तकाच्या समाज शास्त्रातला "स" कधी गायबला तेच कळले नाही.
पांढरपेशा नाखु

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Apr 2015 - 9:21 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत

टवाळ कार्टा's picture

1 Apr 2015 - 11:03 am | टवाळ कार्टा

अगदी अगदी....आज जे बरेच "माचो" आपण बघतो...सक्तीच्या २ वर्षांच्या लश्करी प्रशिक्षणानंतर खरोखर "माचो" बनतील

मंदार कात्रे's picture

31 Mar 2015 - 9:11 am | मंदार कात्रे

जबरदस्त लेखमाला

आभार्स सोन्याबापू

ब़जरबट्टू's picture

31 Mar 2015 - 9:41 am | ब़जरबट्टू

मस्तच अनुभव आहेत.. तिनही भाग एका दमात वाचलेत..अजून येऊ द्या... :)

सुबोध खरे's picture

31 Mar 2015 - 10:10 am | सुबोध खरे

बापूसाहेब
जुन्या दिवसांच्या आठवणी एकदम जागृत झाल्या. दिवसाच्या शेवटी उस्तादाना अगदी आई माई वरून शिव्या द्याव्याशा वाटत. पण कोर्स संपत आला तसे त्यांच्या बद्दल प्रेमही वाटत असे. आमच्या प्लाटूनने तर उस्तादला एक छानसे घड्याळ भेट दिले होते. तो बिचारा गहिवरला आणि म्हणाला सर हमने आप लोगोंको रगडा लगाया वो इसलिये कि आप डॉक्टर लोग रेजिमेंट मे जाके राजा कि तरह रहोगे और कोई दुसरे अफसर से दो कदम आगे हि रहोगे. आर्मीच्या समुद्रात त्याची परत भेट कधीच झाली नाही पण आजही त्याचा चेहरा स्पष्टपणे आठवतो आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Mar 2015 - 10:24 am | कैलासवासी सोन्याबापु

डॉक्टर साहेब, "घड्याळ" ते ही "टाइटन" चे "गोल्ड प्लेटेड" हा मला वाटते भारतीय जीसी , ओसी लोकांचा अन फोर्सेज चा यूनिवर्सल कोड असावा!!! आम्ही पण आमच्या उस्ताद ला घड्याळ दिले होते!! त्याच्या बद्दल रेस्पेक्ट द्विगुणीत कसा झाला हे पुढच्या भागांत येइलच

सुबोध खरे's picture

31 Mar 2015 - 10:34 am | सुबोध खरे

बापूसाहेब
आम्ही १९८८ साली दिलं होतं. तेंव्हा टायटन नसावं. आम्ही एच एम टी चं घड्याळ सी एस डी कॅन्टीन मधून घेऊन दिलं होतं.
आम्ही फार जुने ( कालबाह्य) लोक आहोत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Mar 2015 - 10:49 am | कैलासवासी सोन्याबापु

कालबाह्य ही जनरल टर्म झाली. आपल्या परलंस मधे "वेटरन"!! मुद्दा घड्याळ आहे ! अपना समय बदलने वाले उस्तादजी को घडी का गिफ्ट!!

झकासराव's picture

31 Mar 2015 - 10:57 am | झकासराव

सुरेख लिहिताय. :)

मावसभाउ आर्मीतच आहे.
अर्थात तो जीडी म्हणुन जॉइन आहे.
जॉइन झाला तेव्हा बराच हट्टाकट्टा होता.
रेग्युलर जिम, रनिन्ग आणि स्पोर्ट्स मुळे.

ट्रेनिन्ग वरुन आला तेव्हा काटक झालेला पण बारीक पण.
त्याने त्याचे काहि अनुभव सांगितलेले. ते ही बरेचसे असेच होते.
हेच उस्ताद तुमच्या पासिन्ग आउट परेड पर्यंत मित्रच होतील. :)

विशाल कुलकर्णी's picture

31 Mar 2015 - 11:08 am | विशाल कुलकर्णी

बापु, जियो यार ! कसले खतरा अनुभव आहेत. सालं आपण रोज इतकं बोलतो. एकमेकाला वाट्टेल तशा शिव्या घालतो. पण आता मात्र ठरवलय यावेळेला जेव्हा भेटशील ना हलकटा तेव्हा एक कडकडून मिठी मारायचीय तुला..
आणि हो, त्या आधी त्रिवार मुजरा सुद्धा !

तुला म्हणून नाही, तर या अफाट यातना, कष्ट सोसून पुन्हा आयुष्यभर आपले सर्वस्व देशासाठी वेचणार्‍या तुझ्यासारख्या असंख्य सैनिकांचा प्रतिनिधी म्हणून ! _/\_

चिनार's picture

31 Mar 2015 - 11:22 am | चिनार

अगदी खरं !
एकदा भेटावच लागेल तुम्हाला सोन्याबापू

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Mar 2015 - 12:57 pm | कैलासवासी सोन्याबापु

लेको मीठी काय भेटु तेव्हा भरतभेट प्रकरण करू!!! त्यात काय बे इतके!!!

मुजरा नाको!! मी तितका लायक नाही की सगळ्या सैनिकांच्या वतीने मुजरा स्वीकारावा!! मुजरा करायची सोय आर्मी ने केली आहे अन पोलिस ने ही सदर्न कमांड, पुणे ला वॉर मेमोरियल आहे तिथे जाऊ!!! तु अन मी सोबत मुजरा घालु!

चिनार's picture

31 Mar 2015 - 11:20 am | चिनार

सोन्याबापू..
वाचूनच अंग आकडल्यासारखं वाटतंय !
जबरदस्त वर्णन !

चुकलामाकला's picture

31 Mar 2015 - 12:11 pm | चुकलामाकला

लेख मालिका अतिशय आवडली. पु.भा.प्र.

सविता००१'s picture

31 Mar 2015 - 12:46 pm | सविता००१

कसली मस्त कथामालिका चालू झाली आहे.. अप्रतिम लेखन
या क्षेत्राबद्दल फार कमी माहीत आहे.त्यामुळे वाचतानाच कित्येक गोष्टी अगदी नवीनच कळताहेत.
तुमचे अनुभव सॉलीडच आहेत. कसे सहन करत असतील आपले सैनिक कोण जाणे.
पुभाप्र..

अभिरुप's picture

31 Mar 2015 - 1:37 pm | अभिरुप

मकरागिरी हा शब्द एनसीसी मध्ये खुप वापरायचो...आज त्याची आठवण झाली.खुप सुंदर लेखन....पुभाप्र

भाग्यश्री कुलकर्णी's picture

31 Mar 2015 - 1:41 pm | भाग्यश्री कुलकर्णी

लय भारी...

नितीन पाठक's picture

31 Mar 2015 - 3:56 pm | नितीन पाठक

बापूसाहेब, तुमची लिहीण्याची शैली उत्तम आहे. वाचनीय आहे,
या लेखमाले चे मला चिशेष आकर्षण आहे, कारण मी सुध्दा आमच्या खात्यातर्फे प्रादेशिक सेना (Territorial Army ) मध्ये १० वर्षे सेवा दिली आहे. आणिबाणीच्या परिस्थिती मध्ये काश्मिर, दिल्ली, कोलकता इ.इ. ठिकाणी "ड्यूटी" केली आहे.
आम्हाला सुध्दा पूर्णपणे सैनिकी शिक्षण दिले होते. "रगडा" कसा असतो याचा पूर्ण अनुभव आलेला आहे.
१९९६ साली काश्मिर मध्ये प्रथमच निवडणूक जाहीर झाली होती. संपूर्ण काश्मिर हा त्यावेळी दहशती खाली होता. मी तीन महीने काश्मिर येथे अतिशय अशांत अशा क्षेत्रात SLR, A – 47/56, Carbine . LMG अशी हत्यारे घेउन ड्यूटी केली होती. आमच्या camp वर अतिरेक्यंनी हल्ला केला होता. आज त्याची आठवण आली.
माझ्या कडे सुध्दा भरपूर अनुभव आहे, परंतु श्री. बापूसाहेबां सारखी लेखनशैली नाही त्यामुळे एवढे समर्पक शब्दात लिहीणे जमेल असे वाटत नाही.
असो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...............

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Mar 2015 - 4:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

ओहो वेटरन !!!!! सलुट घ्यावा सर!!! हॉट झोन मधे ड्यूटी करणे खरेच थोड़क्या नशीबवान सैनिकांना लाभते!! _/\_

प्रचेतस's picture

31 Mar 2015 - 4:18 pm | प्रचेतस

जसे जमेल तसे लिहा.
पण अवश्य लिहाच.

टवाळ कार्टा's picture

31 Mar 2015 - 4:33 pm | टवाळ कार्टा

तुमची लेखनशैली कशीही असुद्या...आम्ही वाचुच

बॅटमॅन's picture

31 Mar 2015 - 5:46 pm | बॅटमॅन

_/\_

बाकी काही बोलण्याची औकात नाही, तरी कॄपया जमेल तसे आपले अनुभव लिहावेत ही अत्याग्रहाची विनंती.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Mar 2015 - 5:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लिहा हो. स्वागतचं असेल मिपावर सैनिकी अनुभवांचं.

स्वप्नांची राणी's picture

31 Mar 2015 - 4:19 pm | स्वप्नांची राणी

इन्टरेस्टींग लेखमालीका!! पुतण्याने एवढ्यातच पहिली स्टेप पार पाडलीय. अजून दिल्ली बहुत दूर है..पण तरिही त्याला लगे हाथ हे लेख फॉरवर्ड केले..

आनन्दिता's picture

31 Mar 2015 - 6:48 pm | आनन्दिता

जबरदस्त लेखमाला.. एका दमात सगळ्या भागांचा फडशा पाडला.

पुढचे भाग लवकर टाका.

सस्नेह's picture

31 Mar 2015 - 11:03 pm | सस्नेह

अस्सल मिल्ट्री भाषेतले वरिजिनल अनुभवकथन.

शुभा मोरे's picture

1 Apr 2015 - 12:50 pm | शुभा मोरे

जबरद्स्त अनुभव !!! बापुसाहेब. आता आम्हाला वाचताना ह्सु येतय. पण, त्यावेळची तुमच्या अवस्थेचा विचार केला की किती भयंकर हालत होत असेल...

चाणक्य's picture

6 Apr 2015 - 10:20 am | चाणक्य

मस्त अनुभव कथन.