पाठीराखा (ही नवीन कविता आहे)

द्विज's picture
द्विज in जे न देखे रवी...
19 Nov 2008 - 6:54 pm

पाठीराखा
हे जीवन आहे नश्वर हे जगत आहे नश्वर
आधार एकच असतो नाम त्याचे ईश्वर
कुठे ना कुठे हा आत्मा त्यालाच मिळत असतो
शून्यातून शुन्याकडची वाट चालत असतो

विश्वातून परमातीताची ओळ्ख होऊन जाते
त्याच्या हाकेशी दिलेली साद 'जीवन' नामे स्फुरते
विवेकातूनच चैतन्य स्त्रावित होत असते
मगच "अह॑ ब्रम्हास्मि " बोधाने मन प्लावित होत असते

पदकमला॑मधेच त्याच्या सुख माझे उरले
भौतिकतेचे तामस मनातूनी सरले
आता मुक्त आत्मा परब्रम्हापाशी जाईल
प्रभू माझा पाठीराखा मला घ्यावयासी येईल....

संस्कृतीधर्मप्रकटनविचार

प्रतिक्रिया

द्विज's picture

19 Nov 2008 - 6:55 pm | द्विज

------द्विज
परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो
आधी कवी मग देहाचा जन्म घेतो

द्विज's picture

19 Nov 2008 - 7:29 pm | द्विज

कविता अध्यात्मावर आधारित आहे क्रुपया समजले नाही हे म्हनू नका
------द्विज
परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो
आधी कवी मग देहाचा जन्म घेतो

द्विज's picture

19 Nov 2008 - 7:30 pm | द्विज

इथे सारे नास्तिक आहेत का?
सहज विचारले राग मानू नका
\------द्विज
परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो
आधी कवी मग देहाचा जन्म घेतो

द्विज's picture

19 Nov 2008 - 7:33 pm | द्विज

क्रूपया विड॑बन करू नये
कारण स॑ता॑च्या याच भावना होत्या
------द्विज
परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो
आधी कवी मग देहाचा जन्म घेतो

द्विज's picture

19 Nov 2008 - 7:39 pm | द्विज

कमाल आहे
------द्विज
परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो
आधी कवी मग देहाचा जन्म घेतो

द्विज's picture

19 Nov 2008 - 7:42 pm | द्विज

३४ वाचने
नो प्रतिक्रिया
गूड
------द्विज
परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो
आधी कवी मग देहाचा जन्म घेतो

टारझन's picture

20 Nov 2008 - 12:38 am | टारझन

प्रणव साहेब , णिराश णका होऊ, प्रतिसाद नाही आले तरी काय होत नाही, अपेक्षा ठेउ नका,
जर प्रतिसादच हवे असतील तर खालील गोष्टी विचारात घ्या.

१. सद्ध्या च्या हॉट टॉपीक वर काही तरी प्रक्षोभक लिहा.
२.एखादं प्रसिद्ध विडंबण करा
३. मराठी-अमराठी वर लिहा
४. एखादी शोकांतिका लिहा, किंवा सेंटी सेंटी लिहा
५. हा ऑल टाईम प्रतिसाद खेचणारा विषय आहे, महिलांवर सरसकट कमेंट्स करणारं काहीतरी लिहा.
ही पंचसुत्री लक्षात ठेवा .. तुमचा धागा सेंच्युरी नाही , फिफ्टी तरी नक्कीच मारेल.

बाकी मला कवितांतलं 'अ' का 'ढ' कळत णाही ,म्हणून काही मार्मिक णाही लिहू शकत. आणि अधिक म्हणजे आम्ही जण्माचे णास्तिक .
पण तुम्हाला एक तरी प्रतिक्रिया लाभल्याचं बरं वाटावं म्हणून ही प्लास्टिक सर्जरी.
असो , लिहीत रहा भौ .. फक्त रिकामटेकडे कौल काढू किंवा बिन कामाच आणि रटाळ लिखाण टाळा ..
अन्यथा प्रतिसाद सोडा टोमणे भेटतील.

सामंत काकांकडून चिकाटी शिकण्यासारखी आहे. स्वतःसाठी लिहा हो !!

-(आपलाच) टारझन

शिकण्यासारखी आहे.

शुभेच्छा.

**चार ओळींत मात्रांचे काही गणित नसलेला, दुसर्‍या-चवथ्या ओळींच्या शेवटी यमक असलेला "चारोळी" नावाचा वाचण्यास कठिण प्रकार आजकाल लोकप्रिय होतो आहे. या प्रकाराचा अभ्यास मी केलेला नाही, त्यामुळे वाचन कठिण होते, आशयाकडे लक्ष जात नाही. "विटेवरी-विटेवरी-विटेवरी..." [संदर्भ : असा मी असामी] असे हिंद-रॉक पद्धतीने आरती म्हटली, तर पारंपरिक चालच शिकलेल्यांना कळत नाही. मग असे वाटते, अरे आपल्याला हिंद-रॉक कळत असते तर मजा आली असती. त्याच प्रकारे मला या नव्या चारोळ्यांची गेयता, त्यांचा ठेका कळला असता तर भावना समजायला सोपे गेले असते, असे वाटते.**

वेताळ's picture

20 Nov 2008 - 10:25 am | वेताळ

खुपच सुंदर कविता तुम्ही केली आहे.मला भिती होती तुम्ही जातीपाती च्या कविता करुन त्यात अडकता की काय. पंरतु आता ही कविता वाचुन ती काळजी दुर झाली
कुठे ना कुठे हा आत्मा त्यालाच मिळत असतो
शून्यातून शुन्याकडची वाट चालत असतो

खुपच सुंदर विचार आहे.
भौतिकतेचे तामस मनातूनी सरले

कवीने जातपात ह्या पलिकडे जाऊन कविता करायला हवी.आता नक्कीच तुम्ही भौतिक तामसी विचार मनातुन काढुन टाकले असणार......
वेताळ

राघव's picture

20 Nov 2008 - 2:13 pm | राघव

प्रणवराव,
प्रभू माझा पाठीराखा मला घ्यावयासी येईल....
ही ओळ खूप छान.
कविता चांगली आहे. भाषा थोडी अजुन सोपी करून बघा. तुम्हालाच आनंद होईल. :)

"स्त्रावीत" च्या ऐवजी स्त्रवीत असावे असे वाटते.
तसेच प्लावित हा शब्द नाही बुवा कळला. पल्लवीत असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

अवांतरः
राग मानू नका, पण, "भौतिकतेचे तामस मनातूनी सरले" हे वाक्य जर मनापासून असेल तर तुम्हांस प्रतिक्रिया न येण्याचा, कुणी विडंबन केले तर त्याचा, कविता कुणास समजली नाही तर त्याचा, त्रास होऊ नये असे वाटते.
कुणास जर कविता समजली नाही तर त्याला समजून घेऊन, परत सांगण्याइतपत समजुतदारपणा असावा. त्यातून आपणच अधिक शिकत जातो. आपलीच कविता अधिकाधिक सोपी, प्रगल्भ होत जाते.
स्वत:च त्रागा केला तर सगळ्यात जास्त त्रास स्वत:लाच होईल. येथे तुम्ही मित्र मिळवण्यासाठी आलात असे गृहित धरून सांगतो, मला स्वत:ला येथे काहीही वाईट अनुभव आलेला नाही. कुठे काही चुका असल्यात तर त्या स्पष्टपणे दाखवणारे लोक मिपावर आहेतच. पण आपण त्यातून शिकत गेलो तर सांभाळून घेणारेही आहेत, मैत्री जोडणारेही आहेत. अनुभव घेऊन पहा. शांत-आनंदी रहा, छान लिहा, आम्हालाही त्या लेखनाचा आनंद मिळू देत. शुभेच्छा! :)

आपला,
मुमुक्षु

द्विज's picture

26 Nov 2008 - 1:37 pm | द्विज

धन्यवाद
------द्विज
परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो
आधी कवी मग देहाचा जन्म घेतो