Don't lose out; Work out - पुस्तकाची ओळख

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
4 Mar 2015 - 3:44 pm

नमस्कार,

नुकतंच एक पुस्तक वाचनात आलं. रुजुता दिवेकर यांचं - डोन्ट लूज आउट; वर्क आउट

प्रत्येक पानागणिक एखादी ऐकलेली, बोललेली, वाटलेली, गोष्ट समोर येत गेली. 'अरे हेच.... अगदी हेच वाटलेलं...' किंवा 'ऐला मीही असंच म्हणतो...' असं मनाशी वाटल्याशिवाय पुस्तकातला एकही धडा संपला नाही. त्यामुळे हे पुस्तक वाचताना विशेष मजा आली.

शीर्षकावरूनच पुस्तकाचा विषय कळतो. वर्काउट, किंवा व्यायामावर भाष्य करणारं हे पुस्तक आहे. व्यायाम महत्वाचा आहे कारण असंख्य जण तो महत्वाचा समजत नाहीत. लेखिकेची या विषयावरील पकड निर्विवाद असून त्याचा प्रत्यय पुस्तकातील मांडणीतून येत रहातो.

व्यायाम न जमण्याच्या/करण्याच्या कारणांची उदाहरणं देत पुस्तकाची सुरुवात होते. मग लेखिका स्ट्रेंग्थ ट्रेनिंगचं महत्व, ते शरीरावर कशा प्रकारे परिणाम करतं, फॅट लॉस कसा होतो, कसा होत नाही, हे सांगते. व्यायाम का करावा, कसा करावा, किती करावा यासंबंधीची विपुल स्पष्टीकरणं असलेलं हे पुस्तक तुम्हाला व्यायामाला 'नाही' म्हणायला वाव देत नाही. अनेक शास्त्रीय बाबी सोप्या करून सांगत हे पुस्तक तुम्हाला व्यायामाचं महत्व पटवायचा प्रयत्न करतं.

याचबरोबर उदाहरणादाखल वर्कआउट रेजिम्सही या पुस्तकात आहेत. पुढे योग, शास्त्रीय नृत्य अशा अंगांनीही व्यायामाकडे, स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंगकडे बघत लेखिका तिच्या क्लाएंट्सची काही मजेशीर उदाहरणं देत पुस्तकाचा शेवट करते.

प्रामाणिकपणे सांगायचं तर डाएट ही गोष्ट विशेष पटत नसल्याने रुजुता दिवेकरांची पहिली दोन पुस्तकं मी वाचलेली नव्हती. पण माझा मित्र व जिम ट्रेनर याने मला आग्रह करून हे पुस्तक वाचायला लावलं तेंव्हा हे मी वाचलं. तेंव्हा पहिले त्याला अनेक धन्यवाद. आणि अर्थातच रुजुता दिवेकर यांना धन्यवाद, की त्यांनी इतकं छान पुस्तक लिहिलं.

व्यायाम केलेल्या, करणा-या, करू इच्छिणा-या प्रत्येकाला मी हे पुस्तक सुचवेन. फिटनेस ला महत्व देणा-या किंवा न देणा-या प्रत्येकाला सुचवेन. आपली आपण फिटनेस ची व्याख्या, परिमाणं ठरवणा-या सर्वांनाही सुचवेन. तेंव्हा नक्की वाचा. फिट रहा. स्ट्राँग रहा.

माझ्यासाठी पुस्तक वाचण्याची फलश्रुती म्हणाल तर पुन्हा नियमित व्यायाम सुरू करण्याचा चंग बांधलेला आहे.

a

साहित्यिकक्रीडाविचारसमीक्षासल्ला

प्रतिक्रिया

माझ्यासाठी पुस्तक वाचण्याची फलश्रुती म्हणाल तर पुन्हा नियमित व्यायाम सुरू करण्याचा चंग बांधलेला आहे.

=))

वेल्लाभट's picture

4 Mar 2015 - 3:54 pm | वेल्लाभट

हश्शू आलं का कुनाला तली.... अच्चं जालं का?

मोहनराव's picture

4 Mar 2015 - 3:55 pm | मोहनराव

:)

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2015 - 6:04 pm | पिलीयन रायडर

छान पुस्तक आहे.. फुकट जिम मारण्यात अर्थ नाही, त्यामागे आपल्या शरीरात होणारे बदल आधी समजायला हवेत.

शैली फार मस्त आहे रुजुताची.. मजा येते वाचायला!!

वेल्लाभट फारच शॉर्ट झालं पुस्तकाबद्दल....पुस्तकही तसंच लहान आहे का?

वेल्लाभट's picture

4 Mar 2015 - 6:28 pm | वेल्लाभट

मीच पुस्तकाबद्दल भारंभार लिहीलं तर रुजुता दिवेकरांनी लिहीलेलं काय वाचणार तुम्ही?
त्यामुळे हे इतकंच ठीक आहे; बाकी पुस्तक वाचा :)

छान लिहिले आहे. पुस्तक वाचते आता.
माझ्याकडे तिचे पहिले पुस्तक डोन्ट लूज युवर माईन्ड............आहे, तिच्या सहीसकट :). कालच पुन्हा उघडून पुस्तकातले काहीतरी वाचत बसले होते तेंव्हा मनात आले की हिच्या पुस्तकाचा सारांश असा कितीसा काढता येईल? पानोपानी सारांशच तर आहे! मी तिची डोळे उघडे ठेवून फ्यान आहे. एखाददुसरे तिचे म्हणणे पटलेले नाहीये पण बाकीचे बरेच पटले आहे.

प्रज्ञाताई's picture

4 Mar 2015 - 8:51 pm | प्रज्ञाताई

बुद्धिला आकलन होणं वेगळं. आणि जे कळलं ते आचरणात उतरणं वेगळं. (हो हो. तोच तो, Knowledge आणि Wisdomमधला फरक!)

वेल्ला, तुम्ही व्यायामाला सुरवात केलीत की तुमचे अनुभव इथे वाचायला आवडतील.

माझीही शॅम्पेन's picture

4 Mar 2015 - 9:48 pm | माझीही शॅम्पेन

छान छान :)

पुस्तक परीक्षण करताना त्याची किमत टाकावी का नाही हा आधी पडलेला प्रश्न परत पडला आहे

वेल्लाभट's picture

14 Mar 2015 - 10:51 am | वेल्लाभट

२५० रुपये.
अमेझन.कॉम वर ९८ ला मिळतंय.

माझीही शॅम्पेन's picture

15 Mar 2015 - 9:32 pm | माझीही शॅम्पेन

धन्स … अमेझॉन वरून मागवलं आहे :)

अप्पा जोगळेकर's picture

4 Mar 2015 - 9:51 pm | अप्पा जोगळेकर

हं. 'करिना कपूर' या नावाच्या जोरावर ताईंच दुकान चांगलं जोरात सुरु आहे.
या जगात 'काय म्हटलंय' या पेक्षा 'कोणी म्हटलंय' यालाच अधिक महत्व आहे. - पु. ल. देशपांडे

बाकी हे डाएटिशिअन दर थोड्या वर्षांनी काहीतरी नवीन पुडी सोडत राहतात.
इतके दिवस तूप वर्ज्य होतं. आता अचानक 'ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड' चा शोध लागला.
आज काय भात सोडा. उद्या काय तेल सोडा. आमची थैली भरणं सोडू नका.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Mar 2015 - 11:26 pm | अत्रुप्त आत्मा

@आमची थैली भरणं सोडू नका. >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

आजानुकर्ण's picture

14 Mar 2015 - 1:32 am | आजानुकर्ण

:) :)

खरंय अप्पा. लोकांना यडपट बनवून डायेटिशियन लोक नुसते छापताहेत आजकाल.

'करिना कपूर' या नावाच्या जोरावर ताईंच दुकान चांगलं जोरात सुरु आहे.

अगदी सहमत. घरी आज्जीने सांगितलं तूप खा की चालत नाही. पण तेच दिवेकरबाईनी सांगितलं तर बरण्या घेऊन निघाले घरी.

बरण्या घेऊन निघाले घरी.
हा हा हा. खरय. पण निदान तेंव्हातरी तूप खातायत हे काय कमीए का? नाहीतर तेल नाही, तूप नाही, भात नाही, अमूक फळ नाही किंवा अजून जे काय असेल ते..........
विचित्र, हानिकारक सल्ले ऐकून तब्येतीचं नुकसान करून घेण्यापेक्षा बरय त्यातल्यात्यात!

वेल्लाभट's picture

14 Mar 2015 - 10:59 am | वेल्लाभट

रुजुता दिवेकरांची पहिली दोन पुस्तकं मी याच कारणास्तव टाळली होती. मला उगाच हे खाऊ नको ते खाऊ नको असे सल्ले ऐकायला पाळायला जमायचं नाही. व्यायाम करा आणि जे खाल ते जिरवा हेच बेस्ट. अशी मानसिकता असल्याने मी ती वाचली नाहीत. हे वाचलं ते केवळ हे व्यायाम या विषयावर भाष्य करतं म्हणून. आणि आवडलं अर्थात. असो.
मुद्दा हा की रुजुता दिवेकर सांगतात 'म्हणून' काही करायला नको. जे योग्य आहे ते करावं. आंधळ्या 'फॉलोवर्स' ची कमी नाही.

किसन शिंदे's picture

14 Mar 2015 - 8:45 pm | किसन शिंदे

'डोन्ट लूज युवर माईंड, लूज युवर वेट' वाचतोय या लेखिकेचं.