''बाबा , फॉक्स तर फ्रूट्स नाई खात ना?''
नाही बेटा .
''मग इथं गोष्टीत कसं लिहिलंय ?''
बघू .
ती म्हण आहे, म्हण .
''काय म्हणू?'''
अगं तू काई म्हणू नकोस, त्याला 'म्हण' असं म्हणतात.
लहानशा गोष्टीतून काहीतरी सांगितलेलं असतं .
''पण फॉक्स तर नॉनवेज खातो ना?''
तसं नाही बेटा - कुणाला एखादी गोष्ट मिळाली नाही तर तो म्हणतो ना -'' मला तर ती नकोच होती '' - त्याला म्हणतात कोल्ह्याला द्राक्षं आंबट - कारण कोल्हा पण असाच लबाड असतो.
***
जयाकाकू आलेल्या.
सारखं बोलतच रहातात .
म्हणाल्या '' पिंकीला सेंट जोसेफला नाई मिळालं - आम्हालाही नकोच होतं इतकं लांब !''
मी विचारलं '' म्हणजे कोल्ह्याला द्राक्षं आंबट ना?''
आई रागावली मला .
काकू पण चिडलेल्या बहुतेक .
उगाचच !
प्रतिक्रिया
27 Feb 2015 - 4:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
27 Feb 2015 - 4:22 pm | बॅटमॅन
हा हा हा =))
27 Feb 2015 - 4:41 pm | टवाळ कार्टा
खि खि खि =))
27 Feb 2015 - 5:13 pm | जेपी
हि हि हि =))
27 Feb 2015 - 5:20 pm | सूड
=))
27 Feb 2015 - 5:37 pm | मधुरा देशपांडे
आवडली कथा. :)
27 Feb 2015 - 5:43 pm | एस
वा! आमचे बालपण आठवते आणि कित्येक उगीचच दुखावल्या गेलेल्या मोठ्या व्यक्ती आठवल्या. :-(
27 Feb 2015 - 5:51 pm | कपिलमुनी
हलकी- फुलकी छान कथा
27 Feb 2015 - 6:07 pm | तुषार काळभोर
:)
:)
27 Feb 2015 - 6:33 pm | मनीषा
बालपणीचा - काळ सुखाचा
मनात येईल ते बोलता येतं
27 Feb 2015 - 6:36 pm | आदूबाळ
ही हॉ हॉ हॉ!
जबरीच!
27 Feb 2015 - 6:50 pm | पलाश
छान कथा. आवडली.
27 Feb 2015 - 11:39 pm | खटपट्या
वा !!
28 Feb 2015 - 12:03 am | रुपी
आवडली.
28 Feb 2015 - 12:16 am | अत्रुप्त आत्मा
:-D
28 Feb 2015 - 12:43 am | रेवती
हीहीही. निरागसता लहान मुलांची असते पण मोठ्यांना तोंड लपवावेसे वाटते. ;)
28 Feb 2015 - 7:39 pm | बाबा पाटील
माझ्या ओपीडीत एका तीन साडेतीन वर्षाच्या मुलीला घेवुन तीचे आई वडील आले होते,की बाळ झोपेत सुसु करत्,नेहमी प्रमाणे केस टेकिंगचा भाग म्हणुन बाळा विचारल बाळा तुला कसली भिती वाटते का ? आईजवळ झोपत नाहीस का ? कन्येने असल खतरनाक उत्तर दिल की काय सांगु, आई गप्प उठुन बाहेर निघुन गेली बाबाने जी मान खाली घातली की बाहेर जाइपर्यंत वरच नाही केली. परत काय त्या पेशंटचा फॉलोअप मिळाला नाही.
3 Mar 2015 - 2:43 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
28 Feb 2015 - 1:13 am | लॉरी टांगटूंगकर
:) मस्त
28 Feb 2015 - 11:42 am | आतिवास
:-)
28 Feb 2015 - 11:47 am | नाखु
निरागस जग ! बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रेवा !!
1 Mar 2015 - 10:37 pm | खेडूत
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार..!
3 Mar 2015 - 4:07 pm | ब़जरबट्टू
:).. आवडली...
3 Mar 2015 - 4:32 pm | सविता००१
मस्त कथा