प्रभात राग रंगती...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जे न देखे रवी...
11 Nov 2008 - 4:42 pm

भल्या पहाटे 'ललत'
षड्ज मध्यमी मूर्च्छना
चालली 'भटियारा'ची
प्रभातरंगी अर्चना

डमडम डमरूची
आली 'भैरवा'ची स्वारी
तीव्र मध्यम वाढवी
'रामकली'ची खुमारी

कारुण्यमय 'तोडी'ची
'आसावरी'शी संगती
'अहिरभैरवा' संगे
प्रभात राग रंगती..!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतकवितावाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

11 Nov 2008 - 4:59 pm | लिखाळ

:)
कविता छान आहे तात्या...

तंत्रशुद्ध लेखनाने अभिव्यक्ती अजून खुमासदार होते हे खरेच.

तो मूर्च्छना हा शब्द असा हवा का?
-- (तीन अक्षरी) लिखाळ.

विसोबा खेचर's picture

11 Nov 2008 - 5:13 pm | विसोबा खेचर

तो मूर्च्छना हा शब्द असा हवा का?

करेक्ट..! सुधारणा केली आहे बॉस.. :)

आपला,
(सुधारीत!) तात्या

कपिल काळे's picture

11 Nov 2008 - 7:26 pm | कपिल काळे

तात्या, अशीच एक सुंदर कविता सायंकाली रागांवर येउ दया.

http://kalekapil.blogspot.com/

सुमीत भातखंडे's picture

11 Nov 2008 - 7:41 pm | सुमीत भातखंडे

खूप छान.
कविता आवडली.

मुक्तसुनीत's picture

11 Nov 2008 - 8:01 pm | मुक्तसुनीत

काव्याच्या पाण्यात तुम्ही उडी मारलीत तर एकदम तरबेज झालात की राव ! :-) ते म्हणतात ना ... काव्य "आत" पाहिजे , बाहेरची छंदवृत्तादि वस्त्र-प्रावरणे काय , कधीही घालता येतात ! लगे रहो !

वाटाड्या...'s picture

11 Nov 2008 - 8:04 pm | वाटाड्या...

तात्या...

मोजक्या शब्दात चपखल बसलीये रागांची बारात...सुज्ञास ह्या कवितेवरुन रागांची वेळ/स्वभाव कळण्यास काहीच अडचण येऊ नये.

मुकुल

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Nov 2008 - 8:15 pm | बिपिन कार्यकर्ते

तात्या फुल सुटले आहेत. मस्त रचना.

बिपिन कार्यकर्ते

रामदास's picture

11 Nov 2008 - 9:08 pm | रामदास

गायलेली रचना पण जोडा साहेब.

रामदास's picture

11 Nov 2008 - 9:08 pm | रामदास

गायलेली रचना पण जोडा साहेब.

प्राजु's picture

11 Nov 2008 - 9:11 pm | प्राजु

धोंडोपंत काकांच्या छंदशास्त्रामुळे, तात्या सुद्धा कवी झाले. हेच धोंडोपंतांचे श्रेय.
अभिनंदन तात्या. आता तुमच्यातला कवी जागा झाला आहे.. त्यामुळे मिपावर कवितांचा खजिनाच मिळेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रामदास's picture

11 Nov 2008 - 9:18 pm | रामदास

दुसरीकडे प्रभू मास्तर मोकाट सुटलेत .आज एक कविता टाकलीय.

धोंडोपंत's picture

11 Nov 2008 - 10:04 pm | धोंडोपंत

वा वा वा वा तात्यासाहेब,

हार्दिक अभिनंदन. छान रचना झाली आहे. अशा विवक्षित विषयावर लिहितांना त्या क्षेत्रातील संदर्भ न बदलता लेखन करावे लागते. सहाजिकच ते काम जरा कठीण आहे.

कारण आसावरी, अहिरभैरव, रामकली, भटियार यासारख्या तांत्रिक शब्दात कवीला छंदानुसार बदल करण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. ते जसे आहेत तसे घेऊनच छंदाची पूर्तता करावी लागते.

चांगला कसदार प्रयत्न. असेच लिहीत रहा. शुभेच्छा.

आपला,
(प्रभावित) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

विसोबा खेचर's picture

12 Nov 2008 - 12:25 am | विसोबा खेचर

धन्यवाद गुरुजी..!

काव्य माझे बाळबोध
धोंडोपंतांस वाहिले
काव्यगुरुस करितो
नमन माझे पहिले..!

आपला,
(गुरुशिष्य परंपरेवर गाढा विश्वास असणारा) तात्या.

पक्या's picture

12 Nov 2008 - 12:30 am | पक्या

वा तात्या ..सुंदर कविता.
रागातले फारसे काही कळत नसले तरी कविता मात्र भावली.

चतुरंग's picture

12 Nov 2008 - 12:34 am | चतुरंग

छंद लागे कवितेचा
राग झाले शब्दरुप
गातगात तात्या देती
सुरांनाही शब्दरुप!

चतुरंग

राघव's picture

13 Nov 2008 - 1:29 pm | राघव

सुंदर कविता :)
आमची ही छोटीशी दाद तुमच्या कवितेला -

बहुशब्द योजुनी बनती काव्याच्या पंक्ती,
छंदालंकार नटवी तयाला शब्दांच्या संगती!
निसर्गाचा स्पर्श होई असे काव्य वाचुनी,
घंटा मंजुळ नाद ऐकविती मन-गाभार्‍यातुनी!!

छंदोबद्ध नाही हां हे वरचे लिहिलेले.. अजुन आम्ही धडे गिरवतोय धोंडोपंतांचे मार्गदर्शन वाचून :)

मुमुक्षु

मनीषा's picture

13 Nov 2008 - 7:16 pm | मनीषा

खूप छान कविता ..

जयवी's picture

18 Nov 2008 - 5:16 pm | जयवी

तात्या.....आता काव्यप्रांतात पण प्रवेश..... मस्त !! छान आहे प्रय त्न !!
तुमच्या पुढच्या कवितांसाठी खूप खूप शुभेच्छा :)