राम राम मंडळी, मिपाचे लोक कुठे गप्पा मारत बसतील याची काय ग्यारंटी नै. असेच रमत गमत काही मंडळी वेरुळला येऊन गेली. मलाही काही मिपाकरांना भेटायला नेहमी आवडतं. धन्या आणि वल्ली हे माझे मित्रच पण या निमित्ताने मला अतृप्त आत्मा यांना आणि प्रगोला भेटायला मिळालं. मजा आली.प्रगो,वल्ली,अतृप्त आत्मा,किसनदेव,सतीश गावडे(धन्या) आणि प्रा.डॉ. मंडळी गप्पांना काय विषय नसतो, मनभरुन कोसळणा-या पावसारखे आम्ही आडवे तिडवे उभे बरसलो, नै म्हणायला जाता जाता मी वल्ली किसनदेव संपादकीय गोष्टीवर बोललो. काही सदस्यांवर बोललो, काहींच्या लेखनावर बोललो. काहींच्या विचित्र गोष्टींबद्दल बोललो. सारांश अनेक माणसं आपापल्या वृत्तींसह येतील तेव्हा त्यांना सोबत घेऊन मिपा इंजॉय केलं पाहिजे आम्ही असंही बोललो. प्रगो फारसे काही बोलले नाही. मी, धन्या,बुवा आणि वल्ली आणि मधे मधे किसन देव बोलले. काय बोलले सर्वच काय सांगायचं नसतं नै का.
आणि हो, अतृप्त आत्मा यांनी मला दोन अत्तराच्या बाटल्या दिल्या. धन्स. मला त्यातला आवडता असा मोगरा त्यांनी दिला. मनभर सुगंध दरवळला आणि मी जरा ब्याकमोड मधे गेलो. मैत्रीण म्हणायची आपल्याला बुवांकडून हे हे मागवायचं हं, मी हो म्हटलेलं आठवतं. मी गॉगल लावला आणि डोळ्यांना वाट करुन दिली. बाकी, मोगरा कसला दरवळला, क्या कहु... अजून खुप काही गोष्टी. पण, लिहायचा कंटाळा. दोन क्षण मजेत गेलेत. धन्स मिपाकर. :)
प्रतिक्रिया
11 Jan 2015 - 5:57 pm | त्रिवेणी
गोपनिय कट्टा का म्हणे.
11 Jan 2015 - 6:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाकर भेटणार होते आणि जाहिर चर्चा करायची नै असं ठरलं होतं.
पण, मला दमच नै निघाला. मी जाहीर करुन टाकलं, म्हणुन....!
-दिलीप बिरुटे
11 Jan 2015 - 6:06 pm | त्रिवेणी
बाब्बो.
आता तुमचे मित्र रागावणार ना तुमच्यावर.
11 Jan 2015 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाकर अजून रस्त्यातच असतील. पुण्याला दहा वाजेपर्यंत पोहचतील. सर, कै टाकू नका हं वृत्तांत.
पण मी मनात म्हटलं. आपण काही नात्याचे की गोत्याचे, त्यातल्या त्यात परस्पर विरोधी मताचेच जास्त.
पण भेटावं वाटलं, हे महत्वाचं. नै तर त्रिवेणी तुम्हाला म्हणुन सांगतो. आत्ता घरात पाहुणे आले आहेत,
त्यांच्याबरोबर काय बोलावं माझा वेळच जात नै ये, अन ते पाहुणेही जात नै ये. मी आपलं मोबाईलवरुन
प्रतिसाद लिहितोय. ;)
च्यायला, या बोर पाहुण्यांना कसं कळत नै की समोरुन काही रिस्पॉन्स येत नै तर चालतं व्हावं.
शीट हलतच नै ये... सालं अशा पाहुण्यांचं काय करायचं यावर मला एक धागा काढायचाय. पाहु कसं जमतं ते.. :(
-दिलीप बिरुटे
11 Jan 2015 - 6:34 pm | त्रिवेणी
पाहुणे तुमच्या सासरचे हेत वाटत.
11 Jan 2015 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
*dash1* असं जाहीर नका बोलायला लावू प्लीज.
पाहुणे पाहुणे असतात. सर्वच चांगले असतात नै का. :(
-दिलीप बिरुटे
11 Jan 2015 - 6:13 pm | विवेकपटाईत
गोपनीय कट्ट्यात काय घडले असावे???
काही सदस्यांवर बोललो, काहींच्या लेखनावर बोललो. काहींच्या विचित्र गोष्टींबद्दल बोललो????काय बोलले सर्वच काय सांगायचं नसतं नै का.
जी गोष्ट कुणाला माहित नसते, ती सर्व सामान्य
जी सर्वाना माहित असते, ती गोपनीय
आम्हाला बी कळू द्या, काय काय बोलला ते. कुणाला सांगणार नाही, मीपावची शप्पथ
11 Jan 2015 - 6:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्लीज प्लीज प्लीज, शप्पथ नका घेऊ. या शपथेपायी माझं आयुष्य डावाला लागलंय. :(
कै नै हो, थोडं मिपाबद्दल बोललो, थोडं संक्षीबद्दल बोललो, थोडं मुटेंबद्दल बोललो,
काही अनाहिताबद्दल बोललो, थोडं नीलकांतबद्दल बोललो, थोडं गविबंद्दल बोललो.
थोडं उत्तम लिहिणा-या स्पार्टकस आणि बोका ए आझम बद्दल बोललो.
थोडं बॅटमनच्या संस्कृतबद्दल बोललो. प्रकाश घाटपांड्यांबद्दल बोललो.
बुवांच्या काही श्लोक अष्टकांवर बोललो.
माझ्याशी मैत्री करणार का, असा आग्रह धरणा-यांबद्दल बोललो.
आता प्लीज जास्त विचारु नका. :)
शप्पथ घेतली तशी ती मोडताही येते... पण मिपाची शप्पथ नका घेऊ. :)
(शप्पथ घेऊन कोणी कोणाला तोडू शकत नाही, हे मात्र खरं आहे)
-दिलीप बिरुटे
11 Jan 2015 - 6:51 pm | प्रचेतस
रावांना कसे विसरलात?
-(अजूनही प्रवासात)
11 Jan 2015 - 11:59 pm | अत्रुप्त आत्मा
तुफानी गप्पांचे/छप्परतोड विनोदांचे/एकमेकाच्या खेचाखेचीचे(धनाजीरावांच्या रंगा'चे! ;) )/माफक चर्चांचे/ काहि न कुटलेल्या,आणि कुटायची इच्छा नसलेल्या काथ्यांचे...दोन तास हे फक्त निघायच्या वेळेच्या अंदाजावरून लक्षात आले...अत्तीशय मज्जा आली...
आज असं वाटत होतं,की ही खादाडी अवरल्यावर इकडेच कुठे तरी शेतावर नायतर कुणाच्या ओसरीवर कलंडावं..संध्याकाळी परत चहा वगैरे होऊन फ्रेश व्हावं. नंतर सरांबरोबर पुन्हा फेरफटका गप्पा अशी पायी वारी करावी. आणि एखाद्या निवांत जागी...मोकळ्या पठारावर अगर डोंगर टेकडीवर शेकोटी/चहा/पान तंबाखू आणि भरपूर गप्पांसह मोकळ्या आकाशाखाली परत मनमुराद गप्पांचा/चेष्टा मस्करी थट्टेखोरपणाचा फड जमवावा.. पण हे सारं करण्यासाठी फक्त मी मोकळा आहे. माझा सीझन ऑफ आहे..पण बाकिच्यांना उद्या सकाळपासून त्यांचा सीझन्,मंजे कामाचा (न चुकणारा! :-/ ) अठवडा ऑन करायचाय... तेंव्हा हे सगळं पुन्हा कधितरी! असं काहिसं स्वप्न मनात घेऊन पुण्याकडे मी मनाला ओढत ओढत घेऊन आलेलो आहे. त्यामुळे पुन्हा अचानक कोणत्याही दिवशी मला माझं तेच मन असच पुण्याहून इकडे पळवून आणणार आहे,हे निश्चित! आधी या अचानक येण्याला , वेरूळातला तो बुद्ध-विहार कराणीभूत होणार आहे..याची खात्री मनाला पटेलेली आहेच..आता बिरुटे सरांबरोबरच्या गप्पांचं एक तेव्ह्ढच सरस कारण त्याच्या जोडिला आहे. :)
12 Jan 2015 - 12:14 am | अत्रुप्त आत्मा
हा न्हेमीचा ( ) अणुभव! कट्टा असला आणि त्यात संपादक आलेले असले,की कट्टा संपेपर्यंत ते कट्टेकरी असतात..नंतर लगेच (काहि वेळ तरी..) संपादक होतातच.
बहुधा सदर कट्ट्यातले काय एडिट करायचे? हे ठरवत असावेत! ;)
ही पहा आजची गुप्त खलबते!
=============================
आणि हा आजच्या दिवसातला सगळ्यात गुड-बाय..बाय...
12 Jan 2015 - 10:39 am | गवि
थोडक्यात म्हणजे हजर सदस्य वगळून बाकी सदस्यांबद्दल गॉसिप.
म्हणजे बायका करतात तेच..!! ;) मग स्त्री-कट्टा (आका अनाहिता कट्टा) काय वेगळा? ;) ;)
टाकली काडी.
12 Jan 2015 - 2:46 pm | सूड
उगाच का जुने लोक पुर्षांची मंगळागौर म्हणायचे!! ;)
(ही दुसरी)
12 Jan 2015 - 4:21 pm | गवि
फू.. फू... फू SSS
..आरं सूडा..पेटंना की रे ह्ये..
12 Jan 2015 - 6:33 pm | सस्नेह
मोठ्ठी फुकणी आणा *biggrin*
11 Jan 2015 - 6:43 pm | यशोधरा
आमास्नी म्हायती व्हतं का व्हनार हाये असा कट्टा ह्ये म्हूनशान. आता तुमीच शिक्रेट फोडल्यालं हाय, तवा, आमास्नी ह्ये सांगाया काय हरकत नाय नव्हं?
11 Jan 2015 - 6:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्हय वं. पण ठरलंय ना कै बोलाचं नाय म्हणुन. मी तुम्हाला कै सांगणार नै सांगून ठेवतो.
किसना ठाण्याहुन पुण्याला आला. पुण्याहुन प्रगोच्या गाडीत बुवा,धन्या,वल्ली किसन औरंगाबादला आले इतकेच.
त्यांना मी वेरुळला भेटणार होतो, पण माझा मुड बरा नव्हता आणि मेरा दिल अब कही नही लगता म्हणुन मी त्यांना भेटलो नाही. आणि जाता जाता मला ते माझ्या गावाला भेटले इतकेच बाकी कै नै.
हं आता वल्लीचा वेरुळहुन पाय निघत नै, धन्याला दगड शिल्प बोर होतं. प्रगो आणि बुवाला सहा नंबरची लेणी आवडली.
मी वल्लीला म्हणालो मंगळवारी माझ्या कॉलेजची पोरा पोरींची अजिंठ्याला ट्रीप जातेय तुम्ही मार्गदर्शक म्हणुन या तर तर तो म्हणाला मला ऑफीस आहे, असं खुप काही. पण, मला कोणीही कितीही खोदून खोदून गोपनिय कट्ट्यालबद्दल कितीही विचारलं तरी मी कोणाला काही सांगणार नै सांगून ठेवतो.
-दिलीप बिरुटे
11 Jan 2015 - 7:01 pm | यशोधरा
आमाला ऐकायचंपण नाय! नकाच, नकाच सांगू. :-/
12 Jan 2015 - 7:09 am | चौकटराजा
प्रगो आणि बुवाला सहा नंबरची लेणी आवडली.
असं हाय काय त्या लेणीत ( लायनीत )? . खजुराहोची शाखा म्हारास्ट्रात निघाली की काय ?
12 Jan 2015 - 10:53 am | प्रचेतस
नै नै.
ती लेणी क्र. १०.
त्या महायान चैत्याच्या दर्शनाने बुवा विस्मित झाले होते.
12 Jan 2015 - 4:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महायान चैत्याच्या दर्शनाने बुवा विस्मित झाले ते छायाचित्र प्लीज इथे डकवू नका. :)
-दिलीप बिरुटे
12 Jan 2015 - 5:10 pm | सतिश गावडे
*lol*
11 Jan 2015 - 7:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
छ्या, छ्या ! तुमी कायबी सांगिटलं नाय आनि आमी कायबी ऐकलं नाय :)
कोन्चा कट्टा ? ह्ये कट्टा म्हंजे आस्तं काय ??
11 Jan 2015 - 8:53 pm | पैसा
"अनाहितांबद्दल बोललो" असं कायसं सर म्हणाले. सरांना अनाहितांची भारीच बै कल्जी. दुष्ट अनाहिता इतके कट्टे करतात पण सरांची आठवण कै काढत नैत!
12 Jan 2015 - 4:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनाहितातला नुसता 'अ' जरी उच्चारला तरी अनाहितांचे चारपाच प्रतिसाद कोणाच्याही लेखनाला पडतात इतकेच आम्ही बोललो. बाकी कै नै. आपण एक मिपाकर सोडा...आमची आठवण कोणी करावी असे आम्ही आता राहीलो कुठे. :(
आणि मलाही आता-
''इथलं काहीच नकोय आता
इथुन दूर कुठे तरी...
साता समुद्राकडे
कुठल्या गावी ?
कुठल्या मुलखात ?
कुठल्या वाटेनं ?
कुणासाठी जायचं ?
कशासाठी जायचं ?''*
असं मला वाटायला लागलं आहे. :)
*(अजिंठा-ना.धो.महानोर)
-दिलीप बिरुटे
12 Jan 2015 - 7:03 pm | पैसा
मिपावर एवढी वर्षं काढलीत, मिपाकर काय नवीन आहेत काय तुम्हाला की मिपाबद्दल आम्ही काही नवीन सांगायचंय तुम्हाला! छ्या:, एक मस्तपैकी कवितेचं रसग्रहण लिहा बघू! काय लावलंय उगा!!
12 Jan 2015 - 8:06 pm | सस्नेह
अंहं ! लावणी, लावणी पाहिजे खटकेबाज !
11 Jan 2015 - 9:06 pm | सुबोध खरे
अहो आम्हाला वाटले बिरुटे सर म्हणजे कोणीतरी भारदस्त व्यक्तिमत्त्व असेल(प्राध्यापक डॉक्टर वगैरे) पण हे तर जरा जास्त दिवस कालेजात काढलेल्या जुन्या विद्यार्थ्यासार्खेच दिसतात.
मोगरा कसला दरवळला
काय बात है
12 Jan 2015 - 4:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्यासारखाच अनेकांचा प्रा.डॉ.या आयडीमुळे वयाच्या बाबतीत कै च्या कै समज होत चालले होते. (म्हणुन पहिल्यांदा फोटो टाकला)
प्रा.डॉ.आयडीमुळे मला कितीतरी येणारी चांगली ''स्थळं'' गेली असतील, असं मला नेहमी वाटलं आहे. ;)
-दिलीप बिरुटे
(प्राध्यापक डॉक्टर)
12 Jan 2015 - 5:30 am | रेवती
छोटेखानी कट्टा आवडला.
12 Jan 2015 - 5:44 am | स्पंदना
अजुन वल्लीचा गोपनिय वृत्तांत यायचा आहे, त्यात भर भरुन फोटो असणार, त्यांच्या काळाविषयी, कोरीव कामाविषयी आणी छोट्या मोठ्या लक्षणांविषयी माहीती असणार!!
नुसत्या कल्पनेनेच आसुसायला होतं. पण वल्लीचा वृतांत मी कधीच लगेच वाचुन त्यावर प्रतिसाद देउ शकत नाही. :( डोळाभर पाहूनच होतं नाही तर काय करणार?
बाकी सरांचा छुपा वृतांत आवडला. किसन देवांना फारा दिवसांनी वेळ मिळालेला दिसतो आहे. धन्याने कोणत्या लेण्यात अंग टाकल होतं ते कळाल नाही आणि प्रगोंना पाहून मस्त वाटल.
12 Jan 2015 - 10:53 am | प्रचेतस
ह्यावेळी वृत्तांत मी काहीच लिहिणार नै.
वेरूळ लेखमाला आधीच लिहिलेली आहे की. :)
एक शेवटचा भाग राहिलाय. लेणी क्र. १ ते १० चा. तो तेव्हढा पूर्ण करेन.
आत्मूदांच्या खास शैलीतून मात्र बरेच काही वाचायला मिळण्याची शक्यता आहे.
12 Jan 2015 - 9:05 am | नाखु
असावा अस्ली पिक्चर अभी बाकी है दोस्त्. :-X :-x X: x: :-# :# (इती आत्मुदा) शिवाय "स्थल-स्थापत्य" वर्णन वल्लीदांकडून.लेखाच्या मानाने फोटु कमी आहेत काय?? का मलाच असं वाटतय !!
12 Jan 2015 - 10:00 am | प्रमोद देर्देकर
अगदी अगदी मनातला बोललात डॉ. साहेब.
मला ही तसेच वाटले होते. पण आता त्यांना पाहुन असे वाटते, की या इतक्या हँडासम सरांभोवती विद्यार्थींनींचाच गरडा जास्त असणार.
(कृ.हे.घे.)
12 Jan 2015 - 10:31 am | अजया
गोपनिय कट्ट्याचा वाचनीय वृत्तांत ! बाकी सर काही बोलले नाही अाम्ही काही वाचलं नाही.सर्वांबद्दल ममत्वाने बोलणे झालेले पण जाणवले.अनाहितांबद्दलची कळकळ,मिपावरची एन्जायमेंट,संपादक चर्चा सायडिंगला जाऊन! हे कुठे वाचले कोणास ठाऊक ^_~
12 Jan 2015 - 1:41 pm | सतिश गावडे
वेरुळ लेणी पाहण्यास याच्या आधी सलग दोन वर्ष गेल्याने या वर्षी वल्लीने "तू येणार आहेस का" असे विचारताच नाही असे निक्षून सांगितले. वल्लीने "मी तुझा खर्च करतो" असे म्हणूनही मी माझ्या निश्चयापासून ढळलो नाही. अर्थात वल्ली हे मित्रप्रेमापोटी म्हणाला होता की लेणीप्रेमापोटी याची मला कल्पना नाही.
मात्र ते चौघेच जात असून गाडीत एक जागा रिकामी होती. माझ्या मनाने उचल खाल्ली आणि जावे की न जावे ही मनाची दोलायमान अवस्था दोन मिनिटांत संपून मी वल्लीला "मी येतोय" असे सांगितले. वल्लीच्या आकारमानाचा विचार करता "वल्ली उडालाच" असे म्हणू शकणार नाही. मात्र त्याला आश्चर्याचा धक्का बसला.
अर्थात मी वेरुळला येत नसून औरंगाबादला येतोय असे सांगितले. मी तुमच्यासोबत जरी वेरुळला आलो तरी लेणी पाहायला येणार नाही.
शनिवार उजाडला आणि बॅकपॅकमध्ये एक-दोन मानसशास्त्रावरची पुस्तके टाकून मी आमच्या औरंगाबादस्थित सरळ, सालस आणि बोलघेवडया प्रा. डॉ. मित्राला भेटायला निघालो...
12 Jan 2015 - 3:10 pm | अत्रुप्त आत्मा
@वल्लीने "मी तुझा खर्च करतो" असे म्हणूनही मी माझ्या निश्चयापासून ढळलो नाही. >>>
@अर्थात वल्ली हे मित्रप्रेमापोटी म्हणाला होता की लेणीप्रेमापोटी याची मला कल्पना नाही.>> अत्यंत रास्त शंका! ;)
@ जावे की न जावे ही मनाची दोलायमान अवस्था दोन मिनिटांत संपून मी वल्लीला "मी येतोय" असे सांगितले. वल्लीच्या आकारमानाचा विचार करता "वल्ली उडालाच" असे म्हणू शकणार नाही..>>
12 Jan 2015 - 3:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल किसन आणि माझ्याशी भेट घेतल्यानंतर वल्लीशेठ यांनी चक्क मिपा मालक नीलकांत आणि मिपावर तंत्रज्ञ म्हणुन काम करणारे प्रशांत यांच्याशीही भेट घेतली अशी आमच्या गुप्तहेरांकडून खबर मिळाली. संकेस्थळ सद्स्यांवर टेहळणी करणा-या आमच्या 'क्ष'उपग्रहाने एक छायाचित्र आम्हाला पाठवलं करिता माहितीस्तव.
प्रशांत, नीलकांत (मिपामालक), आणि वल्ली.
-दिलीप बिरुटे
12 Jan 2015 - 3:40 pm | सतिश गावडे
आता सभ्य संपादक माननिय किसनरावजी शिंदे-पाटील धुणार वल्लीला.
वल्लीने किसनाला पुणे स्टेशनला उतरायला सांगितले आणि स्वतः मात्र मालकांना भेटले. इकडे किसना मात्र संगमवाडीला कसे जाता येईल याचा विचार करत रिक्षाने स्वारगेटला आला.
12 Jan 2015 - 4:15 pm | त्रिवेणी
फोटोत संगमवाडीचा ब्रिज दिसतोय.
12 Jan 2015 - 4:31 pm | सस्नेह
नक्की आभासी नाहीये ना ?, गुप्चुप करुकट्टे सर ?
(चोपनीय) स्नेहांकिता *lol*
12 Jan 2015 - 4:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्ही सर्व पुरुषांनी शपथा घेतल्या आहेत कट्टा असो की पाककृती, फोटो टाकल्याशिवाय वृत्तांत लिहायचा नै.
आणि फोटो नसेल तर सरळ प्रतिसाद लिहायचा नै.आमचा हा बाणा आम्ही अभिमानाने पाळत आलो आहोत.
येतो आम्ही.
-दिलीप बिरुटे
13 Jan 2015 - 3:08 am | खटपट्या
बरोब्बरे !!
13 Jan 2015 - 2:41 pm | बॅटमॅन
पुरुष ना. 'बाणा' तर पाळणारच. ;) =))
13 Jan 2015 - 2:45 pm | सूड
खिक्क !!
13 Jan 2015 - 3:14 pm | टवाळ कार्टा
=))
13 Jan 2015 - 5:07 pm | अत्रुप्त आत्मा
@'बाणा' तर पाळणारच. >>> शब्द खाटुक ब्याटुक!
13 Jan 2015 - 5:17 pm | सस्नेह
'बाणा' चा नेम भलतीकडेच दिसतोय ! 'लाईन' मिळाली नाही वाट्टं अजून *wink*
13 Jan 2015 - 5:21 pm | सूड
ह्या बाणाचा नेम न कळेल तरच बरं!! =))
13 Jan 2015 - 8:19 pm | टवाळ कार्टा
=))
13 Jan 2015 - 8:23 pm | अत्रुप्त आत्मा
आगाग्गागागागा! =))))))