सहज..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
1 Jan 2015 - 11:40 am

https://lh4.googleusercontent.com/-SlYwf_I5qkM/VKKOxOhFBGI/AAAAAAAAGoo/bWGXNKJWhdU/w326-h580-no/https%253A%252F%252Flh6.googleusercontent.com%252F3Il92l88Ww_O5tbjFoNYzLAkiCz4u-_2HvN22m-XOe0%253Ds0-d
जाळ्यावर विणले जाळे
शब्दांनी कसंरतं केली.
मी काहि केले नाही
अन्,सहजी कविता झाली.

ना शब्द रंग रस गंध
ना प्रतिकांचे प्रतिबंध.
तालातून जुळता सांधा
लाभला तिला स्वच्छंद!

मी आशा का ठेवावी?
की कविता ऐशिच व्हावी!
जाणून अलंकारांची
का प्रीती मी तीज द्यावी???

तिज वहात जाणे आहे
त्या संथ नदीच्या काठी.
शब्दांच्या लाटा येता
मग पडती सहजी गाठी.

भेटेल तिलाही कधितरि..
तो समुद्र..वहाता वहाता..
कवितेचा सिंधूसागरं
शब्दांचा प्राक्तन दाता.

तोवरी तिच्याही नशिबी
हे वहाणे निश्चित आहे.
या वाहात्या शाश्वततेचा
मी सहप्रवासी आहे.
==============
.
अतृप्त..

शांतरसकविता

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

1 Jan 2015 - 12:17 pm | सस्नेह

तिज वहात जाणे आहे
त्या संथ नदीच्या काठी.
शब्दांच्या लाटा येता
मग पडती सहजी गाठी.

सुंदर !

गुर्जी आता तांब्या-संप्रदाय सोडून इकडेच स्थायिक व्हावे ही इणंति ! *biggrin*

प्रचेतस's picture

2 Jan 2015 - 10:58 am | प्रचेतस

अता काही हरकत नाही तशीही.
त्यांचा बॅटन आता टवाळजी कार्टा यांजकडे आहे म्हणे.

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 3:24 pm | टवाळ कार्टा

दू...दू...दू

दूदू चितळे मध्ये हां बाळा, इथे फक्त मिसळ!!

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2015 - 11:49 am | अत्रुप्त आत्मा

विनंती स्विकारण्यात येत आहे. :) __/\__

सतिश गावडे's picture

2 Jan 2015 - 11:57 am | सतिश गावडे

बुवांचे "प्रतिमा पुनर्निमाण" यशस्वी झाले आहे असे म्हणावयास अत्ता हरकत नसावी.

त्यांच्या "तांब्या"ला जो उत्तराधिकारी लाभला आहे तोही आपल्या गुरुच्याच तोडीचा आहे.

नाखु's picture

2 Jan 2015 - 12:40 pm | नाखु

आपल्या गुरुच्याच तोडीचा आहे.

मी चूकून ताडीचा असे वाचले (कंपनीला सांगून मानिटर बदलू काय?)

मूळ अवांतर.

भ्रमर कवीचा शब्द-गुलकंद "छान" आहे

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 3:26 pm | टवाळ कार्टा

मी चूकून ताडीचा असे वाचले (कंपनीला सांगून मानिटर बदलू काय?)

=))

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 3:25 pm | टवाळ कार्टा

नाय ब्बॉ...गुर्जींनी लाईन बदलली...आता मी पण :)

प्रचेतस's picture

2 Jan 2015 - 3:27 pm | प्रचेतस

अस्सं कस्सं अस्सं कस्सं.

अता एखादा नविन उत्तराधिकारी मिळाल्याशिवाय हे होणे नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2015 - 4:11 pm | अत्रुप्त आत्मा

सदर चर्चेची गरज भागविण्यासाठि आता ट.का. यांचेच धाग्यावर जाण्याचे करावे,अशी नम्र विनंती! ___/\___/\___/\___

मुक्त विहारि's picture

1 Jan 2015 - 12:19 pm | मुक्त विहारि

"तोवरी तिच्याही नशिबी
हे वहाणे निश्चित आहे.
या वाहात्या शाश्वततेचा
मी सहप्रवासी आहे."

झक्कास

चुकलामाकला's picture

1 Jan 2015 - 3:16 pm | चुकलामाकला

वाह!सहज सुन्दर!

पैसा's picture

1 Jan 2015 - 4:58 pm | पैसा

फारच सुंदर जमलीय कविता!

अजया's picture

1 Jan 2015 - 5:32 pm | अजया

फार छान कविता.अावडली.

सतिश गावडे's picture

1 Jan 2015 - 5:37 pm | सतिश गावडे

छान कविता !!!

प्रचेतस's picture

1 Jan 2015 - 8:05 pm | प्रचेतस

कविता अतिशय आवडली.
खूप सहज लिहिता तुम्ही.

तिमा's picture

1 Jan 2015 - 8:12 pm | तिमा

____/\____

सुंदर.

काय मस्त जमवता कवितासुद्धा

यशोधरा's picture

2 Jan 2015 - 5:48 am | यशोधरा

तिज वहात जाणे आहे
त्या संथ नदीच्या काठी.
शब्दांच्या लाटा येता
मग पडती सहजी गाठी.

तोवरी तिच्याही नशिबी
हे वहाणे निश्चित आहे.
या वाहात्या शाश्वततेचा
मी सहप्रवासी आहे.

वा! वा!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Jan 2015 - 8:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं

पियुशा's picture

2 Jan 2015 - 11:03 am | पियुशा

वाह वाह !
असच लिहत राहा :)

स्पंदना's picture

2 Jan 2015 - 11:08 am | स्पंदना

तिज वहात जाणे आहे
त्या संथ नदीच्या काठी.
शब्दांच्या लाटा येता
मग पडती सहजी गाठी.

हॅटस ऑफ आत्मुस!!

बॅटमॅन's picture

2 Jan 2015 - 11:44 am | बॅटमॅन

ताम्रपात्रजनित तैलपक्व शर्करावगुंठित पाकचक्रिका बनवण्याऐवजी अशा कविता जास्त आवडतात.

(याचा अर्थ त्या तैलपाकचक्रिका बनवू नयेत असा नाही ;) )

सस्नेह's picture

2 Jan 2015 - 12:04 pm | सस्नेह

ताम्रपात्रजनित तैलपक्व शर्करावगुंठित पाकचक्रिका

तैलपक्व आवडत नाहीत तूपपक्व आवडतात. :))))
बॅटॅ.....आर्र्र कुट नेउन ठिवली जिल्बी माजी??

चला मग घृतपाकचक्रिका. कढईत काही तळताना दिसले की 'तैल'बुद्धीच होते, त्याला इलाज नाही. ;)

सतिश गावडे's picture

2 Jan 2015 - 2:41 pm | सतिश गावडे

दिसले जर काही तळताना
मला तेल नेहमी आठवते
झाली सवय मना माझ्या
अहो त्याला इलाज नाही

दिसता कविता हो बुवांची
मज वाटे तसली जिलबी
जरी असे ती सुंदर कविता
अहो त्याला इलाज नाही

तुम्ही कितीही नाके मुरडा
अन ठेवा कितीही नावे
थांबे न तांब्या संप्रदाय
अहो त्याला इलाज नाही

जोडी र ला र, ट ला ट
पाडीती कितीतरी जिलब्या
मजसारखे ते "रटा"ळ कवी
अहो त्याला इलाज नाही

बॅटमॅन's picture

2 Jan 2015 - 2:50 pm | बॅटमॅन

सुर्सुरी सुर्सुरी!!!!!!!! दाबणे जरा अवघड होत चालले आहे आता हे प्रतिभाविष्कार पाहून ;)

मस्त रे धन्या.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2015 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा

धनाजिराव का जव्वाब नहीं!

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 3:27 pm | टवाळ कार्टा

काय?

अजया's picture

2 Jan 2015 - 4:20 pm | अजया

=))

विशाल कुलकर्णी's picture

2 Jan 2015 - 11:54 am | विशाल कुलकर्णी

वाह, क्या बात है गुर्जी :)

बाळ सप्रे's picture

2 Jan 2015 - 3:20 pm | बाळ सप्रे

वा बुवा !!

प्यारे१'s picture

2 Jan 2015 - 4:30 pm | प्यारे१

छान कविता गुरूजी