राजला मारायला आलेल्या बिहारीचे एन्काउंटर

इनोबा म्हणे's picture
इनोबा म्हणे in जनातलं, मनातलं
27 Oct 2008 - 7:36 pm

बातमी इथे वाचा.
या घटनेनंतर सर्व बिहारी नेत्यांनी एकत्र येऊन पोलिसांचा निषेध केला आहे. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधांनांची भेट घेउन या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
बिहारी नेते 'राहूल चांगला मुलगा होता,तो कोणी अतिरेकी नव्हता व त्याला पोलिसांनी विनाकारण मारले' असा कांगावा करीत आहेत.
झी चोवीस तास या वाहीनीवर राहूल राज च्या पराक्रमाचा विडीओ दाखवला जात आहे. या विडिओमधे हा तरुण बसच्या खिडकीतून बाहेर गोळ्या झाडताना स्पष्ट दिसतो आहे तरीही लालूप्रसाद हा मुलगा निर्दोष असल्याचे सांगत आहेत.

राजकारणबातमीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

27 Oct 2008 - 8:12 pm | छोटा डॉन

तो राहुल राज अतिरेकी होता की नव्हता हा प्रश्न अलहिदा आहे पण तो एक मनोरुग्ण होता, त्याच्या हातात भरलेले रिवॉल्व्हर होते, अख्ख्या बसमधल्या प्रवाशांना वेठीस धरले होते व त्याचा सारखा "मै राज ठाकरे को मारने के लिये आया हुं" हा नारा ह्या गोष्टी जमेस धरल्या तर त्या परिस्थीतीला अनुरुप झालेले एंकाउंटर योग्य होते.
त्याने काय केले असते ह्याचा नेम नाही, कदाचित २-४ सामान्य माणसांना ऐन दिवाळीच्या तोंडावर प्राणास मुकावे लागले असते ...

शिवाय त्याच्याशी बोलणी करण्याचा प्रयत्न निष्फळ झाल्यावर, अधी त्याने फायरिंग सुरु केल्यावरच मग "एंकाउंटरची कारवाई" करण्यात आली हे जमेस धरता जे झाले ते योग्य होते असे म्हणणे योग्य ठरेल. त्याला जिवंत पकडुन तरी काय उपयोग ? सुटकेसाठी तिकडुन भैया फौक कामाला लागली असती व ह्याने पुन्हा बाहेर येऊन असाच पराक्रम केला असता.

आता अख्खे बिहारी नेहे ह्याच्या समर्थनास एकत्र आले आहेत , पाहु आपल्या मराठी राज्यकर्त्यांची काय भुमीका आहे ते ?

पण सद्य परिस्थीती ही खंबीर कारवाई करणार्‍या "मुंबई पोलीस" व त्याचे स्मर्थन करणार्‍या गॄहमंत्री " आबा पाटालांचे" अभिनंदन ...

ह्या प्रकरणाचा मुळापासुन तपास केला जाऊन त्याचा बोलावता धनी कोण होता ह्याचा तपास व्हायला हवा, नव्हे तसा आग्रह आपल्या नेत्यांनी धरायला हवा.
तुर्तास पुढे काय होते ते पहाणे रोचक ठरेल.
नेहमीप्रमाणे भैय्या नेत्यांनी "मनसे व शिवसेना पक्षांवर बंदी " घालावी अशी मागणी केली आहे.
अजब न्याय आहे, ज्याच्या हत्येसाठी सुपारी दिली जात आहे त्याला संरक्षण द्यायचे सोडुम त्याच्यावर बंदीचा बाता ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे's picture

27 Oct 2008 - 8:38 pm | इनोबा म्हणे

लालूप्रसादची प्रतिक्रीया ऐकून फार चिड आली मला.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

टारझन's picture

27 Oct 2008 - 10:49 pm | टारझन

बरोबर !!! मनोरुग्नच होता .. आणि त्याचा एनकाउंटर केला हे बरेच झाले.... अजुन काही मनोरूग्न मोकळे फिरत आहेत. अशा डोक्यात जाणार्‍या मनोरूग्नांचा एनकाउंटर व्हावा हीच इच्छा !! :)

मिपावरील मनोरुग्नांचा एनकाउंटर करण्याची आमच्या मिनसे पक्षाची योजना आहे.

टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
अरे बघता काय सामिल व्हा

घाटावरचे भट's picture

27 Oct 2008 - 10:51 pm | घाटावरचे भट

मिनसे =))

+१

स्वप्निल..'s picture

27 Oct 2008 - 10:54 pm | स्वप्निल..

मिनसे ... =))

स्वप्निल..

लंबूटांग's picture

27 Oct 2008 - 10:58 pm | लंबूटांग

=))

छोटा डॉन's picture

27 Oct 2008 - 11:23 pm | छोटा डॉन

>> मिनसे ....
=)) =)) =))
भारी आहे राव पक्ष, आमाला हाय का वेंट्री ?
पद काय देणार ?

कोण कोण मनोरुग्ण आहेत ते सांगा, आमच्या कॉर्पोरेटर साहेबांना सांगुन नडग्या फोडतो एकेकाच्या ....
काय बोल्तो ???

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

टारझन's picture

28 Oct 2008 - 1:35 am | टारझन

पद काय देणार ?
आपल्याला मिनसेचे "दिपक पायगुडे" बनवण्यात येईल ... तसेच फाटामार मंत्री करण्यात येइल !!

कोण कोण मनोरुग्ण आहेत ते सांगा, आमच्या कॉर्पोरेटर साहेबांना सांगुन नडग्या फोडतो एकेकाच्या,काय बोल्तो ???
इतिहास चाळा ,कळेलच .. किंबहूना माहित असेलच. कार्पोरेटर साहेब कुठे आहेत हल्ली :)

टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
आम्ही जालिय दशमुर्खांना फाट्यावर मारतो, तेंव्हा अरे बघता काय सामिल व्हा

सखाराम_गटणे™'s picture

28 Oct 2008 - 4:54 pm | सखाराम_गटणे™

>>तो राहुल राज अतिरेकी होता की नव्हता हा प्रश्न अलहिदा आहे पण तो एक मनोरुग्ण होता
मनोरुग्णा खेरीज असे कोणी करु शकत नाही.

त्याला उडवल्याबद्दल पोलिस आणि पाटलांचे अभिनंदन.

--
आम्ही जालिय देशमुख आहोत. आम्ही फालतु आठयाळ, राखुंड्या लोकांकडे लक्ष देत नाही.
योग्य वेळी आम्ही त्यांना कात्रजचा घाट दाखवु.

सखाराम_गटणे™'s picture

27 Oct 2008 - 8:24 pm | सखाराम_गटणे™

>>तो राहुल राज अतिरेकी होता की नव्हता हा प्रश्न अलहिदा आहे पण तो एक मनोरुग्ण होता
मनोरुग्णा खेरीज असे कोणी करु शकत नाही.

त्याला उडवल्याबद्दल पोलिस आणि पाटलांचे अभिनंदन.

--
आम्ही जालिय देशमुख आहोत.

baba's picture

27 Oct 2008 - 8:32 pm | baba

हे वाचा...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3645808.cms
राहुल जॉबसाठी मुंबईला आला होता.. इति राहूलचा बापुस..
.. अरे कट्टा घेउन मुंबईमधे काय जॉब करायला आला होत तुझ कार्ट?
बस मधुन दिवसा कट्टा घेउन फिरतात का? (तुमच्या पाटणा मधे फिरत असतिल आमच्या मुंबईत नाहि..)

मुंबईमधील नुकत्याच घडलेल्या घटना माहीत नव्ह्त्या का तुला आणि तुझ्या कार्ट्याला... मग, दोन दिवसांपूर्वीच (२४ ऑक्टोबरला) का आला राहुल पाटण्याहून?

मुंबई पोलिस आणि अंधेरी-कुर्ला बसच्या 'त्या' ड्रायव्हर आणि कंडक्टरला सलाम...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3646902.cms

...(एक अस्वस्थ)बाबा

बिहारी नेते जसे मिडियासमोर एकत्र आले तसे महाराष्ट्रातले सगळे नेते देखील मिडियासमोर आले पाहिजे....
आर.आर. पाटलांचे गोळीला गोळीनेच उत्तर दिले जाईन हे उत्तर एकदम पटले.... तसेच या बिहारी नेत्यांच्या शक्तीप्रदर्शनाला
शक्तीप्रदर्शनानेच उत्तर दिले पाहिजे.... यांची हिम्मत होतेच कशी महाराष्ट्रामधील कायदा आणि सुव्यवस्थेविषयी बोलायची....
साल्यांनो... म्हणाव बिहारमधे तर रोज खंडणी वसूल करण्यासाठी पोरी बाळी पळवल्या जातात. त्यांच्याबद्दल का नाही कळवळा येत? या माजुर्ड्यांना एक बिहारी मुंबईत मेला तर राजकारणाची पोळी भाजायला एकजात सगळे एकत्र.

अरे तो का मेला? हे बघा ना?

पोलिस काय बंदूक रोखणार्‍या प्रत्येकाला विचारत बसतील का? की अरे तू आतंकवादी आहेस की तुझा मेंदू सटकला आहे?
उद्या ह्याच राहूल राज ने ३-४ जणांवर गोळ्या झाडल्या असत्या तर हेच नेते म्हटले असते की मुंबई की पोलिस निकम्मी है...

ह्या लालू-पासवान-नितीश ला म्हणाव याच एकदा मुंबईत हरामखोरांनो.... मुंबईच्या आजच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहेत ते हे सगळे बिहारमधून आलेले गुंड आणि माजुर्डे लोक... मी क्वचित मुंबईत जातो, पण एकदा मी स्वतः पाहिले की बिहारी पोरे लोकलमधून जाताना महिलांचा डबा पास होऊ लागला की जोराने शिट्ट्या वाजवतात.... अरे छमिया हमका मिलनेको आवेगी क्या असे बोंबलताना ह्या बिहारींना लाजा पण वाटत नाही... मुंबई स्वतःच्या बापाची असल्याच्या थाटात हे युपी बिहारी वावरतात,

राज ठाकरे यांनी त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली म्हणून तर ते बिहारी नेते तिकडे पेटले आहेत. त्यांच्या तोंडाच्या वाफा तिकडेच मिडियासमोर चालणार. इथे मुंबईत यायची एकाची पण आता हिम्मत होणार नाही... आपल्या "राज" ने त्यांचे वांधे करुन ठेवले आहेत म्हणुनच तर त्यांच्या सारख्या मनोरुग्ण असलेल्या "राज" च्या आडून शरसंधान सुरु केले आहे.

अशा लोकांना शिखंडी सारखे हिजडे म्हणणे पण शोभत नाही... कारण शिखंडी तरी शूर होता .... ह्यांनी तर नुसताच त्याचा तिसरा गुण घेतल्याचे दिसते :)

जय महाराष्ट्र.....
सागर

अनामिका's picture

27 Oct 2008 - 9:55 pm | अनामिका

छोटे सरदारांशी सहमत
मला तर दाट संशय आहे की लालूने सुपारी वगैरे देउन पाठवीले असावे.
चेहर्‍यावरुन मुलगा सुशि़क्षित आणि सुसंस्कृत वाटत होता.
इथे माझ्या माहितीतील काही उत्तरभारतिय कुटुंबे अशी आहेत ज्यांनी आपण नोकरी साठी देशाबाहेर गेलो आहोत हे अजुन आपल्या घरच्यांना सांगितले देखिल नाही आहे.
मला हे कळल्यावर धक्काच बसला होता.आपला मुलगा घरा बाहेर पडुन काय दिवे लावतोय हे माहित नसलेल्या पालकांपैकी त्याचे वडिल असावेत्.(अस लिहू नये खर तर)
पण बिहार आणि उत्तरप्रदेश मधे काहीही घडु शकते.
या लोकांच सगळच विचित्र आहे.
जसे यांचे सर्वेसर्वा नेते लालु(चालू असे वाचावे)पासवान्,नितीश (नितीशनी देखिल आपली वर्णि या मंडळिंमधे लावली याचा खेद वाटतो) यासारखे विचित्र व अंखंड जगात दुर्मिळ प्रजातीत मोडणारे प्राणी स्वातंत्र्यानंतर बिहार मधे जन्माला आलेत
लालु हे नाव घेतले तरी शिसारी येते.इतका कळकट माणुस दुसरा शोधुन सापडायचा नाही.
त्या पवन कुमारच्या मृत्युचे भांडवल करायचा प्रयत्न केला पण नाकाडावर आपटले त्याचाच हा परिणाम आहे की सेना मनसे वर बंदी आणायची भाषा करत आहेत.
आधी यांनाच हाकलले पाहिजे हिंदुस्थानातुन.
आता तरी आबा आणि विलास जागे होतिल का?आणि कणा नसलेल्या शरदरावांची प्रतिक्रिया अजुन आली नाही.
या प्रकरणामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली असे सांगत आबांना खुर्ची सोडायचा आदेश नाही दिला म्हणजे मिळवल.
तुमच्या दहा पिढ्या खाली उतरल्या तरि राजच्या केसाला देखिल धक्का लावु शकणार नाहित म्हणाव.
आलेत राज ला मारायला!.महाराष्ट्रातल्या जनतेने काय बांगड्या भरल्यात की काय्?अघाडि सरकार् ने भरल्यात ते जाउ द्या.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/

स्वामि's picture

27 Oct 2008 - 10:02 pm | स्वामि

तोंडाळ आबा पाटलांचे अभिनंदन!!!!आज पहिल्यांदाच स्वतःचे शब्द कॄतिने सार्थ करुन दाखविले.

राहुल नामक माथेफिरूने राज ठाकरे यांनाअ येथे मारायला येण्या ऐवजी त्याच्याच राज्यातील लालु आणि तस्तम राजकारणी लोकांना मारायला हवे होते, ज्यांच्यामुळे त्यांना बिहार सोडुन महाराष्ट्रात पोट्यापाण्यासाठी यायची वेळ आली .
मुंबईचे पोलीस आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन !

राहुल नामक माथेफिरूने राज ठाकरे यांनाअ येथे मारायला येण्या ऐवजी त्याच्याच राज्यातील लालु आणि तस्तम राजकारणी लोकांना मारायला हवे होते, ज्यांच्यामुळे त्यांना बिहार सोडुन महाराष्ट्रात पोट्यापाण्यासाठी यायची वेळ आली .
मुंबईचे पोलीस आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन !

विकास's picture

27 Oct 2008 - 10:58 pm | विकास

बसमधे दिवसाढवळ्या बंदूक चालवणार्‍या माथेफिरूस जर पोलीसांशी चकमकीत गोळी लागली आणि मृत्यू आला तर त्याला जबाबदार ती व्यक्तीच असणार, पोलीस कसे काय?...

बाकी हा कट्टा काय प्रकार आहे? मिसळपाववर पण हा शब्द बर्‍याचदा वाचनात येतो, आणि आता ह्या बिहारीबाबूचे बाबा पण तेच म्हणत आहेत... 8|

सुक्या's picture

27 Oct 2008 - 11:44 pm | सुक्या

मिसळपाव कट्टा म्हंजी सम्दे लोक एकत्र येत्यात. दोन चार शाण्यासारक्या गोष्टी करत्यात. देशाच्या सदयपरीस्थीतीवर (ह्यो सबुद आमच्या गावच्या मास्तुर नं सागीटला) चर्चा कर्त्यात. म्या कदी गेलो न्हाय पर म्हायती हाये.

ह्ये बेनं जे कट्टा घेउन राज ठाकरे ला माराया आलं व्हतं त्यो कट्टा म्हंजी "पीस्टुल / बंदुक". हे साले सायकली पासुन कट्टे बनवत्यात बिहार मंदी. ५०० रुपायापासुन मिळतय बगा. घास घीस केली तर ३०० रुपायात देत्यात.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

शैलेन्द्र's picture

27 Oct 2008 - 11:47 pm | शैलेन्द्र

कट्टा= पट्टा सोडलेले जनावरं जो वापरतात तो..

शैलेन्द्र's picture

27 Oct 2008 - 11:48 pm | शैलेन्द्र

कट्टा= ज्यात दारु भरुन ऊडवतात तो...

विकास's picture

28 Oct 2008 - 12:37 am | विकास

वरील तिनही माहीतीपूर्ण प्रतिसादांसाठी धन्यवाद!

एकंदरीत पाचशेचा कट्टा घासाघीस करून तीनशेला मिळवला असला, तर जीवन हे काहीजणांच्या बाबतीत लाखमोलाचे असण्याऐवजी तीनशेच रुपयांचे कसे ठरू शकते हे कळले...

आज-तक पोल (उजवीकडे)

एनडीटिव्ही (मुख्य बातमीच्याखाली डावीकडे)

अनिरुध्द's picture

28 Oct 2008 - 9:08 am | अनिरुध्द

आता या राहूल प्रकरणावरुन आता नक्कीच मोठा धुरळा उडणार. तेव्हा समस्त मराठी नेते-मंत्री-जनता-पोलीस एकत्र येऊन लालू आणि नितीशकुमारांचं तोंड बंद करायला हवं. ही खरोखरीच समस्त मराठी नेत्यांची कसोटीच असेल. ते जर मनसे मराठी असतील आणि मुंबई-महाराष्ट्र वाचवण्याची थोडी जरी इच्छा/लाज शिल्लक असेल तर मला नाही वाटत हे कठीण आहे. आपलाच दाम खोटा म्हटल्यावर, कोण काय करणार?

महाराष्ट्रात सगळ्यांना स्थान आहे (त्यांच्या म्हणण्याप्रमाणे) हे जरी एकवेळ मान्य केलं तरी असे माथेफिरु फक्त आणि फक्तंचं महाराष्ट्राच्या माथी नका मारु म्हणावं. हे कधीही-कुठेही सुरक्षा व्यवस्थेवर ताणच आणतात आणि आपलं मरण आपणंच ओढावून घेतात.

जय महाराष्ट्र.

मदनबाण's picture

28 Oct 2008 - 9:21 am | मदनबाण

सर्व प्रथम मुंबई पोलिसांचे अभिनंदन !!
या मुंबई पोलिसांमुळेच आज मुंबई सुरक्षित आहे...योग्य वेळी योग्य कारवाई करण्यात आली आहे!!
हातात कट्टा घेऊन सामान्य जनतेचे प्राण धोक्यात घालण्याचा हा प्रयत्न होता व त्यावर योग्य अशीच कारवाई झालेली आहे.
सर्व बिहारी नेत्यांचा निषेध..!! सत्तेचे राजकारण करण्यासाठी हे लोक कसे एकत्र आलेत ते तर पहा !!
मराठी माणसांच्या विरोधात हे सर्व एकत्र आणि आपले नेते ?

(मु.पो समर्थक)
मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

गेल्या एक दोन आढवड्यात प्रथमच त्यानी स्वःताच्या बुध्दीने निर्णय घेतला.

२४ न्युज वर ही बातमी मी पहात असताना वृतनिवेदिकेने माजी मुंपो अधिकारी संजयसिंह पांडे ह्याना ह्या घटनेवर भाष्य करायला बोलावले होते.तीचा बोलवण्या मागचा हेतु असा होता की पांडे साहेबानी असे बोलावे की ही घटना फक्त मुंबईपोलिसाच्या चुकीने घडली. पण पांडे साहेबानी सांगितले की मुंबई पोलिस सर्व घटकाचा विचार करुन,सर्व पर्याय तपासुन मगच अंतिम निर्णय घेतात. त्यामुळे त्यांनी राहुलराज ला नाईलाजाने गोळी घातली असली पाहिजे हे रोखठोक सांगितले.त्यावेळी तिचे थोबाड पायताण मारल्यासारखे झाले होते.
राहिली गोष्ट ललव्वा,रामु व नितीन कुमार ची ,त्यांची थोबाडे तर पवनकुमार च्या मृत्युचे सीसीटीव्ही फुटेज पाहुन आधिच फुटली आहेत. नंतरच्या तपासात सत्य बाहेर येणारच आहे.काळजी नसावी.

वेताळ
बिहारयानी आता ताळ सोडला आहे.

आम्हाला तुमचा अभिमान आहे....

मुंबई पोलिसांचे शतशः अभिनंदन... तसेच त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहणार्‍या आर.आर. पाटील यांचेही मनापासून अभिनंदन
पहिल्यांदाच असे वाटत आहे की राज्याचे गृहमंत्रालय हे एका योग्य व्यक्तीच्या हातात आहे...
आता मुख्यमंत्रीसाहेबांनी दिल्लीच्या दबावाला बळी पडू नये ही अपेक्षा... विलासरावांनी समर्थपणे मराठी खाक्या युपी.बिहार वाल्या टोळभैरवांना दाखवून द्यावा.... सगळे राजकीय पक्ष मग ती शिवसेना असो, मनसे असो, पवारसाहेबांची काँग्रेस असो... एकजात पाठीशी उभे राहतात की नाही ते बघा. अशा प्रकारच्या ताकदीला उत्तर ताकदीनेच दिले पाहिजे

जय महाराष्ट्र
सागर

सर्वसाक्षी's picture

28 Oct 2008 - 11:22 am | सर्वसाक्षी

निरपराध माणसे खिशात गावठी पिस्तुल घेऊन फिरत नसतात. या मुलाने नुसते पिस्तुल बाळगले वा धाक दाखवायला वापरले नाही तर गोळीबारही केला ज्यात प्रवासी जखमी झाले. अशा परिस्थितीत पोलिसांनी काय बसमधली माणसे एक एक करीत मरायची वाट पाहायची होती का? जर पोलिसांनी याला टिपला नसता व याने काही लोकांना मारले असते तर 'पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली/ पोलिस निष्क्रिय आहेत' वगैरे मुक्ताफळे उधळली गेली असती, त्या आधी निरपराध प्रवासींचे प्राणही गेले असते.

बिहारी होता म्हणुन चकमक केली या आरोपात तथ्य नाही. मुंबई पोलिसांचा इतिहास आठवुन पाहा. पोत्या, चोर पक्या, बाब्या, मन्या सुर्वे, सदा पावले, तांडेल वगैरे सगळे चकमकीत उडवले गेलेले गुंड मराठीच होते की!

निदान या बातमीत दिलेला प्रकार तरी पोलिसांनी गुंडाचा केलेला समर्थनिय नि:पात असाच दिसत आहे.

अनामिका's picture

28 Oct 2008 - 11:50 am | अनामिका

आम्हाला तुमचा अभिमान आहे....
सागर लगेच प्रतिक्रिया देवु नका.जरा धिर धरा .ते आघाडिचे सरकार आहे.घुमजाव करायला वेळ लागायचा नाही.
वाचाळपणे वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना मारे आबांनी कमरेला जणु तलवार लटकवली आहे आणि फार मोठी लढाई जिंकली अश्या आविर्भावात गोली का जवाब गोली से देंगे हे मुक्ताफळ उधळले पण त्याला २४ तास न उलटतात तर दिल्लीच्या दबावा पुढे शेपुट घालुन त्या प्रकरणाची चौकशी मुख्य सचिवांमार्फत करण्याची घोषणा केली.
आबा व विलासराव ह्या व्यक्ती अभिमान बाळगण़्याजोग्या आहेत का हाच कळिचा मुद्दा आहे.
शेवटि काय तर दिल्ली बिहार पुढे महाराष्ट्र पुन्हा एकदा नमला हे सिद्ध झाले.
लालु व त्याच्या पिलावळिने राज यांना इजा करण्याच्या उद्देशानेचे त्या व्यक्ती ला पाठवले असा संशय घ्यायला वाव नक्कीच आहे.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

"अनामिका"
अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/

अनामिका,

तुमचे म्हणणे बरोबर आहे.... राजकारणात लोक कधी शब्द फिरवतील हे सांगता येत नाही..
पण आबांकडून तरी ही अपेक्षा नव्हती.... विलासराव कधीच धडाडीचे निर्णय घेताना दिसत नाहीत.
नाहीतर आपल्या देशात उद्योग धंदे न येता सगळे गुजरात मधे का जातात? याचा साधा विचारही केलेला दिसत नाही. तर प्रयत्न कोठून करणार...
मराठी लोकांसाठी राज ठाकरेंनी उभे केलेल्या आंदोलनाला एक प्रकारे मोठी कारवाई न करुन मूक संमती देऊन किमान आबांनी तरी मराठी मनांत एक आदर्श स्थान मिळवलं होतं. आणि आता जर आबाच दिल्लीश्वरांच्या पायाशी लोटांगण घालू लागले तर मुंबई पोलिसांनाही कोणी वाली उरणार नाही.... उद्यापासून कोणीही मुंबईत बंदूका राजरोस घेऊन फिरतील आणि पोलीस नुसते बघत बसतील....

दिल्लीने जर समतेचे राजकारण केले तर केव्हाही मराठी माणूस सोबत आहे. पण आमच्या मराठी मातीत आमचे पाय उखडायचा प्रयत्न कराल तर तुमची मुंडकी छाटायला मराठी माणूस कमी करणार नाही , हा संदेश दिल्लीला खास करुन लालू-पासवान-नितीशला जाणे फार गरजेचे आहे. या मुद्द्यावर सगळ्या राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेऊन समोर यावे असे माझे मत आहे.

राज ठाकरेंवर कायद्यानी भाषण , वक्तव्य करायला बंदी आहे नाहीतर सगळ्यात पहिला जवाब आणि तो ही मराठी ठसक्यातला राज ठाकरेंनी नक्कीच दिला असता. तेव्हा मात्र या शिपुर्ड्यांना पळता भुई थोडी झाली असती...

असो.... मराठी अस्मितेसाठी सगळ्याच मराठी लोकांनी आपला लढा एकत्र येऊन लढावा या मताचा मी आहे. राज ठाकरे म्हणतात तसे, आपापसातील वाद आपण नंतर बघून घेऊ. पण बाहेरच्या आक्रमणाला तरी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे....

जय महाराष्ट्र.....
सागर

कलंत्री's picture

28 Oct 2008 - 12:03 pm | कलंत्री

राहुल अथवा जे कोणी कायदा आणि सुरक्षा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांचा असाच बंदोबस्त करायला हवा. या मनोरुग्णाच्या हातुन नकळत एखादा सामान्य मारला गेला असता तर परत हिंसा भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बहुधा बिहारच्या नेत्यांना मूंबईचे कायदे माहित नसावे. अशा वेळीस असा कोणी जमावाच्या ताब्यात आलातर त्याला मृत्यु हीच शिक्षा असते.

शासनाने अशीच कडक भूमिका घ्यावी.

ऍनकॉन्टर ला चकमक अथवा पारध असा मराठी शब्द वापरावा. आज सर्वच वर्तमानपत्रात ऍनकॉन्टर अशा शब्दाचा वापर आहे.

विकास's picture

28 Oct 2008 - 4:40 pm | विकास

हिंसा सर्वथैव वाईटच.

मूळ मुद्दा मान्य.

बहुधा बिहारच्या नेत्यांना मूंबईचे कायदे माहित नसावे.

वरील वाक्यात "मुंबईचे" हा शब्द घालायची गरज नाही. : "बहुधा बिहारच्या नेत्यांना कायदे माहित नसावेत अथवा नाहीत." असे म्हणले तर जास्त योग्य ठरेल. ;)

ऍनकॉन्टर ला चकमक अथवा पारध असा मराठी शब्द वापरावा.

पारध नक्की नको, कारण पारध हा शिकारी आपल्या शिकारीची करतो. त्याचा अर्थ वेगळा होईल.

सखाराम_गटणे™'s picture

28 Oct 2008 - 4:49 pm | सखाराम_गटणे™

>>ऍनकॉन्टर ला चकमक अथवा पारध असा मराठी शब्द वापरावा.
चकमक, खात्मा, वध, गेम वाजवणे हे पण वापरु शकतो.
--
आम्ही जालिय देशमुख आहोत. आम्ही फालतु आठयाळ, राखुंड्या लोकांकडे लक्ष देत नाही.
योग्य वेळी आम्ही त्यांना कात्रजचा घाट दाखवु.

विजुभाऊ's picture

28 Oct 2008 - 12:46 pm | विजुभाऊ

शेवटि काय तर दिल्ली बिहार पुढे महाराष्ट्र पुन्हा एकदा नमला हे सिद्ध झाले.
हिन्दी भाषीक कसे आक्रस्ताळे आहेत हेच पुन्हा दिसुन आले.
महाराष्ट्र जेंव्हा आपल्यावर अन्याय होतो असे सांगतो तेंव्हा लोकाना अचानक अखंड भारत वगैरे आठवते.
सहिष्णुता हा महाराष्ट्रावर लादलेला अवगुण महाराष्ट्राने मराठी माणसाने सोडावा. अन्यथा क्रूपाशन्कर हा मुख्यमन्त्री म्हणून स्वीकारावा लागेल.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

विसोबा खेचर's picture

28 Oct 2008 - 12:51 pm | विसोबा खेचर

या घटनेनंतर सर्व बिहारी नेत्यांनी एकत्र येऊन पोलिसांचा निषेध केला आहे. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधांनांची भेट घेउन या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

कसली घंट्याची चौकशी? माय फूट...!

त्याचा एन्काउंटर केला तेच बरं झालं! नायतर अजून काहींची भीड चेपली असती आणि तेही आले असते!

साले, भिकारचोट..!

तात्या.

अवलिया's picture

28 Oct 2008 - 3:47 pm | अवलिया

छ्या छ्या छ्या

काही उपयोग नाही तुम्हा लोकांना समजावुन सांगण्याचा !!!

अरे काय ह्या वाह्यात चर्चा लावल्या तुम्ही ? अं?

आपण येथे येतो कशाला तर मराठी साठी. मराठीला आपला काहीतरी हातभार लागावा, मायमराठीची काहीतरी सेवा व्हावी. चार दोन लोकांशी परिचय व्हावा, हाय हैलो सारखे राम राम शाम शाम व्हावे. जमेलच तर कुठे संध्याकाळी निवांत कट्टे करावे.

आपल्या चर्चा फक्त गोड गोड व्हाव्यात असे असतांना तुम्ही हाणामारी, प्रांतवाद घेवुन बसले...
अरेरे काय हा अनर्थ करत आहात तुम्ही..मला अजिबात पटले नाही.

मला जे पटले नाही ते मी बोलुन दाखवले... तुम्हाला पटले तर घ्या नाहीतर...

(हा प्रतिसाद उपहासात्मक आहे हे सुज्ञांच्या लक्षात आले असेलच. इतरांना आता कळले असेलच)

असो.

मुंबई पोलिसांनी जे केले ते योग्य केले.
उत्तरेच्या मंडळीची तसेच आपल्यातल्या विचारवंतांची ही जुनी खोड आहे की जेव्हा मराठी माणुस स्वतःच्या हक्कांबाबत लढा देण्यासाठी उभा रहातो तेव्हा त्याला फुले, आंबेडकर, शाहु महाराज तसेच संतसज्जनांचे दाखले देत त्याच्या पार्श्वभागात पाचर मारायची अन जेव्हा त्याच्याकडुन काम करुन घ्यायचे असेल तेव्हा हिंदवी स्वराज्याची आठवण करुन द्यायची.

यानिमित्ताने आपल्यातल्या विचारवंतांना ही दिवाळी सुबुद्धी देवो ही अपेक्षा करतो.

नाना
(आपलाच)

सखाराम_गटणे™'s picture

28 Oct 2008 - 4:47 pm | सखाराम_गटणे™

सहमत

--
आम्ही जालिय देशमुख आहोत. आम्ही फालतु आठयाळ, राखुंड्या लोकांकडे लक्ष देत नाही.
योग्य वेळी आम्ही त्यांना कात्रजचा घाट दाखवु.

स्वामि's picture

28 Oct 2008 - 11:12 pm | स्वामि

समजा आता जर सर्व बिहारि जनतेने आम्हाला आरक्षण मिळावं अशी मागणी केली तर?ते मागासलेले आहेत, त्यांच्यावर अत्याचार(?) होत आहेत,समाजातल्या गरीब आणि पिछ्ड्या वर्गासाठी काहि तरी केलं पाहिजे या जाणीवेतुन त्यांना आरक्षण का देण्यात येवु नये? ;)

विकि's picture

29 Oct 2008 - 12:38 am | विकि

स्वामी सारखे काही जण असतात त्यांना आरक्षणाशिवाय काही दिसत नाही.
स्वामी साहेब बिहारी असो वा आणि कोणि महाराष्ट्रात प्रत्येक जण पोट भरण्यासाठी येतो. इथे दोन वेळच्या अन्नाची मारामार त्यांना सतावत असते. त्याचा विचार ते करत असतात आणि तुमच्या सारखे उच्चभ्रु त्यांची खिल्ली उडवतात .
शेवटी आपला आर्थिक,सामाजिक उत्कर्ष साधणे महत्वाचे काही जण उभ्या हयतीत तो ही साधू शकत नाहीत.
आपला
कॉ.विकि

टारझन's picture

29 Oct 2008 - 3:11 am | टारझन

समजा आता जर सर्व बिहारि जनतेने आम्हाला आरक्षण मिळावं अशी मागणी केली तर?ते मागासलेले आहेत, त्यांच्यावर अत्याचार(?) होत आहेत,समाजातल्या गरीब आणि पिछ्ड्या वर्गासाठी काहि तरी केलं पाहिजे या जाणीवेतुन त्यांना आरक्षण का देण्यात येवु नये?

=)) =)) =)) =)) =))

बाकी आमच्यासारख्या गरिब ओपन लोकांचं काय हो ? शैक्षणिक कर्ज आत्ताशी फिटलं ... बाकी आज काल श्रीमंती असायला काही उच्च कुळातलंच असावं लागतं असं काही दिसत नाही , राडोची घड्याळं आणि स्कॉर्पियो आजकाल रामदास (आठवले का ?) यांच्या समर्थकांकडे असतात असं दिसतं .. आपल्याला काय घेणं देणं नाय ब्वॉ जातिशी, पण तथाकथित बहुजन असला म्हणजे सरसकट चटया न भेळ विकणारा असावा का ? असा विनोदी प्रश्न पडतो... बाकी समस्या फार आहेत. न्याय सगळ्याच स्तरांतल्या लोकांना समान असावा असे वाटते , उगाच कोणी केवळ कोणत्या जातिचा आहे ते पहाण्यापेक्षा कुठे सामाजिक दृष्ट्या खालावलेला असेल तर काही शैक्षणीक लेव्हल पर्यंत त्यांना (फक्त आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना, जातिच्या नावावर माजलेल्यांना नव्हे) वर आणन्यासाठी प्रयत्न व्हावेत असं मनापासून वाटतं ...

(अवांतर : आमचा वाद फक्त माणसांशी आहे. शिंगावर घेणार्‍या बैलांशी नाही. त्यांच्याशी द्वंद्व करण्यासाठी फाटा उत्तम ,मिपावर रिप्लाय अपेक्षित नाही. आम्ही कोणाचे प्रत्यक्ष नावही घेतले नाही, आपला संबंध लावुन आपली लाल करून घेणारा स्वत: जबाबदार असेल. :) )
कळावे,
लोभ नसावा

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
बघता काय सामिल व्हा

विकि's picture

30 Oct 2008 - 1:33 pm | विकि

तुला पध्दतशीर उत्तर दिले असते पण मिपा मंडळ माझे लेखन काढून टाकेल म्हणुन उत्तर देण्याचे टाळतोय समजले काय. तु आरक्षणाची खिल्ली उडवत आहेस, अश्याने कोणाला काय फरक पडणार नाही. शेवटी एकदोघांचा उत्कर्ष पाहून संपुर्ण समाजाची प्रगती झालि असे मानणार्‍यांपैकी मी नाही . आरक्षण घेणार्‍यांची जात मिपासारख्या संकेतस्थळावर काढतोस ते माजलेत असे म्हणतोस आणि संपादक मंडळ काही बोलत नाही आश्चर्य आहे.अरे बापरे .

टारझन's picture

29 Oct 2008 - 3:21 am | टारझन

.

विकि's picture

29 Oct 2008 - 12:30 am | विकि

भारतीय संघराज्याचे विघटन. महाराष्ट्र वेगळे . आता प्रत्येकाला स्वतःची भाषा,भाषिक अस्मिता महत्वाची वाटू लागली आहे. सारख दिल्ली च्या पुढे झुकण्यापेक्षा राज्यांचे विघटन हा सरळ सोपा उपाय. तो बिहारी तरुण किंवा अन्य कोणि राज द्वेषाने का पछाडला. या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. उत्तर वा दक्षीण भारतातून लोक मुबई महाराष्ट्रात स्थलांतर करतात कारण तेथील गरीबी ,सामाजीक दरी इ. या गोष्टींचा विचार मिपावर व्हायला हवा. दुसर्‍याचा द्वेष करून काय साध्य होणार आहे. वर्षानुवर्षे चणे,भेळ,चटई विकणारे भैये आपनास दिसतात. त्यांची कितपत प्रगती होते हे ही पडताळून पहाणे आवश्यक आहे.
आपला(माणसाला माणूस म्हणून जगू देणारा)
कॉ.विकि

विकास's picture

29 Oct 2008 - 1:41 am | विकास

भारतीय संघराज्याचे विघटन. महाराष्ट्र वेगळे .

हा उपाय आहे की अपाय याचा विचार करायला हवा. मला वाटते की विकीसाहेब हे त्राग्याने अथवा उपरोधाने म्हणाले असावेत. तरी देखील ते मनापासून म्हणत आहेत असे गृहीत धरून उत्तर देतो...

आता प्रत्येकाला स्वतःची भाषा,भाषिक अस्मिता महत्वाची वाटू लागली आहे. सारख दिल्ली च्या पुढे झुकण्यापेक्षा राज्यांचे विघटन हा सरळ सोपा उपाय. तो बिहारी तरुण किंवा अन्य कोणि राज द्वेषाने का पछाडला. या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

राजची आंदोलन करण्याची पद्धत कुणाला पटेल न पटेल, त्यात त्याचे व्यक्तीगत राजकारणी स्वार्थ आहेत याबाबत दुमत नसले तरी ते कारण काही चुकीचे होते असे वाटत नाही...विकी साहेबांचा हिंसेला विरोध असेल तर तसे त्यांनी सांगावे की त्यांचा सर्वांकडून होणार्‍या हिंसेला विरोध आहे म्हणून केवळ राज ठाकरे करतात त्याच हिंसेला नाही म्हणून ;)

भाषा, अस्मिता वगैरे महत्वाचे वाटणे एक आणि त्याचा परीणाम म्हणून इतके टोक गाठणे एक झाले. असे टोक कधी गाठले जाते? - जेंव्हा स्थानीक माणसावर जाणून बुजून अन्याय होतो तेंव्हा. जेंव्हा स्थानीक भाषेला कुत्सितपणे वागवले जाते तेंव्हा. आणि जेंव्हा नवीन प्रांतात येऊन तेथील योग्य राहणी शिकण्याऐवजी "आम्ही बिघडलो तुम्ही बिघडना" म्हणले जाते तेंव्हा...

आज या सर्व प्रसंगावर एकंदरीत बोलणारे कोण आहेत? - उत्तर प्रदेश आणि बिहारातील नेते. आज तुमचे कलकत्याचे कॉमिबंधू तरी बोलतात का ते पहा... कारण त्यांना माहीत आहे बिहारी म्हणजे काय ते. आसामातील काँमी बंधूंनी पण बिहारींना काय केले ते माहीत असेलच. तीच अवस्था कॉमी नसून देखील कर्नाटकातील. पण त्यावेळेस महाराष्ट्रासंदर्भात जसा आरडा ओरडा झाला तसा झाला नाही... असे का?

आणि तरी देखील मला अनेक बिहारी माहीत आहेत जे अतिशय चांगले, कर्तुत्वान वगैरे आहेत...तेच इतरांच्याबाबतीत ही असेल पण सांख्यिकीच्या दृष्टीने पहाल तर जेथे जातो तेथे स्वतःचे बस्तान बसवताना तेथील लोकांवर अन्याय, बेकादेशीर वागणे, भाषेचा अपमान, हे जितके होईल तितका असाच प्रकार सर्वत्र असे जे कोणी वागतील त्यांच्या बाबतीत होईल. येथे ते बिहारी आहेत इतकेच काय ते..

हे सर्व होण्याचे कारण केवळ या सर्व प्रांतातील सामान्य नाहीत तर येथे कुठलीच व्यवस्था न निर्माण करणारे राज्यकर्ते आहेत.

कधी कधी मला असे खरेच वाटायचे, की हे प्रदेश किमानपक्षी काही काळाकरता तुमच्या कम्युनिस्ट पक्षाकडे चालवायला द्यावेत. एकदा का लोकशाहीच्या लाडाऐवजी ठोकशाहीत प्रसाद मिळाला की येईल तमाम जनता ताळ्यावर. पण मग कलकत्त्याचे काय केले ते पाहीले आणि बोलणेच खुंटले...

असो.

आपण माझ्या मताला प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद.
एकूणच स्थानिकांवर जर अन्याय होत असेल तर स्थानिक माणुस अन्याय होईपर्यंत निद्रीस्त होता का? मुंबई महाराष्ट्रात परप्रांतातून म्हणजेच आपल्याच भारत देशातून लोक पोटापाण्यासाठी येत होते आणि आहेत त्यांना रोजगार मिळत होता आणि आहे तेव्हा स्थानिक तरुण,पक्ष,संघटना काय करत होत्या.आज मुंबईतील बहुतेक रेल्वे स्थानक,बाजारपेठा यांवर परप्रांतियांचा कब्जा आहे. मी तर याबाबत माझी मत कित्येकदा मांडली आहेत. अनेक बिहारी माणसे मुंबईत मजूर,फेरीवाले,सुरक्षारक्षक,मासे विक्री,इ.कामे करतात.कित्येकांचे हातावर पोट चालते.झोपडपट्यांत बरेच जण राहतात. यांना मारून ,पळवून काय होणार आहे. त्यांच्या राज्यांची प्रगती(आर्थिक,सामाजिक) झाली नाही तर ते काय करणार.
मी तर म्हणतो मराठी अस्मिता जागी झाली आहेना मग फक्त बिहार,उ.प्र.शच का,सरसकट जेव्हढे म्हणून प्ररप्रांतीय आहेत त्यांना ही विरोध कराना. कि जे श्रीमंत आहेत त्यांना मराठीशी काही देणे घेणे नाही. उदा.कानडी,पंजाबी,राजस्थानी,ईतर यांना कुठे मराठी बोलता येते.भुमिका एकच हवी त्यात बदल नको. ते काय आणि इतर काय सगळेजण पैसा कमवायला मुंबई,महाराष्ट्रात आले आहेत.विरोध करा ना मग सर्वांना.
पैसा कमानेका तो मुंबई आनेका हे फक्त उ.प्र.,बिहार येथील तरुणांना लागू नाही होत तर सर्वांना लागू होते. मुंबईत गगनचुंबी इमारतीत राहणारे कोण आहेत ? त्यांना तर मराठी माणस त्यांच्या इमारतीत चालत नाहीत.मासांहार करणार्‍या मराठी माणसाला तेथे जागाच नाही. या लोकांबाबत कोण बोलणार कि ते धनदांडगे आहेत म्हणून त्यांच्या विरोधात जायचे नाही. हे पाहा कोणतीही आंदोलने जेव्हा होतात तेव्हा त्याच्या सर्वात जास्त फटका(झळ) गरीबांना आणि कनिष्ठ मध्यमवर्गाला बसतो.आज कित्येक मराठी नवश्रीमंत वर्ग आपल्या मुलांना इंग्लीश माध्यमाच्या शाळेत घालतात.त्यांचे काय करायचे.
आपला
कॉ.विकि

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Nov 2008 - 1:00 pm | llपुण्याचे पेशवेll

मी तर म्हणतो मराठी अस्मिता जागी झाली आहेना मग फक्त बिहार,उ.प्र.शच का,सरसकट जेव्हढे म्हणून प्ररप्रांतीय आहेत त्यांना ही विरोध कराना. कि जे श्रीमंत आहेत त्यांना मराठीशी काही देणे घेणे नाही. उदा.कानडी,पंजाबी,राजस्थानी,ईतर यांना कुठे मराठी बोलता येते.भुमिका एकच हवी त्यात बदल नको. ते काय आणि इतर काय सगळेजण पैसा कमवायला मुंबई,महाराष्ट्रात आले आहेत.विरोध करा ना मग सर्वांना.
पैसा कमानेका तो मुंबई आनेका हे फक्त उ.प्र.,बिहार येथील तरुणांना लागू नाही होत तर सर्वांना लागू होते. मुंबईत गगनचुंबी इमारतीत राहणारे कोण आहेत ? त्यांना तर मराठी माणस त्यांच्या इमारतीत चालत नाहीत.मासांहार करणार्‍या मराठी माणसाला तेथे जागाच नाही. या लोकांबाबत कोण बोलणार कि ते धनदांडगे आहेत म्हणून त्यांच्या विरोधात जायचे नाही. हे पाहा कोणतीही आंदोलने जेव्हा होतात तेव्हा त्याच्या सर्वात जास्त फटका(झळ) गरीबांना आणि कनिष्ठ मध्यमवर्गाला बसतो.आज कित्येक मराठी नवश्रीमंत वर्ग आपल्या मुलांना इंग्लीश माध्यमाच्या शाळेत घालतात.त्यांचे काय करायचे.

यू.पी. बिहारी आणि इतर यांच्यात फरक असा आहे की त्यांची भाषिक मग्रूरी कमी आहे. राजस्थानी सुतार, बनिये दुकानदार अगदी व्यवस्थित मराठी बोलतात. कानडी लोक तर अगदी सर्रास मराठी बोलतानाच नव्हे तर मराठी वृत्तपत्रातून मराठी माणसांप्रमाणे लेखन करतानाही आढळतात. मारवाडी आणि गुजराथी तर मराठी बोलतातच. अजून एक सर्वात महत्वाचे 'हम यु.पी. के हैं हम अपनी भासामें बोलेंगे' हा माज नसतो. राहीला प्रश्न मारवाड्यांच्या सोसायट्यांचा, तिथे अनेक मांसाहार न करणारी मराठी कुटुंबे राहीलेली मी पाहीली आहेत. (माझी स्वतःची मावशी अशा एका सोसायटीत राहत होती.)
पुण्याचे पेशवे

विकि's picture

8 Nov 2008 - 1:44 pm | विकि

तुम्ही तर उघड उघड त्यांची बाजू घेत आहात.अर्थात तुम्ही जे अनुभवले ते तुम्ही लिहीले आहे. त्यामुळे त्या विरुध्द बोलण्याचा प्रश्नच येत नाही.
राहीला प्रश्न मारवाड्यांच्या सोसायट्यांचा, तिथे अनेक मांसाहार न करणारी मराठी कुटुंबे राहीलेली मी पाहीली आहेत. (माझी स्वतःची मावशी अशा एका सोसायटीत राहत होती.) मांसाहार करणार्‍या मराठी कुटूंबांनी कोठे जायचे.ते तुम्ही सांगितले नाही.
राजस्थानी सुतार, बनिये दुकानदार अगदी व्यवस्थित मराठी बोलतात.
ते त्यांच्या सोईप्रमाणे व धंद्याच्या हिशोबाने मराठीत बोलतात.
राहीला कानडी लोकांचा प्रश्न त्याबाबत मी खाली लिहीलेले आहे तो प्रतिसाद् वाचा.

भुमिका एकच हवी त्यात बदल नको. ते काय आणि इतर काय सगळेजण पैसा कमवायला मुंबई,महाराष्ट्रात आले आहेत.विरोध करा ना मग सर्वांना
विकिसाहेब, याला राजकारण, मुत्सद्देगिरी म्हणतात. स्वार्थ साधण्यसाठी कधी कधी धूर्त होणं आवश्यक असतं.
राजसाहेब हे काही समाजसेवक नव्हेत. ते एक मुरलेले राजकारणी आहेत. तुम्ही म्हणता तसं सर्वाना एकाचवेळी विरोध केला तर तो मुर्खपणा ठरेल. राज ठाकरे यांनी युपी-बिहारींना लक्ष केले असले तरी त्यांची मूळातल्या मागणी कडे जरा लक्ष द्या.

"महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र दिनच साजरा झाला पाहिजे. उत्तर प्रदेश दिन साजरा करू दिला जाणार नाही. उत्तर प्रदेश दिन त्यांच्या राज्यात साजरा करावा." यामध्ये उत्तर प्रदेश दिनाचा उल्लेख असला तरी ही ताकीद सर्वच परप्रांतिय समाजाला आहे. उद्या गुजराती किंवा इतर समाजाने त्यांच्या त्यांच्या राज्याचा दिन साजरा करायचा म्हटलं तर ते दहादा विचार करतील.

"युपी बिहारचे लोक महाराष्ट्रात राहून मराठी शिकत नाहीत". यातून सुद्धा उल्लेख जरी उ.प्र किंवा बिहारचा असला तरी "महाराष्ट्रात राहणार्‍या प्रत्येकाला मराठी आलेच पाहिजे" ही सुचना सर्वच समाजापर्यंत पोहोचते.

"लेकी बोले सुने लागे" अशी एक म्हण मराठीत आहे!

आपल्याला दहा शत्रूंना नेस्तानाबूत करायचं असेल तर सगळ्यांना एकाच वेळी अंगावर घेऊन लढणे म्हणजे मुर्खपणाच आहे.
त्यापेक्षा एका वेळी एकाच शत्रूशी दोन हात करावे. एकदा त्याला निपटून काढले की मग दुसर्‍याकडे लक्ष द्यावे. अशवेळी इतर शत्रूंना जरा गोंजारलं तरी हरकत नाही. एकदा का तुम्ही एका शत्रूला आडवे केलंत की कदाचित दुसरा शत्रू स्वतःच तुमच्याशी जुळवून घेईल!

गुजराती, बंगाली आणि इतर समाजाला गोंजारून उ. प्र. आणि बिहार समाजाला एकटं पाडण्याचा जबरदस्त डाव राज ठाकरे यांनी खेळला आहे.

शेवटी वैश्विक गांधीवाद घेऊन लढाई लढताच येणार नाही. जिंकणं तर दुरच!

(राजसाहेब प्रेम) रम्या

विकि's picture

8 Nov 2008 - 1:59 pm | विकि

येथे उ.प्रदेश दिन साजरा करणार्‍या तेथील नेत्यांना(कृपाशंकरसिंह,संजय निरुपम,इ.) मोठे करणारे कोण आहेत याचाही विचार कर.इथे कोणाला शत्रू समजणे ही चुक आहे.शत्रू समजणे हे फुटीरतावाधाचे लक्षण असू शकते.
राज ठाकरेंच्या आंदोलनाचा किंवा राजकारणाचा मुख्य उद्देश ,सिद्धांत काही कळला नाही.यू.पी बिहार्‍यांना हाकलून साध्य होणार आहे.शिवसेनेने फार पुर्वी द.भारतीयांविरुध्द आवाज उठवला होता.मला नाही वाटत की या आंदोलनाने फार काही घडेल. राज यांचे राजकारण द्रमुक,अण्णाद्रमुक या पक्षांप्रमाणे असावे असे वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

29 Oct 2008 - 12:32 am | प्रभाकर पेठकर

मराठी राज्यकर्त्यांनी, नेत्यांनी वेळीच सावध व्हावे. नाहीतर महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही.
राज ठाकरेंना माझे पूर्ण समर्थन आहे. (फक्त त्यांनी मराठी अस्मिता स्वार्थ बाजूला ठेवून जपावी.)

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

विकि's picture

29 Oct 2008 - 12:40 am | विकि

अस्मिता जागी झाली म्हणजे दुसर्‍या प्रांताचा तेथील लोकांचा द्वेष करणे.

सुक्या's picture

29 Oct 2008 - 1:58 am | सुक्या

अस्मिता म्हणजे दुसर्‍या प्रांताचा तेथील लोकांचा द्वेष मुळीच नाही.

अस्मिता म्हणजे अभिमान, संस्क्रुतीचा अभिमान. तो सर्वांनाच असतो. बंगाली , बिहारी, तेलुगु, तमीळ, गुजराथी कुनालाही विचार. मराठी माणसाला ही तो अभिमान असतो. अस्मितेच्या नावाखाली लोकांचा द्वेष करा असे कुनीही सांगत नाही. परंतु तुम्ही परप्रांतीय आहात म्हणुन दुर्गापुजा करु नका किवा दांडीया करु नका असं कुनी म्हटलं आहे का? अस्मितेच्या नावाखाली कुनी आपाली ताकत दाखवु लागाला तर त्याला विरोध जरुर असावा. दक्षिण भारतीय लोकांचा द्वेष आपण करतो का? नाही ना मग या बिहार्‍यांचा का करतो ? विचार करा. त्याचे कारणही लगेच सापडेल.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

विकि's picture

30 Oct 2008 - 1:16 pm | विकि

द.भारती्य लोकांचा द्वेष तु करत नसशील पण आमचा सिमाप्रश्न याच द.भारतातत्या कर्नाटक राज्यात पडून,झडुन ,मारूनमुटकून आहे.आमच्या मर्‍हाटी महापौराला(बेळगावच्या) याच कानडी लोकांनी बेदम मारहाण केली होती. याच लोकांचे बहुसंख्य लेडीज बार,हॉटेल्स मुंबईत आहेत त्यात काम करनारा वेटर मराठी आहे का?त्यांच्याच प्रांतातील आहे. रस्त्यावर अनधिकृत नारळपाण्याची,इडलीडोसाची विक्री करणारे कोण आहेत सांग ना.विरोध करायचा तर सर्वांना नाही तर नाही.त्याच काय बोलतेस ते बोल आधी. शिवसेनेने सर्वात आधी यांच्याविरोधात आंदोलन केले होते.
अरे सुक्या अस्मिता जागी झाली म्हणजे दुसर्‍या प्रांताचा द्वेष करणे हे आलेच. त्यात काय मोठे.

इनोबा म्हणे's picture

29 Oct 2008 - 2:05 am | इनोबा म्हणे

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रोजगार नाही म्हणुन हे लोक महाराष्ट्रात किंवा आसपासच्या राज्यात जातता ना? पण मला सांगा गेली कित्येक वर्षे त्या राज्यांचा विकास झाला नाही ,लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार निर्माण केला गेला नाही याला जबाबदार कोण आहे? उत्तर प्रदेश-बिहारच्या राजकीय नेत्यांची काय लायकी आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे.पण सामान्य नागरीक ही या बेरोजगारीला काही प्रमाणात जबाबदार आहेच ना! तिथे रोजगार नाही म्हणून हे लोक आसपासच्या राज्यात पसरत गेले. पण मग त्यांच्या राज्याचे काय? तिथे विकास कसा होणार?
मानवतेच्या-भारतीयत्वाच्या मुद्द्यावर जरी यांना आपल्या राज्यात थारा दिला तरी आणखी किती वर्षे या लोंढ्यांचा भार इतर राज्यांनी सहन करायचा? बरे हे लोक रोजगारासाठी महाराष्ट्रात आल्यानंतर यांची मते खाण्यासाठी त्यांच्या राज्यातील राजकीय पक्ष ही यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. यांना स्वतःचे राज्य सांभाळता येत नसताना यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ढवळाढवळ करण्याची गरज काय?
महाराष्ट्राला/महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना दोष देण्यापेक्षा उत्तर भारतीय नेत्यांनी जर स्वतःच्या राज्याचा विकास केला तर त्या राज्यातील लोकांना तरी इतर राज्यात जाण्याची गरज भासेल का? मात्र या गोष्टीकडे कुणाचे लक्ष जाऊ नये म्हणून उत्तर प्रदेश आणि बिहारचे नेते महाराष्ट्राला घटनेने दिलेल्या अधिकाराचे दाखले देत आहेत. आणि सामान्य उत्तर भारतीय माणूस सुद्धा त्यांनाच साथ देतोय.
आज महाराष्ट्रात परप्रांतिय नगरसेवक जितक्या प्रमाणात आहेत तितके देशातील इतर कुठल्याही राज्यात नाहीत. आणि हेच चालू राहीलं तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला फार वेळ लागणार नाही.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विकि's picture

30 Oct 2008 - 1:45 pm | विकि

तुमच्या हून अधिक जास्त आक्रमक भुमिका मी परप्रांतियांबाबत या आधी मांडली आहे(मनोगत ,उपक्रमावर) पण दोन वेळच्या अन्नासाठी जेव्हा मारामार होते तेव्हा तो परप्रांतीय (स्वतंत्र भारताचा रहिवासी) काय करणार,तेथील राज्याचा विकास(आर्थिक,सामाजिक) नाही झाला तर ते काय करणार.त्यांच्या येथील न झालेल्या विकासाबाबत राज ठाकरेंनी आंदोलने करायला हवी होती. तुम्हाला तेथील किंवा येथील राजकरण्यांनि केलेले राजकारण महत्वाचे आहे काय? नेते येतात बोलून जातात पण सामान्यांचे काय . नेत्यांचे कामच आहे भाषण ठोकणे.
विरोध करायच तर सर्वांना करा.उ.प्र.,बिहार घेऊन बसू नका.

विकि's picture

30 Oct 2008 - 1:45 pm | विकि

तुमच्या हून अधिक जास्त आक्रमक भुमिका मी परप्रांतियांबाबत या आधी मांडली आहे(मनोगत ,उपक्रमावर) पण दोन वेळच्या अन्नासाठी जेव्हा मारामार होते तेव्हा तो परप्रांतीय (स्वतंत्र भारताचा रहिवासी) काय करणार,तेथील राज्याचा विकास(आर्थिक,सामाजिक) नाही झाला तर ते काय करणार.त्यांच्या येथील न झालेल्या विकासाबाबत राज ठाकरेंनी आंदोलने करायला हवी होती. तुम्हाला तेथील किंवा येथील राजकरण्यांनि केलेले राजकारण महत्वाचे आहे काय? नेते येतात बोलून जातात पण सामान्यांचे काय . नेत्यांचे कामच आहे भाषण ठोकणे.
विरोध करायच तर सर्वांना करा.उ.प्र.,बिहार घेऊन बसू नका.

प्रभाकर पेठकर's picture

29 Oct 2008 - 2:05 pm | प्रभाकर पेठकर

अस्मिता जागी झाली म्हणजे दुसर्‍या प्रांताचा तेथील लोकांचा द्वेष करणे.

अजिबात नाही. 'अस्मिता' जागृत होणे म्हणजे दुसर्‍या प्रांताचा द्वेष करणे नाही. स्वतःच्या प्रांताचा 'रास्त' अभिमान बाळगणे. 'स्वत्त्वा'वर होणार्‍या आक्रमणाचा प्रतिकार करणे.
'समानते'च्या नांवाखाली 'कणाहीन' समाज निर्माण करणे म्हणजे इतरांवर प्रेम करणे नाही. स्वतःच्या आजारी मुलाकडे दुर्लक्ष्य करून कर्तृत्वहीन शेजार्‍याच्या मुलाची देखभाल करणे म्हणजे 'समानता' नाही.

मी तर म्हणतो, देशांतर्गत प्रांतवादाइतकी संकुचित भुमिका का ठेवा? देशांच्या सीमेवरून सैन्य काढून टाका. पाकिस्तान्यांना काश्मिरच का? आख्खा भारत घेऊ द्या. अमेरिकेला रशिया देऊन टाका. चीनला अमेरिका देऊन टाका. कुठल्याही देशाच्या सीमा रेषा न आखता कोणालाही कुठेही जाऊन राहण्याची, नोकरी/व्यवसाय करण्याची मुभा द्या. 'व्हीसा' ही असमानता निर्माण करणारी पद्धत बंद करा. मग येऊ द्या 'बिहारीं'ना, नाहीतर कोणालाही, मुंबईत्त. मी हसत हसत स्वागत करीन त्यांचे.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

विकि's picture

30 Oct 2008 - 1:25 pm | विकि

अशी अचानक अस्मिता कशी जागी होते. ते सांगाल का? विद्वेशातूनच अस्मिता जागी होते.

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2008 - 10:37 pm | प्रभाकर पेठकर

काय करायची आहे अस्मिता? माझ्या प्रतिसादातील शेवटचा परिच्छेद पाहा. अस्मितेला गाडून टाका. सर्व सीमा रेषा पुसून टाका. सर्व जग, सर्व देश, सर्व प्रांत सर्वासाठी खुले करा. जगात शांतताच शांतता नांदेल.

शाब्दीक नाही, क्रूती आहे. वाचा

उत्तरभारतियांचे रक्षण राष्ट्रवादी करणार.इथे पहा
याला म्हणतात "घर का भेदी लंका ढाए"
मराठीत "आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ"
"अनामिका"
अनुदिनी-
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/