(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना )
अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना
उघडे तसेच फेस्बुक
लॉगौट.. मन धजेना ..
मी फेस्बुकासमोरी
फेस्बुक-अॅडिक्ट आहे ..
मी हेच सांगताना
रुसुनी कधी बसावे
मी का इथून उठावे
समजूत का पटेना
धरसी अजब अबोला
तुज मौन सोडवेना ..
का पोस्ट मी लिहावी
चर्चाहि होत आहे
मेजवानी वाचका त्या
जाणून उत्सुकाहे
काही अटीतटीने
कुढता अढी सुटेना
कॉमेंट ये स्टेटसला
ऐसी स्थिती इथे ना ..
हा गूढ काही घाव
अन्फ्रेंडचाच रंग
कॉपीस खूप वाव
करण्यात होत गुंग
नावाविना कसा हा
बघ पोस्टतो कळे ना ..
अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना ........
.
( http://mee-videsh.blogspot.in/2014/11/blog-post.html )
.
प्रतिक्रिया
8 Nov 2014 - 12:07 am | सतिश गावडे
कशा हो सुचतात इतक्या सुंदर कविता तुम्हाला?
अहाहा... काय ती शब्दांची नजाकत. काय ती शब्दांची पखरण... काय ते भाषेचं माधुर्य. काय तो शब्दांचा गोडवा... अहाहा...
8 Nov 2014 - 12:37 am | प्रचेतस
हेच म्हणतो.
वाचता वाचता अंतर्मुख करणारी कविता.
आमच्या एका मित्रांनाही अशाच छान छान कविता सुचत असतात.
8 Nov 2014 - 9:21 am | नाखु
"सुचत" च्या जागी मनात म्हंटलेला शब्द आम्ही ऐकला बरं का!!!
वल्लिदा आगे बढो हम तुम्हारे साथ है!
8 Nov 2014 - 12:47 am | स्वप्नज
शीर्षक वाचून वेगळ्याच 'क्रिये'बद्दल कविता आहे असे वाटले...
अजूनी बसून आहे, पण 'यश' येईना असे काहीतरी..
ह.घ्या.विदेशजी..
8 Nov 2014 - 12:51 am | सतिश गावडे
अशा प्रत्ययदर्शी कविता लिहिणारे दुसरे एक कवी मिपावरच आहेत. थोडेसे त्या कवीच्या भावविश्वावरचा पडद बाजूला सरकवला की भांडे दिसेल.
8 Nov 2014 - 12:57 am | स्वप्नज
सगाराव, टकुर्यात ईना कुणाबद्दल बोल्ताय त्ये...
स्वगत-हब्यास कमी पडतूय राव.
8 Nov 2014 - 9:09 am | खटपट्या
हिंट देउ का ?
.
.
उडनमांडी
8 Nov 2014 - 9:32 am | टवाळ कार्टा
=))
10 Nov 2014 - 10:46 pm | हाडक्या
*lol*
8 Nov 2014 - 12:59 am | बॅटमॅन
आईच्या गावात...नेमके हेच लिहायला/म्हणायला आलो होतो.
10 Nov 2014 - 9:30 am | वेल्लाभट
हाहाहाहाहा ! एक नंबर्र !
10 Nov 2014 - 10:30 pm | पैसा
फेस्बुकीय मित्रांना समर्पित!
14 Nov 2014 - 10:28 am | विदेश
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार !