आधीचा धागा भरुन वहायला लागला. घुबडाच्या न बांधलेल्या गबाळ्या घरात खूप जणांना डोकावण्याची उत्सुकता दिसली.
नवीन प्रतिसाद शोधणं त्या धाग्यात कठीण झाल्याने हा आणखी एक धागा तयार करतोय.
अजूनही चार अंडी शिल्लक आणि तीन पिल्लं बाहेर आहेत. चौथं पिल्लू बाहेर यायला विसरलंय की काय ??!
पहिलं पिल्लू प्रचंड मोठं झालंय (तुलनेतच अर्थात). तिन्ही पिल्लांचे डोळे उघडले आहेत. यात गंमतीशीर प्रकार असा की सर्वात लहान पिल्लू (टिल्लू) हे सर्वात मोठ्या भावंडाला (दादा म्हणू) पकडून राहतंय.. जिकडेतिकडे दादाच्या प्रोटेक्शनमधे. ते जणू दादालाच आई आणि रक्षक समजतंय. घाबरलं की दादाला चिकटतं.. त्याच्या कुशीत झोपायला शिरतं. आईकडे जास्त जात नाही.
दादा हा ताईदेखील असू शकेल.. :)
आणि उरलेलं तिसरं (मधलं.. म्हणजे २ नंबर) पिल्लू मात्र मम्माज बॉय आहे. ते कायम आईच्या पंखाखाली.
लहान्या आणि मोठ्याला पंखातून सुटका करुन मोकळ्यावर खेळायची हौस.. तर मधला मात्र आईच्या पदरात सदैव दडून.. बाहेर आला तरी नुसतं डोचकं बाहेर काढून अंदाज घेतो आणि आत दडतो.
थोडक्यात मोठा दादा आणि शेंडेफळ (आत्तापावेतोचं) यांचा कंपू झालेला दिसतो. व्हिडीओ नीट पाहिलेत तर मी काय म्हणतो कळेलच. एकदोनदा तर मला दादा (अर्थात त्याचं स्वतःचं हादडून झाल्यावरच बहुधा..) त्याच्या छोट्या दोस्ताला खायला मदत करतानाही भासला. आणखी निरीक्षणाने पक्कं सांगता येईल.
३१ ऑक्टोबर..
१. आधी बघा एक थोडा मोठा व्हिडीओ. यात आई आणि पोरं यांच्या दिनचर्येतला काही भाग.. शिकारीचे लचके, पोरांची मागणी, घुबडाईची स्वतःची साफसफाई... आणखीही काही दिसलं तर मला कळवा. हा व्हिडीओ फक्त थोडा जास्त वेळ तुम्हाला या घरात डोकावता यावं यासाठी.
२. हा व्हिडीओ दिवाळीत काय होईल याची झलक दाखवतो. शेवटपर्यंत पाहिला तर आधी एक सुतळी बॉंम्ब किंवा लक्ष्मीतोटा उडल्यावरची रिअॅक्शन.. थोडीशीच.. आणि नंतर फटाक्यांची माळ वाजल्यावर मात्र एकदम दचकून चला रे पंखांखाली.. मस्ती बास आता.. असा घुबडाईचा पोक्त इशारा..
३. बिग ब्रदर ईटिंग लंच.. डिस्टर्बन्स नको.. घुबडाईकडे चिर्र चिर्र अशा आवाजांनी मागणी केली जाते आणि ती आणलेल्या शिकारीचा एक लचका तोडून पिल्लांना देते. पिल्लं गुणी आहेत. आ करुन भरवण्याचा हट्ट न धरता आपापली हाताने जेवतात.. (लिटरली.. पिल्लांचे पंजे प्रचंड आहेत.. ते लचका पंजात पकडून किंवा पंजे त्यात रोवून त्यावर बसून चोचीने आपापले खातात.) माझी अशी समजूत होती की त्यांना चोचीत भरवावं लागत असेल. अर्थात मोठं झालेलं पिल्लू अशा रितीने खात असेल हीदेखील शक्यता आहेच.
४. बिग ब्रो झोपलाय. त्याचा छोटा चाहता त्याला ढोसकलतोय. त्याच्यावर चढायचा प्रयत्न करतोय. इतकावेळ ते दोघे एकमेकांशी काहीतरी ढकलाढकली करत होते. त्यानंतर मोठा भाऊ झोपला. तेव्हा लहान बाळ "माझ्याशी अजून खेळ ना रे.. " असं म्हटल्यासारखं मला वाटलं.
५. मला माझ्या वाट्याचा लचका दे अशी घुबडाईकडे बडादादाची तीव्र मागणी आणि लचका तोडून मिळाल्यावर संतोष पावून तो कोपर्यात नेणे. (कोपर्यात घेऊन निवांत खात बसण्याचा भाग व्हिडीओत आलेला नाही.)
पिल्लं घशातून कसलातरी वेगळाच सीर्र सीर्र अशा आवाज करतात. तो यातल्या बर्याचशा व्हिडीओजमधे ऐकायला मिळेलच. पण त्या आवाजाने त्यांची शांतताप्रेमी आई वैतागते आणि त्यांना पंखाखाली घेऊन आणि अर्रर्र किंवा तत्सम दबक्या आवाजात दामटते असं दिसलं. केवळ खाणं / भक्ष्य इतकाच इंटरेस्ट न राहता आता त्या पिल्लांना (निदान थोरल्याला) खेळण्यातही रस उत्पन्न झाला आहे असं वाटतंय. एक रंगीबेरंगी चिंधी मिळाली आहे त्यांना. ती फाडत बसतात.
बाकी अपडेट उद्या किंवा जसाजसा लाभेल तसा. साधारण कालक्रमानुसार आणखी एक पिल्लू उद्या यायलाच हवं.
भेटू..
प्रतिक्रिया
22 Nov 2013 - 10:01 am | पैसा
गुड मॉर्निंग! :)
22 Nov 2013 - 11:10 am | निनाद
छान... बरे वाटले! :)
22 Nov 2013 - 8:40 pm | रुस्तम
धन्यवाद...
22 Nov 2013 - 10:47 am | जेपी
आवडल .
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
22 Nov 2013 - 9:48 pm | नगरीनिरंजन
छान धागा!
पण घुबडाची पिलं जगली म्हणून आनंद व्यक्त करू की मनुष्येतर प्राण्यांचा अवघड होत चाललेला जीवनसंघर्ष पाहून हळहळ व्यक्त करू ते कळत नाहीय.
24 Nov 2013 - 10:17 am | मदनबाण
वाचतोय,व्हिडियो पाहतोय. :)
26 Nov 2013 - 6:45 am | ओसु
गवी सर,
पुढे काही अपडेट्स असतील तर प्लीज टाका.
मोठे पिल्लू तर फोटोजेनिक आहे. मस्त पोझ दिली आहे. :)
26 Nov 2013 - 12:01 pm | गवि
काल मिपा डाऊन असल्याने अपडेट लिहीता आला नाही. कालचा अपडेट आजः
वाढता वाढता वाढे. लवकरच उडण्याचे पहिले धडे घेण्यासाठी मोठे पिल्लू तयार होईल असं दिसतंय. पाचव्या मजल्यावर वळचणीच्या जागेत उडायला कसं शिकवणार हा प्रश्नच आहे म्हणा..प्रॅक्टिसच्या काळात नाही जमलं तर थेट जमिनीवर गच्छंती..एरवी पिल्लू असं खाली पडलं तरी घुबड आईबाप त्याला तिथेच अन्न देतात, आणि एखादा मजला उंचीइतक्या गव्हाणीत परत यायला मदत करतात. पण पाच मजल्यांच्या उंचीवर ही सिस्टीम कशी चालेल माहीत नाही.
पण त्यांनी घर करण्यापूर्वीच हा विचार केला असेल असं म्हणू..
बाकी घरट्यात गुटख्याचे पाकीट दिसत असल्याने यांचे पिताश्री येतजात असावेत असं दिसतंय.. ;)
26 Nov 2013 - 1:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे चित्र नंबर वन ! मी किती उंच झालोय हे अभिमानाने दाखवताना दिसतोय ! पण डोळे मिटालेले आहेत, उभ्या उभ्या डुलक्या चालल्या आहेत की काय? :)
बाकी घरट्यात गुटख्याचे पाकीट दिसत असल्याने यांचे पिताश्री येतजात असावेत असं दिसतंय...
+D26 Nov 2013 - 1:19 pm | प्रभाकर पेठकर
शिक्षा म्हणून वर्गाच्या बाहेर काढल्यासारखा निष्पाप चेहर्याने उभा आहे.
26 Nov 2013 - 1:20 pm | पैसा
हा पठ्ठ्या सुरुवातीपासूनच असा उभा रहाताना दिसतो आहे. मस्तच!
26 Nov 2013 - 1:20 pm | परिंदा
हायला! घुबडं पण गुटखा खातात की काय? :)
पिल्लू थोडं बारीक वाटतंय ना?
26 Nov 2013 - 1:34 pm | गवि
इथे आगोदरच येऊन गेलेले पिल्लांच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यातले काही फोटो एकत्र पोस्ट करतोय.. एकत्रित पाहण्यासाठी केवळ.
26 Nov 2013 - 1:39 pm | पैसा
आता मात्र कळत नाहीये, एवढ्या उंचावर त्यांना उडायला कसं शिकवणार आहेत ते आईबाप?
26 Nov 2013 - 1:43 pm | प्रभाकर पेठकर
आधी कडेवर घेऊन फिरवून आणतील (उंचीची भिती घालवायला). एकदा भिती गेली की आपल्या चोचीत पिल्लाचा एक पाय पकडून उडायला मदत करतील आणि एकदा का उडता यायला लागलं की, 'आयला! आई-बाबांना नं काडीचीही अक्कल नाही' असे म्हणायला पिल्ले मोकळी होतील.
26 Nov 2013 - 1:39 pm | प्रभाकर पेठकर
बच्चोंको जवान होते देखनेमे जो मझा है वो अपने खुदके जवानीमेभी नही होता - सईद जाफरी. चित्रपट - 'मासूम'.
26 Nov 2013 - 1:48 pm | झकासराव
गविशेठ , ही लेखमाला / फोटोमाला पुर्ण झाली की लोकसत्ताला पाठवा.
जबरदस्त आहे. :)
27 Nov 2013 - 1:05 am | उपास
गवि, खूप छान वाटलं प्रगति बघून.. शतशः धन्यवाद!
27 Nov 2013 - 8:36 am | स्पंदना
केव्हढ उंच आहे घुबडु.
बाकी गुटख्यावरुन पिताश्री म्हणजे सुतावरुन स्वर्ग वाटतय. :D
माताजीसुद्धा "दमले बाई म्हणुन तोबरा हाणु शकतात."
27 Nov 2013 - 11:30 am | गवि
काल रात्री पिल्लं दिसेचनात, म्हणून नीट शोधलं तर त्यांनी जन्मल्यास पहिल्यांदाच तो मानसिकरित्या ईअरमार्क केलेला दीड बाय दीड फुटाचा घरटं नावाचा चौकोन सोडून वळचणीत दुसर्या टोकाला भ्रमंती सुरु केली होती. सकाळी पाहिलं तेव्हा परत आली होती दोघंजणं.
माझ्या या कॅमेर्याचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे बर्याचदा उत्तम क्षण पकडण्याच्या कामी धोंड ठरतात. फोटो काढण्याचे बटण क्लिक केल्यावर कसलासा काउंटडाऊन सुरु होतो आणि तो अडकत अडकत कित्येक सेकंदांनी किंवा कधीकधी मिनिटभराने फोटो निघतो. मोक्याचा क्षण टिपला जात नाही.
तरीही आज पिल्लांची तुलनात्मक उंची, पिसं जोराजोरात साफ करणं, मानेचे व्यायाम :) असे बरेच फोटो मिळाले.
व्हिडीओमधे पिल्लांच्या माना किती लवलवतात ते दिसेल. एकदा मोठ्या पिल्लाने मान खांद्याच्याही खाली लटकेल इतकी खाली वळवली. दचकायलाच झालं, पण तो चमत्कारिक फोटो निघेपर्यंत पोज बदललेली. तरीही व्हिडीओत थोडी झलक दिसेल मानेच्या लवचिकतेची. इतक्या माना का वेळावतात कोण जाणे मधेच.. आवाज नीट ऐकू येण्यासाठी की खरंच मानेच्या लवचिकतेची प्रॅक्टिस? :)
व्हिडीओ शेवटपर्यंत बघा कारण, व्हिडीओच्या शेवटाकडे लहान पिल्लाने दिलेली खुन्नस कम मला घाबरवणारा पंख फुलवलेला पवित्रा लाजवाब.. आणि दोन्ही पिल्लांनी घसे फुग्यासारखे फुगवून सोडलेली हवा, यामुळे त्या कुकरशिट्टीचा उगम नेमका कुठे असतो ते आवाजासहित दिसेल. पूर्ण व्हिडीओ पहावा.
प्रतिमा:
मोठ्या पिल्लाच्या पंखांतली आणि पोटावरची जवळजवळ सर्व शुभ्र बालपिसं जाऊन त्याजागी प्रौढ घुबडाची मोठी रंगीत पिसं आली आहेत.
वेगवान पीससफाई:
28 Nov 2013 - 8:19 am | प्रचेतस
जबरदस्त व्हिडियो आहे.
27 Nov 2013 - 1:59 pm | पैसा
तुमच्या कॅमेर्याच्या सगळ्या मर्यादांसकट त्याने जे काम बजावलंय ना, त्याला तोड नाही. जगातल्या कोणत्याही वेबकॅमला असं काम मिळालं नसेल कधी! त्या कॅमेर्याला तुमच्याबरोबरच धन्यवाद!
डिलेड शॉटचं काहीतरी सेटिंग असावं. पण आता त्या पिलांच्या लक्षात न येता अॅडजस्ट करता येईल का कोणजाणे!
28 Nov 2013 - 10:13 am | प्रभाकर पेठकर
अप्रतिम.
मानेचे व्यायाम हे घुबड समाजातील 'योगा'चे प्रकार असावेत. प्रत्येक आकलनिय आणि अनाकलनिय आवाजाला त्यांचा प्रतिसाद पाहता आता निदान एखादा कावळा वगैरे आल्यास त्याला हुसकावून लावण्याचे धाडस आणि कसब त्यांच्यात आले असावे असे वाटते आहे. अजून महिन्याभरात ती उडू शकतील आणि एक सक्षम घुबड नागरीक म्हणून नांवारुपाला येतील अशी शक्यता आहे.
ह्या घुबड संगोपनातील कर्तव्यपूर्तीचा आनंद लवकरच तुम्हाला मिळेल. प्रथम तिथे अंडी पाहिल्यापासून ते थेट घुबडांनी स्वबळावर स्वपंखांनी उडून जाई पर्यंतच्या प्रवासातील तुमची मानसिक आणि भावनिक स्थित्यंतरं, उत्सुकता, काळजी, कौतुक, समाधान, मनाची गुंतणूक वगैरे वगैरे वर एक तपशिलवार लेख तयार ठेवा. हा लेख एक अहवाल लेखन आहे. तो लेख तुमच्या थेट भावभावनांचे शब्दचित्र असावे......घाई नाही, घुबडांनी घरटे सोडून आपल्या सर्वांना टाटा-बाय बाय केल्या नंतर.... पण वाट पाहात आहोत.
28 Nov 2013 - 2:46 pm | बॅटमॅन
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
2 Dec 2013 - 10:42 am | पैसा
चांगले काही असलं तर सांगा. वाईट बातमी अजिबात देऊ नका!
2 Dec 2013 - 11:07 am | रुस्तम
+१
3 Dec 2013 - 10:04 am | गवि
पिल्लं आता त्या वळचणीच्या एरियात मोकळेपणी बागडत असतात. मोठ्या पिल्लाने उडण्याचे काही धडे घेतलेत का हे कळलेलं नाही. सुटीच्या दिवशी अधिक काळ निरीक्षण केल्यानेच कळेल.
लहान पिल्लाच्या पंखातली पिसंही आता प्रौढ घुबडासारखी झाली आहेत. तेही लवकरच उडण्यासाठी तयार होईल असं दिसतं.
एका पायावर उभं राहणं हा दुसर्या पायाला विश्रांती देण्याचा प्रकार आहे की उगीच आपली स्टाईल हे माहीत नाही.
बाकी जबरदस्त इंटरेस्टिंग असा काही अपडेट नाही. घुबडाकडे पहायला मिळणारा वेळही कमी झालाय.
3 Dec 2013 - 10:16 am | पैसा
मस्तच की! दुसरंही आता बर्यापैकी मोठं दिसतंय!
3 Dec 2013 - 10:34 am | बिपिन कार्यकर्ते
गवि, हे सगळं वाचतोय. आसुसून वाचतोय. या दोघांची बातमी वाचायला रोज उत्सुकता लागून राहते.
एक सांगतो, हे दोघेही जेव्हा उडून जातील, त्या दिवशी, पाठवणीच्या वेळेस पोरीचे आईबाप रडतात तसे रडणार तुम्ही! ग्यारंटी. (आणि आम्हीही! :( )
3 Dec 2013 - 10:41 am | पैसा
पहिलं पिलू गेलेलं वाचलं तेव्हा जीव कासावीस झाला होता अगदी. :(
11 Dec 2013 - 1:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय....!
3 Dec 2013 - 11:11 am | स्पंदना
एक पाय असाच टक करायची सवय असावी पक्ष्यांना. माझे पक्षीही (चिमुकले आहेत. तुमच्या घुबीजच्या पायाच्या पंजा एव्हढे.) जेंव्हा शांत एकेठिकाणी बसतात तेंव्हा एक पाय असाच टक केलेला असतो. अन एका पायावर बसुन डुलक्या मारतात. (आमची ही कार्टी फार दंगेखोर आहेत. घराचे मालक होउन बसलेत दोघेही,)
3 Dec 2013 - 6:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
एका पायावर उभं राहणं हा दुसर्या पायाला विश्रांती देण्याचा प्रकार आहे की उगीच आपली स्टाईल हे माहीत नाही.
आँ ! तुमाला "पक्षीयोगा" म्हाईत नाय ? ते त्योच करत्यात न्हव? ;)
बाकी ही नविन पिढी आईबापांच्या सततच्या सहवासाविना मस्त वाढतेय हे बघून गार्गार वाटलं !
4 Dec 2013 - 12:38 am | रुस्तम
सुन्दर........
3 Dec 2013 - 6:14 pm | जेपी
पुढचे अपडेट्स नवीन धागा काढुन टाका . किंवा सगळे फोटो आणी व्हिडीयो नवीन धाग्यावर टाका .हे पण फोटु आवडले .
3 Dec 2013 - 6:31 pm | परिंदा
अपडेट देत राहा. प्रत्येकवेळी जरी प्रतिसाद देत नसलो, तरी खुप उत्सुकता आहे पिल्लांविषयी.
4 Dec 2013 - 3:32 am | उपास
गवि किमान २-३ दिवसांतून जे काय असेल ते डकवाच.
मला तर बिका म्हणतायत तसं 'दाटून कंठ येतो..' असं म्हणायची वेळ जवळ आलेय असं वाटतय.. "परक्या परी असा मी, येथे फिरुन येणे! असं गवि सांगतायत...
"घुबडं ओळखतिल काय हो गवि तुम्हाला?, ज्यांनी त्यांच बाळंतपण केलं" असा ही एक चित्रपटात शोभेल असा प्रश्न पडला..
4 Dec 2013 - 11:22 am | परिंदा
आपण तरी आपले(म्हणजे आईचे) बाळंतपण केलेल्या डॉ ला ओळखतो काय? :)
पण आशा आहे की या सुरक्षित जागी ही पिल्लेच नंतर त्यांचे(किंवा जोडीदाराचे) बाळंतपण करायला येतील नंतर.
4 Dec 2013 - 5:54 pm | गणपा
एक दिवस तुमचा 'रिचर्ड पार्कर' उडुन जाईल..... अगदी पाठी वळुन न पहाता.
आणि तुम्ही-आम्ही इवलसं तोंड करुन राहू.
:)
पिल्लांचा हा अंड्यापासुन इथवरचा प्रवास पहायला फार आवडलं गवि.
शतशः धन्यवाद.
4 Dec 2013 - 6:00 pm | प्यारे१
असेच म्हणतो.
रिचर्ड पार्कर. मस्त रे!
'लाईफ ऑफ पाय'वर लिहीलंय का कुणी मिपावर ?
16 Dec 2013 - 2:37 pm | बॅटमॅन
रिचर्ड पार्कर>>>>>>>>>>>>>>प्रचंड सहमत.........
4 Dec 2013 - 8:11 pm | उपास
गवि, घुबड पिल्लाम्चे इथपर्यंत संगोपन केल्यावर, त्यांचे नामकरण आणि टॅगिंग (स्थलांतरित पक्षांचे करतात तसे) करणे शक्य आहे काय?
8 Dec 2013 - 5:56 am | रुस्तम
नवीन फोटोंची वाट पाहत आहोत. जमल तर टाका ना प्लिज...
8 Dec 2013 - 11:31 am | प्रभाकर पेठकर
आता घुबीज मोट्ठी झालेली आहेत. उद्या कदाचित तेच 'गविं'ची छायाचित्रं मिपावर टाकतील. (गवि हलकेच घ्या हो...)
8 Dec 2013 - 1:09 pm | रुस्तम
हेहेहे....
11 Dec 2013 - 10:06 am | गवि
लहान पिल्लूही आता मोठ्याइतकेच मॅच्युअर झाल्यासारखं दिसतंय. उडण्याविषयी काय प्रगती ते मात्र कॅप्चर करणं शक्य झालेलं नाहीये. ही वळचण सोडून ते बाहेर उडाले तर फोटोग्राफीही अवघड आहे. मला वाटतं की दिवसा ते बाहेर पडणं शक्यच नाही कारण आसपासचे पक्षी त्यांना नुसते पाहूनही फारच कल्ला करतात. त्यामुळे तब्येतीत तपशीलवार उड्डाणशिक्षणाचा वर्ग घेण्याचा अवसर दिवसा त्यांना मिळेल असं वाटत नाही. आणि तसेही ते सिरियसली नॉक्टर्नल.. अर्थात पक्के निशाचर असल्याने रात्रीच शिकत असतील उडायला.. (अशी समजूत.)
दिसेनासे झाले की उडून गेले असं समजायचं.
11 Dec 2013 - 10:09 am | प्रभाकर पेठकर
व्वा! लहान्याच्या चेहर्यावरील निरागसता आणि कुतुहूल पाहण्यासारखे आहे.
11 Dec 2013 - 1:06 pm | गणपा
+१
दोघांना पाहुन आनंद झाला.
15 Dec 2013 - 11:20 pm | कानडाऊ योगेशु
टिपिकल जुन्या हिंदी चित्रपटात हिरोचे बालपण एका प्रसंगात संपून त्याच प्रसंगाच्या कंटिन्युअशनमध्ये तो मोठा होतो तेव्हा पब्लिक शिट्ट्या टाळ्या वाजवुन थिएटर पार डोक्यावर घेते. ( जसे छोटेपणीचा हिरो पळत आहे आणि तो पळत असताना कॅमेरा पायांवर आणि अचानक मोठे पाय आणि कॅमेरा थोडा मागे आणि ढँटडढॅण.. खर्या हिरोची एन्ट्री. किंवा छोटेपणीचा हिरो सायकल चालवताना आणि पुढच्या प्रसंगात बाईकवर मोठेपणीचा हिरो( तेव्हा एक गाणेही..) ) तसे काहीसे हे फोटोज पाहताना वाटले आणि ह्या दोन बेट्यांची वर बघतानाचीही पोझ अशी आहे कि च्यामारी येऊत दे ना आता कोणी शत्रु बित्रु.. भिरकवायला आम्ही अगदी रेडी आहोत.... ह्या फोटोजसाठी शिट्ट्या..टाळ्या..पैशाचा खणखणाट... अगदी पैसा वसूल...
16 Dec 2013 - 3:36 pm | बॅटमॅन
हा हा हा एकच नंबर! फुल ब्यांडविड्थ वसूल बगा.
16 Dec 2013 - 3:34 pm | बॅटमॅन
गुबगुबीत मांसल मस्त दिसताहेत दोघेही., जणू गँडाल्फ आणि चांगुलपणीचा सारुमान आकाशाकडे बघत असावेत असे वाटते आहे.
11 Dec 2013 - 10:08 am | जेपी
आवड्ल
11 Dec 2013 - 10:41 am | रुस्तम
झाली एकदाची मोठी... सुन्दर दिसताहेत...
12 Dec 2013 - 9:53 am | मीता
खूपच गोड दिसत आहेत दोघेही
12 Dec 2013 - 4:14 pm | कवितानागेश
कित्ती छान! :)
15 Dec 2013 - 9:43 pm | गवि
15 Dec 2013 - 10:06 pm | पैसा
उडायला एकदम तयार दिसताहेत!!
15 Dec 2013 - 11:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
काय भरभर वाढली जोडी ! आतातर एका पायावर तप करणारी जोडी एकाच उंचीची दिसतेय. अचानक डोळे उघडून भरारी घेतिल असेच दिसताहेत !!
16 Dec 2013 - 12:20 am | प्यारे१
भन्नाटच. बाकी ते १५ डिसेंबर आहे हे लक्षात घेतल्या गेले आहे. ;)
16 Dec 2013 - 1:43 am | प्रभाकर पेठकर
अरे व्वा ! पहिल्या छायाचित्रात कॅमेरा अँगल आणि झूम बदलले आहे ह्याचीही नोंद घेतली आहे.
16 Dec 2013 - 9:38 am | बहुगुणी
२१ ऑक्टोबर ला पहिला लेख आला होता ना? ही सगळी वाढ केवळ जेमतेम दोन महिन्यांची आहे हे खरं वाटत नाही!
16 Dec 2013 - 3:30 pm | कवितानागेश
कित्ती उंच झाली. मागे पाहिलं तेंव्हा एवढीश्शी होती. :)
19 Dec 2013 - 11:06 am | जेपी
जबर्दस्त
19 Dec 2013 - 11:21 am | सुबोध खरे
+ ११११
19 Dec 2013 - 5:08 pm | वैनतेय
गवि मनापासून आभार
23 Dec 2013 - 5:35 pm | गवि
२१ डिसें. - शनिवारपासून मोठं पिल्लू उडायला लागलं आहे. बराच काळ निघूनच गेलं होतं, धाकटं एकटंच राहिलं होतं.
त्यामुळे मोठं कायमचं उडून गेलं असं वाटलं. पण काल (२२ डिसें.) संध्याकाळी पाहिलं तर परत आलं होतं.
सध्या बहुधा उडण्याचा सराव चालू असल्याने विश्रांतीसाठी अधुनमधून परत येतंय असं दिसतं..
समोरच्या बागेत बरीच झाडं आहेत. प्रत्यक्ष उडणारं पिल्लू दिसत नसलं तरी त्या त्या झाडांच्या वर आकाशात भिरभिरत अखंड कावकाव करणार्या कावळ्यांच्या पिलासोबत भटकण्याच्या पॅटर्नवरुन पिल्लू कुठे आहे ते कळतं. उड्डाणाचे फोटो काढण्याची यंत्रणा आणि सुयोग्य परिसर नसल्याने ते करता येणार नाही.
पल्ला वाढला की मात्र पिल्लू परत न येण्यासाठी निघून जाईल. एनी डे नाउ.
आणि मी येते काही दिवस अनुपस्थित असणार. त्यामुळे बहुधा एकदोन आठवड्यांनी दोघेही निघून गेलेले आणि रिकामी झालेली जागाच थेट दिसणार मला बहुधा..
सध्यातरी घुबड आईबाप या उंचीवर पिल्लांना उडायला कसे शिकवणार हा प्रश्न निकालात निघाला आहे. ते त्यांनी व्यवस्थित तर्हेने साध्य केलेलं दिसतं आहे.
23 Dec 2013 - 5:50 pm | पैसा
मस्तच! (कदाचित) आई आणि ५ पिल्लं एवढीजणं गेल्यानंतर निदान एक तरी पिल्लू नीट मोठं झालं! असंच यशस्वीरीत्या जगलं म्हणजे झालं! त्या दोघांनाही शुभेच्छा! आणि तुम्हाला खूप धन्यवाद! सध्या आमच्या समोरच्या बिल्डिंगवर एक घुबड कुटुंब वस्तीला आलं आहे. पॅरापेटवर ३ पिल्लं बसून असतात. विचित्र जागी असल्याने फोटो काढणे शक्य नाही. एका मोठ्या घुबडाच्या पंखाना इजा झाल्याने त्याला लोकांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात दिले. ते त्याला उपचारासाठी बोंडला इथल्या प्राणीसंग्रहालयात घेऊन गेले. हे घुबड लोक रात्री बराच आवाज करत असले तरी अजूनतरी त्यांना हाकलावं वगैरे कोणी सोसायटीतले लोक म्हणत नाहीयेत नशीब!!
24 Dec 2013 - 10:56 am | सौंदाळा
जानेवारीत मस्त गविटच प्रवासवर्णन्+खाद्ययात्रा वाचायला मिळणार बहुतेक.
घुबडांची प्रगती वाचुन आनंद झालाय आणि आता लवकरच तुमचे अपडेट्स बंद होणार म्हणुन हुरहुर पण वाटतेय
24 Dec 2013 - 11:04 am | डॉ सुहास म्हात्रे
अरे व्वा ! एक पिलू पूर्णपणे सक्षम झालं. आता दुसर्याला हक्काचा दादा असल्याने तेही लवकरच उडू लागेल, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे ! :) मात्र त्यांच्या वाढण्याचे सचित्र अपडेट्स बंद होतील ही हुरहुर लागलीय :(
24 Dec 2013 - 12:10 pm | मी_आहे_ना
असेच म्हणतो. ह्या दोघांनाही शुभेच्छा!!!
24 Dec 2013 - 12:26 pm | प्रभाकर पेठकर
या घुबडांनो परत फिराSS घराSSकडे आपुल्याSSSSSS!
लळा लावला होता हो पोरांनी.......
दोघांमधील एक जरी घुबडीण असेल तर, लग्ना नंतर माहेरपणाला येईलच, असा विश्वास बाळगुया.
10 Jan 2014 - 11:11 am | गवि
दॅट्स इट..!!
10 Jan 2014 - 10:40 pm | एस
हूरहूर आहेच, पण त्यापेक्षा महत्त्वाचे हे दोन जीव जगले, मोठे झाले आणि तेही आपल्या डोळ्यांदेखत. पिल्ले मोठी होऊन उडून जाणार असतातच. पण त्यांचा तो तिथपर्यंतचा प्रवास पाहण्यात काय सुख असते याची एक प्रचिती ह्या धाग्यानिमित्त आली. आनंद वाटला. कालच सॅन्क्च्युअरी एशियाने एक फोटो अपलोड केला आहे त्यांच्या चेपु पेजवर. त्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियन सरकारने शार्क माशांच्या हल्ल्यांपासून समुद्रात पोहणार्यांना वाचवण्यासाठी सरळसरळ शार्कची कत्तल 'कलिंग' या नावाखाली सुरू केली आहे अशी बातमी आहे. फोटोत एका शार्कच्या तोंडात साखळदंड अडकवून त्याला ओढत नेत आहेत असे विदारक चित्रण आहे. सॅन्क्च्युअरीने या सगळ्याला 'वर्ल्डस् मोस्ट डेंजरस अॅनिमल होमो सेपिअन' अशी उपमा दिली आहे. या पार्श्वभूमीवर आपला हा लेख फारच भावला आणि याच होमो सेपिअन्समध्ये निदान थोडेतरी खरोखरच 'सेपिअन' आहेत याची खात्री पुन्हा एकदा पटली.
अवांतर - डॉ. गिरीश जठार हे घुबडांचे संशोधक आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून ह्या धाग्याची माहिती देतो. आणि मिपावर ह्या लेखाची दखल नक्कीच घेतली गेली पाहिजे अशी संमंला नम्र विनंती.
10 Jan 2014 - 11:17 am | मदनबाण
किती लवकर झाला हा सगळा प्रवास ! तुमच्या या सर्व कामगिरीला आपला सलाम... :)
10 Jan 2014 - 4:04 pm | मी_आहे_ना
अगदी असेच म्हणतो
10 Jan 2014 - 4:21 pm | शिद
11 Jan 2014 - 9:01 pm | रुस्तम
मी नेहमी "पु भा प्र" विचारायचो. आता नाही विचारता येणार… :(
14 Jan 2014 - 11:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
10 Jan 2014 - 2:14 pm | मुक्त विहारि
आणि
दंडवत.
10 Jan 2014 - 4:18 pm | सन्दीप
शिट्ट्या..टाळ्या.
10 Jan 2014 - 5:07 pm | पैसा
रिकामं घरटं...
10 Jan 2014 - 10:41 pm | एस
:(
11 Jan 2014 - 11:14 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
11 Jan 2014 - 9:29 pm | खेडूत
धन्यवाद गवि !
एक उत्तम विषय, ताजे अपडेट्स आणि सतत उत्कंठा वाढवून ठेवणारा धागा!
मजा आली.
13 Jan 2014 - 11:40 am | झकासराव
उत्तम फोटो डोक्युमेन्टरी, त्यात गविंचे समालोचन. :)
गवि, पब्लिश कराच...
25 Oct 2014 - 11:29 am | गवि
दिवाळी आली अन घुबडबाई परत आल्या आहेत.
संसार थाटलाय परत..
करिता माहितीस्तव..
घुबडाई परत आलीय की तिचे बाळ मोठे होऊन बाळन्तपणाला आलेय ते शोधावे लागेल.
25 Oct 2014 - 11:33 am | पैसा
छान वाटलं! दिवाळीची भेटच की आम्हाला सगळ्यांना!
25 Oct 2014 - 12:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
लै भारी ! आता अजून एक नवी थरारक कथा सुरू झाली !!
26 Oct 2014 - 7:43 pm | सूड
पुन्हा बघून बरं वाटलं !!
25 Oct 2014 - 12:59 pm | कानडाऊ योगेशु
सुरवातीच्या लेखात घुबडाबद्दलच्या आख्यायिकेलाच फाट्यावर मारले आहे तरी हे लिहिण्याचा मोह आवरत नाही म्हणुन हे लिहितोय.
घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे त्यामुळे दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घुबड दिसणे हा शुभशकुन मानला जातो.
इथे तर ते चक्क तुमच्या घरीच आले आहे आणि ते ही दिवाळीत आणि ते ही हक्काने!
गवि तुम्ही भाग्यवान आहात!