मला नाना पाटेकरचा एक जुना हिंदी चित्रपट आठवतो दूरदर्शनवर बघितलेला. रविवारी दुपारी चुकून हिंदीच लावला होता.
नाना एका हवेलीमध्ये रहात असतो. जुना संस्थानिक वगैरे काही. वैतागलेला, चिडलेला असा नेहमीचाच. मरतो काही कारणानं. मेल्यानंतर त्याचा आत्मा तिथं राहून येणारांना पळवून लावत असतो. भंडावून सोडून, घाबरवून, चिडचिड करुन.
एक कुटुंब येतं तिथं. मुलं आणि आईवडील. नाना सातत्यानं चिरडीला येऊन ह्यांना पळवून लावण्याच्या प्रयत्नात. कधी नुसतं शरीर तर कधी नुसतं डोकं दाखवून वगैरे. पण त्या कुटूंबातली एक चिमुरडी धीट असते, अजिबात न घाबरणारी.
ती त्याला महाराज वगैरे म्हणायला लागते. का चिडचिड करतोस म्हणे.
हा म्हणे मी चिडचिड केली नाही, माझा अहं सोडून दिला तर माझं अस्तित्व संपेल.
ती म्हणते मी कधी कुणावर चिडत नाही, कुणावर आवाज चढवून बोलत नाही, अकारण वाद घालत नाही... मग मी नाही???? आहे ना? मग? कुणासाठी स्वतःला प्रूव्ह करायचं? काय गरज आहे स्वतःचं अस्तित्व सातत्यानं दाखवून द्यायची? ह्या विश्वामध्ये अगदी मुंगीपासून सगळ्यांनाच आपापलं अस्तित्व आहे आणि स्वतःसाठी दुसर्याची रेघ कमी करण्याची काही एक गरज नाही. असं बरं काही ऐकून नानाचा आत्मा आपली तडफड थांबवून शांतपणं आपला सूडाचा विचार सोडून देऊन चिरनिद्रा घेतो.
हल्ली मिपावर वाचताना सातत्यानं आपण ह्या राणासारखं तर करत नाही ना हा विचार प्रकर्षानं वर आला. चित्रपटातलं बाकी काहीच आठवत नाही. य वर्षं झाली बघून. थोडा शोध घेतल्यानंतर विकीपिडीया वर http://en.wikipedia.org/wiki/Abhay_%28The_Fearless%29 हे सापडलं. ते वाचून तार जुळली नि नंतर शीर्षक टंकलं.
(ज्याला मी वर महाराज म्हणत होतो तो खरा राजस्थानी राणा आहे असं वरच्या लिंकमध्ये वाचताना समजलं)
जर कुणाला हा चित्रपट आंतरजालावर सापडला तर कॄपया त्याचा शोध घेऊन बघावा. म्हणायला बालचित्रपट आहे. पण आयुष्यं गेली लोकांची तरी एका बालचित्रपटातला बोध आपल्याला सापडत नाही. अर्थात ह्याचंच कशाला लहानपणी दुसर्याची गोष्ट चोरू नका, खोटं बोलू नका, बाहेरचं काही अचकट विचकट घरात आणू नका ह्या अत्यंत मूलभूत शिकवणुकीचा विचार तरी आपण क रतो का हे ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला बघावं लागेल.
असाच एक विचार डोक्यात आला, रिलेट झाला नि आपल्यासमोर मांडला.
डिस्क्लेमरची फार काही गरज न वाटल्यानं टाकला नाही. वाचक सूज्ञ आहेत.
बाकी जोर से बोलो म्हटलात तर उत्तर असेल || जय माता दी||
प्रतिक्रिया
15 Oct 2014 - 4:27 am | स्पंदना
बराच चांगला चित्रपट आहे.
चिद चिड करु नये, जीवाचा चडफदाट करु नये.
आन म्या पयली. यीप्पिई *dance4*
15 Oct 2014 - 8:30 am | विजय१९८१
मि बघितलाय तो सिनेमा......आवडला छान आहे.
15 Oct 2014 - 8:47 am | विजय१९८१
अणि अजुन एक बाल चित्रपट आठ्वला त्यात एका मुलिला एक गोड्स कुत्र्याच पिलु रस्त्यावर सापड्ते ति आणि तिचे मित्र मालकाचा शोध घेते. शेवटि मालक न सपड्ल्यामुळे ठरते कि पिलु तिच्याकडे ठेवावे आणि तिचा त्या पिलावर जिव जड्तो सगळ मस्त चालु अस्ते. एक दिवशि अचानक एक mentaly handicap मुलाचे आई वडिल ते पिलु मगायला येतात.........काय मस्त सिनेमा आहे. मुलिचे खोट बोलने कि कुत्रा तिच्याकडे नाहिये मग असा विचार करुन कि आपल्याल खेळायला मित्र-मैत्रिणि आहेत पण त्या मुलाला फक्त ते पिलु आणि ते पिलु परत करणे...एकदा बघावाच असा सिनेमा.
15 Oct 2014 - 8:50 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
नाव आठवलं तर व्य.नि. करा.
15 Oct 2014 - 3:25 pm | हाडक्या
त्या चित्रपटाचं नाव 'halo' होतं असं स्मरतंय.. :)
15 Oct 2014 - 3:44 pm | चिगो
"हॅलो"च.. मला आठवत असेल बरोबर, तर ती छोटी जाता जाता त्या मुलाला सांगते, "उसका नाम हॅलो हैं".. लै म्हंजे लैच हृद्यस्पर्शी आहे क्लायमॅक्स..
15 Oct 2014 - 3:54 pm | प्यारे१
वर शीर्षकामध्ये लिहीलेलं आहे प्रतिसादकानं. आपण शीर्षक बघायला विसरतो बर्याचदा. ;)
15 Oct 2014 - 3:55 pm | हाडक्या
आमच्या बालपणाच्या मस्त आठवणी आहेत हे चित्रपट.. बर्याच लोकाना लक्षात असलेले पाहून छान वाटले.
आज काल असे बाल-चित्रपट बनतात की नाही काय माहीत.
15 Oct 2014 - 8:20 pm | एस
'हॅलो' पाहिलाय. खूप छान चित्रपट होता. विशेषतः शेवट.
15 Oct 2014 - 9:13 am | सतिश गावडे
छोटेखानी चित्रपट परिचय आवडला. चित्रपट शोधून नक्की पाहीन.
मात्र ज्या हेतूने चित्रपटाची ओळख करुन दिली आहे त्या हेतूशी असहमत. ज्यांना अशी दोन ओळींची सुवचने भानावर आणतील ते मुळात असे बेभान वर्तन करणारच नाहीत.
काही वेळा होतं काय, माणसाच्या काही अंतर्गत (उदा. जनुके, मेंदूतील रासायनिक स्त्रावांचा असमतोल किंवा इतर रचनीय बिघाड) अथवा बाह्य (उदा. घरातील किंवा घराबाहेरील एकंदर परिस्थीती) यामुळे त्या माणसाच्या विचारांची तसेच वर्तनाची एक ठराविक अशी चाकोरी ठरुन जाते. भले मग ही चाकोरी तत्कालिन समाजमान्य संकेतांविरुद्ध असली तरी त्या व्यक्तीला आपली चाकोरीच एकमेव योग्य मार्ग वाटते. अशा व्यक्तींना काही समजावून सांगणे हे दगडावर डोके आपटण्यासारखे असते. आपले डोके फुटून आपण रक्तबंबाळ होतो. दगडाला काहीच होत नाही.
अशा व्यक्तींशी वागायचं कसं?
१. कुटुंबात अशी व्यक्ती असल्या तज्ञांचा सल्ला घ्यावा. या कौटुंबिक समस्येला जनरिक सोल्युशन नाही. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंबाची गोष्ट वेगळी असते. त्यामुळे तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन यावर मार्ग शोधावा.
इथे मला तज्ञ म्हणजे अशा मानसिक समस्या या क्षेत्रात काम करणारे लोक अपेक्षित आहेत. उदा. समुपदेशक, मानसोपचारतज्ञ.
२. अशी व्यक्ती नोकरीच्या ठीकाणी आपल्यापेक्षा वरच्या अधिकार पदावर असल्यास शक्यतो नोकरी बदलावी. लढा वगैरे देण्यात आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नये. अशी व्यक्ती तुम्हाला पुरुन उरेल.
३. समाजात इतरत्र वावरतानाही आपली अशा व्यक्तींशी गाठ पडण्याची शक्यता असते. मात्र जोपर्यंत अशा व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारची शारिरीक इजा होण्याचा धोका नाही तोपर्यंत अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करणे हा सर्वोत्तम उपाय असतो. शारिरीक इजा होण्याचा धोका जाणवल्यास योग्य ती पावले उचलावीच.
जाता जाता, उपदेशांचे डोस पाजून अशा प्रवृतींना निर्बंध घालता येत नाहीत. अशा व्यक्ती उपदेश स्विकारण्याच्या अवस्थेच्या पलिकडे असतात. किंबहूना अशा उपदेशाचा नकारात्मक परिणाम होतो. लोकांनी केलेल्या टिकेमुळे अशा व्यक्तींचा "हे सारे माझ्या ज्ञानावर, माझ्या प्रतिभेवर, माझ्या प्रज्ञेवर जळतात. या टिका करणार्या लोकांकडे माझ्याईतके ज्ञान, प्रतिभा, प्रज्ञा नसल्यामुळे ते मला खाली त्यांच्या पातळीवर खेचण्याचा प्रयत्न करत आहेत." हा समज अधिकाधिक दृढ होत जातो.
अधिक काय लिहिणे. तुम्ही सुज्ञ आहात. :)
15 Oct 2014 - 9:44 am | पैसा
प्रतिसाद आवडला. तुझ्या पूर्वावतारात तुझ्या रूममेटबद्दल लिहिलं होतंस त्याची आठवण झाली. पण तेव्हाही त्या लेखाचे विपरित अर्थ काढले गेले होतेच. चलता है!
15 Oct 2014 - 11:52 am | स्वामी संकेतानंद
सहमत.. बिल्कुल सही बोल्यो रे भायो
15 Oct 2014 - 9:36 am | अजया
एकदा मी मळ्यात गेले होते .तिथे एका बोगद्यात जाऊन अडकले.बोगद्यात बालचित्रपट चालु होता.दिग्दर्शक प्यारेकाका होते.त्यांनी त्यात बोध सांगीतला.मी तो ऐकला .तेव्हापासुन मी कोणाला कमी लेखत नाही,नावे ठेवत नाही,दुसर्यांचे न्युनगंड,अल्पबुध्दी काढत नाही.धन्याकाकांचे वाचुन मानसोपचारतज्ञाकडे जाईन.नोकरी सोडीन.
आणि हो,मी पण सुज्ञ होणार!!!!
15 Oct 2014 - 9:41 am | पैसा
आमच्यासारख्या अतिकोमल मनाच्या माणसांनी काय करावे मग! संन्यासच घ्यायला पाहिजे आता.
(ए, कोण रे तो म्हणतोय? तुम्ही माणसं आहात का म्हणून?)
15 Oct 2014 - 2:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
+D
पण काही असो, नुकत्याच येउन गेलेल्या अनेक सकस धाग्यांवरील तितक्याच सुपीक विचारमंथनामुळे मिपाकरांचा कल्पनाविलास आणि त्याला शब्दांत उतरावण्याचे लेखनकौशल्य प्रचंड प्रगल्भ झालेले आहे, इतके बोलून मी आपली रजा घेतो ! ;) :)
15 Oct 2014 - 3:54 pm | अत्रुप्त आत्मा
@मी पण सुज्ञ होणार!!!! >>> =))
15 Oct 2014 - 9:42 am | पैसा
ह.भ.प. प्यारेबुवा, __/\__
15 Oct 2014 - 11:54 am | स्वामी संकेतानंद
चित्रपट मिळवून बघावा म्हणतोय.
15 Oct 2014 - 11:57 am | पैसा
ही श्टुरी भूतनाथला जवळची वाटतेय, आधीचा कुठचा?
15 Oct 2014 - 2:09 pm | प्यारे१
अभय १९९४ चा आहे असं वरील दुव्यावरुन आणि विकी वरुन समजलं. भूतनाथ नंतरचा आहे.
बाकी धन्याचा प्रतिसाद आवडला.
15 Oct 2014 - 2:53 pm | मुक्त विहारि
ह्या जगांत अफात माणसे आणि बेफाट प्रव्रुत्ती.
चालायचेच.
15 Oct 2014 - 3:47 pm | टवाळ कार्टा
मस्ट प्रटिसाद ;)