आज मी माझ्या एका सहकार्याशी ( तसा तो सिंधी आहे आणि गुजरात मध्ये पूर्वी नौकरी करीत असे) रेल्वे भरती कशी होते याबद्दल चर्चा करत होतो. त्या माहितीच्या आधारे हा लेख लिहित आहे.
माझे समज ( याबद्दलच्या माहिती फक्त काही प्रांतातच येतात, त्या प्रांताच्या लोकांना वेगळी अशी वागणुक / सवलत मिळते, नेहमीप्रमाणे मराठी लोकाना डावलले जाते, अश्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रात कधीच येत नाही, रेल्वे ही काय एका विशिष्ठ प्रातांचीच मक्तेदारी आहे काय? इत्यादी इत्यादी मी मुद्दे मांडले.)
त्यावर त्याचे उत्तर मी मराठीत देत आहे -> अश्या परिक्षा देशातल्या वेगवेगळ्या भागात होत असतात. अश्या परीक्षाची माहिती काही रेल्वेने अधिकृत केलेल्या वर्तमानपत्रातच येत असते. किंबहुना त्या बिहारच्या वर्तमानपत्रातही येत नाही. मुख्य म्हणजे याबद्दलची साद्यंत माहिती एम्पॉलमेंट न्युज मध्येच येत असते. याबद्दल हे मुले अतिशय जागृत असतात आणि वर्षभर फक्त त्याचीच तयारी करत असतात. समजा या स्पर्धात्मक परीक्षेत त्यांना यश आले नाही तर ते दुसर्यावर्षीही त्याचीच तयारी करत असतात. इतर प्रांताच्या मुलांना त्यात गुजरातीही आले अथवा मराठीही आले अशी माहिती नसते, गम्यही नसते आणि स्वारस्यही नसते. वर्षानुवर्ष ही वहिवाट चालू आहे आणि राजकारणामूळेच याबद्दल चे प्रबोधन चालू आहे. जसे काही प्रांत लष्करी सेवेसाठी प्रसिद्ध आहेत तसेच बिहार मध्ये काही गाव / शहरे ही फक्त रेल्वेच्या नौकरीसाठीच आहे. रेल्वेमध्ये नौकरी नसेल तर त्यांची लग्नेही जमत नाही.
माझी आता कळकळीची विनंती :
(संपादक मंडळ : कृपया हा मजकुर कमीत कमी दोन दिवस तरी काढु नये.)
माझ्या सहकार्याने दिलेली ही माहिती खरी आहे का? दुसरे असे जर असेल तर कोणी रोजगार बातमीवर लक्ष ठेवु शकेल का? म्हणजे आपण मराठी माणसापर्यंत ही वार्ता नेऊ शकतो. तिसरे या परीक्षेसाठी काय तयारी करावी लागते. म्हणजे आपण ती मराठी मुलांकडून करुन घेऊ शकतो.
तात्याने सांगितल्याप्रमाणे कृपया प्रक्षोभक अशी भाषा वापरु नये. लोकशिक्षण हेच सर्व सामाजिक समस्याचे समाधान आहे. मिपा आपण विरंगुळा म्हणून वापरतो आज एक पाऊल पूढे टाकु या.
कोणाला माझ्या या लेखामध्ये अप्रिय वाटते असेल तर व्यनि / खरडमध्ये माझी वाटेल तितकी निंदा / नालस्ती करु शकता. फक्त येथे ते प्रदर्शित करु नका. अन्यथा सर्वच लेख उडवला जाऊ शकतो.
प्रतिक्रिया
22 Oct 2008 - 8:38 pm | कोलबेर
सकाळ मधील ह्या बातमी मध्ये रेल्वे बोर्डाने मुंबई आणि नागपुर मधुन दोन प्रसिद्ध मराठी वर्तमानपत्रात जाहिरात दिल्याचे समजते.
सहमत!
22 Oct 2008 - 8:46 pm | कलंत्री
लेखाचा सारांश ५४४ जागा आणि ७५००० उमेदवार.
भारताची खरी समस्या हीच आहे.
माझ्या एका मित्राने स्वताचा व्यवसाय सुरु केला होता. त्याच्या वडिलांच्या आजोबापासून त्याच्यापर्यंत सर्वच जण रेल्वेत नौकरी करीत होते ( ४ पीढी). त्याला मात्र रेल्वेची नौकरी आवडत नव्हती. जेंव्हा त्याने नौकरी सोडुन व्यवसाय करण्याचा मनोदय व्यक्त केला तेंव्हा घरात हाहाकार झाला. ( स्मृतीरंजन)
22 Oct 2008 - 9:04 pm | कोलबेर
सारांशाशी सहमत आहे..
ह्या तुमच्या प्रश्नावर वाचीव माहिती पुरवली इतकेच
22 Oct 2008 - 9:00 pm | लिखाळ
स्पर्धा परिक्षात भाग घेण्याचा ओढा आपल्याकडे थोडा कमीच दिसतो हे खरे असले तरी अनेकानेक मुले या ना त्या वेळी स्पर्धा परिक्षेसाठी उत्सुक असतात. म्हणजे एकदम आय ए एस सारख्या नव्हेत पण नेट-सेट सारख्या परिक्षा, बँक आणि इतर क्षेत्रातल्या परिक्षा, बहुधा आय आय टी च्या परिक्षा, वगैरे. तर एंप्लॉयमेंट न्युज हे वृत्तपत्र आठवड्यातून एकदा जेव्हा बाजारात येते तेव्हा भराभर खपते.
पण तरी हे मान्यच आहे की मराठी मुले या परिक्षा द्यायला कमीच उत्सुक असतात.
--लिखाळ.
22 Oct 2008 - 9:10 pm | प्रभाकर पेठकर
१९७०-७१ पर्यंत मराठी पेपरात (लोकसत्ता) रेल्वेच्या जाहिराती येत. अशी जाहिरात पाहूनच 'असिस्टंट स्टेशनमास्तर' जागे साठी अर्ज आणि परीक्षा दिली होती. (बालमोहन की कुठल्याशा शाळेत घेतली होती). वडिलांच्या आग्रहाने गेलो होतो. मलाही रेल्वेत स्वारस्य नव्हते. पुढे रेल्वे खात्याकडून काहीच टपाल आले नाही. मी समजलो काय ते.
पुढच्याच वर्षी माझा एक मराठी मित्र वरील प्रकारची परिक्षा पास होऊन रेल्वेत 'असिस्टंट स्टेशनमास्तर' पदावर नोकरीस लागला.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
23 Oct 2008 - 12:12 pm | चटोरी वैशू
हो हे असेच आहे.... मराठी माणूस बाहेरच्या प्रातांत नोकरी साठी (ते ही सरकारी नोकरी )जाण्यास तयार नसतो... त्यांना सगळे इथल्या इथे हवे असते.... आइ टी क्षेत्रा तले तेवढे ... बैगलोर, हैद्रबाद, गुरगांव, चैनई , दिल्ली, कलकत्ता अशा मोजक्या ठीकाणी जाणे पसंत करतात.... पण परप्रांतीय हे भारताच्या कुठल्याहि कोपर्यात जाण्यास तयार असतात ...म्हणून आज अशी परिस्थिती आहे कि आपल्या महाराष्ट्रात सरकारी असो कि खासगी नोकरी असो .... बाकि लोकांचे वर्चस्व जास्त आहे... जर आपण प्रयत्न नाही करत तर बाकी लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही.... आणि राजकरणी मंडळी ह्याचा फायदा घेतात.... मग जाळपोळ ...दंगे.... नुकसान कुणाचे जनतेचे.... त्यापेक्षा आपण जाग्रुत राहून .... सगळी कडे जाण्याची तयारी ठेवावी... दाखवुन द्यायचे सगळ्यांना.....
इथे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफि असावी.... पण मला जे वाटले ते मे व्यक्त केले....
23 Oct 2008 - 1:05 pm | कुंदन
>>याबद्दल हे मुले अतिशय जागृत असतात आणि वर्षभर फक्त त्याचीच तयारी करत असतात. समजा या स्पर्धात्मक परीक्षेत त्यांना यश आले नाही तर ते दुसर्यावर्षीही त्याचीच तयारी करत असतात.
सहमत , एक उदा .
मी पुर्वी अधुन मधुन ज्या टपरी वर पान घायचो , त्या भैया चा तरुण बेरोजगार मुलगा ( भैया मुलुख ला गेल्यावर ) टपरी वर बसुन पान बनवता बनवता मिळणार्या मोकळ्या वेळात या परिक्षा साठी अभ्यास करताना मी पाहिलाय.
अवांतर : एम्पॉलमेंट न्युज इथे वाचा http://www.employmentnews.gov.in/
23 Oct 2008 - 1:16 pm | मराठी_माणूस
त्यांना सगळे इथल्या इथे हवे असते
ही तर मानवी प्रवृत्ती आहे. नाईलाजच झाला तरच स्थलांतर होते. ज्या ज्या प्रांतातुन लोक इथे आले तीथे रोजगार नाही आणि हे कित्तेक वर्षा पासुन चालु आहे म्हणुन त्यांच्या साठी पर प्रांतात जाणे हे काहे विशेष नाही, त्यांची तशी मानसीक तयारी झालेली असते.
आताची काही वर्षे सोडली तर मराठी माणूस रोजगारा साठी बाहेर जाणे सर्रास नव्हते. त्या मुळे मानसीकता पण तशीच होती. आपण आपल्या साठी इथेच रोजगार निर्माण केला हा दोष आहे का गुण.
10 Dec 2013 - 1:46 am | देव मासा
रेल्वे भर्ति प्रक्रिया फार लांबलचक चालते, कमित कमि ५ वर्ष, मग एक पद आसो किंवा शंभर,फेब २०१० मधे सुरु ज्हालेलि टीसी/लिपिक भर्ति प्रक्रिया आजुन सुरु आहे, आताशि प्राथमिक लेखि परिक्षा झालि , त्याचे निकाल अजुन जाहिर झाले नाहि, आजुन ३ वर्ष, संपुण प्रक्रिया संपायला लागेल, तोपर्यन्त २२ वर्षचा उमेदवार ३० वर्षचा होईल, तेव्हा त्यचि शारिरीक चाचणी होईल २०१०च्या जाहिरातिचे निकष लाउन......ररबि मुंबईचे संकेत स्थ्ळ पहा, तिथे लोक आजुन २००७ सालि झालेल्या परिक्षाचे निकालाचि वाट पहात आहेत, रेल्वे्च्या लेखि परिक्षा फार कठिण आसतात,तुब- नाळी वर रवि हांडाचे काहि विडीओ ऊपयोगि येऊ शकतात.
10 Dec 2013 - 7:17 am | लॉरी टांगटूंगकर
इतक डीफेन्सीव होउ नका, काहीही चुकीचं लिहीत नाहीये तुम्ही.
रेल्वेची कोणतीतरी एक परिक्षा गेल्या रविवारीच झाली. एका मित्राचा चेपु अपडेट होता. रेल्वेचं एक संपूर्ण फुल टाइम इंजिनिअरिंग कोर्स देणारं कॉलेज पण आहे.
बहुदा हे असावं.
www.irimee.indianrailways.gov.in