एका प्रवासवर्णनामध्ये या खेळांचा उल्लेख केला, तेव्हा एका प्रतिसादामध्ये अधिक माहितीविषयी विचारणा केली होती, त्यासाठी हा लेख. संदर्भासाठी साठवणीतीलच छायाचित्रे वापरली आहेत.
समुद्रात लाटेवर स्वार होऊन केले जाणारे सर्फिंग्, बर्फात केले जाणारे स्किईंग् आणि रस्त्यावरचे स्केटबोर्डिंग् यांचे एकत्रित रूप म्हणजे बोर्डिंग् गेम्स होय. स्किईंग न येणा-यांसाठी स्लेडिंग् नावाचा खेळ बराच लोकप्रिय होता. एका सपाट फ़ळीवर बसून बर्फ़ावरून घसरत जायचे असा स्लेडिंग् किंवा स्लेईंग प्रकार खेळ म्हणून, तसेच काही ठिकाणी वहातुकीचे साधन म्हणून वापरले जाते. वरील सर्फिंग आणि स्कटेबोर्डिंग् खेळांतून एकाच बोर्ड् वर दोन्ही पाय ठेवण्याची पद्धत, आणि स्किईंग खेळातून बर्फातील उपयुक्तता व आधीच उपलब्ध असलेल्या रिसॉर्ट्/लिफ्ट आदि सुविधा असे उसने घेऊन 60 च्या दशकात या खेळाला सुरुवात झाली. लवकरच पुढे वाळूमध्येही त्या खेळाची थोडाफ़ार फ़रक करून लोकप्रियता वाढली. या 'साहसी खेळांविषयी' थोडे...
स्नोबोर्डिंगः
स्नो बोर्डिंग मध्ये बोर्ड व बूट्स् ही अत्यावश्यक सामग्री आहे. त्याशिवाय हेल्मेट्, नी-एल्बो कॅप्स्, हे स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यकतेप्रमाणे वापरायची साधने. बोर्ड् हा अर्धा सेमि जाडीचा व दोन्ही टोकांना थोडा वळवलेला, शक्यतो फायबरचा बनवलेला असतो. बोर्ड् उभा केल्यास आपल्या नाकापर्य़ंत किंवा खांद्यापर्यंत उंचीचा निवडावा, म्हणजे ताबा अधिक चांगल्या प्रकारे रहातो. खूप लांब बोर्ड वळताना त्रास देतो, तर खूप लहान बोर्ड मुळे वेग खूप अधिक वाढतो त्यामुळे ताबा ठेवणे कठिण जाते. बूट्स् आपापल्या पावलाप्रमाणे मिळतात. बोर्डवर बूट् घट्ट बसवण्यासाठी खाचा व पट्टे असतात. दोन्ही गोष्टी खास याच खेळासाठी बनवलेल्या असल्याने रीसॉर्ट् मध्ये भाड्याने मिळतात. एक पाय बोर्ड्वर अडकवून एक पाय चालण्यासाठी मोकळा ठेवतात.
सर्व साहित्य घेतल्यानंतर लिफ़्ट् - खुले पाळणे आपल्याला हव्या त्या दिशेत वर घेउन जातात आणि मग आपण दुसराही पाय बोर्ड्वर बांधून घसरत खाली यायचे. वेगावर नियंत्रण राहण्यासाठी, तसेच अधिक कौशल्यपूर्ण खेळासाठी नागमोडी वळणे घेत क्रीडापटू खाली येतात.
यात बर्फाचा उतारांचे चार प्रकार असतात. ग्रीन् सर्कल हिरवा उतार हा नवशिक्यांसाठी, ब्लू स्क्वेअर निळा उतार हा मध्यमकौशल्य उतार, ब्लक् डायमंड् हा प्रगत क्रीडापटूंसाठी आणि डबल ब्लक् डायमंड् पारंगतांसाठी. चित्रांवरून अधिक ओळख होईलच, तर अशी ही स्नोबोर्डिंगची तोंडओळख.
सॅन्डबोर्डिंगः
स्नोबोर्डिंगप्रमाणेच यासाठीही बोर्ड् व बूट् ही किमान आवश्यक सामग्री. यात बोर्ड्वर वाळू चिकटू नये म्हणून मेण घासतात. या खेळात वाळूवर वेग घेणे थोडे कठिण असल्याने बोर्ड थोडा लहान घेतला तरी चालतो. या खेळात लिफ़्ट् ऐवजी ड्यून बग्गी आपल्याला चढावर घेऊन जाते. आणि मग घसरत खाली यायचे. पण तुलनेत वाळूवर खरचटण-या इजा जास्त होतात, तर बर्फात मुका मार जास्त लागतो. बर्फाचे उतार हे अधिक लांब असतात तर वाळूचे लहान. आणि वाळूचे खेळ हे थंड वाळवंटातच खेळू शकतो किंवा वाळू थंड झाल्यावर, त्यामुळे आशियाई देशांतील उष्ण वाळवंटांमध्ये यांची लोकप्रियता तुलनेत कमी आहे.
स्नोबोर्डिंगः
बोर्ड,बूट व माउंटिंग:
सिध्द्ध:
लिफ़्ट्
खेळताना:
माझा बोर्ड - विरुद्ध बाजू
सॅन्डबोर्डिंगः
बोर्ड,बूट व माउंटिंग:
सिध्द्ध:
ड्यून बग्गी:
प्रतिक्रिया
16 Aug 2014 - 7:00 pm | कंजूस
चांगली माहिती .चांगला खेळ .इकडे दुर्लक्ष का करतात मुलं ?
16 Aug 2014 - 11:24 pm | एस
मस्तच माहिती. सी सर्फिंगवर कृपया अजून माहिती येऊ द्यात.
16 Aug 2014 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा
शेवटाचा फोटू अवडला.
17 Aug 2014 - 3:42 am | खटपट्या
मस्त !!
हिवाळ्यात खेळून बघायला पाहिजे !!!