गोफ - २

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
15 Dec 2007 - 3:48 am

भाग -१ ला ५० प्रतिसाद झाले आहेत. आता नव्या चारोळ्या पान-क्र्.२ वर जाऊ नयेत व सगळ्या चारोळ्यांचा एकत्रीत आस्वाद घेता यावा म्हणून पुढिल चारोळ्या इथे लिहाव्यात

तेथील शेवटची चारोळी
श्रीपाद, वल्लभ, दत्त, दिगंबर
विरु, बसंती, जय नि गब्बर !
आपण आठ मिळूनी टाकू
मेंढिकोटचा डाव जब्बर! ;)))

हं चालू दे पुढे.. हर हर....

चारोळ्याप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

15 Dec 2007 - 3:53 am | मुक्तसुनीत

हर हर बोला हर हर बोला
बोला अमृत बोला
या दुनिये मध्ये थांबायाला
वेळ कोणाला ?

धनंजय's picture

15 Dec 2007 - 4:38 am | धनंजय

देवगिरीला गरजत होती
कोटावरची मेंढा तोफ
तरी किल्ला गारद झाला
नियती विणते मुश्किल गोफ

(चारोळी हा प्रकार मला अजून समजलेला नाही, गोखल्यांच्या बहुतेक रचना मला आवडलेल्या नाहीत :-( तरी या वाटेला मी बहुधा जात नाही... मागे एकदा चार लिहिल्या होत्या तितक्याच...)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Dec 2007 - 8:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॊ. धनंजय
फारच सुंदर चारही ओळी ! (चारोळी)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश's picture

15 Dec 2007 - 5:13 am | ऋषिकेश

वरवर कोरड्या वाटणार्‍या नारळात
थंड मधूर पाणी असतं
मृगजळ का असेना, अहो
वाळवंटातही पाणी असतं

शलाका पेंडसे's picture

15 Dec 2007 - 10:30 am | शलाका पेंडसे

छानच चारोळी.

प्रमोद देव's picture

15 Dec 2007 - 9:40 am | प्रमोद देव

ऋषिकेशराव गोफ बाकी मस्त विणलाय तुम्ही आणि इथल्या समस्त कवींनी.
मस्त आहे हा खेळ. चालू द्या.

सहज's picture

15 Dec 2007 - 9:55 am | सहज

आहे तर खरच आहे काय?
नाही तर खरच नाही काय?
पंचायत समीती आहे काय?
नाहीतर पंचाईत झालीय काय?

सर्किट's picture

15 Dec 2007 - 10:34 am | सर्किट (not verified)

आम्ची पंचाईत झाली अशी
इथली पंचायत गेली तशी
आहे आमचा क्रमांक चार
पण कोण करतो आमचा विचार ?

आमच्या नावावर येते लिहून
ते असेल कुणाही कडून
पण त्याचा आम्ही करता निषेध
देती आम्हाला भावनात्मक छेद..

(च्यामारी हे चारोळी लिहिणे वाटले तितके सोपे नाही हो !)

- सर्किट

धोंडोपंत's picture

15 Dec 2007 - 10:27 am | धोंडोपंत

वा वा,

गोफ अगदी छान विणलाय सर्वांनी. आम्हालाही लिहायची इच्छा आहे. पण हा काव्यप्रकार आम्ही कधी हाताळलेला नाही. बघतो प्रयत्न करुन काही जमताय का?

आपला,
(नवखा) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

ऋषिकेश's picture

15 Dec 2007 - 10:32 am | ऋषिकेश

व्वा! ऐकून आनंद झाला... तुमच्या चारोळीची वाट पाहत आहोत :)

ऋषिकेश's picture

15 Dec 2007 - 10:31 am | ऋषिकेश

प्रकाशरावांच्या सुचनेनुसार एक पाचोळीचा प्रयत्न....

आता चोरि बंद करा!
अशी मुजोरी बंद करा!
अश्लीलता बंद करा!
पंचायत, मालक बंद करा!
अहो मग बंद करा की बंद करा.. आरडाओरड करून हे सगळं चालू कोण ठेवतय?

(झालं गेलं विसरू पाहणारा) ऋषिकेश

शलाका पेंडसे's picture

15 Dec 2007 - 10:34 am | शलाका पेंडसे

समाजकंटकाना मारा
चिंचेचा फोक
आणि मिसळपावचा विणा
छान छान गोफ!

ही कशी आहे?-:)

सर्किट's picture

15 Dec 2007 - 10:37 am | सर्किट (not verified)

कंटक कुणाला म्हणावे ?
ज्यांनी आजवर केली सेवा,
समाजाची, पण कुणीतरी,
समजते मालक समाजाचा,
कंटकांचा कंटक, कुणीतरी ?

(ही मराठी साहित्यप्रकारांच्या विष्ठावळीतील, आमची पाचोळी)

- सर्किट

प्राजु's picture

16 Dec 2007 - 5:26 am | प्राजु

का समाजाच्या नावने बोंबलायचे..
तो ही माणसांनीच बनवलेला..
केला कितीही आरडाओरडा
तरी गांव तिथे उकिरडा........!

- प्राजु.

ऋषिकेश's picture

16 Dec 2007 - 9:57 pm | ऋषिकेश

मी आहे समाजसेवक*
असेच सारे म्हणतात
कर्तृत्व त्यांचं पाहून
ते समाजसेवक** ठरतात

*अर्थः समाजाची सेवा करणारा
**संधीविग्रहः माजासहित असलेले सेवक ;)

प्राजु's picture

17 Dec 2007 - 7:52 pm | प्राजु

समाजाचे नितीनियम
आणि संस्कृतीची जाणीव
पाळणा-यांसाठी सर्वकाही..
नाहीतर सगळ्याचीच उणीव..

- प्राजु.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Dec 2007 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपाववर खोदलेले खड्डे बुजवतांना
आम्ही दक्ष राहिलो होतो.
म्हणतात की, प्रत्येक खड्ड्यात त्यांनी
सुरुंग पेरले होते.

( कोणता प्रकार हाताळला आम्ही कोणास ठाऊक )

ऋषिकेश's picture

18 Dec 2007 - 6:06 am | ऋषिकेश

मोकळ्या स्वच्छंदी गगनातही
पेरू शकतात सुरुंग..
स्वातंत्र्य झेपत नाही,
कारण सवयीचे असती तुरुंग!

प्राजु's picture

18 Dec 2007 - 9:54 pm | प्राजु

मंडालेच्या तुरूंगात
घडले गीतारहस्य..
सुखावल्या त्या भित्ती
अन गजांवर उमटले हास्य..

- प्राजु.