नमस्कार मिपाकर्स !!
चीन मध्ये येउन साधारण ६ महीने झालेत ..
आणी हाय हॅलो पूरत चायनीज बोलायला शिकलोत ..(भाषेत आधी पासुनच कच्चा!!)
विशेष म्हणजे चीन मध्ये राहुन काम करायच तर तुम्हाला चायनीज (थोडीफार का होइना)यायलाच हवी .
नाय तर फारच त्रास होतो ...
चायना मेड मालाची निर्यात करणा-या एका फर्म मध्ये क्वालीटी चेक करण्याचे (थोडक्यात पाट्या टाकायचे) महत्त्व पूर्ण काम मी करतो..
आणी कामानिमित्त सारख भटकंती चालू असते ...
साधारण पणे प्रत्येक फॅक्टरीत कोण ना कोण ईंग्लीश येणारा (मोस्टली येणारी) असतोच/असतेच ...
पण ब-याचदा असा कोणी प्राणी नसेल तर मग आमचा द्वीभाषीक संवाद ऐकून /पाहुन कुणाचीही करमणुक होइन ..
२ महीन्यापूर्वी मला अनहुयी प्रोव्हीयंस मधल्या एका फॅक्टरीत जायचे होते ...
चायनीज कलीगने कुठल्या बस स्टेशन वरून जायचे ,बस टायमींग वगैरे आधीच माहिती मला दिली होती ...
आणी ब-या पैकी मीही सरावलेला असल्याने .. नो टेन्शन ,ओन्ली अटेन्शन ...
(बाकी आमच ईंग्रजी ऐकून ईंग्रज नक्कीच डोक फोडीन आधी माझ आणी मग स्वतःच !!-इती सौ.ढवळे मॅडम..१० वी/क)
सकाळी ६.४५ ला मेन रोडला येउन मी टॅक्सी वाल्याला हात करतो ..
टॅक्सी वाला 'नीहाव' (नमस्ते ह्या अर्थी ) म्हणुन 'समा तीफांग ?' ( कुठे जायच बोला ह्या अर्थी ) विचारतो ..
आणी मला पहीला घोटाळा जाणवतो....
कारण मी ७-८ वेळा बस -स्टेशनला गेलोये पण नेमका उच्चार विसरतोच (जुनी सवय !)..
"खैन जुन्शान" - मी..
टॅक्सीवाला न समजल्याचा आव आणुन भाबड्या चेहे-याने माझ निरीक्षण करतोये...
"छीछ्जान ! नग खुआइ जुन शान !" मी उच्चार सुधारण्याच्या प्रयत्नात ...
"थींगपुतो !!!!" इती चालक !! (नाय समजलं !)
ह्या संवादात १० मिनीट झालेली असतात...
बस चुकण्याची भीती असते...
आता दुसरा पर्याय नाही हे लक्ष्यात येउन कलीगला फोन ...
पूर्ण बेल संपत आल्यावर " क्या है बे सुबु -सुबू साले ?" --माझा कलीग वैतागलेला स्वर !!
" आरे भरत भाय ,ये बस स्टेशन का नाम क्या है यार ? ये ड्रायव्हर नही समझ रहा !!"
"अबे उसको खैन चोंग शान बोल, तब समझेगा वो ! और तु भी कही पे लिख के रख ना यार !"
(सगळे कलीग अमराठी असल्याने हींदी शिवाय पर्याय नाहीये !)
झाल ...
एक काम फत्ते ...आमचा विजय रथ बस स्टेशनाला .....
नेहेमी प्रमाणे सकाळच्या प्रसन्न वातावरणात रंगी -बेरंगी फू्लपाखरांच निरीक्षण करत स्वारी तिकीटाच्या लायनीत उभी...
आमचा नंबर येतो ," ईग चा ओ हु !" मी अगदी ऐटीत ...
आणी तिकीट देणारी अगदी भाबड्या आणी न समजल्या चेहे-याने ,"नालीया ?" अस प्रेमळ विचारते ..
आता आली का परत पंचाइत ...
२-३ वेळा तीला समजावुन सांगण्याचा विफल प्रयत्न ....
आणी मग डोक्यात लक्ख प्रकाश पडतो की चायनीज कलीगने एका कागदावर पूर्ण पत्ता आणी फोन क्रमांक दिलेला...
आणी तीथेच मी माझे सारे खिसे रीकामे करतो ,तो कागद शोधतो आणी तीला दाखवतो..( अगदी विजेत्याच्या थाटात )
मागील रांगेत उभे असलेले आणी आजुबाजुने जाणारे माझ्या कडे अगदी अप्रतीम नजरेने बघताएत ..( कोणत्या नजरेने ते सुज्ञ वाचकांना सांगने न लगे !!)
हुश्श्य !!
तर एकदाच तिकीट भेटत......
बस निघायला अजुन १५ मिनीट शिल्लक आहेत ...
आमची स्वारी स्मोकींग रूम कडे वळते ...
' हर फीक्र को धूयेमे उडाता चला गया "
अर्धी अधीक बस भरलेली .....साधारण ७ तासाचा प्रवास ...
अगदी ठरल्या वेळेत बस मार्गस्थ होते ...
मग काय निवांत पडी मारने क्रम प्राप्त ठरते .....
एका स्टेशनावर बस थांबते..
आणी सगळे प्रवासी 'सफाना' घ्यायला ..( शुद्ध मराठीत लंच हो !!)
आम्ही पण घोळक्यात सामील होउन रेस्टॉरेंट मध्ये प्रकटतो.....
आत न समजणारे बरेच पदार्थ ठेवलेले असतात ..
एकच ओळखीचा पदार्थ मला दिसतो...पांढरा भात !!
पण खायचा कशा सोबत ?
मग सगळे मेनु एकदा नजरे खालून घातले जातात..
अगदी बटाटा , कसल्या कसल्या शेंगा, आणी बरचस घास फूस बघुन ( नाकाला झोंबणारा वास सहन करत ) आम्ही वाढप्या पाशी येतो...
आणी ' सुचाइ ' कुठली अशी विचारणा करतो ...( व्हेज ह्या अर्थी )
वाढप्या २-३ पदार्थ दाखवतो ..आणी अगम्य चायनीजमध्ये काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो..
साले चीने ! सुचाइ म्हणतात आणी त्यातही बीफ किवा पोर्क टाकुन ठेवतात..
आता काय करायच बर!!
तिथुन काढता पाय घेत आम्ही बाजुच्या दुकानातुन एक फंता घेतो आणी ढोसत बसतो ...
परत बस मार्गस्थ होते ..
दुपारी ३.०० च्या सुमारास आमचे इच्छीत स्थळ येते..
नशिब बलवत्तर असते ..
फॅक्टरी चा माणुस आधीच येउन वाट पाहत बसलेला असतो ..
शेक हँड करत "हॅलो अनिलया ! " म्हणतो ..
(इकडे प्रत्येकाच्या नावाला या जोडण्याची पद्धत आहे ,अगदी आपण कस टा-या ,टींग्या,धम्या म्हणतो तस...)
दुसरा धक्का ,ह्याला ईंग्रजी येते !
मग प्रश्न मिटला ...
काय खाणार,के एफ सी ? - केवीन..
(चीन्या चे ईंग्रजी नाव !!)
'मेवंती !" मी ...( नो प्रॉब्लेम )
२ बर्गर पोटात गेल्यावर जीवात जीव आलेला असतो ..
अगदी मूड मध्ये येउन मी त्याच्या शी गप्पा मारत बसतो....
तासा भरात आमचा रथ फॅक्टरीत पोचलेलो असतो ..
मी भरभर काम ऊरकत असतो ..
२ आयटम (!) मला असीस्ट करत असतात ...
बाकी उरलेली अर्धे अधीक कामगार माझ्या कडे विचीत्र नजरेने पहात असतात ...
(प्राणी संग्रहालयात एखादा नवीन प्रतीचा प्राणी आपण ज्या नजरेने पाहतो ,अगदी तीच नजर !!)
कुणी अस पाह्यल की मला अतीशय राग येतो, आलेला असतो!
पण सोबत च्या आयटम कडे ( तीच्या हस-या चेहे-या कडे) पहात ,मी राग आतच गिळून टाकतो...
लगबगीत माझ काम आटोपून मी बॉस ला रीपोर्ट देतो ...
रात्र होत आलेली असते ..अजुन थोड काम शिल्लक असते ,
शिवाय परतीसाठी बस दुस-या दिवशीच उपलब्ध असते..
मग रात्रीचा मुक्काम हॉटेलात करावा लागणार !
केवीन मला हॉटेलात घेउन येतो .
चेक इन झाल्यावर केवीन मी आणी लोबान ( त्याचा बॉस ) एका कॉफी शॉप मध्ये येउन संध्या समयीच सुग्रास भोजन घेतो ..
टीपीकल चायनीज फूड ...
अगदी पोटाला तड पडे पर्यंत हादडून झाल्यावर लोबान चा के टी वी त जाण्याचा मूड होतो..
आणी त्याला मीही सोबत हवा असतो...
आता पून्हा टेन्शन ..
आपल्याला असल काय जमत ही नाही..आणी माझी फर्म असल काही खपवून ही घेत नाय ...
पण दोघाचा आग्रह मोडवत नाही, आणी आम्ही के टी वी मध्ये अवतरतो...
पून्हा सगळा केटीवी स्टाफ माझ्या कडे विचीत्र नजरेने पहात असतो...
मी आपला उगाच भींतीवर टांगलेली पेंटींग पहात असतो...
एका मोठ्याशा हॉल वजा खोली मध्ये आम्ही येतो..
शेजारी म्युजीक सिस्टीम आणी समोर च्या भींतीवर स्क्रीन असते ..
आता लोबान अगदी मूग्धपणे चायनीज गाने गात असतो..
शब्द समजत नाहीत ,पण कानाला बर वाटत..
केटीवी चा एक आयटम पन आमच्या कंपूत सामील झालेला असतो...
नंतर केवीन एक ईंग्रजी गाणे म्हणतो....
सोबत आयटम सुद्धा पारंपारीक चायनीज गीत गाते ..
आणी खरच गीत आवडते मला..(संगीताला भाषा नसते म्हणातात्,खरये !!) आम्हाला साक्षात्कार झालेला असतो....
तोपर्यंत ढोसलेली बीयर लोबान च्या डोक्यात नाचायला लागलेली असते..
आणी मला गाणे म्हणण्याची गळ घातली जाते...
( चक्क मला !! ? !!)..
भारतीय संगीत अतीशय सुरेल आणी गोड आहे ,हा त्यांचा विश्वास अढळ रहावा म्हणुन ...
मी टाळंटाळ करत असतो...
पण लोबान फूल मूड मध्ये आलेला असतो..
आणी मी गाण म्हनाव हा त्याचा इज्जतीचा मुद्दा झालेला असतो...
केवीन आणी आयटम सुद्धा लाडे लाडे हसत विनंती करतात ..
आणी अखेर....
'गालावर खळी ,डोळ्यात धुंदी ' चा अंतरा मी माझ्या सुरेल (?) आवाजात गातो....
सारे टाळ्या वाजवुन "व्हेरी गूड !!" म्हणतात..
माझा चेहेरा आता खरच पाहण्या सारखा झालेला असतो......
सरते शेवटी आम्ही हाटीलात परततो..
लोबान सुद्धा सोबत आलेला असतो...
आणी त्याच्या डोक्यातील बीयर आता भरतनाट्यम करायला लागलेली असते ..
त्याला ते गीत आत्ताच हव असत...
मी नेट वरून कॉपी करून त्याला ते गीत देतो..
आणी कट कट संपवतो.......
सकाळी पून्हा फॅक्टरीत येउन ,उर्वरीत काम पूर्ण केल जात....
त्यानंतर आमची स्वारी बस स्टेशनावर येते ..
केवीनने आधीच तिकीट बूक केलेल असत ..
३.००ची बस अगदी वेळे वर आलेली असते ..
मी लोबान शी हात मिळवतो आणी 'अलवीदा ' करतो...
लोबान रात्री झालेल्या प्रकारा बद्दल "तियुपुची!" म्हणतो....( सॉरी)
मी सुद्धा "मेकवान्शी !!" ( हरकत नाय्,इट्स ओ के ह्या अर्थी )..
नंतर केवीन सोबत हात मिळवत "गूड बाय" म्हणतो...
केवीन ह़ळूच 'बॉस ला तुझ गीत खरच आवडलये' अस सांगतो.....
मी सुद्धा हसून 'शीशे!' म्हणतो...(थॅन्क्स !).....
मी माझ्या सीट वर येउन बसतो ....जवळ -जवळ पूर्ण बस भरलेली असते ...
माझ्या शेजारची सीट अजुन ही मोकळीच असते....
'चला बरये ! हात पाय पसरून मस्त पडी मारता येइन' असा विचार माझ्या टकु-यात आलेला असतो....
आणी इतक्यात ती येते ....
तीच .....
धाप लागलेली...
हातात तीकीट आणी ...
धावत येउन एकदाची बस पकडल्याचा आनंद...
हीरोइन च्या चेहे-यावर ओसंडत असतो...
(हीरोइनच की नाव कुठ माहितीये मला !!)
वर्णन अगदी गालावर खळी ,डोळ्यात धुंदी ! ओठावर खुले लाली गुलाबाची! असच करता येइल ...
तिकीटा वरील क्रमांक शोधत ती येते..
माझ्या शेजारची सीट हीरोइनचे असते...
थोडीशी बावरलेली...
थोडीशी लाजत ती शेजारी बसते....
(चायना मध्ये लाजणारी मुलगी क्वचीतच दिसते ! एकदम बोल्ड प्रकार असतो इकडे ! कधी कधी मलाच लाज वाटते, पण ह्यांना नाही.. असो..)
बस निघते ....
आता परत एकदा मी स्वतः च्या नावाने शिव्या घालत असतो ..
सहा महिने झाले ,पण इतकाही कॉन्फीडेन्स नाय की एखाद्याशी बोलू शकशील !!!
(चोराच्या मनात चांदणे )
कस बोलू ....कशी सुरुवात करू...ह्याचाच मी विचार करत असतो...
हलकेच मी हीरोइन कडे बघतो...
ती सुद्धा डोळ्याच्या कोपरातुन माझ्या कडे पहात असते..
आणी गालात गूढ हसत असते...
मी स्वतः वर परत एकदा चरफडत असतो...
बस आपल्या उच्चतम गतीने मार्ग क्रमण करत असते....
तास होतो...
२ तास होतात.....
अर्धे अधीक प्रवासी डाराडूर झालेले असतात ....
काही जण स्क्रीन वरचा अगम्य कूंग फू पट बघण्यात दंग असतात ....
हीरोइनची पण मस्त पैकी डुलकी चाललेली असते....
आणी इकडे माझी झोप उडालेली असते......
थोड्या वेळाने बस एका थांब्यावर थांबते...
पून्हा गीळण्याचा कार्यक्रम करण्या साठी सारे प्रवासी सरसावतात ....
हीरोइन सुद्धा घोळक्यात सामील होउन रेस्टॉरेंट मध्ये जाते.....
मी आपला शेजारच्या शॉपी मध्ये जाउन ऑरेंज ज्युस घेतो...
आणी एक - एक घोट घेत बसलेलो असतो.....
परत एकदा सगळे परततात..
हीरोइन सुद्धा येते आणी रीतसर सीट लांब करून ठीउन देते....
आता माझ्याकडे सुद्धा काही पर्याय नसतो....
अजुनही शब्द जुळलेले नसतात..
माझ काय होणार ? ह्या विचारात मी सीट लांब करतो....
अचानक जाग येते...
बस एक्सप्रेस वे सोडून निंगबो मध्ये आलेली असते ..
१५ मिनीटात स्टेशन येणार असते....
हीरोइन आधीच जागी झालेली असते ..
आणी गालात हसत माझ्या कडे पहात हसते....
(स्वगत :अब नही तो कब आन्या? )
मी हसून तीला 'नीहाव !!' म्हणतो.....
"नीहाव ! यु मस्ट बी इंडीयन ,राउट?" --हीरोइन ....
"ऑफकोर्स !!" --मी .....
च्या मारी हीला ईंग्रजी येत ....
( स्वगत : मूडदया ,७ तासाच खोबरं केलस की रे !!)
मग आमचा संवाद चालू होतो....
हीरोइन सुधा एका ट्रेडींग कंपनीत असते....
आणी तीला भारत देशा विषयी बरीच (?) माहीती असते...
' तुम्ही भारतीय फारच कलाकार लोक असता..
सण असो वा लग्न ,अगदीच...
कुठलाही प्रसंग तुम्ही नाचुन -गाउन सेलेब्रेट करता' इती हीरोइन ....
भारतीय लोकाचा पेहेराव तीला विशेष आवडत असतो..
खास करून भारतीय स्त्रीयांचा..
ऐश्वर्या,सुष्मीता वगैरे मंडळी विषयीच तीच सामान्य ज्ञान अगाध असते...
भारतीय पुरुषच जगात असा आहे की बोलण्या आधी फार-फार विचार करतो...इ.इ.
तीला हे ज्ञान भारतीय शीनेमा आणी नेट पाहुन च आलेल आहे हा आमचा विश्वास दॄढ होतो...
" येस ! माय कंट्री इज कलर फूल !!"
मी देखील अभिमानाने सांगतो....
एवढ्यात बस स्टेशनात आलेली असते.....
चला !हीला तीच्या घरी सोडू आणी मग निघु, असा सुज्ञ विचार डोक्यात पक्का झालेला असतो ..
आम्ही बस मधुन उतरतो...
एक चींका , २- अडीच वर्षा च्या बाहुली बरोबर थांबलेला असतो....
हीरोइन जाते..आणी बाहुलीला मिठीत घेते .....
"अनिलया ! मीट माय हजबंड लीओ!" -- हीरोइन ....
मी लीओ ला हास्तांदोलन करतो, पण माझ विचार चक्र थांबलेल असत...
मला काय बोलाव , काय कराव कळत नसत.....
डोक्याचा हरभजन (!) म्हणजे नेमक काय ते आज उमजत असते....
बाहुली सुद्धा हसून चायनीज मध्ये मला काही तरी बोलत असते ....
मी हसण्याचा प्रयत्न करतो आणी बाहुलीला " हॅलो !" करतो....
एक टॅक्सी येते हीरोइन आणी तीची फॅमीली बसतात ...
"चाय चीयान !" म्हणत असतानाच टॅक्सी भूर्रकन उडून जाते ...
मी तीथेच थांबलेला असतो......
दुसरीची वाट बघत.......
( दुस-या टॅक्सीची ).........................................
ता . क . :- अजुनही मला हीरोइन चे नाव माहीती नाही !!!
प्रतिक्रिया
16 Oct 2008 - 9:37 am | मनिष
मस्त आहे रे, अनिलया! :)
16 Oct 2008 - 2:34 pm | टारझन
(चायना मध्ये लाजणारी मुलगी क्वचीतच दिसते ! एकदम बोल्ड प्रकार असतो इकडे ! कधी कधी मलाच लाज वाटते, पण ह्यांना नाही.. असो..)
आय बेट .. अफ्रिका मधे यापेक्षा वरचा गियर असतो ..... आम्ही ओशाळून ओशाळून इतके ओशाळलोय की आता काहीच वाटत नाही (फक्त मनाला .. बाकी आहे ते आहेच.. असो)
आन्या लेका .. इकडे सेम पोपट झाला रे ... च्यामारी ... चायनिज :) मला आहे ..
मस्त लिहीलय .. जरा अजुन येउन देत
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
16 Oct 2008 - 9:48 am | झकासराव
:))
बैलाचा पोपट झाला रे...........
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
16 Oct 2008 - 9:54 am | सहज
चीनची मुशाफीरी आवडली.
16 Oct 2008 - 9:56 am | जैनाचं कार्ट (not verified)
=))
जबरा अनिलिया !
मस्त लिहतोस !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
16 Oct 2008 - 9:56 am | सखाराम_गटणे™
अरे ओळख करुन घ्यायची,
तीची लहान बहीन, कलीग वैगरे असेलच ना.
आणि शुदध मैत्रीला कसली भीती???
-----
16 Oct 2008 - 10:03 am | महेश हतोळकर
बघण्यात फार वेळ घालवू नकोस रे!!!!
16 Oct 2008 - 10:04 am | प्रमोद देव
ती 'दुसरी' तुला लवकरच मिळो.तथास्तु!
अनुभव कथन मस्त झालंय.
16 Oct 2008 - 10:07 am | सुचेल तसं
अन्या,
एकदम भारी. तुझ्या लेखनाची शैली जाम आवडली. लेख एकदम इंटरेस्टिंग आहे. मला चीनी लोकांचं नवल वाटतं कारण ते काही पण खातात म्हणून. मागे एक ईमेल आलं होतं. त्यात ओलिंपिक्स च्या खाद्यपदार्थांच्या मेनूमध्ये कुत्रा, साप वगैरेंच्या डिशेस होत्या.
>>एक चींका , २- अडीच वर्षा च्या बाहुली बरोबर थांबलेला असतो....
माझ्या college मधे मिझोराममधनं आलेली चिकार मुलं-मुली होती. मुलगा असेल तर त्याला चोंगा आणि मुलीली चिंकी म्हणायचे. :)
>>के टी वी त जाण्याचा मूड होतो..
साहेबा हे के टी वी काय प्रकरण आहे? आपल्या इकडल्या डान्सबारसारखं का?
>>शेक हँड करत "हॅलो अनिलया ! " म्हणतो ..
>>(इकडे प्रत्येकाच्या नावाला या जोडण्याची पद्धत आहे ,अगदी आपण कस टा-या ,टींग्या,धम्या म्हणतो तस...)
प्रिया नावाच्या मुलीला काय म्हणतील? प्रियाया :?
>>दुसरीची वाट बघत.......
>>( दुस-या टॅक्सीची ).........................................
शेवट एकदम बेष्ट!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
16 Oct 2008 - 10:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे मस्तच लिहितोस रे तू बैला! (फक्त प्रत्येक वाक्य लिहून झालं की "एंटर" का मारतोस?)
अदिती
16 Oct 2008 - 10:25 am | जैनाचं कार्ट (not verified)
>> (फक्त प्रत्येक वाक्य लिहून झालं की "एंटर" का मारतोस?)
बैल आहे तो.... जरा गवत खाऊन ढुश्या मारुन आपली शेपुट हलवतो... ;)
काय पण ईचारते ही यमी !
त्याची स्टाईल आहे !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
16 Oct 2008 - 10:12 am | केवळ_विशेष
पावरबाझ...
डोक्याचा हरभजन (!)
16 Oct 2008 - 10:27 am | अनिल हटेला
>>बैलाचा पोपट झाला रे...........
ब-याचदा झालाये पोपट !!!
>>तीची लहान बहीन, कलीग वैगरे असेलच ना.
आणि शुदध मैत्रीला कसली भीती???
खरये शुद्धा मैत्रीच हवी होती हो ...पण अचानक सार घडल की ..
>>बघण्यात फार वेळ घालवू नकोस रे!!!!
सबर का फल मीठा होता है !!!
>>ती 'दुसरी' तुला लवकरच मिळो.तथास्तु!
धन्य हो देवा !!!
>> ओलिंपिक्स च्या खाद्यपदार्थांच्या मेनूमध्ये कुत्रा, साप वगैरेंच्या डिशेस होत्या.
साप खातात हे मी पण पाह्यलये ....पण बाकी कुत्रा ,बेडूक वगैरे .मला नाय माहिती अजुन तरी....
>>साहेबा हे के टी वी काय प्रकरण आहे? आपल्या इकडल्या डान्सबारसारखं का?
नक्की डान्स बार नाय पण ह्या ठीकाणी तुम्ही जाउन मनसोक्त ढोसू शकता, आणी सोबत गाणी गाउ शकता.काही केटीवी मध्ये डान्स बार सारखाच प्रकार असतो..
>>प्रिया नावाच्या मुलीला काय म्हणतील? प्रियाया
नाय फक्त प्रिया च ....बहुतेक ह्म्म...
>>शेवट एकदम बेष्ट!!!
शेवट हा नविन सुरुवात ही असु शकतो....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
16 Oct 2008 - 10:38 pm | वर्षा
हे चीनी केटिवी जपानी 'काराओके' सारखंच प्रकरण वाटतंय...
मस्त वाटलं वाचून. चिनी-जपानी माणसांची वयं खरोखर कळत नाहीत....आपल्याला वाटतं त्याच्या बरोब्बर उलट निघतं! :)
-वर्षा
16 Oct 2008 - 10:35 am | अनिल हटेला
>> (फक्त प्रत्येक वाक्य लिहून झालं की "एंटर" का मारतोस?)
सवय आहे हो अदीती देवी ....
>>बैल आहे तो.... जरा गवत खाऊन ढुश्या मारुन आपली शेपुट हलवतो...
हा हा हा ...बरोब्बर ओळखलत राजे ....( बैलाचा मित्र कोण?)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
16 Oct 2008 - 10:44 am | भोचक
लेख एकदम 'चाबूक' झालाय.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
16 Oct 2008 - 10:55 am | आनंदयात्री
छान लिहलयेस अनिल !
16 Oct 2008 - 11:30 am | फटू
येगदम ढासू लिखेला हैं... बोले तो जबराट...
वो "गालावर खली..." गाना तुमने वो चिंकी लोकको सुनाया... लय भारी...
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
16 Oct 2008 - 11:41 am | स्वाती दिनेश
एकदम चटपटीत लिहिले आहे, आवडले.
स्वाती
16 Oct 2008 - 8:17 pm | लिखाळ
चटपटीत लिहिले आहे.... लेख आवडला.. मजा आली.
--लिखाळ.
16 Oct 2008 - 11:42 am | धमाल मुलगा
सही लिहीलयस रे अन्या (घे मी पण चायनीज बोल्लो!) :)
एकदम चाबुक मजा आली.
तिकडच्या टॅक्सीवाल्याबरोबर कधी मिटरच्या बिलावरुन कचकच घालायची वेळ आली तर काय अवस्था होईल यार?
वा वा! अनिलराव, मायमराठीचा झेंडा तुमी चायनापार फडकवलात की :)
हॅत्तिच्याआयला, झाला का पोपट? मला आधी वाटलं, काय नवी बातमी देतोय की काय गडी!
"अमुक अमुक शुभ दिने चिंकीबरोबर पाट लावणेचे योजिले आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहुन आम्हास आशिर्वाद द्यावेत" इ.इ. ;)
असो, छोटीश्शी चीनवारी घडवल्याबद्दल 'शीशे!'
-ध'म्या' मांच्युरियनकर
16 Oct 2008 - 11:54 am | घाशीराम कोतवाल १.२
लगे रहो बैलोबा चायनीजकर !!!
येउ देत तुमची चायना सफारी मस्त आहे
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?
16 Oct 2008 - 1:38 pm | मनीषा
खूप छान अनुभव कथन .
डोक्याचा हरभजन (!)
मी तीथेच थांबलेला असतो......
दुसरीची वाट बघत.......
( दुस-या टॅक्सीची ).........................................
हे मस्तच !!!
16 Oct 2008 - 4:13 pm | स्पृहा
अतिशय छान लिहिलय...
मी तीथेच थांबलेला असतो......
दुसरीची वाट बघत.......
( दुस-या टॅक्सीची )......................................... =)) =))
16 Oct 2008 - 4:30 pm | टारझन
मी तीथेच थांबलेला असतो......
अरे बापरे ... अजुन एक गुगली ... च्यायला हल्ली आभासी जगात नुसत्या नावावर जाउन गुदगुल्या करुन घेणारा अंमळ येडझवा ठरू शकतो ... टारझन फॅक्टस मधे भर पडली
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
16 Oct 2008 - 4:30 pm | अदिति_राहुल
हे हे हे हे ....खरच मस्त आहे अनिल्या....!!!! :D
16 Oct 2008 - 6:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडला चायना किस्सा !!! :)
16 Oct 2008 - 7:12 pm | संदीप चित्रे
एकदम चटपटीत शैलीत लिहिलंय.
मी दोनच आठवडे कंपनीच्या कामानिमित्त चीनला गेलो होतो आणि आपलं इंग्लिश खूपच चांगले आहे हा अभिमान मनात घेऊन परतलो ;)
16 Oct 2008 - 7:30 pm | विसुनाना
स्फूट आवडलं.
चीन या देशाबद्दल अजब कुतुहल आहे. जरा वातावरण, निसर्ग यांचेही वर्णन येऊ दे.
16 Oct 2008 - 9:46 pm | सर्वसाक्षी
काम जोरात आहे की!
मस्त लिहिलाय.
बाकीचे अनुभव प्रत्यक्ष भेटीतच - पुढच्या महिन्यात येतोय, आलो की हाक देतो
16 Oct 2008 - 10:40 pm | यशोधरा
मस्त लिहिलय एकदम!!
17 Oct 2008 - 1:10 am | धनंजय
पण ही कथा उगाच आठवली :
http://www.misalpav.com/node/4017
17 Oct 2008 - 2:24 am | प्राजु
ये कैसी मुश्किल हाय! कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाय..
आवडला लेख.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Oct 2008 - 2:55 am | स्वप्निल..
अनिल या,
अनुभव एकदम मस्त...अजुन असतील तर ते पण लिहा..
....."अनिलया ! मीट माय हजबंड लीओ!" -- हीरोइन ....
....मी तीथेच थांबलेला असतो......
दुसरीची वाट बघत.......
( दुस-या टॅक्सीची ).........................................
हे मात्र झक्कास....
चला..लवकरच तुम्हाला दुसरी मिळो..ह्यासाठी शुभेच्छा..
स्वप्निल
17 Oct 2008 - 3:06 pm | अभिज्ञ
मस्तच.
और आने दो,
अभिज्ञ.
17 Oct 2008 - 3:41 pm | विसोबा खेचर
लेखन अंमळ चटपटीत व चवदार... :)
2 Feb 2009 - 12:37 pm | अनिल हटेला
>>मी दोनच आठवडे कंपनीच्या कामानिमित्त चीनला गेलो होतो आणि आपलं इंग्लिश खूपच चांगले आहे हा अभिमान मनात घेऊन परतलो
हो ना!! माझासुद्धा गैरसमज झालाये असाच .....
>>चीन या देशाबद्दल अजब कुतुहल आहे. जरा वातावरण, निसर्ग यांचेही वर्णन येऊ दे.
नक्कीच प्रयत्न करीन .....
>>पुढच्या महिन्यात येतोय, आलो की हाक देतो
वाट बघुन राह्यलो ,राजे !!
>>पण ही कथा उगाच आठवली
फरक आहे साहेबा ,मला शेवट पर्यंत ती देवीजी शादीशुदा आहे अस माहीती नव्हत....
आणी मी कुठेही माझ्या वागण्याच समर्थन केलेल नाहीये....
>>कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाय..
हा हा हा !!!
>>लवकरच तुम्हाला दुसरी मिळो..ह्यासाठी शुभेच्छा..
लगेच दुसरी मिळाली टॅक्सी ,बरं !!!
>>और आने दो,
>>लेखन अंमळ चटपटीत व चवदार...
और भी है ,जल्दी ही अयेगा !!
सर्व प्रतीसाद देणारे आणी न देणारे देखील ....
धन्यवाद !!!!!!!!!!!
मंडळ आपले आभारी आहे.......
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
2 Feb 2009 - 3:39 pm | श्रावण मोडक
प्रत्युत्तराच्या निमित्ताने धागा वर आला आणि तो वाचून काढला.
छोटी वाक्ये, सुटसुटीत लेखन. आवडले. ही एंटरची सवय कायम ठेवा, पण त्यापेक्षा वाक्ये अशीच छोटी ठेवण्याची सवय कायम ठेवा. भल्या-भल्यांना जमत नाही ते अनेकदा.
या छोट्या वाक्यांवरून राजिंदर पुरींच्या स्तंभलेखनाची आठवण झाली. कारण चीन हा या दोन्ही अत्यंत वेगळ्या स्तरावरील लेखनातील सामायीक धागा. अर्थात, ते लिहितात ते सारे वेगळेच.