भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले.
स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल...
त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...
प्रतिक्रिया
3 Jun 2014 - 9:16 am | अमोल केळकर
अरेरे, वाईट बातमी
श्रध्दांजली
3 Jun 2014 - 5:44 pm | बालगंधर्व
RIP. Gopinath Munde. Can't express my emotions. I dont know is there god or not. But what is happened, is very bad and sorrowful. We are unable to forget you.
3 Jun 2014 - 9:20 am | सुमीत भातखंडे
खूप धक्कादायक बातमी...
त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...
असेच म्हणतो.
मनापासून आदरांजली.
3 Jun 2014 - 9:21 am | किसन शिंदे
मुंडेसाहेबांना श्रद्धांजली!! :(
3 Jun 2014 - 9:22 am | नाखु
राजकारणा पलिकडे समयोचीत समाजकारण अंगिकारणार्या "महाराष्ट्र" सुपुत्रास विनम्र श्रद्धांजली..
3 Jun 2014 - 9:25 am | ज्ञानोबाचे पैजार
जबरदस्त धक्कादायक बातमी.
खर तर विश्र्वास बसत नाही.
भावपुर्ण श्रध्दांजली
3 Jun 2014 - 9:26 am | llपुण्याचे पेशवेll
मुंडेसाहेब गेल्यामुळे खरंच महाराष्ट्रातल्या राजकारणाचे नुकसान झाले आहे. पवारबाजीला वेसण घालण्याची ताकद मुंडेंमधे होती. मुंडेसाहेब तुमची आज देशाला, महाराष्ट्राला फार गरज होती. का गेलात इतक्या तडकाफडकी.
3 Jun 2014 - 9:57 am | आनन्दिता
त्या पवारांना नडायची धमक दाखवणारा एकटाच नेता ..! आता उरलेत ते सगळे त्यांचे बगलबच्चे!ं
छ्या ..देवा खुप चुकीचं केलंस तु ,,. :(
3 Jun 2014 - 9:26 am | सुहास..
प्रमोद महाजन, विलासराव देशमुख आता मुंडे :(
3 Jun 2014 - 9:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
केंद्रीय ग्रामविकास मंत्री खा.गोपीनाथ मुंढे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक. मराठवाड्याचा एक मोठा लोकनेता, सामान्य माणसाशी संपर्क असलेला असा एक मोठा माणुस निघून गेला.
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...
-दिलीप बिरुटे
3 Jun 2014 - 9:28 am | विटेकर
एका झुंजार नेत्याचा अकाली अंत !
ओम शांती शांती शांती !!!
3 Jun 2014 - 9:32 am | मदनबाण
अगदी धक्कादायक आहे ! :(
आत्ताच काही वेळा पूर्वी ही वाईट बातमी कळाली...
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
3 Jun 2014 - 9:32 am | किसन शिंदे
मुंडेसाहेबांच्या मृत्यूमध्येही आता काही लोकं राजकारण करू पाहत आहेत. आणि व्हॉट्सअॅपवर त्यासंबंधीच्या अफवा पसरण्यास सुरूवातही झाली आहे. या दुर्दैवी घटनेतही राजकारण करू पाहणार्या लोकांच्या मनाचा कोतेपणा कधी जायचा?? :(
3 Jun 2014 - 9:50 am | विकास
धन्यवाद किसनराव स्पष्ट केल्याबद्दल... आपण सर्वच हे लक्षात ठेवून कुठल्याही माध्यमातून असले मेसेजेस दुर्लक्षित करूया आणि फॉरवर्ड करण्याचे पूर्णपणे टाळूयात...
3 Jun 2014 - 9:36 am | नितिन थत्ते
अत्यंत वाईट बातमी. श्रद्धांजली.
3 Jun 2014 - 9:36 am | अत्रुप्त आत्मा
@स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल...>>> +++१११
एक खरा लोकनेता हरपला! :(
3 Jun 2014 - 9:38 am | सुहास..
3 Jun 2014 - 9:39 am | नानासाहेब नेफळे
मुंडेसाहेबांना आदरांजली.RIP.
3 Jun 2014 - 9:43 am | विकास
एनडीटिव्हीवर सांगितल्याप्रमाणे:
एका गाडीने ट्रॅफिक सिग्नल लाल झाला तरी तो सिग्नल तोडून पुढे आली, जेंव्हा मुंडे यांची गाडी हिरव्या दिव्यामुळे पुढे आली होती. त्या गाडीला बाजूने (काटकोनात) जोरात धक्का मारला. थोडक्यात ही हानी होण्याचे कारण केवळ लाल सिग्नल तोडणे हे होते...
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे: त्यांना आणले तेंव्हाच त्यांचे श्वसन बंद होते आणि हृदयक्रीया बंद होती. जवळपास ५० मिनिटे त्यांना रिवाइव करण्याचा प्रयत्न केला गेला. एक नाकावर किंचित जखम सोडल्यास वरकरणी काहीच लागलेले नाही. अंतर्गत जखमा झाल्या होत्या का ते शवविच्छेदनानंतरच समजेल असे म्हणले जात आहे.
3 Jun 2014 - 9:48 am | पगला गजोधर
R. I. P. मुंडेजी
3 Jun 2014 - 9:49 am | प्रचेतस
लोकनेत्याला श्रद्धांजली.
3 Jun 2014 - 9:49 am | मुक्त विहारि
श्रद्धांजली.
3 Jun 2014 - 9:50 am | सावत्या
धक्कादायक बातमी!!! महाराष्ट्राचे एक झुंजार नेतृत्व हरपलं!!!! महाराष्ट्राला त्यांची उणीव सदैव भासेल!!!
मुंडेसाहेबांना श्रद्धांजली!!
3 Jun 2014 - 10:01 am | आतिवास
दु:खद बातमी.
श्रद्धांजली.
3 Jun 2014 - 10:03 am | हुप्प्या
फार वाईट वाटले. असे व्हायला नको होते. नवी खासदारकी, नवे मंत्रीपद, कर्तृत्वाला आवाहन करणारी नवी क्षितिजे उघडत असताना दैवाने डाव साधला.
माझी श्री मुंडे यांना श्रद्धांजली.
3 Jun 2014 - 10:03 am | प्रभाकर पेठकर
अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी. कठोर संघर्ष करीत नावारुपाला आलेल्या धडाडीच्या नेत्याला केंद्रात मानाचे मंत्रीपद मिळाले असताना अचानक काळाने घाला घातला.
3 Jun 2014 - 10:06 am | डॉ सुहास म्हात्रे
अत्यंत वाईट बातमी.
श्रद्धांजली.
3 Jun 2014 - 10:10 am | सुधीर जी
अगदी धक्कादायक आहे
श्री मुंडे यांना श्रद्धांजली
3 Jun 2014 - 10:10 am | सौंदाळा
श्रद्धांजली
चांगला लोकनेता हरपला.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे.
3 Jun 2014 - 10:15 am | मितान
अत्यंत धक्कादायक बातमी.
मराठवाड्यात वाढलेल्या माझ्यासारख्या असंख्यांच्या बालपणावर प्रमोद महाजन्,विलासराव देशमूख आणि गोपीनाथ मुंडेंच्या नावाचे ठसे उमटलेले आहेत.
माहेरचा कर्तबगार माणूस गेल्याचं फीलिंग येतंय :(
सतत संघर्ष, अनेक यशापयश, कौटुंबिक आणि पक्षीय बंडाळी या सर्वांना पुरून उरलेला हा माणूस एका अपघातात गेला यावर विश्वासच बसत नाही.
श्रद्धांजली !
3 Jun 2014 - 10:28 am | मितभाषी
मुंडेसाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली....
3 Jun 2014 - 10:44 am | शिद
आयुष्यभर एक ध्यास घेऊन अखंड झटत राहायचं... कष्टांना नुकतीच कुठं फळं येऊ लागली असताना अपघाती मृत्यू व्हावा... अगदी हळहळ वाटण्यासारखं आणि सुन्न करून टाकणारं आहे हे!गोपीनाथ मुंडेंच्या अविरत कष्टांना सलाम व भावपूर्ण श्रध्दांजली...!
3 Jun 2014 - 10:52 am | विजय_आंग्रे
अत्यंत वाईट बातमी.
श्रद्धांजली.
3 Jun 2014 - 10:55 am | पैसा
ज्यासाठी इतकी वर्षे लढा दिला ते करून दाखवायची संधी समोर असताना असं व्हावं हे प्रचंड दुर्दैव. सगळ्यांचंच. मुंडेसाहेबांना श्रद्धांजली. मात्र प्रमोद महाजनांना भावाने गोळ्या घातल्यावर एकट्याने उचलून हॉस्पिटलमधे नेणारा माणूस शॉकमधे जाऊन हार्ट अटॅक येऊन गेला यावर विश्वास बसत नाहीये. टीव्हीवर गाडी दाखवताहेत तिलाही फार धक्का बसल्याचं जाणवत नाहीये.
3 Jun 2014 - 11:00 am | सर्वसाक्षी
भाजप वैभवाच्या शिखरावर असताना आणि गोपिनाथजींना त्यांच्या दिर्घ पक्षनिष्ठेचे योग्य ते फळ मिळालेले असताना ते फळ चाखण्यापूर्वीच त्यांचे असे निधन व्हावे हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. मुंडेसाहेबांची लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला नेत्रदिपक यश मिळवुन देण्याची महत्वाकांक्षा अधुरी राहीली. मा. श्री गोपिनाथ मुंडे यांना सादर श्रद्धांजली
3 Jun 2014 - 11:13 am | शुभां म.
महाराष्ट्राचे एक जेष्ठ नेते व मराठवाड्याचा बुलंद आवाज मा.खा.गोपिनाथ मुंडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली
3 Jun 2014 - 11:19 am | _मनश्री_
अत्यंत धक्कादायक बातमी!!
भावपुर्ण श्रध्दांजली........ *sad*
3 Jun 2014 - 11:24 am | धर्मराजमुटके
काही नेते नुकतेच नावापुरते नेते असतात. मात्र गोपीनाथ मुंडे हे खरेच लोकनेते होते.
त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली !
अशा अकाली निधनाच्या बातम्या वाचल्यावर उरात धडकी भरते.
जन पळभर म्ह्णतील हाय हाय ! मी जाता राहिल कार्य काय !
रामकृष्ण ही आले गेले त्या विना जग का ओसची पडीले !
ही भा. रा. तांबेंची कविता आठवते.
आपल्यानंतर आपल्यावर अवलंबून असणार्यांचे काय होईल हा विचार मनात सारखा सारखा येत असतो.
इतर वेळेस मस्त मजेत जगताना असे प्रसंग मुळापासून हादरवतात. त्यामुळे
कल करे सो आज कर ! आज करे सो अब ! पल मे प्रलय होएगी , बहुरि करेगा कब ?
हेच खरे !
3 Jun 2014 - 11:26 am | आत्मशून्य
भावपुर्ण श्रध्दांजली.... :(
3 Jun 2014 - 11:30 am | पेट थेरपी
अतिशय वाइट वाटले. उमदे व्यक्तिमत्व . त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
3 Jun 2014 - 11:37 am | psajid
"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
3 Jun 2014 - 5:14 pm | सखी
असेच....अतिशय दु:खद आणि धक्कादायक, त्यांच्या कुटुंबियांना या कठिण काळातुन जाण्याचे बळ येवो.
3 Jun 2014 - 11:39 am | मित्रहो
मराठवाड्याचा वाघ हरवला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना.
-मित्रहो
3 Jun 2014 - 11:49 am | स्पार्टाकस
गोपीनाथरावांना विनम्र श्रध्दांजली..!!!
अपघात नसून घातपात असण्याची जास्त शक्यता वाटते.
3 Jun 2014 - 11:59 am | आतिवास
अपघात नसून घातपात असण्याची जास्त शक्यता वाटते.
अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे.
टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.
3 Jun 2014 - 11:52 am | psajid
"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
3 Jun 2014 - 11:53 am | सस्नेह
मुंढेसाहेबांना श्रद्धांजली !
3 Jun 2014 - 11:57 am | संपत
भाजपला महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने वाढवणाऱ्या लोकनेत्याला श्रद्धांजली.
3 Jun 2014 - 12:09 pm | नि३सोलपुरकर
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
3 Jun 2014 - 12:43 pm | प्यारे१
:(
ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो!
3 Jun 2014 - 12:45 pm | बॅटमॅन
विश्वास बसत नाही. श्रद्धांजली तर आहेच, पण त्याशिवाय आता महाराष्ट्रात भाजपचे अवघड आहे.
3 Jun 2014 - 12:51 pm | एसमाळी
श्रद्धांजली.
3 Jun 2014 - 1:04 pm | सन्दीप
प्रमोद महाजन ०३.०६.२००६ तर खा.गोपिनाथ मुंडे ०३.०६.२०१४.
भावपुर्ण श्रध्दांजली.
3 Jun 2014 - 1:28 pm | साती
गोपीनाथ मुंडे २०१४
3 Jun 2014 - 8:19 pm | विकास
प्रमोद महाजन ०३.०५.२००६
3 Jun 2014 - 1:19 pm | चौकटराजा
दैवगति अविचारी असते. माणसांचे व तिचे हिशेबच वेगवेगळे असतात. महाजन मुंडे यांच्या कुटुंबांवर जे आघात झाले ते शत्रूवरही होउ नयेत असे होते.काहीसे मिश्कील तर बरेचसे गंभीर असे मुडे अजून खूप जगायला हवे होते.बाळासाहेब ठाकरे,
विलासराव देशमूख यांच्या निधनानंतर मुंडे यांच्या निधनाने मराठी मन पोरके होते की काय असे वाटू लागले आहे.
3 Jun 2014 - 1:25 pm | कानडाऊ योगेशु
भावपूर्ण श्रध्दांजली.बातमी ऐकुन व वाचुन धक्का बसला.!
3 Jun 2014 - 1:26 pm | राही
आज दिवस उजाडला तो ही वाईट बातमी घेऊनच. एक उमदे आणि धडाडीचे व्यक्तिमत्व हरपले.महाराष्ट्राची आणि देशाची मोठी हानि आहे. महाराष्ट्रातली राजकीय समीकरणे बदलू शकतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
3 Jun 2014 - 3:38 pm | मृगनयनी
...*~*~*~* श्री. गोपीनाथ'जी मुंडे' यांना भावपूर्ण श्रद्धांजली *~*~*~*...
अत्यंत दुर्दैवी घटना..... असं व्हायला नको होतं.... :|
3 Jun 2014 - 1:47 pm | बारक्या_पहीलवान
भाजपला महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने वाढवणाऱ्या लोकनेत्याला श्रद्धांजली - सहमत...
3 Jun 2014 - 1:54 pm | निलरंजन
मुंडेजी लोकनेते तसेच भावी मुख्य मंञी सुद्धा होते
फक्त क्षुल्लक अपघात होऊन त्यांचे जाणे मनास पटत नाही
इंडिका गाडी नक्की कुणाची?
ड्रायव्हर ताब्यात आहे तर ही चूक जाणूनबूजून की मुद्दम हे काही कऴले नाही
3 Jun 2014 - 5:33 pm | टवाळ कार्टा
चोप्य पस्ते करुन
अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे.
टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.
3 Jun 2014 - 1:55 pm | केदार-मिसळपाव
श्रद्धांजली.
महाराष्ट्राने फार मोठा नेता गमावला आहे.
3 Jun 2014 - 1:56 pm | दत्ता काळे
फार वाईट झालं.. एक झुंजार राजकीय नेता गेला. मुंडेसाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली.
3 Jun 2014 - 2:04 pm | सुहास झेले
भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
3 Jun 2014 - 2:32 pm | कवितानागेश
महाराष्ट्राचं दुर्दैव. :(
3 Jun 2014 - 2:49 pm | दुश्यन्त
मुंडेसाहेबांना श्रद्धांजली!!
3 Jun 2014 - 3:06 pm | नंदन
आणि दु:खद बातमी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
दोन वर्षांपूर्वी लोकसत्तेच्या 'आयडिया एक्स्चेंज'मध्ये झालेली त्यांची मुलाखत वाचली. त्यातला हा भाग वाचून पहा -
4 Jun 2014 - 2:39 pm | बॅटमॅन
आयला, पॉलिटिशियन असूनही इतका प्राञ्जळ इंटर्व्ह्यू???? औघड आहे.
3 Jun 2014 - 3:40 pm | सूड
श्रद्धांजली. :(
3 Jun 2014 - 3:48 pm | तुमचा अभिषेक
वेळ खरेच चुकली
भावपुर्ण श्रद्धांजली !
3 Jun 2014 - 4:22 pm | निनाद मुक्काम प...
अम्मांचा एन डी ए मध्ये प्रवेश होण्याची शक्यता ही च्नागली बातमी कानावर पडते तोवर ही वाईट बातमी वाचायला मिळाली.
विनम्र श्रद्धांजली
3 Jun 2014 - 4:29 pm | अनन्न्या
खूप आशा होत्या, विधानसभेत....महाराष्ट्रात भाजप पोरके झाले.
विनम्र श्रध्दांजली!
3 Jun 2014 - 5:44 pm | निलेश देसाई
आत्ता कुठे महाराष्ट्रात नवी पहाटं झाल्यासारखं वाटतं होत पण आज पुन्हा अंधारुन आल्यासारख वाटतय...
3 Jun 2014 - 6:17 pm | बहिरुपी
गोपिनाथ मुंडे यांच्या आत्म्यास शांती लाभो.
3 Jun 2014 - 6:33 pm | रेवती
वाईट बातमी.
3 Jun 2014 - 10:48 pm | समिर१२३
RIP. After staying in opposition for 15 yrs now he got so close to an opportunity to be in power in Maharashtra & he has to leave. Very Sad. Deepest Sympathies for family n friends.
But no one seems to worry about cause of death. Its like failing to prevent preventable cause & waiting for next one. Its a road traffic accident. According to other car's (indica which hit Munde's car) driver, munde's drive run a red light leading to crash. So where is main culprit ? Is it free yet?
4 Jun 2014 - 7:07 pm | विकास
अनेक ठिकाणी या संदर्भात वाचले.... अर्थात नक्की काय झाले हे कदाचीत पोलीस आणि मुंडे यांच्या ड्रायव्हर-सचिवासच माहीत असेल.
यात अजून एक गोष्ट झाली म्हणजे, मुंडेंची शुद्ध हरपली तेंव्हा सिपिआर अर्थात प्रथमोपचाराने हृदयक्रीया तात्काळ चालू करण्याचे प्रयत्न कसे करावेत याचे शिक्षण ड्रायवर आणि सचिवास नसल्याने ते तात्काळ काही करू शकले नाहीत. असे प्रथमोपचार हे तात्काळ म्हणजे अक्षरशः काही (३-४) मिनिटांमधे करावे लागतात. त्यातच त्यांच्या यकृतात रक्तस्त्राव झालेला होता...
खाली श्रीरंगने म्हणल्याप्रमाणे झालेले दुर्दैवाने कोणीच बदलू शकणार नाही, पण असे परत होणार नाही या जाणिवेने सगळ्यांनी वागणे अतिशय महत्वाचे आहे. असो.
----
अजून एक अपडेटः अंतर्गत रक्तस्त्राव आणि मज्जारज्जूस बसलेल्या धक्क्यामुळे हृदयक्रीया बंद पडली. अर्थात हा हृदयविकाराचा झटका नव्हता.
4 Jun 2014 - 7:51 pm | नाव आडनाव
माहिती साठी धन्यवाद. काल जे झाला ते दुर्दैवी आहेच. पण असं वाटतं जे आज अंतिम संकारा वेळी झालं तेही चुकीचं होतं. एक गाडी जाळली गेली, मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक झाली, राज ठाकरे जे सरकार मध्ये नाहीत त्यांना घेराव घालण्यात आला. आजच बातमी होती कि सरकार ने चौकशी केलेली आहे आणि यात घातपात नाही, पण तरीही कार्य कर्त्यांची डोकी भडकावण्यात आली आणि या गोष्टी झाल्या. हे थांबलं पाहिजे. मिसळपाव वर लोकांनी अफवा पसरवण्याच थांबवण्यासाठी प्रयत्न केले ही चांगली गोष्ट आहे.
4 Jun 2014 - 8:24 pm | विकास
दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते.
अजून एक गोष्ट नीट वाचली नाही पण नुसता फोटो पाहीला: महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले.
या संदर्भात किंचीत वेगळी पण एक पद्धत आठवते (मला वाटते आपल्याकडे ती पाळली जाते का ते माहीत नाही): अमेरीकन राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधीच्या वेळेस एक रँडम सेक्रेटरी (कॅबिनेट मंत्री) हा गैरहजर असतो आणि अज्ञात स्थळी असतो.
5 Jun 2014 - 6:53 am | मदनबाण
दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते.
सहमत. पण मॉब सायकोलॉजी हा एक वेगळा आणि समजायला आणि नियंत्रण करायला कठीण असलेला विषय आहे, अर्थात या कॄत्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येउ शकत नाही.
महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले.
लोकांच्या भावना अनावर झाल्या हे खरं तर या प्रकाराच्या मागचे कारण आहे. मंत्री/संत्री यांच्या गाड्यांना घेराव घातला गेला आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली गेली. एका लोकप्रिय नेत्याच्या मागे किती जनाधार असतो हे या घटनेने दिसुन आले. तसेच लोक उद्विग्न {जनता पिसाळली } तर ते मंत्री-संत्री लोकांना घेराव घालु शकतात/अडवु शकतात हे देखील दिसुन आले.
4 Jun 2014 - 12:04 am | पाषाणभेद
अतिशय दुर्दवी घटना आहे. श्री मुंडे यांना श्रद्धांजली.
4 Jun 2014 - 11:34 am | चिप्लुन्कर
गोपिनाथ मुंडे यांच्या आत्म्यास शांती लाभो.... विनम्र श्रध्दांजली!!!!!
4 Jun 2014 - 11:37 am | शैलेन्द्र
पंकजा ही गोपिनाथरावांची राजकीय वारसदार आहे की नाही हे काळच ठरवेल, पण तिला त्यांच्या अंत्यविधिचा आधिकार देणार्या कुटुंबाला माझा सलाम..
4 Jun 2014 - 12:55 pm | संपत
दोन गोष्टींचे खरच कौतुक केले पाहिजे.
१. भाजप कार्यकर्त्यांनी फारशा ठिकाणी बंद न पाळता दाखवलेला संयम.
२. पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.
4 Jun 2014 - 4:54 pm | शैलेन्द्र
वैदीक काळात कदाचीत ही रुढी असेल आणि आजच्या पुढारलेल्या जातींमधेही हे फारस नविन नाही, जर नविन काही असेल तर बीडसारख्या मागासलेल्या भागातील, इतर मागासवर्गीय समाजतील एका लोकनेत्याच्या कुटुंबियांनी धाडसाने हा पायंडा पाडणे.. समाज नेत्याला घडवतो, पण एक चांगला नेता, स्वता:ही समाजाला घडवतो, याचे एक छान उदाहरन म्हणुन ही गोष्ट लक्षात राहील.
4 Jun 2014 - 5:19 pm | संपत
हेच म्हणायचे होते.
4 Jun 2014 - 7:11 pm | विकास
सहमत.
झाले ते दुर्दैवीच आहे. पण ही गोष्ट जनतेच्या नजरेत आणण्यासाठी माध्यमांनी कष्ट घेतले पाहीजेत असे वाटते.
बाकी पुढारलेल्या कुटूंबांबद्दलच बोलायचे तर मला वाटते: इंदीरा गांधींनी नेहरूंचे, मल्लीका साराभाईंनी विक्रम साराभाईंचे, सावित्रीबाईंनी महात्मा फुल्यांचे अंत्यसंस्कार केले होते... असे अजून अनेक असतील. पण जनतेला सतत या कहाण्या सांगण्याची गरज असते.
4 Jun 2014 - 7:15 pm | बॅटमॅन
अतिशयच सहमत. असे सतत बिंबवल्याने काही अंशी तरी फरक पडेलसे वाटते.
4 Jun 2014 - 12:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
१,००,००० % सहमत !