हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !!
इथे परकीयांपेक्षा स्वकीयांची भीती जास्त वाटते,
जगण्यासाठी क्षणाक्षणाला संघर्ष करावा लागते,
छोट्या छोट्या गोष्टींसाठी वारंवार
झगडावे लागते,
हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !!
इथे नीतीमत्तेची रोजच होळी केली जातेय,
जातीच्या धर्माच्या आधारावर उचनीच ठरवले जातेय,
तरी जो तत्वांना जागतो त्याला षंढ ठरवले जातेय,
हे जीवन एक महाभारत झालेय हे भाऊ !!
इथे स्वार्थासाठी जो तो हपापलाय,
माझे माझे करताना परिवार माञ विसरलाय,
दूरदूरवर पसरलाय अन्याय,
न्याय माञ कुठेतरी हरवलाय,
हे जीवन एक महाभारतच हे भाऊ !!
मानसन्मान हेवेदावे हे रोजचेच पाहुणे झालेत,
शकुनी तर माणसा माणसात ढीगाने सापडायला लागलेत,
विश्वासाला तर कित्येकजण यमसदनी धाडलाय टपलेत
हे जीवन एक महाभारतच हे भाऊ !!
इथे रोजच होतेय स्ञियांचे विडंबन,
नाक्यानाक्यावर दिसतायत दुर्योधन आणि दुशासन,
काही न पाहणार्या धृतराष्ट्रासारखे आंधळे झालेय प्रशासन
हे जीवन एक महाभारत झालेय भाऊ !!
जिंकायची आस ठेवली तरी बरेचसे गमवावे सुद्धा लागतं,
मोह किती झाला तरी आपलं काय परकंसुदधा जपावे लागतं,
कृष्ण काय आणि अर्जुन काय
इच्छा असो वा नसो प्रत्येकाला
इथे लढावचं लागतं
प्रतिक्रिया
31 May 2014 - 4:16 pm | आत्मशून्य
हे वाक्य हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !! या ऐवजी वाचले की आपल्या काव्याला अर्थ प्राप्त होतो.
31 May 2014 - 6:21 pm | पोटे
आता पुढची कविता येउ दे.
हे जीवन एक रामायण आहे ताई.
31 May 2014 - 8:23 pm | संजय क्षीरसागर
हे जीवन एक तारांबळच आहे बाई!
2 Jun 2014 - 7:53 pm | मृगनयनी
येथे "विडंबन" ऐवजी "विटंबना" किंवा तत्सम शब्द अधिक उचित वाटला असता. "विडंबन" हा एक लेखनप्रकार आहे. :)
31 May 2014 - 8:27 pm | निलरंजन
आत्मशून्य तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
तुमच्या सूचनाचे मी नक्कीच पालन करीन
पोटे साहेब ही कविता मनातल्या उत्कट भावनांचे प्रतीक आहे
महाभारत संपले पण आजही आपल्याला पांडवासारखे लढावे लागते
आणि सगऴयात जास्त ञास ते आपलीच माणसं
हा जडलेला ञास वेदना दायी ठरतोय आणि तो मुक्या ने सहन सुदधा करावा लागतोय
31 May 2014 - 8:52 pm | संजय क्षीरसागर
आता रामायण लिहायला घेणार का?
ज्याम प्रयत्न करुनही तुमच्यासारखा त्रास काढता येत नाही. नक्की कसला त्रास होतोयं तुम्हाला?
31 May 2014 - 9:08 pm | निलरंजन
आपल्याला हेच कळत नाही के आपले शञू आपलेच जवळजवळचे लोक आहेत
आणि जेव्हा हे कळते तेव्हा फार च ऊशीर झालेला असतो
तोंडावर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणार्यांची भीती वाटते
31 May 2014 - 8:32 pm | जेपी
हे g.one मिसळपाव आहे,
इथे लेखापेक्षा प्रतिसादाचीच भिती वाटते, लिखाणाची आस असेल तर सुद्दलेखन सुधरावेच लागते, संस्थळ फुकट असले तरी काय झाल इंटरनेटचे बिल भरावेच लागते.
31 May 2014 - 8:45 pm | संजय क्षीरसागर
हे जीवन एक महाभारतच हे ताऊ !!
इथे रोजच होतेय वस्त्रांचे उन्नयन,
मोक्यामोक्यावर दिसतायत दिपिका आणि बालन,
काही न पाहणार्या धृतराष्ट्राला सुद्धा करावेसे वाटेल प्रशासन
31 May 2014 - 9:01 pm | निलरंजन
अगदी सुरेख प्रतिसाद
31 May 2014 - 9:04 pm | संजय क्षीरसागर
हे जीवन एक महाभारत झालेय दादू !!
घरची हौस पुरवायला बाहेरचं कमवावं सुद्धा लागतं,
मोहाला उपाय नाही, आपलं काय परकं सुद्धा जपावं लागतं,
कृष्ण काय आणि अर्जुन काय
इच्छा असो वा नसो प्रत्येकाला
त्यासाठी वाकावचं लागतं
31 May 2014 - 9:03 pm | निलरंजन
वाहवा करावे च लागेल
आवडले
धन्यवाद
2 Jun 2014 - 7:55 pm | सुहास..
हे फेसबुकावर वाचले होते , तुम्हीच टाकलेत का ?
2 Jun 2014 - 11:27 pm | निलरंजन
मी एकाच वेळी दोन्ही कडे पोस्ट केलेले