डेटिंग गेम - डिनरडेट - हलकाफुलका धागा

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
27 Apr 2014 - 7:56 am

अतिशय हलकाफुलका, जंत्रीवजा बराचसा निर्बुद्ध आणि हुच्चभ्रूच्या अगदी विरुद्ध निव्वळ मनोरंजनात्मक व पाश्चात्य (विशेषता: अमेरॆकेअन) संस्कृतीत जो डेटिंग गेम चालतो त्यात सर्वसाधारण कोणत्या नियमांवर खेळ खेळला जातो त्याचे उथळ चित्रण करणारा हा धागा असून सर्वांनी हलका घ्यावा अशी विनंती. धागाकर्ती सर्व मुद्द्यांशी सहमत असेलच असे नाही. जड्व्यागळ धाग्यांपासून हटके , डोक्यास नो कल्हई असे या धाग्याचे स्वरूप आहे. तसेच या धाग्याला स्त्री-पुरुष लढाईचा आखाडा बनवू नये, अथवा ...... ऑन सेकण्ड थॉट बनवा ना माझ्या तॆर्थरुपांचे काय जाते. फक्त् अशा भांडणात धागाकार्ती उत्तरे-प्रत्युत्तरे करत बसेल अशी अपेक्षा करू नये ;) तर सुरु करते.
_______________________
बीच-बुक पण सेल्फ-हेल्पिश प्रकारातील एक पुस्तक वाचते आहे. नाव आहे - What Smart Women Know .
पहिलाच मुद्दा हा आहे किंबहुना हेच गृहीतक आहे म्हणाना की smart होण्याचे २ च मार्ग आहेत - (१) कठीण (२) सोपा. कठीण मार्ग तो जेव्हा स्त्री स्वत:चे हृदय पोळून घेउन, अनुभवांती शिकते तर दुसरा राजमार्ग हा की अन्य पोळलेल्या स्त्रियांच्या अनुभवातून ती शहाणपणाचा धडा घेते.
मग अर्थातच २ रा मार्ग बहुसंख्य निवडतील या अजून एका गृहीतकातून लेखक व लेखिका, वाचक स्त्रियांना शहाणे (smart) करुन सोडण्याचा घाट घालतात.

एका प्रकरणात लेखकद्वयी पुढील द्न्यांमौक्तिक उधळतात - smart स्त्री हे जाणून असते की पहिली डिनरडेट ही केवळ जेवण नसून त्याहून अधिक काही असते. आता हे अधिक काही काय तर हे जेवण म्हणजे त्या पुरषाबरोबर पुढील संपूर्ण आयुष्य कसे जाणार त्याची नांदीच असते. मग पुढे येते जंत्री अशा वागणूकविशेषांची. अशी वैशिष्ट्ये जी प्रदर्शित करणार्या पूरशापासून स्त्रियांनी ४ हात लांब रहावे , पळून जावे असा सल्ला लेखकद्वयी देते.

(१) असा पुरुष जो तुमच्यासमोर वेटर, वेट्रेस किंवा गल्ल्यावरच्या स्त्रीशी फ़्लर्ट करतो.

(२) जो ठरल्या वेळेपेक्षा कमीत कमी १० मिनिटे उशीर करून तुम्हाला ताटकळत ठेवतो.

(३) आपल्या ऑरडरमधील शीतही जो तुमच्याबरोबर शेअर करत नाही

(४) जो काटाचमचा-चमचा न वापरता हाताने अन्न ओरपतो.

(५) जो संपूर्ण जेवणाचे पैसे भरण्याचे साधे तोंडदेखलही ऑफर करत नाही.

(६) तुम्ही अर्धे बिल भरणे ऑफर केल्यावर जो चिडतो.

(७) जो आपण स्वत: तर खूपच महाग रेस्तोरंत निवडतो पण पैसे भरताना तुम्ही अर्धे द्यावेत अशी अपेक्षा करतो.

(८) जो निवडताना तर महागडे रेस्तोरंत निवडतो अन मग मागवताना काटछाट करत बसतो.

(९) जो एपेटायझर फार भारी भारी महाग अन खूप जास्त मागवतो मात्र शेवटी त्यात तुम्ही अर्धे पैसे शेअर करावे अशी अपेक्षा करतो.
(१०) जो तुम्हाला आमंत्रण देतो, जेवतो वगैरे अन शेवटी त्याच्या लक्षात येते की तो पाकीट घरीच विसरलाय.

(११) अर्धे बिल अर्थात तुमचा हिस्सा किती , त्याचा किती हे जो केल्युलेटर घेउन चिकटपणे पैशात मोजत बसतो.

(१२) जो पुरुष एकाहून अधिक वेळा टेबल बदलतो किंवा खाण्याची ऑरडर बदलतो किंवा खाणेच परत पाठवतो.

(१३) जो हेल्थ कोन्शस अर्थात fitness conscious असल्याने चलोरिएस baddal अति अति जागरुक असतो.

(१४) जो संपूर्ण वेळ napkin लाळेर्यासारखा लाउन जेवतो.

(१५) जो वेटरला दमात घेतो / त्याच्यावर खेकसतो
(१६) जो जादा ब्रेडला पैसे पडतील का अन किती वगैरे चवकशा करत बसतो. किंवा बुफेमध्ये चहा अंतर्भूत आहे अथवा जास्त पैसे द्यावे लागतील आदी चवकशा करतो.

(१७) तुम्ही किती अन कसे खावे याचे नियम सांगत जो तुमच्यावर सत्ता/अधिकार गाजवू पहातो.

(१८) जो पीउन टाइट होतो, बेताल होतो.

(१९) तुमच्याशी गप्पा मारण्याऐवजॆ बाजूच्या टेबलांवर काय चाललय यातच ज्याचे डोके असते.

(२०) तुमच्याशी संभाषण कमी अन खाण्यातच ज्याचे लक्ष असते.

(२१) जो स्वत:ची प्लेट तर संपवतोच पण जो तुमच्या प्लेटीवर डल्ला मारतो.
(२२) एकाच खानावळीत/रेस्तोरन्त मध्ये गेली १० वर्षे आपण कसा एकच पदार्थ मागवतोय याच्या कहाण्या जो तुम्हाला ऐकवतो.

(२३) मागवणे कमी अन पदार्थांची अल्लेर्ग्य जास्त अशी ज्याची स्थिती आहे तो.

(२४) जेवणाचे ताट, पेले, चमचे, भांडी स्वच्छ अन कचरामुक्त आहेत याची सखोल चिकित्सा करण्यात जो अर्धा वेळ घालवतो.

(२५) चेक येउन पडला तरी त्याकडे ढुनकुनही जो पहात तरी नाही किंवा चेक आल्या आल्या ज्याला बाथरूममध्ये जाण्याची उबळ येते असा.

(२६) बिल पाहून ज्याचा चेहरा पडतो/ त्रासतो/वाकडा होतो असा.

(२७) जेवताना अश्लील जोक्स सांगणे, अंगाचटीला येणे असले अशिष्ट प्रकार जो करतो.

(२८) जो स्वत:बद्दल चकार शब्द बोलत नाही.

(२९) जो फक्त स्वत:चे छंद, आवडी-निवडी आदी स्वत:चे पुराण लावतो.

(३०) तुम्ही काय बोलता याकडे ज्याचे लक्षच नसते पण जो त्याला काय बोलायचे आहे तोच मुद्दा दामटत बसतो.
______________________________________

संस्कृतीसमाजजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

27 Apr 2014 - 8:01 am | शुचि

I have typed in other site so few mistakes!!
चलोरिएस = calories
अल्लेर्ग्य = allergies

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Apr 2014 - 8:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

(४) जो काटाचमचा-चमचा न वापरता हाताने अन्न ओरपतो.

=)) च्यायला, डेट गेली खड्ड्यात, काही पदार्थ असे असतात जे हातानीचं ओरपावे असे असतात. डेट भारतात चालुये असं गृहित धरु, मिसळीमधे पाव सुरीनी कापुन नंतर काट्यानी उचलुन खाणं डोळ्यासमोर पण आणवत नाहीये. उद्या टेबल मॅनर्स च्या नावाखाली पुरणपोळी काट्यानी तोडुन मग दुधात किंवा तुपात बुडवुन खायला लागली तर पुरणपोळी खाणं सोडुन द्यायची वेळ येईल. :).

(मसाला डोसा काट्या-चमच्यानी खाता नं येणारा) अनिरुद्ध

चौथा कोनाडा's picture

27 Apr 2014 - 9:46 am | चौथा कोनाडा

अगदी हेच म्हणाणार होतो.

वेताळ's picture

27 Apr 2014 - 11:16 am | वेताळ

हाताने खाणे जर असभ्य असेल तर मग आमचे नाव पण कटाप.

तुमचा अभिषेक's picture

27 Apr 2014 - 1:33 pm | तुमचा अभिषेक

मी पण ते वाचून दचकलोच पण....
अश्यावेळी हुशारीने काट्याचमच्याने खाता येतील असेच पदार्थ मागवायचे असतात. :)

डोसा नाही खाता येत काही हरकत नाही, वडा सांबार मागवा.
बाकी पहिल्या डेटला डोसा आणि वडासांबार हेच चित्र डोळ्यसमोर विनोदी म्हणून येतेय ;)

यावरून आठवले - मी माझ्या बायकोबरोबर लग्नाआधी जेव्हा गर्लफ्रेंड म्हणून डेटींग करायला सुरुवात केली होती तेव्हा ती मला सांगते की तीच तेव्हा जास्त कॉशिअस असायाची, काय खायचे कसे खायचे, इम्प्रेशन चुकीचे नाही पडणार ना वगैरे वगैरे.. खरे तर ती माझ्यापेक्षा जास्त टेबल मॅनर्स जाणून आहे आणि माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे. पण बहुधा त्यामुळेच मी देखील तसा विचार करत असेल या विचाराने ती काळजी घ्यायची आणि मी मस्त खुलेपणाने वागायचो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Apr 2014 - 1:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो उदाहरण दिलं हो. टेबल मॅनर्स अगदी झक्कासपणे पाळता येतात. फॉर्मल लंच किंवा डिनर ला पाळावेत. पण जे पदार्थ हातानी खायचे आहेत त्याला उगाच चमचा कशाला लावायचा? डेटला नाही हो वडा किंवा डोसा =)). बा.द.वे. काँशिअस झालं की जास्त चुका होतात =))

शुचि's picture

27 Apr 2014 - 2:47 pm | शुचि

अश्यावेळी हुशारीने काट्याचमच्याने खाता येतील असेच पदार्थ मागवायचे असतात. Smile

खरे आहे, पहिल्या डेटला, काटेरी आख्खा मासा, भरलेले खेकडे किंवा खेकड्याचा रस्सा (भारतात) अन पोर्क रिब्ज rack (परदेशात) मागवू नये अन मागवलेच तर हाताने खायला लाजू नये.

अनन्या वर्तक's picture

28 Apr 2014 - 10:09 pm | अनन्या वर्तक

शुचि हे कसलं सही लिहिलं आहे. अगदी बरोबर........

चौथा कोनाडा's picture

27 Apr 2014 - 9:45 am | चौथा कोनाडा

पुस्तका बद्दल छान माहिती. चेकलिस्ट मनोरंजक आहे. या बाबतीत आपणा सर्वांचा अनुभव पाहता हा धागा लढाईचा आखाडा बनायला फुल्ल स्कोप आहे !

एसमाळी's picture

27 Apr 2014 - 11:23 am | एसमाळी

smart भारतीय मुली पहिल्या डिनरडेटला काय चेकलिस्ट बघत असतिल हे कुणी सांगेल का ?
पहिल्या डिनरडेटला मी तर हातानेंच curd rice ओरपला होता.

जेनी...'s picture

27 Apr 2014 - 10:06 am | जेनी...

सहिय ..... पण डेटिंग साठी येणारा पूरुष स्त्री वर छाप पाडण्याचा प्रयत्न करत असतो ...
हे वरचे पॉईंट्स जरा विचित्रच आहेत ... म्हणजे असं वागताना पाहिलहि नाहि न ऐकलहि नाहि ..

एनिवेज .... माझी पहिली वहिली डीनर्डेट चा किस्सा सांगायला आवडेल ... कुणाला ऐकायला आवडनार असेल तर ;)

खटपट्या's picture

27 Apr 2014 - 11:39 am | खटपट्या

आम्हाला आवडेल जेनी

तुमचा अभिषेक's picture

27 Apr 2014 - 1:37 pm | तुमचा अभिषेक

सांगा की, मी सुद्धा माझ्या एका ऑर्कुट डेटचा किस्सा लिहिलेला तो आठवला..

त्याची लिंक हि..

माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!

शुचि's picture

27 Apr 2014 - 2:44 pm | शुचि

जरूर सांग किस्सा.

आयुर्हित's picture

27 Apr 2014 - 12:14 pm | आयुर्हित

आदमीकी अस्लीयत उसके चेहरे पे लिखी नही होती!

Rangeela
http://www.youtube.com/watch?v=CCTq9c7KdOM

धमाल मुलगा's picture

27 Apr 2014 - 12:22 pm | धमाल मुलगा

आयला! हे पुस्तक वाचून जी कोण डिनरडेटचे निष्कर्ष काढत बसेल ती बहुतेक आयुक्षभर डिनरडेट्सच करत बसेलसं दिसतंय.
मुद्दा क्र.२० आणि ३० = काहीही केलं तरी गडी नापासच.
मुद्दा क्र.२८ आणि २९ = तरीही नापासच.

थोडक्यात, इथून पुढे (जर कधी संधी..हे आपलं.. वेळ आलीच तर!) डिनरडेटला जाण्यापुर्वी जिच्यासोबत डेट आहे तीने हे पुस्तक वाचलेलं नाही ह्याची खातरजमा केल्याशिवाय हाटेलात पाय टाकणे नाही! हौ ना राव. सगळं व्यवस्थित करुन सवरुन फुकट इज्जतीचा पंचनामा करुन घ्यायला कुणी सांगितलंय? म्हणजे, तेलही जाणार, तूपही जाणार अन समोरचा कानफाडात मारुन हातातलं धुपाटणंही काढून नेणार! ;)

तुमचा अभिषेक's picture

27 Apr 2014 - 1:57 pm | तुमचा अभिषेक

मुद्दा क्र.२० आणि ३० = काहीही केलं तरी गडी नापासच.
मुद्दा क्र.२८ आणि २९ = तरीही नापासच.

वरवर कन्फ्यूजिंग वाटत असले तरी सोप्पय ते.
पहिले म्हणजे शक्यतो संभाषणाचे वेटेज ५०-५० टक्के वा त्याच्या जवळपास हवे. एकच जण बोलतोय आणि एका काहीच नाही असे टाळावे. समोरच्या मुलीलाही बोलायची आवड असेल आणि तिला बोलायला नाही दिले तर तिची प्रचंड चीडचीड होणारच. त्यामुळे बोलायलाही द्यावे आणि काय बोलतेय ते ईंटरेस्ट घेऊन ऐकावेही, हे महत्वाचे अन्यथा इकडे तिकडे लक्ष दिल्यास तिच्या मनात समोरच्या टेबलावरचा ग्लास उचलून तुमच्या डोक्यात मारावा असे विचार येण्याची संभावना असते.

जर तिला ऐकण्यातच रस जास्त असेल तर मात्र तिला ऐकण्यात ईंटरेस्ट आहे अश्याच विषयांवर बोलावे. पण आपल्याला जे बोलता येते आणि जे विषय आवडतात त्यात त्या मुलीला ईंटरेस्ट नसेल तर तिने आपल्याला बाद करायच्या आधी आपणच तिला बाद करावे. पहिल्याच भेटीत उगाचच्या उगाच स्वताचेच पुराण लावणे टाळावे. कोणीही बोर होणारच. हे दुसर्‍या तिसर्‍या चौथ्या भेटींसाठी ठेवावे. पण जर ती मुलगी आधीच आपल्या प्रेमात असेल तर मात्र तिला हे आवडू शकते.

तळटीप - लग्नासाठीच डेटींग असेल तर स्वता जसे आहोत तसेच वागणे कधीही चांगले. पण एखाद्या मुलीला भेटताना आपल्याला काही गोष्टींचे तारतम्य बाळगता येत नसेल तर ती नक्कीच सुधारणेची जागा आहे.

हि एकमेकांशी बोलण्याची ट्यूनिंग जमली की खरे तर इतर बर्‍याच गोष्टी गौण असतात.
आमचे स्वताचेही इतर सर्व गोष्टी एकमेकांशी जराही मिळत्याजुळत्या नसून या एका मुद्द्यावर जुळले आहे.

धमाल मुलगा's picture

27 Apr 2014 - 7:30 pm | धमाल मुलगा

आहोऽऽऽ....तो माझा एक इनोद करण्याचा केविलवाणा (आणि आता बहुधा निष्फळ) प्रयत्न होता हो!

इतक्या होपलेसली रोम्यांटिक बाबी इतक्या शिरेसली घेऊ नका जी. त्यात आणि मी बोलत असेल तर बिलकुलच नको. :)

तुमचा अभिषेक's picture

27 Apr 2014 - 8:41 pm | तुमचा अभिषेक

चालतं हो, जसे वाचन कधी फुकट जात नाही तसे लिखाणही कधी फुकट जात नाही :)

तेलही जाणार, तूपही जाणार अन समोरचा कानफाडात मारुन हातातलं धुपाटणंही काढून नेणार! Wink

वाट्टेल त्या अतिरेकी म्हणी बनवू नकोस =))

अहो, आजच्या जमान्यातील सत्य म्हण आहे ही!

मेल्या धम्या, नायतरी तुका काय करुची आसा ही म्हायती!

मृगजळाचे बांधकाम's picture

27 Apr 2014 - 12:58 pm | मृगजळाचे बांधकाम

पुस्तकाच्या लेखकाशी सहमत.

प्यारे१'s picture

27 Apr 2014 - 1:18 pm | प्यारे१

ह्यातनं २-४ गोष्टीच शिल्लक राहत असतील नै?
आपल्याला काही 'आनभव' नाय ब्वा!

प्रसाद गोडबोले's picture

27 Apr 2014 - 2:51 pm | प्रसाद गोडबोले

काहीच्या काही अव्वाच्यासव्वा निष्कर्श काढलेत

(४) जो काटाचमचा-चमचा न वापरता हाताने अन्न ओरपतो.

=)) हे तर कहरच आहे ...

पाश्चात्यांत हाताने खाण्याकडे विशेषता: चारचौघात (fOrmal भेटीत ) खरच गर्हणीय मानले जात असावे . माझ्या मुलीच्या मैत्रिणीचे आई (Indonesian) अन वडील (कॉकेशिअन) आले असताना मी चुकून मटन तसे(हाताने ) खाल्ले होते कारण फार मोठे तुकडे असलेले मटन त्या दिवशी केले होते :( पण त्या लोकांना जेवण तर निट गेलेच नाही परत नंतर त्यांनी आमच्याबरोबर्चे संबंध अत्यल्प करून टाकल्याचे स्मरते. :( :( तेव्हापासून मी धडा घेतला आहे.

प्रसाद गोडबोले's picture

27 Apr 2014 - 3:09 pm | प्रसाद गोडबोले

मग त्यांना घरी बोलवुन एकदा वरणभात आणि आळुची भाजी असा बेत करायला हवा होता ... अशी अळुची भाजी ओरपुन खाताना पाहुन ते चक्कर येवुनच पडले असते =))

बाकी माज्या मते तर आपण जिथल्या तिथल्या प्रथा पाळाव्यात ... मला तर चायनिज चॉप्स्टिक्सनेही अगदी व्यवस्थित जेवता येत पण ते केवळ चायनिज (चायनिज चायनिज : ऑथेन्टीक चायनिज) रेस्टरों मध्येच !
आणि आजही उत्तपम काटाचमचाने खाणार्‍यांची कीवच वाटते मला :)

पैसा's picture

27 Apr 2014 - 3:09 pm | पैसा

म्हणजे डिनरडेटला सगळे सैधिंडियन्स पार नापास होणार की! ते भाताचे गोळे आणि कोपरापर्यंत येणारे सांबार एखाद्या गोर्‍या मडमेने पाहिले तर ती चपला पर्स तिथेच टाकून पळ काढेल ना राव!

कोपरापर्यंत येणारे सांबार एखाद्या गोर्‍या मडमेने पाहिले तर ती चपला पर्स तिथेच टाकून पळ काढेल ना राव!

हाहाहा लई म्हंजी लई खरं आहे!!! Traumaa होउन बसायचा त्याना ;)

विजुभाऊ's picture

28 Apr 2014 - 1:36 am | विजुभाऊ

ते भाताचे गोळे आणि कोपरापर्यंत येणारे सांबार
या पेक्षा कहर म्हणजे.
भाताचे गोळे आणि दोन बोटांधून पिचकारीप्रमाणे पाझरणारे सांबार

खटपट्या's picture

28 Apr 2014 - 5:12 am | खटपट्या

अगागागा !!!!

मृगजळाचे बांधकाम's picture

27 Apr 2014 - 3:30 pm | मृगजळाचे बांधकाम

डाव्या हाताने भर पंगतीत भाताचे डीघारे ओरप्नाऱ्या लोकांबाबत तुमचे सर्वांचे काय मत आहे =))

भारतीय रेस्तरांत मी भाजी पोळी हाताने खात असताना शेजारच्या टेबलावरील हामेरिकन कुटुंब डोळ्याच्या कोपर्‍यातून बघत होते. त्यांनी प्रयत्न केला पण जमले नाही. मग खांदे उडवून त्यांनी पोळीचा रोल करून पालक पनीरात डिप असल्यासारखा बुडवून खायला सुरुवात केली. शाकाहारी असल्याने नॉनव्हेजीय पदार्थांशी कुस्ती खेळत खाण्याचा प्रसंग माझ्यावर आला नाही पण दोसा मऊ असल्यास काटा सुरीने जास्त चाम्गल्या पद्धतीने खाता येतो असे मत बनले आहे. तसाही पपडासारखा दोसा खाउन समाधानही होत नाही.
शुचीमामी, वरील सर्व यमनियम वाचून भूक जाईल एखाद्याची, किंवा यासगळ्यात जेवायचे कधी? असा प्रश्न पडेल. बिले देण्यास मी मागेपुढे पहात नाही. नवर्‍याला प्रेमाने सांगते की बाबारे तू कमावतोस तर निदान बील तरी माझ्या कार्डाने भरू देत! तो नाही म्हणत नाही. ;)
पण मामांच्याबाबतीत तुला आलेले अनुभव लिही म्हणजे मणोरंजण होईल. ;)

स्वप्नांची राणी's picture

27 Apr 2014 - 7:28 pm | स्वप्नांची राणी

>>> नवर्‍याला प्रेमाने सांगते की बाबारे तू कमावतोस तर निदान बील तरी माझ्या कार्डाने भरू देत! तो नाही म्हणत नाही. >>>> रेवती....डिट्टो...!!! *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol

धमाल मुलगा's picture

27 Apr 2014 - 7:37 pm | धमाल मुलगा

काकांच्या नशिबाचं नेहमीचं कौतुक वाटत आलं आहे, आज मात्र हे वाचून आनंदानं डोळेच पाणावले. :)
काकू तुस्सी ग्रेट हो! भार्रऽत माताऽऽ की ज्जय!!!!

तुमचा अभिषेक's picture

27 Apr 2014 - 8:38 pm | तुमचा अभिषेक

मग खांदे उडवून त्यांनी पोळीचा रोल करून पालक पनीरात डिप असल्यासारखा बुडवून खायला सुरुवात केली.

सेम असाच अनुभव आपल्याइथे वाशीच्या मॉलमध्ये घेतलाय. एक आफ्रिकन कपल भगत ताराचंदची वेज थाळी घेऊन आता ती कशी खायची या विचारात होते. पाहिले तर त्यातील हिरो असाच चपातीचा रोल करून डाळीत डुबुक डुबूक करून खाऊ लागला, आणि भाजी राहिली बाजूलाच. एक तर त्याला तसे डाळचपाती खाण्यात मजाही येत नसणार आणि चपातीबरोबरच डाळ संपवली तर भाताबरोबर हा भाजी खाणार की त्यात ताक ओतणार. पण जे काही करेल त्यानंतर परत आपल्या देशात जाऊन भारतीत फूड ला नावे मात्र नक्की ठेवणार हे दिसून आल्याने मी देश के इज्जत क सवाल है बोलत लागलीच त्याच्या मदतीला धावलो. सुदैवाने आम्हीही तशीच एक वेज थाली मागवली असल्याने त्याला समजावणे सोपे पडले. बरेपैकी जमले त्यांना !

स्पंदना's picture

28 Apr 2014 - 7:32 am | स्पंदना

भर हो भर!! अशी हजारो बिलं भरत जा गो रेवक्का!! :)) :))
पाहिलतं? पाहिलतं? आमच्या रेवाक्काच मन किती मोठठ आहे ते? :))

पण मामांच्याबाबतीत तुला आलेले अनुभव लिही म्हणजे मणोरंजण होईल.

रेवती, खालती सुहास यांच्या प्रतिसादास , उप-प्रतिसादात आमचे कसे जम्ले ते लिहीले आहे. इच्छा असल्यास तुझे अनुभव शेअर कर :) .... मजा येते गं अन माहीते सगळ्यांच्या शेअरींगमधून एक सम्यक अनुभव मिळतो.

होय, तुझा वाचला अनुभव. चिकन नगेटस खातात का असे पहिल्या भेटीत! ;)
आमचे लग्न ५ मिनिटात ठरल्याने (व पुरती ओळख होण्याच्या आत झाल्याने)अनुभव असे काहीच नाहीत. लग्नाआधी एकदा बाहेर जेवायला गेल्यावर जेवताना गप्पा मारून विषय संपले मग बील येईपर्यंत बोलायला काही उरले नसल्याने गप्प बसून होतो दोघेही. फारशी ओळख नसल्याने काय बोलायचे हा प्रश्न! बील नवर्‍यानेच दिले व भाजीपोळी टाईप जेवण होते त्यामुळे खमंग किस्से नाहीत. एकंदरीतच माझे लग्न इतक्या नेहमीच्या आणि साध्या पद्धतीने ठरले की "अय्या, असं झालं का? " टाईप किस्से नाहीत. शिवाय तो स्वभावानेच शांत असल्याने फार काही विषय नसतात, व काहीतरी बोल बाबा आता असे एकदोनदा म्हणून मी पस्तावले. विश्वनाथन आनंदशिवाय विषय नसतो. सुदैवाने आम्ही तमिळनाडून रहात नाहीये ही देवाची कृपा! मी मात्र जगभराच्या गप्पा मारत असते.

प्यारे१'s picture

28 Apr 2014 - 9:32 pm | प्यारे१

हम्म्म्म!

चिकन नगेटस खातात का असे पहिल्या भेटीत!

दुसरी भेट होती कारण पहीली सासू-सासरे व आई-बाबा अन मॅरेज ब्युरोतील एका व्यक्तीच्या समक्षच झाले. त्याचे पहीले वाक्य होते "त्याला म्युझिकचे व्यसन आहे" अन लगोलग माझे वाक्य होते "आणखी कोणती व्यसने आहेत आपल्याला?" त्यावर तो खूप हसला होता :) ..... वन ऑफ सम रियली फॉन्ड मेमरीज ऑफ दोस डेज!!! :)

शिवाय तो स्वभावानेच शांत असल्याने फार काही विषय नसतात, व काहीतरी बोल बाबा आता असे एकदोनदा म्हणून मी पस्तावले.सुदैवाने आम्ही तमिळनाडून रहात नाहीये ही देवाची कृपा! मी मात्र जगभराच्या गप्पा मारत असते.

हाहाहा

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2014 - 6:43 pm | अत्रुप्त आत्मा

बाप रे........!!!

डेटींग हे प्रकरण असलं भयंकर असतं होय! http://www.sherv.net/cm/emo/hearts/sick.gif
आमस्नी तर ह्ये सम्दं मुळ्ळीच खरं वाटत नाय. तिच्यायला,आम्च्या घाटावर..खेड्यापाड्यात सुदीक..पोरं पोरी कालिजात वळख होऊन..कुटतरी चिचच्या झाडाखाली,न्हायतर ओढ्याकाठी..येकदम्म पिरेमाच्या फुल्ल करंटमदी येऊन..कुनी हाकायला येत न्हाई..तो परेंत गुलुगुलु..गुलूगुलू करत्यात.. त्ये ह्या डेटिंग का फेटींग परास लै फर्मास!!! http://www.sherv.net/cm/emo/hug/cute-hug.gif आनी माणशिक आरोग्यास अत्यंण्त लाबदायक! http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/happy-love-heart-smiley-emoticon.gif
काय म्हण्न्ता???

आत्मशून्य's picture

27 Apr 2014 - 10:03 pm | आत्मशून्य

हे वाचावं लागलं यातच सर्व आले.

शुचि's picture

27 Apr 2014 - 11:43 pm | शुचि

:)

आत्मशून्य's picture

28 Apr 2014 - 2:11 am | आत्मशून्य

जोडिदाराला फरक पडत नसावा.

आपण डेलिक्सि व जोडिदाराचा सेल्फ रिस्पेक्ट किती जपतो आणी काय धमाल करतो इतकेच महत्वाचे आहे. छोटसेे उदाहरण देतो, एकी सोबत Sndt रोड वर फिरत होतो, नुकतच स्वाद मधून बाहेर आलो होतो, तोच खिशात एक्लेअर्स सापडले, लगेच तोंडात टाकले व रेपर रस्त्यावर सोडुन दिले. लगेच मंजूळ आवाज कानी... असा रस्त्यावर कचरा कसा टाकतोस ? मी लगेच ते वेष्टन उचलून खिशात कोम्ब्ले. पुन्हा मंजूळ आवाज GOOD BOY. मी सांगितले म्हणून एकाही मुलाने आज पर्यंत लगेच असे काही परत उचलले नाहिये. तु GOOD BOY आहेस. ती प्रतिक्षिप्त क्रिया होती स्त्रीमन दुखावु नये म्हणून केलेली. पण अर्थात व्यक्ती परत्वे हे आपोआप करावेसे वाट्ने सुधा महत्वाचे असते.

उगा बिल बघून चेहरा कसा केला, काटा चमचा वापरला की नाही यागोष्टी वरील चेमिस्त्री साध्य झाल्यास गउन ठरतात.

प्रभाकर पेठकर's picture

28 Apr 2014 - 1:44 am | प्रभाकर पेठकर

बापरे! हल्ली असे 'नियमानुसार' प्रेम करावे लागते? बरं झालं आमच्या काळी हे कांही नव्हतं. बटाटेवडा (हो 'टे' वडा), वडा पाव, मिसळ पाव, व्हेज सँडविच, कांदा-बटाटा-मिरची भजी, चहा-पाव वगैरे वगैरेंवर आमचं प्रेम जोपासलं, फोफावलं आणि लग्नाच्या जाळ्यात जाऊन अडकलं ते आजतागायत. आजही बरेचसे पदार्थ हाताने आणि पाण्याचं भांडं तोंडाला लावून पिण्यातच सुख मानतो. अगदी गोर्‍यांच्या देशात जाऊनही. आपल्या भारतात येऊन्/राहूनही ते हाताने जेवायला शिकले नाहीत तर त्यांचेच स्वदेश प्रेम लक्षात ठेवून मी ही कधी माझ्या देशाच्या चालीरिती, निदान त्यांना रिझवायला तरी, सोडल्या नाहीत.

राजेश घासकडवी's picture

28 Apr 2014 - 8:23 am | राजेश घासकडवी

च्यायला,
- दहा नियम बिलाविषयी आहेत.
-पाच नियम गप्पा मारण्याविषयी आहेत.

निष्कर्ष - स्मार्ट विमेनांना हा माणूस आपल्याशी बोलतो कसा यापेक्षा दुप्पट हा बिल कसा देतो याविषयी पडलेली असते.

शुचि's picture

28 Apr 2014 - 5:00 pm | शुचि

हाहाहा डाटा analysis केलात का लग्गेच? :)

बाबा पाटील's picture

28 Apr 2014 - 1:02 pm | बाबा पाटील

आपल्याला बापजन्मी जमणार नाही.जेंव्हा कधी कुठल्या ललनेबरोबर मोठ्या हाटीलात हादडायचा टाइम आला तेंव्हा तेंव्हा तिला अगोदर टपरीवरचा चहा पाजला होता,त्यामूळे असला काय शानपणाचा विषय कोनी केलाच नाय.आणी कॉलेजात असतानातर बाई गाडी माझी,पेट्रोल मी टाकतो,हव तर अख्या महाराष्ट्रार फिरु खायच प्यायच डीपार्ट्मेंट तुझ.त्यामुळे फारसे काही प्रॉब्लेम आलेच नाहीत.

आणी कॉलेजात असतानातर बाई गाडी माझी,पेट्रोल मी टाकतो,हव तर अख्या महाराष्ट्रार फिरु खायच प्यायच डीपार्ट्मेंट तुझ.त्यामुळे फारसे काही प्रॉब्लेम आलेच नाहीत.

हाहाहा :)

सुहास..'s picture

28 Apr 2014 - 1:29 pm | सुहास..

डिनरडेट चा अनुभव नाsssssssssssssssé ही ...

बाकी शुचिमामींचा काही अनुभव असल्यास आम्हाला वाचायला काही हरकत नाही ..धन्यवाद !!

हाहाहा फार काही अनुभव नाही.

माझ्या बी एस सी नंतर, नवरा मुंबईहून मला पहायला पुण्यात आलेला तेव्हा मी भला मोठा गॉगल लावून लुनावरुन आलेले. अजूनही नवरा म्हणतो अगं केवढा मोठा तो गॉगल, संपूर्ण चेहराभरच की. (अन तेव्हा मी समजत होते गॉगलमध्ये मी स्मार्ट दिसते आहे ;) )आम्ही फर्ग्युसन टेकडीवर गेलो, गप्पा मारल्या अन मग फर्ग्युसनच्या समोर तेव्हा व्हेन्कीज होते तिथे आईस्क्रीम सोडा अन चिकन नगेट्स मागवले होते. गप्पा चांगल्या रंगल्या होत्या. सोडा अफलातून होता. मला तो आवडलेला. माझा होकार होता पण याने १ वर्ष घेतलं होकार कळवायला. तोपर्यंत मी आय आय टी मध्ये अ‍ॅड्मिशन घेतली होती पण त्याला विसरले नव्हतेच नव्हते.

आत्मशून्य's picture

29 Apr 2014 - 6:53 am | आत्मशून्य

Friendships of women have usually been not
merely unsung , but mocked, belittled and
falsely interpreted.

दाट संशय येतोय हे सहितले वाक्य याच What Smart Women
Know पुस्तकातील असावे.

शुचि's picture

29 Apr 2014 - 6:54 am | शुचि

No no. It's from a different book :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Apr 2014 - 9:43 am | ज्ञानोबाचे पैजार

पुस्तकाचे शिर्षकच गंडलेले आहे

किंवा

पुस्तक खपावे म्हणुन प्रकाशकाच्या डोक्यातुन निघालेली भन्नाट आयडिया आहे.

हाहाहा पैजारबुवांना म्हणायचे आहे की smart अन वुमन शी द्विरुक्ती कशाला? ;)

कवितानागेश's picture

29 Apr 2014 - 12:34 pm | कवितानागेश

गमतीदार प्रकार आहेत. यातला १४वा प्रकार मी आणि माझा नवरा दोघे रेग्युलरली करतो. १०वा प्रकार मीच कधीतरी करते आणि २४वा प्रकार नवरा कायम करतो. :)

खाण्याचं राहू देत हो...पहिल्या भेटीत मी मुलीच्या मराठी व्याकरण, उच्चारांच्या चुका काढेन की काय याची भीती वाटते आताशा. माझं नावंच ही चूक काढायला पहिलं कारण ठरु नये ही ईश्वरचरणी प्रार्थना!! ;)

काही अंशी आम्हांसही तीच भीती वाटते.

(अंध जेवणतारखेवर जाण्यास उत्सुक) बॅटमॅन.

समीरसूर's picture

29 Apr 2014 - 3:45 pm | समीरसूर

यातलं बहुधा मी काहीच करणार नाही पण सणसणीत अपवाद क्र. ४!

काही पदार्थ हातानेच खायला मजा येते. इन फॅक्ट, आपले जेवण काटा-चमच्याने कसे जेवावे? डाळगंडोरी, भरीत, भाकरी, शेवभाजी, सावजी चिकन, उकडलेल्या बटाट्याची लालेलाल रस्सा असलेली भाजी (भूक लागली राव!), इत्यादी स्वर्गीय पदार्थ काटा-चमच्याने कसे बरे खायचे? आणि तसा प्रयत्न करणे देखील अपमान आहे; त्या पदार्थांचा! रात्री १२ वाजताची वेळ आहे; पिक्चरचा शेवटचा खेळ झाल्यानंतर मित्रांचे टोळके घरी जायला निघाले आहे. थंडी कपड्यांमधून शिरून बोचते आहे. 'मैं खिलाडी तू अनाडी' बघून लक्ष्मीनारायण टॉकीजवरून दोन-तीन दुचाक्यांवर स्वार होऊन तुम्ही रस्त्यावर घरंगळत जात आहात. "च्यायला, भूक लागली राव!" असं कुणीतरी कोकलतं. मग तुम्ही गाड्या स्वारगेट बसस्थानकाजवळ हळू करता. बाहेरच्या गाड्या तुम्हाला प्रेमळ साद घालतात. गरमागरम भुर्जी, भाजलेला पाव कळकट ताटल्यांमध्ये घेऊन तुम्ही चापायला सुरुवात करता. भूक शमेपर्यंत पावाचा रतीब सुरु असतो. लागल्यास अजून एक डबल भूर्जी मागवता. जठराग्नी शांत झाल्यावर गाड्यांवर निवांत बसून चहाचे घोट घेत घेत बिड्यांचा धूर सोडत गप्पा ठोकत बसता. बाकीचं जाऊ द्या पण हा भुर्जी-पाव काटा-चमच्याने खाणार कसा? तो गाडीवाला गाडी तशीच सोडून पळून जाईल. :-)

बाकीच्या मुद्द्यांशी लई वेळा सहमत.

नानबा's picture

29 Apr 2014 - 4:36 pm | नानबा

इकडे सिडनीत चायनिज मैत्रिणीसोबत हाटेलात गेलो, तर वेटरने ऑक्टोपस सलाड आणि नूडल्सच्या बाऊल्स सोबत त्या खायला लाकडी कांडक्या (चॉपस्टीक का कसलीशी अवदसा) आणून ठेवल्या.
आमची परिस्थिती छोटी सी बात मधल्या चायनिज हाटेलात गेलेल्या असरानीसारखी. :))

शुचि's picture

29 Apr 2014 - 4:37 pm | शुचि

असरानी की अमोल पालेकर?

नानबा's picture

29 Apr 2014 - 4:55 pm | नानबा

अमोल पालेकर होण्याचं आमचं नशीब कुठे?

अच्छा !! तुम्ही सिडनीत मयतरणीसोबत हाटेलात जाता तर !! ;)

हाहाहा असा वाक्य दोहरायला (मराठी शब्द?) लावणारा खवचट प्रश्न विचारणे हा सूड मोडच झाला आहे. मी पहिल्यांदा लंबूटांग यांच्या प्रतिसादानंतर पाहिला व आता परत :)

मराठी शब्दः पुनरावृत्ती (?)

शुचि's picture

29 Apr 2014 - 4:54 pm | शुचि

yesss!!!

बाकी मोड मिपावरचा जुनाच आहे हो!! कधीतरी मी आपला उसना आणतो. ;)

नानबा's picture

29 Apr 2014 - 4:56 pm | नानबा

मयतरणीसोबत हाटेलात. ते पण चायनिज.. ;)

काय चायनिज नानबा, मयतरीण का हाटेल? =))))

काय चायनिज नानबा, मयतरीण का हाटेल?

दोन्ही... :)

काय चायनिज नानबा, मयतरीण का हाटेल?

दोन्ही... :)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2014 - 6:50 pm | अत्रुप्त आत्मा

@मयतरीण का हाटेल?>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif स'खोल सुडूकची.अचूक धडूक! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

(२२) एकाच खानावळीत/रेस्तोरन्त मध्ये गेली १० वर्षे आपण कसा एकच पदार्थ मागवतोय याच्या कहाण्या जो तुम्हाला ऐकवतो.

यावरून तर पोरगा पोरीशी एकनिष्ठता पाळू शकतो असंच वाटत... १० वर्षे बिच्यार्याची खायची सुद्धा टेस्ट बदलत नाही तर बाकी तर सोडाच ;)

शुचि's picture

29 Apr 2014 - 5:34 pm | शुचि

हे बाकी खरे बरका :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Apr 2014 - 1:50 am | निनाद मुक्काम प...

माझ्या मते काही पदार्थ हे हाताने खाण्याचे असतात तर काही काटा चमच्याने
चपखल उदाहरण द्यायचे तर मेकडोनाल्ड चे बर्गर व के एफ सी चे चिकन हे जगाच्या पाठीवर कोठेही हाताने खातात मात्र जगाच्या कोणत्याही पंचतारांकित हॉटेलात बर्गर हा सर्व करतांना काटा चमचा देतात .आणि त्याने खातांना मी माणसे पहिली आहेत.
परदेशात भारतीय उपहार गृहात गोरेच काय पण भारतीय सुद्धा भात व बिर्याणी चमच्याने खातात.
मला आमच्या घरी चमच्यानेच खावा लागतो.
पण हा अपवाद वगळता , डोसे , ते नान हे हाताने खातात.
आम्हाला हॉटेल व्यवस्थापनाच्या पहिल्या वर्षाला टेबेल मेनेर्स शिकवत असतांना एका चुकार मुलाचे लक्ष नव्हते ते पाहून आमचे सर त्याला सणसणीत पारशी शिवी हासडून म्हणाले ,ह्या कोर्स मध्ये शिकवली जाणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी ना कधी तरी उपयोगी पडणार ,