चित्रगुप्त उवाच:
दिल्लीचा उन्हाळा, आणि वेळ दुपारी चारची ठरलेली. आम्ही तिघे, म्हणजे विवेक पटाईत, अरूण जोशी आणि मी बरोबर एकाच वेळी 'त्रिवेणी कला संगम' या ठरलेल्या ठिकाणी पहुचलो. तिथल्या उघड्या आभाळाखालच्या उपहारगृहामध्ये बसावे असा विचार करून तिकडे मोर्चा वळवला, पण संध्याकाळी रम्य वाटणारी ती जागा अजून चांगलीच गरम होती. मग आता कुठे जावे, असा विचार करत एक-दोन जागा बघून शेवटी एक-दीड किलोमीटर अंतरावर असणार्या नवनिर्मित 'महाराष्ट्र सदन' मध्ये पहुचलो.
भव्य इमारत, पार्किंगची उत्तम सोय, झाडांनी वेढलेला परिसर, आत गेल्यावर एकदम चकाचक संगमरवरी फरशी, वेलबुट्टीचे खांब-झरोके, भिंतीवर लावलेल्या कलाकृती, शाहू महाराज, अहिल्याबाई इत्यादिकांचे पुतळे, शांत, स्वच्छ, वातानुकूलित विस्तीर्ण दालन, गुबगुबीत सोफे, मुख्य म्हणजे अजिबात गर्दी नाही, हे सर्व बघून सर्वजण अगदी सुखावलो. त्यातून दिल्लीत अभावाने मिळणारे मराठी खाद्यपदार्थ माफक किंमतीत उबलब्ध असल्याचे बघून बरे वाटले. प्रशस्त मोकळ्या भोजन-कक्षात त्यांचा आस्वाद घेत गप्पा सुरु झाल्या.
एकमेकांचा परिचय - म्हणजे अगदी लहानपणापासूनच्या आठवणी सांगण्यात प्रत्येक जण रमून गेला, आणि सहसा कुणाला सांगितल्या न जाणार्या अश्या आठवणीही मोकळेपणाने सांगू लागला. चित्रकला, साहित्य, इ. पासून राजकारण वगैरे पर्यंतचे नाना विषय, आणि अर्थातच मिपावरील लेखनाची गम्मत, अश्या गप्पा चांगल्या चार-पाच तास रंगल्या. शेवटी तिथेच भोजन आटोपून, आता दर महिन्यात असा कट्टा करायचा, असे ठरवून आम्ही निरोप घेतला.
सुरुवातीच्या जागा शोधण्याच्या भानगडीत त्रिवेणी परिसरात असलेली आठ-दहा कलादालने बघण्याचे मात्र राहूनच गेले,
चला, पुढल्या वेळी.
अरूण जोशी उवाच:
तसा दिल्लीच्या कट्ट्यावरचा हा लेख केवळ ऐसीअक्षरे व मिसळपाव या दोनच संस्थळांवर प्रकाशित होत आहे, पण तरीही मी इथे 'मराठी संकेत स्थळे' असा शब्द वापरेन. विविध मसंस्थांवरील वेगवेगळ्या भागातील कट्टे पाहून अगदी जळायला झाले होते. पुण्या मुंबईत तर अनेक कट्टे झाले आहेतच, विदेशातही झाले आहेत हे पाहून माझ्या मनात आमच्या दिल्लीत एक कट्टा का नको असा इर्ष्यात्मक विचार १-२ महिन्यांपूर्वी येऊन गेला होता. चित्रगुप्त यांनी स्थळ, दिवस, वेळ ठरवून एकहाती सारे कोऑर्डीनेशन केले आणि अखेर त्रिसदस्यीय कट्टा काल संपन्न झाला. विवेकजी, चित्रगुप्त नि मी.
तर विवेकजींनी चित्रगुप्तना पाहताच 'अरे, तुम्ही चित्रगुप्त ना, मग आपण ही गॅलरीतली चित्रेच जरा पाहून घेऊ' असे भेटल्यावर पहिल्या मिनिटातच सुचवले. 'नक्कीच' म्हणत आम्ही एका दालनात घुसलो. 'कलादालनात चित्रे पाहणे' कशाशी खायचे असते हा प्रकार मला ठाऊक नव्हता, म्हणून मी त्यांना माझ्या स्टाईलने विचारले कि कोणत्याही एका चित्रात नक्की काय पाहायचे ते सांगाल तर ते मी सगळ्या चित्रांचा आस्वाद घेऊ शकेन. त्यांच्या उत्तराला सुरुवात होईतो विवेकजींची चित्रे पाहून झाली होती नि आम्ही कॅफेटेरियाच्या प्रांगणात गेलो. तिथे १-२ फोटो काढेपर्यंत जाणवले आज दिल्लीत अधिकृतरित्या ह्यूमिडिटी चालू झाली आहे. मग आम्ही कष्टाने पार्क केलेल्या गाड्या काढून तानसेन रोड ते कोपरनिकस रोडवरील महाराष्ट्र भवन असा प्रवास केला. तिथे रखवालदाराने आम्हाला आता इथे कोणतेही कँटीन नाही, तुम्ही कस्तुरबा गांधी मार्गावरील नव्याने बनलेल्या महाराष्ट्र सदनात जा असे सांगीतले. त्याच्यावर विश्वास न ठेवण्यात आमचा बराच वेळ गेला. शेवटी ४ चा कट्टा ४.४५ ला सुरु झाला. पण जागेचा शोध 'वर्थ इट' होता. विदेशातले माहित नाही, पण भारतात मसंस्थकरांचा इतक्या चांगल्या जागी कट्टा झाला नसावा हा विचार सुखावून गेला.
या कट्ट्यात आम्ही तिघेच असल्याने आईस्ब्रेकिंग व्हायला नि मनमोकळेपणाने सगळ्या चर्चा चालू व्हायला किंचितही वेळ लागला नाही. 'चित्रकलेने आम चित्रकाराचे घर चालू शकते का?' या टिपिकल इंजिनिअरिंगची मानसिकता दर्शविणार्या माझ्या प्रश्नाला चित्रगुप्तजींनी मार्मिक उत्तर दिले. त्यात 'त्या काळी मी इंजिनिअरिंग २ वर्षांत सोडून देऊन चित्रकलेचाच कोर्स चालू ठेवला' हा षटकारही होता. या दोन प्रभृती, म्हणजे चित्रगुप्त नि विवेकजी, सुरुवातीला बोलत असताना, मी दिल्लीत इथे होतो, तिथे होतो असे एकमेकांना सांगत असताना, 'त्या देशपांड्यांना ओळखता का?', 'पोतदारही तिथे होते ना तेव्हा? ' असे प्रश्न विचारू लागले, आणिबरेचसे लोकआमच्या ओळखीचे निघू लागले.
दोहोंना संस्कृतचे नि महाभारताचे ज्ञान आणि गोडी असल्याचे जाणवले. चित्रगुप्तांच्या महाभारत कथांवरील लेखांवर, ज्यांत ते भूतकाळच बेमालूमपणे बदलतात, विवेकजींच्या क्षणिकांवर, ज्यांत ते महाभारत सद्य राजकारणांत उतरवतात नि माझ्या ऐसीवरील 'लढवय्या प्रतिगामीत्वाबद्दल' रोचक चर्चा झाली. पुढे काय लिहायचे आहे यावरही चर्चा झाली. विवेकजींना मराठीत कादंबरी लिहायची आहे, चित्रगुप्तना बरेच काल्पनिक ऐतिहासिक, पौराणिक, घटनाक्रम त्यांना सुचतात तसे लिहायचे आहेत नि मला बिझनेस आणि अर्थशास्त्र इ बद्दल लिहायचे आहे असे सामोरे आले. (तरी) विवेकजींचे भारताच्या सार्या प्रमुख प्रकल्पांचे ज्ञान मला मोहवून गेले.
दिल्लीत (किंबहुना अगदी अमेरिकेच्या मानानेही) मराठी लोक कमी असावेत. त्यात ही ते स्थानिक संस्कृतीशी मिसळून गेले आहेत. आणि त्यामुळे ते सम-मूल लोकांशी बोलायला थोडे जास्त आसुसलेलेअसावेत. याचा परिपाक म्हणून कि काय आम्ही खूप वेळ कौटुंबिक चर्चा केली. आम्ही माळवा, मराठवाडा नि विदर्भ अशा वेगळ्या मूळ जागचे, या सर्व गप्पात ४-५ तास कसे गेले ते कळले नाही. मे मधे पुढचा कट्टा निश्चित ठरवून आम्ही रात्री ९ च्या आसपास समारोप घेतला. पुढच्या वेळेस सगळ्याच मसंस्थवर पोहोचण्याचा प्रयत्न असेल.
काही फोटो:
१. (डावीकडून)विवेक पटाईत आणि अरुण जोशी, त्रिवेणीच्या प्रांगणात
२ व ३. महाराष्ट्र सदनातः चित्रगुप्त, विवेक पटाईत आणि अरुण जोशी.
.
प्रतिक्रिया
27 Apr 2014 - 4:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
वा, वा ! राजधानीत मिपाकट्ट्याची सुरुवातच नाही तर दर महिन्याच्या वेळापत्रकाची नांदी झाली हे विषेश ! आता कधी तिकडे फेरी झाली तर अगोदर सांगून मिपाकट्टा ठरवायची सोय झाली असावी काय ? ;)
लेख आणि फोटो सुंदर आहेत हेवेसांनल !
27 Apr 2014 - 4:55 pm | पैसा
वृत्तांत मस्तच! फोटोही आवडले. सगळ्यांना प्रथमच फोटोत पहाते आहे.
ते महाराष्ट्र सदनही झकास दिसते आहे. दिल्लीत गेल्यावर जाण्याचे एक ठिकाण म्हणून नोंद घेतली आहे.
27 Apr 2014 - 5:27 pm | arunjoshi123
धन्यवाद.
आशय पोहोचला आहे पण सर्वाधिक योग्य वाक्यरचना काय असावी हे मला खूप विचार करूनही सुचत नाहीय. :)
27 Apr 2014 - 7:31 pm | पैसा
मला पण खरं तर सुचलं नाही एग्झॅक्ट काय लिहावं ते. तुम्हाला कोणाला प्रत्यक्ष पाहिलं नाहीच पण तुमचे फोटोसुद्धा पहिल्यांदा पहाते आहे! कारण तुम्ही कोणीच फेसबुकग्रस्त नसावेत बहुधा! :D
27 Apr 2014 - 8:03 pm | arunjoshi123
तसं इग्नोर करता आलं असतं. पण "सगळ्यांना पहिल्यांदाच दारू पिऊन पेंगलं असल्याचं पाहिलं" सदृश वाक्यरचना वाटली म्हणून नोंद केली. शिवाय ते भाषांतरही लांब झालंय, जरा थोडक्यात नेमकं लिहायला कोणाला जमेल का पाहू.
27 Apr 2014 - 10:59 pm | प्यारे१
१.'आपल्या प्रसन्न व्यक्तीमत्वाचे प्रथमच दर्शन झाले'
२.'अरे वा, अरुण जोशी आपणच का?'
आणि आम्च्याकडं
'आज पैल्यांदाच तुम्चं त्वांड (आहे, ह्याऐवजी दुसरा शब्द आहे) बगिटलो!' :)
-हलकं घ्या हो साहेब!
27 Apr 2014 - 11:35 pm | arunjoshi123
"यापूर्वी तुम्हाला कोणाला प्रत्यक्ष पाहिलं नाहीच पण तुमचे फोटोसुद्धा पहिल्यांदा पहाते आहे!"
मधला फोटो हा माहितीचा भाग या तिन्ही वाक्यांत नाही.
28 Apr 2014 - 3:30 pm | सूड
दिल्लीतल्या लोकांचं मराठी अजूनही इतकं नेटकं असल्याचं बघून डोळे पाणावले. ;)
29 Apr 2014 - 4:47 pm | बॅटमॅन
अरे ये अरुणजोशी नै जानता ;)
29 Apr 2014 - 4:51 pm | सूड
आता नै जानता तर नै जानता. मेरा ज्ञान थोडा तोकडा हय रे बाबा !!
29 Apr 2014 - 5:33 pm | बॅटमॅन
परेश रावळच एकदम उभा राहिला डोळ्यांसमोर.
27 Apr 2014 - 4:59 pm | चौकटराजा
नवे सदन तर चकाचक दिसतेय. हा कट्टा मला तरी पॅरिस मधला वाटतोय. चित्रकार व उदरनिर्वाह या वरून पुलं चा एक किस्सा आठवला. रत्नागिरीचे जावईबापूना तिथल्या एकाने विचारले,. "काय करता ?" " गाण्याचे कार्यक्रम !! " ( अभिमानाने)
हो पण पोटापाण्याचा काही व्यवसाय असेलच ना ? ( अभिमानाची ऐशी तैशी ).
बाकी संख्येपेक्षा , स्वादापेक्षा, संवादाला महत्व आहे. व कट्टेकर्याची नावे पहाता तो " लय भारी" झाला असणार यात शंका नाही.
27 Apr 2014 - 5:00 pm | अजया
मस्त वृत्तांत आणि फोटो. महाराष्ट्र सदनही छान दिसतय. एप्रिल महिना मिपाचा कट्टे महिना झाला म्हणायचा !!
27 Apr 2014 - 5:10 pm | प्रचेतस
वृत्तांत आवडला.
दिल्ली वैतागवाणी असूनही जाम भारी आहे. तिथल्या चांदणी चौक, पालिका बझार, करोलबाग ह्या भागात तर फिरायला अतिशय आवडते.
27 Apr 2014 - 9:59 pm | आत्मशून्य
दिल्ली अजिबात वैतागवाणी नाही. मुंबई च्या तुलनेत तर ही शंका स्वप्नातही नको. सभोवताल कसाही असो प्रत्यक्ष दिल्ली मात्र ओएसिस आहे. प्रोपर दिल्लीकर नसूनही दिल्ली वैताग्वानी म्हणणार नाही
27 Apr 2014 - 10:05 pm | प्रचेतस
अस्समतीशी सहमत.
माझ्या मताशी तुमची मते जुळतीलच असे नाही.
27 Apr 2014 - 10:08 pm | आत्मशून्य
हे महत्वाचे.
27 Apr 2014 - 11:31 pm | arunjoshi123
दिल्ली मुंबईच्या तुलनेत कैक पट छान जागा आहे, कैक अर्थानी. व्यक्तिगत कारणानी म्हणा व्यक्तिगत आवडनिवडीने म्हणा मला दिल्ली खूप आवडते नि मुंबई मुळीच आवडत नाही. १०० पैकी मी दिल्लीला ७०-८० नि मुंबईला १०-१५ मार्क देईन.
27 Apr 2014 - 5:19 pm | भाते
वृत्तांत आवडला. फोटो छानच आहेत.
दिल्लीत दरमहा कट्टा होणार हे वाचुन आनंद झाला.
27 Apr 2014 - 5:20 pm | यशोधरा
अरे वा, मस्त! ट्रेकला जाताना दिल्लीला थांबायला लागते. तिथे ३ -३ मिपावाले काका आहेत हे ब्येस! :)
27 Apr 2014 - 5:26 pm | दिपक.कुवेत
कटट्याचा आटोपशीर वृत्तांत छानच.
27 Apr 2014 - 5:42 pm | अत्रुप्त आत्मा
लै भारी
हो कट्टेकरी! 
27 Apr 2014 - 6:16 pm | रेवती
छान वृत्तांत, फोटूही चांगले आलेत. महाराष्ट्र भवनात बरेच वर्षांपूर्वी गेले होते आता बदललेल्या ठिकाणीही भेट देण्यास आवडेल.
27 Apr 2014 - 6:21 pm | शुचि
वृत्तांत अन फोटोही छान आहेत .
:)
27 Apr 2014 - 6:59 pm | llपुण्याचे पेशवेll
वाहवा दिल्लीवर स्वारी. छान छान.
27 Apr 2014 - 7:17 pm | आयुर्हित
छान वृत्तांत व राजधानीकरांचे व महाराष्ट्र सदनाचे फोटो पाहून अगदी भरभरून आले!
मला या तिघात अटकेपार झेंडे लावायला निघालेले मर्द मराठी सरदारच दिसत आहेत!
असेच पुढील छान वृत्तांत पाठवावेत ही विनंती.
27 Apr 2014 - 7:31 pm | मुक्त विहारि
खूद्द दिल्लीत कट्टा!, पण खाण्याचे फोटो न टाकण्याचे प्रयोजन काही समजले नाही.
आपण सगळे ह्या निमीत्ताने भेटलात, ही आनंदाची गोष्ट.
27 Apr 2014 - 9:51 pm | चित्रगुप्त
खाण्याचे फोटो मुळात काढलेच नाहीत, कारण त्यात अगदी खास असे काही नव्हते, म्हणजे पदार्थ चांगले होते, पण घरगुती टाईप.
.
थोडक्यात म्हणजे ते खाऊन असले काही होईल, असे नव्हते:
27 Apr 2014 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरे वा ! या तीन नव्या मिपाकरांची नावे नाही सागितलीत ??? ;)
27 Apr 2014 - 11:01 pm | प्यारे१
आधी ही चित्र... गुप्त करा राव ! =))
आम्हाला कॉम्प्लेक्स येतोय. ;)
27 Apr 2014 - 11:02 pm | चित्रगुप्त
अरेच्चा, ओळखले नाहीत काय?
गोलूबाळ, फॅटमॅन आणि विक्षिप्त-मेघडंबरी.
27 Apr 2014 - 11:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
28 Apr 2014 - 7:23 am | चौकटराजा
बा बो ! या तिघांच्या कट्ट्याचा वृतांत यायलाच पाहिजे . हो खी खी खी खी नई फॅटमॅन ?
28 Apr 2014 - 9:13 am | इरसाल
विक्षिप्त-मेघडंबरी की विक्षिप्त-मेघडंगरी ?
28 Apr 2014 - 2:56 pm | बॅटमॅन
हा हा हा =))
27 Apr 2014 - 11:51 pm | निनाद मुक्काम प...
मस्तच ह्या कट्या निमित्ताने दिल्लीतील ह्या ह्या स्थळाची माहिती झाली , एवढी प्रशस्त वास्तू मराठी माणसाच्या साठी खुद्द महाराष्टात असेल कि नाही ह्या बद्दल शंका आहे.
मला एका मिपाकाराचा व्यनि आला असून
पुढच्या आठवड्यात आमच्या शहरात कुटुंबासह भटकंती निमित्ताने येत आहेत तेव्हा कट्टा तो बनता हे
28 Apr 2014 - 9:03 am | प्रमोद देर्देकर
अहाहा काय सुंदर गोष्ट. मराठी मिपाकरांनी दिल्लीचे तख्त कट्ट्याने गाजवले म्हणायचे.
बाकी चौराकाका म्हणतात त्याप्रमाणे >>>या तिघांच्या कट्ट्याचा वृतांत यायलाच पाहिजे >>> तर नका हो देवु त्यांच्या खादाडीचा वृत्तांत नाहीतर मि पा ची बँन्ड विड्थ फुल होईल. च्यायला कसलं खादाडतायत ते.
28 Apr 2014 - 9:48 am | विकास
वृत्तांत आवडला. महाराष्ट्र सदनाला कोणिही भेट देऊ शकते का?
28 Apr 2014 - 10:53 am | चित्रगुप्त
माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र सदनात कोणीही जाऊ शकते, आणि तेथील उपहारगृहात जेवण, चहापानादि करू शकते. तिथे मुक्काम करण्यासाठी बहुधा सरकारदरबारचा काही लग्गा लावावा लागत असेल. दोन-चार तास बसून भेटायला, गप्पा करायला अगदी मध्यवस्तीत असूनही मोकळेचाकळे असे छान ठिकाण आहे. हल्लीच्या महागाईत जेवणादि स्वस्त वाटावे, असे दर आहे.
28 Apr 2014 - 12:18 pm | जे.पी.मॉर्गन
वा वा वा! झकासच! नेक्ष्ट टाइम आम्हाला सांगा... आम्ही पण येऊ. नोएडात आहे सध्या.
जे.पी.
28 Apr 2014 - 2:54 pm | शशिकांत ओक
कट्टा एे देहली...
रॉयल पुतळ्याने आपल्या फोटोला भारदस्तपणा आला आहे. प्लेटमधील मुख चर्वणास मिळालेले विविध पदार्थ पोटोबा कमी व मनमोकळ्या गप्पा जास्त असे त्रैराशिक दिसत आहे.
29 Apr 2014 - 4:48 pm | बॅटमॅन
जबराट कट्टा. नेक्ष्ट दिल्लीवारीत आता जाणारच!!