'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
25 Apr 2014 - 12:00 pm

मित्रांनो,
नुकतेच 'साप्ताहिक प्राजक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे.
'श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या. त्या प्रतिज्ञेत आचार्यांच्या मते ईश्वरन सर्व नियामक तर मंडनमिश्रांचे मते फळ देणारे ते कर्मच होय. ईश्वराची काही गरज नाही.' असे प्रतिपादन केले.
'पराभव झाला तर मी गृहस्थाश्रम सोडून संन्यास घेईन!' असे मंडनमिश्र म्हणाले तर 'या शास्त्रार्थात पराजित झालो तर संन्यासाची भगवी वस्त्र टाकून गृहस्थाची शुभ्र वस्त्रे नेसेन असे आचार्यांनी म्हटले. आचार्यांच्या दृष्टीकोनातून ब्रह्मज्ञान महत्वाचे तर मंडनमिश्रांचे मते कर्मच सर्वश्रेष्ठ आहे असे म्हटले गेले. त्या दोघांमधील शास्त्रार्थात मध्यस्थी करण्याचे (म्हणजे निर्णय देण्याचे) उत्तरदायित्व मिश्रांची पत्नी उभयभारतीने स्वीकारले. बराच रंगलेल्या वाद-विवादानंतर उभयभारती स्वयंपाक करायला उठत म्हणाल्या, 'ह्या पुष्पमाळा दोघांच्या गळ्यात घालते. त्यापैकी ज्यांच्या गळ्यातील हार कोमेजेल तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.'
...
त्या शास्त्रार्थात काय विचारधन मांडले गेले. हारजीत उभयभारतींनी स्वतः न ठरवता हार कोमेजायवर का सोपवली? आदि प्रश्नावर पुढील अंकातून प्रकाश टाकला गेला जाईल असे वाटते. (जाड ठशातील मत ओकांचे.)
....
या पार्श्वभूमीवर आता महत्वाचा प्रश्न असा की या शास्त्रार्थाला आज २०१४ साली माझ्या जीवनात काय स्थान आहे? मी हे का समजून घ्यावे?
ईश्वराचे अस्तित्व न मानणारा अनेक जण आजही आहेत. लौकिकार्थे ते सुखी व समृद्ध आहेत. मी देवाचे काहीही करीत नाही असेच ते म्हणतात. वैयक्तिकरित्या मला त्यांच्या बद्दल आदर आहे. परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे.
मित्रामित्रांमधे चर्चा होते. त्यावेळी लहान मुुलगा आपल्या वडिलांबाबत केवढा निरपेक्ष अभिमान व्यक्त करतो. आपले वडील आपल्यावर प्रसन्न व्हावेत असा विचार त्याच्या मनाला शिवतही नाही.
आजचा ३५ वर्षे वयाचा तरूण त्याच भावनेने 'त्वमेव पिता' चा अभिमान का बाळगत नाही? तथाकथित देवाबाबत विश्वास व्यक्त करायला का लाजतो? मंडनमिश्रांसारख्या ईश्वरी सत्ता न मानणाऱ्या एका श्रेष्ठ अभ्यासकाला आचार्य जर आपला सिद्धांत पटवून देऊ शकले, ईश्वरच सर्व नियामक आहे हे पटवून देऊ शकले तर त्याच आचार्यांच्या शिकवणूकीवर आजचा तरूण का चिंतन करत नाही?
वडिलांची भूमिका बजावणाऱ्या आजच्या ४० व्या वयोगटातील मुलामुलींना शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाची काय माहिती आहे? ४५ व्या गटातील आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही? अध्यात्म या विषयाचे तो इतके अवमूल्यन का करतो? हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?
तरुणांनी आपले मत, आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करावेत ही नम्र. "
वरील विचार त्या लेखकाचे (त्यांचे नाव छापलेले नाही) आहेत. ते फक्त विचारार्थ ओकांना सादर केले आहेत.

धर्मसद्भावनाआस्वादलेख

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

25 Apr 2014 - 12:10 pm | चित्रगुप्त

हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?

ही दिव्य परंपरा नेमकी कोणती/कसली म्हणता? जरा डीटेलवार उस्कटून सांगाल तर बरे.

आयुर्हित's picture

25 Apr 2014 - 1:12 pm | आयुर्हित

४५ व्या गटातील आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही? अध्यात्म या विषयाचे तो इतके अवमूल्यन का करतो? हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?

आयुर्हित's picture

25 Apr 2014 - 12:34 pm | आयुर्हित

लेख आवडला. यातून बऱ्याच माहित नसलेल्या गोष्टी महती होतील अशी अपेक्षा.
नास्तिकता व तिचे फायदे/तोटे या बद्दलही वाचायला आवडेल.
छान लेख व योग्य मार्गदर्शन.
पुभाप्र.
धन्यवाद.

परंपरा - ती दिव्य आहे का नाही? हे कोणी ठरवले? वगैरे गोष्टींचा ओहापोह करायला वेगळा धागा समर्पित करावा. आचार्यांच्या शिकवणूकीवर आजचा तरूण का चिंतन करू इच्छित नाही? हा प्रश्न लेखात उपस्थित केलाय त्यावर प्रतिसाद अपेक्षित.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Apr 2014 - 12:44 pm | प्रकाश घाटपांडे

हा वादसंवाद शतकानु शतके चालू आहे. प्रत्येक पक्षाला वाटते कि आपण बरोबर असून समोरचा चूक आहे. आपापल्या पक्षाच्या समर्थनार्थ आपल्याला अनुकुल तेवढेच संदर्भ देण्याचा खटाटोप प्रत्येक जण करतो. वैज्ञानिकांच्या भुमिका काय आहेत याकडेही लोक लक्ष देतात. याबाबत ऐसी अक्षरेवर मी दिलेली एक प्रतिक्रिया डकवत आहे...
.खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो.
जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात.
वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते.
असो.... टंकाळा आला.

आनन्दा's picture

25 Apr 2014 - 12:54 pm | आनन्दा

वा वा.. मस्तच. चेपुवर शेअर करत आहे.. अर्थात तुमची सहमती असेल असे गृहीत धरून.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Apr 2014 - 1:07 pm | प्रकाश घाटपांडे

शुअर

शशिकांत ओक's picture

25 Apr 2014 - 4:36 pm | शशिकांत ओक

काय प्रकार आहे?

चेपु= चेहरा पुस्तक= फेसबुक.

प्रतिसाद नेहमीप्रमाणेच आवडला.

धन्या's picture

25 Apr 2014 - 5:24 pm | धन्या

सुंदर प्रतिसाद काका.

डॉ. श्रीकांत जोशींचं "मनोविकारांचा मागोवा" माझ्या संग्रही आहे. :)

माहितगार's picture

26 Apr 2014 - 11:58 am | माहितगार

प्रकाश घाटपांडेजी प्रतिसाद आवडला.

प्रकाश घाटपांडेजी,
खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याच्याशी १००% सहमत.

जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही याच्याशी मात्र सहमत नाही.
कारण जो खरा वैज्ञानिक आहे,(Option ला काही न टाकता)तो आपले संपूर्ण लक्ष जर आपल्या शोध्कडे लावत असेल तर एक दिवस असा येतोच की परमेश्वराशिवाय दुसरी कोणतीच शक्ती जगात सर्वतोपरी नाही हे त्याला मान्य होतेच.
चांगले प्रतिथयश डॉक्टर सुद्धा हे मान्य करतात की त्यांच्या ही हाती काही नसते, करता करवता तो परमेश्वरच आहे.म्हणून बऱ्याच हॉस्पिटल मध्ये मंदिर असते आणि डॉक्टरांच्या कॅबीन मध्ये देवाचा फोटो.

अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतात: विश्वाच्या रचनेतुन स्वत:चे रूप प्रगट करणाऱ्या परमेश्वराकडे माझी श्रद्धा आहे. परमेश्वराची शक्ती या विश्वात प्रगट झाली आहे.

डॉ ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात:अध्यात्म आणि विज्ञान यांचा योग्य समन्वय झाला, तरच देश आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि स्थिर बनवण्याचे आपले ध्येय सफल होईल.

हे सारे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर देवाचे अस्तित्व स्विकारतात ती त्यांची व्यक्तिगत श्रद्धा असते. म्हणून काय ते लगेच कालातीत सत्य ठरत नाही. अमका असं म्हणतो म्हणजे ते तसं असणारच याला व्यक्तीप्रामाण्य म्हणतात. :)

आयुर्हित's picture

26 Apr 2014 - 3:15 pm | आयुर्हित

धनाजीराव वाकडे,
एक गोष्ट आपण या प्रतिसादात "व्यक्तिगत श्रद्धा" या विषयीच बोलत आहोत.

शास्त्रज्ञ आणि डॉक्टर यांचे मुद्दाम उदाहरण दिले आहे, ज्या मुळे खूप हुशार(जास्त IQ असणारी)लोकांचे अनुभव विश्व हे कमी हुशार (low IQ असणारी)लोकांपेक्षा जास्त प्रगट व प्रकांड असतेर त्यांच्या पावलावर पावूल ठेवून इतरांनाही त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो.

कमी हुशार (low IQ असणारी)लोकांचे अनुसरण केले तर कोणाचा फायदा झाला आहे हे सप्रमाण दाखवून द्यावे.

IQ जास्त असणार्‍यांना सार्‍याच बाबतीत सारं कळतं असं नाही. किंवा एखाद्या व्यक्तीचा केवळ IQ जास्त आहे म्हणून त्या व्यक्तीने मांडलेली सारी मते स्विकारायला हवीत असंही नाही.

आता सकारात्मकतेवर थोडा उजेड टाका... म्हणजे कोणाची मते स्विकारावीत असे आपले विचार सांगतात ?

आयुर्हित's picture

26 Apr 2014 - 11:48 pm | आयुर्हित

लहान तोंडी मोठा घास घेतो आहे, चुकल्यास माफ करावे हीच विनंती.

कोणाची मते स्विकारावीत?
अर्थात ह्या प्रश्नाचे उत्तर हे वैयक्तितरित्या प्रत्येकाची वेगवेगळी असतील आणि असावीत.
यात प्रत्येकाचा अनुभव,अधिकार,संपर्क,धर्म,छंद व आवड/निवड,आजवर मिळालेले मार्गदर्शन व विवेकबुद्धी यावरच अवलंबून असेल. फक्त सारासार विवेकबुध्दी जागृत असायला मन अगोदर अहं व अज्ञान विरहित असावं लागतं.

पण जेव्हा सामायिक मते(जागतिक,राष्ट्रीय,सामाजिक)बनवायची असतील तेव्हा एका चांगल्या नेत्याकडे/नायकाकडे कोणते गुण समाजाच्या प्रगतिला सहाय्यक ठरतील व ज्यात जास्तीत जास्त लोकांचा कायमचा फायदा होईल असे वाटते (मग भले आपला काही काळ/थोड्या लोकांचा सर्वकाळ तोटा होणार असेल तरी चालेल)व त्या नेत्याचा पूर्वानुभव याबाबत चांगला असणे हेही तितकेच महत्त्वाचे.

फक्त त्या नेत्याचा काही स्वार्थ तर नाहीं ना? असला तर तो कोणत्या प्रसंगी कोणाला जास्त महत्व देईल हे जाणणे/पारखणे महत्वाचे आहे! नाहीतर महाराष्ट्रातील नेते काही कमी नाहीत....

म्हणून इतकेच म्हणेन, धाग्याच्या विषयानुशंगाने चर्चेवर उजेड पाडलात तर मज सामान्य वाचाकाला कशाबाबत चर्चा चालु आहे याचे भान रहायला सोपे होइल.

ज्यांना अद्वैत सिद्धात मान्य आहे त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्यावरील शास्त्रार्थातून मंडन मिश्र यांचा पराभव झाला (म्हणजेच त्याकाळातील अन्य तत्वज्ञान चुकीचे ठरते असा निर्वाळा त्यावेळच्या मंडन मिश्र आदि विचारकांनी दिला) व त्यांनी ईश्वरीय सत्ता सर्व नियामक आहे असे मान्य करून आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे अद्वैत मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे.
लेखकाच्या भाषेत - आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही?

आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही?

असं नाही काका.

माझा देव, धर्म या गोष्टींवर विश्वास नसताना हे दोन्ही ग्रंथ माझ्याकडे आहेत. अधून मधून मी वाचतोही.

समर्थांच्या रामाशी काही घेणं-देणं नसताना मी दासबोध वाचतो त्यातील आयुष्य कसं जगावं याच्या सुंदर स्पष्टीकरणासाठी. काही गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. तर काही आजही लागू होतात.

ज्ञानदेवांच्या हरीशी काहीही घेणं-देणं नसताना मी ज्ञानेश्वरी वाचतो ते त्यातील भाषेसाठी. भाषा सौंदर्याच्या बाबतीत इतका अप्रतिम ग्रंथ मराठीत तरी दुसरा नसावा. "जो जे वांछील तो ते लाहो" सारख्या ओव्या वाचल्या की आपलंही मन करुणेनं भरुन येतं.

मात्र असा वेगळा विचार अध्यात्मपंथींना मान्य नसतो. ते लगेच आखाडयात उतरण्यासाठी आव्हान देतात. :(

शशिकांत ओक's picture

25 Apr 2014 - 7:14 pm | शशिकांत ओक

समर्थांचे व्यवहार चातुर्य व ज्ञानेश्वरांचा कल्पना विलास आपल्याला भावतो ते ठीक आहे. याशिवाय अद्वैत सिद्धांत ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले जावे.

याशिवाय अद्वैत सिद्धांत ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले जावे.

म्हणजे माझ्यासारख्या देव न मानणार्‍या किंवा देव असलाच तर त्याच्या असण्याने काही फरक न पडणार्‍यांनी लिहू नये काय? ;)

आत्मशून्य's picture

26 Apr 2014 - 5:33 am | आत्मशून्य

तसेही देव न मानणे अथवा देव असलाच तर त्याच्या असण्याने... फरक न पडणे ही फार विरोधाभासी वैचारीकता आहे.. एक तर त्याला माना अथवा नका मानु यापैकी एक, अथवा सरळ याबाबतीत निर्णयच न होण्याची/घेउ शकण्याची अवस्था मान्य करा (होय ही सुधा एक अवस्था आहे. इश्वर आहे अथवा नाही हे छतीठोकपणे सांगताना बरेचदा लोक याच अवस्थेचे बळी असुनही तिला अमान्य करतात, अशांना साइबाबांनी एकच मौलिक सल्ल्ला दिलाय तो म्हणजे "श्रध्दा आणी सबुरी".

असो, वरील ३ पैकी शेवट्च्या दोन अवस्था जिवाला आल्या असतील तर ओक काका अशांनी प्रतिसाद देउ नये असेच स्पश्ट सुचवतात. कारण त्यामुळे धागा भरकटतो आहे असे त्यांचे मत आहे ज्याला फाट्यावर मारायचे आपले स्वातंत्र्य अबाधीत आहे.

धन्या's picture

26 Apr 2014 - 12:38 pm | धन्या

बरे. :)

शुचि's picture

25 Apr 2014 - 7:33 pm | शुचि

होय ज्ञानेश्वरीमध्ये रुपकाच्या मौक्तिक लडीच्या लडी उलगडत जातात. शृंगाराला नवरसांचा राजा म्हटले जाते परंतु ज्ञानेश्वरीमध्ये शांतरसाने ,शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवला असे म्हणतात.

मीदेखील ज्ञानेश्वरी भाषा व रुपक सौंदर्याकरता खूपदा वाचते.

ते कुंडलिनी जगदंबा| जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा|
जया विश्वबीजाचिया कोंभा| साउली केली||२७२|| .......... काय म्हणावे या शब्दलेण्याला!!

किंवा

पिंडें पिंडाचा ग्रासु| तो हा नाथसंकेतींचा दंशु|
परि दाऊनि गेला उद्देशु| श्रीमहाविष्णु ||२९१|| ........ किती व्यापक अर्थाची ही इवलीशी ओवी आहे.

मागे एकदा मी याचा अर्थ विचारला असता कोणा एका मिपावरील ज्ञानी व्यक्तीने अतिशय रसाळ व व्यापक अर्थ सांगीतला होता.

निवृत्तीनाथ हे शैव = नाथ पंथी. तर ज्ञानेश्वर हे विष्णूभक्त. ..... मग ही निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु कसे ..ही सांगड कशी? याबद्दलही त्यांनी विवेचन केले होते. ...... तसेच मला जितके आठवते त्याप्रमाणे त्या मिपाकरांनी हे देखील सांगीतलेले की शिव-पार्वती यांचा संवाद चालत असताना शंकर आदिमायेला गूढाची उकल करत असतेवेळी, दोघांच्या नकळत, मासा बनून श्रीविष्णूंनी ते ज्ञान ग्रहण केले. म्हणुन नाथसंकेतीचा दंशु असे कुंडलिनीच्या ज्ञानास म्हटले जाते.

जर ते मिपावर येत असतील, तर त्यांनी कृपया हे विस्कळीत विचार सांधून परत एकदा प्रतिसाद लिहावा ही विनंती!

देवी किंवा विष्णु किंवा अन्य देवतांच्या सहस्रनामांमध्येही तेच शाब्दिक सौंदर्य जाणवते मणून वाचली जातात. पण वाचण्याचा हेतू काहीही असो अ‍ॅट द एंड ऑफ द डे, या स्तोत्रांनी मनःशांती मिळते हेदेखील १००% खरे आहे.

मलाही ज्ञानेश्वरी फार आवडते. त्यातून इतिहासही समजतो.

ज्ञानेश्वरीचा समारोप करताना ज्ञानेश्वर म्हणतात

तेथ इंदुवंशविलासु । जो सकळकळांनिवासु ।
न्यायातें पोखीत क्षितीशु । श्रीरामचंद्रु ||

मुळातच देव ,कर्म आणि आत्मा नाही .देवाने केलेली निर्मिती बरोबर का चूक पेक्षा मानवाने केलेली देवाची (=देव ही संकल्पना)निर्मिती हीच मोठी चूक आहे .यानंतर काहीही प्रश्न उरत नाहीत आणि त्यांची उत्तरे शोधायचीही गरज पडत नाही .

आयुर्हित's picture

25 Apr 2014 - 3:29 pm | आयुर्हित

मुळातच देव न मानणे यालाच नास्तिकता म्हणायची का?
नास्तिकता व तिचे फायदे/तोटे या बद्दलही वाचायला आवडेल.

कर्म आणि आत्मा नाही म्हटले तर पुनर्जन्म ही नाही.
मग एखादा गोल्डन स्पून घेवून जन्माला येतो तर दुसरा कचराकुंडीत का फेकला जातो?
वेगळा धागा येवू द्यात, म्हणजे आपली काही मते अभ्यासता येतील.

देव ही मुळात मानवनिर्मित संकल्पना असल्याने त्यावर उलट सुलट कसेही मत व्यक्त केले तरी तोही निव्वळ कल्पनाविलासच.

धन्या's picture

20 Jun 2014 - 4:21 pm | धन्या

एक नंबर प्रतिसाद :)

शशिकांत ओक's picture

25 Apr 2014 - 3:09 pm | शशिकांत ओक

ईश्वराचे अस्तित्व ज्यांना मान्य आहे त्यांना उद्देशून वरील धाग्यावर विचार कथन केले आहेत. ज्यांना ते अमान्य असतील त्यांनी प्रतिसाद दिला नाही तरी चालेल.

आपल्या वरील लेखात असे आहे-

"ईश्वराचे अस्तित्व न मानणारा अनेक जण आजही आहेत. लौकिकार्थे ते सुखी व समृद्ध आहेत. मी देवाचे काहीही करीत नाही असेच ते म्हणतात. वैयक्तिकरित्या मला त्यांच्या बद्दल आदर आहे. परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे."

पण हे कुतुहल मात्र जे इश्वरावर विश्वास ठेवतात त्यांनीच शमन करायचे!

असे का बरं ? आणि अशांच्या उत्तरांनी आपले समाधान होइल?

हाच प्रश्न मलाही पडला आहे.
ज्यांच्याकडून ओक काकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील त्यांनाच ते तुम्ही लिहू नका असे म्हणत आहेत. :)

मित्रा, मूळ लेखकाला निरीश्वर वाद्यांचे तसे मत का असावे असे कुतूहल जरूर आहे. मात्र त्याच्या कारणासाठी ते इथे विचारणा करत नाहीत.
ज्यांची ईश्वर तत्वाला मान्यता आहे अशा विशेषतः तरूण पालकांनी आपल्या पाल्यांना या तत्वज्ञानाची ओळख करून द्यायला किंवा आपणहून ते आत्मसात करायला का संकोच वाटतो यावर त्यांना व पर्यायाने मला विचारणा करायची आहे.
आपल्याला ती कारण मिमांंसा सांगायची असेल तर आपण जरूर आपले विचार मांडावेत. त्यासाठी आपण निरीश्वर वादाला मानत असल्याने बाधा येत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Apr 2014 - 3:31 pm | अत्रुप्त आत्मा

भाग १
http://www.sherv.net/cm/emoticons/housework/dusting-smiley-emoticon.gif
====================
भाग २
http://www.sherv.net/cm/emoticons/eating/pancake.gif
====================
भाग ३
http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/cleaner-smiley-emoticon.gif

प्रचेतस's picture

25 Apr 2014 - 5:00 pm | प्रचेतस

अगागागागागा =))
काय ह्या स्मायाल्या आत्मुबुवा

चित्रगुप्त's picture

25 Apr 2014 - 3:35 pm | चित्रगुप्त

'आजचा तरूण' हे फार सामान्यीकरण झाले. मी जेंव्हा विशीतील तरूण होतो, तेंव्हा मी दासबोध, जे. कृष्णमूर्ती नेमाने वाचत असे, परंतु त्यावेळचे माझे खूपसे समवयस्क तरूण सिनेमे बघणे, काकोडकर वगैरे वाचणे, सिग्रेटी ओढणे, वगैरे प्रकार करत असायचे. तेंव्हा हा प्रकार नेहमीच चालत आला असणार. अगदी पाचशे वर्षापूर्वी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचणारे तरूण एकंदरित कमीच असतील. अर्थात त्यावेळी हल्लीसारखा मनोरंजनाचा अहोरात्र रतीब नसणार, आणि प्रत्येक लहान गावातही कीर्तन, भजनादि होत असल्याने तुकारामादिंचे अभंग कळत-नकळत कानावर पडतच असणार. तेंव्हा अशिष्ट मानल्या जाणार्‍या तमाशा, मुजरा, लावणी, इत्यादी प्रकारांवर कडी करणारे प्रकार आता घराघरात चोवीस तास बघता येतात, त्यात तरुणाई गुंतल्यास आश्चर्य नाही.

आज ज्याला आपण 'सायन्स' आणि 'टेक्नॉलोलॉजी' म्हणतो तो प्रकारही आतासारखा तेंव्हाच्या जीवनाचे अविभाज्य अंग झालेला नसल्याने हल्लीपेक्षा एकंदरित तथाकथित 'अध्यात्मिक' विचारांचे प्राबल्य/प्रचार कदाचित ज्यास्त असेलही. याविषयी नक्की विदा आता उपलब्ध होण्याची शक्यता कमीच वाटते.
नेमाडेंच्या 'हिंदू' कादंबरीत याविषयी पुष्कळ मननीय मुद्दे मांडलेले आहेत.

शशिकांत ओक's picture

25 Apr 2014 - 4:33 pm | शशिकांत ओक

लेखातील ३५,४०,४५ वयांची नोंद केली आहेर. त्यात भोंगळपणा आला कुठे?
प्रत्येक काळात असे वैचारिकता असलेली माणसे कमी असणार. शास्त्रीय संगीत वादक, गायक, जाणकार कमी असतात. तरीही हजारों वादक एका कार्यक्रमाच्या वेळी एकत्र येऊन संगीत सादर करतात.
विपश्यना साधना, योगसाधना, आदि शिबिरातील उपस्थिति भारतीय विचारधारा, कला, शास्त्र, यातील रस दर्शवतो. याशिवाय विदेशी तरूण- तरुणी भारतीय विचारांचे आकलन करताना दिसतात. ज्यांना हिंदू एक अडगळ वाटते, त्यांच्या बद्दल याधाग्यावर न लिहिलेले बरे.

चित्रगुप्त's picture

25 Apr 2014 - 4:59 pm | चित्रगुप्त

ज्यांना हिंदू एक अडगळ वाटते, त्यांच्या बद्दल याधाग्यावर न लिहिलेले बरे.

लेखकाला हिंदू ही अडगळ वाटते, हे सदर पुस्तक न वाचताच बनवलेले वर्तमानपत्री मत आहे, असे दिसते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अगदी उलट आहे, हे पुस्तक वाचल्यावर स्पष्ट होईल. अगदी पहिल्याच पानावर " साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ" असे मागणे केलेले आहे.

माझा प्रतिसाद संपादकांनी काढून टाकावा .उगाच चर्चा भलतीकडे जायला नको .

'साप्ताहिक प्याफक्त' विचार धन - १. मच्छराचार्य - खंडनमिश्र शास्त्रार्थ वाद
http://misalpav.com/node/27707#new

आजकालच्या तरुणांपुढे rat race मध्ये धावून 'survival ऑफ the fittest या उक्तीप्रमाणे स्वतःला fittest ठेवायचे आहे त्यातच सगळी शक्ती जाते मग कुठून सुचणार दासबोध वाचायला आणि शास्त्रार्थ करायला ?

तसेच आजूबाजूला इतक्या घटना घडत असतात कि ज्यामुळे देवावरचा आणि कर्मसिद्धांतावरचा विश्वासच उडून गेलाय आजच्या तरुणाईचा :-(

हे वाचून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व

आयुर्हित's picture

26 Apr 2014 - 8:56 pm | आयुर्हित

भावना पोचल्यात व सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच आम्ही मिपावर आहोत, ही खात्री बाळगावी.

मला मान्य आहे rat race मध्ये धावावेच लागते, कारण मी ही याच काळात वावरतो व आपल्यासारखाच एक तरूण आहे.

स्वतःला fittest ठेवायचे आहे तर त्यासाठी जी काही शरीरिक व मानसिक तयारी करावी लागते, ती येण्यासाठीच लहानपणापासून आमच्या बालमनावर जे काही चांगले संस्कार झालेत, त्याचाच आज आम्हाला फायदा झाला आहे. यात शामची आई, भगवतगीता, रामायण, महाभारत, भागवत कथा, मनाचे श्लोक, दासबोध, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा, एकनाथांचे भारुड, बहिणाबाई चौधरींच्या कविता, संत मीराबाईची व तुलसीदासांची कवने, हठयोग, शिवाजी महाराज, राणाप्रताप, झाशीच्या राणी, मंगळ पांडे, राणी चेन्नम्मा, वासुदेव बळवंत फडके, विवेकानंद, स्वातंत्रवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू,सुखदेव यांचा इतिहास यांचाच मोलाचा वाटा आहे.

दुर्दैवाने आजपर्यंत आपल्याला जे सरकार व कुलगुरू भेटले आहेत त्यांना कधी ही बुद्धी येईल की हे वरील सर्व पुस्तके आपल्या पाठ्यक्रमाचा भाग होतील.

आपल्या माहितीसाठी सांगतो गीतेत "परिवर्तन संसाराचा नियम आहे" हे आधीच सांगितले गेले आहे. स्थितप्रज्ञ याची उत्कृष्ट व्याख्या केली आहे, कोणी काय खावे व खावू नये हे समजावून सांगितले आहे. आज गीता जरी १००% समजून घेतली व १००% अनुसरली तरी जगातला कोणीही व्यक्ती सर्वात जास्त सुखी असेल, तो कधीही आजारी पडणार नाही!

आपली तयारी असेल व थोडे कष्ट करायची तयारी असेल तर आपल्या साऱ्या समस्या सोडवायला मला निश्चितच आनंद होईल.

ज्या क्षणी तुमचे विस्तार पावणे थांबेल त्या क्षणी मृत्यू निकट आहे, धोका जवळ आला आहे हे समजा:स्वामी विवेकानंद

बाळ सप्रे's picture

28 Apr 2014 - 11:49 am | बाळ सप्रे

सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच आम्ही मिपावर आहोत, ही खात्री बाळगावी

अनंतकोटी ब्रह्मांडनायक............. बाबाकी जय!!!!

Prajakta२१'s picture

29 Apr 2014 - 9:13 pm | Prajakta२१

मी आजच्या तरुणाईचा जनरल दृष्टीकोन मांडला

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

शशिकांत ओक's picture

27 Apr 2014 - 10:07 am | शशिकांत ओक

सार्वजानिक क्षेत्रात जीवनयापन करताना पडणारे कष्ट व अपुरा मोबदला यामुळे जीवन सिद्धांत, आचरणातील त्रुटी यामध्ये पडणारे अंतर यातून पुढील पिढीला मी काय सांगू? शरीर शुद्धि विचार शुद्धि व भाव शुद्धी याचा प्रभाव टिकत नाही. म्हणून ईश्वर सत्तेवर विश्वास असूनही पालकांना पुढील पिढीला वैचारिक आदर्श ठेवायला संकोच वाटत असेल...

चित्रगुप्त's picture

27 Apr 2014 - 11:53 am | चित्रगुप्त

एका 'क्लिक' बरोबर अनेक अकल्पनीय गोष्टींची तात्काळ प्रचिती घेण्याच्या या काळात ईश्वर, गॉड इ.इ. चा झटित प्रत्यय घेण्याची क्लृप्ती सांगाल, आणि त्या युक्तीला फेसबुक, व्हॉट्सॅपादिवर शेयर कराल, तर हल्लीची पीढी 'लाईक' करेलही कदाचित.
आहे का अशी काही क्लृप्ती ?

||श्री गणेशाय नमः||

व्यासपौर्णिमेचा। दिस हा महान।
सद्गुरूस वंदन। करितो मी॥

संतधर्म हाच। जीवनाचा मंत्र।
आता त्याचे तंत्र। वर्णितो मी॥

धर्महीन आज। झाले बुद्धिवंत।
नाही कुणा खंत। अध:पतनाची॥

बोलघेवड्यांचा। क्षीण पुरूषार्थ।
भ्रष्ट परमार्थ। बोकाळला॥

दंभी भोगासक्त। ज्ञानियाचे सोंग।
साक्षात्कारी ढोंग। वठविती॥

तणावमुक्तीला। मानुनिया सिद्धी।
ठकवावी बुद्धी। पाखंड्याने॥

ज्ञान 'शून्यतेचे'। भक्तीहीन भ्रम।
वृथा सारे श्रम। प्रायोगिक।।

सद्गुरूंची कृपा। ईश्वराची भक्ती।
साधकाची शक्ती। आंतरिक॥

सद्गुरूकृपेने। आकळले मज।
अंतरीचे गुज। नाथांचिया॥

पिंडी ते ब्रह्मांडी। असे ज्याचे मर्म।
निसर्गाचा तो धर्म। साहजिक॥

मनःकल्पनांचा। नसे हा पिसारा।
आहे प्रान्त सारा। वास्तवाचा॥

चित्तचतुष्ट्याच्या। रूपे साकारले।
पिंड आकारले। व्यक्तीरूप॥

ब्रह्मांडी कोंडला। विश्वाचा पसारा।
'चिद्विलास' हा सारा। चैतन्याचा॥

मन, चित्त, बुद्धी। आणि अहंकार।
शक्तीमय सार। व्यक्तीत्वाचे॥

चतुर्विध क्षेत्र। असे 'भाव'मय।
सहज प्रत्यय। येई त्याचा॥

ब्रह्मांडरूपाने। विस्तारले तेच।
स्वभावेच साच। पहा कैसे॥

मन भावनेचे। बुद्धी हे विद्येचे।
चित्त विहाराचे। स्थूल क्षेत्र॥

कर्तृत्वरूपाने। येई प्रत्ययास।
नित्य अनायास। अहंकार॥

ब्रह्मांडी ही तैसी। क्षेत्रे चतुर्विध।
समष्टीत विविध। पहा कैसी॥

चंचल ते मन। होतसे तल्लीन।
ईशपदी लीन। तीर्थक्षेत्री॥

बुद्धीस लाभते। व्यवहारी ज्ञान।
तैसेची प्रज्ञान। विद्यापीठी॥

सहज उत्स्फूर्त। चित्ताचा विहार।
मिळता आधार। कुटुंबाचा॥

संघभावनेने। अहंकार शुद्धी।
सकल कार्यसिद्धी। ग्रामांतरी॥

गृह विद्यापीठे। ग्राम तीर्थक्षेत्रे।
चतुर्विध क्षेत्रे। सामाजिक॥

पिंड ब्रह्मांडाचे। असे सामरस्य।
नसे ते रहस्य। सहजसिद्ध।।

परिशुद्ध करा। चतुर्विध क्षेत्र।
हाच गुरूमंत्र। नाथपंथी।।

अष्टाक्षरी हा मंत्र। करावया सिद्ध।
व्हावे कटिबद्ध। साधकाने॥

खारीचाच वाटा। उचलावा नीट।
रचा एक वीट। नाथ मंदिराची॥

विचारशून्यतेची। हिडीस वासना।
बाष्कळ कल्पना। गांजेकस॥

भक्तीभावनेने। जीवना सन्मुख।
होता शांती सुख। द्वारी उभे॥

नाथसिद्धांताचे। जाणुनिया वर्म।
निष्कामत्वे कर्म। आचरावे।

कर्तव्यपूर्तीने। चारी पुरूषार्थ।
आणि परमार्थ। साधा सारे॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
साभार :-राहुल आपटे

राहुल आपटे म्हणजे मूकवाचक का?

You Apr 30 मिटवाhttp://www.misalpav.com/comment/576688#comment-576688
ह्या प्रतिसादातील लिहिलेल्या ओळी आपल्याच आहेत का?

http://apterahulya.blogspot.in/2011_07_01_archive.html
हा ब्लॉग आपलाच आहे की अजून कोणी दुसरा राहुल आपटे आहे?

कृपया त्रास गोड मानून घ्यावा ही विंनती.
. मूकवाचक 2:36 pm मिटवाBlockहोय, त्या प्रतिसादातल्या ओळी माझ्याच आहेत. (प. पू. बाबा महाराज आर्वीकर यांच्या शिकवणीवर आधारित)
आपण सांगता आहात तो ब्लॉगही माझाच आहे.

आपण लिहीलेले चार शब्द कुणी स्वारस्य घेउन वाचत असेल तर त्यात आनंद आणि समाधानच आहे. यात त्रास कसला?

यसवायजी's picture

27 Apr 2014 - 12:20 pm | यसवायजी

परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे.
प्रत्येक गोष्टीत आध्यात्म असलेच/आणलेच पाहिजे का? जग सुंदर आहे एवढंच म्हणुन भागत नाही, त्यामागे दैवी शक्ती असलीच पाहिजे का?
.
“Atheism is more than just the knowledge that gods do not exist, and that religion is either a mistake or a fraud. Atheism is an attitude, a frame of mind that looks at the world objectively, fearlessly, always trying to understand all things as a part of nature.”
― Emmett F. Fields

आयुर्हित's picture

27 Apr 2014 - 1:03 pm | आयुर्हित

अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म का असल मतलब
हृदयनारायण दीक्षित
अध्यात्म रोचक शब्द है। सामान्यतया भक्ति या ईश्वर विषयक चर्चा को अध्यात्म कहा जाता है। पूजा पाठ करने वाले ‘आध्यात्मिक’ कहे जाते हैं। भारत के लोक जीवन में यह शब्द मुद्रा से भी ज्यादा तेज रफ्तार चलताऊ है लेकिन प्रगतिशील विद्वानों के बीच उबाऊ है और घिसा पटा है। घिसा इसलिए कि पुराना है, पिटा इसलिए कि इसका रूप आस्थावादी है। लेकिन अध्यात्म का मूल अर्थ ‘ईश्वर सम्बंधी’/ईश्वरीय चर्चा या ईश्वर ज्ञान कदापि नहीं है। गीता के अध्याय 8 की शुरूवात अर्जुन के प्रश्नों से होती है, पूंछते है ”हे पुरूषोत्ताम! वह ब्रह्म क्या है? अध्यात्म क्या है? और कर्म के माने क्या है? (अध्याय 8 श्लोक1, लोकमान्य तिलक का अनुवाद, गीता रहस्य पृष्ठ 489) मूल श्लोक है ‘ किं तद् ब्रह्मं किम् अध्यात्मं किं कर्म पुरूषोत्ताम”। प्रश्न सीधा है। यहां ब्रह्म की जिज्ञासा है, ब्रह्म ईश्वरीय जिज्ञासा है। आगे अध्यात्म जानने की इच्छा है। अध्यात्म ईश्वर या ब्रह्म चर्चा से अलग है। इसीलिए अध्यात्मक का प्रश्न भी अलग है। कर्म भी ईश्वरीय ज्ञान से अलग एक विषय है। इसलिए कर्म विषयक प्रश्न भी अलग से पूछा गया है। अब श्रीकृष्ण का सीधा उत्तार देखिए ”अक्षरं ब्रह्म परमं, स्वभावों अध्यात्म उच्यते – परम अक्षर अर्थात कभी भी नष्ट न होने वाला तत्व ब्रह्म है और प्रत्येक वस्तु का अपना मूलभाव (स्वभाव) अध्यात्म है। (तिलक-गीता रहस्य पृष्ठ 490) वासुदेवशरण अग्रवाल का अनुवाद है ”परम अक्षर (अविनाशी) तत्व ही ब्रह्म है। स्वभाव अध्यात्म कहा जाता है।” (गीता नवनीत, पृष्ठ 175)

अध्यात्म पारलौकिक विश्लेषण या दर्शन नहीं है। अध्यात्म का शाब्दिक अर्थ है – ‘स्वयं का अध्ययन-अध्ययन-आत्म। वासुदेवशरण अग्रवाल ने अध्यात्म की सुसंगत व्याख्या की है, ”इसका तात्पर्य यह है कि जो अपना भाव अर्थात् प्रत्येक जीव की एक-एक शरीर में पृथक पृथक सत्ता है, वही अध्यात्म है। समस्त सृष्टिगत भावों की व्याख्या जब मनुष्य शरीर के द्वारा (शारीरिक संदर्भ लेकर) की जाती है तो उसे ही अध्यात्म व्याख्या कहते हैं।” (वही, पृष्ठ 55) गीता में श्रीकृष्ण का उत्तार सरल है – स्वभावो अध्यात्म उच्यते – स्वभाव को अध्यात्म कहा जाता है। (8.3) स्व शब्द बड़ा प्यारा है। इससे कई शब्द बने हैं। ‘स्वयं’ शब्द इसी का विस्तार है। स्वार्थ भी इसी का हितैषी है। स्वानुभूति अनुभव विषयक ‘स्व’ है। सभी प्राणी मरणशील हैं, जब तक जीवित हैं, तब तक स्व हैं, तभी तक सुख हैं, संसार है, जिज्ञासाएं हैं, प्रश्न हैं। विज्ञान और दर्शन के अध्ययन है। प्रत्येक ‘स्व’ एक अलग इकाई है। इसकी अपनी काया देह है, अपना मन है, बुध्दि है, विवेक है, दृष्टि है विचार हैं। इन सबसे मिलकर भीतर एक नया जगत् बनता है। इस भीतरी जगत् की अपनी निजी अनुभूति है, प्रीति और रीति भी है। अपने प्रियजन हैं, अपने इष्ट हैं। इन सबसे मिलकर बनता है ”एक भाव” इसे ‘स्वभाव’ कहते हैं। स्वभाव नितांत निजी वैयक्तिक अनुभूति होता है लेकिन स्वभाव की निर्मिति में माँ, पिता, मित्र परिजन और सम्पूर्ण समाज का प्रभाव पड़ता है। स्वभाव निजी सत्ता और प्रभाव बाहरी। जब स्वभाव प्रभाव को स्वीकार करता है, प्रभाव घुल जाता है, स्वभाव का हिस्सा बन जाता है। इसका उल्टा भी होता है, लेकिन बहुत कम होता है।

स्वभाव में अपनी निजता को बचाने की इच्छा होती है। निजता की रक्षा के प्रति अतिरिक्त सुरक्षा भाव भी होता है। निजता की रक्षा, निजता के प्रति विशेष संरक्षण सतर्क भाव ही ‘स्वाभिमान’ कहलाता है। स्वाभिमान, स्वभाव, स्वार्थ और स्वयं की विशिष्टता के कारण ही स्वभाव पर प्रभाव की जीत नहीं होती। बेशक स्वभाव पर दबाव के कारण प्रभाव पड़ते है, स्वभाव तो भी बना रहता है। तो भी ‘स्वभाव’ अजर और अमर नहीं होता। आखिरकार वह एक इकाई है, एक दैहिक सत्ताा (शरीर) है। विकास के क्रम में स्वभाव, स्वार्थ और स्वाभिमान का भी विकास होता है। खाटी निजीहित के स्वभाव वाले ‘स्वार्थी’ भी परिवार हित में निजस्वार्थ छोड़ते है। यहां स्वभाव के विकास का नया स्तर है। वे गांव-नगर या राष्ट्र क्षेत्र के हित में परिवार स्वार्थ से भी ऊपर उठते हैं, यह स्वभाव विकास की अगली मंजिल है। राष्ट्रवादी लोग निजी स्वभिमान की जगह राष्ट्रीय स्वाभिमान के स्तर तक विकसित होते है। विश्व को एक सम्पूर्ण जीवंत इकाई जानने मानने वाले सुधीजन विश्वमानव कल्याण के लिए राष्ट्र से ऊपर भी जाते हैं।

‘स्व’ का एक भौगोलिक क्षेत्र भी होता है। पहली परिधि और सीमा यह शरीर है। इसका स्वभाव, स्वार्थ और स्वाभिमान होता है। इसी का विस्तार ग्राम, राष्ट्र, विश्व के मनुष्य हैं। फिर सभी कीट पतिंगो और वनस्पतियों को भी शामिल किया जा सकता है। यहां स्व का भौगोलिक क्षेत्र बढ़ा है। फिर सूर्य, चन्द्र, पृथ्वी, अग्नि, जल, वायु और आकाश सहित समूचे ब्रह्माण्ड तक विस्तार होता है। तुलसीदास ने ‘परहित’ को धर्म कहा- परहित सरिस धर्म नहि भाई। यहां परहित स्वहित से बड़ा है। इसी तरह परहित से राष्ट्रहित, राष्ट्र हित से विश्वहित बड़ा है। लेकिन स्वार्थ तो भी है। स्व की सीमांए विश्व तक व्याप्त हो गयी हैं लेकिन अंतिम समूची मंजिल में ब्रह्माण्ड भी शामिल होता है। यहां स्व ससीम नहीं रहा। सीमांए टूट गयी। यही स्व चरम पर पहुंचा और परम हो गया। इसी स्वार्थ का नाम अब परमार्थ होगा। स्वभाव भी अब परमभाव कहलाएगा। अध्यात्म कोरी ईश्वरीय चर्चा नहीं है। यह ‘स्वभाव’ को जानने की कैमिस्ट्री है। अध्यात्म मानव मन की परतों का अजब गजब रासायनिक विश्लेषण है। वृहदारण्यक उपनिषद् (2.3.4) में कहते हैं ”अध्यात्म का वर्णन किया जाता है ”अथ अध्यात्म मिदमेव”। समझाते है ”जो प्राण से और शरीर के भीतर आकाश से भिन्न है, यह मूर्त के, मर्त्य के इस सत् के सार हैं।” यहां अध्यात्म का विषय प्राण और आकाश को छोड़कर बाकी देह है। शंकराचार्य के भाष्य के अनुसार ”आध्यात्मिक शरीराम्भकस्य कार्यस्यैष रस: सार: – आध्यात्मिक शरीराम्भकस्य कार्यस्यैष रस: सार: – आध्यात्मिक यानी शरीराम्भक भूतों का यही रस यानी सार है।” वृहदारण्यक (शांकरभाष्यार्थ, गीता प्रेस पृष्ठ 520)

शरीर के भीतर चैतन्य है, प्राण है। इसके भीतर आकाश भी है। इसके अलावा बाकी जो कुछ है वह अध्यात्म है। अध्यात्म का अर्थ ‘स्व’ ही है। छान्दोग्य उपनिषद् का प्रथम अध्याय-प्रथम प्रपाठक ओ3म से प्रारम्भ होता है। यहां प्राण को श्रेष्ठ बताया गया है। फिर अधिदैवत् – देवों से सम्बंधित विवेचन (तीसरा खण्ड) है। प्रणव और उद्गीथ की व्याख्या है। ऋग्वेद के विद्वान ओ3म् को प्रणव कहते है। सामवेदी इसे उद्गीथ बताते हैं। दोनो एक हैं। यहां सृष्टि का विस्तार से वर्णन है। सातवें खण्ड में कहते हैं – अर्थ अध्यात्मम् यानी अब अध्यात्म सुनिए। (1.7.1) अनुवादक का विवेचन है, ”अध्यात्म (शरीर के सम्बंध में) कहते हैं। (छान्दोग्य उप0, प्रो0 राजाराम, डायनमिक पब्लिकेशन, पृष्ठ 22) यहां अध्यात्म शरीर चर्चा है। कहते है ”ऋचा वाणी है, साम प्राण है। (शंकराचार्य के अनुसार जो नासिका में प्राण है अर्थात घ्राण) साम गान ऋचा यानी वाणी के सहारे है।” फिर कहते हैं ”ऋचा आंख हैं। साम आत्मा (स्वयं) है। यह साम (स्वयं) इसी आंख के सहारे है।” फिर कहते हैं ”आंख की चमक ऋचा है, इसका नीला वर्ण साम है। इसका नीला अंश दीप्ति के सहारे है।” (वही, 2., 3, 4) अध्यात्म स्वयं का ही अध्ययन विश्लेषण है। यह एक अंतर्यात्रा है।

डॉ0 राधाकृष्णन् ने गीता के ‘अध्यात्म’ (8.3) विषयक तत्व पर टिप्पणी की है ”अध्यात्म – शरीर का स्वामी, उपभोक्ता। यह ब्रह्म की वह प्रावस्था है जो वैयक्तिक बनती है।” (श्रीमद्भगवद् गीता, डॉ0 राधाकृष्णन पृष्ठ 207) यहां ब्रह्म चेतना वैयक्तिक चेतना बन गया है। ब्रह्म बना या कोई और, असली बात वैयक्तिक चेतना ही है। वैयक्तिक चेतना का गहन अध्ययन विवेचन-अध्यात्म ही मूल तत्व तक पहुंचाएगा। गीता के 7वें अध्याय (श्लोक 29) में भी अध्यात्म शब्द का प्रयोग हुआ है। कृष्ण कहते है ”जो मुझमें शरण लेते है और बुढ़ापा तथा मृत्यु से मुक्ति पाने की कोशिश करते हैं, वे ब्रह्म अध्यात्म व कर्म के सम्बंध में सब कुछ जान जाते हैं।” (डॉ0 राधाकृष्णन का अनुवाद) बुढ़ापा से मुक्ति की कोशिश सांसारिक कार्रवाई है। मृत्यु कष्ट से मुक्ति के प्रयास मानवीय इच्छाए हैं। ब्रह्म या ईश्वर जानने की इच्छा आदिम है। अध्यात्म का ज्ञान अर्थात निजी अध्ययन संसार में रहने का प्रथम सोपान है। कर्म प्रवीणता के बिना कोई उपलब्धि नही। मूल बात है स्वयं का विवेचन, स्वयं के अंतस् का अध्ययन, भीतर की ऐषणाओं के केन्द्र बिन्दु की खोज, अपने रागद्वैष, काम क्रोध, राग विराग के स्रोत की जानकारी। पूर्वजों ने इसे ही अध्यात्म कहा था।

शशीकाका ....श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे ......इथेच वाचायचे सोडले..

नास्तिक म्हणतो देव नाही ...सोडुन देतो .

अस्तिक म्हणतो देव आहे ...शोधायचे सोडुन देतो

दोघे ही सारखेच :)

पन्नास !

शशिकांत ओक's picture

28 Apr 2014 - 2:30 pm | शशिकांत ओक

पण मुद्दा अस्तिक नास्तिकांचा नाही. जर पुढे वाचले असते तर कळले असते.
भारतीय संस्कृतीतील ईश्वरीय सत्ता मान्यता करायला व पुढील पिढीला पोहोचवायला सध्याच्या तरूण पिढीला वाटणारा संकोच का असा प्रश्न आहे तों समर्पकपणे मांडला जावा.

सुहास..'s picture

28 Apr 2014 - 2:58 pm | सुहास..

बेसिक्स काका बेसिक्स !!

कर्मकांडाची व्याख्या अध्यात्म्याशी रिलेट न करता , जर ती शास्त्राशी केली गेली असती तर सत्ता मान्यता वेगळ्या स्तरावरी झाली असती असे वाटुन गेले...असो .......

एक सहज प्रश्न पडला . जरा वैयक्तीक वाटेल पण आणि राग ही नका मानु ...तुमच्या पिढीने तरी ' नाडी ' शिवाय दुसरे काय केले :)

शशिकांत ओक's picture

29 Apr 2014 - 10:45 pm | शशिकांत ओक

मित्रा,
कर्मकांडांना मॉडर्न शास्त्राशी कसे जोडावे असे आपल्याला वाटतेय़ ...ज्ञानेश्वरी, दासबोध वाचताना त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे किंवा द्यावे अशी धाग्यातील लेखकाची अपेक्षा आहे.

प्रसाद गोडबोले's picture

29 Apr 2014 - 11:01 pm | प्रसाद गोडबोले

ज्ञानेश्वरी, दासबोध वाचताना त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे किंवा द्यावे अशी धाग्यातील लेखकाची अपेक्षा आहे.

मागे एका स्वामींना भेटण्याचा योग आला होता , त्यांच्याशी बरीच चर्चा झाली पण सगळ्यात महत्वाचा सल्ला मी तिथुन निघताना त्यांनी मला दिला ....
" उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत् । "
आपण आपली उन्नती करुन घ्या , आणि अधोगती टाळा ...बस्स !
जगाची काळजी करत बसण्याचे आपल्याला कारण नाही असा मी त्याचा सोयेस्कर अर्थ काढला आहे

त्यामुळे आपल्याला कळाले बस्स झाले :D

चित्रगुप्त's picture

28 Apr 2014 - 1:26 pm | चित्रगुप्त

...श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे ......इथेच वाचायचे सोडले..

@ सुहास
अरेरे !!! असे काय करता, आम्ही तर हे सगळे मिटक्या मारत वाचले , आणि त्यातून आम्हाला हे सुचले:
http://misalpav.com/node/27707

आता हे दोन्ही वाचा.

प्रसाद गोडबोले's picture

29 Apr 2014 - 12:07 am | प्रसाद गोडबोले

ह्या निमित्ताने परत एकदा रेने देकार्त च्या "मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी" ची परत आठवण झाली ...आता वाचायला घ्यावेच लागणार :)