या विषयावर अंतरजालावर किती लेखन झालय हे मला अपरिचित आहे. मी स्वतः सुद्धा,मिपावर अश्या प्रकारचे लेखन कमीच केले आहे. पण पूर्वी हे असले लेखन तुरळकपणे का होइना..पुणे..पिंपरी चिंचवड अश्या एरियातल्या २/३ (लोकल) मासिकांमधुन केले होते. (माझी वहिनी..साप्ताहीक-गगनझेप..वगैरे) काही कारणानी ती लिंक ८ वर्षांपूर्वीच तुटली.पण लिहिण्याची भूक शाबूत होती. तो चान्स पंधरा एक दिवसांपूर्वीच मिळाला. चान्स असं म्हणतो... कारण की एकतर ते दिवस अठवले. आणि दुसरं म्हणजे यावेळी चक्क साप्ताहिक सकाळ मधून फोन आला..म्हणून!
आधी पहिली दोन मिनिटं मी पलिकडून तिथला कोणी तरी कार्यकारी माणूस बोलतोय अश्या समजातूनच बोलत होतो. पहिले काहि क्षण गेल्यानंतर आवाज ओळखिचा वाटू लागला..आणि पुढचं वाक्य तिकडून आलं गुरुजी..तुंम्ही ओळखलं नाहीत अजून! माझ्या मेंदूत अनेक जुन्या फाइल्स चाळल्या गेल्या(खर्या!) पण काही कळेना. नंतर त्यानीच सांगितलं गुरुजी मी अभिजीत! मग एकदम सगळं जुनं जुनं फ्लॅश झालं. थोड्या गप्पा झाल्या. मी लेख देण्याची लास्ट डेट विचारली. आणि फोन ठेवला. बरेच दिवसानी मासिक टाइप लेख लिहायची संधी मिळालि होती.पण विषय तसा सिरियस होता.म्हणुन लग्गेच लेख "लिहायला" बसलो नाही. एक दिवस वेळ घेऊन दुसर्या दिवशी लिहिला.आणि नेऊन दिला. आला तर येइल छापून असा अंदाज बांधून विषय सोडला होता.(काहि जुन्या अणुभवांनुसार!) पण १८ तारखेला त्याचाच फोन आला.(अता तो साप्ताहिक सकाळ मधे गेली ३ वर्ष सहसंपादक आहे.) "संध्याकाळी ऑफिसवर येऊन जा!" ..त्याप्रमाणे गेलो. त्यांच्या सगळ्या टीमला लेख अवडला होताच.शिवाय प्रस्तुत विषयाबद्द्ल ठाम भुमिका घेऊन लेखन केल्याबद्दल अभिनंदनंही केले गेले. गेले काहि वर्ष त्यांना ज्या लोकांनी लेख लिहुन दिले..ते फक्त धर्मशास्त्रातली माहितिच-भरून देत होते..आणि पंचांगातले छापिल मुहुर्त!(अशी त्यांची तक्रार!) तसं पाहिलं तर मासिकात लेख छापुन येणे हे काहि फार मोठ्ठे असे नाही. पण काहि वाक्यरचनांचे फेरबदल आणि काहि विनोदी पद्धतीने केलेले एक/दोन उल्लेख सोडता मी लिहिलेल्यातले काहिही वगळले गेले नाही..याचा आनंद सगळ्यात जास्ती झाला. (यापूर्वीचा असल्या लेखनाबद्दलचा माझा मासिकांबद्दलचा अनुभव फारसा उत्साहवर्धक नाही..असो!)
आज सकाळी वल्लीचा व्हॉट्स अपवर अभिनंदनाचा संदेश आला.आणि मी दुपारपासून अभिजितला लेख "अंतरजालावर" आला की नाही म्हणून सताऊ लागलो. दुपारी २ पर्यंत अप्लोडेल असं वाटलवतं.पण अत्ता तासापूर्वी एकदाचा-आला!
"सावधान'चा मुहूर्त !:- http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20140422/4876045655882308747.htm
मनात म्हटलं..अता हे मि.पा.वर आधी शेअर केलं पाहिजे. म्हणून सगळ्यात आधी मि.पा.वर! :)
या लेखात नेमके काय आहे??? ...
१)विवाह मुहुर्त हे नक्की काय प्रकरण आहे?
२)काढीव मुहुर्त म्हणजे काय?
३) ज्येष्ठ/आषाढ/पौष आणि चातुर्मास-विवाहास निषिद्ध का?
४) आणि या सगळ्या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या धार्मिक माणसाला धर्माच्या..ज्योतिषशास्त्राच्या..समाजाच्या कक्षेत राहुन यावरची "तोड" मिळू शकते काय? (आणि ही "तोड" असते तरी कशी?)
५)धर्माच्या कक्षेत राहुन मिळालेल्या "तोडिचे" फलित किती? कसे? आणि काय? तसेच याच्या पुढे जाताना नेमकी काय दक्षता घ्यावी...या मुद्द्यवर लेखाचा समारोप आहे.
तर मिपाकरहो...लेख वाचा आणि कसा वाटला,ते सांगाही! :)
==============================================
"अहो...म्हायत्ये हो तुम्ही फार पुरोगामी गुर्जी आहात ते.. पण तरी कायतरी एक वेळ विवाहमुहुर्त म्हणून हवी की नको? की मेंढरांचा कळप आत आल्यावर कवाड लावतात...तसं लग्न लावायच..सगळी जमल्यावर? "
काही वर्षांपूर्वी ,एका (क्लाएंट..) यजमानाघरी चाललेल्या लग्नाच्या कार्यक्रम रूपरेषा चर्चेत, हा माझ्या अंगावर आलेला बाण! तेंव्हा तर मी बराचसा नवखाही होतो..आणि या पौरोहित्याच्या क्षेत्रात अनुभवाला-पारखाही! त्यामुळे बुद्धी ज्याला कौल देइल,ती प्रत्येक गोष्ट भावना(मन) स्विकारेलच असं नाही..मग ते खरं असो,अगर खोटं! हा धडा फार पटकन मिळाला. मग मनात क्षणभर विचार केला..असला हा मुहुर्ताचा प्रकार धर्मशास्त्रातंही उत्तरकालीन,तरिही एकदा काहि विधी करायचे निश्चित झाले..की त्याला काहितरी वेळ निश्चित करणे आलेच की? मग त्या यजमानांना..विवाह मुहुर्ताच्या दिवशी वधुवरांना(आणि त्यांनाही!) अनुकूल अशी एक वेळ काढून दिली..आणि न जमणार्या छापिल मुहुर्तांच्या कचाट्यातून त्यांना सोडविले. पण हा प्रसंग मलाही बरेच काही शिकवून गेला. त्यातही एकदा धर्म म्हटलं,की ते कसही काहिही असो..तो सारा भावनेचाच विषय असतो ना? मग तिथे बुद्धी गणित बांधण्यापुरतीच उपयोगात आणायला हवी,आणि ते सोडवायला भावनाच!
मग विचार असा केला,की मुहुर्त कुठे नाहीत?
शाळा भरायला आणि सुटायला...मुहुर्त आहे.
ऑफिसांना ..मुहुर्त आहे.
येश्टी,रेल्वे,विमान सुटायला...मुहुर्त आहे.
घरातून कामाला निघण्याचा ...मुहुर्त आहे.
डॉक्टरला ऑपरेशनांचा... मुहुर्त आहे.
हे सगळीकडे मुहुर्त आहे...मुहुर्त आहे... असं उत्तर, आमच्या कोकनातल्या द्येवलात घातलेल्या गार्हान्यातल्या 'होय..म्हाराजा!' सारखं यायला लागलं. चला...म्हटलं,उत्तर सापडलं! पण आमची मेली बुद्धी गप बसू देइल होय आंम्हाला? छ्या! आजाबात न्हाय! तीनी लगेच सांगितलच.. "आओ दिवेकर गुर्जी.. , शाळा हापीस रेल्वेचे मुहुर्त-काढले जात नाय...,ठरवले जातात.आनी त्यास्नी 'येळ' म्हनत्यात,मुहुर्त न्हाई! मुहुर्तात सुब/असुब असतं,आनी येळेत फकस्त टाइम असतुया!"
हे उत्तर मिळालं आणि मग एकदम सर्व चित्र स्पष्ट झालं. मुहुर्तात जर आपण काहि शुभ/अशुभ गृहीत धरत असू,तर प्रचलीत धर्मशास्त्र निर्णयानुसारच जायला लागणार.पण तसं काहिही गृहीत नसेल..तर ती एक कार्यक्रम करण्याला अनुकूल अशी फक्त आणि फक्त वेळच असेल..आणि धार्मिक कार्यक्रमासाठी ती घ्यायची तर फक्त पंचांगशुद्धी पाहुन घ्यावी लागेल. मग पंचांगशुद्धी.. म्हणजे तरी काय हो? तर पंचांगात दिलेलं दिनमान..म्हणजे 'योग्य दिवस,प्रतिकूल दिवस,चांगला,शुभ्,अशुभ.. ' हे! पण आता त्यातंही अडकणे नसले उपयोगाचे तर काय हो करावे दिवेकरभट? मग ते असे करावे,की सरळ बुद्धीगम्य निर्णय घ्यावा. आणि आपल्या सोयीचा असा कोणताही दिवस निवडावा. किंवा आपली ही अपेक्षा सांगून ज्योतिषाकडनं काढून घ्यावा.
लोकहो, वरती केलेला सगळा उहापोह आपण क्षणभर बाजुला ठेऊ. आणि असा विचार करू.., की ही गरज आपल्या मनाला नेमकी कशी आहे? आणि का आहे? माझ्या मते दोन तीन कारणं असू शकतात.
१)धर्मशास्त्रातलं हे परंपरेनी चालत आलेलं सगळंच्या सगळं बाजुला टाकुन द्यायला मन तयार होत नाही.
२) तुमचं सगळं पटत हो...पण लोक काय म्हणतील? हे लोकं-भय निर्णयावर येऊ देत नाही.
३)आंम्हाला हवं तेंव्हा मंगल कार्यालय वगैरे उपलब्ध नाही..असं तात्कालीक कारण आहे म्हणून!
यातील पहिलं कारण असेल,तर मी तुम्हाला यातल्या खर्या/खोट्याच्या वादात जाणिवपूर्वक न नेता एव्हढच सांगिन की मानवाच्या प्राथमिक समुहजीवनाचा(टोळी किंवा ट्राइब'चा) काळ आठवा..ज्यावेळी सृष्टी त्याला अत्यंत प्रतिकूल होती,आणि धर्म ही गोष्ट आजच्या सारखी ऐसपैस तर सोडाच्,उलट ती नीट हिशोबातंही आलेली नव्हती. तेंव्हाही माणूस ह्या गोष्टींशिवाय जगत होता.आणि त्याची मानसिक/ऐहिक सुखदु:ख्खंही अगदी फार वेगळी नव्हती. (ह्यावर कुणी आजच्या अपडेट समाज जीवनाचा दाखला दिला आणि आक्षेप घेतला,तर त्याला उत्तर एव्हढच की रोटी/कपडा/मकान..एव्हढ्याच गरजा मूलंभूत असतात.त्यांची रुंदी नव्हे!) तेंव्हा आपल्या मनाला आता ही नवी सवय लाऊन घ्यायला काहिही हरकत नाही. आणि त्यात काहि वाइटंही नाही.
दुसर्या कारणाचा परामर्श घ्यायचा,तर लोकंभय उडवून लावणं ही गोष्ट सोपी नाही,हे आपण प्रामाणिकपणे मान्य करूनच पुढे जाऊया. आता.. हे लोकंभय म्हणजे तरी काय हो? तर अश्या प्रसंगी आपणच दुसर्यांशी जे व्यक्त होत असतो..तेच हे लोकंभय आहे. धर्म.. या क्षेत्रातला कोणताही निर्णय, (मग तो योग्य/अयोग्य..जो असेल तो!) बुद्धिनीच घ्यायला हवा..आणि औषधाच्या कडू गोळी प्रमाणे तो जिभेवर ठेऊन पचवायलाही हवा. आणि त्याची सुरवातंही ते लोकंभय वाटत असतानाच करायला हवी..कारण??? - "अभी नही..तो कभी नही!" आणि समजा..यावेळी जमली नाही,तर पुढच्या वेळी तरी ही सुरवात करायला हवीच हवी..पण दरवेळी प्रयत्न हवा आणि तो मात्र निकराचाच हवा हो...तरच हे आपणच निर्मिलेलं लोकंभय नाहिसं होइल. कदाचीत आपण लहान मूल होतो..तोपर्यंत ह्या गोष्टींमधे, लोक-आपल्याला "तो बघ बुवा आला,बुवा आला!" करत होते.पण आता एकदा तरी मोठे होऊन या "बुवा आला"च्या आरोळीलाच आपल्या पर्यंत न येण्याची वेळ आणवुया. म्हणजे पुढे चालून ती त्यांच्यावरंही येणार नाही!
तिसर्या कारणाला तर काही चिंताच करायची गरज नाही. आपत्काल हा (हो..हो..धर्मशास्त्रातंही) युद्धासारखा असतो..आणि प्रेमात व युद्धात सर्व काही माफ असतं... मग अजुन काय सांगावे?
या सगळ्याचा एकाच वाक्यात समारोप करायचा झाला..तर एव्हढच सांगता येइल,की.. आपण धर्म पाळायचा असतो,धर्मानी आपल्याला पाळायचं नसतं.
============================
प्रतिक्रिया
22 Apr 2014 - 7:14 pm | शुचि
लेख वाचला. माहीती मिळाली. मुहुर्ताविषयी एक प्रश्न आहे - ५:३० पहाटे ला वैशाख शुद्ध तृतीयेचा समजा मुहुर्त आहे, तर तीच वेळ बरोब्बर ११ - ११ १/२ तासांनी पाश्चात्य देशात येते. याचा अर्थ मुहुर्त असा फिरता असतो का? :(
22 Apr 2014 - 7:33 pm | अत्रुप्त आत्मा
@ याचा अर्थ मुहुर्त असा फिरता असतो का? Sad>>> =)) नाही..नाही..
वेळ तिच..फक्त ती.. तिकडे घ्यायची! :)
22 Apr 2014 - 7:34 pm | शुचि
:) धन्यवाद
22 Apr 2014 - 8:15 pm | समर्पक
कसे? तिथि हि (पृथ्वीवर)स्थलसापेक्ष नाही. (क्ष तारिख) ५:३० पहाटे ला वैशाख शुद्ध तृतीयेचा समजा मुहुर्त आहे, आणि तृतीया जर ८ ला संपते, तर १२ तास मागे असलेल्या देशात ती त्यांच्या वेळेप्रमाणे १२ तास आधी संपते त्यांच्या 'क्ष तारिख ५:३० पहाटे' ला तृतीया रहिलेली नसेल... अर्थात, त्याच मुहुर्ताचे कार्य १२ तास मागे असलेल्या देशात 'क्ष-१ तारिख ५:३० सायं' करावे लागेल, नाही का?
22 Apr 2014 - 8:21 pm | अत्रुप्त आत्मा
@ अर्थात, त्याच मुहुर्ताचे कार्य १२ तास मागे असलेल्या देशात 'क्ष-१ तारिख ५:३० सायं' करावे लागेल, नाही का?>>> म्हणूनच मी वरील प्रतिसादात -- वेळ तिच..फक्त ती.. तिकडे घ्यायची! असे म्हणालो होतो.. अता त्यातच एक महत्वाचा बदल करतो... ती ज्योतिषाला विचारून घ्यायची...(म्हणजे..प्रश्नच मिटला!)
या धाग्यावर एक महत्वाचे:---- मी ज्योतिषी नाही पौरोहित्याच्या या लाइन मुळे,त्या ला'इन'ची थोडी माहिती आहे. इतकेच! :)
23 Apr 2014 - 10:14 am | उपाशी बोका
तुम्ही म्हणता की "मी ज्योतिषी नाही". मग लेखात लिहिले आहे
हे कसं काय म्हणू शकता? आणि लेखात लग्नाचे मुहुर्त का दिले आहेत? म्हणजे ज्योतिषाचे ऐका असे सांगण्याचाच प्रयत्न झाला ना? की पौरोहित्य करण्यामुळे conflict of interest नको म्हणून असे विधान केले आहे?
जर ज्योतिषाने सांगितले की मुहुर्त चांगला नाही (समजा सांगितले की अमावास्येला लग्न करू नका) किंवा पत्रिका जुळत नाही, तरीही लग्न केले तर काय वाईट परिणाम होतात?
23 Apr 2014 - 2:27 pm | अत्रुप्त आत्मा
@ हे कसं काय म्हणू शकता? >>> सोप्पं आहे..कारण हे मी म्हणतच नाहीये ज्योतिषशास्त्र-काय म्हणतं... ते मी फक्त (प्रस्तुत..लेखन विषयाची गरज म्हणून..) लोकांना दाखवून देतोय... ते ज्योतिष शास्त्राचं मत आहे... म्या पामराचं नाही! आणि लेखनाशिवाय हा प्रश्न मला विचारत असाल...तर-लेखनविषयाच्या औचित्यामुळे मला असं म्हणायचा अधिकार आहेच!!!
@आणि लेखात लग्नाचे मुहुर्त का दिले आहेत? >>> साप्ताहिक सकाळला हवे होते ..म्हणून!
@म्हणजे ज्योतिषाचे ऐका असे सांगण्याचाच प्रयत्न झाला ना?>>> ज्योतिषाचे ऐका..असं तुंम्हाला वाटलेलं आहे.पण ते तसं नाही. मला असं वाटतं.. की,लेख वाचणार्यांनी:--- संपूर्ण लेख वाचा,आणि वाचल्यानंतर आपलं मन आपल्याला कोणत्या श्रद्धेच्या जवळ नेतं..परंपरागत ..की नवसामाजिक श्रद्धा??? (ते पाहा..) अता,ती श्रद्धा..या दोन्हीपैकीच १ असणार.नाही का? ..तर मग त्यातल्या ज्या श्रद्धेच्या जवळ जाल..त्याप्रमाणे वागा. स्वतःचं मन(आज) जिथे प्रामाणिक होतय..तो कौल घ्या..असं सुचवलेलं आहे..किंवा तसा संदेश द्यायचा प्रयत्न मी केलेला आहे.
@की पौरोहित्य करण्यामुळे conflict of interest नको म्हणून असे विधान केले आहे? >>> नाही .. तसे काहिही नाही.
@जर ज्योतिषाने सांगितले की मुहुर्त चांगला नाही (समजा सांगितले की अमावास्येला लग्न करू नका) किंवा पत्रिका जुळत नाही, तरीही लग्न केले तर काय वाईट परिणाम होतात? >>> काहिही वाइट परिणाम होत नाहीत.कारण वाइट परिणाम होण्याचा या ज्योतिषशास्त्रीय गोष्टींशी काहिही संबंध नाही. जे काहि चांगले किंवा वाइट परिणाम होतात,ते... दोघांमधली परस्पर व्यवहाराची रीत कशी आहे? ज्या कुटुंब/जाती/समाजात राहतात,त्याचा त्यांच्यावर होणार परिणाम काय आहे? ..अश्या निरनिराळ्या शुद्ध इहलैकिक गोष्टी/कारणांमुळे होत असतात.
24 Apr 2014 - 10:44 am | ऋषिकेश
बास बास!
उगान नै आम्ही अॅग्नॉस्टिक असूनही तुमचे लेख आवर्जून वाचत!
24 Apr 2014 - 3:27 pm | अत्रुप्त आत्मा
@अॅग्नॉस्टिक असूनही तुमचे लेख आवर्जून वाचत!>>> :) अरे व्वा! फारच छान. धन्यवाद.
23 Apr 2014 - 11:00 am | आनन्दा
हा एक गहन प्रश्न आहे, मी जरी ज्योतिषी नसलो तरी मला देखील हा प्रश्न बरेच दिवस पडला आहे, आता तुम्ही विचारला आहेच, तर माझ्या उपलब्ध माहितीनुसार कढतोच उत्तर शोधून.
22 Apr 2014 - 7:22 pm | पैसा
आता लेख वाचते!
22 Apr 2014 - 7:28 pm | धन्या
जरा ते तुमचं "मी माझा,..." पुस्तकही दया की वाचायला. :)
22 Apr 2014 - 7:34 pm | अत्रुप्त आत्मा
धन्या...प्लीज ..ते हिते नको! :D __/\__ :D
22 Apr 2014 - 7:47 pm | आदूबाळ
लेख आवडला, आत्माजीराव!
एक दोन शंका:
- मारवाडी लग्नांमध्ये "विवाह का समय" म्हणून वेळेची एक रेंज दिलेली असते. आपल्याकडे ११:२६ असा लोकलच्या वेळेसारखा मुहूर्त असतो. असं का?
- समजा मुहूर्त चुकला तर काय होतं?
आणि हू इज द अभिजीत?
22 Apr 2014 - 8:00 pm | प्रचेतस
हा बहुधा अभिजीत पेंढारकर असावा आणि तोच असला तर तो आपलाच एक मिपाकर आहे. आपला अभिजीत.
22 Apr 2014 - 8:16 pm | अत्रुप्त आत्मा
@हा बहुधा अभिजीत पेंढारकर असावा >>> नाही... हा अभिजित सोनावणे..म्हणून आहे.
22 Apr 2014 - 8:18 pm | प्रचेतस
वोक्के जी.
22 Apr 2014 - 7:55 pm | नाखु
मित्रांना सांगावा असा सुंदर लेख..
अभिनंदन..
22 Apr 2014 - 7:55 pm | सूड
मस्त लिहीलंयत आणि विशेष म्हणजे वाचकांशी संवाद साधल्याच्या अंगानं जाणारं लिखाण आहे. स्मायल्या वगळल्यात म्हणून की काय देव जाणे, लेख जमलाय हों !! ;)
22 Apr 2014 - 8:18 pm | प्रचेतस
पुनरेकवार अभिनंदन.
लेख छान जमून आलाय.
25 Apr 2014 - 11:40 pm | लॉरी टांगटूंगकर
असेच म्हणतो.
22 Apr 2014 - 8:19 pm | पैसा
आताच्या मुहूर्तांना सगळ्यात महत्त्वाचं आणि आवश्यक म्हणजे त्या दिवशी हवं ते कार्यालय उपलब्ध असणे. अशा वेळी लोक तुम्हाला दिवस सांगून मुहूर्त शोधायला बसवत असतील!
22 Apr 2014 - 9:17 pm | खटपट्या
अभिनंदन !!!
मस्त लेख
----------------------------------------------------------
संपूर्ण बाहेर पडलेला "खटपट्या"
22 Apr 2014 - 9:25 pm | अजया
अभिनंदन बुवा ! छान आहे लेख !
23 Apr 2014 - 12:03 am | डॉ सुहास म्हात्रे
लेख फक्कड झालाय ! ग्रहनक्षत्रांनी शब्दबंबाळ न करता नेहमीसारखाच धर्म आणि प्रथांच्या गुंत्यातही व्यवहारिक जमिनीवर पाय रोवून आहे !
(स्मायल्या टाकायच्या नसल्याने बुवांना लेख लिहीतांना कसंसंच झालं असणार असं उगाचच वाटलं. ;) )
23 Apr 2014 - 12:09 am | मुक्त विहारि
सविस्तर प्रतिसादासाठी वेगळा धागा (आणि विशेषतः वेळ) काढायला लागेल.
23 Apr 2014 - 2:08 am | बॅटमॅन
लेख एकदम जमून आला आहे. स्मायली नसल्याने अंमळ अवघडल्यागत वाटलं असेलही कदाचित पण लेखात तरी तसं कै दिसत नै. एकदम नो नॉन्सेन्स आणि साधी सोपी सरळ भाषा आहे. सरळ मुद्याला भिडत असल्याने लेख विशेष आवडला.
23 Apr 2014 - 7:50 am | भाते
लेख आवडला. पण लेखात एकही स्मायली नसल्याने चुकल्यासारखे वाटले. :)
23 Apr 2014 - 7:54 am | यशोधरा
अभिनंदन! आता लेख वाचते.
23 Apr 2014 - 7:57 am | जोशी 'ले'
अभिनंदन बुवा...लेख आवडला
23 Apr 2014 - 1:22 pm | मृगनयनी
अ.आ. जी... उपयुक्त आहे लेख!. आवडला!! :)
_____________
या आपल्या वाक्यात एक थोडेसे करेक्शन सुचवावेसे वाटते.. ते म्हणजे.. ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ अपत्यांची लग्ने करू नये.. असा कुठलाही नियम नाही. फक्त "३ ज्येष्ठ" एकत्र येऊ नयेत.. असा नियम आहे. म्हणजे ज्यांचे लग्न आहे.. तो मुलगा आणि ती मुलगी हे जर आपापल्या जन्मदात्या आईवडिलांचे ज्येष्ठ अपत्य असतील.. तर त्या दोघांचा विवाह ज्येष्ठ महिन्यात करणे टाळावे. कारण तीन ज्येष्ठ एकत्र येऊ नयेत. असा नियम आहे.
पण सपोझ, मुलगा घरातील ज्येष्ठ अपत्य असेल आणि मुलीला मात्र तिच्यापेक्षा मोठे एखादे भावंड असेल, तर त्या दोघांचा विवाह ज्येष्ठ महिन्यात करण्यास काहीच प्रॉब्लेम नसतो. कारण इथे मुलगी कनिष्ठ अपत्य असते. किंवा मुलगी ज्येष्ठ अपत्य व मुलगा कनिष्ठ अपत्य असेल.. तरी ज्येष्ठ महिन्यात विवाह करण्यास काहीच अडचण नसते.
त्याचप्रमाणे एखाद्या घरात लग्नाळू मुलगा किंवा मुलगी सद्यःस्थितीला जरी ज्येष्ठ असले आणि यापूर्वी त्यांचे एखादे भावंड लहानपणी मृत पावले असले... तर त्यांना शास्त्रानुसार "ज्येष्ठते"चा दर्जा मिळत नाही. पर्यायाने ज्येष्ठ महिन्यात लग्न ते करू शकतात.
त्याचबरोबर एखाद्या स्त्री'चा पहिला गर्भ "अॅबॉर्ट" / "मिसकॅरेज" झाला असेल.. तरी दुसर्या गर्भाला किंवा अर्भकाला ज्येष्ठ म्हणता येत नाही. त्यामुळे त्या अर्भकाच्या विवाहाच्या वेळेस "ज्येष्ठ" महिना आडवा येत नाही.
:)
23 Apr 2014 - 8:46 am | प्रमोद देर्देकर
लेख वाचला, अभिनंदन!.
ज्या जोडप्यांना (जास्त करुन पालकांना) जे काढीव मुहुर्त आपल्या सोयीचा करण्यासाठी धडपडता, त्यांच्यापर्यंत योग्य तो संदेश पोहचवणारा लेख.
पण लेखातले हिंग्लिश शब्द वगळायला हवे होते असे वाटते.
धन्स
23 Apr 2014 - 9:51 am | ऋषिकेश
चर्चा विषय रोचक आहे.
माझे लग्न मी ३ दिवस लागून आलेली सुट्टी व हॉलच्या उपलब्धतेनुसार केले. पौष महिना असल्याने चांगला हॉल फार त्रास न होता मिळाला.
पौष महिना, पितृपंधरवडा हे कमी त्रासात व गर्दिविरहित वातावरणात कार्ये करायला उत्तम मुहुर्त आहेत, असे स्वानुभवाने सांगतो!
23 Apr 2014 - 10:44 am | प्रकाश घाटपांडे
मुहुर्त म्हटले की भास्कराचार्य लिलावतीची गोष्ट आठवते. यंदा कर्तव्य आहे मधे त्या बद्दल लिहिले आहे
मुहुर्ताच्या निमित्ताने
23 Apr 2014 - 11:00 am | ब़जरबट्टू
सगळेच "तुम्ही मानत असाल तर" असल्यामुळे आवडला आहे...
बाकी दक्षिणा घेतांना चालते का हो ... तुम्ही मानत असाल तर" :) (ह.घ्या)
23 Apr 2014 - 11:45 am | झकासराव
अरे वाह!!
अभिनंदन. :)
लेख वाचतो आता.
23 Apr 2014 - 1:27 pm | सुहास झेले
लेख आवडला... अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगितलेत :)
25 Apr 2014 - 11:35 pm | किसन शिंदे
अगदी हेच बोलतो. बुवा लेख आवडला.
23 Apr 2014 - 1:58 pm | मृत्युन्जय
अभिनंदन बुवा. लेख छापुन आल्याबद्दलही आणि लेख फक्कड जमल्याबद्दलही. :)
24 Apr 2014 - 10:26 am | सफरचंद
मीपा वर अजून सविस्तर येऊ द्या कि .....
24 Apr 2014 - 10:32 am | मनीषा
चांगल्या विषयावरचा माहितीपूर्णं लेख
24 Apr 2014 - 6:50 pm | रेवती
वाचला लेख. चांगला झालाय. अभिनंदन हो बुवा!
24 Apr 2014 - 9:19 pm | वपाडाव
आत्म्या पळुन कुकडे गेला रे?
लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...
24 Apr 2014 - 9:31 pm | प्रचेतस
माताय, लै दिसांनी आलास रे. :)
24 Apr 2014 - 11:10 pm | अत्रुप्त आत्मा
@आत्म्या पळुन कुकडे गेला रे?
लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...>>> :-/ असाच प्रशन मी गेले काहि महिने (विवाहामुळे तडिपार जाहलेल्या) एका मित्राला विचारत होतो.. आपल्याला...हल्ली तो मित्र कुठे असतो? हे माहित आहे का?
भेटला तर सांगा त्याला..कंपू वाट पाहात आहे!
24 Apr 2014 - 11:15 pm | प्रचेतस
=))
25 Apr 2014 - 3:00 am | रेवती
अगदी हेच म्हणते.
बरा सापडला! ;)
25 Apr 2014 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा
१)आदूबाळ >>>
@मारवाडी लग्नांमध्ये "विवाह का समय" म्हणून वेळेची एक रेंज दिलेली असते. आपल्याकडे ११:२६ असा लोकलच्या वेळेसारखा मुहूर्त असतो. असं का?>>> ती त्या लोकांनी त्यांच्या लोकांची पाहिलेली सोय असते. तरीसुद्धा मलाही मारवाडी लग्नात हा प्रकार तुरळक दिसलेला आहे. ते ही मुहुर्ताचे भोक्ते आहेत..पण व्यावहारीकपणे!
@समजा मुहूर्त चुकला तर काय होतं? >>> लोकं आमच्यावर चिडतात! :D जोक्स अपार्ट..त्याचं स्पष्टीकरण,वर सांगितलेलं आहे.
=================================
२)सूड >>> प्रतिसाद नक्की आपणच लिहिलायत का?
अशी पहिल्या वाक्यामुळे आलेली शंका,दुसर्या वाक्यामुळे दूर झाली. :p
=================================
३)पैसा >>>
@अशा वेळी लोक तुम्हाला दिवस सांगून मुहूर्त शोधायला बसवत असतील!>>>असंही घडतच,आणि हे आता सवईच झालय.
=================================
४)इस्पीकचा एक्का >>> :D
=================================
५)मृगनयनी >>> आपण जे काहि म्हणलात,त्यातून-लोकं जड-होणार्या गोष्टीतून,धर्मशास्त्राचा वर्ख लाऊन आपापली सोय पहातात. हेच स्पष्ट होतं.
=================================
६)प्रमोद देर्देकर >>>
@पण लेखातले हिंग्लिश शब्द वगळायला हवे होते असे वाटते.>>> लेख- मासिकाच्या वाचकांच्या बोलीभाषेत रहावा,म्हणून मुद्दामच तसे केले आहे. :)
=================================
७)ब़जरबट्टू
@बाकी दक्षिणा घेतांना चालते का हो ... तुम्ही मानत असाल तर" >>> =)) ते तुंम्ही आंम्हाला किती मानता यावरून ठरवावं लागतं! :D
=================================
८)सफरचंद
@मीपा वर अजून सविस्तर येऊ द्या कि >>> जी साब!
=================================
९)वपाडाव
वरती एक र्हायलच होतं,ते अता पूर्ण करतो
@आत्म्या पळुन कुकडे गेला रे?
लोक वाट पाहतायत तुझ्या उत्तरांची...>>> वप्या पळुन कू(णी)कडे गेला रे? :D
मी वाट पाहतोय त्या तुझ्या उ(अ)त्तरांची... :p
26 Apr 2014 - 6:29 am | प्रचेतस
ही अत्तरांची काय भानगड आहे हो आत्मुदा? ;)
23 Apr 2015 - 12:22 am | अत्रुप्त आत्मा
============================================
हा फोटो कॉपीमधला लेख तेथे सा.सकाळच्या धोरणानुसार काहिसा संपादित झालेला आहे. म्हणून मूळ कच्चा मसूदाहि येथे खाली देत आहे.
============================================
हा मूळ मसुदा...
=============================================
संपादकः- कृपया हा प्रतिसाद मूळ धाग्यात लाऊन द्यावा. :)
23 Apr 2015 - 10:16 am | प्रमोद देर्देकर
पुनरेकवार हाभिणंदन गुरुजी
23 Apr 2015 - 12:43 pm | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद!