लोकहो......... समस्त मिपाकरहो....
दिनांक २८ मार्च २०१४ रोजी आपले प्रभाकर पेठकर काका पुण्यग्रामी येत आहेत होsssssssssssss! तरी,ज्या ज्या मिपाकरांस या अचानक डॉट कॉम कट्ट्यास येणेचे शक्य असेल त्यांनी या दवंडीस प्रतिसादी अनुमोदन द्यावे होsssssssssssss!
कट्ट्याचे स्वरूपः- सकाळी दहा वाजता ,पुण्यनगरीतील मंडई नामक बहुश्रुत विभागातील तुलसीबाग नामे करुन असलेल्या प्राचीन स्त्री....( सॉरी :D ..) स्त्री प्राचीन... (हां...आता जम्लं! :D ...) अलंकार प्रीती विभागात.... अंतःपुरात जाणार्या वाटेवर ..राम देवालया समीप असलेल्या... श्रीकृष्ण मिसळ नामे खाद्यक्षुधावर्धन गृहात जमावयाचे आहे होsssssssssssss!
तद् नंतर पुढील पूर्ण दिनात् अत्र/तत्र हिंडोन* सायंकाली चिंचवड ग्रामात ट्रान्स्पोर्ट नगरातील रामदेव-बाबा-ढाबा नामक महा-क्षुधा-शांति गृहात हादडौन दिनः-सांगता करण्याचे नक्की केले आहे होsssssssssssss!
*---- (हे हिंडणे आपल्या सर्वांच्या [मिसळ भक्षून तट्ट जाहलेल्या पोटा'चे] हिंड-मान लक्षात घेवोन..आयत्यावेळी "कुठेही" करणेत येइल...! )
हे ढांम ढांम ढांम ढांम ...
धत्तड तत्तड तत्तड तत्तड....
प्रतिक्रिया
26 Mar 2014 - 6:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
मी पैला... मी येणार... २८ मार्चला !
26 Mar 2014 - 6:03 pm | अत्रुप्त आत्मा
संध्याकाळी...तिकडे चिंचवडात येणारे मिपाकर...
वल्ली,नादखुळा,चौकटराजा...
26 Mar 2014 - 6:05 pm | झकासराव
२८ एप्रिल होय.
दिवसभर जमल नसल तरी मिपाकराना भेटायला रामदेव धाब्याला हजेरी लावेन.
सोबत रबडी- गुलाबजामुनचा आस्वाद घेता येइलच. :)
26 Mar 2014 - 6:06 pm | झकासराव
अरे २८ मर्च आहे होय.
मघाशी एप्रिल दिसलं.
शुक्रवार आहे.
शनिवारी वर्कीन्ग आहे.
भेटण्यासाठी एक चक्कर मारेन. :)
26 Mar 2014 - 6:12 pm | प्रचेतस
येणार..येणार...येणारच...............
26 Mar 2014 - 7:21 pm | आत्मशून्य
.
26 Mar 2014 - 6:13 pm | आदूबाळ
श्रीकृष्ण मिसळ
(मारक्या बैलाची स्मायली)
कट्ट्याला शुभेच्छा
(गुरगुरणार्या बोक्याची स्मायली)
26 Mar 2014 - 6:39 pm | सूड
सकाळी असेल तर जमेलसं दिसतंय. फक्त दहा वाजता जमेलसं दिसत नाही. अकरा वैगरे वाजतील.
26 Mar 2014 - 7:13 pm | अत्रुप्त आत्मा
वाजू द्या....पण या!
26 Mar 2014 - 6:52 pm | केदार-मिसळपाव
पुण्यास येउन, त्यातल्या त्यात तुळशीबागेत कमित कमी १२ वेळेला फेरफटका (?) मारुनही "श्रीकृष्ण मिसळ" न दिसल्याने आणि त्या अनुभवास मुकल्याने अतिव दुख्खः होत हाए.
26 Mar 2014 - 6:53 pm | केदार-मिसळपाव
दाबुन चापा मिसळ लेको...
26 Mar 2014 - 7:26 pm | दिव्यश्री
पेशल जंटलमन असा कट्टा आहे का?
महिलांना बंदी आहे का ?
26 Mar 2014 - 7:38 pm | बॅटमॅन
म्हैलांना एण्ट्री ब्यान असा ढिस्क्लेमर दिसतोय का कुठे?
अन तुम्ही तर बाहेर असता ना हो? तिथे बसून शलाकाक्षेपण आणि कसलं करतांव आँ?
26 Mar 2014 - 8:03 pm | अत्रुप्त आत्मा
+१ :D
26 Mar 2014 - 8:10 pm | दिव्यश्री
म्हैलांना एण्ट्री ब्यान असा ढिस्क्लेमर दिसतोय का कुठे?>>> नयी हु मय . अतृप्त आत्मा कुड , कसा , कंदी(पेडा नाय बर का :P ) ढिस्क्लेमर टाकतील याचा नेम नाय . म्हणल इचारूण खात्री करावी .
अन तुम्ही तर बाहेर असता ना हो?>>> व्हय जी ...आम्ही बाहेरच असतो . म्हणून आम्ही कंदी आत यायच्च नाही का ? यायला बंदी हाये का आम्हाले ??
तिथे बसून शलाकाक्षेपण आणि कसलं करतांव आँ?>>> नाय बा ...आधीच नयी हु मय .त्यात कुठल्याही कंपूत नाही ...अल्पसंख्यांक ...कसलं शलाकाक्षेपण...आण कसलं काय . :)
26 Mar 2014 - 8:16 pm | स्वप्नांची राणी
'जंटलमन' असाही ढिश्क्लेमर नाहीये ग...
26 Mar 2014 - 7:58 pm | बाबा पाटील
दोन्हीपैकी एका वेळी नक्की येणार.आत्मुराव कृपया भ्रमणध्वनी नंबर व्यनी करावा.
26 Mar 2014 - 8:01 pm | देवांग
मी येईन चिंचवडला...आपल्याला जवळ आहे ...
26 Mar 2014 - 8:29 pm | चौकटराजा
आसे असल्यास भो पंचम जॉर्ज च्या स्टाईल वर स्वागतपद्य शीवाजी म्हाराज व तुकाराम बुवा यांच्या साक्षीने म्हणू !
26 Mar 2014 - 10:40 pm | प्रभाकर पेठकर
मी येणार.... मी येणार
26 Mar 2014 - 10:49 pm | यसवायजी
:))
उत्सवमुर्ती, आपण तर आलंच पैजे.
(शुक्कर्वारची रजा मिळाल्यास)
मी पण येणार.... मी पण येणार
27 Mar 2014 - 6:02 am | स्पंदना
उत्सव मुर्ती??
काऽऽका!! स्वत्;ला वाचवा!!!
27 Mar 2014 - 10:08 am | प्रभाकर पेठकर
हा: हा: निरोप पोहोचला.
27 Mar 2014 - 6:33 pm | सूड
>>काऽऽका!! स्वत्;ला वाचवा!!!
पुणेकरांचा कट्टा आहे, इथे टीटीएमेम असा कारभार असतो म्हंटलं!!
27 Mar 2014 - 7:20 pm | दिव्यश्री
:D *LOL*
28 Mar 2014 - 1:24 am | शशिकांत ओक
पुंण्यात्मा व अन्य पुणेरी मिपाकर आपल्या आगमनासाठी अत्तराच्या फायासह सज्ज आहेत. येणे करावे.
चपाती कम पराठा जास्त व मिसळ कम पाव जास्त असे करत खाणे कम पिणे जास्त असा काहीसा अहवाल फोटू सह पहायला मिळावा अशी आग्रहाची विणंति.
26 Mar 2014 - 11:30 pm | सुहास झेले
शुभेच्छा... मज्जा करा :)
27 Mar 2014 - 9:03 am | प्रशांत
कट्ट्याला शुभेच्छा....
एक तर शुक्रावार आणि सध्याकाळी ८ च्या ट्रवल्सने अकोला जातोय :(
27 Mar 2014 - 9:32 am | मि मिपाचा मित्रच
कृपया भ्रमणध्वनी नंबर व्यनी करावा. सो , so chinchwad la kuthe ani kiti vajta bhetayche te samjel & accordingly off madhun early yeta yeil
27 Mar 2014 - 10:11 am | नाखु
जिम्मेदारी "बॅट्याला" आणण्याची...
"आप"लाच
परस्पर भागवत.
27 Mar 2014 - 11:30 am | झकासराव
चिन्चवडचे आयोजक कोण आहे?
मोबाइल नंबर हवाय.
रामदेव बाबाला संध्याकाळी बर्यापैकी गर्दी असते.
आधीच फोनवर बुकिन्ग केल तर बरं पडेल.
27 Mar 2014 - 6:01 pm | झकासराव
आत्माराव,
व्यनी पहा कृपया.
27 Mar 2014 - 6:22 pm | निश
श्रीकृष्ण मिसळ ला मिसळ म्हंणणे म्हंजे चपातीला परोठा म्हणण्यासारख आहे. तो बट्याट्याचा रस्सा नामक जे काही ताटात येते ते असत मात्र भारी ह्यात शंकाच नाही. फार मस्त. पाव स्लाईस बरोबर खाताना अजुनच मजा येते.
27 Mar 2014 - 9:07 pm | खटपट्या
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा !!!
--शुभेच्छुक "खटपट्या"
27 Mar 2014 - 9:39 pm | पिंगू
आलोच उद्या.. तुळशीबाग काय.. एक गल्ली ओलांडली की आलीच..
27 Mar 2014 - 10:00 pm | मुक्त विहारि
मस्त कट्टे करा....
27 Mar 2014 - 11:09 pm | उपास
पुण्यातल्या पुढच्या कट्ट्याला जमवेन... तूर्तास कोरड्या शुभेच्छा!
27 Mar 2014 - 11:32 pm | पिवळा डांबिस
जर्मनी झाली, आता एकदम पुणे!
मस्त भटकतायत पेठकरकाका!!
(कामधंदा कधी करतात कुणास ठाऊक!!)
-किंचित इनोग्राहक
पिडांकाका
:)
28 Mar 2014 - 10:57 am | चौकटराजा
आता केजरीवाल आंबानी अदानी नंतर पेठकर काकांचेच नाव घेणार दिल्ली चालवतात म्हणून . हा का ना का !
28 Mar 2014 - 10:39 am | प्रमोद देर्देकर
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा ! मज्जा करा.
28 Mar 2014 - 12:42 pm | विटेकर
आत्ताच पेठ्कर काकांशी बोललो .. आत्मुबाबा स्मयलीवाले यांच्या फोन्वर.
श्रीकृष्ण ची मिसळ चेपून मंडळी अमंळ सुस्तावलीत.
28 Mar 2014 - 12:55 pm | सुकामेवा
मी रामदेव ढाब्यावर भेट्तो किति वाजता जमताय ते सांगा
28 Mar 2014 - 12:58 pm | प्रचेतस
७.१५ पर्यंत
28 Mar 2014 - 1:12 pm | बाबा पाटील
फक्त एखाद्या पेशंटने गडबड करायला नको.
28 Mar 2014 - 1:14 pm | यशोधरा
मज्जा आली कट्ट्याला. :)
28 Mar 2014 - 1:26 pm | पैसा
याच्यासोबत इनोची पाकिटं पण दे ना!
28 Mar 2014 - 1:33 pm | पिंगू
इनोची खास पाकिटे घ्यायला तुळशीबागेत यायचं हं..
28 Mar 2014 - 1:34 pm | पैसा
दुष्ट कुठला!
28 Mar 2014 - 1:42 pm | यशोधरा
:D
28 Mar 2014 - 1:44 pm | अत्रुप्त आत्मा
@तुळशीबागेत यायचं हं..>>> धन्यवाद पिंगु! :D
28 Mar 2014 - 2:11 pm | सूड
>>तुळशीबागेत यायचं हं..
हल्ली बागेत इनो विकतात? बा द वे हे तुळशीबाग का काय ते कुठे आलं?
28 Mar 2014 - 2:31 pm | यशोधरा
मंडई के पायर्यांपर जो पाणी पड्या है, उसमें पडके डूब मरो मेल्या! :D
28 Mar 2014 - 1:49 pm | भाते
आम्ही इथे हापिसात बसुन काम करतोय आणि हे धाग्यावर कट्टयाचे धावते समालोचन देत आहेत दुष्ट लेकाचे!
आता खादाडीचे फोटो आणि सविस्तर वृत्तांत टाकुन आणखी जळवतिल.
28 Mar 2014 - 2:14 pm | मि मिपाचा मित्रच
आम्ही इथे हापिसात बसुन काम करतोय आणि हे धाग्यावर कट्टयाचे धावते समालोचन देत आहेत दुष्ट लेकाचे!
आता खादाडीचे फोटो आणि सविस्तर वृत्तांत टाकुन आणखी जळवतिल
28 Mar 2014 - 2:54 pm | झकासराव
मी रात्री आहेच रामदेव धाब्यावर. :)
आत्मुरावांचा मोबाइल नंबर मिळाला आहे.
28 Mar 2014 - 3:21 pm | प्रचेतस
आत्मुदा, पेठकर काका आणि एक्काश्री ही मंडळी आता पवनानगर येथील बेडसे लेण्यांच्या भटकंतीला निघाली आहेत अशी आमच्या आतल्या गोटातून खबर आहे. =))
28 Mar 2014 - 3:27 pm | यशोधरा
अगदी खरीय बातमी :)
28 Mar 2014 - 4:18 pm | यसवायजी
ही मंडळी ?
मग तुम्ही (लेणी गाईड!) नाहीत त्यांत??
28 Mar 2014 - 4:44 pm | प्रचेतस
मी हापिसात कळफ़लक बडवत बसलोय. :(
28 Mar 2014 - 5:20 pm | यसवायजी
सांजच्याला भेटू.
28 Mar 2014 - 5:37 pm | प्रचेतस
वोक्के सर.
28 Mar 2014 - 4:32 pm | मि मिपाचा मित्रच
आणखी जळजळ झाली...
आता countdown start kele ahe – off madhun nighayche & katta join karayche !!!
28 Mar 2014 - 8:00 pm | किसन शिंदे
व्वा! मज्जा चाललीये मंडळी :-)
28 Mar 2014 - 9:52 pm | निनाद मुक्काम प...
पेठकर काका
२ तारखेला मुंबईत आहात ना
मी तेव्हा मुंबईत असेल
ता. क
मी मुंबईत ० मार्च ते १४ एप्रिल आहे.
मुंबईत महा कट्टा करता आला तर खूप बरे होईल , म्हणजे जास्तीसजास्त मिपाकरांना भेटता येईल.
मिपाकरांना भेटण्यास उतावीळ व कट्टा आयोजकाच्या शोधत
निनाद , मुक्काम पोस्ट मुंबई
दोन आठवड्या पुरता
28 Mar 2014 - 10:36 pm | पिवळा डांबिस
० मार्च? हे काय जर्मन कॅलेंडर काय हो?
:)
(टायपो हाय तां कलतांव, पन पीजे करांचा मोह आवरंना!!!)
28 Mar 2014 - 11:37 pm | उपास
आँ पिंडाकाका, मला तर दिसतांव ३० मार्च, तुमका दिसत नाय, हॅप्पी अवर की काय तां? ;)
29 Mar 2014 - 1:12 am | पिवळा डांबिस
हॅप्पी अवर खंयचो इतक्या लवकर?
मांका अजूनही ० मार्चच दिसतांसा, तुमी काय ३डी स्क्रीन वापरतसांत की माझो स्क्रीन १डी झालो तां काय कळना!!!
मिपावर भुताटकी आसां ता म्हायती होतां पण इतको प्रत्यक्ष अनुभव पहिल्यांदाच!!!
:)
असो. ३० मार्च तर ३० मार्च...
29 Mar 2014 - 1:15 am | उपास
पिडांकाका, ब्राऊजर बदलून बघतलत का? ;)
29 Mar 2014 - 1:17 am | पैसा
० मार्च दिसतांहा.
29 Mar 2014 - 1:19 am | उपास
ज्योताय, पुण्यवान माणसास ३० दिसतां.. :))
29 Mar 2014 - 1:27 am | पिवळा डांबिस
नाय मेल्या, ३० मार्च तारीख तर सगळ्यांकाच दिसतां..
जेंका ० मार्च दिसता ते खरे भाग्यवान!!!
:)
29 Mar 2014 - 8:58 am | आनन्दिता
+१ हनुमोदन
-- पुण्यवान आनंदिता
29 Mar 2014 - 2:01 pm | इरसाल
माका ० मार्च दिसताहां. माझो ० डी दिसता
1 Apr 2014 - 12:10 pm | चिगो
मंग मी पुण्यवान, मी पुण्यवान.. ;-)
29 Mar 2014 - 1:19 am | सूड
माकां पण ० मार्चच दिसतां मरें!! ब्राऊजर बदललो जाल्यार ३० दिसतलां कांय?
29 Mar 2014 - 1:30 am | पिवळा डांबिस
एकबाणी रामासारखो हो पिडांकाका सुद्धा 'एकब्राउजरी' आसां!!!
29 Mar 2014 - 1:22 am | सूड
>>मिपावर भुताटकी आसां ता म्हायती होतां पण इतको प्रत्यक्ष अनुभव पहिल्यांदाच!!!
साक्षात पिवळो डांबिस हंयसर असताना वेगळी भुताटकी कित्यां होयी महो?
29 Mar 2014 - 1:33 am | पिवळा डांबिस
पण म्हंटलां अत्रूप्त आत्म्याचो धागो म्हंटल्याकारणान काय सांगूक येतां?
:)
असो. धाग्याचा इतक्या जम्मू पुरे, उगीच पार श्रीनगर नुको करूयांत!!!
:)
29 Mar 2014 - 3:12 am | निनाद मुक्काम प...
आता पहिले
मला सुद्धा ० मार्च दिसत आहेत.
तीस तारखेला असेच म्हणायचे होते.
मुंबईत राहणार आहे त्यामुळे डोंबिवली ते मुंबई व तिची उपनगरे कुठेही कट्टे करण्यास उत्सुक
रविवार वगळता सकाळ चा कट्टा करण्यास पुण्य नगरीला सुद्धा धावती भेट देऊ शकतो.
ता . क
आताच मूवी ह्यांचा व्यनि आल्याने जीव भांड्यात पडला आहे.
पुण्याच्या कट्याला शुभेच्छा
29 Mar 2014 - 9:21 am | यशोधरा
डोंबोली म्हट्ले की लग्गेच मुविकाकांचा व्य नि आला काय? बरी नव्हे हो पार्श्यालिटी! :P
बाकी मलाही ० मार्च दिसत आहे!
30 Mar 2014 - 5:49 am | उपास
मलाही शून्यच दिसतेय पण ३० चा अंदाज लावला, पिडांकाका मोकळेच होते म्हटलं टाकावा गुगली.. बर्याच विकेट्स मिळाल्या पण ;) गंमत हां!
30 Mar 2014 - 5:55 am | यशोधरा
आम्हांला माहिताय पण कशाला तुमचा पचका करा, असं ठरवलंन! :D :P
30 Mar 2014 - 9:53 pm | मुक्त विहारि
ओके
जून मध्ये पुण्याला येत आहे.
29 Mar 2014 - 8:51 am | झकासराव
कालची रबडी सर्वांची भेट झाल्याने अधिकच गोड लागली. :Happy:
29 Mar 2014 - 9:57 am | यसवायजी
आणी बबडी?? ;)
29 Mar 2014 - 10:04 am | प्रभाकर पेठकर
'अतृप्त' आयोजकाने श्रीकृष्णमध्ये मिसळपाव सदस्यांना मिसळपावच खाऊ घालून अगदी तृप्त केले.
सूड, इस्पिकचा एक्का, पिंगू, यशोधरा आणि दस्तुरखुद्द अतृप्त आत्मा ह्यांच्या समवेत सकाळचा कट्टा संपन्न झाला. ह्या कट्ट्याला माझ्या लेकानेही उपस्थिती लावली. नंतर सूड, पिंगू आणि यशोधरा ह्यांना कामे असल्याने (म्हणजे आम्ही रिकामटेकडे होतो असे नाही) त्यांनी उपस्थितांचा दु:खी अंतःकरणाने निरोप घेतला. तिथून पुढे, अम्मळ शतपावली करीत आणि पुण्याचे 'सृष्टीसौंदर्य' पेन्शनर्सच्या नजरेने पाहात पाहात, बाकीचे आम्ही (इस्पिकचा एक्का, आत्मा आणि मी) अतृप्ताम्याच्या वाहनाकडे निघालो. वाटेत, अतृप्त आत्मा ह्यांच्या शिफारशीनुसार एका अस्सल पुणेरी दुकानातून अस्सल अत्तराची खरेदी झाली. पुढील पाडाव कोथरुडात माझ्या घरी होता. तिथे चहापाना दरम्यान इस्पिकचा एक्का ह्यांनी मस्कतच्या जुन्या आठवणी जागवल्या. गप्पा छान रंगल्या होत्या परंतू पुढे बेडसे लेणी पाहायला जायचे होते. गुरुजींनी, लेण्यादर्शनार्थ अगदी जुजबी पायर्या चढाव्या लागतील आणि त्या घारापुरी पेक्षा अगदी सहज आहेत असे आश्वासन दिले होते. त्या नंतर तिथे पोहोचल्यावर डोंगराच्या पायथ्याशी उभे असताना, मला वाटले पायर्यांच्या पहिल्या वळणानंतर लेणी सुरु होतील. परंतु, माझ्या ह्या भाबड्या विचारांना अतृप्त आत्म्याने, ' ते चाफ्याचे झाड दिसते आहे नं, तिथे आहेत ती लेणी' असे म्हणून भूसुरुंग लावला. मी पाहिले तर ते चाफ्याचे झाड, मी उभा होतो तिथून तुळशी वृंदावनातल्या तुळशीच्या अशक्त रोपट्याएवढे दिसत होते. एका सत्शील दिसणार्या गुरुजींनी एवढ्या लांब आणून आपला 'कात्रज' केला आहे हे तत्क्षणी मला जाणवले. दर आठ-दहा पायर्यांवर विसावत उरलेल्या मार्गाचा आढावा घेत मार्गक्रमणा सुरु झाली. 'गुरुजी' जमातीवरून माझा विश्वास उडाला. गुरुजी आणि तरुण इस्पिकचा एक्का टणाटण उड्या मारत पायर्या चढत होते, त्यांचा उत्साह बापुडवाण्या चेहर्याने पाहात, मी (माझेच) पाय ओढत, माझा देह चाफ्याच्या झाडाच्या दिशेने निकराने ढकलत होतो. सोबत काकू होत्याच त्यांना आता हा माणूस वर (म्हणजे लेण्यांपर्यंत) कसा पोहोचणार आणि सदेह कसा परतणार ह्या चिंतेने ग्रासलं होतं. बर्याच खडतर प्रयत्नांनंतर चाफ्याच्या झाडापाशी पोहोचलो आणि हुश्श (सर्वांनीच) केलं. तळावरून तुळशीच्या अशक्त रोपट्याएवढे दिसणारे ते झाड चांगलेच १५ बाय १५ फुट असे डेरेदार होते.
लेणी पाहताना आत्तापर्यंतच्या सर्व श्रमांचा विसर पडला. दगडात कोरलेली नक्षी, आणि भावदर्शी शिल्पं पाहून मन मोहून जाते. आम्हा उरलेल्या ३ 'व्यक्तीं'साठी आज अतृप्त आत्मा हेच 'वल्ली' होते. त्यांनी त्यांच्या परीने ती भूमिका सुंदर वठवली. लेण्यांची माहिती देत अविस्मरणिय अशी सहल घडवली. एवढ्या उंचावर पाषाणात कोरलेली शिल्पं,गोड पाण्याची टांकं, बौद्ध भिख्खूंची चर्चा कक्ष, विश्रांती कक्ष, स्नानगृह आणि ध्यानगृह पाहून मन खरंच विस्मयचकित होतं. मी आणि काकू फक्त श्रवणभक्ती करीत होतो. पण गुरुजी आणि इस्पिकचा एक्का ह्या ज्ञानी जनांमध्ये ही शिल्पं , आपला धर्म आणि मुसलमान धर्मातील फोलपणा ह्यावर व्यासंगी चर्चा झाली. दांभिकपणा बाबत सर्व धर्मात एक वाक्यता आहे, धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून, स्वार्थ साधण्यासाठी भोळ्या भाबड्या (म्हणजेच मूर्ख) जनतेस वेठीस धरतात ह्यावर एकमत झालं. परतीचा प्रवास (माझ्यासाठी) सुकर होता. निगडीकडे मार्गस्थ झाल्यावर वाटेत एका क्षुधाशांती उपहारगृहात पुनःश्च एकवार मिसळपाव आणि चहानामक पेयावर ताव मारून झाला जड अंतःकरणाने (आणि देहाने) बेडसे लेण्यांचा निरोप घेतला. काकूंना तिच्या बहिणीकडे 'मनमोकळ्या' गप्पासत्रासाठी सोडून मी 'श्री रामदेव बाबा ढाब्याकडे' संध्याकाळच्या कट्ट्यासाठी प्रयाण केलं.
'श्री रामदेव बाबा ढाब्यावर' अतृप्त आत्मा, इस्पिकचा एक्का ह्यांच्या समवेत चौकटराजा, श्री आणि चिरंजिव नादखुळा, मी मिपाचा मित्र (मी आधी 'नीताचा' ऐकलं. त्यामुळे ही 'नीता' कोण ह्या विचारात कांही सेकंद गेले), झकासराव, वल्ली, यसवायजी, देवांग आदी जमले होते. थोड्या उशीराने श्री. बाबा पाटील ह्यांनी उपस्थिती नोंदविली.
'श्री रामदेव बाबा ढाबा' ह्या नांवामुळे आपल्या पुढे काय 'वाढून' ठेवले असेल धाकधुक मनांत होती. पण डाल बट्टी ह्या राजस्थानी पारंपारिक पदार्था समवेत, व्हेज कडाई, मटर-मेथी-मलाई,भाकरी, दहिखिचडी वगैरे पदार्थ छान होते. गोड खाणार्यानी रबडी हादडली. भरपूर साधकबाधक चर्चा झाली. मराठी चर्चेला चिं. नादखुळा ह्या मिपाच्या भावी क्रिकेटप्रेमी सदस्याने कानडी तडका दिला. जेवूनखाऊन तृप्त मनाने शेजारच्याच पानाच्या टपरीची विक्रि वाढविली तिथे उर्वरीत चर्चा (वल्ली आणि अतृप्त आत्मा ह्यांची लटकी खणाखणी) रंगली. अचानक किसन शिंदेंनी हजेरी लावून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. पुढे त्यांच्या आणि मिपाच्या वादग्रस्त सदस्याच्या जवळिकीवरून हास्यविनोदाला उधाण आले. निरोप घेता घेता चर्चा रंगत राहिल्या. निघता पाय पुन्हा पुन्हा मागे घेतला जात होता शेवटी 'उद्या ऑफिस आहे' ह्या व्यावहारिक विचाराने मिपाची सुंदर संध्याकाळ आवरती घेतली.
सर्वांनाच मजा आली. यशस्वी कट्टा आयोजनाबद्दल अतृप्त आत्मा ह्यांचे विशेष आभार.
कोणीतरी कट्टुयाची छायाचित्रे टाकेलच.(मी सुद्धा वाट पाहात आहे).
29 Mar 2014 - 10:30 am | धन्या
किसन शिंदे नाही काका. मी मी धन्या. :)
29 Mar 2014 - 11:53 am | प्रभाकर पेठकर
छ्या:! झाला नं गोंधळ. माफी असावी धनाजी राव.
30 Mar 2014 - 12:11 am | धन्या
माफी कसली हो काका. मी फक्त तुमच्या लक्षात आणून दिलं. :)
29 Mar 2014 - 12:15 pm | आत्मशून्य
माताय असा वास्तवातिल डु आयडी प्रकार पहिल्यांदाच पाहिला ....