लोकहो......... समस्त मिपाकरहो....
दिनांक २८ मार्च २०१४ रोजी आपले प्रभाकर पेठकर काका पुण्यग्रामी येत आहेत होsssssssssssss! तरी,ज्या ज्या मिपाकरांस या अचानक डॉट कॉम कट्ट्यास येणेचे शक्य असेल त्यांनी या दवंडीस प्रतिसादी अनुमोदन द्यावे होsssssssssssss!
कट्ट्याचे स्वरूपः- सकाळी दहा वाजता ,पुण्यनगरीतील मंडई नामक बहुश्रुत विभागातील तुलसीबाग नामे करुन असलेल्या प्राचीन स्त्री....( सॉरी :D ..) स्त्री प्राचीन... (हां...आता जम्लं! :D ...) अलंकार प्रीती विभागात.... अंतःपुरात जाणार्या वाटेवर ..राम देवालया समीप असलेल्या... श्रीकृष्ण मिसळ नामे खाद्यक्षुधावर्धन गृहात जमावयाचे आहे होsssssssssssss!
तद् नंतर पुढील पूर्ण दिनात् अत्र/तत्र हिंडोन* सायंकाली चिंचवड ग्रामात ट्रान्स्पोर्ट नगरातील रामदेव-बाबा-ढाबा नामक महा-क्षुधा-शांति गृहात हादडौन दिनः-सांगता करण्याचे नक्की केले आहे होsssssssssssss!
*---- (हे हिंडणे आपल्या सर्वांच्या [मिसळ भक्षून तट्ट जाहलेल्या पोटा'चे] हिंड-मान लक्षात घेवोन..आयत्यावेळी "कुठेही" करणेत येइल...! )
हे ढांम ढांम ढांम ढांम ...
धत्तड तत्तड तत्तड तत्तड....
प्रतिक्रिया
31 Mar 2014 - 2:52 pm | सूड
>>किसन शिंदे नाही काका. मी मी धन्या.
बाकी किसन शिंदे म्हटलं तरी नवल नाही. ते असा आश्चर्याचा धक्का देऊ शकतात. ;)
29 Mar 2014 - 11:33 am | संजय क्षीरसागर
आवडला.
29 Mar 2014 - 4:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
माझा पहिला दिवसभराच मिपाकट्टा... खान-पान-चर्चा... लै मजा आली.
29 Mar 2014 - 6:20 pm | अत्रुप्त आत्मा
@तिथे चहापाना दरम्यान इस्पिकचा एक्का ह्यांनी मस्कतच्या जुन्या आठवणी जागवल्या.>>> समस्त मिपाकरहो...या गप्पा म्हणजे जे काहि होते...ती एक्काकाकांची एक जबरदस्त लाइव्ह लेखमाला होती! धर्मव्यवस्था कोणतीही असो.जर का त्यात उदारमतवादी सहृदययी पण करारी व्यक्ती सत्तास्थानी आली तर समाजाचा आश्चर्यकारक काया-पालट घडवू शकते. हेच पदोपदी पटवून देत होती. (एक्काकाका,पुन्हा एकदा विनंती आहे हो..लिहा..लिहा..आणि लिहाच!) मी पुढे बेडश्याला जाताना लेखमालेचा उत्तरार्ध प्रश्नोत्तरांसह अनुभवला आहे.आणि तो जबरदस्त परिणाम घडवून गेलाय.
@गुरुजींनी, लेण्यादर्शनार्थ अगदी जुजबी पायर्या चढाव्या लागतील आणि त्या घारापुरी पेक्षा अगदी सहज आहेत असे आश्वासन दिले होते. त्या नंतर तिथे पोहोचल्यावर डोंगराच्या पायथ्याशी उभे असताना, मला वाटले पायर्यांच्या पहिल्या वळणानंतर लेणी सुरु होतील.>>>
@परंतु, माझ्या ह्या भाबड्या विचारांना अतृप्त आत्म्याने, ' ते चाफ्याचे झाड दिसते आहे नं, तिथे आहेत ती लेणी' असे म्हणून भूसुरुंग लावला.>>>
@मी पाहिले तर ते चाफ्याचे झाड, मी उभा होतो तिथून तुळशी वृंदावनातल्या तुळशीच्या अशक्त रोपट्याएवढे दिसत होते. एका सत्शील दिसणार्या गुरुजींनी एवढ्या लांब आणून आपला 'कात्रज' केला आहे हे तत्क्षणी मला जाणवले.>>>
@दर आठ-दहा पायर्यांवर विसावत उरलेल्या मार्गाचा आढावा घेत मार्गक्रमणा सुरु झाली. 'गुरुजी' जमातीवरून माझा विश्वास उडाला. गुरुजी आणि तरुण इस्पिकचा एक्का टणाटण उड्या मारत पायर्या चढत होते, त्यांचा उत्साह बापुडवाण्या चेहर्याने पाहात, मी (माझेच) पाय ओढत, माझा देह चाफ्याच्या झाडाच्या दिशेने निकराने ढकलत होतो. सोबत काकू होत्याच त्यांना आता हा माणूस वर (म्हणजे लेण्यांपर्यंत) कसा पोहोचणार आणि सदेह =)) कसा परतणार ह्या चिंतेने ग्रासलं होतं. बर्याच खडतर प्रयत्नांनंतर चाफ्याच्या झाडापाशी पोहोचलो आणि हुश्श (सर्वांनीच) केलं. तळावरून तुळशीच्या अशक्त रोपट्याएवढे दिसणारे ते झाड चांगलेच १५ बाय १५ फुट असे डेरेदार होते.>>> भ...र >>> झाड-जवळ आल्यानंतर काकांनी "इथे येणार्या लोकांना येथपर्यंत एक १२३ पौंड(बरोबर ना? :D ) वजनाचा माणूस येऊ शकतो,याची खूण पहायला मिळणार आहे" आंम्ही-"कशी?" काका- "तिथे १ कबर बांधली जाणार आहे." =))
बेडश्याच्या तळापासून ते वरच्या गाळ्यापर्यंत काका त्या डोंगरा इतक्याच उंचिचे षटकार मारत होते! =)) या वेळी मी मुद्दामच "इथेच जवळ आहे..हाकेच्या अंतरावर" या खेडवळ लोकांच्या स्टॅमिना वाढवणार्या औषधाचा परिणामकारक वापर काकांना चाफ्याचे-झाड दाखवून केला.. पण लोकहो,उद्देश हाच की वरती त्या अद्भुताचा साक्षात्कार घडावा. मी माझ्याकडे बाहेरगावहून येणार्या मित्रमंडळी-पाहुण्यांना देखिल पुणे-दाखविण्या ऐवजी "बेडसे" दाखवतो! कारण,भारतीयत्वाची सांस्कृतीक मूल्य वाढवून रुजवणारी अशी ती एक जागा आहे,याची माझ्या मनाला खात्री आहे. छोटेसे सुंदर लेणे,पण मानवी प्रयत्नांचा अद्भुत चमत्कार आहे तो! :)
@कोणीतरी कट्टुयाची छायाचित्रे टाकेलच.(मी सुद्धा वाट पाहात आहे). >>> लगेच टाकतो आहे.
29 Mar 2014 - 10:32 am | चौकटराजा
तो नंतर आलेला किस्ना नव्हे धन्या ! ( अर्थात किस्ना घाट ओलांडून का आला नाही ? बौधा त्याची सानची पाळी असेल ! )
29 Mar 2014 - 11:55 am | प्रभाकर पेठकर
हो.. झाला खरा गोंधळ. वयपरत्वे नांवे आणि चेहरे लक्षात राहात नाहीत. वारंवार कट्ट्यांना हजेरी लावल्यावर कदाचित लक्षात राहतील.
29 Mar 2014 - 11:42 am | भिकापाटील
पेठकर काका आपल्या एन्टीक्युटीचा काय झालं :)
29 Mar 2014 - 11:51 am | प्रभाकर पेठकर
अॅन्टीक्यूटी नाही (ती भारतिय, मला वाटतं, स्कॉचचे नांव अँटीक्वेरी आहे). ती शोधली पण मिळाली नाही. ब्लॅक लेबल आहे. सांगा कधी (मुंबईत) बसायचं.
29 Mar 2014 - 11:52 am | संजय क्षीरसागर
संध्याकाळ नंतरच्या कट्ट्याचा वृत्तांत दडवलेला दिसतोयं!
31 Mar 2014 - 2:42 pm | सूड
भारी रे तुला चवकश्या जनोबा!! गप रांव, वशाड मेलो!!
29 Mar 2014 - 11:55 am | कंजूस
पेठकरकाकांचा फोडणी लावलेला वूत्तांत आवडला .ज्या गोष्टी खाल्या नाहीत त्याच्या फोटोपेक्षा चवदार वर्णन बरे .बेडसे लेणी आणि अतृप्त अत्तरासाठी नक्कीच आलो असतो .चाफ्याचे झाड इतके उंचावर का लावले आहे ?
29 Mar 2014 - 11:58 am | प्रभाकर पेठकर
विचारले, पण चाफा बोलेना.. चाफा खंत करी, कांही केल्या बोलेना.
1 Apr 2014 - 12:18 pm | चिगो
=)) :D काका, मुजरा स्विकारावा! सॉलिड म्हणजे सॉलिडच हाणता तुम्ही..
29 Mar 2014 - 12:00 pm | मि मिपाचा मित्रच
"ही 'नीता' कोण ह्या विचारात कांही सेकंद गेले " असे पुन्हा न व्हावे, म्हणुन अस्मादिकांनि नाव बदलण्याचे नक्कि केले आहे
नवीन ओळख लवकरच जाहिर करु....
29 Mar 2014 - 12:49 pm | नाखु
नाव बदलून उपयोग नाही.रहस्यभेद झाला आहे.
फोडणी वृतांत "खमंग" अजून वल्ली-आत्मुदा-धन्या-व्हाया चॉरा काका पुरवणीची वाट बघावी लागेल.
29 Mar 2014 - 1:26 pm | यसवायजी
हे चॉराकाका म्हंजे कोण??
गुर्जी, हेच का 'ते'?? :))
(काड्यासारू)
29 Mar 2014 - 5:30 pm | अत्रुप्त आत्मा
@ हेच का 'ते'?? >>> =)) व्हय जी व्हय!! =))
29 Mar 2014 - 1:43 pm | नाखु
चौकटराजा
"चौ" टायपाचा नेहमी घोळ होणारा..
"दिल्"गीर
नाद्खुळा
29 Mar 2014 - 3:32 pm | निलेश देसाई
विसरलात का??
असो....पन कालचा कट्टा मात्र जबरी झाला बर का..
मिपाकरांसोबत पहिल्याच कट्ट्याला मज्जा आली...षटकारांची धुंवाधार बरसात
29 Mar 2014 - 4:30 pm | मि मिपाचा मित्रच
बहुदा रबडीचा परिणाम ....
29 Mar 2014 - 7:07 pm | अत्रुप्त आत्मा
सौजन्य-एक्काकाका :)
१) देसाई अंबेवाल्याच्या इथून टिपलेला शनिपार चौकाचा व्ह्यू. याच फोटोत त्या पांढर्या टेंपोपाठी निळ्यापाटी खाली (दहाच वाजलेले असल्यामुळे ;) ..) अर्धे शटर उघडलेले चितळ्यांचे 'महान' दुकान आहे. :D या दुकानापासून तो टेंपो वळतोय त्याच दिशेला पुढे रस्त्यावर ५ मिनिट अंतरावर "श्रीकृष्ण मिसळ" आहे. पण ते शोधायला सुडक्यानी मला ३ फोन केले. =)) आणि वर परत दुकानाच्या पाटीसमोर उभ राहून मला "श्रीकृष्ण भुवन अशी पाटी दिसतीये,तेच ना हे???" असेही विचारले. पुण्यात काही शहरातल्या लोकांना पुण्याचा 'पत्ता लागत नाही' असा न्यूनगंड वाढवणारा प्रकार तो हाच्च! ;)
२) हा देसाई अंबेवाल्यांच्या बाहेरचा 'अतिक्रमीत-भाजिवाला!'
३)बेडसे लेणी---पेठकर काकांचे-थांबे :D --- १]
२]
४) हा बेडश्यावरनं दिसणारा पुणे-मुंबई एक्सप्रेस हाय वे पर्यंतचा व्ह्यू
५) आणि आता -- बेडसे लेणी...
एक्का काका
६) आता रामदेवबाबा---की---------------जय!!! :D
डाव्याबाजुनी अनुक्रमे-बाबा पाटील,वल्ली,यसवायजी,गंपापाटील,चौकटराजा,चिरं-जीव ;) नादखुळा
उजव्या बाजुनी-झकासराव,एक्काकाका,अत्रुप्त आत्मा,मी मिपाचा मित्र,पेठकर काका,नादखुळा
पेठकर काकांच्या "जेवणानंतर काय हवं? रबडी की बबडी ???" =)) या सिक्सरचा परिणाम
प्रथम भेटितले मिपाकर- बाबापाटिल,झकासराव,यसवायजी,...पाटिल
पुन्हा मीच (पैला :D ..),मी मिपाचा मित्र,पेठकर काका,नादखुळा
आणि आता ह्याप्पी ह्याप्पी येंडिंग!!!!
===================================
29 Mar 2014 - 7:26 pm | अनन्न्या
चेपूवर काही फोटु पाहिले.
29 Mar 2014 - 7:30 pm | अनन्न्या
सगळे फोटो मस्त!
29 Mar 2014 - 8:35 pm | भाते
मुंबईत रविवारी सार्वजनिक सुट्टी असते तशी पुण्यात शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असते का?
जर नाही तर
ऊपस्थित मिपाकरांना शुक्रवारी या कट्टयाला यायला कसे जमले?
अ) सगळयांनी हापिसाला एकदम दांडी मारली का?
ब) या सर्वांना इतर काही कामे नव्हती का?
आपल्या कामधंद्यातुन मुद्दामुन वेळ काढुन आलेले मिपाकर यातुन वगळले आहेत. :)
इतर मिपाकर हापिसात बसुन काम (?) करत असताना, कट्टेकर्यांकडुन (आम्हाला जळवणारे) धावते समालोचन करणे किती योग्य आहे?
वेगळा फोटोसहित सचित्र वृत्तांत न देता याच धाग्यावर अर्धवट माहिती देणे किती योग्य आहे?
आचारसंहिता? अनाहितासारखा 'केवळ पुरुषांसाठी' वेगळा विभाग काढुन इथे देता येत नसलेला संपुर्ण सचित्र वृत्तांत आला पाहिजे!
जाताजाता, आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत औद्योगिक संस्थापनांना शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असते! :)
29 Mar 2014 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा
@मुंबईत रविवारी सार्वजनिक सुट्टी असते तशी पुण्यात शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असते का?>>> नाही पण त्यात सुटसुटीत सार्व-जनिक ता असते.
@जर नाही तर >>>
ऊपस्थित मिपाकरांना शुक्रवारी या कट्टयाला यायला कसे जमले? >>> संध्या-काळ असल्यामुळे आणि त्यांनी 'जमवले' म्हणून! ख्या..ख्या...ख्या..!
@अ) सगळयांनी हापिसाला एकदम दांडी मारली का?
ब) या सर्वांना इतर काही कामे नव्हती का?>>> खारिज!!!!!!!!!!! :D
@आपल्या कामधंद्यातुन मुद्दामुन वेळ काढुन आलेले मिपाकर यातुन वगळले आहेत. Smile
इतर मिपाकर हापिसात बसुन काम (?) करत असताना, कट्टेकर्यांकडुन (आम्हाला जळवणारे) धावते समालोचन करणे किती योग्य आहे?>>> व्यक्तिगत आरोग्यास अत्यंत पोषक..असे हे धोरण आहे. :D
@वेगळा फोटोसहित सचित्र वृत्तांत न देता याच धाग्यावर अर्धवट माहिती देणे किती योग्य आहे? >>> चूक आहे... :D नीट आणि येत्या २ दिवसात करंट आल्यास क्कसर भरून काढली जाइल. ;)
@आचारसंहिता? अनाहितासारखा 'केवळ पुरुषांसाठी' वेगळा विभाग काढुन इथे देता येत नसलेला संपुर्ण सचित्र वृत्तांत आला पाहिजे! >>> =)) आपले मत चिंत्य आहे! =))
@जाताजाता, आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत औद्योगिक संस्थापनांना शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असते!>>> पांडू मोड ऑन---- ब्वॉर्र मग!? :D पांडू मोड ऑफ.
29 Mar 2014 - 11:05 pm | यशोधरा
जाताजाता, आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत औद्योगिक संस्थापनांना शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असते >> आणि तरीही कट्ट्याला हजेरी लावली नाही! अरेरे! :P
29 Mar 2014 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा
@आणि तरीही कट्ट्याला हजेरी लावली नाही! अरेरे!Blum3>>> रैट्ट...रैट्ट...! :D प्वॉइंतचा मुद्दा पकडला! :D
30 Mar 2014 - 8:31 pm | भाते
मी वरती लिहिल्याप्रमाणे, 'आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत औद्योगिक संस्थापनांना शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असते!'
सगळेच मध्यवर्ती डोंबिवलीकर इतके सुदैवी नसतात की मध्यवर्ती डोंबिवलीत राहुन हापिससुध्दा मध्यवर्ती डोंबिवलीतच असते!
पुणेकरांना काय बाईकवर टांग मारली की पोहोचले हापिसात. (इतक छोटस आहे ते पुणे!) :)
आम्हा डोंबिवली/मुंबईकरांना रेल्वे/बस शिवाय पर्याय नाही.
अस्मादिक मध्यवर्ती डोंबिवलीत रहात असले तरी आम्ही औद्योगिक संस्थापनात काम करत नाही आणि आमचे हापिस मध्यवर्ती डोंबिवलीत नाही आहे.
30 Mar 2014 - 12:16 am | प्रभाकर पेठकर
आता ३१, १ आणि २ ह्या ३ दिवसांत (एखाद दिवस) मुंबै-कट्टा जमू शकतो आहे का? संध्याकाळचाच ठेवूया. जागा आणि सदस्य संख्या ठरवा. कोणाला किती 'तहान' भूक त्या नुसार आयोजकांना कट्टा आयोजन सुलभ (म्हणजे 'ते' नाही हो..) होईल. आयोजकांनी पुढे यावे ही विनंती.
30 Mar 2014 - 5:53 am | उपास
ढाब्याचं नाव नोंदवून ठेवलय..
पुण्यातला किंवा आसपासचा नंबर १ धाबा कुणी सांगेल का? मुंबईत दहिसर चेकनाक्या पुढे आणि मुलुंड चेकनाक्या पुढे काही चांगले अस्सल ढाबे आहेत..
वृतांत मस्त! आता आलो की श्रीकृष्णाची मिसळ खाणे आलेच, जिलब्या मारुती समोर आहे काय? शनिपारापाशी गेलो की श्री कडेच जाणे होते जास्त, ह्यावेळेस बदल अपरिहार्य!
30 Mar 2014 - 5:57 am | यशोधरा
सूड सांगेल पत्ता (आता) :D
30 Mar 2014 - 9:20 am | चौकटराजा
मला ऐकू जावे अशा बेताने अ आ इतरास ...." पेठकर काका समोर म्हातार्यास बसवू ! " ******
तो अमूक सुझलान मधे माझा मित्र आहे त्याला ओळखता का ? एक दुसर्याला !
"नाही मी दोन वर्षापूर्वी जॉईन झालो?
"मग ती अमुक अमुक तिला ओळखता का ? ती पण तिथेच कामाला आहे"
" हां तिला मात्र ओळखतो ! " सुझलान वाल्याचे उत्तर यायच्या आतच चौरांचे उत्तर ! ******
कानडीत चिं प्रिन्स नादखुळा हे यसवायजी शी कानडीत बोलतात बाकीचे शुन्य चेहर्याने ऐकत रहातात. हे पाहून चौरा म्हणतात " आता पेठकर काका व इस्पिक एक्क्का मिडल इस्टच्या भाषेत बोलायला लागतील बरं ! " त्यावर " आम्ही तिकडची नाही इकडची भाषा तिकडे घेउन जातो ! " एक्कांचा सणसणीत षटकार ! अनुपचा या ष़ट्काराला " वेल सेड" नी प्रतिसाद ! ****
नादखुळांचा प्रिन्स जर आजच्या कट्ट्ञामुळे आईला म्हणाला की " आपले बाबा इतके साधे नाहीत हा !" तर काय होईल ? चौ रा चा सवाल. " हे तुला आज कळालं काय असं सौ नादखुळा म्हणतील ! " पेठकर काकानी चौराच्या फुलटॉसला
भिरकावले ! ****
बुवा म्हणतात " चौ रा तुम्ही मी व अभ्या मिळून आयडीच्या स्मायली बनवू ! " काही आय डी कडे मला बघून घ्यायचेय !
चौ रा म्हणतात " एक बुवा सुट्टे पैसे मोजत बसला आहे " अशी बुवाची स्मायली बनवावी लागेल. जोरदार हशा .****
बाकी वल्ली शी आणखी एका गडप्रेमीची ( अनुप) ओळख. पेठ्कर काकांचे जवळचे नातेवाईक चि़चवडला रहातात याची चौ रा ना माहिती मिळणे. हे या कट्ट्याचे फलित.
जाता जात एक फलित ...
आता ह्यापी येंडींग वरचा फटू पहा.. त्यात अ आ यांच्या डोळ्याकडे पहा व इतरांच्या डोळ्याकडे पहा. रामसे ब्रदर्स च्या पिच्चर मधल्या अ आ सारखाच हा डोळा दिसतो की नाही ? ( लाल बुंद ! ) आँ ? .
31 Mar 2014 - 6:22 pm | धन्या
हा किस्सा बुवांनी निगडी ते सिंहगड रोड या प्रवासात ओशाळलेल्या स्वरात ऐकवला. :D
31 Mar 2014 - 7:44 pm | पैसा
हे असे का?
(सौजन्य कोण ते काय सांगायला पाहिजे?)
31 Mar 2014 - 7:48 pm | प्रचेतस
अगागागागा =))
मेलो मेलो.
31 Mar 2014 - 9:56 pm | अत्रुप्त आत्मा
माझा चेहेरा असा असतांन्ना
याहिवेळी
त्याचे वय वाढवणारा अगदी तोच्च हात (त्यावेळचा- http://misalpav.com/comment/509450#comment-509450 ) यामागे आहे..हे वळिखलय हां आमी! :p
टोपीचा रंग अगद्दी सेम नसला तरी, अंग बरोब्बर पकडलयन् मेल्यानी! =))
1 Apr 2014 - 3:04 pm | सूड
>>अंग बरोब्बर पकडलयन् मेल्यानी!
आवरा !! =))))
1 Apr 2014 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा
31 Mar 2014 - 8:03 pm | बाबा पाटील
काय बुवा ? बर चालय ना ?
31 Mar 2014 - 8:05 pm | सूड
ती कसलीशी पुडी नि डबी मांडीखाली का ठेवलंनीत म्हणें?
31 Mar 2014 - 9:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
लैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलै भाsssssssssssssरी !!!!!!!!
31 Mar 2014 - 9:35 pm | अत्रुप्त आत्मा
@एक बुवा सुट्टे पैसे मोजत बसला आहे@
1 Apr 2014 - 11:35 am | चौकटराजा
एक बंदूक ज्याची आयडिया आहे त्यासाठी एक ती आयडेया साकारणार्या निरागस महान चित्रकारासाठी !
एनकाउंटरचे स्थळ- सिहगड रस्त्यावरचा पूल !
1 Apr 2014 - 4:27 pm | अत्रुप्त आत्मा
@एनकाउंटरचे स्थळ- सिहगड रस्त्यावरचा पूल ! >>> :-/ ना.....ही!!! :-/
दिसता क्षणीच गोळी घाला-असा आदेश!
31 Mar 2014 - 9:58 pm | यसवायजी
:))
चेपुवर प्रोफाईल पिक् म्हणुन रिकमेंड करतो. ;)
30 Mar 2014 - 9:59 pm | मुक्त विहारि
झक्कास
31 Mar 2014 - 3:37 pm | प्यारे१
पुढच्या वेळी तुमच्या कट्ट्यावेळी धो धो पाऊस पडो.
31 Mar 2014 - 3:40 pm | सूड
कावळ्याच्या शापाने गाय/बैल मरत नाहीत.
31 Mar 2014 - 3:50 pm | प्यारे१
कावळ्या च्या नाही रे आवल्याच्या ;)
बा द वे कावळ्याला शाप दिल्याचं समाधान मिळतं ते काय कमी आहे?
31 Mar 2014 - 6:03 pm | अत्रुप्त आत्मा
1 Apr 2014 - 11:47 am | झकासराव
अरे वाह!!!
वृतांत मस्तच. :)
आत्मुस इन्टेरेस्टिन्ग माणुस आहे.
पेठकर काकांचे षटकार उत्तुन्ग असतात.
चौरा काका लैच फिरक्या घेण्यात एक्सपर्ट.
1 Apr 2014 - 2:21 pm | झकासराव
एक्का काका सॉरी.
तुम्ही बिल द्यायला निघाल्यावर मी जरा जास्तच जोरात मागे ओढलं तुम्हाला. :(
तुम्हाला राग आला नसेल अशी आशा.