व्हर्गा हा पावसाचा एक प्रकार आहे.. तो जमिनीवर पोचण्याआधीच वाफ होऊन नाहीसा होतो.
व्हर्गासारखं हवेत नाहीसं झाल्याचा भास देणारं मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग विमान. सगळेजण या विचित्र घटनेविषयी सर्वत्र वाचत आणि ऐकत आहेतच. तरीही काही इतर नाही तरी महत्वाच्या वाटणार्या गोष्टींची एक यादीच का होईना, पण बनवण्यासाठी टंकणं अनिवार झालं.
या फ्लाईटसाठी वापरलेलं विमान म्हणजे बोईंग ७७७ - २०० ई आर. (777-200ER)
ER म्हणजे एकस्टेंडेड रेंज. लांब प्रवासासाठी जास्ती अंतर एका दमात पार करता यावं म्हणून जास्त कपॅसिटीचे फ्युएल टँक्स बसवलेलं. नेहमीच्या 777-200 पेक्षा जवळजवळ चौपन्न हजार लीटर जास्त एव्हिएशन ग्रेड केरोसीन नेण्याची क्षमता. एकूण फ्युएल टँक साईझ एक लाख सत्तर हजार लीटर्सच्या वर.. आणि फुल टँकसहित नॉन स्टॉप उड्डाण चौदा हजार तीनशे किलोमीटर्स, सुमारे.
जास्तीतजास्त टेकऑफ वेट दोन लाख सत्याण्णव हजार किलो म्हणजे जवळजवळ तीनशे टन.
१९९ फूट विंग स्पॅन आणि २०९ फूट लांबी.
हे सर्व वरवरचं झालं. पण याच्या आतल्या सिस्टीम्स ?!
फोटो आभारः विकीमीडिया
बोईंग 777 सीरीजचं हे विमान हवेत अचानक बिघाड होऊन तत्क्षणी कोसळणं हे जवळजवळ अशक्य आहे. यामधे फार फार उच्च दर्जाच्या सिस्टीम्स आहेत. बाकी विमानाची अंतर्गत सुरक्षितता, एका कंट्रोलचं किंवा पार्टचं काम बंद झालं तर अन्य योजना, वायरींची गुंतागुंत टाळणारी आधुनिकता, कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम मॅनेजमेंट हे सर्व बाजूलाच ठेवू.
त्याखेरीज अनेक संपर्काचे मार्ग या विमानाच्या पायलट्सकडे होते:
-रेडिओवर बोलून कंट्रोल टॉवर आणि मार्गावरच्या अन्य फ्लाईट कंट्रोल सेंटर्सशी संभाषण करण्याचा कॉमन चॅनेल. हा सर्व सेंटर्स आणि परिसरातल्या सर्व विमानांना एकत्र ऐकू येतो. नथिंग पर्सनल अबाउट इट.
-याखेरीज किमान एक खाजगी चॅनेल, पायलट आणि क्रूला आपल्या एअरलाईनच्या ऑफिसशी आणि आपल्या स्वतःच्या ग्राउंड इंजिनियर्सशी बोलण्यासाठी.
बोलण्याचा मार्ग बंद झाला तरी आणखी पर्याय उरतातः
- रडार - प्रायमरी- प्रायमरी रडार हवेत सिग्नल्स पाठवून ते जिथे अडून परत फिरतील त्या त्या ठिकाणी विमाने आहेत असं ओळखतं.यासाठी विमानात काहीही खास उपकरण असण्याची गरज नाही.
- रडार - सेकंडरी- सेकंडरी रडारमधे विमानातही एक ट्रान्सपाँडर असतो. तो विमानाच्या ठिकाणाची माहिती उलट ट्रान्समिट करत राहतो. त्यामुळे रडारच्या डिस्प्ले स्क्रीनवर विमानाचं नाव, जमिनीपासून उंची, अन्य स्टेटस दिसत राहतं. याच ट्रान्सपाँडरमधून पायलट एक शब्दही तोंडाने न बोलता कॉपपिटवरची बटनं फिरवल्यासारखी करुन नकळत वेगवेगळे कोडस सेट करुन गुपचुप रडारवर आपले मेसेजेस पाठवू शकतो. याला ट्रान्स्पाँडर स्क्वॉक / स्क्वॅक को़ड्स म्हणतात उदा. 7500 सेट केला तर "हायजॅक" असा टॅग विमानतळाच्या रडार स्क्रीनवर विमानाच्या ठिपक्यालगत चमकायला लागतो. 7600 सेट केला तर "आमचा रेडिओ बंद पडला आहे".
- आकार्स ( Aircraft Communications Addressing and Reporting System ) - ही रेडिओ सिस्टीम सर्व महत्वाच्या फ्लाईट इव्हेंट्सच्या वेळी विमानतळाकडे माहिती पाठवत राहते. हे एकतर्फी प्रक्षेपण नाही, तर विमानतळावरुन कंपनी बदललेल्या हवामानाप्रमाणे बदललेला फ्लाईट प्लॅन विमानाच्या सिस्टीममधे या आकार्समार्फत थेट अपलोड करु शकते. शिवाय गरज पडली तर विमानाच्या कंट्रोल्स आणि इंजिनच्या आख्खा स्टेटस लॉग डाऊनलोडवू शकते.
MH370च्या नाहीश्या होण्यातला सर्वात विलक्षण भाग म्हणजे वर म्हटलेल्या या कम्युनिकेशन सिस्टीम्सपैकी एकातर्फेही कोणताही दुरित सिग्नल न येता हे विमान जागीच वाफ व्हावी तद्वत विरलं असं चित्र उभं राहिलं आहे.
बोईंग ७७७ २०० ईआर या विमानाची रोल्स रॉईस इंजिन्स आणि त्यांची कंट्रोल सिस्टीम / एअरफ्रेम पाहिली तर एक गोष्ट नक्की आहे की रिकव्हरीला किंवा संपर्काला अजिबात वाव न देण्याइतकं तातडीचं आणि संपूर्ण फेल्युअर या विमानात होणं तर्कदृष्ट्या अशक्य आहे. कोणतीही महत्वाची सिस्टीम, इतकंच काय, अगदी इंजिन जरी डॅमेज झालं.. दोन्ही इंजिन्स बंद पडली तरी हे विमान ग्लाईड करत बराच काळ हवेत उडत राहू शकतं. या वेळात जमिनीकडे झेपावत राहणं अपरिहार्य असलं तरी हा खाली येण्याचा वेग नियंत्रित करुन खूप लांब पल्ला गाठता येतो. निदान जवळात जवळच्या विमानतळावर, आणि किमान आलो तिथे (क्वालालंपूर) परत जाण्याइतका अवसर इथे नक्कीच मिळायला हवा. आणि अशा वेळी रेडिओवर (ज्यांना वेगळा पॉवर सप्लाय असतो) संभाषण करुन आपली हालहवाल सांगता यायला हवी.
जर विमानाची फ्रेम / पंख / शेपूट इत्यादि तुटून विमान कोसळलं तर ते जवळच तिथल्यातिथे खाली पडतं आणि त्यामुळेच त्याचे अवशेष थोड्याश्या मर्यादित एरियात ढिगार्याच्या रुपात दिसतात. आणि जमिनीवर कोसळो अथवा समुद्रात, असे एकत्रित असलेले अवशेष दिसणं फार सोपं असतं.
या बाबतीत मात्र असे अवशेष दिसलेलेच नाहीत. जे दिसले ते विमानाचे नसल्याचं सिद्ध झालं.
वरचं सर्व कम्युनिकेशन सोडा, विमान कोसळल्यानंतरही त्याचा ब्लॅक बॉक्स खुद्द पडल्या जागेवरुन स्वतःच्या रेडिओमार्फत डिस्ट्रेस सिग्नल ट्रान्समिट करत राहतो. शिवाय ऐकू येतील असे आवाजी सिग्नल्सही फेकत राहतो.. किमान काही दिवस.. अगदी पाण्याखालूनही.. हे आवाजी सिग्नल अर्थातच फार दूर जात नाहीत.. पण रेडिओ सिग्नल तुलनेत सहज मिळतात. यावरुन तो ब्लॉकबॉक्स कुठे आहे ते शोधायला मदत होते.
कोणताही मागमूस न ठेवता हे दोनशे एकूणचाळीस जिवांना घेऊन अंधारात झेपावलेलं अजस्त्र यंत्र डोळ्याआड गेलं, आणि तीन दिवस झाले तरी कोणाला कसलाच अंदाज येत नाहीये.
रडारच्या रेकॉर्डवरुन हे विमान नाहीसं होण्यापूर्वी क्वालालंपूरकडे उलट फिरलं असल्याची लक्षणं दिसली आहेत.
अधिकृतरित्या आणि निश्चित कोणीच सांगू शकत नाहीये की नेमकं काय झालंय. पण जे दिसतंय त्यावरुन फार थोड्या शक्यता उरतातः
शक्यतासंच एकः
- जे काही झालं ते फार वेगाने आणि क्षणार्धात झालं आहे.
- विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट). त्यामुळे एका जागी अवशेष एकवटलेले नाहीत.
- अर्थातच यामुळे पायलट्सना बोलण्याची संधी न मिळणं आणि सर्व चॅनेल एकदम बंद होणं हेही यात एक्सप्लेन होतंय. (रडार सिग्नल, अन्य उपरोक्त सिग्नल्स एकदम थांबणं)
- हे सर्व प्रचंड तीव्र स्फोट किंवा तत्सम टार्गेटेड हल्ल्यामुळे होऊ शकतं. विमानातल्या आपोआप उद्भवणार्या दोषामुळे नाही.
शक्यतासंच दोनः
-या दुबळ्या शक्यतेनुसार विमान अद्याप सहीसलामत असेल हायजॅक झालं असेल. धाकाने सर्व कम्युनिकेशन (ट्रान्सपाँडर, रेडिओज इत्यादि)बंद करुन पायलटवर बलप्रयोग केलेला असू शकतो, किंवा स्वतःकडे फ्लाईटचा ताबा घेऊन एखाद्या अज्ञात ठिकाणाकडे अत्यंत कमी उंचीवरुन उडवत (प्रायमरी रडारपासून सुटका) घेऊन जाणे असा प्रकार झालेला असू शकतो. हे ठिकाण बर्यापैकी लांब असलं तरी एक्स्टेंडेड रेंज फ्युएल टँक्सचा इथे हायजॅकर्सना फायदा होऊ शकतो.
पण कोणत्याही मार्गाने थांगपत्ता लागू न देता इतकं अजस्त्र धूड कुठेतरी नेऊन लपवणं हे अशक्य नसलं तरी बरंच अवघड आहे. यासाठी असं कृत्य करणारा इसम विमानविषयक सर्व शास्त्रांमधला पोचलेला माणूस असायला हवा.
या थिअरीप्रमाणे विमान अपेक्षित ठिकाणापासून दूर गेलेलं असणं हा अँगल एक्सप्लेन होतो.
कदाचित दोन्ही शक्यतांचं कॉम्बिनेशनही असू शकेल.. म्हणजे मूळ फ्लाईटपाथकडून भरकटवून हे विमान पळवून नेण्यात येणं आणि कुठेतरी दूर अनपेक्षित जागी पोचून फ्युएल स्टार्व्हेशनने कोसळणं.. अर्थातच सध्या जिथे शोध चालू आहे तिथे ते नसू शकेल.
.........
जोपर्यंत हाती काही लागत नाही तोपर्यंत केवळ अंदाजाखेरीज कोणीच काही करु शकत नाही.
या सर्व वाईट प्रकाराला जो मानवी अँगल आहे त्यात मी फार शिरत नाही कारण तो मनात अत्यंत खळबळ करणारा प्रकार आहे. ते सर्व वाट पाहणारे नातेवाईक.. तीन दिवस लाल अक्षरात MH 370 च्या पुढे सतत "Delayed" असं फ्लाईट स्टेटस दाखवणारा तो बैजिंग विमानतळावरचा बोर्ड.. आणि खरंच फ्लाईट उशीरा येत असल्याचं स्वतःला बजावत बसलेले सर्व प्रवाश्यांचे ते आप्तेष्ट.
केवळ पार्थिव देह दिसला नाही, म्हणून आशा सोडता सोडवत नसलेले अत्यंत अभागी जीव.
आपण त्यात नाही हा केवळ योगायोग.. यू नेव्हर नो.
फोटो आभारः विकीमीडिया.
प्रतिक्रिया
21 Mar 2014 - 12:45 pm | राजो
या दुव्यावर विमान शोधासंबंधीचे लाइव्ह अपडेट्स पहायला मिळतील
21 Mar 2014 - 11:59 pm | देव मासा
मराठीत अपडेट्स इथेच वाचायला मिळत आहेत , म्हणून सारखा सारखा इथेच येत आहे मी , पण सारे लोक विंग्रजी बातम्यांच्या संकेत स्थळे दाखउन इथे, वाचा , आणि हे वाचा म्हणुन फक्त लिंक पेस्टत आहेत . आणखी एक अशीच शंका विचारायची होती
एवढ्या मोठया विमानाचे disassemble , म्हणजेच विमानाचे सुट्टे भाग करायचे म्हंटले तर किती वेळ लागेल हो , अगदी युद्ध पातळीवर करायचे झाले तरी ?
24 Mar 2014 - 12:45 pm | सुहासदवन
http://www.business-standard.com/article/international/missing-mh370-ful...
24 Mar 2014 - 8:23 pm | सचिन कुलकर्णी
शोध अधिकृतरीत्या बंद
24 Mar 2014 - 10:14 pm | माहितगार
विमान अपघातात सापडल्याचीच शक्यता जास्त होती. ते शक्यतेची पुरेशी खात्री करून आता आशा सोडली आहे हे अधिकृतपणे सांगीतल गेल आहे. मला वाटत आशा दाखवून शॉक देण्यापेक्षा; "बातमी अप्रीयही असू शकते" अस सांगून विमान प्रवाशांच्या नातेवाईकांची मानसिक तयारी आठवड्या भरापूर्वीच मलेशियन एअरलाइन्सनी करून ठेवण अधीक चांगल राहील असतं.
विमानात भारतीय प्रवासी कमी होते म्हणून शब्द योजनेने खूप फरक पडतो आहे असे नाही तरीही, अर्थात "शोध अधिकृतरीत्या बंद" ही वरील प्रतिसादातील शब्द योजना नेमकी आणि सुयोग्य असल्याबद्दल मी अल्पसा साशंक आहे.
कारण विमानाचा ब्लॅकबॉक्स मिळेपर्यंत अधिकृतपणे शोध बंद केला जात नाही. आणि समुद्रातून ब्लॅक बॉक्स मिळवणे २-४वर्षे लागणारेही काम असू शकते.
सुयोग्य शब्द योजना काहीशी "पुरेशा खात्रीशीर विश्लेषणानंतर, मलेशिया एअरलाईन्सने आशा सोडली असून अधिकृतपणे विमान प्रवाशांसोबात बुडाल्याच गृहीत धरलं जात आहे. (प्रिझ्युम्ड डेड) " अशी हवी असे वाटते.
24 Mar 2014 - 10:31 pm | आयुर्हित
विमान आपल्या निर्धारित मार्गावरच कोसळले असते तर हा अपघात आहे असे म्हणता आले असते.
परंतु विमान आपल्या निर्धारित मार्गावरून मुद्दाम हटवून, जबरदस्तीने/अपहरण करून/रिमोट कंट्रोल वापरून हिंदी महासागरात कोसळवले आहे. याचा अर्थ नक्कीच विमानात असे काही असणार, ज्याचा शत्रूला पत्ता लागला असावा.
मलेशिया एअरलाईन्स ला या बद्दल आधीपासूनच माहिती असावी, त्यामुळे वेळच्या वेळी योग्य ते निरीक्षणे नोद्विण्यात अथवा निष्कर्ष देण्यात खोडसाळपणा करण्यात आला आहे असेच वाटते.
24 Mar 2014 - 10:34 pm | सखी
"शोध अधिकृतरीत्या बंद" ही वरील प्रतिसादातील शब्द योजना नेमकी आणि सुयोग्य असल्याबद्दल मी अल्पसा साशंक आहे. -- हेच म्हणायला आले होते.
दुवा १ आणि दुवा २ मध्ये प्लेनचा अंत (शोध अंत नव्हे) दुर्देवाने हिंदी महासागरात झाल्याचे दिसते.
फक्त एक कळले नाही ३० दिवसाच्या आत ब्लॅक बॉक्स मिळायला पाहीजे असे ब-याच वेळा ऐकले, त्याचे काही विशेष कारण असु शकेल का? एअर फ्रान्सच्या अपघातानंतर तो २ वर्षानंतर मिळाला तरी काम करत होता....कॉलिंग गवि...
24 Mar 2014 - 10:47 pm | श्रीरंग_जोशी
माझ्या माहितीप्रमाणे ३० दिवस ही ब्लॅकबॉक्सच्या ट्रान्समिटरला व विद्युत पुरवठा करणारी बॅटरीची क्षमता आहे. पाण्यात बुडालेला असताना त्याचा शोध घेणे सोपे जावे हे यामागचे प्रयोजन आहे.
अपघात झाल्यास ब्लॅकबॉक्समध्ये लिहिली गेलेली माहिती नष्ट होऊ नये अशीच त्याची रचना केली गेलेली असते.
विकी दुवा.
24 Mar 2014 - 11:03 pm | उपास
गवि, धन्यवाद लेखाबद्दल आणि पुढच्या प्रतिसादांबद्दल..
एक प्रश्न मनात येतो की ब्लॅक बॉक्स विमानातच असायला लागतो का आणि असे असल्यास का? ब्लॅक बॉक्स म्हणजे माझा क्रिटीकल डेटाबेस आहे आणि इतर कुठल्याही मिशन क्रिटिकल अॅप्लिकेशन प्रमाणे तो मी नियमित (कधी कधी तर सेकंदाला) रिप्लिकेट करेन, तसेच अतिशय संरक्षित अशा डेटा सेंटर मध्ये ठेवेन, त्याचे (फक्त) विमानाबरोबरच असण्याचे नेमके प्रयोजन काय?
25 Mar 2014 - 12:01 am | गवि
आजच्या पुढे गेलेल्या टेक्नोलोजीच्या पार्श्वभूमीवर ही शंका अत्यंत रास्त आहे.
बिलीव्ह मी. 120 टक्के आता या अपघातानंतर समूळ बदलेल ट्रॅकिंग.. अर्थात रिमोट डेटा ट्रान्सफरवर पूर्ण अवलंबता येणार नाही. विमानात एक सर्वात रिलायेबल आणि थेट कनेकशन म्हणून इनबिल्ट रेकोर्डर राहणारच..
25 Mar 2014 - 12:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
शंका वर वर जरूर रास्त वाटते पण व्यावहारिकतेबद्दल शंका आल्याने उत्सुकतेने जरा खाली दिलेली डोकेफोड केली आहे...
जालावर अशी चौकशी केली:
"Total number of flights in one whole day around the world?"
तर ही माहिती सापडली...
that is an increbily hard question to answer. If you define a flight as a takeoff and landing, then the total number of daily commercial flights is going to be high. I have estimated that the total number of flights per day is around 85,000 to 90,000. Bearing in mind that this includes flights that carry less than 19 people to fully loaded jumbo jets.
Source:
Rank 1: Star Alliance = 16,930
Rank 2: Sky Team = 14,615
Rank 3: One World = 8,000
एकूण = ३९,००५.
These are the top 3 airline alliances covering more than 50 airlines. There are over 1,000 airlines in the world.
म्हणजे सर्व १००० कमर्शियल एअर्लाईन्सच्या एका दिवसाच्या उड्डाणांची संख्या नक्कीच ५०,००० पेक्षा बरीच जास्त होईल. त्यांत चार्टर्ड आणि खाजगी विमानोड्डाणाची संख्या अजून वाढ करेल.
तर आता असे प्रश्न उभे राहतात...
१. एका उड्डाणाचा (२० मिनीटे ते ८ तास) अव्हरेज डेटा २० जीबी (हे व्हॉईस डेटाच्या तासांच्या आकारमानाप्रमाणे फार कमी-जास्त असू शकते पण केवळ कामाच्या व्याप्तीच्या धोपट अंदाजाकरीता समजूया) धरला तर दर दिवशी १००० टेरॅबाईट डेटा, म्हणजेच दर वर्षीचा ३६५,००० टीबी डेटा होईल. प्रत्यक्षात हा आकडा अनेक पटींनी मोठा असू शकतो.
इतका डेटा विश्वासूपणे साठवणे म्हणजे त्याच्या अनेक कॉपीज एकमेकापासून दूर अनेक ठिकाणी ठेवणे आले. इतका डेटा प्रत्येक सेकंदाला जमिनीवरच्या सेंटरला प्रक्षेपित करणे, साठवून ठेवणे आणि काँकरंट म्हणजे सतत एकमेकासारसा ठेवणे हे तांत्रीदृष्ट्या अशक्य नक्कीच नाही पण गुंतागुंतीचे आणि खार्चीक असणार आहे. यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील...
आजच्या घडीला विमान प्रवासात होणार्या अपघातांचे आणि जिवीतहानीचे प्रमाण रस्त्यावरच्या वाहतूकीपेक्षा लक्षणीय प्रमाणात कमी आहे. हे बघता, या नविन पद्ध्तीने होणारा फायदा कॉस्ट इफेक्टीव्ह आहे का? ल्बॅक बॉक्सच्या तुलनेने खूप जास्त असलेल्या या अतिरिक्त खर्चाचा भार अर्थातच प्रवाश्यांवर पडेल, हे प्रवासी आणि एअर्लाईन्सना परवडेल काय?
असे असते तर स्वतःच्या हक्कांकरता जागरूक असणार्या पाश्च्यात्य प्रवासी संघटनांनी आतापर्यंत न्यायिक पावले उचलली असती असे वाटते.
२. सुचवलेल्या व्यवस्थेतला खर्च कमी करण्यासाठी बर्याच एअरलाईन्सनी ही व्यवस्था एकत्रितपणे करण्यालाही बर्याच अडचणी आहेत...
अ) या संवेदनाशील डेटाची सिक्युरीटी: हा डेटा फक्त अपघातासंबंद्धीचाच डेटा नाही तर कॉकपिटमधले "सर्व" संभाषण मुद्रित करतो. हे संभाषण थर्ड पार्टीच्या हाती देणे सर्वच एअरलाईन्सना "अस्वस्थ" करेल !
आ) डेटा फिजिकली साठवलेल्या जागेच्या देशाचे, विमान कंपनीच्या देशाचे आणि ज्यांचे नागरीक अपघातग्रस्त झाले आहेत त्या सर्व देशांच्या कायद्यांतील फरक आणि काँफ्लिक्ट ऑफ इंटरेस्टस् , इ.
असो. इतरही बरेच मुद्दे आहेत. पण सद्या इतके पुरे. जाणकार अधिक भर घालतीलच.
25 Mar 2014 - 1:23 pm | सुहासदवन
अनेक कंपन्या एवढा किंवा ह्या पेक्षा कमी जास्त डेटा दरवर्षी साठवून ठेवत असाव्यात आणि वापरतात देखील.
आणि प्रत्येक फ्लाईटचा सारा डेटा सेन्ट्रली इतका वेळ कशाला साठवायला हवा. विमानाचा उड्डाणासाठी लागणारा महत्वपूर्ण डेटा विमान निदान जमिनीवर सुखरूप उतरेपर्यंत तरी ठेवायचा नंतर वाटल्यास काढून टाकावा.
आणि काय गोपनीय माहिती लिक होईल अशी भीती वाटते. प्रत्येक ठिकाणी इतका हव्यास कशाला हवा व्यक्ती स्वातंत्र्याचा.
एक विमान इतक्या इंचीवरून जिवंत व्यक्तींना घेऊन उडते आहे आणि त्याचे कधीही काहीही होऊ शकते. अशा वेळी त्या विमानावर पूर्णवेळ सक्तीने लक्ष ठेवलेच पाहिजे. अशी स्वयंपूर्ण यंत्रणा असायलाच हवी.
प्रत्येक विमान कंपनीने स्वतःहून अशी यंत्रणा निर्माण करायला हवी होती आणि आहे.
प्रत्येक विमान कंपन्यांची जबाबदारी असायला हवी ती.
दर वर्षी अविश्वसनीय हवामान अंदाज वर्तविणाऱ्या कामासाठी लागणाऱ्या उपग्रहापेक्षा, मध्ये मध्ये नेटवर्क सतत जात येत असणाऱ्या मोबाईल कंपन्यासाठी लागणाऱ्या उपग्रहापेक्षा निदान ह्या कामासाठी चार पाच राष्ट्रांनी मिळून एक सर्वेक्षण उपग्रह ठेवायला हवा.
अशा प्रकारची यंत्रणा अशक्य आणि खर्चिक नाही पण करायची कुवत, इच्छा इत्यादी नसणे हेच कारण असावे. कारण यंत्रणेत अशा प्रकारचा/चे बग असणे हे ज्या प्रमाणे पुढील संशोधनासाठी कारणीभूत असते तसेच असे बग माहित असून देखील काही काळ ते तसेच ठेवणे, बऱ्याच लोकांसाठी तरी फायद्याचे / स्वार्थाचे असते.
एक अवांतर -
असाच डेटा खाजगी बस वाले, एसटीवाले, प्रवास करीत असणाऱ्या प्रवाशांचा घेतात.
नाव, वय, फोन नंबर, कुठे उतरणार इत्यादी.
पण हा डेटा प्रवास करीत असताना चालक आणि क्लिनर ह्यांनी तो वेळ असताना शेअर न करणे आणि फक्त स्वतः जवळ बाळगणे, किती लॉजिकल आहे?
समजा गाडीला अपघात झाला आणि ही यादी / डेटा हरवला, जळाला, भिजला तर काय उपयोग आहे त्याचा.
मला तर वाटते विमानासारखा रिकॉर्डर, निदान प्राथमिक अवस्थेतला तरी प्रत्येक गाडीत, निदान मोठ्या गाड्यांना देखील असायला हवा.
विमान प्रवास आजपर्यंत सर्वात सुखरूप ठरला आहे म्हणून भविष्यात देखील तो सर्वात सुखरूप असेल हे माझ्या मते नशिबाचा भाग आहे.
नाहीतर भारतासारख्या देशात तिथल्या यंत्रणा रस्त्यावर जाण्याऱ्या गाड्या, माणसे सुखरूप हाताळू शकत नाहीत तिथे उडणारी विमाने सुखरूप आहेत ह्याबद्दल कोणाचे आभार मानावे.
25 Mar 2014 - 3:02 pm | माहितगार
मॉडर्न सिस्टीम्स लावण्यासाठी पाच-पंचवीस कोतीही खर्च होईल. अपघातात वर गेलेल्यांच्या आयुष्याच नुकसान हा एक भाग झाला; दुसर अस की काँपन्सेशनची माणशी एकेक कोटी किंमत जरी धरली समुद्रातून ब्लॅकबॉक्स शोधण्याचा खर्च किंवा ज्यांच्या जमिनीवर पडले त्यांना द्यावी लागणारी भरपाई धरली तर अधिक प्रगत तंत्रज्ञानावर खर्च करण्यास फार खर्च येईल असे वाटत नाही. गळ्या पर्यंत येत नाही तो पर्यंत अॅक्शन नाही असा प्रकार आहे.
रेल्वे कोच मध्ये बसलेल्यांच्या प्रायव्हसीचे ठिक आहे. रेल्वे इंजीन चालवणार्यास रेल्वेच्या सुरक्षे पेक्षा प्रायव्हसी महत्वाची असू शकत नाही. प्रायव्हसी पाहीजे म्हणून उद्या विमानतळावरच चेकींग नको म्हणतील. प्रयव्हसी महत्वाचीच पण प्रायव्हसीचा मुद्दा सुरक्षेच्या (तुलनेत) बाबतीत तर्कसुसंगत ठरत नाही.
25 Mar 2014 - 3:30 pm | स्वप्नांची राणी
आणि काय गोपनीय माहिती लिक होईल अशी भीती वाटते. प्रत्येक ठिकाणी इतका हव्यास कशाला हवा व्यक्ती स्वातंत्र्याचा.<<<< पुर्ण अनुमोदन.
मानवी हस्तक्षेपामुळे होणार्या चुका टाळण्यासाठीच 'थर्ड अम्पायर' या संकल्पनेचा जन्म झाला. पण सुरुवातीला त्यालाही असाच विरोध झाला होता.
या घटनेवरुन योग्य तो बोध घेउन खरोखर एविएशन क्षेत्रात पण असा थर्ड अम्पायर असायलाच हवाय. शेवटी २३७ लोकांचे जिवंत राहण्याचे स्वातंत्र्य हे २ लोकांच्या खाजगी बातचितीच्या स्वातंत्र्यापेक्षा नक्कीच जास्त असेल.
25 Mar 2014 - 6:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
मी केवळ फक्त सद्य वस्तूस्थितीचे माझ्या अल्पमतीने विश्लेषण करण्याच्या थोडासा प्रयत्न केला.
सद्य वस्तुस्थिती आणि ती कशी असावी याबद्दलचा तुमचा (आणि माझाही) दृष्टीकोन यांच्यंत बराच फरक असू शकतो.... किंबहुना आहेच.
25 Mar 2014 - 8:02 pm | उपास
इस्पिक एक्का.. माझ्या अनुभवानुसार तुम्ही दिलेली आकडेवारी जरी ग्राह्य मानली तरी खर्च (इम्प्लिमेंटेशन/ मेन्टेनन्स) हा करायलाच हवा. ९/११ नंतर वाढलेल्या सिक्युरीटी मुळे आणि प्रवाशांचा त्यात जो वेळ जातो त्याचा हिशोब करता अपरिमित खर्च होतोय पण म्हणून तो टाळता येऊ शकणार नाहीच. गुगल/ फेसबुक/ याहू इतके मोठे सर्वर्स चालवतात, त्यामुळे सिस्टीम जर फूल प्रूफ होत असेल तर खर्च करायलाच हवा.. एखादा प्रायव्हेट क्लाऊड किंवा तत्सम नेटवर्क उभं राहायला हवं, आणि प्रायव्हसी हवी म्हणून सिक्युरीटी नको असं म्हणणं तितकसं उचित नाहीच.
आज त्या विमानाचा ब्लॅकबॉक्स मिळाला असता तर चित्र वेगळं असतं, कदाचित प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न तरी नक्कीच करता आले असते आणि हे केवळ टेक्नॉलॉजिच अपयश आहे असं मी मानतो, हे टेक्निकल डेब्ट घेऊनच आपल्याला वावरावे लागणार अजून काही काळ हे एक टेक्निकल माणूस म्ह्णून मला निराशाजनक वाटतं!
25 Mar 2014 - 9:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
उपास, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अधिक उपयोगी सिस्टीम नको असे कधिच म्हटले नाही. प्रवास करण्याची आवड असल्याने अशी काही व्यवस्था होऊ शकली तर इतरांसाठीच नाही तर माझ्या स्वतःसाठीही मला अत्यानंदच होईल.
मी माझ्या मूळ प्रतिसादात फक्त असे का होत नसावे याची फक्त काही संभाव्य कारणे लिहीली आहेत.
हे एक कठोर सत्य आहे की मोठे व्यवसाय (यात विमानवाहतूकही आली) हे सर्व कॉस्ट-बेनेफीट रेशोच्या प्रत्यक्ष आणि संवेदीत (परसिव्ह्ड) तत्वांवर चालविले जातात. त्याशिवाय ते फार काळ कारकिर्दित राहू शकणार नाहीत... मग कंपनीही नाही आणि सेवाही नाही असे होईल.
बिलियन्समध्ये कंपनीत गुंतवणूक करणारी कंपनी "सरळ सरळ अपघात आणि आताच्या अनाकलनिय विमान दुर्घटनेसारख्या गोष्टी झाल्या तर त्यांचे कंपनीवर होणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष (टँजिबल-इनटँजिबल) परिणाम" आणि "त्यावरच्या प्रतिबंधक आणि निवारक उपाययोजनांवर होणारा खर्च" या दोन गोष्टी प्लॅनिंग मध्ये धरणार नाही असे गृहीत धरणे जरा फारच धारिष्ट्याचे होईल.
याशिवाय या सर्व कंपन्यांना त्या ज्या ज्या देशात कार्यरत आहेत त्या सगळ्या देशांच्या रेग्युलेटरी संस्थांच्या नियमांचे पालन करावे लागते. हे नियम बनवताना "किती कडक नियम म्हणजे अती कडक नियम ?" हा यक्षप्रश्न नेहमीच असतो.
प्रत्येक अधिक सुरक्षा व्यवस्थेने खर्चही त्याप्रमाणात वाढणार हे नक्की. तेव्हा पहिल्या प्रश्नाबरोबरच "प्रतिबंधक उपाययोजनांचा किती खर्च म्हणजे अती खर्च?" हा दुसरा यक्षप्रश्नही उभा असतो. यात विमानकंपनी आणि प्रवासी या दोघांच्या हितसंबंधांचा तोल सांभाळत निर्णय घेऊन नियम करावे लागतात.
अपघात कोणालाचा सुखद नसतो... प्रवाश्यांना, कंपनीला आणि प्रवासी/कंपनीच्या देशातील व जागतीक नियमन करणार्या संस्थाना. तेव्हा, नियमन करणार्या संस्था प्रवाश्यांची सुरक्षा सर्वात वर ठेवून नियम बनवतात. याचसाठी आजही विमानप्रवासातली मनुष्यहानी आज रस्त्यावरच्या मनुष्यहानीपेक्षा लक्षणिय कमी आहे. मात्र "किती सुरक्षा म्हणजे अती सुरक्षा ?" हा प्रश्न कायमच अनुत्तरीत राहणार आहे... कारण वरच्या प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून त्याचे उत्तर सतत वेगळेच राहणार आहे.
असो. या दुर्घटनेतून जगभरात विमानप्रवासाच्या सुरक्षेबद्दल काही नविन शिकले जावून तो अजून जास्त सुरक्षित बनावा ही इच्छा करणेच माझ्यासारख्या सर्वसामान्य प्रवाशाच्या हातात आहे.
26 Mar 2014 - 1:13 am | उपास
तुमचा मुद्दा एक व्यावसायिक म्हणून पटला आणि कळला, पण एक तंत्रज्ञ ह्या दृष्टीकोनातून मी येथे पाहात असल्याने टॅक्नॉलोजिकल फॅल्युअर अस्वस्थ करतेय, ह्यातून पुढे नेमक्या सुधारणा होताहेत हे बघण्यासारखं असेल, गवि म्हणतात तसं १२०% जर काही होणार असेल तर पहायला प्रचंड उत्सुक आहे, त्या दृष्टीने अपघातात गेलेल्यांच 'व्यर्थ न हो बलिदान' इतकंच म्हणेन!
दहशतवाद्यांनी केलेल्या ९/११ च्या हल्ल्यात कित्येक माणसं मेली/ नुकसान झालं पण ते मानवनिर्मित होतं, काही तांत्रिक कारणाने असं जेव्हा होतं तेव्हा व्यावसायिक दृष्टीकोना पलिकडे विचार करावाच लागतो, तंत्रावरचा किंवा ते वापरणार्यांवरचा सामान्य माणसाचा विश्वास ढेपाळू शकतो, ते जास्त निराशाजनक आहे विज्ञानाच्या प्रगतिच्या दृष्टीने.
26 Mar 2014 - 12:09 am | स्वप्नांची राणी
हा प्रतिसाद मला आहे का? पण मी तर सुहास्वदन साठी लिहिला होता. अर्थात काहिही पर्सनल घेउ नका प्लीज. प्रतिसाद देतांना माझ्या डोक्यात जरा स्नोडेन आणि विकीलीक्स पण घोळत होतं.
26 Mar 2014 - 10:22 am | डॉ सुहास म्हात्रे
नाही, तो प्रतिसाद उपास यांनी उपस्थित केलेल्या माझ्या मूळ प्रतिसादातील मुद्द्यांचा थोडा अजून विस्तार म्हणून लिहीला होता.
मीही एक प्रवासी याच दृष्टीकोनातून विचार करून लिहीतोय. पण ते करताना "किती मागण्या म्हणजे अती मागण्या?" असाही विचार करतोय. कारण जितकी मला माझ्या जिवाची काळजी आहे तितकीच कंपनीलाही असते... त्याचे कारण माझ्या प्रत्यक्ष जीवाइतकेच (किंवा काहिंच्या मते त्याहीपेक्षा जास्त !) कंपनीच्या भवितव्य हे असते. कारण कोणत्याही मोठ्या अपघाताने विमान कंपनीचे आस्तित्वच धोक्यात येऊ शकते... कमीत कमी व्यवसायत मोठा तोटा तर नक्कीच होतो. हे कोणत्याही कंपनीला नकोच असते.
प्रवासी म्हणून मलाही अती सुरक्षा मागताना तिची किंमत परवडेल काय असाही विचार करावाच लागेल. कारण प्रत्येक वाढलेला खर्च प्रवाश्याच्या तिकीटाच्या किंमतीत वाढ करतो (दुसरे कोण देणार तो?)... त्यामुळे विमानप्रवास जर माझ्या आवाक्याबाहेर गेला तर एक प्रवासी कमी झाला म्हणून कंपनीचे जेवढे नुकसान होईल तसेही विमानप्रवासाला मुकल्यामुळे माझेही होईल.
विमानप्रवासातला अपघात म्हणजे जिवावरचा खेळ आणि त्यात आवश्यक सर्व सुरक्षा हवी हे अगदी मान्य. पण आपल्याला तो सुरक्षित ठेवून परत कमीतकमी खर्चातही हवा असतो... ही "आखूड शिंगी, भरपूर दूध देणारी गाय... वगैर" अशीच तारेवरची कसरत करायला लावणारी मागणी असते ही वस्तुस्थिती आहे, इतकेच.
माझा विमानव्यवसायाशी आतापर्यंत एकाच प्रकारचा संबंध आला आहे... प्रवासी म्हणून. सो, अॅब्सॉल्युटली नथिंग पर्सनल... एक्सेप्ट फॉर माय (पॅसेंजर) सेफ्टी अँड द कॉस्ट दॅट आय अॅम रेडी तो बेअर फॉर इट :)
26 Mar 2014 - 10:49 am | आनन्दा
पुन्हा एकदा गविंच्या प्रतीक्षेत. यात नेमकी विमान कंपन्यांची / जबाबदार संस्थांची भूमिका काय असते ते कदाचित तेच सांगू शकतील.
24 Mar 2014 - 11:07 pm | गवि
Beyond all reasonable doubts.. अशी शब्दरचना करुन मलेशियाच्या मुख्यमंत्र्यांनी या विमानाचा अंत झाल्याचं जाहीर केलं आहे.
या डिक्लेरेशनचा जाहीर आणि उघड केलेला स्रोत म्हणजे नव्याने हाती लागलेले उपग्रह ट्रॅकिंग. या ट्रॅकिंगने विमान नक्की दक्षिणेकडेच गेलं आणि जिथे शेवटचे सिग्नल मिळाले तसंच इंधनाची मर्यादा संपली ते ठिकाण कोणत्याही जमिनीपासून हजारो किलोमीटर दूर असल्याने लॅंडिंगचा प्रश्नच नव्हता. आणि समुद्रात इतक्या आतवर दोन आठवडे सर्व्हायव्हर्स असण्याची जराशीही शक्यता नाही..या तर्काने हे विधान केलेलं आहे.
नेमकं काय नवीन पद्धतीने ट्रॅकिंग केलं ती माहिती नंतर पोस्ट करण्याचा प्रयत्न करीन.
त्याच पहिल्या दिवशी हा पत्ता लागला असता तर काही सर्व्हायव्हर्स मिळू शकले असतेही. पण ही जर तर ची गोष्ट.
ही लाजिरवाणी गॅप आहे. त्याविषयी परत कधीतरी.
24 Mar 2014 - 11:24 pm | खटपट्या
नेट वर चाललेला एक भन्नाट संवाद :
Questions and answers about missing Malaysia airliner:
User 1: Is it possible that plane flew vertically up and left earth’s atmosphere into deep space? I am just trying to think outside the box
User 2: No. Get back in the box.
25 Mar 2014 - 12:07 am | आत्मशून्य
पायलटने विमान का भरकटवले ? हे जाणीवपुर्वक असेल तर आत्मघाती हल्ला टाळण्यासाठीच असाच माझा कयास आहे...
25 Mar 2014 - 12:24 am | गवि
जर विमानाने आपली आल्टिट्यूड आणि दिशा बदलत प्रवास केला ही थिअरी / माहिती चुकीची ठरली तर मग घोस्ट फ्लाईट स्थिती उत्पन्न झाली असण्याची शक्यता सर्वाधिक आहे. हेलिओस घोस्ट फ्लाईटप्रमाणे. हेलिओसविषयी मी इथे पूर्वी लिहिलं होतं. आत्ता लिंक देणं शक्य नाहीये.
फक्त हेलिओसच्या बाबतीत पायलट्स बेशुद्ध झाल्याचं आणि एकूण परिस्थितीविषयी त्याचवेळी कळलं होतं. स्क्रॅंबल करायला आलेल्या एअरफोर्स फायटर विमानांनी जवळ समांतर उडून cockpit च्या आत बघितलं होतं. ती फ्लाईट जमिनीवर होती आणि लगेच ॲकशन झाली म्हणून गूढ राहिलं नाही. mh370 च्या बाबतीत त्याच्यावर सतत लक्ष असतं तर ते वाचवता आलं असतं कदाचित. कदाचितच अर्थात. या विमानाला फ्लाय बाय वायर यंत्रणा असल्याने काही कंट्रोल कदाचित करता आला असता.
बाकी निव्वळ सत्य काय ते black box / FDR सापडला तरच कळू शकेल. ती शक्यता कमीच वाटते. पण शोध चालू राहील हे नक्की.
25 Mar 2014 - 12:15 pm | मी_आहे_ना
गवि, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे (आणि अजूनही कुठेतरी २-३ ठिकाणी वर्तवलेल्या शक्यतेनुसार) जर ३७० घोस्ट फ्लाईट झाली असेल, तर अश्या फ्लाईट्स साठी काही संवैधानिक अधिकार एखाद्या देशाला असतात का? जसे, न जाणो पण ही ३७० फ्लाईट कमी अंशातून वळून वायव्येकडे (पर्यायाने भारताकडे) किंवा जास्त अंशात वळून ऑस्ट्रेलियाकडे गेली असती आणि जमिनीवर पडली असती तर होणारी जीवित हानी भयंकर असती. अश्या वेळी 'डिसिजन पावर' कोणाकडे असते का?
25 Mar 2014 - 12:22 pm | सचिन कुलकर्णी
हि घ्या हेलिओसची लिंक.
25 Mar 2014 - 10:37 am | सुहासदवन
आजच लोकसत्तामध्ये हा लेख वाचनात आला.
एक अभ्यासपूर्ण आणि बर्याच शंकांना उत्तरे देणारा लेख...
http://www.loksatta.com/vishesh-news/mystery-of-malaysia-airlines-flight...
ह्या घटनेनंतर कदाचित एविएशन इंडस्ट्रीचा आणि त्यांतील तंत्रज्ञानाचा चेहरामोहरा सुधारेल ही आशा.....
25 Mar 2014 - 11:10 am | पिशी अबोली
हा लेख आल्यापासून सतत अपडेट्स वाचायची सवय लागली होती. कुठेतरी खोटी आशा वाटत होती.. आता फक्त खूप वाईट वाटतंय. :(
या अशा घटनेवरही जोक्स सुचणार्या, सांगणार्या आणि फिरवणार्या लोकांमुळे उद्विग्नता आली होती. त्यातील गांभीर्य अतिशय नेमकेपणे जाणवून देणार्या या लेखाचे खूप आभार.
25 Mar 2014 - 1:45 pm | देशपांडे अमोल
विमान पाण्यात पडल्या नंतर, मोठी लाट किंवा पाणी उसळून आले नसेल? ते कुणाला दिसले अथवा जाणवले नसेल? मला वाटतं की हे नक्कीच कुठल्या radar वर डिटेक्ट झाला असेल च ना? मग त्या विषयी अजुन काहीच वाचनात कसं नाही आलं?
25 Mar 2014 - 3:14 pm | माहितगार
(या बद्दल गवि आणि इतर अधिक ट्क्नीकल सांगू शकतील पण माझ जे वाचन झाल त्यानुसार:)
विमान पाण्यात पडल्या नंतर, मोठी लाट किंवा पाणी उसळून आले नसेल? >> असेल ना पण तो (अंशतः) कायम वादळी वारे आणि उंच लाटांचा वेगवान समुद्री प्रवाहांचा प्रदेश असल्यामुळे उपग्रहांकडून सध्यातरी ज्या प्रतीच्या इमेजेस उपलब्ध होतात त्यात नेहमीच्याच मोठ्या लाटात अजून एक मोठी लाट दिसणार नाही. वातावरण ढगाळ असेल तर काहीच दिसणार नाही. सॅटेलाईटशी संपर्कातही व्यत्यय येऊ शकत असावा.
वादळी भागात नौकाही कमी जातात. आसपास जमिनी प्रदेश नसल्यामुळे मानवी दृष्टीच्या ट्प्प्याबाहेर असणे सहज सहाजिक आहे.
त्सुनामी विषयक यंत्रणा कोणत्या तत्वावर काम करतात त्याची कल्पना नाही पण समुद्राच्या एकुण आकारा पुढे एक विमान क्षुल्लक गोष्ट ठरत असावी. एकुण माणूस अजून निसर्गाला जिंकु शकला नाही हेच खर आहे.
25 Mar 2014 - 3:31 pm | प्रमोद देर्देकर
पण जर ते विमान समुद्रात जरी पडले असेल तरी पाणबुडीवाले लोकांच्या सहाय्याने (जे डीस्कवरीला सतत दाखवतात), किंवा जहाजावरिल सोनार लहरी वापरुन त्याचा शोध घेवु श्कत नाही काय?
25 Mar 2014 - 5:38 pm | सुहासदवन
आजच्या ह्या आधुनिक सिस्टिम्स असणाऱ्या काळात संपूर्ण पृथ्वीवर, जमिनीलगत असा कोणता प्रदेश आहे जिथे मानवी आणि संगणकीय डोळे पोहोचू शकत नाहीत?
आता जिथे विमान कोसळले असे सांगितले जात आहे तो सागरी भाग सदैव जल आणि वायू सेनेच्या निरीक्षणा खाली असतो.
अश्या ठिकाणी जर विमान सापडणार नसेल तर काय फायदा त्या देशांकडे एवढी आधुनिक यंत्र आणि युद्ध सामुग्री असण्याचा?
ह्या विमानासंबंधी नक्कीच काहीतरी हेतू परस्पर लपविले जात आहे.
आणि म्हणूनच इतके दिवस जेव्हा हाती काहीच लागले नाही, तो पर्यंत सारे आता पुढे काय म्हणून आस लावून बसले होते.
आणि जेव्हा आता हाती काही तरी लागणार असे दिसते तो पर्यंत "सगळे संपले" म्हणून मोकळे झाले…
ह्यातून काय ते समजा....
अवांतर -
एक थेअरी अशी ही सांगता येईल-
एका क्रूर प्रयोगांतर्गत ह्या सागरी पट्ट्यावर ताबा / वर्चस्व मिळविण्यासाठी आणि जवळपासच्या कोणत्या देशाकडे काय यंत्रणा आहे हे जोखण्यासाठी काही जीवांचा बळी दिला गेला आणि दुर्दैवाने त्या प्रयोगाचे उद्दिष्ट सफल झाले आहे.
आता पुढील काही काळात ह्या सागरी पट्ट्यात काही घडामोडी घडणार हे नक्की.
25 Mar 2014 - 8:03 pm | भटक्य आणि उनाड
अत्यन्त अवघड आणि खर्चिक आहे..it all depends on numerous factors like weather conditions, distance of possible crash site from nearest airport/land,depth of sea for that location, etc etc... long list.
25 Mar 2014 - 9:45 pm | सुहास झेले
प्रमोदजी, ज्या भागात हे विमान कोसळले आहे अशी आशंका आहे, तो भाग अतिशय खडतर आहे. काल हा व्हिडीओ अपलोड केला होता ह्या भागात सर्च ऑपरेशन करणाऱ्या बोटीचा...
.
.
26 Mar 2014 - 8:46 am | प्रमोद देर्देकर
हा व्हिडीओ तुम्ही काढुन टाकला आहे. तसा मेसेज येतोय.
26 Mar 2014 - 2:35 pm | नांदेडीअन
http://youtube.com/watch?v=hrq0zWacnyY
हा व्हिडीओ तर नव्हता ना तुम्ही शेअर केलेला ?
हा खूप जुना व्हिडीओ आहे, MH370 च्या सर्च ऑपरेशनचा नाहीये.
26 Mar 2014 - 3:20 pm | सुहास झेले
हो... मी नव्हता अपलोड केलेला. फेसबुकवर मिळालेला. पण कळले की तो खोटा आहे ते... :(
http://www.ahem.in/190/a-fake-video-of-the-mh370-search-operation-tends-to-shows-the-dangerous-side-of-indian-ocean/
25 Mar 2014 - 4:49 pm | दिपस्तंभ
सर्व लेख, दुवे वाचले.. आणि प्रतिसाद सुद्धा. जर हे विमान हिंदी महासागराकडे गेले असेल (कसेही) तर आपण या भागातील बाकी सर्व देशंबद्दल बोलतोय फक्त श्रीलंका सोडुन. श्रीलंका हा हि तसा जवळ्चाच देश आहे त्यांच्या टप्प्यातील, जेथे हे विमान सर्व यंत्रणा बंद करुन उतरवले जाउ शकते......
25 Mar 2014 - 9:27 pm | आयुर्हित
भुवनेश्वर : मलेशियन एअरलाईन्सच्या "एमएच 370' या विमानातील प्रवाशांना श्रद्धांजली वाहणाऱ्या वाळूशिल्पावर शेवटचा हात फिरवताना प्रख्यात वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक.
साभार: सकाळ
26 Mar 2014 - 9:53 am | सुहासदवन
http://www.ibtimes.co.uk/malaysia-airlines-plane-mh370-latest-conspiracy...
http://www.gizmodo.com.au/2014/03/12-of-the-most-bizarre-flight-mh370-co...
http://globalvoicesonline.org/2014/03/15/in-absence-of-facts-conspiracy-...
26 Mar 2014 - 10:05 am | आयुर्हित
Why and how did MH370 end up in the Indian Ocean?
26 Mar 2014 - 3:03 pm | आत्मशून्य
सर्व कम्युनिकेशन एकाच वेळी कसे काय बंद पडले ? बर बंद पडले तर इतर मार्गाने संपर्क का केला नाही याची संपुर्ण उत्तरे अजिबात देत नाही. अथवा मला हे समजुन घेता आलेले नसावे.
30 Mar 2014 - 1:52 pm | पैसा
कित्येक वेळा या धाग्यावर येऊन काही न लिहिता परत गेले. वेड्यासारखी नेटवर शोधत होते. २३९ माणसांसकट एवढे अत्याधुनिक विमान असे नाहिसे होते आणि ३ आठवड्यांनंतर त्याचा पत्ता लागत नाही हे फार भीषण आहे.
कालपरवा कुठेतरी असेही वाचले की मुख्य पायलट बायको सोडून गेल्यामुळे फार अस्वस्थ होता आणि विमान चालवायच्या मनस्थितीत नव्हता. शेवटचे शब्द को पायलटचे होते याचा अर्थ मुख्य पायलट विमान चालवत होता. को पायलट टॉयलेटला गेल्यावर मुख्य पायलटने सगळा पुढचा मार्ग आणि फ्लाईट प्रोग्राम फीड करून विमान ४५००० फुटांवर नेले असं तर झालं नाही ना? बरं त्या उंचीवर ते २३ मिनिटे होतं असंही वाचायला मिळालं. एवढ्या अवधीत सगळंच संपलं असेल. :(
http://www.express.co.uk/news/world/466933/Malaysia-Airlines-Jet-passeng...
31 Mar 2014 - 12:22 am | आत्मशून्य
आता आपण मृत्युवत झालेल्यांना श्रध्दांजली अर्पण करुन हा विषय इथेच थांबवुयात.
तसेही एक्दा विमान ताब्यात आल्यावर मरायचे १०० पर्याय हाताशी उपलब्ध असताना उगाच प्रकांड कौशल्याचा दिर्घ असा अद्रुश्य प्रवासाचा धोका पत्करुन निव्वळ आत्महत्या करण्यात काहिच प्वाइंट नाही. चारचौघात आत्महत्येला अपयश/विरोध ९९.०९९% आहेच, तरीही निर्मनुष्य ठिकाणी पोचुन ती शक्यतो केली जात नाही.
31 Mar 2014 - 1:02 am | गवि
सहमत.
+१
31 Mar 2014 - 2:49 pm | बॅटमॅन
पूर्ण सहमत.
13 Apr 2014 - 10:53 pm | अजयिन्गले
लापता मलेशियाई विमान की खोज में अब तक का सबसे बड़ा खुलासा.... http://owl.li/vJJWQ
14 Apr 2014 - 3:24 am | मंदार कात्रे
मीदेखील एबीपी न्यूज चाच दुवा द्यायला आलो होतो ...
अफघाणिस्तानात अतिरेक्यानी ते विमान लपवून ठेवलेले असून वेळ पडल्यास भारतावर ९/११ सारखा हल्ला करण्यासाठी ते वापरले जावू शकते असा इशारा एफ बी आय ने १० मार्च च्या आसपास दिला होता. आज तेच रशियन गुप्तहेर सन्घटना म्हणत आहेत ...!
14 Apr 2014 - 3:27 am | मंदार कात्रे
रूस की खुफिया एजेंसी का दावा, अपहरण के बाद कांधार में है लापता मलेशियाई विमान
By एजेंसी
रविवार, १३ अप्रैल २०१४ ०९:१५ अपराह्न
लंदन: मलेशिया एअरलाइंस का लापता यात्री विमान एमएच 370 की हिंद महासागर में सघन तलाशी के बीच रविवार को एक सनसनीखेज खबर सामने आई. ब्रिटेन के समाचार पत्र डेली मिरर के मुताबिक रूसी खुफिया एजेंसी ने कहा है कि विमान दुर्घटनाग्रस्त नहीं हुआ है, बल्कि उसका अपहरण हुआ है.
14 Apr 2014 - 4:26 am | आत्मशून्य
पण विमानाने सुर मारत आत्मघाती हल्ला करायचा आहे (तो सुधा भारतात, मोदी सभेवर असे गृहीत धरुया) तरीही प्रवाश्यांना अजुन जिवंत ठेवायचे कोणतेही कारण लक्षात येत नाही. आणी अपहरण होते तर मागण्या का नाहीत ते सुधा चिनसोबत ?
मानवी अस्तित्वाची बिंधास्त गळपेची करणार्या चिन सोबत इतका उघड पंगा घेतला जाइल ? याला चिन मदत करणार नाही व आख्खा भारत बायपास करणे तर अशक्यच, अर्थात मला या प्रकारात भारताची भुमीका (तर्कद्रुश्टीने) सुरुवातीपासुन संशयास्पद वाटली आहे. तरीही... रशीया म्हणत असेल त्यात किंचीतही तथ्य असेल तर इट विल ब्लो माय माइंड...कोणत्याही देशाच्या पाठींब्याशीवाय हे अपहरण घडुच शकत नाही... आणि आता तर वाटाघाटी फक्त सुरु व्हायचा अवकाश तुफान लश्करी कारवाइ होइल.
23 Apr 2014 - 10:03 am | आयुर्हित
मलेशियन एअरलाइन्सच्या 'एमएच ३७०' या गूढरीत्या बेपत्ता झालेल्या विमानाचा हिंदी महासागरात कुठेही थांग लागत नसल्याने आता हे विमान जमिनीवरच कुठे तरी उतरले असावे, असा नवा तर्क आता करण्यात येत आहे.
'न्यू स्ट्रेट टाइम्स' या वृत्तपत्राने या विमानाचा तपास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पथकांतील तज्ज्ञांचा हवाला देऊन ही बातमी दिली आहे. या विमानाच्या संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेऊन, हिंदी महासागराच्या अतिदक्षिण भागात त्याच्या अवशेषांचा शोध गेले काही दिवस सुरू होता. मात्र, अनेक दिवस सखोल शोध घेऊनही अवशेष मिळाले नसल्याने हे विमान हिंदी महासागरात कोसळलेच नसावे, असा तर्क आता करण्यात येत आहे.
येत्या काही दिवसांत आणखी तपास करून काहीही न आढळल्यास या तर्काला आणखी आधार मिळू शकेल, असे या तज्ज्ञांना वाटते. अर्थात महासागरातील शोध मोहीम चालू राहायला हवी, असेही त्यांचे मत आहे.
बेपत्ता विमानाचा शोध जमिनीवर?
23 Apr 2014 - 1:58 pm | समीरसूर
लेख नेहमीप्रमाणे नवीन माहिती पुरवणारा आणि सखोल!
बाकी त्या विमानाचे काय झाले असावे हे रहस्यच आहे. आज दीड महिना होऊन गेला. :-(
28 Apr 2014 - 1:16 am | चाणक्य
मति गुंग करून टाकणारा प्रकार आहे हा सगळा
9 Jul 2014 - 10:05 pm | मदनबाण
खरं तर जेव्हा ही बातमी कळली होती, तेव्हा त्यावर जितके काही वाचता येइल तितके वाचण्याचा प्रयत्न केला होता,आणि एक विचार केला होता की :- चीन ने या विमानावर क्षेपणास्त्र डागले असेल का ? जो याच धाग्यावरच्या प्रतिसादात मी व्यक्त केला होता,पण चीन असे का करेल ? जेव्हा आज सार्या जगाच्या नजरा चीन आणि त्यांच्या प्रगतीवर आहे,आणि जेव्हा आजच्या घडीला चायनाच्या इकॉनॉमिने अमेरिकेला मागे टाकले आहे तेव्हा अशी गोष्ट करण्याचा ते प्रयत्न करतील काय ? पण काहीही झाले तरी ते विमान कोणीतरी पाडले या माझ्या विचार आणि मतावर मी ठाम होतो... जगात इतके आधुनिक रडार सिस्टीम्स आणि अंतराळात अगणित हायएंड सॅटलाईट असताना विमान आकाशातल्या आकाशात गायब होउ शकते यावर मी विश्वास ठेवायला तयार नव्हतो...
तेव्हा यावर जालावर अजुन माहिती घेण्याचा प्रयत्न चालुच ठेवला होता, आज मात्र काही वेगळीच माहिती मिळाली...
फरक एकच निघाला. तो म्हणजे चीन नाही पण...
अधिक इकडे :-
MH370: The Follow-Up
Flight 370 Downing
light 370 downing was Energy weapons demo
जाता जाता :- जरासे अवांतर विषयावर पण मूळ कारण वरचेच,म्हंणजे वेपन. HAARP आणि फुकिशिमा.
वेळ मिळाल्यास Fukushima: Impact of Fallout On Oceans (Pt.1) हे सुद्धा जरुर वाचा.
आजची स्वाक्षरी :- Sachin Tendulkar Walks Out To Bat At Lord's - Entry Of A Legend कोण शारापोव्हा? ;)
22 Aug 2014 - 9:09 pm | आयुर्हित
A book on the ill-fated flight MH370 suggests that passengers died of oxygen deprivation before the pilot Ahmad Shah ditched the plane into the Indian Ocean.
The theory is the result of the first independent study into the disaster by the New Zealand-based air accident investigator, Ewan Wilson.
Malaysia Airlines MH370: Pilot Starved Passengers of Oxygen, Says New Study
11 Oct 2014 - 6:03 pm | प्रदीप
सर टिम क्लर्क हे एमिरेट्स ह्या नामांकीत विमानसेवा कंपनीचे सी. ई.ओ. आहेत. नुकतीच त्यांनी एका जर्मन वर्तमानपत्राला मुलाखत दिली, जीमध्ये ते म्हणतात की MH370 शेवटपर्यंत कुणीतरी चालवीत होते. त्यांचे मुद्दे:
* बोईंग ७७७ मधे अत्यंत प्रगत टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. त्यामुळे त्याचे दळवळण अजून विकसीत करण्याची जरूरी नाही.
* अशा अत्यंत विकसीत विमानाचे दळणवळण संपूर्णतः थांबवणे हे कुठल्याही पायलटाला अशक्य आहे.
* त्या विमानामधे कोणकोण होते, ह्याविषयीची माहिती असणार्यांना (पक्षी: त्या घटनेची चौकशी करणार्यांना) आपण रेटा लावून बोलते केले पाहिजे.
थोडक्यात, ह्यांचा रोख कुठल्यातरी कॉन्स्पिरसीच्या दिशेने आहे, असे दिसते.
28 Dec 2014 - 10:42 am | अर्धवटराव
एअर एशियाचे विमान बेपत्ता;विमानात 162 प्रवासी
:(
28 Dec 2014 - 12:50 pm | गवि
भयंकर प्रकार आहे.
..अनिश्चितता लवकर संपावी अशी इच्छा.
बाकी घडामोडी फॉलो करुच.
29 Dec 2014 - 1:28 pm | देव मासा
हाच लेख शोधत होतो , पुन्हा एकदा मलेशियाचे विमान बेपत्ता झाले आहे, घरचा टीवी बंद पडल्या मुळे फार अपुरी माहिती मिळत आहे ,
म्हंटले ईथे अपडेटस आले असतील
29 Dec 2014 - 2:00 pm | गवि
आत्तापर्यंत दिसलेल्या धाग्यादोर्यांवरुन मलेशिया एअरलाईन्स आणि एअरएशिया केसेसमधे फ़रक वाटतोय.
१. खराब हवामान , विशेषत: धोकादायक ढग पायलट्सनी घोषित केले होते आणि त्यासाठी रस्ता किंचित बदलून मागितला होता. मलेशिया ३७० प्रमाणे आलबेल स्थिती नव्हती.
२. अजूनतरी विमान संपर्क तुटल्यावरही बरेच तास भलत्या दिशेत उडत राहिले होते वगैरे अशी चिन्हं एअर एशिया बाबत दिसली नाहीत. म्हणून गूढता काही प्रमाणात कमी आहे.
30 Dec 2014 - 12:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
विजय देवधरांनी अनुवाद केलेल्या बर्म्युडा ट्रँगल किंवा ओशन ट्रँगल मधे असे प्रकार घडायचे प्रमाण ख्रिसमसच्या आसपास जास्त घडल्याचा उल्लेख आठवतोय. :(
डेथ इस ब्लेसिंग रादर दॅन अनसर्टेनिटी... :(
8 Mar 2015 - 12:39 pm | योगी९००
एक वर्ष झाले हो हे विमान गायब होऊन..सर्व मृत व्यक्तींना श्रद्धांजली..!!
एका वर्षात हे विमान शोधायचे भरपूर प्रयत्न झाले. किंवा प्रयत्न केले गेले असे तरी दाखवले गेले. खरे खोटे देवास ठाऊक..!! पण ह्याचा काहीच ठावाठिकाणा लागला नाही. नक्कीच काहीतरी conspiracy आहे.
9 Mar 2015 - 5:43 am | स्पंदना
आजच्या बातमीनुसार विमानाच्या बॅटरीज २०१२ ला एक्स्पायर झाल्या होत्या म्हणे. अन त्या २०१४ पर्यंत बदलल्या नव्हत्या!!
असो, पण आता बॅटरीज एक्स्पायर्ड असण्याचा संबंध, विमान मुळ दिशा सोडून कुठच्या कुठे जाणे आणी त्याचा शोध ऑस्ट्रेलियाच्या आसपास घेणे, या गोष्टींशी कसा लावायचा हे काही कळत नाही.
9 Mar 2015 - 6:05 am | श्रीरंग_जोशी
या एक्सायर्ड झालेल्या बॅटरीज underwater locator beacon या यंत्राच्या होत्या. हे यंत्र विमान पाण्यात कोसळल्यावरच काम करणे सुरू करते अन ते विमानाच्या डेटा रेकॉर्डरला जोडलेले असते. अपघातानंतर ३० दिवसांपर्यंत ध्वनीलहरी ट्रान्समिट करू शकते (म्हणजे किमान ३० दिवस त्याच्या बॅटरीजचा चार्ज संपणार नाही).
छापील तारखेनुसार एक्सपायर झालेल्या बॅटरीजचा चार्ज संपलेला असेलच असे काही आवश्यक नाही.
तसेच पहिले ३० दिवस जर प्रत्यक्ष अपघाताच्या ठिकाणी शोधकार्य झाले नसेलच तर बॅटरीज चार्ज असूनही काही उपयोग नाही.
बातमीचा दुवा:Battery of underwater locator beacon expired year before disappearance of MH370, report says
9 Mar 2015 - 3:18 pm | स्पंदना
धन्यवाद!!
सगळी माहिती समजली.
9 Mar 2015 - 7:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
मलेशियन एअर ट्रॅफिक कंट्रोलरने (बहुतेक त्यामुळे होणारी नाचक्की आणि कायदेशीर कारवाइ टाळण्यासाठी असावी) धोक्याच्या वेळची कार्यपद्धती सुरू करण्या ऐवजी विमान गायब झाल्याची बातमी दाबून ठेवून व्हिएतनामच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरला "सगळे आलबेल" असल्याचे संदेश देणे चालू ठेवले. त्यामुळे विमान ठरलेल्या मार्गाच्या विरुद्ध दिशेन जाऊनही लष्करी आणि मुलकी रडारचे संदेशांचे नीट विश्लेषण झाले नाही असा पुरावा बाहेर येत आहे...
Missing Flight MH370 was flown off course deliberately – and the culprit was inadvertently helped
12 Mar 2015 - 10:19 am | श्रीरंग_जोशी
एक वर्षानंतरही MH 370 च्या शोधात यश मिळण्याचे चिन्ह स्पष्टपणे दिसत नाहीये.
याचसारख्या दुर्दैवी विमान अपघातांचा आढावा खालील लेखात घेण्यात आला आहे ज्यांत अवशेषांचा शोध कधीच लागला नाही.
No answers: Missing Flight 370 just one of dozens of vanished planes
24 Mar 2015 - 4:31 pm | भुमन्यु
अजुन एक अपघात: एअर बस ३२० विमान दक्षिण फ्रान्सच्या आल्प्स भागात दुर्घटना ग्रस्त. विमानात १४२ प्रवासी व ६ कर्मचारी होते. दुवा
6 Aug 2015 - 5:08 am | गवि
.सतरा महिन्यांनंतर पहिला अवशेष सापडला.मादगास्कर बेटांजवळच्या रीयुनियन आयलंड्स या फ्रेंच बेटांवर वाहात आलेला फ्लॅपरॉन हा पार्ट एमएच३७०चा असल्याचं आज अधिकृतरित्या जाहीर झालं.
http://www.bbc.com/news/world-asia-33798195
..या तुकड्यावरुन आता मूळ क्रॅश लोकेशन सापडणं अशक्य वाटतंय..मूळ कारणही.
.नष्ट झालं इतकं नक्की झालं केवळ.
6 Aug 2015 - 7:13 pm | विकास
विंडोज् , कुशन्स पण सापडल्या :(
6 Aug 2015 - 9:55 pm | अर्धवटराव
कि मुद्दाम तिथे सापडावं अशी तजवीज करण्यात आलि ?? :(
6 Aug 2015 - 11:55 pm | विकास
कुशन्स आणि विंडोज् म्हणत असाल तर तसे वाटत नाही. बाकीचे पार्ट पण तिथे मुद्दामून आणून ठेवणे केवळ मलेशियाला जमू शकेल असे वाटत नाही. आणि इतरांनी मदत करण्याइतकी इंटरनॅशनल कॉन्स्पिरसई करणे गोपनियता ठेवण्यासाठी अवघड होऊ शकले असते.
एक (गंमतशीर म्हणता येत नाही म्हणून) विचित्र प्रकारः त्यांना म्हणे तो पार्ट ७७७ चा आहे हे कळले तरी तो मलेशियन विमानाचाच आहे का याची खात्री करून घेयची होती. पण आजपर्यंत एक MH270 सोडल्यास दुसरे कुठलेच ७७७ हरवलेले नाही!
3 Mar 2016 - 4:09 pm | मंदार कात्रे
http://www.hindustantimes.com/world/mh370-traced-high-possibility-mozamb...
3 Mar 2016 - 4:53 pm | गवि
ला रियुनियन बेटांवरही सापडला होता एक भाग. मोझांबिकमधेही एकच तुकडा सापडलाय बहुधा.
रियुनियनवाल्या तुकड्यालाही असंच परीक्षणांसाठी पाठवलं. हाही पाठवतील. काळ जातोच आहे. प्रत्यक्ष उकल कितपत होतेय ते बघूया.
4 Mar 2016 - 4:02 am | श्रीरंग_जोशी
या बातमीतला ब्लेन गिब्सन हा माणुस गेल्या एक वर्षापासून स्वखर्चाने या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष शोधत फिरत आहे.
Tourist who found debris was searching for MH370
18 Jan 2017 - 4:06 pm | अत्रन्गि पाउस
http://beta1.esakal.com/global/three-year-search-malaysia-airlines-fligh...२६६४०
19 Jan 2017 - 3:45 pm | माझीही शॅम्पेन
सर्व मृत व्यक्तींना श्रद्धांजली. __/\__
नियती पुढे काही चालत नाही
16 Aug 2023 - 1:40 pm | हणमंतअण्णा शंकर...
मित्रहो,
हा धागा वर काढतो आहे.
इच्छुक व्यक्तीनी पुन्हा सर्व घटनाक्रम वाचावा म्हणून.
16 Aug 2023 - 1:49 pm | हणमंतअण्णा शंकर...
Video 1 - FLIR Footage: https://youtu.be/bpiFfp-0abI?t=68
Video 2 - Satellite Perspective: https://www.youtube.com/watch?v=KS9uL3Omg7o
Side-by-side comparison of both videos: https://imgur.com/p7NMOTX
Original video via Wayback machine:
http://web.archive.org/web/20140525100932/http://www.youtube.com/watch?v...
काही दिवसांपूर्वी हे पूर्णपणे विस्मृतीत गेलेले व्हिडिओ खोदून वर काढले गेले आहेत.
हे व्हिडिओ डिबंक करायला जितकं अधिक खोलात जाऊ तितकं जटील होत आहे. इतकं की हे व्हिडिओ एकतर जगातील बेस्ट होअक्स आहे किंवा निखळ ढळढळीत वर्स्ट सत्य!!! दोनच शक्यता. जर हे बेस्ट होअक्स असेल तर ज्या कुणी हे व्हिडिओ डॉक्टर केले आहेत ती व्यक्ती अल्ट्रा लेव्हल जिनियस म्हणावी लागेल.
लवकरच मी या दिवाळी अंकात यावर विस्तृत लेख लिहित आहे. सध्यातरी मी केवळ थक्क झालो आहे.
16 Aug 2023 - 2:27 pm | गवि
व्हिडिओ संभ्रमजनक आहेत. पण फेक असण्याचा संशय दाट होण्यासाठी काही मुद्दे कारणीभूत ठरत आहेत.
१. विमानाच्या नाकाचा आकार आणि व्हरटिकल स्टाबिलयझरचा स्लोप, आणि इंजिन प्लेसमेंट यावरून कोणते तरी एक "बोईंग" कंपनीचे विमान आहे इतके दिसते आहे.
पण योगायोग इथे संपतो.
२. पहिल्या व्हिडिओ बाबत: तो स्थिर जागेवरून / stable perspective ने चित्रित केलेला आहे. ज्या प्रकारे विमानाचा आकार आणि पूर्ण वळसा दिसतो त्यानुसार जर खरोखर हे शूटिंग आकाशात केलं गेलं असेल तर ते किमान काही किलोमीटर दुरून केलं गेलं आहे. अशा वेळी एक बूम टाइप शॉक वेव्ह इतक्या दूरवर आणि थेट कॅमेऱ्यावर येणे हे अत्यंत कृत्रिम वाटत आहे.
३. दुसऱ्या व्हिडिओ बाबत. हा साटेलाईट perspective म्हटला गेला आहे. पण विमानाचे पृष्ठभाग आणि त्यांचे orientation पाहता तो व्हिडिओ विमानाच्या खालून शूट केला गेला आहे. पहिल्या व्हिडीओत अंधारातील चित्रीकरण आहे. म्हणजे विमान त्या वेळी अंधारात होते. अशा वेळी एखादा उपग्रह जरी सूर्यप्रकाशात असेल तरी विमानाचे चित्रण अंधारातच असले पाहिजे होते आणि ते इतके स्पष्ट (resolution नव्हे, प्रकाश या दृष्टीने) नसले पाहिजे.
दुसऱ्या व्हिडीओत विमान गायब होतानाचा चमकता स्फोट हा अगदीच रामानंद सागर रामायण टिव्ही सीरिज बाणांचे युद्ध स्पेशल इफेक्ट लेव्हलला गेला आहे.
या दोन व्हिडीओत असलेले केवळ perspective चे सातत्य पाहता ती एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये तयार केली गेलेली रील वाटते. आणि त्यामुळेच त्यात पॅच वर्क किंवा पिक्सेल अनियमितता सापडू शकत नसावी.
अर्थात यात तथ्य आढळल्यास खूप मदत होईलच काय गूढ आहे त्याचा शोध लावण्यात.
आणखी एक. मूळ व्हिडिओ जर मार्च १४ मधेच आला होता आणि समजा कोणीतरी सरकार / लष्कर पातळीवर तो काढून टाकला, तर मग आर्काइव्ह डॉट ऑर्ग वरून cached कंटेंट न काढून टाकणे अगदीच दूधखुळेपणाचे वाटते.
16 Aug 2023 - 2:28 pm | गवि
ता.क. दिवाळी अंकातील लेखाबद्दल उत्सुकता आहे. वाचनीय असेल.
16 Aug 2023 - 6:05 pm | हणमंतअण्णा शंकर...
हा सुपरइंपोज केलेला फोटो.
![c](https://preview.redd.it/47qajo44ehhb1.jpg?width=904&format=pjpg&auto=webp&s=b767e8c8466693cea14ff5f238f3b211a3b2c375)
सॅटेलाईट नेमके काय असावे यावर खूप खल झाला आहे.
क्रॉप केलेला व्हिडिओ असल्याने त्यात सॅटेलाईटचे नाव अर्धेच आले आहे. तरीही ते बहुतेक NROL-22 असावे असा कयास आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे मूळ व्हिडिओ हा स्टेरिओस्कोपिक थ्रीडी असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार NROL-22 हा फक्त रिले सॅटेलाईट म्हणून वापरला आहे असे ध्यानात येते. म्हणजे मूळ व्हिडिओ एक किंवा दोन इतर सॅटेलाईटनी घेतलेला आहे. कदाचित SBIRS-GEO 1 (aka USA 230) or SBIRS-GEO 2 (aka USA 241). किंवा USA-184 आणि USA-200 असण्याची देखील शक्यता आहे.
अंधाराबाबत पुन्हा संदिग्धता आहे. यावर अजून काही स्पष्ट अॅनालायसिस आलेले नाही.
हा थर्मल व्हिडिओ एका मिलीटरी ड्रोन ने घेतलेला आहे. मूळ व्हिडिओ ग्रेस्केल असण्याची शक्यता आहे. MQ-1C Gray Eagle
त्यात अनियमितता आहे. पण ती का आहे हे ताडायला गेले तर व्हीएफएक्स वाल्यांनी यावर प्रचंड म्हणजे प्रचंड मेहनत घेतलेली दिसतीय. कारण व्हिडिओ कशाचे आहेत हे जर पाहिले तर व्हीएफएक्स वाल्यांना काय सिम्युलेट करावं लागतंय हे पाहा.
१. ३डी लेयर
२. स्पाय सॅटेलाईट रेकॉर्डिंग
३. रिले सॅटेलाईट डिटेल्स
४. 6fps ने एका मोठ्या क्षेत्रफळावर नॅव्हिगेशन
५. हा मोठा व्हिडिओ पॅन करायला कर्सर हलवणे दाखवायला कस्टम सॉफ्टवेअर
६. रिमोट डेस्क्टॉप स्ट्रीम वेगळ्या रिझॉल्युशनला
७. त्याचे स्क्रीन कॅप्चर
मूळ व्हिडियोला तसेही फार लोकांनी पाहिले नव्हते. ते अजूनही तसेच आहेत. आर्काइव्ह वरुन सहजासहजी कंटेट काढता येतो का ते माहित नाही. कदाचित तसा प्रयत्न झाला देखील असेल.
परंतु एक लक्षात घेतले पाहिजे. युएसेस निमित्ज चा फ्लिर व्हिडिओ २००८ च्या दरम्यान लीक झाला होता. तेव्हाही तो फेक आहे असे लोक सांगत होते. न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्धी देताना पेंटॅगॉन ने जवळ जवळ साताठ वर्षांनी व्हिडिओ लीक खरे आहेत असे मान्य केले. त्यामुळे आपण काहीही सांगू शकत नाही.
मलेशियन एअरफोर्स चीफ रोदझाली यांनी ' unidentified blobs on military radar ' पाहिल्याचे सांगितले आहे.
कदाचित ते तितकंच क्रॅपी असू शकेल. नाहीतर व्हिज्युअलचा बाप माईस्त्रो Guillermo del Toro त्याने पाहिलेल्या तबकडीवर म्हणालाच आहे : त्याच्याच शब्दात : "It was horribly designed. It was a flying saucer. So clichéd, with lights going like this. It’s so sad. I wish I could reveal they’re not what you think they are. They are what you think they are." हा हा हा.
16 Aug 2023 - 6:18 pm | हणमंतअण्णा शंकर...
अजूनएक म्हणजे, विमान गायब होण्याआधी तापमान कमी करणे, ऑर्ब फिरताहेत ते पूर्ण ३डी गोलाकार (निव्वळ एकाच प्रतलात फिरणे नव्हे) फिरणे, त्यांच्या तापमानातले फरक दाखवणे इत्यादी इत्यादी.. दोन्ही व्हिडीओ वेगवेगळ्या काळात अपलोड केलेले आहेत.
सॅटेलाईट्सचा अभ्यास, विमानाच्या एअरोडायनॅमिक्सचा अभ्यास, वरती व्हीएफएक्सचा अभ्यास म्हणजे कुण्या एका व्यक्तीचे काम नाही. गायब होताना अगदी ढगांवर पाठीमागून रिफ्लेक्ट झालेला लाईट असो, किंवा लहा छिद्र असोत, अगदी बारीक बारीक तपशीलही सोडले नाहीत!! इतक्या बारीक गोष्टींचा विचार करणार्याला अगदी अदभुत टेलिपोर्ट दाखवता आलाच असता की!
त्यामुळे मला स्पेशल इफेक्ट स्पेशलच असावा असे वाटत नाही.
16 Aug 2023 - 2:08 pm | टर्मीनेटर
🙏
(आधी पाहिला नसल्यास) National Geographic चा MH370 विषयक Malaysia Airlines (Full Episode) | Drain the Oceans हा व्हिडीओ पण पाहुन घ्या असे सुचवतो, चांगली माहिती आहे त्यात.
नॅशनल जिओग्राफिकची 'ड्रेन द ओशन्स' ही माझी आवडती मालिका आहे.