व्हर्गा हा पावसाचा एक प्रकार आहे.. तो जमिनीवर पोचण्याआधीच वाफ होऊन नाहीसा होतो.
व्हर्गासारखं हवेत नाहीसं झाल्याचा भास देणारं मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग विमान. सगळेजण या विचित्र घटनेविषयी सर्वत्र वाचत आणि ऐकत आहेतच. तरीही काही इतर नाही तरी महत्वाच्या वाटणार्या गोष्टींची एक यादीच का होईना, पण बनवण्यासाठी टंकणं अनिवार झालं.
या फ्लाईटसाठी वापरलेलं विमान म्हणजे बोईंग ७७७ - २०० ई आर. (777-200ER)
ER म्हणजे एकस्टेंडेड रेंज. लांब प्रवासासाठी जास्ती अंतर एका दमात पार करता यावं म्हणून जास्त कपॅसिटीचे फ्युएल टँक्स बसवलेलं. नेहमीच्या 777-200 पेक्षा जवळजवळ चौपन्न हजार लीटर जास्त एव्हिएशन ग्रेड केरोसीन नेण्याची क्षमता. एकूण फ्युएल टँक साईझ एक लाख सत्तर हजार लीटर्सच्या वर.. आणि फुल टँकसहित नॉन स्टॉप उड्डाण चौदा हजार तीनशे किलोमीटर्स, सुमारे.
जास्तीतजास्त टेकऑफ वेट दोन लाख सत्याण्णव हजार किलो म्हणजे जवळजवळ तीनशे टन.
१९९ फूट विंग स्पॅन आणि २०९ फूट लांबी.
हे सर्व वरवरचं झालं. पण याच्या आतल्या सिस्टीम्स ?!
फोटो आभारः विकीमीडिया
बोईंग 777 सीरीजचं हे विमान हवेत अचानक बिघाड होऊन तत्क्षणी कोसळणं हे जवळजवळ अशक्य आहे. यामधे फार फार उच्च दर्जाच्या सिस्टीम्स आहेत. बाकी विमानाची अंतर्गत सुरक्षितता, एका कंट्रोलचं किंवा पार्टचं काम बंद झालं तर अन्य योजना, वायरींची गुंतागुंत टाळणारी आधुनिकता, कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम मॅनेजमेंट हे सर्व बाजूलाच ठेवू.
त्याखेरीज अनेक संपर्काचे मार्ग या विमानाच्या पायलट्सकडे होते:
-रेडिओवर बोलून कंट्रोल टॉवर आणि मार्गावरच्या अन्य फ्लाईट कंट्रोल सेंटर्सशी संभाषण करण्याचा कॉमन चॅनेल. हा सर्व सेंटर्स आणि परिसरातल्या सर्व विमानांना एकत्र ऐकू येतो. नथिंग पर्सनल अबाउट इट.
-याखेरीज किमान एक खाजगी चॅनेल, पायलट आणि क्रूला आपल्या एअरलाईनच्या ऑफिसशी आणि आपल्या स्वतःच्या ग्राउंड इंजिनियर्सशी बोलण्यासाठी.
बोलण्याचा मार्ग बंद झाला तरी आणखी पर्याय उरतातः
- रडार - प्रायमरी- प्रायमरी रडार हवेत सिग्नल्स पाठवून ते जिथे अडून परत फिरतील त्या त्या ठिकाणी विमाने आहेत असं ओळखतं.यासाठी विमानात काहीही खास उपकरण असण्याची गरज नाही.
- रडार - सेकंडरी- सेकंडरी रडारमधे विमानातही एक ट्रान्सपाँडर असतो. तो विमानाच्या ठिकाणाची माहिती उलट ट्रान्समिट करत राहतो. त्यामुळे रडारच्या डिस्प्ले स्क्रीनवर विमानाचं नाव, जमिनीपासून उंची, अन्य स्टेटस दिसत राहतं. याच ट्रान्सपाँडरमधून पायलट एक शब्दही तोंडाने न बोलता कॉपपिटवरची बटनं फिरवल्यासारखी करुन नकळत वेगवेगळे कोडस सेट करुन गुपचुप रडारवर आपले मेसेजेस पाठवू शकतो. याला ट्रान्स्पाँडर स्क्वॉक / स्क्वॅक को़ड्स म्हणतात उदा. 7500 सेट केला तर "हायजॅक" असा टॅग विमानतळाच्या रडार स्क्रीनवर विमानाच्या ठिपक्यालगत चमकायला लागतो. 7600 सेट केला तर "आमचा रेडिओ बंद पडला आहे".
- आकार्स ( Aircraft Communications Addressing and Reporting System ) - ही रेडिओ सिस्टीम सर्व महत्वाच्या फ्लाईट इव्हेंट्सच्या वेळी विमानतळाकडे माहिती पाठवत राहते. हे एकतर्फी प्रक्षेपण नाही, तर विमानतळावरुन कंपनी बदललेल्या हवामानाप्रमाणे बदललेला फ्लाईट प्लॅन विमानाच्या सिस्टीममधे या आकार्समार्फत थेट अपलोड करु शकते. शिवाय गरज पडली तर विमानाच्या कंट्रोल्स आणि इंजिनच्या आख्खा स्टेटस लॉग डाऊनलोडवू शकते.
MH370च्या नाहीश्या होण्यातला सर्वात विलक्षण भाग म्हणजे वर म्हटलेल्या या कम्युनिकेशन सिस्टीम्सपैकी एकातर्फेही कोणताही दुरित सिग्नल न येता हे विमान जागीच वाफ व्हावी तद्वत विरलं असं चित्र उभं राहिलं आहे.
बोईंग ७७७ २०० ईआर या विमानाची रोल्स रॉईस इंजिन्स आणि त्यांची कंट्रोल सिस्टीम / एअरफ्रेम पाहिली तर एक गोष्ट नक्की आहे की रिकव्हरीला किंवा संपर्काला अजिबात वाव न देण्याइतकं तातडीचं आणि संपूर्ण फेल्युअर या विमानात होणं तर्कदृष्ट्या अशक्य आहे. कोणतीही महत्वाची सिस्टीम, इतकंच काय, अगदी इंजिन जरी डॅमेज झालं.. दोन्ही इंजिन्स बंद पडली तरी हे विमान ग्लाईड करत बराच काळ हवेत उडत राहू शकतं. या वेळात जमिनीकडे झेपावत राहणं अपरिहार्य असलं तरी हा खाली येण्याचा वेग नियंत्रित करुन खूप लांब पल्ला गाठता येतो. निदान जवळात जवळच्या विमानतळावर, आणि किमान आलो तिथे (क्वालालंपूर) परत जाण्याइतका अवसर इथे नक्कीच मिळायला हवा. आणि अशा वेळी रेडिओवर (ज्यांना वेगळा पॉवर सप्लाय असतो) संभाषण करुन आपली हालहवाल सांगता यायला हवी.
जर विमानाची फ्रेम / पंख / शेपूट इत्यादि तुटून विमान कोसळलं तर ते जवळच तिथल्यातिथे खाली पडतं आणि त्यामुळेच त्याचे अवशेष थोड्याश्या मर्यादित एरियात ढिगार्याच्या रुपात दिसतात. आणि जमिनीवर कोसळो अथवा समुद्रात, असे एकत्रित असलेले अवशेष दिसणं फार सोपं असतं.
या बाबतीत मात्र असे अवशेष दिसलेलेच नाहीत. जे दिसले ते विमानाचे नसल्याचं सिद्ध झालं.
वरचं सर्व कम्युनिकेशन सोडा, विमान कोसळल्यानंतरही त्याचा ब्लॅक बॉक्स खुद्द पडल्या जागेवरुन स्वतःच्या रेडिओमार्फत डिस्ट्रेस सिग्नल ट्रान्समिट करत राहतो. शिवाय ऐकू येतील असे आवाजी सिग्नल्सही फेकत राहतो.. किमान काही दिवस.. अगदी पाण्याखालूनही.. हे आवाजी सिग्नल अर्थातच फार दूर जात नाहीत.. पण रेडिओ सिग्नल तुलनेत सहज मिळतात. यावरुन तो ब्लॉकबॉक्स कुठे आहे ते शोधायला मदत होते.
कोणताही मागमूस न ठेवता हे दोनशे एकूणचाळीस जिवांना घेऊन अंधारात झेपावलेलं अजस्त्र यंत्र डोळ्याआड गेलं, आणि तीन दिवस झाले तरी कोणाला कसलाच अंदाज येत नाहीये.
रडारच्या रेकॉर्डवरुन हे विमान नाहीसं होण्यापूर्वी क्वालालंपूरकडे उलट फिरलं असल्याची लक्षणं दिसली आहेत.
अधिकृतरित्या आणि निश्चित कोणीच सांगू शकत नाहीये की नेमकं काय झालंय. पण जे दिसतंय त्यावरुन फार थोड्या शक्यता उरतातः
शक्यतासंच एकः
- जे काही झालं ते फार वेगाने आणि क्षणार्धात झालं आहे.
- विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट). त्यामुळे एका जागी अवशेष एकवटलेले नाहीत.
- अर्थातच यामुळे पायलट्सना बोलण्याची संधी न मिळणं आणि सर्व चॅनेल एकदम बंद होणं हेही यात एक्सप्लेन होतंय. (रडार सिग्नल, अन्य उपरोक्त सिग्नल्स एकदम थांबणं)
- हे सर्व प्रचंड तीव्र स्फोट किंवा तत्सम टार्गेटेड हल्ल्यामुळे होऊ शकतं. विमानातल्या आपोआप उद्भवणार्या दोषामुळे नाही.
शक्यतासंच दोनः
-या दुबळ्या शक्यतेनुसार विमान अद्याप सहीसलामत असेल हायजॅक झालं असेल. धाकाने सर्व कम्युनिकेशन (ट्रान्सपाँडर, रेडिओज इत्यादि)बंद करुन पायलटवर बलप्रयोग केलेला असू शकतो, किंवा स्वतःकडे फ्लाईटचा ताबा घेऊन एखाद्या अज्ञात ठिकाणाकडे अत्यंत कमी उंचीवरुन उडवत (प्रायमरी रडारपासून सुटका) घेऊन जाणे असा प्रकार झालेला असू शकतो. हे ठिकाण बर्यापैकी लांब असलं तरी एक्स्टेंडेड रेंज फ्युएल टँक्सचा इथे हायजॅकर्सना फायदा होऊ शकतो.
पण कोणत्याही मार्गाने थांगपत्ता लागू न देता इतकं अजस्त्र धूड कुठेतरी नेऊन लपवणं हे अशक्य नसलं तरी बरंच अवघड आहे. यासाठी असं कृत्य करणारा इसम विमानविषयक सर्व शास्त्रांमधला पोचलेला माणूस असायला हवा.
या थिअरीप्रमाणे विमान अपेक्षित ठिकाणापासून दूर गेलेलं असणं हा अँगल एक्सप्लेन होतो.
कदाचित दोन्ही शक्यतांचं कॉम्बिनेशनही असू शकेल.. म्हणजे मूळ फ्लाईटपाथकडून भरकटवून हे विमान पळवून नेण्यात येणं आणि कुठेतरी दूर अनपेक्षित जागी पोचून फ्युएल स्टार्व्हेशनने कोसळणं.. अर्थातच सध्या जिथे शोध चालू आहे तिथे ते नसू शकेल.
.........
जोपर्यंत हाती काही लागत नाही तोपर्यंत केवळ अंदाजाखेरीज कोणीच काही करु शकत नाही.
या सर्व वाईट प्रकाराला जो मानवी अँगल आहे त्यात मी फार शिरत नाही कारण तो मनात अत्यंत खळबळ करणारा प्रकार आहे. ते सर्व वाट पाहणारे नातेवाईक.. तीन दिवस लाल अक्षरात MH 370 च्या पुढे सतत "Delayed" असं फ्लाईट स्टेटस दाखवणारा तो बैजिंग विमानतळावरचा बोर्ड.. आणि खरंच फ्लाईट उशीरा येत असल्याचं स्वतःला बजावत बसलेले सर्व प्रवाश्यांचे ते आप्तेष्ट.
केवळ पार्थिव देह दिसला नाही, म्हणून आशा सोडता सोडवत नसलेले अत्यंत अभागी जीव.
आपण त्यात नाही हा केवळ योगायोग.. यू नेव्हर नो.
फोटो आभारः विकीमीडिया.
प्रतिक्रिया
13 Mar 2014 - 1:25 pm | आनन्दा
इतके सोपे नाही ते. जीपीएस विदा पाठवणे म्हणजे प्रायव्हसी चा भंग होउ शकतो..
13 Mar 2014 - 4:59 pm | माहितगार
रोल्स रॉईसकडे इंजिनाचा डाटा जातो वगैरेची कल्पनाच नव्हती. इंजीनाचा मॅन्युफॅक्चर असला तरी अशा पद्धतीने डाटा मॅन्युफॅक्चरने परस्पर मागवणे डाटा लिंकेज स्थापणे कितपत रास्त समजावे. एखाद्या देशाच्या उच्चपदस्थ व्यक्तिच्या विमानाचे इंजीन किती तास चालू होते ह्याने फारशी रिस्क नाही पण ऑपोजीट प्रकारचा डाटा लिंकेज करून विमानांची इंजिने नियंत्रित करणे उपग्रहाच्या स्टाईल मध्ये तांत्रिक दृष्ट्या अशक्य नसेल पण सुरक्षेच्या दृष्टीने कशा प्रकारचे परीणाम असू शकतात असा प्रश्न मनात उपस्थित होतो आहे.
अर्थात मूळ विमान हरवल्याच्या प्रश्नापुढे उपरोक्त प्रश्न सध्यातरी गौणच समजावा लागेल.
14 Mar 2014 - 12:21 pm | मराठीप्रेमी
कदाचित परस्पर नसावे, म्हणजे विमाने विकताना जे काही कॉन्ट्रॅक्ट केले असेल त्यात याचा उल्लेख असेल असे वाटते.
13 Mar 2014 - 2:22 pm | चिरोटा
खाली म्हंटल्याप्रमाणे MH370 मधून डेटा दोनदा आला आहे,टेक ऑफच्या वेळी व बीजिंगच्या दिशेने जाताना.हा डेटा उपग्रहामार्फत रोल्स रॉईसकडे जातो. या शिवाय दर अर्ध्या सेकंदाला हवेतील विमाने आपले co-ordinates जमीनीवर transponder मार्फत पाठवत असतात.
MH 370
13 Mar 2014 - 2:30 pm | प्रभाकर पेठकर
वाचतो आहे. पण एकूणच सर्व प्रकार डोके सुन्न करणारा आहे. गविंचे अपडेट्स महत्वपूर्ण आणि त्यांच्या अनुभवामुळे विश्वासार्ह आहेत.
एवढ्या गंभिर प्रसंगात, २३९ प्रवाशांच्या नातेवाईकांची मनःस्थिती आणि दुर्घटनेची शक्यता लक्षात घेऊन उथळ प्रतिक्रिया टाळाव्यात ही विनंती.
13 Mar 2014 - 4:57 pm | वेताळ
लिहल्याप्रमाणे अचानक तयार झालेल्या कृष्णविवरातुन प्रवास करुन हे विमान गायब झाले असावे काय? पाण्यात विमानाची इंजिन सुरु रहाणे शक्य नाही.बाकी आपण सर्व कल्पना व्यक्त करु शकतो.
13 Mar 2014 - 7:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
अतिशय दुर्दैवी घटना. प्रवासी आणि त्यांचे नातेवाईक यांना शुभेच्छा देण्याशिवाय आपल्या हातात काही नाही.
या धाग्यामुळे आणि मेडियातल्या बातम्यांमुळे बरीच माहिती मिळत आहे.
14 Mar 2014 - 11:13 am | आनन्दा
हे पहा
14 Mar 2014 - 11:59 am | सचिन कुलकर्णी
मागे गविंनी अशाच एका अपघाताची कहाणी सांगितल्याचे आठवते.
14 Mar 2014 - 12:00 pm | सचिन कुलकर्णी
ए ऐवजी एक वाचावे
14 Mar 2014 - 12:04 pm | आनन्दा
गविंचे मत घेणेच योग्य..
14 Mar 2014 - 12:45 pm | गवि
केबिन प्रेशर अचानक शून्य होण्याचे कारण घेऊन त्या बेसिसवर तर्क लावले जात आहेत. ही एक सर्वाधिक शक्यतांपैकी असलेली थिअरी आहेच. विमान ३५ हजार फुटांवर उडताना बाहेरील हवेचे अत्यंत कमी प्रेशर आणि त्याहून अत्यंत कमी ऑक्सिजन लेव्हल ही मानवी शरीराच्या दृष्टीने तात्काळ मारक आहे. अशा वेळी अचानक पूर्ण कॅबिन प्रेशर नष्ट झालं तर साधारण ६ सेकंदांचा "यूजफुल कॉन्शसनेस" म्हणजे काही विचार करुन अॅक्शन करण्याइतकी शुद्ध लाभते. त्यानंतर कन्फ्युजन आणि बेशुद्धी, मग कोमा आणि मृत्यू. या सुरुवातीच्या सेकंदांच्या काळात पायलटला ऑक्सिजन मास्क लावता आला नाही तर पुढे तो लावण्याइतके को ऑर्डिनेशन त्याच्याकडे राहात नाही (म्हणूनच विमानात इतरांना मदत करण्यापूर्वी स्वतःचा मास्क आधी लावा असं सांगतात.)
हळूहळू केबिन प्रेशर लॉस झाला तर पायलट्सना ते स्वतः हळूहळू बेहोष / बेभान होताहेत हे कळतच नाही. हळूहळू ऑक्सिजन लेव्हल घटत जाते. पायलट्स असंबद्ध वागतात इत्यादि.
या केसमधे अचानक केबिन प्रेशर लॉस झाला असं गृहीतक (किंवा काही मार्गाने पक्की माहिती ?!) धरुन पायलटला काही सेकंदच अॅक्शन करायला मिळाली असं समजून त्याने काय केलं असेल याचं गृहीतक (किंवा काही मार्गाने पक्की माहिती?!) मांडून त्याच्यापुढे विमान ऑटोपायलटवर शेवटच्या ट्रॅजेक्टरीत जात राहिलं आणि इंधन संपून कोसळलं अशी थिअरी धरली गेली आहे.
आता ती ट्रॅजेक्टरी नेमकी मादागास्करच्या दिशेनेच होती आणि शेवटी विमान नेमके मादागास्करनजीक कोसळले असा अंदाज व्यक्त करताना अमेरिकन सूत्रांनी त्यांच्याकडे तसे क्लूज आहेत याखेरीज काहीच पक्की कारणमीमांसा / पुरावे दिले नसल्याने पुढे काही बोलता येत नाही.
पण इतका प्रचंड खर्च करुन आपली विनाशिका बोट आणि हेलिकॉप्टरे त्या मूळ ठिकाणापासून इतक्या दूरच्या ठराविक ठिकाणी डिप्लॉय करण्याचा अमेरिकेचा निर्णय अनमानधपक्याने असेल असे वाटत नाही.
15 Mar 2014 - 10:07 am | सुबोध खरे
एक छोटी पुरवणी -- साधारण ३५००० फुटावर उडताना युजफुल कॉन्शसनेस हा अर्धा ते एक मिनिट असतो . तोच पन्नास हजार फुटावर ६-ते १० सेकंद इतका कमी असतो. ३५-३६००० फुट हि उंची साधारण विमानासाठी उत्तम समजली जाते कारण कमी उंचीवर हवेचा रोध जास्त असतो आणी वातावरणातील असमतोल यामुळे विमान धक्के खाते. उंची जितकी जास्त तितका हवेतील ऑक्सिजन कमी होत जातो त्यामुळे विमानाच्या इंजिनाची कार्यक्षमता कमी होत जाते. हा युजफुल कॉन्शसनेस जेंव्हा लष्करी विमान (उदा मिग २९ किंवा सुखोई ३०) एकदम सरळ(VERTICAL ASCENT) वर चढते तेंव्हा फार महत्त्वाचा ठरु शकतो. गवी साहेब यावर जास्त चांगले भाष्य करू शकतील. .
15 Mar 2014 - 12:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जेट ईंजिन, टर्बो किंवा सुपरचार्ज्ड ईंजिन्स काँप्रेसर च्या तत्वावर काम करतात. जेट ईंजिनांमधे आत घेतलेली हवा वेंचुरी ईफेक्ट नी काँप्रेस केली जाते. काँप्रेस केल्यामुळे हवेची घनता वाढते, अर्थातच हेवेतील ज्वलनशिल प्राणवायुचे प्रमाण वाढते. ह्यामुळे उंचीचा आणि त्यामुळे बदलणार्या प्राणवायुचं प्रमाणाचा ईंजिनावर होणारा परिणाम कमी होतो आणि ईंजिनाची ताकद आणि कार्यक्षमता वाढते.
आणि एक प्रश्ण.
केबिन प्रेशर कमी होताना बाकीची काही वैद्यकीय ल़क्षणे दिसतात का? जसे की डोकं दुखणं, चक्कर येंणं, मळमळण, नाकातुन अथवा कानातुन अचानक रक्त येणं किंवा रक्तदाब ई.
15 Mar 2014 - 12:40 pm | सुबोध खरे
साहेब,
सर्वच जेट विमाने हवा दाबून इंजिनात ढकलतात. त्यामध्ये जमिनीच्या पातळीला हवेचा दाब जास्त असतो पण हवेचा रोद्धी जास्त असतो जितकी उंची तुम्ही वाढवता तितका हा रोध कमी होतो परंतु एका विशिष्ट उंचीनंतर हवेतील ओक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने हवा जास्त दाबली तरीही इंधन आणी हवेचे मिश्रण यात ऑक्सिजन कमी होऊन इंधन अर्धवट जळते आणी इंधन फुकट जाते
आम्हाला हवाई वैद्यकशास्त्र शिकवताना असे सांगितल्याचे आठवते कि प्रवासी विमाने साधारण ३५ ते ३६ हजार फुट उंचीला उडवतात यात हवेचा रोध कमी आणी ओक्सिजनचे प्रमाण वाजवी असते त्यामुळे इंधनाची सर्वात जास्त काटकसर होते.
अवांतर :- लष्करी विमाने हि याहून जास्त उंचीवरून उडू शकतात. मिग २५ तर ८५००० फुटावरून उडू शकत असे आणी ते क्षेपणास्त्रापेक्षाही जास्त वेगाने जात असे (३. २ MACH) .(MIG 25 CAN OUTRUN A MISSILE) .
15 Mar 2014 - 11:29 pm | भटक्य आणि उनाड
मिग २५ चा रेकोर्ड आहे फ्लोन अबोव्ह १,००,००० फीट...
14 Mar 2014 - 12:12 pm | सुनील
गूढ वाढतच चालले आहे.
बर्याच वर्षांपूर्वी असेच एक विमान दक्षिण अमेरीकेतील अँडीज पर्वतरांगात कोसळले होते. परंतु, त्यातील काही व्यक्ती जिवंत राहिल्या होत्या. बर्याच काळानंतर शोधपथकाला त्यांचा शोध लागला होता.
15 Mar 2014 - 5:11 am | आत्मशून्य
खायप्याय्ची व्यवस्था नाही, अपघात झालेला दिसला नाही, अपहरणाची जबाबदारी नाही,
रडार वरून गायब झाल पण रोल्स रोइसलामात्र डेटा ट्रांसमीट होत होता ... कमाल आहे कुछ तो गड़बड़ है दया.... कालिंग 221b बेकर रस्ता.
15 Mar 2014 - 10:26 am | मराठीच
आगाऊ एप्रिल फुल करतायत काय?
15 Mar 2014 - 11:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गविंची उत्तम माहितीपूर्ण लेखन आणि प्रतिसाद. सर्व प्रवाशी सुरक्षित असावेत, राहावेत अशा प्रार्थनेशिवाय दुसरं काय करु शक्यतो. :(
-दिलीप बिरुटे
15 Mar 2014 - 12:01 pm | सुहास झेले
मटा ऑनलाइन वृत्त । क्वालालंपूर
मलेशिया एअरलाइन्सच्या बेपत्ता विमानाला अपघात झालेला नसून त्याचं अपहरण झाल्याची दाट शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. विमानाची सर्व संपर्क यंत्रणा बंद करून त्याचं अपहरण केलं असल्याचा अंदाज मलेशिया सरकारनं व्यक्त केला आहे. त्यामुळे विमानातील सर्व प्रवाशी जिवंत असल्याचं बोललं जातंय.
मलेशियन विमानाच्या अपहरणाबाबत आजूनपर्यंत कुठल्याही मागण्या समोर आलेल्या नाहीत. तसंच हे विमान नेमकं कुठे आहे, याचाही पत्ता लागलेला नाही, असं मलेशियाच्या एका अधिकाऱ्यानं नाव न घेता स्पष्ट केलं. विमानाचं अपहरण झाल्याचा प्रकार फार काळ लपवता येऊ शकत नाही, असंही तो म्हणाला.
बेपत्ता विमानाचा उड्डाणानंतरचा प्रवास पाहता ते रडावर येऊ नये म्हणून या विमानाची सर्व संपर्क यंत्रणा बंद करण्यात आली आहे. त्यामुळेच या विमानाला अपघात झालेला नाही तर त्याचं अपहरण करण्याच आलं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
बेपत्ता विमानाचं अपहरण !
15 Mar 2014 - 12:02 pm | सचिन कुलकर्णी
मलेशियाच्या शोधपथकाने (अधिकृतपणे) विमानाचे अपहरण झाले असू शकते असे सांगितले आहे.
15 Mar 2014 - 12:18 pm | सचिन कुलकर्णी
Malaysian PM Razak on MH370: Based on new data, location of last communication was at possibly at border of Kazakhstan and Turkmenistan.
15 Mar 2014 - 1:58 pm | किसन शिंदे
गविंचा माहीतीपूर्ण धागा आणि आलेल्या प्रतिसादांतून बरंच काही नविन वाचायला मिळालं. सध्या काही नविन माहीती मिळाली आहे का या विमानासंदर्भात??
15 Mar 2014 - 6:45 pm | माहितगार
विमानांची विमानतळांची संख्या भारतात आणि जगभर वाढती आहे. एकीकडे प्रकाश योजने दूर असलेली अंतराळ याने लीलया नियंत्रीत केली जाताहेत दुसरी कडे MH ३७० सारख्या घटना अजूनही टेक्नॉलॉजी आणि व्यवस्थापनातील गॅप्स दाखवताहेत. विमाने पडूच नयेत पडलीच तर १०० वर्षापूर्वीपर्यंत समूद्र वाळवंटात जंगलात पडली असती तर ठिक होते. एखादे मोठे विमान एखाद्या मोठ्या तेलवाहू नौकेवर पडले तर काय होईल किंवा एखाद्या हाय डेन्सिटी शहरात अथवा भोपाळ टाइप कारखान्यावर पडले तर काय होईल ? निसर्ग आणि जिवीत हानी अन इमॅजीनेबल असू शकते.
भारताकडेही उपग्रह आहेत रडार आणि युद्ध नौका आहेत. इतर देश प्रोअॅक्टीव्हली इन्व्हेस्टीगेट करताना दिसताहेत. आमच्या प्रायमरी रडारवर विमान दिसल अथवा दिसलच नाही अशी क्लिअर कॉमेंट भारत सरकार कडून येताना दिसत नाही. याचा अर्थ मिडिया फ्रेंझीत पडाव असा नाही. अशी इनव्हेस्टीगेशन्स स्वतःच्या टेक्नॉलॉजी आणि व्यवस्थापन गॅप्स शोधण्यासाठी आणि भरून काढण्यासाठी वापरली जावयास हवीत, या प्रकरणात मलेशियाच्या विनंतीवर तोंडदेखल्या सहभागा खेरीज, इन्व्हेस्टीगेशन साईडला भारतीय एजन्सीजचा (सरकारी) स्वभाव आपल्याला काय देणे घेणे असाच आहे का याची शंका वाटते.
16 Mar 2014 - 3:42 pm | आत्मशून्य
एकंदरच हे प्रकरण बघता भारताने जाणीवपुर्वक कानाडोळा केला आहे की काय अस साँशय येतो ? (हलगर्जीपणा न्हवे).
15 Mar 2014 - 11:12 pm | आयुर्हित
If the flight did enter the Andaman Sea, on way to the Bay of Bengal, Indian air defence radars should have ideally detected it.
If MH370 made it to Andaman Sea, did Indian radars fail to detect it?
16 Mar 2014 - 7:28 pm | आयुर्हित
source: bbc news
Missing Malaysia plane: Malaysia requests countries' help

.jpg)
15 Mar 2014 - 11:32 pm | आत्मशून्य
.
16 Mar 2014 - 2:03 am | आयुर्हित
कोई ये बताये कि ये कारण तो नही?
Sun, 29 Sep 2013 11:46 PM (IST)
मलेशिया के प्रधानमंत्री के अनुसार, 'वैसे तो कट्टरपंथ सबको प्रभावित कर रहा है लेकिन इसके चलते इस्लाम धर्म में आस्था रखने वाले सबसे ज्यादा नुकसान उठा रहे हैं।' मुसलमानों के अच्छे भविष्य के लिए रजाक ने कट्टरपंथियों के खिलाफ जंग छेड़ने की अपील की। प्रधानमंत्री रजाक के मुताबिक कट्टरपंथी अपने फायदे के लिए शांति और सहिष्णुता के सिद्धांत पर आधारित इस्लाम धर्म की व्याख्या तोड़मरोड़ कर करते हैं। उन्होंने कहा कि कट्टरपंथियों को हाशिये पर लाया जा सकता है। इसके लिए संयम और प्रतिबद्धता की जरूरत है जो इस्लाम में है। उन्होंने आगाह किया कि संयम को हमारी कमजोरी नहीं समझना चाहिए।
अपनों से ही मुस्लिमों को सबसे बड़ा खतरा
16 Mar 2014 - 2:35 am | विकास
स्ट्रोब टॅलबोट्ट (क्लिंटनच्या काळातील डेप्यूटी सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि परराष्ट्र धोरणातले तज्ञ) यांची ट्वीट...
Malaysian plane mystery: Direction, fuel load & range now lead some to suspect hijackers planned a 9/11-type attack on an Indian city.
16 Mar 2014 - 5:49 am | आत्मशून्य
विमान अपघाताचे चिन्ह नाही
कोणत्याही मागण्या नाहीत
सर्व संपर्क यंत्रणा एकाच क्षणी बंद,
हे सर्व जरी खरे असले तरी हवाइ हल्यापुर्वी चक्क ५ तास विमान गायब केले जाउन शेजारील देशामधे त्याबद्दल अलर्टनेस निर्माण केला जाण्याची शक्यता नाही. आजच्या जमान्यात मोबाइल सारखी संपर्क साधने असताना ? (SOS काम करेल मोबाइल फ्लाइटमोडवर असेल तरी) असा हवाइ हल्ला यशस्वी करायचा असेल तर अतिशय कमी वेळेचे धक्का तंत्र अत्यावश्यक आहे व म्हणुनच अशा देशाची एअर स्पेस आत्मघाती विमानाकडून चुकुनही ओलांडली जाउ नये अथवा कमीत कमी मिनीटात/सेकंदात पार करता यावी याची काळजी घेतली जाइल.
हे जर कोणत्याही कारणाने घडवलेले अपहरण असेल तर अपहरणकर्त्यांचे दोन अंदाच चुकलेच असावेत,
१) विमानाचा शोध कितपत घेतला जाइल याची शक्यता
२) रोल्स रॉइसला आपोआप मिळणार्या लॉग बद्दल अनभिज्ञता
आणी आता हल्ला करणे मात्र शक्य नाही कारण आवश्यक अलर्टनेस आला आहे. अन तरीही अभाळातुनच हल्ला झाला तर आपली तीच लायकी आहे हे नक्कि.
16 Mar 2014 - 5:54 am | आत्मशून्य
असा हल्ला केला तर बहुदा सरळ मलेशीयावरच करायचा प्लान असावा. पायलटने पध्दतशीरपणे विमान त्या दिशेने वळवुन संपर्क यंत्रणा बंद झाल्यावर हल्लेखोरांचा प्लान उधळण्यासाठी जाणीवपुर्वक विमान भरकटवले असावे.
16 Mar 2014 - 8:26 am | विकास
संशयाची सुई पायलट आणि को-पायलटकडेच बोट दाखवत आहे. त्यामुळे पायलटने मुद्दामून वळवले असण्याची शक्यता कमी असावी असे वाटते.
16 Mar 2014 - 9:09 am | माहितगार
या विमानाच्या मुख्य पायलट पॉलीटीकल माइंडेड होता आणि आदल्या दिवशी मलेशियाच्या विरोधीपक्ष नेत्याच्या अटकेमुळे अपसेट होता अशी बातमी येते आहे . मलेशिया क्रॉनीकल.कॉमचा दुवा मलेशियन सरकार ही बाब चर्चेत येण्यापासून दाबू पहात होते असे दिसते.
16 Mar 2014 - 10:21 am | वेताळ
स्टेट्स अजुन ही ऑनलाईन दाखवत आहेत्,तसेच विमानातील काही लोकांचा मोबाईल वर रिंग देखिल वाजत होत्या. मग हे नवीन टेक्नॉलॉजीने ट्रॅक करता येणार नाही काय?
16 Mar 2014 - 11:38 am | भाते
जेव्हा मी डेस्कटॉपवरून ब्राऊसर मधुन सोशल साईट वापरतो आणि त्यातुन लॉग आउट न करता फक्त ब्राऊसर बंद करतो तेव्हा इतरांना मी ऑनलाईन दिसत असतो. तीच गोष्ट मोबाईलची. मी ऑफिसमधुन वाय-फाय वरून सोशल साईट वापरतो आणि त्यातुन लॉग आउट न करता ऑफिसमधुन बाहेर पडल्यावर वाय-फाय नेटवर्कशी संबंध तुटल्यामुळे मला सोशल साईट वापरता येत नाहीत. पण तेव्हा इतरांना मी ऑनलाईन दिसत असतो. मी प्रत्यक्षात लॉग आउट केलेले नसल्याने टेक्निकली मी ऑनलाईनच असतो.
अर्थात नविन टेक्नॉलॉजीने हे ट्रॅक करणे सहज शक्य आहे. बहुतेक पोलिस तपासात हे तंत्र वापरले जाते असे बातम्यांमधुन समजते.
17 Mar 2014 - 7:30 am | निनाद
मला वाटते मलेशियन सरकारने बेजबादारपणे हे प्रकरण हाताळले आहे.
त्यांच्या रडारवर हे विमान दिसले होते तर त्यांनी ती माहिती वेळीच द्यायला हवी होती.
कालच्या बातमीनुसार विमान भारतावरून गेले आणि लक्षात आले नाही, असे झाले असेल तर प्रकरण गंभीर आहे.
(बहुदा भारतावरून गेले नसावे असे वाटते.)
एकुणच सर्वच घडामोडी चमत्कारिक आहेत हे मात्र खरे.
आजच्या बातमीनुसार दहशतवादी हल्ला झाला असावा असे गृहीत धरले जाते आहे.
कुण्या पकडलेल्या दहशतवाद्याने असे सांगितले की त्याने
मलेशियन पायलटला बुटातली स्फोटके दिली होती आणि हा हायजॅकचाच बेत होता.
त्यामुळे हे विमान कुठे तरी उतरवले गेले असावे असे आता काही लोक मानताहेत.
हे विमान उतरायला ४५ मिटर रुंद १५०० मिटर्स लांब धावपट्टी पुरेशी आहे म्हणे.
विमान परत उडवायचे नसेल तर मातीच्या धावपट्टीवरही उतरू शकते.
असे असले तरी मोबाईल आणि डिजिटल कॅमेर्यांच्या युगात 'विमान उतरलेले कळणार नाही' असा कोणता प्रदेश असेल?
रोज येणार्या नवनवीन बातम्या आणि शक्यतांमुळे नातेवाइकांच्या भावनांचा काय खेळ होत असेल ते तेच जाणोत.
आता बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांद्वारे मलेशियन एयर विरुद्ध दावे दाखल केले जातील का?
केल्यास असे खटले कुठे लढले जातील?
लंडनला? - कारण इन्शुरन्स तेथला आहे.
क्वलालंपूर ? - कारण कंपनी तेथे आहे
चीन? - कारण चीनी हद्दीत गायब झाले आहे
की जेथे विमान उतरले असेल तेथे?
विमान बनवणारी कंपनी अमेरिकन, आणि इंजिने बनवणारी रोल्स रॉइस युरोपीय, हे पण प्रतिवादी होऊ शकतील का?
माझ्या ऐकीव माहितीनुसार एयर फ्रान्स ४४७ क्रॅश वरुन सुमारे ४७५ मिलियन डॉलरचे दावे क्लास अॅक्शनद्वारे दाखल झाले होते.
त्यातले बरेच कोर्टाबाहेर मिटवले गेले व उरलेल्यांना १८२ मिलियन या एकरकमी तडजोडीत निकाली काढले.
17 Mar 2014 - 1:22 pm | माहितगार
उपग्रहांनी पाठवलेली छायाचित्रे आंतरजालावरून सामुहीक पद्धतीने (क्राऊडसोर्सींग) शोधण्याचा डिजीटल ग्लोबवर तर्फे www.tomnod.com वर प्रयत्न चालू आहे. त्यात मी एक अनुभव घ्यावा म्हणून वेगवेगळ्या मॅपच्या जवळपास ११०० टाइल्सच्या आसपास रँडमली शोधल्या. त्यात मिळालेला ४ वाजून १४ मिनीटांचा ह्या नकाशात एका विषीष्ट पॅटर्न मध्ये पाण्यावर तरंग आणि शिंतोडे असावेत असे वाटते. पावसाचे असते तर वर ढग राहीले असते. हे कशाचे असू शकतील ? आपल्याला www.tomnod.com ने केवळ मर्यादीत टॅगींग सुविधा दिली आहे त्यामुळे कॉमेंट टाकणे अथवा संपर्काची काही सुविधा दिसली नाही.
http://www.tomnod.com/nod/challenge/malaysiaairsar2014/map/682517
या नकाशा बाबत तुम्हाला काय वाटतं ?
17 Mar 2014 - 4:54 pm | अधिराज
हे विमान शोधण्यासाठी ज्योतिषतज्ञ किंवा एखादे सिद्धीप्राप्त बाबा / महाराज ह्यांची मदत होऊ शकते का?
17 Mar 2014 - 9:21 pm | लंबूटांग
फक्त आता तो म्हणायचा कोणी नक्की? मलेशियन एअरलाईन्स च्या अधिकार्यांनी की नेत्यांनी की कोणी? जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
17 Mar 2014 - 10:14 pm | अप्पा जोगळेकर
कृपया धाग्याचे गांभीर्य घालवू नये. सव्वा दोनशे माणसे मिसिग असताना यावर विनोद करणे तुम्हाला पटते काय. दंगा करायला इतर धागे आहेत.
17 Mar 2014 - 10:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१,०००,०००
17 Mar 2014 - 11:18 pm | लंबूटांग
मी सिरीयसली विचारला होता प्रश्न ! जर मंत्र म्हणून ते विमान आणि प्रवासी सापडणार असेल तर व्हाय नॉट?
धागा माहितीपूर्ण आहे यात वादच नाही आणि काही प्रतिसादही. पण बर्याच प्रतिसादांत इकडून तिकडून बातम्यांच्या लिंका पेस्टवून/ स्वतःच्या कॉन्स्पिरसी थीअरीज टंकून जे विनोद झाले आहेत त्याचे काय?
असो मला पहिल्यापासूनच त्या वाईट झालं, माझ्या प्रार्थना/ शुभेच्छा त्यांच्या सोबत आहेत वगैरे फेसबुकी छाप भाषा झेपत नाही त्यामुळे तसा प्रतिसाद दिला नाही.
असो, कोणीतरी असा प्रतिसाद देईल असे वाटलेच होते. तुम्ही दिलात.
संपादकांनी प्रतिसाद उडवायचा तर उडवावा.
18 Mar 2014 - 10:12 am | माहितगार
धाग्यावर जाण्यास हरकत नाही.
18 Mar 2014 - 10:53 am | प्रदीप
हे आपल्या नजरेत आलेले दिसत नाही. जगातील बहुतेक सर्व प्रमुख वर्तमानपत्रांतून हे आले होते; त्याचा व्हिडीयोही जालावर मिळावा.
17 Mar 2014 - 10:35 pm | kurlekaar
Russia “Puzzled” Over Malaysia Airlines “Capture” By US Navy
EU Times च्या १४ मार्च च्या लेखान्वये रशिया चं GRU (सैन्याचे हेर खाते) बुचकळ्यात पडलंय की अमेरिकन नौदलाने या मलेसिअन एअर लाईन्ज चं ३७० या उड्डाणाचा ताबा घेऊन व त्याचा मार्ग बदलून त्याला अमेरिकेच्या दीएगो गार्सिया या भारतीय महासागरात असलेल्या सैनिकी तळाकडे का वळवले. हे उड्डाण GRU च्या नजरेखाली होतं कारण त्यात एक संशयास्पद कार्गो होता व या कार्गोचा संबंध सीशेल्स या देशाशी व अमेरिकेच्या MV Maersk Alabama या व्यापारी जहाजाशी जोडला होता. GRU ने या बाबतीत चीनच्या Ministry of State Security (MSS) शी देखिल संपर्क साधला होता व त्यांना सांगण्यात आलं की चीनच्या वायुहद्दीत आल्यानंतर या कार्गोची चौकशी केली जाईल पण असंहि कळलंय की चीन देश हे विमान बीजिंग ऎवजी त्यांच्या हैनान बेटावरील Haikou Meilan इथल्या आंतर राष्ट्रीय विमानतळावर उतरवून घ्यायच्या तयारीत होता. .
या Boeing 777-200ER aircraft विमानात fly-by-wire (FBW) system असल्याने त्याला electronic interface असतो व त्याच कारणाने हे एका ड्रोन विमानाप्रमाणे दुरून देखिल कंट्रोल केलं जाऊ शकते.
18 Mar 2014 - 10:07 am | माहितगार
विमानाच्या कार्गोत केवळ (मलेशीयन) फळे होती अस मलेशीयन मंत्र्याच विधानाच रिपोर्टींग झाल आहे. स्वतःच्या कमर्शियल विमान कंपनीची क्रेडिबीलीटी धोक्यात घालून मलेशिया सरकार मलेशियन विमान कंपनी असे काही करू देण्याची शक्यता कमीच. लोकांना भरपाई म्हणूनच त्यांचा कोट्यावधीनी खर्च होणार आहे.
कोणत्याही सरकारला किमती कार्गो पाठवायच असेल स्पेशल विमानाने पाठवणही शक्य असत त्याच्या करता कमर्शियल फ्लाईटची गरज नाही. आमेरीकी सरकार गुप्तचर कारवाया करत नसेल असे नाही पण जगाच्या महासत्तेला असल कोणतीही काम लपवून करण्याची मुळात गरज असेल अस वाटत नाही.
18 Mar 2014 - 11:02 am | कल्पक
हे जर खरं असेल तर खूपच धक्कादायक आहे
17 Mar 2014 - 10:51 pm | kurlekaar
Source http://www.whatdoesitmean.com/index1753.htm
18 Mar 2014 - 12:22 pm | माहितगार
Secretive Beijing demands transparency over missing jet
18 Mar 2014 - 12:39 pm | माहितगार
तुमच्या हातात सुपर कॉम्प्युटर आहे उपग्रहातून मिळणारी छायाचित्रे आहेत. आकाश बर्याच अंशी निरभ्र आहे. एक विमाना सारखा ऑब्जेकट आहे ज्याची काळ काम वेगाची गणित बांधून कोणत्याही क्राऊड सोर्सींग शिवाय सुद्धा चार नाही सहा दिवसात विमानाच काय झाल याच उत्तर अगदी मलेशियाच्या मदती शिवाय आमेरीका रशिया चीन भारत या सर्वच देशांना देण जमायला हव. दुसर्या देशाच्या मुव्हींग मिसाईल्सचा बरोबर वेध घेऊन पाडता येतात, एका भल्यामोठ्या विमानाचा शोध घेता येत नाही ? टेक्नॉलॉजी गॅप नाही पण टेक्नॉलॉजीच्या वापरातला गॅप म्हणता येईल आणि मग नाही नाही त्या थेअरीज येऊ लागल्या आहेत. इतर देशांच माहित नाही भारताकरता याचा अर्थ एवढाच होतो की चिनने किंवा इतर देशांनी पाठवलेल इंटर काँटीनेंटल बॅलेस्टीक मिसाईल ट्रॅक करण्याकरता वाटेत हाणून पाडण्या करता आम्ही अजून मागे आहोत २१व्या शतकात भारताकडे उपलब्ध साधन क्षमता लक्षात घेता अजिबात भूषणावह वाटत नाही.
मी भारतातील आलतूफालतू विरोधी पक्ष नेता असतो तरी या टेक्नॉलॉजी गॅपकरता भारताच्या पंतप्रधानाचा राजीनामा मागीतला असता आजी माजी केंद्रीय मंत्र्यांना निवडणूका लढण्यापासून बाद करण्याची मागणी केली असती.
18 Mar 2014 - 1:09 pm | योगी९००
भारताला इतके कमी लेखणे बरोबर नाही.
असे ही असू शकेल की : विमान hijack झाले असून मलेशिया, चीन, भारत वगैरे देशाच्या उच्च अधिकार्याना याची कल्पना असेल व अतिरेक्यांबरोबर वाटाघाटी चालू असतील. काही गुप्त कारणामुळे ही माहिती आपल्यापर्यंत उघड केली नसेल.
18 Mar 2014 - 2:25 pm | माहितगार
तस नाहीए हो, मी भारताला कमी लेखत नाहीए. सत्तेतल्या लोकांना काय गुप्त खलबत करायचीत ते करू दे ना ! येता जाता दुहाई देणारे विरोधी पक्ष रोखठोक प्रश्न विचारण्याच्या त्यांच्या भूमीकेत कमी पडत नाहीत ना असाही प्रश्न आहे .
18 Mar 2014 - 3:27 pm | माहितगार
सिएनएनच्या या वृत्तातील खालील तर्क पटण्या जोगा वाटतो.
18 Mar 2014 - 1:10 pm | गवि
आता सर्च एरिया अमर्याद वाढल्यामुळे आणि कालापव्यय झाल्यामुळे विमान सापडण्याची शक्यता बरीच विरळ झाली आहे. या काळात शेकड्यांनी नवनव्या थियरीज पुढे आल्या आहेत. यापैकी बरीचशी तर्कटे केवळ एक शक्यता म्हणून मांडली गेलेली आहेत. कोणत्याही खास माहितीविनाही असे अंदाज करता येतात. उदा. विमानात असलेल्या संवेदनशील कार्गोमुळे विमान अन्यत्र नेले गेले. किंवा ते अमेरिकेच्या दिएगो गार्सिया या तळावर उतरवले गेले. किंवा भारतावरुन पूर्ण प्रवास या विमानाने सिंगापूर एअरलाईन्सच्या त्याच वेळी प्रवास करणार्या कायदेशीर विमानाच्या मागेमागे अत्यंत जवळून उडत केला, ज्यामुळे रडार्सवर त्या दोन्हीचा मिळून एकच ठिपका दिसला असणार आणि तीही फ्लाईट सिंगापूर एअरलाईन्सच्या सावलीत क्लियर झाली. एअरबॉर्न कोलिजन अव्हॉईडन्स सिस्टीममुळे जवळजवळ उडणार्या विमानाची वॉर्निंग एरवी सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानाला मिळाली असती, पण MH370ने आपल्या सिस्टीम्स बंद करुन ते टाळलं इत्यादि.
या थियरीज म्हटलं तर केवळ तात्विकदृष्ट्या शक्य आहेतच, पण प्रत्यक्षात कितपत घडू शकल्या असतील याविषयी मोठी शंका घेता येईल.
एकूण काही संकीर्ण मुद्दे खाली नोंदवतो आहे.
- मलेशियाने अधिकृतरित्या असं जाहीर केलं होतं पायलट्सकडून आलेला शेवटचा संदेश "ऑल राईट, गुड नाईट" हा विमानाची ACARS सिस्टीम मॅन्युअली बंद करण्यापूर्वी / आपोआप बंद होण्यापूर्वी आलेला नसून ती बंद केल्यावर / झाल्यावर आला होता. याचा अर्थ पायलट्सनी एक सिस्टीम बंद होऊनही कोणताही दुरित संदेश न देता संभाषण संपवलं होतं. पण आज मलेशिया म्हणते की वरील माहिती अयोग्य असून आता आम्ही असे म्हणतो की पायलट्सचा "ऑल राईट गुड नाईट" हा शेवटचा संदेश हा सिस्टीम बंद होण्यापूर्वी आलेला नव्हता.
याचा अर्थ अजूनही होय होय- नाही नाही असा प्रकार आणि माहितीच्या बाबतीत यू टर्न्स चालू आहेतच.
-शेवटचा संदेश को पायलटच्या आवाजात होता. म्हणजे एकट्या मुख्य पायलटवर संशय घेऊन भागणार नाही.
- मुख्य पायलट हा "पोलिटिकली अॅक्टिव्ह" होता, आणि तो विरोधी पक्षप्रमुखाचा खंदा समर्थक होता, आणि तो फ्लाईटपूर्वी या प्रमुखावर चाललेल्या खटल्याला हजर राहिला होता, आणि त्याबद्दल अस्वस्थ होता. अशी माहिती जाहीर झाली आहे. मुख्य पायलटचे काही फोटो जाहीर झाले आहेत. त्यात त्याने "डेमॉक्रसी इज डेड" असा संदेश परिधान केलेला दिसतो आहे.
पण एकूण माहितीवरुन थेट पायलटवर संशय घेणं अत्यंत हीनतेचं वाटतं. समजा डेमॉक्रसीचा गळा घोटला जात आहे अशा मताची व्यक्ती असली तरी तरी या प्रकारच्या व्यक्तीच्या विचारधारेचा कडवा सपोर्ट डेमॉक्रसीला म्हणजे लोकशाहीला असणार. अशा वेळी ही व्यक्ती अन्य काही लोकशाहीच्या तत्वाने प्रतिकार करेल.. अतिरेकी मार्गाने विरोध का व्यक्त करेल?
त्या विरोधी पक्षनेत्यानेही पायलटवर घेतल्या जाणार्या संशयाविषयी अतिशय तीव्र निषेध केला आहे.
हायजॅक किंवा अपहरणाची थियरी मानण्यात अत्यंत मोठा धोंडा म्हणजे मोटिव्ह, अर्थात उद्देशाचा अभाव. कोणताही मोटिव्ह दुरुनही नजरेत न येणं हा मोठा प्रॉब्लेम आहे.
आठ दिवसांत पॅसेंजर्स किंवा पायलट्स किंवा अपहरणकर्ते यांच्याकडून कोणताही संपर्क नसणं हे न पटण्यासारखं आहे. अपहरणकर्त्यांना आठ दिवस गप्प बसून अडीचशे लोकांना गुप्तपणे विमानासह दडवून ठेवणं हे अशक्यप्राय आहे.
याचाच अर्थ विमान आता अस्तित्वात नसण्याची सर्वात जास्त शक्यता आहे.
माझ्यामते विमानाचा ब्लॅक बॉक्स भविष्यात कधीच मिळणार नाही (न मिळण्याची फारच मोठी शक्यता आहे..)
कारणे:
विमानाचा क्रॅश झालाच असेल तर तो त्याच दिवशी इंधन संपताक्षणी झाला असणार. म्हणजे त्याला ९-१० दिवस झाले. विमान इन्टॅक्ट पाण्याखाली गेलं नसेल तर विमानाचे तरंगणारे हलके भाग म्हणजे खुर्च्यांची कुशन्स, बॅगा, कपडे इत्यादि. हे गेल्या दहा दिवसांत मूळ ठिकाणापासून शेकडो किलोमीटर रँडमली भरकटले असणार. पण ब्लॅक बॉक्सेस मात्र मूळ जागीच पाण्यात बुडाले असणार. त्यामुळे आता तरंगणारे अवशेष जरी सापडले तरी ब्लॅकबॉक्सचा थांग त्यावरुन लागणार नाही.
जर हिंदी महासागरात ते बुडाले असतील तर त्यांचे संदेश पृष्ठभागापर्यंत पोहोचण्याची शक्यता बहुतांश भागांत शून्यवत आहे. आणि हे जे काही संदेश ट्रान्समिट होतात ते ३० दिवसांपर्यंतच होतात. बॅटरी तेवढीच असते. पूर्ण हिंदी महासागर तळातून सावडणे जवळजवळ अशक्य आहे. आणि तसं केलं तरी महिन्याभरात तिथे पोचणं त्याहून अशक्य. जाणार्या प्रत्येक दिवसासोबत समुद्रतळाशी विसावलेले ब्लॅकबॉक्स आणि इतर पार्ट्स वाळूखाली गाडले जाण्याची शक्यता जास्तजास्त.
वाट पाहणं भयानक असतं. मृत्यू तुलनेत खूप लवकर स्वीकारला आणि पचवला जातो, पण ज्या लोकांचं जवळचं कोणी बेपत्ता झालेलं असतं ते कितीही प्रयत्न केले तरी आशा सोडू शकत नाहीत आणि त्याचवेळी ती व्यक्ती कुठे आणि कशी असेल किंवा असेल की नसेल याचे विचार थांबवू शकत नाही.
त्यामुळे खरंच बाकी काही कळो न कळो, या लोकांचं काय झालं याचा निकाल मात्र नक्की लागू दे अशी तीव्र इच्छा..
18 Mar 2014 - 1:26 pm | आतिवास
वाट पाहणं भयानक असतं. मृत्यू तुलनेत खूप लवकर स्वीकारला आणि पचवला जातो, पण ज्या लोकांचं जवळचं कोणी बेपत्ता झालेलं असतं ते कितीही प्रयत्न केले तरी आशा सोडू शकत नाहीत आणि त्याचवेळी ती व्यक्ती कुठे आणि कशी असेल किंवा असेल की नसेल याचे विचार थांबवू शकत नाही.
+१
आपले परिचित अशा दुर्दैवी घटनांत असतात, त्यावेळी बातमी फक्त बातमी राहात नाही :-(
18 Mar 2014 - 4:00 pm | सुहास झेले
अगदी अगदी...
18 Mar 2014 - 2:38 pm | माहितगार
सर्च एरीआ अमर्याद वाढला म्हणजे काय ? उपग्रहातन काहीच छायाचित्र मिळत नसती विमान त्यात न दिसण्या एवढ छोट असत तर वेगळी गोष्ट होती. विमान निघाल्या वेळे पासूनचा उपग्रहछायाचित्रातून प्रत्येक मिनीटाचा मागोवा घेता येत असणार. विमान कोणत्याही दिशेला वळल तरी ३६० बाय ३६० अँगल मध्ये वळल तरीही उपग्रह छायाचित्रातून सुटण्याच काहीच कारण नाही (केवळ ढगांच परसेंटेज फार मोठ असेल आणि विमान त्यातच अडकून वेदरमुळे खाली कोसळल तर वेगळा भाग पण प्रत्यक्षात वेदर बर्यापैकी स्वच्छ होत अस दिसतय, मी स्वतः टॉमनॉड डॉट कॉम वरील छायाचित्र शोधात सहभाग घेतला मला तरी आभाळ बर्यापैकी स्वच्छ वाटल अर्थात टॉमनॉड डॉट कॉमवालेही लॉजीकली काम करताना दिसत नाहीत म्हटल्यावर मी सहभाग बंद केला). फक्त सुयोग्य कोऑर्डीनेट्सची छायाचित्र एका नंतर एक लावण्याची आवश्यकता असावी ते आमेरीकन टॉमनॉड कंपनीन केल नाही पण भारतासहीत इतर महासत्ता झोपल्या सारख्या वागतात याच आता प्रचंड आश्चर्य वाटत आहे.
18 Mar 2014 - 3:04 pm | गवि
समुद्रतळाशी सर्च आणि छुप्या ठिकाणांची सर्च याविषयीचा तो उल्लेख आहे. केवळ तरंगणारे अवशेष उपग्रहामार्फत शोधण्याचा नव्हे.
18 Mar 2014 - 3:16 pm | माहितगार
ओके धन्यवाद
19 Mar 2014 - 12:19 am | दिव्यश्री
वाट पाहणं भयानक असतं. मृत्यू तुलनेत खूप लवकर स्वीकारला आणि पचवला जातो, पण ज्या लोकांचं जवळचं कोणी बेपत्ता झालेलं असतं ते कितीही प्रयत्न केले तरी आशा सोडू शकत नाहीत आणि त्याचवेळी ती व्यक्ती कुठे आणि कशी असेल किंवा असेल की नसेल याचे विचार थांबवू शकत नाही.>>> :(
रविवारचीच गोष्ट आहे. माझी बहिण लंडन हून निघाली होती , शनिवारी रात्रीच विमान होतं...शनिवार पासून मी अक्षरशः त्या online status कडे भीतभीत बघत होते . अगदी Flight Operating , Departure etc . पण जोपर्यंत मी तिचा आवाज ऐकला नाही तो पर्यंत लक्ष लागत नव्हत कशातही... तिचा हेलो ऐकून स्मितरेशच उमटली . आणि online status वर Arrived दिसलच नाही शेवटपर्यंत...नंतर मग मी विसरूनही गेले . शेवटी आपलं माणूस नसाव अशा कुठल्याही प्रसंगात असच वाटत . सतत प्रार्थना चालू होती मनातल्यामनात कि ती सुखरूप असू दे .
18 Mar 2014 - 1:45 pm | स्वप्नांची राणी
मला तर अजुनही असच वाटतं कि;
१. सडन मेकेनिकल फेल्युअर.
२. एअर प्रेशर ड्रॉप. त्यामुळे सुमारे ८-१० सेकन्दात पायलटसह सगळेच बेशुद्ध.
३. सगळ्या सिस्टिम्स बंद पडल्यामुळे ट्रॅक न होता, ईंधन संपेपर्यंत विमान ग्लाईड होतं उडत राहिले.
४. आणि कोसळले तिथे पाण्याची खोली ४०००-४५०० मिटर्स असावि.
खुप टेक्नीकली बरोबर लिहिता येत नाहीये. पण आत्महत्या किंवा हायजॅक नसाव असच, का कोण जाणे, पण वाटत.
18 Mar 2014 - 2:12 pm | गवि
असंच वाटत होतं.. अजूनही बर्याच अंशी हेच वाटतं.
पण बरेच पुरावे तांत्रिक दोषापेक्षा मानवी हस्तक्षेप असल्याचं निश्चितच दाखवतात.
महत्वाचे:
- पहिले डायव्हर्शन हे विमानाच्या कंट्रोल कॉलमने (फिजिकल कंट्रोल हाताने फिरवून) केलेले नसून फ्लाईट कॉम्प्युटरला फीड केलेल्या प्लॅनमधे बदल करुन घडवलेले दिसले आहे. इमर्जन्सीत, बेशुद्ध होताहोता केलेली इमर्जन्सी वळण्याची किंवा अन्य हालचाल ही कॉम्प्युटर एंट्रीतर्फे केली जाईल हे शक्य दिसत नाही.
- आकार्स आणि ट्रान्सपाँडर या दोन वेगवेगळ्या सिस्टीम्स काही काळाच्या अंतराने बंद केल्या गेल्या आहेत. "सडन फेल्युअर"च्या किंवा सडन क्रॅशच्या केसमधे सर्व सिस्टीम्स एकदम बंद पडायला हव्या.
-इंधन संपेपर्यंत विमान उडत राहिले असेल तर ते शेवटच्या ट्रॅजेक्टरीमधे ऑटोपायलटवर स्ट्रेट अॅन्ड लेव्हल फ्लाईटमधे उडत राहायला हवे. पण इथे मात्र त्या विमानाने पुढचा प्रवास हा ठराविक चेकपॉईन्ट्स पार करत (VAMPI --> GIVAL) केला. म्हणजेच मूळ मार्गावर नसलेले चेकपॉईन्ट्स त्याने घेतले. हे चेकपॉईन्ट्स घेताना मार्ग बदलावा लागतो. या चेकपॉईन्ट्सना वापरुन प्रवास करण्याने ठराविक एअरवेवर राहून कोणत्यातरी ठिकाणाकडे कूच करण्याचा उद्देश सरळ दिसतो. सर्वजण बेशुद्ध होऊन मूळ मार्गावर विमान राहिले असते तर ते बीजिंगच्या दिशेत जात राहिले असते. जर बेशुद्ध होण्यापूर्वी पायलटने नवी दिशा दिली असती तर त्या दिशेत जात राहिले असते. पण असे वेगळ्या मार्गाचे चेकपॉईंट्स घेतले नेमके क्रमाने घेतले नसते.
-शिवाय मूळ ३५००० फुटांच्या पातळीवरुन ४५००० फुटांपर्यंत उंच आणि २३००० आणि कदाचित ५००० फूट, इतक्या प्रकारे लेव्हल्स चेंज केल्या. फ्लाईट लेव्हल कमी होणंही कदाचित समजता येईल, पण खाली उतरुन परत वर चढणं आणि तेही हजारांच्या पटीत फूट, हे आपोआप होणारं मॅनुव्हर नक्कीच नाही.
18 Mar 2014 - 3:17 pm | स्वप्नांची राणी
काय झालं असेल हो नेमक मग? आणि ब्लॅक बॉक्स ही मिळणार नाही मग हे गुढ कधी उकलणारच नाही कि काय...?
18 Mar 2014 - 1:55 pm | सार्थबोध
गवि,
फार सुरेख माहिती, आभारी आहे,
माझा प्रणाम आपल्याला
18 Mar 2014 - 11:13 pm | मस्तानी
गवि … धन्यवाद या लेखाबद्दल. गेले काही दिवस हा एक लेख follow करतेय. आज हे वाचायला मिळालं, बघा तुम्हाला पटतंय का … कुणी काही वाईट हेतूने प्रेरित होऊन केलंच नसेल पण ही खरच एक अतिशय दुर्दैवी घटना / अपघात असेल असं असू शकेल ?
https://plus.google.com/app/basic/stream/z13cv1gohsmbv5jmy221vrfyiz3vdhb...
19 Mar 2014 - 10:29 am | सुहास झेले
पुन्हा अंदमानवर नजरा....
.
.
.
Hyderabad techie uploads satellite image of missing plane on CNN site
19 Mar 2014 - 11:18 am | अनन्त अवधुत
MH370: Debunked: Image of plane over Andaman Islands on Mapbox Map
19 Mar 2014 - 1:29 pm | मराठीच
मल तल वाततं कि प्लन अलायनी पलवले अषवे
19 Mar 2014 - 1:58 pm | योगी९००
बलं.. बलं..
प्लनला मोकलाया दाही दिशा..
24 Mar 2014 - 11:13 pm | खटपट्या
19 Mar 2014 - 2:17 pm | विटेकर
हा लेख मला कालवॉट्स अप वर आला.. असाच्या असा! वरती "सौजन्य गवि" असे लिहिले होते !
पाठविणाराला मिसळ्पाव बद्दल काही ही माहीती नव्हती , त्याने तो फक्त पुढे ढकलला. .. मी ही फार चौकशी केली नाही.
तात्पर्य . ग विंचे लेखन सर्वदूर अन्य माध्यमात ही वाचले जाते !
या विषयाचे औत्सुक्य खूप ताणले गेले आहे. ही लिंक पहावी.
http://www.malaysiaairlines.com/my/en/site/dark-site.html
निवेदन इंग्रजी आणि चीनी भाषेत (?) आहे .
19 Mar 2014 - 11:05 pm | डँबिस००७
बोइंग कंपनीच्या सुत्रांकडुन आलेल्या माहिती नुसार, सदर विमान पाकिस्तानात उतरलेले असण्याची शक्यता आहे.
ह्या घटनेत ईराणी लोकांचा सहभाग असल्याने इज्राईल जास्त सावध झाला आहे. एरवीही सावध असणारा हा देश आता युद्दाच्या पवित्र्यात आलेला आहे.
अश्या पार्श्वभुमीवर अश्या प्रकारच्या संभाव्य धोक्याकडे भारताची प्रतिक्रीया काहीच नाहीय. ईज्राईल वर आक्रमण करु शकले नाहीत तर भारतावर सहज करु शकतील अशी शक्यता नाकारता येणार नाही.
बाकी आपल्याला जाग अॅटॅक आल्या नंतरच येईल याची शक्यता जास्त आहे.
The Malaysian government reportedly is investigating the possibility that missing Malaysia Airlines Flight MH370 avoided radar detection and landed in Pakistan near the Afghanistan border inside Taliban-controlled territory, according to the UK Independent . . . investigators confiscated a homemade flight simulator from the pilot’s home to see if it reveals any useful information . . . the Malaysian foreign minister told reporters that Malaysia asked several Asian countries for assistance in its investigation, including Pakistan . . . Pakistan dismissed the idea that a Boeing 777 could land undetected inside the country but promised to work with the Malaysian government in its search for the missing plane . . . a LIGNET analyst received information from a source at Boeing that the company believes the plane did land in Pakistan . . . Israel is taking the possibility of a terrorist attack seriously by mobilizing air defenses and scrutinizing approaching civilian aircraft, according to the Times of Israel . . . a Boeing 777 requires a lengthy, 7,500-foot runway, and Pakistan has many of them, meaning Flight 370 could conceivably be hidden in a hangar inside the country . . . U.S. surveillance of the area may be able to shed light on the theory through satellite imagery or signals intelligence.
http://www.lignet.com/InBriefs/Malaysia-Hunts-for-Missing-Jet-in-Pakista...-
19 Mar 2014 - 11:35 pm | आत्मशून्य
आता फक्त रशिया-युक्रेन परिस्थीतीवर तोडग्यासाठी अपहरण झाले एव्हडीच थिअरी उरली आहे....असो विमानाचे अपहरण झालेच असेल(?) तर ते कोणत्याही देशाच्या पाठिंब्या शिवाय शक्य वाटत नाही. विषेशतः भारत, चिन, आणी मलेशीया. बाकी चालुद्या.
19 Mar 2014 - 11:42 pm | सचिन कुलकर्णी
ते विमान एलिअनने पळवून नेले असावे हे ऐकून हसावे का रडावे ते कळत नाहीये.
20 Mar 2014 - 10:53 am | मी_आहे_ना
ही बातमी देण्याची इतकी घाई का केली हे कळत नाही. हिंदी महासागरात आढळलेल्या वस्तू ह्या विमानाचेच भाग आहेत हे तपासण्या-आधीच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी माध्यमांना सांगितलंय "हे असू शकेल किंवा नसूही शकेल"
20 Mar 2014 - 11:56 am | चिरोटा
घाई नसावी.त्यांना जवळपास कळले असावे.बातमी दिली नाही तर 'बातमी दडवून ठेवता आहेत निश्चितच काहीतरी काळबेर आहे' असेही म्हणता येते.
20 Mar 2014 - 12:25 pm | मी_आहे_ना
तेही आहेच म्हणा, नाहीतर इतक्या उच्चा दर्ज्याच्या माणसाने माध्यमांकडे अशी माहिती (ज्याच्याकडे सगळं जग डोळे लावून बसलंय) जाहीर करणे सहज घडणार नाही.
काहीही असो, लवकर सत्य बाहेर येवो. त्या शे-दोनशे लोकांच्या (जे बीजिंग एयरपोर्टवर गेले १२ दिवस वाट पाहतायेत) भावनांचा विचारही केला तरी डोळ्यांत पाणी येते.
20 Mar 2014 - 12:46 pm | अमोल केळकर
ह्म्म्म, वाईट बातमीने या सर्व प्रकरणाला पुर्णविराम मिळणार असे दिसते. पण अजूनही आशा सुटत नाही
अमोल केळकर
20 Mar 2014 - 3:26 pm | माहितगार
'एम एच ३७० पासून भारताने घ्यावयाचा धडा' या विषयावर प्रविण स्वामी यांचा वाचण्याजोगा चिंतनीय लेख आला आहे.
20 Mar 2014 - 4:29 pm | सुहासदवन
भारताला घेण्यासारखे असे अनेक धडे आहेत.....
पण भारताने घ्यायचा म्हणजे नेमके कोणी घ्यायचा, ह्या विषयी कदाचित साशंकता असल्याने असे अनेक धडे वेगवेगळ्या पुस्तकांत, वर्तमानपत्रांत आणि इतर ठिकाणी तसेच पडून राहिले असावेत.
20 Mar 2014 - 6:59 pm | डँबिस००७
भारताला घेण्यासारखे अनेक धडे अजुनही अनेक अहवालात पुरलेले आहेत.
कोणालाही भारताच्या भल्याचा प्रश्नच पडत नाही, प्रश्न काही ठरावीक राजकीय पक्षाच्या,काही ठरावीक धर्माच्या
च्या भल्याचाच पडत असतो,
ज्या देशात दर वर्षी ५०,००० ते ७५.००० कोटी रु अन्न धान्याच्या नासाडीवर व्यर्थ जातात त्या देशातच संरक्षण दला साठी लागणारी आयु धे आणि शस्त्र सामुग्री घ्यायला पैसे नाहीत या कारणास्तव सैन्य दलाच्या मागण्या धुडकावल्या जातात.
ह्या देशाला फक्त देवच चालवत आहे अन्यथा देशाच्या आता पर्यंत चिंधड्या झाल्या असत्या !!
21 Mar 2014 - 12:36 am | मेघनाद
अरेच्चां….हा तंतोतंत लेख आताच २ तासापूर्वी व्हाट'स अप वर वाचला. तुमचा लेख कुणी टाकला तिथे गविसाहेब….?
21 Mar 2014 - 12:50 am | आत्मशून्य
त्याची भुख हा लेख भागवतो... मेडीयाकडे वळलो तर रोज एक नवं अन बेभरवशाचे सामोरे येत असताना हा लेख सुरेखच, याला दुखद घटनेची किनार आहे हेच काय ते दुर्दैव. :(
21 Mar 2014 - 8:57 am | अजया
माझ्याकडे पण व्हॉट्स अप वर हा लेख आला आहे.मी त्या ग्रुपला हा लेख कोणी लिहिला आहे,कुठे आहे,तसेच लेखकाच्या आणि संस्थळाच्या नावाशिवाय तो असा फिरवणे कसे चुकीचे आहे ई. ज्ञानामृत पाजले आत्ताच.
21 Mar 2014 - 9:40 am | सुहासदवन
क्षमा इंग्रजी बद्दल.....
Largest object sighted is 24 mt long, say Aussie officials
http://in.news.yahoo.com/live--after-60-hours--no-sign-of-debris-0509095...
http://in.news.yahoo.com/analysis-possible-plane-debris-slowed-vast-size...
21 Mar 2014 - 11:56 am | गवि
आता जिथे संशयास्पद अवशेष उपग्रहातून दिसले (होते) ती जागा समुद्रात साधारण चौदाशे नॉटिकल माईल्स (अडीच हजार किलोमीटर्सच्या आसपास) इतकी दूर आहे. शोधकार्यासाठी ही निखालस एक अत्यंत अवघड जागा आहे. यात असंख्य समस्या आहेतः
१. त्या जागी शोधपथकाच्या विमानाला एक फेरी मारायची तरी जाऊन येऊन पाच हजार किलोमीटर्सचा प्रवास (चार + चार = आठ तास) करावा लागणार.
२. त्या ठिकाणी अर्थातच लँडिंग करता येणार नसल्याने परतीचे फ्युएल निघतानाच घ्यावे लागणार. तसंच तिथे शोधकार्यासाठी उडत राहण्याचं फ्युएलही निघतानाच घ्यावं लागणार. याचा अर्थ परत येण्याची शाश्वती हवी असेल तर शोधविमानाला तिथे संशयित घटनास्थळी शोध घेण्यासाठी एका खेपेत फार कमी वेळ मिळणार. (सध्याची काही शोधविमानं तिथे दोन तास(च) घिरट्या घालू शकताहेत.
३. तिथे विमानाने शोधकार्य करण्यात आणखी अन मुख्य अडचण अशी की विमानाला हेलिकॉप्टरप्रमाणे स्थिर तरंगत राहून एका विशिष्ट जागेचे जवळून निरीक्षण करता येत नाही. शिवाय हेलिकॉप्टरप्रमाणे विमानाला दोरी खाली सोडून लटकता मनुष्य उतरवता येत नाही.
४. हेलिकॉप्टर्स या ठिकाणी स्वतः उडत पोहोचणे विमानापेक्षा आणखी कठीण. कारण हेलिकॉप्टर्सचा वेग विमानापेक्षा फार कमी असल्याने तिथे पोचायला आणखी बरेच तास लागतील, आणि इंधन खाण्याची हेलिकॉप्टरची भूक अन रेंज पाहता एकाच फ्युएलिंगमधे हेलिकॉप्टर्स इतका लांबचा प्रवास येऊन जाऊन करु शकतील हे शक्य दिसत नाही.
५. म्हणजेच मोठ्या बोटी हाच पाण्याच्या पृष्ठभागालगत अनेक दिवस स्थिर राहून शोध घेण्याचा मार्ग आहे. मोठ्या लष्करी बोटीवरुन हेलिकॉप्टर्स आणि काही विमानं टेकऑफ / लँडिंग आणि इंधन भरणे या गोष्टी करु शकतात.
६. या ठिकाणी बोटी पोहोचण्यासाठी अनेक दिवस लागतील. योगायोगाने त्याच भागात सध्या असलेली नॉर्वे देशाची कमर्शियल बोट शोध घेतेय, पण ती या कामासाठी खास बनलेली बोट नाही.
७. समुद्राची खोली या ठिकाणी अंदाजे १३००० ते १६००० फूट आहे. बोटी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि प्रत्यक्ष शोध सुरु झाला तरी विमानाचा ब्लॅक बॉक्स त्या अवशेषांच्या ठिकाणी बुडलेला असेलच अशी शक्यता कमी आहे. तरंगणारे अवशेष एव्हाना भरकटत मूळ ठिकाणाहून बरेच दूर आले असणार. त्यामुळे ब्लॅक बॉक्स नेमका कुठे बुडला ते कळणं फारच कठीण आहे.
८. वर दिलेल्या सर्व गोष्टी या एका गृहीतकावर अवलंबून आहेत. ते उपग्रहाला दिसलेले अवशेष प्रत्यक्षात शोधपथकाला डोळ्यांनी दिसले आणि ते MH370चेच अवशेष आहेत हे सिद्ध झालं तरच या सर्व गोष्टी अॅप्लिकेबल आहेत. आजरोजी अजून तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी असे अवशेष सापडलेले किंवा दिसलेले नाहीत. उपग्रहाने डिटेक्ट केलेली ती चित्रं पाच दिवसांपूर्वीची आहेत.
इतक्या दूरवर हे विमान नेऊन कोसळवणे (किंवा इतक्या दूरवर ते विमान जाऊन कोसळणे अशी शब्दरचना करता येईल..) म्हणजे घोस्ट फ्लाईट (पायलट्स / पॅसेंजर्स मृत किंवा बेशुद्ध असणे, आणि विमान सरळ रेषेत उडत राहणे) किंवा पायलटची आत्महत्या इतकेच पर्याय मलातरी दिसतात. बाकी कोणत्याही मेकॅनिकल किंवा अन्य फेल्युअरने हे होऊ शकणं माझ्यातरी विचारकुवतीपलीकडचं आहे.
घोस्ट फ्लाईट किंवा आत्महत्या या दोन्हीमधे विमान इंधन संपेपर्यंत ऑटो पायलटवर उंची मेंटेन करुन सरळ उडत राहतं. इथे मात्र विमानाकडून मार्ग आणि उंचीही -खाली आणि परत वर- बदलत गेल्याचे रिपोर्ट आहेत. यापैकी एक गोष्ट चुकीची आहे हे नक्की.
हे अवशेष जर खरंच MH370चे निघाले तर ही आतापर्यंतची विमानविश्वातली सर्वात गूढ घटना आणि सर्वात लांब फ्लाईटपाथ डायव्हर्जन असेल.
21 Mar 2014 - 12:13 pm | पिलीयन रायडर
तुमचा लेख जरी वॉट्स अॅप फिरत असला तरी तुमचे हे पुढचे प्रतिसाद जास्त माहितीपुर्ण आहेत.. त्यामुळे लोकांनी लेख चोप्य पस्ते करण्यापेक्षा (किंवा त्या सोबतच..) ह्या धाग्याची लिंक पण द्यावी..
मी हा लेख चेपु वर शेअर करत आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना कळेल तरी की लेखक तुम्ही आहात..
21 Mar 2014 - 12:30 pm | वडापाव
'courtesy - gavee' asha heading khali tumcha lekh whatsapp var firtoy!!!