मिट्ट

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
24 Feb 2014 - 8:40 pm

गेल्या महीन्यापासून बघण्याचे डोक्यात असलेला एक माहितीपट बघायची संधी मिळाली... भारतीय निवडणुकांच्या हंगामात अमेरीकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एका राजकारण्याच्या व्यक्तीगत वर्तनाची एक झलक बघताना नकळत तुलना होते. अर्थात येथे कुठे कुणाला आदर्श समजत नसून आपण कुठले वर्तन मिस करत आहोत इतकेच डोक्यात येते...

त्या माहितीपटाचे नाव आहे MITT. अमेरीकन राष्ट्राध्यक्षपदासाठीचे उमेदवार मिट्ट रॉमनी यांच्यावरील हा वेगळ्याच पद्धतीने घेतलेला माहितीपट आहे. २००६ साली सर्वप्रथम मिट्ट रॉमनी यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचे ठरवले. तेंव्हा पासून एका प्रत्रकारास त्यांनी त्यांच्या कौटूंबिक राजकीय संवादाचा पूर्ण (बर्‍यापैकी) अ‍ॅक्सेस दिला. २००६ ते २०११ डिसेंबरपर्यंतचा हा कालावधी आहे ज्यात या पत्रकाराने त्यांचे चित्रिकरण केले आणि त्यातून तयार केलेला हा राजकीय माहितीपट आहे.

त्याबद्दल लिहीण्याआधी एक व्यक्तीगत स्पष्टीकरणः या देशात रहात असल्याने आणि मिट्ट रॉमनीने ज्या राज्याचे गव्हर्र्नर होते त्या मॅसॅच्युसेट्सचा रहीवासी असल्याने मी रॉमनींचा अजिबात चाहता नाही. या माणसाने राजकीय पद्धतीने लोकसेवा करायच्या फंदात पडू नये - ते त्यांच्यासाठी आणि लोकांसाठी चांगले असेल असेच मला वाटते. तरी देखील एक यशस्वी उद्योजक, अतिश्रीमंत, धार्मिक (मॉर्मन ख्रिश्चन) असा हा माणूस नक्कीच बघण्यासारखा आहे. त्याच्या देशाबद्दलच्या आणि समाजाबद्दलच्या बांधिलकीबद्दल कधी देखील शंका येत नाही. तशी ती कुठल्याच अमेरीकन राजकीय व्यक्तीबद्द्ल येत नाही, अगदी या राजकारणी उडदामाजी देखील प्रत्येकात काहीतरी काळे(बेरे) दिसत असले तरी. असो.

रॉमनी अतिशय कडक आणि मनाने केवळ धंदेवाईक असलेली व्यक्ती आहे अशी त्यांची एकंदरीत प्रतिमा आहे. आणि ती प्रत्यक्षाहून फार वेगळी आहे असे वाटत नाही. तरी देखील प्रत्येक व्यक्तीच्याच प्रतिमेस अनेक कंगोरे असतात तसेच रॉमनींच्या बाबतीत आहे. विशेषकरून मनापासून धार्मिक मॉर्मन असल्याने, त्यांचे कौटूंबिक जीवन अतिशय वेगळे दिसते. पाच मुले, सुना, बायको आणि रॉमनी यांचे सात्यत्याने आणि अतिशय मनमोकळेपणाने चाललेल्या राजकीय चर्चा यात पहायला मिळतात. हे सर्वच त्यांच्या नेहमीच्या आयुष्यात विविध (बिझिनेस या अर्थाने) उद्योगात व्यस्त आहेत. ह्या मुलांचा वडीलांवरील यशस्वी राज्यकर्ता होण्यावरील विश्वास, जरी हरलो तरी देश आपला आहे आणि बॅक टू बिझनेस जाऊन सुखाने राहू हा अ‍ॅटीट्यूड दिसतो. बायकोचा पाठींबा, सुनांचे म्हणणे सगळे काही दिसते. स्वतः रॉमनींचे वडील हे मिशिगन राज्याचे गव्हर्नर होते आणि ते अध्यक्षिय निवडणूक लढू शकले नव्हते. पण वडीलांबद्दलचा आदर / आठवण रॉमनींच्या बोलण्यावागण्यातून दिसत होती. त्यांचे सपोर्टर्स, विमानातून, बस मधून फिरणे सगळे काही बघण्यासारखे आहे, कारण ते खरे चित्रिकरण आहे. अर्थात त्यांच्या धोरणात्मक बैठकांचे चित्रिकरण यात नाही, ते साहजीक देखील आहे. तरी देखील इतके स्वत:चे जाहीर करणे सोपे नाही असे पाहताना सतत वाटत राहीले.

२००८ साली रिपब्लीकन प्रायमरीतच जिंकण्याची शक्यता कमी दिसल्यावर एखाद्या न चालणार्‍या धंद्याविषयी जसे त्यांनी निर्णय घेऊन मोडीत काढले तसेच त्यांनी स्वतःची उमेदवारी मागे घेतली. २००१२ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणू़कासाठी मात्र ते रिपब्लीकन उमेदवार झाले. मात्र टोकाचे धंदेवाईक अशी जी काही त्यांची प्रतिमा आहे, त्याला ते जनतेच्या मनातून बदलू शकले नाही. त्याचा परीणाम म्हणून निवडणूक हरण्यात झाला.

त्या निवडणूक निकालाच्या रात्री जस जसे निकाल जाहीर होऊ लागले तस तशी अटळ गोष्ट दिसू लागली होती. बॉस्टनला त्यांच्या कँपेन हेडक्वार्टर मधे कुटूंबासमवेत बसून चर्चा करत असल्याचा टिपलेला क्षण बघण्यासारखा आहे. ओहायो आणि फ्लोरीडा राज्ये हातातून निसटू लागली तसे त्यांनी मान्य केले की आता जिंकणे शक्य नाही. मुलांना आणि कॅपेन मॅनेजरला विचारले, प्रेसिडंटचा (ओबामाचा) फोन नंबर काय आहे? इथल्या पद्धतीत हरलेला उमेदवार जिंकलेल्या उमेदवारास फोन करून हार मान्य करतो आणि जिंकलेल्याचे अभिनंदन करतो. मग स्वत:च्या सपोर्टर्ससमोर भाषण (कन्सेशन स्पीच) करायचे असते आणि मग जिंकलेला उमेदवार त्याच्या सपोर्टर्ससमोर जाऊन भाषण करतो...रॉमनींनी मग पटापट ५००+ शब्दाचे कन्सेशन स्पीच स्वतःच लिहीले, मुलांना वाचून दाखवले, किती शब्द आहेत आणि किती वेळात ते पूर्ण होईल या बद्दलचे अंदाज व्यक्त केले.

त्या रात्री जर ते जिंकले असते तर निर्वाचीत राष्ट्राध्यक्ष असते म्हणून त्यांच्या भोवती अभेद्य वाटावे असे सरकारी गुप्तहेर यंत्रणा आणि पोलीसांचे (एफबीआय, युएस मार्शल्स वगैरे) कडे होते. त्यांच्या नातवंडांपर्यंत प्रत्येकाला कोडनेम्स देऊन तयारी झालेली होती... पण कन्सेशन स्पीचला जायच्या आधी त्यांनी त्यांच्या मॅनेजरला सांगितले की सिक्रेट सर्विस एजंट्सना सांगा की माझी गाडी नसल्याने कदाचीत मला घरी जाण्यापुरती मदत लागेल नंतर ते जाऊ शकतात, आता गरज नाही...

शेवटी मला वाटते ते मुलाच्या गाडीत बसले मुलाने त्यांना ड्राईव्ह करून बॉस्टनच्या बाजूच्या बेलमाँट नावाच्या उपनगरात त्यांचे घर आहे तेथे सोडले. शेवटी कॅमेराकडे पाठमोरे बसलेल्या मिट्ट चा फक्त बायको समोर असताना उसासे सोडण्याचा आवाज ऐकायला येतो आणि तेथेच माहितीपट संपतो.

नाट्यराजकारणप्रकटनमाध्यमवेध

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Feb 2014 - 10:23 pm | पैसा

या पार्श्वभूमीवर राऊल बाबाचे झोपड्यांना भेटी देणे वगैरे आठवले. ते नेते धंदेवाईक असतील, तर आपल्याकडचे नट एवढाच फरक.

पिवळा डांबिस's picture

24 Feb 2014 - 11:40 pm | पिवळा डांबिस

पण जोपर्यंत मतदारांना ही नाटकं आवडतात तोपर्यंत ती तशीच चालणार...
आमच्या आजीच्या शब्दात सांगायचं तर, "मेल्या हातात खराटो घेतलंय तर मग झाडूक सुरवात कर! हीर कशे बरोबर नाय ह्येच्या तक्रारी कसले करतंय?" :)

स्पंदना's picture

25 Feb 2014 - 3:18 am | स्पंदना

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2014 - 1:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

लंबर वन !

आत्मशून्य's picture

25 Feb 2014 - 2:23 am | आत्मशून्य

करतो. मग
स्वत:च्या सपोर्टर्ससमोर भाषण (कन्सेशन स्पीच)
करायचे असते आणि मग जिंकलेला उमेदवार
त्याच्या सपोर्टर्ससमोर जाऊन भाषण
करतो...रॉमनींनी मग पटापट ५००+ शब्दाचे कन्सेशन
स्पीच स्वतःच लिहीले, मुलांना वाचून दाखवले,
किती शब्द आहेत आणि किती वेळात ते पूर्ण होईल
या बद्दलचे अंदाज व्यक्त केले.

मध्यंतरी मैट डेमोन चा अडजेस्टमेंट ब्यूरो बघितला...! त्यात साधारण हाच प्रसंग वेग्ळा चित्रित केला होता.

विकास's picture

25 Feb 2014 - 3:02 am | विकास

Mitt Romney म्हणून मिट्ट

मध्यंतरी मैट डेमोन चा अडजेस्टमेंट ब्यूरो बघितला...! त्यात साधारण हाच प्रसंग वेग्ळा चित्रित केला होता.

तो चित्रपट अजून पहायचा आहे. पण यातील विशेष असे की हे कलाकार नव्हते तर वास्तवातले History in Making चे चित्रिकरण होत

या माहितीपटात रॉमनीचे केवळ कुटूंबियच बहुतांशी दाखवले आहेत आणि त्यांच्याबरोबरचे संवादच आपण पहात असतो. पण त्या वेळेस जे काही ऐकले त्यानुसार त्याचे पाठीराखे त्याला हार लगेच मान्य करू नका असे सांगत होते, पण रॉमनी आणि (ह माहितीपट पाहील्यावर कळणारे) कुटूंबिय पाहून समजते की त्यांना असला काही खेळ आणि नंतर स्वतःचे हसे करून घेयची इच्छा नव्हती. तसे (आता सेक्रेटरी ऑफ स्टेट असलेल्या) जॉन केरी ने करून स्वतःचे (ironically बॉस्टन मधेच) हसे करून घेतले होते.

आत्मशून्य's picture

25 Feb 2014 - 11:20 am | आत्मशून्य

निवडणूकीत पराजय झाल्यावरचेही भाषाण कसे व्यावसायिकतेनेच तयार केलेले असते यावर मार्मीक बोट ठेवले आहे...! बाकी चित्रपट हा लव स्टोरी आहे. हॉलीवुडची यशराज फिल्म्स टाइप.

आवडेल पहायला ही डॉक्युमेंटरी.
असाच एक माहितीपट इंदिरा गांधींवरही पाह्यला होता. फक्त कौटुंबिक.

विकास's picture

25 Feb 2014 - 4:03 am | विकास

असाच एक माहितीपट इंदिरा गांधींवरही पाह्यला होता. फक्त कौटुंबिक.

माझ्या डोक्यात तेच आले होते की असा इंदिराजींवर चांगला होऊ शकला असता. तुम्ही कुठला म्हणत आहात?

खुप वर्षापुर्वी दुरदर्शनवर पाह्यला होता.
त्यात त्या राजीव गांधींना राजकारणात यायचा आग्रह करताना दाखवल्या होत्या.
बरचसा भाग त्या घरात फिरताना, तयार होताना, प्रियांका राहुल यांच्या बरोबर. अन मग कार्यालयाकडे निघताना असा होता. शोधावा लागेल. असेल की नाही देवजाणे. :(

सुनील's picture

25 Feb 2014 - 8:09 am | सुनील

जनातलं-मनातलं हा लेखनगट आणि मिट्ट हे नाव वाचून वाटलं की विकासरावानी काळोखावर एखादी कथा वैग्रे लिहिली आहे की काय? :)

माहिती आवडली. भारतात इंदीरा गांधींवर असा एखादा पट बनू शकला असता हे मान्य.

पुण्याचे वटवाघूळ's picture

25 Feb 2014 - 1:54 pm | पुण्याचे वटवाघूळ

लेख आवडला. डॉक्युमेन्टरी बघायला हवी.

तरीही विकास आणि 'जनातलं मनातलं' मध्ये लेख आणि तो ही डॉक्युमेन्टरीवर हे थोडे पटायला अवघड गेले.प्रत्येक मिपाकराची काहीतरी प्रतिमा आपल्या मनात असते.त्या मिपाकराने त्या प्रतिमेला अनुसरून नसलेले वेगळे लेखन केले तर ते थोडे पटायला अवघड जाते. अर्थातच काय लिहावे हा प्रत्येक लेखकाला हक्क आहे आणि तसे स्वातंत्र्यही आहे.पण माझ्यासरख्यांना ते पटायला थोडे अवघड जाते हे नक्कीच.

उद्या बंडामामा समजा कोणावरही टिका न करता काहीतरी संदर्भमूल्य असलेले लेख लिहायला लागले, नितीन थत्ते समजा काँग्रेसवर टिका करू लागले, पिवळा डांबिस त्यांची खुसखुशीत शैली सोडून गंभीर प्रतिसाद लिहू लागले किंवा क्लिंटन पाककृतीवर लिहायला लागलेत असे चित्रच डोळ्यासमोर उभे राहत नाही.पण असे काही प्रत्यक्षात होताना पाहिले तर त्याचा तात्कालिक धक्का बसतोच.तसाच (पण सुखद) धक्का विकासांच्या लेखाने बसला.

परत एकदा लेख आवडला हे लिहून माझे चार शब्द आवरते घेतो.

विकास's picture

25 Feb 2014 - 5:20 pm | विकास

तुमच्या "जर-तर" मधील वाक्यावाक्याशी सहमत. लेख आवडल्याबद्दल धन्यवाद.. पण आजपर्यंत मी वाटेल त्या विषयावर लिहीले आहे हो. अर्थात हे मोदी, केजरीवाल, हिंदूत्ववादी, सुडोसेक्यूलर्स, राजकारणी, समाजकारणी मला अडकवून ठेवतात असे म्हणणे असले तर ते १००% मान्य. ते सगळे शहाण्यासारखे वागले तर मला अथवा क्लिंटन/थत्ते यांना आमची दुकानेच बंद करावी लागतील. ;)

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2014 - 12:32 am | पिवळा डांबिस

तर मला अथवा क्लिंटन/थत्ते यांना आमची दुकानेच बंद करावी लागतील.

मिपा सुखी होईल, तिच्यायला!!! उगीच शिंचे वाद घालत बसतात!!! :)
ही राजकीय दुकाने बंद होऊन त्यांच्याजागी जर ह्या लोकांचेच बीयर-बार सुरू झाले तर किती मजा येईल?
काय मिपाकरांनो, कशी वाटतेय आमच्या आयडियाची कल्पना?

विकास's picture

26 Feb 2014 - 12:43 am | विकास

तुर्तास आम्ही केजरीबार काढला आहे! :)

बॅटमॅन's picture

26 Feb 2014 - 1:35 am | बॅटमॅन

प्रश्न वादाचा नै हो. त्या वादात स्वतःला काही बोलता येत नै त्याचा आहे ;)

वाद घालायला इतर चिक्कार इशय असताना हे इशय बघून अंमळ जळफळाट की काय तो होतो ;)

मदनबाण's picture

25 Feb 2014 - 4:14 pm | मदनबाण

मस्त ओळख करुन दिली आहे.
अशीच पण जरा वेगळ्या विषयावरची Al Gore's campaign ची An Inconvenient Truth हा माहितीपट पाहिला होता... मिपावर मला वाटतं कधी तरी याचा संदर्भ दिला होता.